I don't want born like this in Marathi Biography by PrevailArtist books and stories PDF | मला असा जन्म नकोय......

Featured Books
  • સંઘર્ષ - પ્રકરણ 20

    સિંહાસન સિરીઝ સિદ્ધાર્થ છાયા Disclaimer: સિંહાસન સિરીઝની તમા...

  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

  • સંઘર્ષ જિંદગીનો

                સંઘર્ષ જિંદગીનો        પાત્ર અજય, અમિત, અર્ચના,...

Categories
Share

मला असा जन्म नकोय......

एक कोणाच्या मनातली गोष्ट तुमच्यासमोर सादर करीत आहे नक्की वाचा

अअअअअअअ हॅलो ....

मला माहितीय मी जर हॅलो केलं तर तूम्ही मला response नाही देणार , कारण मी केलयचं असं.

त्यामुळे मी काही बोलण्याआधी माफी मागतो.माफी ह्यासाठी कि मी आल्यामुळे तुमच्या जीवनशैलीत खूप चेंजस आले आहेत आणि ते काही चांगले आहेत तर काही वाईट.

नमस्कार माझ्या.....अअअअअअअ
आता आपल्यात असं काही नातं नाही आहे त्यामुळे मी सरळच विषयावर येतो.

नमस्कार मी कोरोना विषाणू....
कृपा करून तुम्ही ऑडिओ बंद करू नका. मला माहितीय मी पूर्ण जगाला त्रास दिलाय, आणि अजूनही त्रास होतोय.

माझा जन्म एका चीन देशातून झालाय पण तो नक्की कसा झाला हे मला हि अजून कळालं नाही आहे.

मी पण एक अनाथ आहे , मला हि माहिती नाही आहे कि माझे आई-बाबा कोण आहेत ते, पण मी एक चांगलं सांगू शकतो कि खूप जणांना आपले आई-बाबा मिळाले असतील, कळलेही असतिल. मी आज जगात बघतोय ना कि खूप जण कुटुंब एकत्र राहत आहेत आणि हि आपल्यासाठी मोठी गोष्ट आहे. आज जे आई-बाबा गावाकडे एकटे राहत होते त्यांची मूल आता त्यांच्या सोबत एकत्र राहू लागलीयत, एकत्र राहिल्याने खूप काही गोष्टी तुम्ही एकमेकांना सांगत आहेत, एकत्र जेवण बनवत आहेत,नव नवीन खाद्य पदार्थाचा आस्वाद घेत आहेत.
आज पर्यंत जी मूल उठल्यावर आपल्या बापाला बघू शकत नव्हते ती आता पूर्ण पूर्ण दिवसभर बापाच्या सानिध्यात राहून खुश आहेत.
कोणाला नोकरी मुळे आपल्या कुटुंबाला वेळ देता येत नसे तशी सून घरच्यांना समजून घेते ,कोणाला हवं नको ते पाहतेय. तिच्या जॉब जाण्यामुळे तिची चिडणारी सासू आज तीच घरातून काम बघताना आय सुनेच्या कामाची कल्पना आली असेल. त्यामुळे तरी सासू सुनेबद्दल वाद कमी झाले असतील.
आज सगळ्यांचे दार उघडे आहेत त्यामुळे कोणाच्या घरी कोणता पदार्थ शिजला आहे ते कळतंय आणि तो एकमेकांना वाटून घेत आहेत.
आज सगळ्यांच्या घरी Work from Home concept सुरु आहे म्हणजे घरातून काम करणे, आणि ह्यामुळे आपण खुप आरामात काम करू शकतो पण आता कस होईल जस जसे दिवस घरातून काम करायची वाढत जातील तस तसे आपल्याला आपल्या कामाचं दडपण यईल कारण आपण ऑफिस मधून काम करताना आपल्याला सहकारी मदत करत असतात आणि आता आपण एकटेच काम करणार त्यात कोणीही सहकारीला आपली अडचडण सांगितली तर तो आपल्याला आढेवेढे कारण देऊन त्यातून पळ काढेल आणि तुम्हाला येणाऱ्या कामाचा त्रास होईल ,त्याचबरोबर बॉसचे येणारे मेसेजेस त्यातून तुम्हाला येणार खूप मोठं दडपणामुळे तुम्हाला जास्त ताण येईल आणि तुमची घरात चिडचिड सुरु होईल.
चिडचिड ह्यासाठी कि बॉस कंपनी वाचवण्यासाठी तुमच्या कडून काम करून घेणार आणि तेव्हाच तुम्हाला महिन्याला मोबदला मिळणार , जर तुम्ही नीट काम केलं नाही तर तुमचा पगार , तुमच्या नोकरीवर खूप परिणाम तुम्हाला पाहायला मिळेल.

