callgirl - 4 in Marathi Love Stories by Satyajeet Kabir books and stories PDF | कॉलगर्ल - भाग 4

Featured Books
  • My Wife is Student ? - 25

    वो दोनो जैसे ही अंडर जाते हैं.. वैसे ही हैरान हो जाते है ......

  • एग्जाम ड्यूटी - 3

    दूसरे दिन की परीक्षा: जिम्मेदारी और लापरवाही का द्वंद्वपरीक्...

  • आई कैन सी यू - 52

    अब तक कहानी में हम ने देखा के लूसी को बड़ी मुश्किल से बचाया...

  • All We Imagine As Light - Film Review

                           फिल्म रिव्यु  All We Imagine As Light...

  • दर्द दिलों के - 12

    तो हमने अभी तक देखा धनंजय और शेर सिंह अपने रुतबे को बचाने के...

Categories
Share

कॉलगर्ल - भाग 4

प्लान तर fantastic च होता. यशला त्यामुळे हुरूप आला. आशेचा नवा किरण दिसू लागला.
“अनु प्लान तर excellant आहे पण माझ्यासोबत राहायला कोण येईल?”
“ते तू माझ्यावर सोड रे, फक्त पैसा खर्च करायची तयारी ठेव.”
“हा जॉब वाचवण्यासाठी मी पाण्यासारखा पैसा खर्च करायला तयार आहे.”
“but are you OK with this?”
“I am Ready. पण अनु मी काय म्हणतो, तूच का येत नाहीस माझ्यासोबत?”
हे ऐकून अजय वैतागला.

“अरे तुझ्या जिभेला काही हाड? आम्ही तुझं घर बसवायचा प्लान करतोय, अन तू माझाच संसार उठवायला निघालास. आणि काय रे वाहिनी ही आईसमान असते ना? अन तू चक्क अनुला बायको म्हणून घेऊन जाणार?”

“अरे बाबा, मी तिला आईसारखंच treat करेल. काय अनु तुला चालेल का?”
“I am ready, तू अजयला समजावं.”
“ए आज्या, प्लीज रे. फक्त एक महिन्याचा प्रश्न आहे. प्लीज रे.”

“NO नाही, अजिबात नाही, एकतर conference मुळे ती पंधरा दिवस बंगलोरला होती, त्यामुळे मला बिलकुल करमत नव्हतं. आणि पुन्हा आता महिनाभर, never. त्यापेक्षा तू जॉब का सोडत नाहीस?”

अजयची अगतिकता पाहून यश अन अनु हसायला लागले.

“खरंच यश मी तुझ्यासोबत आले असते. पण टार्गेट्स इतकी डोक्यावर आहेत की, month end च्या आधी यम जरी आला, तरी त्याला तुझं जे काय असेल ते month end नंतर असंच सांगेल.”

“मग आता काय करायचं?”
तू पण ना यार, तुला साधी गर्लफ्रेंड सुद्धा नाही. कॉलेज ला असताना एवढ्या मुली तुझ्या मागे होत्या, एकीलाही हो म्हणाला नाहीस. आत्ता कामी आली असती. अजयने बघ बरं लगेच मला प्रपोज केला. शिक यार तुझ्या मित्राकडून.”

“उनमे वो बात नही थी यार, आणि अनु तुझी गोष्ट वेगळी आहे. तू ‘हो’ म्हणवीस म्हणून आज्याने सिद्धिविनायकाला साकडं घातलं होतं. आणि आजही तो दर मंगळवारी सिद्धिविनायकाला जातो.”

“खरंच अजय. I love you dear.”

“ए गप ..... उगाच काहीतरी सांगू नकोस. माझी गणपतीवर श्रद्धा आहे म्हणून मी जातो. काहीतरी फालतू बोलू नकोस.”

“मी फालतू बोलतोय? अरे मी जर सोबत नसतो तर अनुने तुला कधीच हो म्हणल नसतं.”

“ही गोष्ट खरी आहे हं. अजय ने प्रपोज केल्यावर मी सुद्धा विचार केला की, जो मुलगा यश प्रधान चा बेस्टफ्रेंड आहे, त्या मध्ये नक्कीच काहीतरी guts असणारच.!!!”

“पण एक गोष्ट सांगतो अनु, जर माझ्यासोबत आज्या नसता तर मी आज इथपर्यंत पोचलोच नसतो. त्याने माझ्यासाठी जे केलंय ते दादा पण करू शकला नसता. He is my brother from another mother.”

