callgirl - 8 in Marathi Love Stories by Satyajeet Kabir books and stories PDF | कॉलगर्ल - भाग 8

Featured Books
  • રેડ સુરત - 6

    વનિતા વિશ્રામ   “રાજકોટનો મેળો” એવા ટાઇટલ સાથે મોટું હોર્ડીં...

  • નારદ પુરાણ - ભાગ 61

    સનત્કુમાર બોલ્યા, “પ્રણવ (ૐ), હૃદય (નમ: ) વિષ્ણુ શબ્દ તથા સુ...

  • લગ્ન ને હું!

    'મમ્મી હું કોઈની સાથે પણ લગ્ન કરવાના મૂડમાં નથી, મેં નક્...

  • સોલમેટસ - 10

    આરવને પોલીસ સ્ટેશન જવા માટે ફોન આવે છે. બધા વિચારો ખંખેરી અન...

  • It's a Boy

    સખત રડવાનાં અવાજ સાથે આંખ ખુલી.અરે! આ તો મારો જ રડવા નો અવાજ...

Categories
Share

कॉलगर्ल - भाग 8

दुसऱ्या दिवशी सुट्टी असल्यानं यशला उशिराच जाग आली. त्यानं घड्याळात बघितलं तेव्हा काटा दहावर आला होता. पण त्याला बेडवरून उठायची इच्छा होत नव्हती. त्याने पुन्हा डोक्यावरून ब्लांकेट ओढली.
“यश, दहा वाजतायेत, आज दिवसभर झोपायचा प्लान आहे का?” जान्हवी बेडरूममध्ये येत म्हणाली. यशच्या डोक्यावरचं ब्लांकेट तिने ओढलं.
“’जानु’ यार, झोपू देना थोड्यावेळ. फारच थकल्यासारखं वाटतंय.”
‘जानु?’ यशमध्ये एका रात्रीत झालेला बदल तिच्या लक्षात आला.
“तुला थकल्यासारखं वाटतंय?”
“हं. tired but satisfied. तुला कसं वाटतंय?”
जान्हवी फक्त हसली. यशने हात पकडून तिला जवळ ओढलं.
“सांग ना जानु, कसं वाटतंय?”
“सोड मला. खूप कामं आहेत. आणि तुही उठ लवकर.”
“तू उत्तर दिल्याशिवाय मी सोडणारच नाही” यशने तिला ओढून बेडवर बसवलं.
जान्हवीच्या चेहऱ्यावर लज्जा स्पष्ट दिसत होती. यशने तिला घट्ट मिठीत घेतलं.
“ऊं..... सोड मला. किती गडबड करतोस? रात्री पण अशीच गडबड करत होतास.”
“अच्छा? मग तेव्हाच का नाही सांगितलस? आणि माझ्या performance ला किती ग्रेड देशील?”
“performance चांगला आहे. but there is chance to improvement. अजून बच्चा आहेस तू.”
तिच्या उत्तरानं यश नाराज झाला. त्याचा इगो दुखावला.
“मी बच्चा आहे? बरोबरच आहे. माझी ही पहिलीच वेळ होती. तू काय प्रोफेशनल आहेस. एव्हाना यात तुझी पीएचडी झाली असेल.” त्याच्या तोंडून नकळत शब्द बाहेर पडले. पण लगेच त्याला आपली चूक लक्षात आली. रागाच्या भरात आपण किती मोठं स्टेटमेंट केलं....... त्यानं जान्हवीकडे पाहिलं. तिचा चेहरा पडलेला होता.
“sorry जानु, मला तसं म्हणायचं नव्हतं.”
जान्हवी काहीच बोलली नाही. पण तिच्या ओलावलेल्या डोळ्यांच्या कडा सारं काही स्पष्ट सांगत होत्या. यशच्या नकळत तिच्या वर्मावर घाव बसला होता. तिचं मन दुखावलं गेलं. ती उठली अन किचनमध्ये गेली.
यश स्वतःवरच वैतागला.
“जान्हवी, I am sorry. मला तुला दुखवायचं नव्हतं गं. पण तू मला बच्चा म्हणालीस म्हणून रागाच्या भरात मी तसं म्हंटल. मला माफ कर, तू माफ केल्याशिवाय मी तुझा हातच सोडणार नाही.”
“यश मी तुला कशी माफ करणार? त्या आधी तू काही चूक तर केली पाहिजेस. तू खरं तेच बोललास. त्यात चुकीचं काहीच नाही.”
“नाही नाही. आधी माफ केलं म्हण, तरच मी हात सोडेन.”
“ठीकय. केलं मी माफ. खुश? आता सोड.”
तिने आपला हात यशच्या हातातून सोडवून घेतला अन पुढच्या कामाला लागली. ती खूप दुखावली गेली आहे हे यशच्या लक्षात आलं. पण गोष्ट होऊन गेली होती. दिवसभरात जान्हवी यशला स्वता:हून बोलली नाही. यश जेवढं बोलायचा त्याला तेवढ्या पुरतंच उत्तर द्यायची.
रात्री झोपताना यशने तिला जवळ घेतलं. तिच्या मांडीवर डोकं ठेवत तो म्हणाला,
