Julale premache naate - 2 in Marathi Fiction Stories by Hemangi Sawant books and stories PDF | जुळले प्रेमाचे नाते - भाग-२

Featured Books
  • નારદ પુરાણ - ભાગ 61

    સનત્કુમાર બોલ્યા, “પ્રણવ (ૐ), હૃદય (નમ: ) વિષ્ણુ શબ્દ તથા સુ...

  • લગ્ન ને હું!

    'મમ્મી હું કોઈની સાથે પણ લગ્ન કરવાના મૂડમાં નથી, મેં નક્...

  • સોલમેટસ - 10

    આરવને પોલીસ સ્ટેશન જવા માટે ફોન આવે છે. બધા વિચારો ખંખેરી અન...

  • It's a Boy

    સખત રડવાનાં અવાજ સાથે આંખ ખુલી.અરે! આ તો મારો જ રડવા નો અવાજ...

  • ફરે તે ફરફરે - 66

    ફરે તે ફરફરે - ૬૬   માનિટ્યુ સ્પ્રીગ આમતો અલમોસામાં જ ગ...

Categories
Share

जुळले प्रेमाचे नाते - भाग-२

मी हसुन परत बोलु लागली......,

मी एकदा कॉलेजला जायला निघाले. भरपूर पाऊस होता, पण कॉलेजला जाणे गरजेचे होते. लेक्चर्स मिस करन महागात पडल असत. मी ट्रेन ने स्टेशनला पोहोचले, तिथून ऑटो करेन म्हणुन थांबले होते की, एक ऑटो माझ्या समोर येऊन थांबली.


मी पाहिलं तर आत निशांत होता. मला यायला सांगत होता तो. आधी मी नाही बोलले, पण एवढ्या पावसात परत ऑटोसाठी थांबन मूर्खपणाचे ठरले असते. मग काय बसले जाऊन त्याच्या सोबत. बाहेर पाऊस, आणि त्या ऑटोमध्ये मी आणि तो. छान वातावरण होत बाहेर. अचानक माझी नजर त्याच्यावर गेली. त्याचे ते फिजलेले केस डोळ्यावर येत होते, तो सारखे कंटाळून ते बाजुला करत होता. मला गंमत वाटली. "निशांत, अरे रुमालने पूस ना... किती वेळ ते बाजुला करत राहणार आहेस..!" "अरे मी विसरलो ग आज घाईत."


मी रुमाल दिला..., "हा घे माझा रुमाल.., पुसून घे." मी रुमाल पुढे केला आणि त्याने काहीही न बोलता तो घेतला. तो रुमाल बघुन आधी हसला. मी विचारलं त्याला..., रुमाल बघुन हसण्यासारख काय आहे...??"


तो...," अग केवढासा आहे तो, माझा चेहरा ही पुसला जाणार नाही. पण राहूदे आज घेतो चालवून." मी जरा तोंड वाकड करतच बाहेर पाहिलं.... किती हा खडुसपणा. खड्यांचे धक्के खात पोहोचलो आम्ही दोघे कॉलेज जवळ. खर्च अर्धा अर्धा दिला. नाही तर परत काही बोलायचा. मी पैसे देऊन माझ्या क्लासरूमध्ये निघून गेली.


मधल्या सुट्टीमध्ये त्याला भेटुन होकार द्यायचं ठरवल आणि त्याला शोधत निघाले. आज डायरेक्टर मी ऑडीमध्ये गेले. तर निशांत डान्सची प्रॅक्टिस करत होता. मी जाताच तो थांबला. "काय मॅडम, वाट चुकलात का.. इकडे कुठे.???"
"अरे ते जात होते म्हटलं जरा सर्कस बघुन जाऊया. म्हणून इकडे आले." यावर तो जोर जोरात हसला. मग मी ही हसली. पण सॉरी बोलून आपण का आलोय हे सांगून टाकलं.
"निशांत मी... म्हणजे काल तु विचारल होतास ना..?" तेच सांगायला आले होते की, मला तुझ्या सोबत डान्स करायला आवडेल. "अरे वाह लगेच तय्यार हा.., या आधी कधी केला आहेस का डान्स...?" तो.


