Julale premache naate - 50 in Marathi Fiction Stories by Hemangi Sawant books and stories PDF | जुळले प्रेमाचे नाते - भाग-५०

Featured Books
  • नेहरू फाइल्स - भूल-59

    [ 5. आंतरिक सुरक्षा ] भूल-59 असम में समस्याओं को बढ़ाना पूर्व...

  • 99 का धर्म — 1 का भ्रम

    ९९ का धर्म — १ का भ्रमविज्ञान और वेदांत का संगम — 𝓐𝓰𝓎𝓪𝓣 𝓐𝓰𝓎...

  • Whispers In The Dark - 2

    शहर में दिन का उजाला था, लेकिन अजीब-सी खामोशी फैली हुई थी। अ...

  • Last Benchers - 3

    कुछ साल बीत चुके थे। राहुल अब अपने ऑफिस के काम में व्यस्त था...

  • सपनों का सौदा

    --- सपनों का सौदा (लेखक – विजय शर्मा एरी)रात का सन्नाटा पूरे...

Categories
Share

जुळले प्रेमाचे नाते - भाग-५०

डायनिंग टेबलवर आम्ही सगळं छान ठेवलं होतं.. डाळ, भात, बटाटा भाजी.., श्रीखंड-पुरी.., अळुवड्या.., पापड-लोणचं आणि बाबांचे आवडते गुलाबजामुन.. अस साधं पण सर्वांना आवडेल अस जेवण होत..

डायनिंग टेबलवर समोर बाबा तर बाबांच्या बाजुला आजोबा.. आजोबांच्या समोर आजी.. आजीच्या बाजूला मी आणि माझ्यासमोर निशांत.. आणि बाबांच्या समोर आई.
असे सगळे आम्ही बसलो होतो.

"घ्या सगळ्यांनी पोटभर जेवा हा..." आईने सर्वांना सांगितलं. तस मी ताटातील श्रीखंड पुरीवर ताव मारला.. समोर निशांत होताच.. ज्याची नजर फक्त माझ्यावर होती.., पण मी काही त्याच्याकडे बघत नव्हते..

"का बघु मी...?? मी असताना कोणी दुसरं त्याला ओवाळावे.. मी कस सहन करू ना.." हे सगळं मी माझ्या मनात बोलत होते आणि एक कटाक्ष निशांतवर टाकला..
पण त्याचा गोड हसरा चेहरा मला राग विसरायला लावत होता..

"पण नाही. अस विरघळून नाही चालणार.." स्वतःच्या मनाशी बोलून मी माझी मान खाली घालून जेवत बसले..

जेवुन आम्ही गप्पा मारत बसलो तेव्हा ही मी निशांतकडे बघत नव्हते.. नाकावर राग होताच.. नंतर स्वतःच्या रूममधे गेले आणि झोपायचा पूरेपूर प्रयत्न चालू केले.. पण झोप काही येत नाही बघून मी पुस्तक काढुन वाचत बसले..
पण त्यात ही मन रमत नव्हतं.. काही तरी टाईमपास करावा म्हणून मी खितकीत जाऊन बसले...


"दुपारची ऊन्ह आता परतत होती... सकाळपासून आग ओतणारा सुर्यदेवही आता शांतपणे ढगांच्या मागे जाऊन दडला होता... ढग मात्र उगाचच इकडून तिकडे उड्या मारत होते... तर काही पक्षी त्या शांत वातावरणात समोरच्या गार्डनमध्ये सभा भरावी असे एकत्र येऊन कलकलाट करत होते.. मधेच एखादं लहान मुलं येऊन त्यांना भिरकावून लावत आणि ते ही किती लबाड बघा ते परत येऊन आपल्या जागी बसत.."


हा खेळ मी खिडकीत उभं राहून बघत होते की माझ्या खांद्यावर एक हात येऊन विसावला... तो शांत, गरम हात निशांतचा होता..

"काय ग हनी-बी... तुझं काय बिनसलं आहे.??? नीट बोलत नाहीसच पण बघत ही नाही आहेस. नक्की काय झालंय सांगणार आहेस का..??" त्याने शांतपणे विचारल..

"काही नाही..." मी ही स्वतःच तोंड वाकड करून समोर बघत बसले...

"तु सांगणार नाहीस तर कस कळणार बाळ..??" त्याच्या हळव्या आवाजाने माझा इतका वेळ थांबवून ठेवलेला बांध सुटला आणि मी त्याला बिलगून रडु लागले...

"तु का अस वागतोस खडूस..??? तुला महित आहे ना माझं तुझ्यावर किती प्रेम आहे आणि तु अस कोणाशी तरी बोलावसं" मी स्वतःला त्याच्यापासून दूर करत त्याला विचारलं..

"मॅडम कशाबाबद्दल विचारत आहेस तु..???" त्याने प्रश्नार्थक चेहऱ्याने माझ्याकडे पाहिलं...

"मी ऐकल सगळं. तु सकाळी तिला सांगत होतास ना, "तुझ्याशिवाय माझी दिवाळी ही दिवाळी सारखी नाही जाणार... त्याच "तिच्या बद्दल" मी विचार आहे." मी स्वतःच्या हातांची घडी घालत विचारल...



"अरे ती... काय ग तु.. रडकुबाई.. रिया बद्दल बोलत बाहेस वाटत तु... ती माझ्या मामाची मुलगी आहे.. दर दिवाळीत ती येते पण या दिवाळीत ती तिच्या काकांकडे म्हणजे युके ला गेली आहे.. सो ती आज ऍन्ड आहे आपल्या या घरी काएन आम्ही इथे आहोत सो मी तिला इथेच बोलावून घेतलं आहे... तशी ती कधी भाऊबीज करत नाही पण या वर्षी करायला सांगणार आहे.. कारण मला माझी पाडवा साजरा करणारी जी भेटली आहे..." निशांतने डोळा मारत स्वताच बोलण उरण केलं तशी मी लाजले..


"काय रे खडूस किती हा गोंधळ.. नीट सांगायचं ना तु...मी तर गैरसमज करून घेतला ना.." स्वतःच्या कानांना धरून मी निशांतची माफी मागितली.

"तु बघत नव्हतीस माझ्याकडे आणि म्हणे नीट सांगायचं.. कस सांगणार माणूस... त्यासाठी बोलावं लागत ना."
आता निशांत लटक्या रागात बोलत होता.


To be continued