“I know यार. तुमचा जर्नी मी पहिला आहे. I am proud of your frendship. sorry our frendship.”

“So, तर मग आम्ही दोघं तुझ्यासाठी डमी वाईफ सर्च करतो, तोपर्यंत तू लिव्ह घेऊन मुंबईतच थांब. जर प्लान workout झाला, तर बायकोला सोबतच घेऊन जा.”
यशला अनुचं म्हणणं पटलं. तो मुंबईतच थांबला.
x x x x x

दुस-या दिवशी दुपारी यशला अनुचा कॉल आला. “हँलो यश, संध्याकाळी सात वाजता ‘कँफे आयरिश हाउसला’ ये. तुझी would be वाईफ शोधली आहे. तुम्ही दोघं भेटा, बोला अन डिसिजन घ्या.”

संध्याकाळी ‘कँफे आयरिश हाउस’मध्ये यश, अजय अन अनुजा यशच्या would be वाईफ ची वाट पाहत होते. यशचं हृदय उगाचच धडधडत होतं. तो मनात तिची इमेज तयार करत होता. एवढ्यात अनुने कुणाला तरी हात केला. यशने पाठीमागे वळून पाहिलं. एक मुलगी त्यांच्याच टेबलाकडे येत होती. तिने जीन्सवर लाल रंगाचा टाँप घातला होता, त्यावर पांढऱ्या रंगाचं जाकेट घातलं होतं. खांद्यावर मिनी पर्स होती. अनुकडे पाहत ती टेबलाजवळ आली. तिच्या चेहऱ्यावर स्माइल होतं. अनुने तिला मिठी मारली.
“हाय डार्लिंग, how are you? looking gorgeous…!!!”
“I am fine अनु. तू बेंगलोरहून कधी आलीस?”
“मी saturday लाच आले हनी....!!! मीट माय फ्रेंड्स. अजयला तू ओळखतेसच...आणि हा आमचा बेस्टफ्रेंड यश प्रधान. काल आपण या subject वर discuss केलं आहेच. आणि यश मीट माय फ्रेंड जेनी.”
यशने तिला hello म्हंटल. तीही यशकडे पाहून गोड हसली.

डिनर चालू असताना त्यांच्या गप्पा चालू होत्या. त्यावेळी यश जेनीचं निरीक्षण करत होता. जेनी दिसायला खूपच सुंदर होती. शुभ्र गोरा रंग, मोठे डोळे, रेखीव धनुष्याकृती भुवया, सरळ नाक, तिने गुलाबी ओठावर लावलेला हलकासा ग्लाँस फारच मोहक होता. तिच्या गुलाबी ओठांवरती डाव्या कोपऱ्यावर असलेला ‘तीळ’ तिचे सौंदर्य आणखीच वाढवीत होता. तिचे काळेभोर लांब केस तिने खांद्यावरून पुढे घेतले होते. त्या चमकदार केसांना यशला स्पर्श करून पहावासा वाटत होता. ती बोलताना जेव्हा पापण्या मिटायची तेव्हा पापणीचे केस तिच्या चेहऱ्याला हळुवार स्पर्श करायचे. ती हसली कि तिच्या गालावर आणि हनुवटीवर खळ्या पडायच्या. यश तिच्याकडे भान हरपून पाहत होता. ‘ही सुंदर मुलगी जर आपल्या सोबत राहायला आली तर काय बहार येईल’ या विचारात तो हरवला होता. एवढ्यात अनुच्या बोलण्याने तो भानावर आला.
“यश, तू डेझर्टसाठी काय घेशील?”
“अं? माझ्यासाठी बटरस्काँच आईसक्रीम सांग.”
“आणि जेनी तू?”
“मला व्हँनीला आवडेल.”