"हो शाळेत होते तेव्हा करायची." लावणी, कोळीगीत यांच्यावर. कधी कधी आम्ही आदिवासी यांच्या ही पद्धतीचे डान्स केलेत.
"ओ मॅडम हा डान्स फॉर्म वेगळा आहे. सालसा डान्स फॉर्म आहे. कपल डान्स आहे. जमेल का तुला..?.."


आता माझ्या इज्जतीचा सवाल होता. खर तर नाहीच बोलणार होते, पण हा सर्वांसमोर काही बोलला तर, म्हणुन मी होकार दिला. " हो मी तय्यार आहे, यात काय शिकेन मी."
तु तय्यार आहेस का..?.... "अग मी विचारलं मग मी तर असणारच ना तय्यार..... मग उद्या पासून रिहर्सल करूया. लवकर जमेल का यायला...??!..... लवकर येऊन करूया म्हणजे आपल्याला आपली जागा मिळेल. काही दिवसांनी सगळेच ऑडीमध्ये प्रॅक्टिससाठी येतील तोपर्यंत आपला अर्धा तरी डान्स बसलेला असेल.


मग आपण तो कुठेही करू शकतो. त्यात तुला हा फॉर्म नवीन त्यामुळे शिकायला ही वेळ लागेल ना. सो उद्यापासुन सकाळी दहाला ऑडीमध्ये तु मला हजर हवी आहेस. नाही तर मला दुसरा पार्टनर बघावा लागेल. अस बोलून तो क्लाससाठी निघून गेला. मग मी देखील निघाले.


हर्षु आणि मी क्लासमध्ये बसलो होतो. "ए प्राजु तु बोललीस का ग हो त्याला..?" की मीच जाऊन विचारू त्याला.... "मॅडम मी आजच त्याला हो सांगितलं आहे." सालसा फॉर्म आहे. के ते कपल की काय तो.... आज जाऊन त्याची म्हाहिती काढते, पण जर नाही बोलले असते तर माझं इम्प्रेशन वाईट पडलं असत म्हणून मी होकार दिला.


उद्यापासुन रिहर्सल ठेवलीये ती देखील दहा वाजता. शार्प दहाला यायला सांगितलं आहे खडून महाराजांनी.... "ए त्याला खडूस नको ना बोलुस..., कसला भारी आहे यार तो. प्राजु यार तु कसली लकी आहेस. सालसा डान्स तोही त्या हँडसम बॉय सोबत." "गप ग काही ही असत तुझं.. किती खडूस आहे तो. जाऊदे उद्यापासुन त्यालाच बघायचं आहे. यावर मलाच हसु आल.


लेक्चर्स संपवून आम्ही घरी जायला निघालो. आज मला लवकर जाऊन सगळं आटपून लवकर झोपायचं होतं. नाही तर सकाळी उठायला झालं नसत. मी घरी जाताच जरा आई ला मदत केली. जेवण जेवुन आम्ही झोपलो. म्हणजे मीच कधी नव्हे ती लवकर झोपले.


घडाळ्यातल्या अलार्मने सकाळची जाणीव करून दिली. पण आईच्या हाकेशिवाय माझी काही सकाळ व्हायची नाही. काही वेळाने ती देखील आली आणि मी बेड सोबत काही वेळसाठी ब्रेकअप केला. फ्रेश होत नाश्तासाठी किचनमध्ये आले तर आई चहा- बिस्कीटं पुढे करत विचारती झाली. " काय मॅडम आज लवकर उठलात,...??" कुठे निघालीस एवढ्या लवकर..!!"


