Julale premache naate - 1 in Marathi Fiction Stories by Hemangi Sawant books and stories PDF | जुळले प्रेमाचे नाते - भाग-१

Featured Books
  • લગ્ન ને હું!

    'મમ્મી હું કોઈની સાથે પણ લગ્ન કરવાના મૂડમાં નથી, મેં નક્...

  • સોલમેટસ - 10

    આરવને પોલીસ સ્ટેશન જવા માટે ફોન આવે છે. બધા વિચારો ખંખેરી અન...

  • It's a Boy

    સખત રડવાનાં અવાજ સાથે આંખ ખુલી.અરે! આ તો મારો જ રડવા નો અવાજ...

  • ફરે તે ફરફરે - 66

    ફરે તે ફરફરે - ૬૬   માનિટ્યુ સ્પ્રીગ આમતો અલમોસામાં જ ગ...

  • ભાગવત રહસ્ય - 177

    ભાગવત રહસ્ય-૧૭૭   તે પછી સાતમા મન્વંતરમાં શ્રાદ્ધદેવ નામે મન...

Categories
Share

जुळले प्रेमाचे नाते - भाग-१

गुड आफ्टरनून.......,
आज मी माझ्या शाळेतल्या काही फ्रेंड्स ला भेटायला जातेय. गेट टु गेदर आहे आमचं. तु जेवुन घे कारण, मी तिकडूनच खाऊन येणार आहे. आणि हो काळजी घे. मिस यु. बाय


चला याला मॅसेज केला आता निघते नाही तर त्या माझा जीव घेतील.
'मी प्रांजल निशांत चिटणीस. काही महिन्यांपूर्वीच माझं लग्न झालं आणि मी देखील इतर नवीन लग्न झालेल्या महिलांसारखी नटून-थटून जातेय आज छोट्याच्या गेट टु गेदर ला. जास्त नाही मेकअप करत. याला नाहीच आवडत मी जास्त केलेला मेकअप. पण मी लावलेलं आयलाईनर आणि लिपस्टिक हेच त्याला प्रचंड आवडत.


खरतर माझ्याच घरी ठरलं होतं भेटायचं. पण सगळ्यांना दुर पडलं असत म्हणुन आम्ही आज अभिलाषाच्या घरी भेटणार आहोत. आम्हा सर्वांना बर पडत ना. त्यात ते मधे आहे. मग काय सर्वांनी ठरवलं तिच्या घरीच भेटुया. मी राहते ठाण्याला. ती घाटकोपर. आणि बाकीच्या दोघी तर एकाच बिल्डींगमध्ये दादर ला राहतात. त्यामुळे आम्हाला घाटकोपर कसं मधे आहे ना त्यामुळे जवळ पडत. पण वाट मात्र माझी लागते.


ट्रेन ने जायला काही प्रॉब्लेम नाही ओ होत, होतो तो परत घरी यायला. किती ती गर्दी. नशीब याच्याकडे गाडी आहे. नाही तर माझं काय झालं असतं. हा तशी मी आधी ट्रेन ने प्रवास करायची. कॉलेजमध्ये असताना. पण आता घरीच असते, त्यामुळे ट्रेन चा प्रवास कमीच झालाय.


चलो पण आज शनिवार म्हणुन मला जास्त गर्दी नाही मिळाली. नाही तर ड्रेसची इस्त्री ही गेली असती आणि माझा भुतासारखा अवतार झाला असता तो वेगळा. असे विचार मनात आले की मलाच माझं हसु येतं.


"आनंद म्हणजे काय म्हहित आहे का...?" आनंद म्हणजे ट्रेनमध्ये विंडो सीट. त्यात हलका पाऊस येऊन गेलाय मग काय छान थंड हवा माझ्या भुरभुऱ्या केसांना उडवत आहे. आनंद घेत घेत पोहोचले बाबा एकदाचे घाटकोपर स्टेशनला. आता ऑटो आणि तिच्या घरी. पाऊस येण्याआधी मी पोहोचते नाही तर सगळी भिजायचे.