थोड्यावेळाने अजयने अनुला खूण केली. तशी अनुजा म्हणाली,
“यश, तुम्ही दोघं एकमेकांशी बोलून घ्या. जेनीला मी तुझ्याबद्दल थोडी आईडिया दिलीच आहे. पण तुमचे काही डाउटस् असतील तर क्लिअर करून घ्या. आम्ही दोघं बाहेरच आहोत.”
अनु नि अजय बाहेर गेले. आणि टेबलावर आँकवर्ड सायलेन्स पसरला. थोडा वेळ कुणीच कुणाशी बोललं नाही. त्या शांततेचा भंग करत यश म्हणाला,
“मी यश प्रधान, पेट्रोकेमिकल इंजीनिअर आहे. तू काय करतेस जॉब की .........?”
“मी वेलणकर कॉलेजला आहे. appearing masters in pharmacy last year.”
जसजसा वेळ गेला तसं तसं त्यांच्या गप्पा वाढू लागल्या.
यशने त्याच्या जॉबची सगळी स्टोरी सांगितली.
“तुला कॉलेज बुडवून एक दीड महिना बाहेर राहायला जमेल का?”
“माझी annual exam last week मध्ये संपली. त्यामुळे आता दोन महिने vacations आहेत. नवीन टर्म जुलै मध्ये स्टार्ट होईल. तोपर्यंत मी फ्री आहे.”
“गुड... तुला आणखी काही विचारायचं आहे का?”
“हो, म्हणजे, एक महिना out of station राहायचं असल्याने माझे काही प्लान disturb होणार आहेत. म्हणून मी माझं पेमेंट जास्त सांगितलं आहे. मी पेमेंट आणि other expenses मध्ये निगोसिएशन करू शकणार नाही. तसं मी अनुशी discuss केलं आहे, आणि तुम्हालाही कल्पना देते. म्हणजे......”

“don’t worry about payments. I will discuss with अनु. तू तुझ्या फँमिलीला सोडून माझ्यासोबत as a wife म्हणून येत आहेस this is big thing for me. तू या आधी अशी कुठे गेली होतीस?, किंवा काही अनुभव आहे का?”
“नाही.. म्हणजे night stay escortship चा experience आहे, पण तो फक्त दोन ते तीन दिवसांचा....एक महिना तेही out of station मी ही पहिल्यांदाच जात आहे.”
“तिच्या बोलण्याचा अर्थ यशला कळला नाही. night stay escortship म्हणजे काय? जाऊ दे . असेल काही तरी.”
त्यांचं बोलणं पुढ चालू राहिलं. आणि अचानक यश बोलता बोलता थांबला. night stay escortship? अचानक त्याच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. night stay escortship म्हणजे ही मुलगी sex worker आहे. O, fuck! एक sex worker मुलगी माझ्यासोबत as wife म्हणून येणार? या विचारानं त्याचं डोकच भनाणलं. समोर जेनी काहीतरी बोलत होती, पण तिचं बोलणं यशच्या कानापर्यंत जात नव्हतं. त्याने मोबाईलवर कॉल आल्याचं नाटक केलं. आणि रेंजसाठी बाहेर उठून आला. त्याने समोर पाहीलं तर गार्डनमध्ये बेंचवर अजय आणि अनु बसले होते. तो तणतणतच त्यांच्याकडे गेला.
“are you mad? मला वेड्यात काढताय का तुम्ही दोघं? माझी मदत करताय का चेष्टा करताय?” यश संतापानं अजयवर ओरडला.
“यश काय झालं तुला चिडायला? काही प्रॉब्लेम झालाय का?”
“प्रॉब्लेम? यार तुम्ही जीवाभावाचे मित्र म्हणून तुम्हाला मदत मागितली, आणि तुम्ही मदत करायची सोडून मला चुत्या बनवताय?”
“अरे शांत हो. काय झालं ते तरी सांगशील?”
“काय झालं म्हणून काय विचारतोस? मला डमी wife च्या नावाखाली sex worker सोबत रहायला सांगताय? what the f*** यार, जरा तरी लाज बाळगा. ही मदत करायची पद्धत झाली का?”
“मग तुला काय प्रॉब्लेम आहे? तुला तिच्यासोबत लग्न करायचं आहे का?”
“shame on you आज्या. माझ्यावर वेळ आली म्हणून तू मला prostitute सोबत रहायला सांगतोस? these things are not expected from both of you.”
“मुर्खासारखं बडबडू नकोस. आणि prostitute काय म्हणतोस तिला? जरा तरी लाज वाटू दे.”
“अरे ती night service देते. she is a sex worker. तिला prostitute नाही तर आणखी काय म्हणू? वेश्या आहे ती वेश्या? तुला कळतंय का? मी काय म्हणतोय ते?”
यश रागात असल्याने समजावण्याच्या पलीकडे गेला होता. अजयने अनुकडे पाहिलं. तिचा चेहरा रडवेला झाला होता. शेवटी हा प्लान तिचाच होता. तिने यशला जेनीबाबत काहीच कल्पना दिली नव्हती.
“माझे दिवस खराब चालू असतील कदाचित, पण एका वेश्येसोबत रहायची वेळ यावी इतके खराब नक्कीच नाहीत.”
“enough यश” अजय ओरडला. “वेश्या काय म्हणतोस? तुला तिच्याबद्दल काय माहिती आहे? एखाद्याला या पद्धतीनं जज करनं पटतं का तुला? निघ, चालता हो इथून. माझ्या डोळ्यासमोर अजिबात थांबू नकोस.”
यशही तणतणतच निघाला. टँकसी करून सरळ फ्लँटवर आला. अजूनही तो संतापातच होता. थोड्या वेळाने अजय-अनुही घरी आले. अजय यशच्या बेडरूममध्ये आला.
“यश मी काय बोलतो ते ऐकून तर घे.”
“आधी मी जे बोलतो ते ऐकून घे.”
“बोल तू बोल. पहिल्यांदा तुझं होऊ दे.”
“आज्या, मी सिम्पली तुझ्याकडे मदत मागितली. तुझा आणि अनुचा प्लान चांगला आहे. त्या बद्दल no doubt. but तो प्लान एका prostitute सोबत कसा काय workout होऊ शकतो?”
“तू मूर्ख आहेस का? prostitute prostitute काय म्हणतोस? मान्य आहे की ती कॉलगर्ल आहे, पण ती वेश्या नाहीये यार.”
“मग कॉलगर्ल आणि prostitute मध्ये काय फरक आहे? sex worker ती sex worker. नाव बदलल्यानं असा काय फरक पडतो?”
“आहे नक्कीच फरक आहे. वेश्या शरीराचा व्यापार पैश्यासाठी करते. पैसा हेच तिचं सर्वस्व असतं. त्यासाठी ती काहीही करायला तयार असते. तिला फक्त पैसा हवा असतो. समोरचा कस्टमर कोण आहे याच्याशी तिला काहीही घेणं-देणं नसतं. शरीराचा व्यापार करणे एवढंच तिला माहित असतं. सकाळी उठायचं, मेक-अप करायचा, आणि रात्री जागायचं, वर्षानुवर्ष हेच तिचा आयुष्य असतं. पण कॉलगर्लच तसं नसतं यार, ती शरीराचा व्यापार पैशासाठी करत नाही. ती शरीराचा व्यापार करते ते जगण्यासाठी...... तिचं पर्सनल लाइफ वेगळं असतं. त्यासाठी तिला पैसा लागतो. तो ती या मार्गानं मिळवते. पैश्याची गरज भागली की ती त्या वाटेला जात देखील नाही. जेनीचचं उदाहरण घे, ती m.pharmacy ची student आहे,