"अग आई तुला संगणारच होते." मी कॉलेजमध्ये एका डान्स कॉम्पिटेशनमध्ये भाग घेतला आहे आणि त्यासाठी रोज दहा वाजता कॉलेजमध्ये जावं लागणार आहे..., मी आईकडुन चहा-बिस्कीट घेत म्हटलं...... "ठीक आहे जा, पण अभ्यासाकडे दुर्लक्ष झाले नाही पाहिजे हा. नाही तर मला बाबांना सांगावं लागेल."...आई. "हो ग आई, तु टेंशन नको घेऊस." अभ्यास होत राहील ग. हे काही रोज असणार आहे का..?,मी नाश्ता संपवत आईकडे पाहिलं. चल येते मी..., बाय.


आई चा निरोप घेऊन मी कॉलेजसाठी निघाले. ट्रेन पकडून स्टेशन ला आणि तिथून चालत कॉलेज जवळ पोहोचले. घडाळ्यात बघितल तर दहा वाजून दहा मिनिटे झालेली. मी तडक ऑडीमध्ये पोहोचले. निशांत आधीच येऊन बसला होता. मी पोहोचताच, त्याने माझ्याकडे एक कटाक्ष टाकला. "काय मॅडम वाजले किती...??" तु दहा मिनिटे लेट आहेस. हे अस लेट येण मला चालणार नाही आताच सांगतो. आणि मला मॅसेज करायचा ना लेट होणार होत तर.

"पण... माझ्याकडे...".
"काय आता तुझं मधे..., नेक्स्ट टाईम लेट होणार असेल तर मला आधी मॅसेज टाकत जा कळल...." तो भराभर बोलत होता.
"अरे मी काय बोलते ते ऐक तरी. माझ्याकडे तुझा नंबरच नाहीये. मग कसा करणार मॅसेज...??!"मी मधेच त्याच वाक्य तोडत बोलले.....

त्याने माझ्याकडे पाहिलं. "काय तुझ्याकडे माझा नंबर नाहीये, मग आधी का सांगितलं नाहीस..??"...तो.
"अरे बोलु देशील तर सांगेल ना.. आता दे तुझा नंबर अस बोलुन मी जाऊन चेअरवर बसले."
तो बॅगेजवळ गेला आणि स्वतःचा मोबाईल घेऊन माझ्याजवळ आला. "सॉरी, घे माझा नंबर." त्याने त्याचा नंबर दिला. तो मी माझ्या मोबाईल मध्ये सेव करून ठेवला. "खडूस" या नावाने."

"चला करूया प्रॅक्टिस.." मी उठले आणि स्टेजवर पोहोचले. खाली वाकुन स्टेजला प्रणाम करून मी स्टेजवर उभी राहिली. हे सगळं तो बघत होता.
मी स्टेजवर पोहोचताच त्याने मला कन्सेप्ट बद्दल सांगितलं.
" हे बघ प्रांजल, हा कपल डान्स आहे." त्यामुळे जरा जवळीकपणा वाढेल. काही स्टेप्स वेगळ्या असतील, त्यात मी तुला उचलेल वैगेरे तर तुला चालेल का..??
काही प्रॉब्लेम असेल तर आताच सांग, म्हणजे मी माझा पार्टनर बदलेल. नाही तर तुला शिकवेन आणि तू नंतर नाही बोलायचीस. "सो आताच सांग, जमेल का तुला...??!"


मी दहा मिनिटे विचार करून होकार दिला. वेगळा फॉर्म शिकायला मिळणार. त्यात निशांतने स्वतः सांगितलं की त्यात जवळीकपणा वाढेल म्हणजे त्याला वाटलं सांगावस. जर त्याचा वाईट हेतु असता तर त्याने का सांगितलं असत नाही....!!. या सर्वाचा विचार करून मी त्याला होकार दिला पाहिजे.