“तुला एक गोष्ट सांगू जानु, आईला us ला जाऊन सहा वर्ष झाली. जेव्हा बाबा वारले तेव्हा मी रांगतच होतो. तेव्हापासून आईने मला सांभाळलं. लहानाचं मोठं केलं. मी आईशी खूपच attached होतो. वाहिनीच्या delivery वेळी प्रॉब्लेम झाला म्हणून आई us ला गेली. त्यावेळी मी second yr ला होतो, फक्त १९ वर्षाचा... या गर्दीत मला माझं असं कोणीच उरलं नाही. रोज आईची आठवण यायची. कशातच लक्ष लागायचं नाही. वाटायचं उठावं अन सरळ आईजवळ जावं. पण ते शक्य नव्हतं. मी सारखा रडायचो. डिप्रेशनमध्ये जायचो. पण अजय first yr पासून माझा रूम पार्टनर होता. त्याला माझं दु:ख कळायचं. तो मला नेहमी समजवायचा. कायम माझ्यासोबत असायचा. मला आधार द्यायचा. अजयने मला लहान बाळासारखं जपलं. कॉलेजला सुट्टी लागली की मुलं आपापल्या घरी जायची. मी कुठे जाऊ? मला प्रश्न पडायचा. अजय मला त्याच्या घरी घेऊन जायचा. पुढे अनु आली तिनेही मला समजून घेतलं. ती दोघं सतत माझ्यासोबत असायची. मी M.TECH साठी चेन्नईला गेलो. तरी त्यांचं माझ्यावर लक्ष होतं. अनु मुद्दाम माझ्यासाठी चेन्नईच्या ऑफिस व्हीझिट घ्यायची. माझं कँम्पस सलेक्शन झालं अन मी इथे आलो. इथं आल्यावर मी खूप एकटा पडलो. पुन्हा आईची आठवण यायला लागली. इथं रहायला नको वाटायचं. मी जॉब सोडायच्या मनस्थितीत होतो. पण त्याचवेळी तू भेटलीस, माझ्यासोबत रहायला आलीस. मला सांभाळून घेतलंस. अगदी अजय-अनुजासारखा आधार दिलास. मी मात्र मुर्खासारखा तुला त्रास देतो. मनात येईल ते बोलतो. तुझा अपमान करतो. पण माझा हेतू तसा नसतो गं. ते नकळत घडतं. त्याची अशी शिक्षा देऊ नकोस. प्लीज माझ्याशी अबोला धरू नकोस. तू बोलली नाहीस की मला पुन्हा एकटं वाटायला लागतं. पुन्हा आईची आठवण येते, पुन्हा त्रास सुरु होतो. यशच्या डोळ्यातून अश्रू आले. तो रडायला लागला. त्याचे अश्रू पाहून जान्हवी विरघळली. तिने यशचे अश्रू पुसले. त्याला शांत केलं.
“रडू नकोस यश, तुला एवढा त्रास होईल याची मला कल्पना नव्हती. तुझ्या सकाळच्या बोलण्यानं मी दुखावले. पण तू जे बोललास त्यामुळे नव्हे. तू खरं तेच बोललास. सध्या पुरतं का होईना पण तेच माझं profession आहे. आणि तीच फँक्ट आहे. मला वाईट वाटलं कारण किमान तुझ्याकडून तरी असं बोलण्याची अपेक्षा नव्हती. तू एवढा हुशार आहेस, विनम्र आहेस. तुला माझ्याबद्दल माहित असून सुद्धा मला इथं घेऊन आलास, माझी काळजी घेतलीस, मी तुझ्यात चांगला मित्र शोधते. पण तूच असं बोललास म्हणून मला वाईट वाटलं.”
“यश, तुला आणखी एक गोष्ट सांगू, एखाद्या मुलीला मुलाकडून काय हवं असतं असं तुला वाटतं? तिला त्याच्याकडून प्रेम हवं असतं. विश्वास हवा असतो. respect हवा असतो. सेक्स हे केवळ निमित्त असतं. त्या मुलीला त्याचा प्रेमळ सहवास हवा असतो. त्या सहवासात ती फुलते, जगण्याचा आनंद घेते. आपली स्वप्नं ती त्याच्या डोळ्यात पाहते. त्याच्या स्वप्नांना ती आपली स्वप्नं मानते. सेक्स म्हणजे शारीरिक संबंध तर आहेतच, पण त्यापेक्षा ते मानसिक जास्त आहेत. दोन माणसं एकमेकांच्या सहवासात स्वताःची शारीरिक भूक भागवतातच पण मनाची भूक भागली तरच त्याला अर्थ आहे. नाहीतर तो फक्त वासनांचा खेळ उरतो. त्या दोघांच्या मनाच्या तारा जुळल्या की मग कशाचीच गरज राहत नाही. एकमेकांच्या नुसत्या सहवासाने त्यांची मानसिक भूक शमते. त्यांची मने शांत होतात. त्यावेळी त्यांच्या दृष्टीने सेक्सची किंमत नगण्य असते. यश, तुझ्याकडून माझी हीच अपेक्षा आहे. तू समोरच्या व्यक्तीचं मन ओळखायला शीक. तिच्या भावना समजून घे. करशील ना माझ्यासाठी एवढं?”
जान्हवीच्या डोळ्यात अश्रू आले होते. यशने तिला मिठीत घेतलं.
“I promise जानु.” एवढेच शब्द त्याच्या तोंडून बाहेर पाडले.

क्रमशः
x x x x x