"ऑटो....!!"..., या घाटकोपर ला ऑटोसाठी कितीही ओरडा तुमचा जीव जाईल पण एक ऑटो थांबणार नाही. पण नशिबाने एक थांबली.
कुठे..??!..ऑटोवाला. विचारात होता की धमकी देत होता हे त्याचच त्याला म्हाहित. "मला पंथ नगर ला जायचं आहे...मी.
"बर बसा. पण पन्नास रुपये होतील. ऑटोवाला."
"अहो एवढे...!!! जवळच आहे ना. बघा ना तीस घ्या."
"ओ मॅडम पन्नास देत असाल तर ठीक नाही तर आताच उतरा.."ऑटोवाला.
बर ठीक आहे. पन्नास तर पन्नास.


मी तोंडबंद करून गप्पपणे ऑटोमध्ये बसले. खर तर चालत जायचं होतं, पण उशीर होईल म्हणून ऑटो केली, तर हा ऑटोवाला नाटकीच निघाला. असो.
पोहोचले बाबा एकदाचे. दारावरची बेल वाजवते.


टिंग टॉंग... (दरवाजा उघडला गेला.)
समोर अभिलाषा. "काय मॅडम शेवटी लेट आहात तुम्ही." अग ते मी निघाली होती. पण ट्रेन ने, तुला तर म्हाहितच आहे ना. (मी आता कारण देत होती. काय करणार मलाच उशीर झालेला. याच्यासाठी जेवण करून ठेवावं जे लागलं त्यात गेला वेळ.)
"दर वेळीचं आहे ग प्राजु तुझं. चल ये आता त्या दोघी कधीच्या वाट बघत बसल्यात. हो ग.. बोलत मी घरात घुसली. अजून ओरडा होताच त्यादोघींचा.


"या या मिसेस चिटणीस बाई या." काय मग आज कोणतं नवीन कारण. मी ओशाळातच सोफ्यावर बसले..., "काय तुम्ही, मला बसु तरी द्या." लेगच काय प्रश्न. मी आली हा फ्रेश होऊन. पटकन पळत फ्रेश व्हायला गेले नाही तर आज माझी होती शाळा. काय आहे ना खुप दिवसांनी भेटलो ना आम्ही. त्यात मीच नाचत असते घरी लवकर जायचं आहे... लवकर भेटुया आणि मीच लेट पोहोचते, त्यामुळे ओरडा ही मीच खाते. असो.


'काय आई कशा आहात...?' या अभिलाषाच्या सासूबाई. प्रेमळ आहेत. वय झालय म्हणुन जास्त बोलत नाहीत. हा पण मी आले की माझी अखंड बडबड त्या ऐकत असतात. बिचाऱ्या, पण आज झोपण्याच्या तय्यारी असल्याने मी हॉलमध्ये आले.


"गर्ल्स आज आपण दर वेळी सारख्या स्वतःच्या लव्ह स्टोरीज सांगायच्या हा."....प्रियांका. 'खर तर प्रांजल आज तुझी बारी आहे हा. म्हणजे मागच्या वेळी माझी झाली. अभिची लव्ह मॅरेज आणि त्यात तिचा नवरा कोण आणि त्यांची लव्ह स्टोरी आता अक्षरशः शिळी झालीये.' यावर सगळेच हसलो. अगदी अभि सुद्धा. 'नेक्स्ट टाईम आपण वृंदा ची ऐकु. सो आजच्या गेट टु गेदर मध्ये तूच तुझी स्टोरी सांगायची.'
सर्वांनी माना हलवल्या. मग काय माझ्याकडे काहीही ऑपशन नसल्या सारखी मी बोलु लागले.


मी घसा ठीक करत सुरू झाले. तर माझी ओळख झाली ती कॉलेजला असताना. "निशांत चिटणीस." एक वर्ष सिनिअर होता. नावा सारखाच शांत, अस फक्त बघणाऱ्यालाच वाटे. पण मस्तीखोर मुलगा. वर्गात हुशार, "बोलण्यात त्याचा हात धरणारा अजुन जन्माला आलाच नाहीये" असं नेहमी त्याच वाक्य असायचं. मदत करणारा. पण अकडू होता. माझी ओळख झाली ती कॅन्टीनमध्ये. मी दिलेली ऑर्डर हा घेऊन खात होता. मग काय मी काय सोडते की काय त्याला, गेली आणि लागली भांडायला.