"निशांत, माझा होकार आहे." आपण कधीपासून सुरुवात करूया. मी रेडी आहे.
आजच सुरू करू......आणि मी स्टेजवर निघून गेली. तो फक्त बघत राहिला. मग तो देखील स्टेजवर आला.
"आपण ना गाणं सुरू झाल्यावर एन्ट्री घेऊ, ठीक आहे."
मी एक सॉंग सिलेक्ट केलं आहे. नंतर ऐकवतो आता आपण जरा ठरवून घेऊया. त्याची बडबड चालू होती.
त्याच्या चेहऱ्यावर उत्सुकता ओसंडून वाहत होती. कदाचित त्याला डान्स आवडत असेल. बाहेर भेटलेला निशांत आणि आताचा हा निशांत किती वेगळा आहे. अस मलाच माझं वाटून गेलं.


"थांब हा मी तुला गाणं ऐकवतो." त्याने बॅकस्टेजला जाऊन एक गाणं लावलं. एक इंग्लीश गाणं त्याने चालू केल.
"या गाण्यावर आपण डान्स करायचा आहे..??!"..मी आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं...??!!
"हो..., का काही प्रॉब्लेम आहे या गाण्यात...??" हे सालसासाठी बेस्ट सॉंग आहे. चल चालू करूया..... त्याने स्वतःचे डोळे बंद केले.

"तु नेहमीच सालसा हाच फ़ॉर्म करतोस का..??..
" हो..., का काय झालं...?"..तो.
"एक सुचवू का मी..??, बघ तुला पटलं तर.." आपण फ्री स्टाईल डान्स केला तर, म्हणजे बघ त्यात ना आपण एक स्टोरी सांगु शकतो. सोबत डान्स असेलच. पण फ्री स्टाईल असल्याने आपल्याला खूप स्टेप्स ही मिळतील आणि सोबत काही तरी वेगळं ही करता येईल. मी आनंदात हे सगळं त्याला सांगितले.


" ए हॅलो..., मी तुला डान्ससाठी काय विचारल तु तर स्वतःच सगळं ठरवुन टाकलस. मी फॉर्म बदलणार नाही. आणि राहिला प्रश्न तुझ्या आयडियाचा तर ती तुझ्याचकडे ठेव समजलं......" लावणी, कोळीगीत आणि आदिवासी डान्स सारख सोप नाहीये हे. उगाच स्वतःच डोकं नको वापरूस.

हे सगळं त्याने एवढ्या रागात सांगितलं की माझ्या डोळ्यातुन अश्रु कधी गालावर येऊन थांबले हे देखील मला कळलं नाही. मी काहीही न बोलता स्टेजवरून खाली उतरत स्वतःची बॅग घेऊन ऑडीमधून निघाले. सरळ वॉशरूममध्ये जाऊन थोडे रडलेच. "अस काय वाईट सांगितल होतं की त्याने एवढ्या रागात माझ्याशी बोलावं..., चेहऱ्यावर थंड पाणी मारत स्वतःला शांत केले." चेहरा पुसत बाहेर आले आणि लायब्ररीत जाऊन बसले.


खुप लवकर आल्याने लायब्ररीमध्ये ही कोणी नव्हतं. पुस्तक घेत वाचु लागले. वाचता वाचता कधी झोप लागली ते देखील कळलं नाही. जाग आली ती मॅडम च्या आवाजाने. "मिस प्रांजल....हॅलो.!! उठ.....ही काय जागा आहे का झोपायची...??" ही लायब्ररी आहे तुझं घर नाही. मी डोळे चोळत समोर पाहिलं, समोर मॅडम
ला बघुन गडबडीत उठली.
"सॉरी मॅडम... माफ करा."बोलत मी लायब्ररीतुन पळत क्लासरूम मध्ये पोहोचले.


समोर हर्षु ला बघून बर वाटल. "हेय... प्राजु.!" कसा होता पहिला डे विथ हँडसम..??!!" हर्षु यार नको तो विषय आणि मी तिला मिठी मारत सगळं महाभारत सांगितले. "यार हा असा काय.. किती छान आयडिया होती तुझी, जाऊदे तु या आयडिया सोबत कोणा दुसऱ्याला विचार आणि डान्स कर. म्हणजे त्याला तुझी किंमत कळेल....हर्षुही थोडी रागावलीच."
"जाऊदे ग आता मला नाही करायचा डान्स वैगेरे.. मी भली आणि माझी स्टडी भली."