आज पर्यंत तुम्ही पाहिलं असेल , दर महिन्याला खूप घटस्फोट प्रमाण खूप असायचे. आता माझ्या येण्याने कमी झालं कमी झालं कारण आता तुम्ही एकमेकांना समजायला लागले असाल , सतत मदत करून तुम्ही समजून घेत असतील

आज पर्यंत खूप गुन्हे झालेले पण माझ्या येण्याने ८०% गुन्हे कमी झाले असतील कारण गुन्हे करायला माणसांचा सपोर्ट असंण गरजेचं आहे आणि तो ह्या दिवसात मिळत नसल्याने गुन्हे कमी झाले आहेत. एक म्हण आहे कि "टाळी कधी एका हाताने वाजत नाही".

माझ्या येण्याने तुमच्या मधील बहुतेक शे आजार कमी झाले असतील कधीही त्यांचा उल्लेख होत हि नसेल, कारण तुम्ही सगळे स्वतःच्या घरी राहून शिजवलेलं अन्न खात असाल मग तुम्हाला कळून चुकेल असेल कि बाहेरच अन्न किती धोकादायक असत आपल्या शरीराला.

मला नाही माहिती कि मी किती दिवस आहे ह्या पृथ्वीवर?
पण जेवढे दिवस आहे तेवढे दिवस तुम्ही आनंदी राहून सकारात्मक विचार करून तुम्ही ह्या पृथ्वीवर राहाल.

माझ्यामुळे तुम्हाला सकारात्मक फरक पडेल म्हणजेच काही जण घरात बसून नव नवीन पदार्थ,गोष्टी, इत्यादी करत असणार.
नकारात्मक गोष्टी म्हणजे सतत चार भिंतीत राहून वेग वेगळे वाईट विचार मनात येतील, लग्न झाले असेल तर सतत घरातल्या कामावरून भांडण होणार, सतत एकमेकांचा द्वेष करणार तुम्ही आणि ह्यात लहान मूळ बळी पडणार, रिकाम्या वेळेत काय नवीन करू शकतो हा विचार येईल पण आपण तो अमलात नाही आणणार कारण आपल्यामध्ये आळसाने जागा घेतली असते, बसून बसून आजार वाढतील,रिकामं डोकं शैतानाच घर असेल ,
घरात बसून नीट काम होत नाही म्हणून कोणाची नोकरी जाईल, कोणाला अर्धा पगार मिळेल त्या पगारात पूर्ण घर चालवायचं हे चेलेंज असेल , एका वेळचं शिजवणे पण कठीण होऊन बसेल. असे खूप समस्या येतील.

खूप जण माझा शोध लावत आहेत, मी कुठून आलो,कसा आलो, मी काय काय करु शकतो असे वेग वेगळे खूप तर्क लावत असतील सायंटिस

मला माहितीय मी आल्याने तुमच्या पूर्ण जीवन शैलीत खुप मोठा फरक पडला आहे , मी आलोय खरा पण मला संपवण्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करायला हवे कारण आणि तो प्रयत्न तुम्ही स्वतःला एकत्र राहून,समजून घेऊन करायला हवे.
हि तुमची एकट्याची लढाई नाही आहे माझी पण आहे कारण मी खूप वाईट जन्माला आलोय ,आणि मला तसा जन्म नकोय ,मलाही त्रास होतो कोणाला माझ्यामुळे प्राण गमवावे लागले तर त्यामुळे एकत्र चांगले राहा ,सुरक्षित राहा काळजी घ्या.
धन्यवाद