तिला फीससाठी, स्वतःच्या रेंटसाठी पैसा लागतो, तिची फँमिली तिच्यावर डिपेंड आहे. यार ती काही रोज उठून sex work करत नाही. आणि आपण कॉलेजला असताना किती तरी मुली night service द्यायच्या. त्यातल्या कितीतरी आपल्या फ्रेंड होत्या. आज बऱ्याच जणींची लग्न झाली आहेत. बऱ्याच जणींनी शिक्षण पूर्ण करून जॉब सुरु केला आणि हे काम सोडलंय. त्या सर्वांनाच तू prostitute म्हणणार का? तू इतका सनातनी असशील असं वाटलं नव्हतं. आणि एक गोष्ट लक्ष्यात ठेव, वेश्या काय किंवा prostitute काय, त्या हे काम करतात म्हणून तुझ्या माझ्या घरातील स्त्रिया सुरक्षित आहेत. त्या जर नसत्या तर आपल्या बायकांना रस्त्यावर चालणं मुश्कील झालं असतं. आणि आपला कामधंदा सोडून कोण येणार आहे तुझ्यासोबत राहायला? ते ही तुझी बायको म्हणून? तुला या गोष्टीचा एवढाच प्रॉब्लेम असेल तर जॉब सोडून दे. माझं काहीच objection नाहीये.”
यशला अजयचं म्हणणं पटलं. हळूहळू तो शांत झाला. त्याला त्याची चूक लक्ष्यात आली. आपण असं वागायला नको होतं. त्याला गिल्टी फील व्हायला लागलं.
“पण जेनी दुसरं काम का नाही शोधत?”
“”तुला काय वाटतं तिने प्रयत्न केले नसतील का? कोणती मुलगी आपलं profession म्हणून ही field निवडते?”
“sorry यार आज्या, मी माझ्या प्रॉब्लेम्समुळे एवढा आंधळा झालो की, मला समोरचं काहीच दिसत नव्हतं. माझं माझ्यावरच नियंत्रण राहिलं नाही. मी फारच चुकीचं वागलो.”
“आणि यश, एक गोष्ट तुझ्या लक्ष्यात आली का? ती कॉलगर्ल आहे हे तिने स्वतःहून सांगितलं. वाटलं असतं तर ती लपवूही शकली असती. यातून तुला ती प्रामाणिक वाटत नाही का? आणि ती कॉलगर्ल आहे हे मला आणि तुलाच माहित आहे. कोकणात गेल्यावर तिथल्या लोकांसाठी ती तुझी बायको आहे. आणि don’t worry, तू साईटवर गेल्यावर ती काही दुसऱ्यांना service देणार नाही. मला तिच्या लॉयल्टीवर पूर्ण भरवसा आहे.”

