Is that One Murder in Marathi Crime Stories by PrevailArtist books and stories PDF | एक हत्या अशी ही......

Featured Books
Categories
Share

एक हत्या अशी ही......

आज खूप राग आला होता सविताला तिला वाटलं की आज तरी आई समजून घेतील, पण झालं उलटंच सविताची रोजची दगदग त्यात तिला होणारा त्रास ती त्यातलं काही सांगू शकत नव्हती कारण, तीच ऐकणारे असे कोणीही नव्हते तिचा नवरासुध्दा तीच ऐकत नसे. आज ती पूर्णपणे एकटी पडली होती. खरंतर घरच्यांचा विरोधात लग्न केलं होत तिने, सर्वांप्रमाणे सविताने पण लग्नाची खूप स्वप्न पहिली होती.
सविताचा नवरा प्रसाद आधीपासुन म्हणजेच लग्नाच्या आधी तिच्या करिअरला पाठींबा द्यायचा आणि तोच पाठिंबा आज लग्नानंतर त्याचा कमी दिसायला लागला तो फक्त तिला इतकं म्हणायचा," सविता हे बघ तुझी नोकरी आहे ठीक आहे पण घरातलं सगळं आवरून जायचं आणि त्याचबरोबर माझ्या आईबाबांकडे पाहायचं त्यांचा नाष्टा-दुपारचं जेवण-रात्रीच जेवण आणि त्यांची औषध हे सगळं पाहायचं त्यांना त्रास नको असं काय वागू नकोस ".
हे प्रसाद किती सहजरित्या तिला बोलून गेला, कारण रोजच हे सगळं करेपर्यंत दिवसभर तिची दमछाक होई आणि जर बरोबर नाही झालं तर , प्रसादचा ओरडा आणि सासुसासऱ्यांचे बोलणं हे समोर मांडलेलं असायचे, भरल्या घरात वाद नको म्हणून सविता निमूटपणे सगळं आवारायची आणि गपगप्प राहायची. पण खर सांगायचं म्हटलं तर सविताने इतकं करायची गरज नाही ती एक सक्षम महिला आहे,स्वतःच्या पायावर उभी आहे, ती तिच्या हक्काप्रमाणे राहू शकते ,ती तशी वागायची नाही कारण लोक काय बोलतील ह्या विचाराने ती शांत असायची,पुढे जे काही होईल,काय बोलतील ते ती गिळून टाकत असे आणि पुढे जात असे.
जर तिला कामावरून यायला उशीर झाला तर सासुसासरे रागवायचे, सासू मुद्दामून बेसिंगमध्ये भांड्यांचा रास करून ठेवायची जेणेकरून तिला त्रास होईल, सविताला हे पाहून राग यायचा आणि त्याच रागाच्या माध्यमातून तिच्या डोळ्यात पाणी यायचं आणि मुकाट्याने सगळी काम करायची.
आपण झी मराठी बघतो त्यात एक मालिका आहे "अग्गबाई सासूबाई" त्यात शुभ्रच्या सासूला कळत कि आपली सून नोकरी करते तेव्हा तिला खूप आनंद होतो. हे असं का..?? का तर जे आपल्याला मिळाल नाही करायला ते आपली सून करतेय. ह्या मालिकामध्ये आसावरी(सासू) शुभ्र।ला(सुनेला) प्रत्येक घरातील गोष्ट समजावून सांगते, ह्याउलट शुभ्रा बाहेरची दुनिया कशी आहे, हे समजवण्याचा प्रयत्न करत असते. आपण आत्मविश्वासाने बाहेरील जगात कस वावरायच हे शिकवत असते म्हणजेच काय तर एक बाहेरील विश्व दाखवते आणि दुसरी आतील विश्व दाखवते ह्याच्यांत सासू सुनेच नातं कमी मैत्रीचं नातं अधिक दाखवलेलं आहे. अश्याच प्रकारे सविताची सासू सविताला समजावून घेतलं तर त्यांचं संसार किती सुखाचा होईल.

एकदिवस ती सकाळी किचनमध्ये जाते दुध गरम करायला ठेवते आणि थोड्यावेळाने अचानक सविताच्या पोटात दुखायला लागलं आणि तीला खूप त्रास होतो, ती जमनीवर पडते कोणाला त्रास नको म्हणून ती ओरडत नाही, त्रास बंद होईल या आशेने ती तशीच विव्हळत पडलेली असते,आता ती उठायचं प्रयत्न करते आणि तिला उठता येत नव्हतं कारण तिच्या आजाराने तिला पुरत गिळल होत. काही वेळाने सविताची सासु उठते तेव्हा त्यांना काहीतरी करपल्याचा वास येतो त्या किचनमध्ये जातात तर दुधाचं पातेलं करपलेल असतं आणि बाजूला सविता पडलेली दिसते आईच्या ओरडण्याने प्रसाद आणि बाबा बाहेर येतात ,सविताच्या तोंडावर पाणी मारतात ,ती उठत नाही हे बघून लगेच तिला दवाखान्यात हलवतात, दवाखान्यात गेल्यावर काळत तिची प्राणज्योत सकाळीच मावळली होती. डॉक्टरांनी सांगितलं," तिला एक आजार होता महिन्यापूर्वी आम्ही तिला सांगितलं होत की लवकरात लवकर उपचार करायला हवेत नाहीतर तुमच्या जीवाला धोका आहे, पण आपल्याला ह्यातल्या कोणत्याच गोष्टीची कल्पना नाही हे जेव्हा प्रसादला समजत तेव्हा तो स्वतःचाच राग करायला लागतो कारण त्याला आठवत सविताने आपल्याला एकदोनदा सांगायचं प्रयत्न केला होता पण आपल्याच विश्वात दंग होतो, मित्रांच्या पार्टीत, आपली नोकरी,जर आईबाबांना त्रास झाला तर तिला वाट्टेल तसे बोलणं आणि ती आजपर्यंत फक्त आपलं गप्प राहून सगळं सहन करत होती आणि त्यात आपण तिच्याकडे लक्षच नाही दिल हि खूप लाजिरवाणी गोष्ट आहे आपल्यासाठी, तो तेव्हापासून तिच्या आठवणीत फक्त रडत बसतो कारण त्याने एका व्यक्तीच्या मनाची हत्या केलेली असते आणि ह्या हत्येच त्याच्या मनावर आयुष्यभर दडपण असणार.

आता आपल्या समाजात असे अनेक सविता असतील,कि जे अजूनही न बोलता सहन करत असतील, अश्या सवितानां आपल्या जिव्हाळ्याच्या माणसांची गरज असते म्हणजेच मुलगी लग्न करून सासरी जाते तेव्हा ती सासुसासारे नाही आई-वडील शोधत असते, नंणद नाही एक बहीण शोधत असते आणि त्याचबरोबर आयुष्यभरासाठी आपण ज्याला निवडलय त्याचा सहवास,समजूतदारपणा,प्रत्येक कठीण गोष्टीत आपल्याला साथ देणारा साथी ती शोधात असते.