Sud - 6 in Marathi Detective stories by Vinit Rajaram Dhanawade books and stories PDF | सूड ... (भाग ६)

Featured Books
  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

  • સંઘર્ષ જિંદગીનો

                સંઘર્ષ જિંદગીનો        પાત્ર અજય, અમિત, અર્ચના,...

  • સોલમેટસ - 3

    આરવ રુશીના હાથમાં અદિતિની ડાયરી જુએ છે અને એને એની અદિતિ સાથ...

Categories
Share

सूड ... (भाग ६)

महेश आणि अभिषेक airport ला पोहोचले. अभीने कालच air control कडे शुक्रवारची passenger list मागवली होती.

" हे बघ, सावंत बरोबर बोलत होते. रात्री १०.३० च्या Flight मध्ये कोमलच नावं आहे. म्हणजे त्यांचा driver खरं बोलत आहे. कोमलने flight पकडली होती वेळेवर." त्या दोघांनी मग बंगलोरची flight पकडली आणि ते पोहोचले. तिथे गेल्या गेल्या त्यांनी air control ला contact केला आणि त्या flight ची passenger list मिळवली.

" OK… त्यादिवशी flight वेळेवर पोहोचली होती आणि कोमल सावंतचं नाव आहे इथेही. म्हणजेच ती आली होती इथे, airport ." महेश त्या लीस्टमध्ये पाहत म्हणाला.

" त्यांच्या flat चा पत्ता आहे माझ्याकडे. तिथे जाऊन काही माहिती मिळते का बघू.",अभी बोलला.

" चालेल. बाहेर taxi आहेत. लवकर पोहोचू." महेशने taxi थांबवली. दोघे आत बसले आणि अभीने taxi driver ला पत्ता देत म्हटलं,"इस address पे जाना हे। ". taxi driver ने दोघांकडे एक नजर टाकली." आप नये हो क्या इधर… ? ","क्यू… क्या बात हे। "," अरे साहब … वो सामने बिल्डींग दिख रही हे। वही का address हे ये। " दोघेही taxi मधून उतरले. त्याने दाखवलेल्या बिल्डींगमध्ये आले. बाहेर watchman कडे विचारपूस केली, बरोबर पत्ता होता. कोमलचा फोटो ओळखला त्याने. त्याच्याकडे असलेल्या एन्ट्री लिस्ट मध्ये, शुक्रवार किंवा शनिवारी बिल्डींगमध्ये आलेल्या व्यक्तींमध्ये कोमलच नावं नव्हतं. watchman ची कसून चौकशी केली दोघांनी. शिवाय संपूर्ण बिल्डींगमध्ये विचारणा केली. कोमल आलीच नव्हती.

" कसं शक्य आहे ? मग ती गेली तरी कूठे ?",

"कदाचित direct तिच्या ऑफिसमध्ये गेली असेल.",

"तिथे जाऊन बघू." ऑफिसमध्ये पोहोचले तेव्हा उत्तर तेच होतं. कोमल तिथेही पोहोचली नव्हती.

" काहीतरी गडबड आहे ,महेश. ",

"हो रे… ", महेश आणि अभिषेक, एका हॉटेलमध्ये चहा पीत बसले होते.

" हे बघ… कोमल मुंबईवरून निघाली रात्री १०.३० वाजता. साधारण १.३० तास लागतो बंगलोरला पोहोचायला. तशी ती आलीही १२.०० वाजता. flat तर इथेच आहे.… १० मिनिटांवर, walking distance. आणि एवढया रात्री ती ऑफिसला जाणे शक्य नाही. तरीसुद्धा , airport पासून ऑफिस, चालत गेला तरी २० मिनिटे, आणि flat पासून १० मिनिटं. ", महेश बोलला,

" म्हणजेच airport ते flat… या अंतरातच काहीतरी झालं आहे. ",अभी बोलला.

" मला नाही वाटतं असं काही झालं असेल. एवढयाश्या अंतरात कसं काय शक्य होईल.शिवाय airport आहे. गजबज तर असणारच. तिच्याकडे सामान होते. इकडून kidnap शक्य नाही." दोघे विचार करत बसले. आणि बंगलोर पोलिस स्टेशन मध्ये कोमल हरवल्याची तक्रार नोंदवून ते मुंबईला आले.

पुढचा दिवस, महेश त्याच्या lab मध्ये गेला. अभी पोलिस स्टेशनमध्ये त्याच केसचा विचार करत होता. दुपारी महेशला अभिने call लावला… ,"काम नसेल तर ये लवकर इकडे. ". महेशने त्याचं काम संपवलं आणि आला अभिला भेटायला.

" काय रे, एवढया urgent बोलावलंसं… ",

" आधी खाली बस… मग सांगतो." महेश खुर्चीवर बसला.

" कोमलच्या मोबईल फोनचे details आले आहेत." अभी बोलला आणि त्याचा फोन वाजला.पलीकडून Mr. सावंत बोलत होते.

" हेलो, inspector अभिषेक.…. काही कळलं का माझ्या मुलीबद्दल ? ",

"नाही अजून… प्रयत्न चालू आहेत आमचे.",

"हो पण जरा लवकर हा… काळजी वाटते मला. ",

"तुम्ही काळजी करू नका, आम्ही सांगतो तुम्हाला, काही कळलं तर." म्हणत अभिने call कट्ट केला.

"एवढी काळजी वाटते ना…. मग कशाला पाठवायचं मुलीला…. स्वतः जायचे ना." अभी नाराज स्वरात बोलला.

" तो कसा जाईल…. पकडला नाही जाणार का… ",

"अरे… तुला काय राग आहे त्यांचा आणि त्यांना कोण कशाला पकडेल ? " अभी बोलला.