“please यार आज्या, अजून embarrass नको करू. मला तिचा नंबर देशील? मी तिला डायनिंग टेबलवर एकटच सोडून आलो. तिला काय वाटलं असेल. मला तिला sorry म्हणायचय.”
“sorry म्हणायचं असेल तर आधी अनुला म्हण, बघ जरा, तुझ्या वागण्यामुळे ती किती दु:खी झालीये. गाडीतून येताना ती अक्षरश: रडत होती. आणि तुला माहित आहे का? जेनी अनुची childhood फ्रेंड आहे. अनु तिच्या बाबतीत खूपच पझेसिव्ह आहे. ती जेनीला स्वतःची बहिण मानते. आणि तू मात्र तिच्या समोर असं वागलास. तिला वेश्या म्हणालास. say sorry to her.”

“oh shit! यार, मी तर अनुचा विचारच केला नव्हता. ती कुठे आहे?” असं म्हणत यश ताडकन उठला.
अनु तिच्या बेडरुममध्ये पुस्तक वाचत होती. अधूनमधून डोळे पुसणं चालूच होतं. यशला तिच्यासमोर जायला आँकवर्ड वाटत होतं. तो भीतभीतच तिच्या पायाजवळ जाऊन बसला.
“यार अनु, तू रडू नको यार,”

“सॉरी यश, खरंच मी चुकले. मला तुला फसवायचं नव्हतं. तुमचं confirm झाल्यावर मी तुला सांगणारच होते. तू एवढा हर्ट होशील याची मला खरंच कल्पना नव्हती. सॉरी यश रियली सॉरी.” अनुचा पुन्हा बांध फुटला व ती रडायला लागली.”

“अनु यार तू कशाला सॉरी म्हणतेस? खरं तर मीच मुर्खासारखं वागलो. तुम्ही मला मदत करत होतात आणि मी मात्र तुम्हाला वाटेल ते बोललो. मला माफ कर अनु. आणि मी, मी जेनीसोबत राहायला तयार आहे. तिच्या profession शी मला काहीही देणं घेणं नाही. उलट ती माझ्यासोबत येतेय हीच माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे.”

“नाही यश, तू माझ्यासाठी compromise नको करू, तुझी तिच्यासोबत राहायची इच्छा नसेल तर मी तुला force करणार नाही. आपण तुझ्यासाठी दुसरं कोणीतरी शोधू. तू आधीच इतक्या प्रॉब्लेममध्ये आहेस त्यात माझ्यामुळे तुला आणखीच त्रास झाला.”
“अनु तूच असं बोलल्यावर मी काय करायचं? तुम्ही माझ्यावर हक्क नाही दाखवायचा तर कोणी दाखवायचा? या एवढ्या मोठ्या देशात तुम्हा दोघांशिवाय माझं कोण आहे? आणि आता दुसऱ्या कोणासोबत नाही, मी फक्त जेनीसोबतच राहणार. आणि ती सोबत आली नाही तर मी ही सावरीला जाणार नाही. तू आत्ताच्या आता मला तिचा नंबर दे, मी तिच्याशी बोलतो अन डेट फायनल करतो.”
“तू खरंच तिच्या सोबत जायला तयार आहेस?”
“तू नंबर दे तिचा, आमचं आम्ही भेटून ठरवतो.”
“ठीकय नंबर देते मी, पण तुम्ही दोघं एकटंच भेटणार नाहीत, मी आणि अजय समोर असेल तरच ही मिटिंग होईल. तुझा काही भरवसा नाही, तू चिडलास तर तिलाच काहीतरी बोलशील.”
“common यार अनु, हेच ओळखलंस का मला?”
“गंमत केली रे, उद्या same time, same place, मीटिंग confirm.”

क्रमशः