आम्ही वर्गात जाऊन बसलो. काही लेक्चर्स आम्ही अटेंड केले आणि अचानक मला गरगरल्या सारख झालं. मी पाणी पिऊन गप्प बसून राहिले. मधल्या सुट्टीमध्ये काही तरी खाऊ म्हणून आम्ही दोघी कॅन्टीनमध्ये गेलो. हर्षु ऑर्डर द्यायला गेली आणि मी टेबल शोधत होते. अचानक मला चक्कर आली आणि मी खाली कोसळले. आजू बाजूच्या काही वर्गातल्या मुलांनी मला उचललं आणि खुर्चीवर बसवलं. हर्षुने पाणी आणून दिल. थोडा वेळ बसून आम्ही कॉलेजमधल्या डॉक्टरकडे गेलो. तेव्हा तिथे कळलं की, सकाळपासून काही न खाल्ल्याचा हा परिणाम होता. डॉक्टरांनी काही मेडिसिन दिल्या आणि लगेच काही तरी खाऊन घ्यायला सांगितले.


आम्ही तिकडून परत कॅन्टीनमध्ये गेलो. मला चक्कर आलेली कदाचित सर्वाना कळलं म्हणून मी जाताच काही जणांनी मला बसायला टेबल दिलं. माझ्यासाठी खायला मागवलं. मी ते खाऊन मेडिसिन घेतल्या आणि प्रिन्सिपल च्या केबिनमध्ये दाखल झाले. "सर आत येऊ का..??!"
"येस प्लीज.., मिस प्रधान." मला कळलं डॉक्टर माधुरी मॅडमकडुन की तुम्हाला चक्कर आलेली. "ठीक आहात ना मिस प्रधान तुम्ही..?..सर"


"हो सर मी ठीक आहे, पण गोळ्यांनी खुप झोप येत असल्याने मला सुट्टी हवीये सर..."
"ओके ठीक आहे." जा तुम्ही. हवी असल्यास उद्या ही घ्या. पण, परवा यायच हा कॉलेजला..!!."सर.
"हो सर नक्की." एवढं बोलुन मी निघाले. हर्षुला मॅसेज केला आणि घरी निघुन आले.

घरी पोहोचताच आई ला सांगितले. मग काय तिने घेतलं लगेच टेंशन. पण डॉक्टरकडे जाऊन आलीये आणि आता आराम करायचा आहे, हे सांगितल्यावर तिने लगेच मला आराम करायला पाठवलं.


गोळ्यांमुळे डोळ्यावर झोप होती. मग काय, मी लगेच माझ्या लाडक्या बेडसोबत पॅचप केला. आणि ताणून दिलं. त्या अंधारात मला अंधुक आवाज येत होता. कळत नव्हतं नक्की काय होतंय, डोळे काही केल्या उघडत नव्हते. हळुहळू आवाज वाढत गेला आणि मला कळलं की ती आई आहे. हो ती आईच होती...


पण...., आई मला का उठवत होती. गोळ्यांच्या प्रभावाखाली असल्याने माझे डोळे काही केल्या उघडत नव्हते. आता ती मला जोरजोरात हलवत होती.
"अरे अस कस हे स्वप्न, कशाला आई उठवते आहे." पण नंतर कळलं की, हे स्वप्न नाही तर आई खरच उठवत होती.