" तुला सांगितलंच नाही ना.… सांगतो, या सावंतचा कसला बिझनेस आहे… माहित आहे का तुला ?",

" हो… import export चा… त्यात काय." ,

"बंगलोरला, याच्यावर केस चालू आहे. smuggling ची.… हे माहित आहे तुला. "महेश म्हणाला तसं अभिला आश्चर्याचा धक्का बसला.

" हे तुला कोणी सांगितलं ? ",

" वर्षापूर्वी, मी बंगलोरला गेलेलो माहित आहे ना, एका केससाठी. तेव्हा याची news होती तिथे. केससुद्धा चालू आहे. मला वाटते म्हणून याने मुद्धाम मुलीला त्या ऑफिसवर पाठवलं असेल. किती लोकं मागे आहेत त्याच्या…. भित्रा साला… नाहीतर त्या कोमलला याचं काहीतरी कळलं असेल, म्हणून यानेच तिला गायब केलं असेल. " महेश बोलला.

" चल रे… असं असतं तर त्याने मला कशाला बोलावलं असतं… तक्रार नोंदवली नसती. त्यांनाच माहिती आहे कि कोमल हरवली होती ते.",

"असेल तसं, बरं मला का बोलावलं ?",

"अरे बघ… विसरलो. हे बघ, जरा विचित्र वाटते, शेवटचा call मी पाहिला तेव्हा तुला बोलावलं मी. तो शेवटचा नंबर बघ आणि वेळ बघ." महेश सुद्धा ते पेपर वाचता वाचता विचारात पडला.

" कोणाचा नंबर आहे माहित आहे का… सोलापूर रेल्वे पोलिसांचा. ",

" What… ? हे कसं शक्य आहे. ",

"मलाही विचित्र वाटते ते. म्हणून रात्रीचं मी तिथल्या एका अधिकारीला बोलावून घेतलं आहे. तो निघाला कालच, एवढयात येईल. तो आला कि कळेल नक्की काय आहे ते." अभी बोलला.

" ह्म्म… आणखी एक कर, अभी…. तिचा मोबाईल "track" कर… म्हणजे खर काय ते कळेल. "," हो… ते लक्षात नाही आलं माझ्या." आणि लगेच त्याने तिचा मोबाईल track करायला सांगितले.

अर्ध्या तासानी, सोलापूर रेल्वे पोलिस स्टेशनमधून एक अधिकारी आले. "नमस्कार सर, मी inspector कदम. तुमच्या बरोबर बोलणं झालं माझं.","हो हो, बसा… हं… हा नंबर तुमच्याच पोलिस स्टेशनचा आहे ना… ", त्यांनी नंबर चेक केला.

" हो सर… आमचाच आहे.",

"OK… कोमल सावंतच्या मोबाईलवर तुम्ही call केला होता ना. ",

"means…. काही कळले नाही मला." महेशने त्यांना कोमलचा फोटो दाखवला,

" या…हो… आता आठवलं, हो… यांना मीच फोन लावला होता.",

" तुमची कशी ओळख… कोमल सावंतशी.… ",

"ओळख कशी असेल ? त्यांना तर पहिल्यांदा बघितलं मी त्यादिवशी.",

"मग फोन वगैरे काय ? ",

" अहो… या madam , त्यांची bag राहिली ट्रेनमध्ये. म्हणून तक्रार घेऊन आल्या होत्या.",

"काय ?",अभी उडालाच. " सविस्तर सांगा जरा." महेश बोलला.

" शनिवारी, माझीच Duty होती. आणि या madam आलेल्या तक्रार घेऊन.… ",

" नक्की याच होत्या ? ",

" हो… १००% " ,

" किती वाजता आल्या होत्या ?",

"साधारण १० वाजता, सकाळी. त्यांची bag राहिली ट्रेन मध्ये आणि त्या ट्रेन बाहेर. ट्रेन बरोबर bag पण गेली. ","मग… ",

" यांची तक्रार लिहून घेतली.",

"आणि त्या कूठे गेल्या त्यानंतर.",

"ते माहित नाही, हा… पण बंगलोरचा पत्ता दिला आहे त्यांनी. सामान भेटलं कि त्या पत्तावर पाठवा अस म्हणाल्या." ,

" मग तुम्ही कशाला फोन केलेला त्यांना… ?",

"असंच… miss call केलेला.… त्या तेव्हा होत्या पोलिस स्टेशनमधेच.… नंबर बरोबर आहे का ते बघण्यासाठी miss call केलेला." दोघेही विचार करू लागले.

" साधारण किती वेळ लागतो … सोलापूर ते मुंबई.… तुम्हाला किती वेळ लागला.? ",

" १० तास पकडून चाला… तुम्ही मला रात्री फोन केलात तेव्हाचं निघालो मी. ",

" ठीक आहे,… कोमल सावंत तिथे सकाळी १० वाजता पोहोचल्या होत्या, मग मुंबईवरून कोणती गाडी आहे ?,",

" आहे… रात्री ११.३० ची एक गाडी आहे. ती ९ ते १० दरम्यान सोलापूरला येते. आणि पुढे बंगलोरसाठी निघते.",

" या गाडीचं तिकीट मिळते लगेच… ",

" हो… आता कूठे सुट्ट्याचा time आहे…. शिवाय हीच शेवटची गाडी आहे रात्रीची. त्यामुळे जास्त कोणी नसते या गाडीला. तिकीट ना, लोकल ट्रेन सारखंच मिळते या काळात." ,

" हम्म्म…. " अभीने सगळं नीट ऐकून घेतलं. " बरं, ठीक आहे. तुम्ही आता जाऊ शकता… पुन्हा काही वाटलं तर बोलवू आम्ही…" ,

" Thanks sir …. येतो मी. " म्हणत ते निघून गेले.


------------------- क्रमश : ----------------