"प्राजु..!! अग उठ ना... बघ तुला कोणी तरी भेटायला आलय तुझ्या कॉलेजमधून. चल लवकर उठ बघू आता."
मी कसे बसे डोळे उघडले, तर समोर आई. "किती ही झोप..??"
"उठ, हॉलमध्ये बसला आहे तो. ये लवकर." आणि आई निघून गेली.
तो की ती..? आई नक्की काय बोलली. मी उठुन फ्रेश होऊन हॉलमध्ये पोहोचली. तर डोळ्यांना विश्वास बसत नव्हता. तो निशांत होता. हो. तोच खडुस निशांत. मी हॉलमध्ये जाताच तो उभा राहिला.
"हेय.... कस वाटतंय तुला..??" मला कॉलेजमध्ये कळलं की तुला चक्कर आली; म्हणून मी आलो तुला भेटायला.
त्याने हातातला फुलांचा बुके पुढे केला. "तुझ्यासाठी."


माझ्या चेहऱ्यावर बारा वाजले होते. एक स्माईल देत तो मी घेतला आणि टीपोय वर ठेवून दिला. काही बोलणार तितक्या आई हातात चहा, पोह्यांचा ट्रे घेऊन आली.
"घे बाळा, चहा आणि पोहे." बघ जसे जमले तसे केले हा मी, जरा घाईतच बनवले. आवडतील ना तुला..?"
"अहो मला खुप आवडतात पोहे." एक घास खात त्याने आईकडे पाहिलं, वाह...!!"
"काय चव आहे तुमच्या हाताला." काकु काही बोला हा, पण एक नंबर झालेत पोहे. नेक्स्ट टाईम केले तर प्रांजलकडे पाठवून देत जावा माझ्यासाठी....,निशांत.
"हो हो... नक्की पाठवेन हा." पण तुझ नाव कधी ऐकल नाही प्रांजल कडून..??... आई.

या सगळ्यात मी माझी ओळखच द्यायला विसरलो. " मी निशांत चिटणीस, प्रांजलच्या कॉलेजमध्ये एक वर्ष सिनिअर आहे. आम्ही एकत्र डान्स कॉम्पिटेशनमध्ये भाग घेतला आहे... हो ना प्रांजल...!" त्याने माझ्याकडे पाहिलं. मी मानेनेच होकार दिला. आणि गप्पपणे माझे पोहे खात बसले.
"अरे हो, प्राजु बोलली होती मला.. तर तू आहेस तिचा पार्टनर."


"हो काकु... आम्ही एकत्र करतो आहोत डान्स." खरतर प्रांजल आज मला एक न्यू आयडिया सांगणार होती, पण तिला चक्कर आली अस कळलं सो म्हटलं भेटुन यावं. "बर केलंस आलास ते...आई."


आई आणि निशांत एकमेकांशी अक्षरशः जुनी ओळख असल्या सारखे गप्पा मारत होते. मी मात्र एकटी बाजुला त्यांच्या घरी आल्यासारखे पोहे खात बसलेले. अचानक आई ने माझ्याकडे पाहिलं आणि मी दचकले. "अग प्राजु एवढ्या छान मुला बद्दल बोलली नाहीस तु मला." आता यावर मी काय उत्तर देणार की, याच मुलामुळे मला चक्कर आलेली. आणि याने माझा किती पाणउतारा केला होता.


"सांगणारच होते ग आई.".... मी काही तरी बोलावं म्हणून बोलत होती. "निशांत बेटा आज जेवूनच जा हा तु, मी आमच्या यांना आवडतात म्हणुन अळूच्या वड्या करणार आहे."
" अरे वाह..!! मला ही खूप आवडतात. आता तर मी जेवूनच जाणार."...निशांत.
"आई मी याला माझ्या रूममध्ये घेऊन जाते. जरा बोलायच आहे. ..मी."
"हो चालेल जेवण झालं की, मी हाक मारते तुम्हाला जावा तुम्ही.."..आई.


आम्ही माझ्या रूमध्ये गेलो. "मिस्टर निशांत चिटणीस, तुम्हाला कोणी सांगितलं की माझ्या घरी येऊन माझी विचारपूस करा...??" मी तरी नव्हते सांगितले. आता बोलणार आहात की, असच तोंडाला कुलूप लावल्या सारखे उभे राहणार आहात....
तो चालत माझी रूम न्याहाळत होता. "हे सगळं तु डेकोरेत केलं आहेस का..?" सगळंच भारी आहे.....मला खुप आवडलं, तु मला ही करशील का ग मदत..??", माझ्या रूमला डेकोरेट करायला.....त्याने वळून माझ्याकडे पाहिले. अरे मी काय बोलतेय, तुझं काय चालू आहे. मी काही तुझी मदत करणार नाहीये....ओके.


आणि हॉलमध्ये आई ला काय बोललास, आपण एकत्र डान्स करतो आहोत. कशाला खोटं बोलायच.. की अजून काही नवीन भाषण द्यायला आला आहेस की, कसा मला डान्स येत नाही ते. माझी अखंड बडबड चालू होती.. मी बोलता बोलता मागे फिरली तर हा स्वतःच्या गुढग्यावर बसून होता. मी दचकले... "आता हे काय नवीन नाटक...."


"प्रांजल.., मला माफ कर." मी आज सकाळी तुझ्यासोबत जे काही वागलो त्यासाठी मला माफ कर....निशांत."
ठीक आहे पण हे अस खाली नको बसुस प्लीज उठ.. मी त्याला उठवलं आणि बेडवर बसवल. "हा बोल आता काय ते.."


"हे बघ प्रांजल, याआधी मला कधीच कोणी स्वतःहून काही सांगितलं नाही... म्हणजे खर तर माझे कोणी फ्रिएन्ड्स नव्हतेच. मी आश्चर्याचाने त्याच्याकडे पाहिलं...??. काय..? अच्छा तुला वाटत असेल ना कॉलेजमध्ये एवढे फ्रिएन्ड्स आहेत त्याच काय..!!.. कॉलेजमध्ये खुप आहेत, पण मला अस स्वतःहुन कोणी काही सांगत नाही. मी जे बोलतो तेच करतात सगळे. त्याचीच सवय झाली मला, पण आज तु स्वतः मला काही तरी सांगितलंस आणि रोजच्या सवयीमुळे हे सहन नाही झालं. त्यामुळे मी तुझ्यावर चिडलो, तुला खूप काही बोललो, खरच मला माफ कर. हे सगळं माझ्या रागामुळे झालय. तो पूढे बोलु लागला.......,


"खरतर आई-बाबा गेल्यापासून मी एकटा झालो, कोणी आपल म्हणणार मिळालच नाही कधी. आजी- आजोबांनी वाढवलं मला. पण ते तरी किती दिवस पुरणार ना..?
शेवटी सगळेच सोडून जातात... म्हणून मी असा चिडचिडा झालोय. माझ्या बोलण्याचा तुझ्यावर एवढा परिणाम होईल असं वाटलं नव्हतं. प्लीज मला माफ कर...सगळं बोलुन तो शांत झाला.


बापरे किती ते दुःख मनात. आणि आपण याला खडूस समजत होतो. "निशांत..., मी हात पूढे केला. त्याने प्रश्नार्थक चेहऱ्याने माझ्याकडे पाहिलं.?? " आपण फ्रिएन्ड होऊ शकतो का..??" ... "हो पण तु मला कंटाळून जाणार नाहीस ना..." "नाही जाणार..., पण तू कमी रागवशील..??" ... "प्रयत्न करतो...".


"म्हणजे..., तु मला माफ केलंस ना.!! आपण करूया ना एकत्र डान्स...? प्लीज"
"माफ करेन आणि डान्स देखील, पण माझ्या दोन अटी आहेत.."
"कोणत्या अटी..??" एक म्हणजे माझी कन्सेप्ट ऐकून घे आणि दुसरी म्हणजे उद्या कॅन्टीनमध्ये मला तुझ्याकडुन वडा-सांबर ची पार्टी हवीय." विचार करुन सांग. मी डोळा मारत सांगितले.
"ओके मॅडम दोन्ही अटी मान्य, अस बोलत त्याने माझ्या समोर हात जोडले.
यावर आम्ही दोघेही हसलो.


"तर सांगा मॅडम तुमची कन्सेप्ट काय आहे." मी आनंदाने सांगायला सुरुवात केली.....,
बघ..,आपण ना एक लव्हस्टोरी वर डान्स ठेवू. मी तर गाणं देखील ठरवल होत. यावर त्याने लगेच त्याच्या भुवया उंचावल्या. हेहेहे खर तर माझे बाबा नेहमी बोलतात की, माणसाने नेहमी तय्यारीत राहावं. आपण जेव्हा काही सांगणार असतो त्याआधी सगळी तय्यारी करण गरजेच आहे. म्हणजे हे सगळं करून ठेवल होत मी.
हा तर, आपण एका गरीब मुलीची आणि श्रीमंत मुलाची लव्हस्टोरी दाखवुया. त्यांच्यातल्या प्रेमाची कथा. पूर्ण डान्स तूच बसवायचा आहेस. यासाठी आपण हे गाणं घ्यायचं... आणि मी त्याला माझ्या मोबाईल मध्ये सॉंग प्ले करून ऐकवलं.


तू आता है सीने मै
जब-जब सांसें भरती हूँ
तेरे दिल की गलियों से
मैं हर रोज़ गुज़रती हूँ.......


त्याने पूर्ण गाणं ऐकल. गाणं ऐकताच त्याला ते खुप आवडल आणि सोबत माझी कन्सेप्ट ही..... "वाह...!!" प्रांजल खुप सुंदर गाणं तु सिलेक्ट केलं आहेस या कन्सेप्टसाठी. आणि हो मला आवडली हा तुझी कन्सेप्ट आणि गाणं ही. "सो आपण उद्यापासून करूया ना प्रॅक्टिस..??"


मी डोळ्यांनीच होकर दिला. तेवढ्यात आई चा आवाज आला आणि आम्ही हॉलमध्ये गेलो. डायनिंग वर गरमा गरम जेवण होत. "आई..., बाबा नाही आले अजून.??". "अग त्यांना आज उशीर होणार आहे, त्यांचा फोन आलेला. त्यांनी जेवुन घ्यायला सांगितलं आहे."


"निशांत बेटा ये बस, कुरकुरीत अळूवडी खा.. पोटभर खा हा."..आई... छान जेवण झालं काकु...निशांत स्वतःच्या पोटावर हात फिरवत बोलला. निशांत तर आज पोट फुटेपर्यंत जेवला होता. सोबत गप्पा होत्याच.
मग अजून गप्पा करून तो निघाला. "काकु चला निघतो आता." येतो बोलावं बाळा"..आई.


"आई मी याला खाली सोडून येते." अस बोलून आम्ही निघालो......"निशांत.., तुला माझ्या घरचा पत्ता कोणी दिला..?""तो, मला पत्ता तुझ्या बेस्ट फ्रिएन्ड ने दिला, प्लीज हा तु तिला काही बोलु नकोस."...निशांत. मी फक्त मानेनेच हो म्हटलं. आम्ही खाली आलो.. याने स्वतःची बाईक काढली, हेल्मेट घातलं. "प्रांजल..., उद्या वाट बघेण.. दहा वाजता"...एवढं बोलुन तो निघून गेला.
मी त्याची बाईक दिसेनाशी होईपर्यंत बघत राहिले.


वर येऊन आईला मदत केली. सगळं आवरून बेडवर पडले. एवढा ही वाईट नाहीये हा निशांत. फक्त काळाने त्याच्या मनात खुप काही साचून राहील आहे. तेच बाहेर यायला हवं. चला उद्या उठायचं आहे. मनाशी ठरवून मी निद्रेच्या स्वाधीन झाले.
काय वाढुन ठेवलय उद्या ते कळलेच.....


to be continued......

(कथेचा हा भाग कसा वाटला हे नक्की सांगा.कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. )


स्टेय ट्युन अँड हॅपी रीडिंग....

©हेमांगी सावंत(कादंबरी)