"ओ मिस्टर.. हो तुम्हीच मागे नका बघु." तुमच्याशी बोलतेय. तुम्ही जो वडा-सांबर आता चाटून पुसून खात आहात ना.., तो माझा होता. मी त्याचे पैसे भरले होते आणि फक्त चहा घ्यायला गेली तर तुम्ही तो खात आहात...!! त्याने शेवटचा घास संपवला आणि मान वर केली. "तुम्ही मला बोललात का.???" "नाही ओ मी त्या मागच्या भिंती सोबत बोलतेय."


तो हसला आणि माझ्या जवळ येत त्याने मला
वडा- सांबरचे पैसे दिले आणि तो चक्क सॉरी न बोलता निघुन ही गेला. किती खडुसपणा हा. मी ते पैसे घेतले आणि परत एक वडा-सांबरची ऑर्डर दिली. ब्रेक संपला तशी वर्गात गेली.
गप्पा मारत लेक्चर संपले. आम्ही निघालो मी आणि माझी कॉलेज फ्रिएन्ड हर्षल.


मी मधेच थांबली..., बघते तर या सगळ्या हातातलं तसचं ठेवून मन लावून माझं बोलणं ऐकत होत्या. मी थांबले तशा त्यानी लगेच खुणवल...., काय...?! अरे..! ते एक बिस्कीट घेते, बोलता बोलता भूक लागली आणि मी एक बिस्कीट उचलून खाऊ लागले. त्या तिघी अशा बघत होत्या जशा की, मलाच खाऊन टाकतील. मी लगेच तोंडातल बिस्कीट संपवत स्टोरी सुरू केली.


तर एक दिवस अस झालं की, मी आणि तो आम्ही लायब्ररीत एकाच पुस्तकासाठी भांडत होतो. आणि भांडण एवढं वाढल की आम्हा दोघांना तीन आठवड्यासाठी लायब्ररीत येण्यासाठी बंदी केली गेली. तो गेला, तशी मी पण माझे पाय आपटत निघून गेले. असेच दिवस जात होते आणि माझ्या एक्साम जवळ आल्या. मला काही पुस्तकं लायब्ररीतुन इशु करायची होती, पण बंदी असल्याने मी जाऊ देखील शकत नव्हते. माझ्या काही फ्रेंड्स ने त्यांच्या अभ्यासाठी आधीच पुस्तके इशु केली असल्याने मी कोणाकडे मदत ही मागू शकत नव्हते.


त्याच टेंशनमध्ये मी क्लासरुममध्ये बसले होते की, एक मुलगा माझ्यासमोर काही पुस्तके घेऊन आला आणि ठेवुन निघून ही गेला. मी त्याला विचारेपर्यँत तो निघून गेला होता. मी पुस्तकं पाहिली सगळी मला हवी असणारी होती. मग काय मी चक्क नाचले वर्गात. एक आठवडा एक्साममध्ये गेला. आता वेळ होती ती म्हणजे ही पुस्तके मला कोणी दिली हे शोधण्याची.


मी माझ्या फ्रिएन्ड्ला म्हणजे हर्षुला विचारता तिने मला एक सिनिअर स्टुडेंट ने मला एक्साम कोण कोणत्या आहेत आणि कोण कोणती पुस्तके हवी हे विचारल होत. मी तिला नाव विचारल तेव्हा ती बोलली, "अग तो निशांत आहे ना..??! आपल्याला सिनिअर, त्यानेच मागितलं होत. "यार कसला हँडसम आहे ना तो." मी लगेच तिला बाय बोलुन त्याला भेटायला गेले. सगळीकडे शोधलं, पण त्याचा काही शोध लागला नाही. तेव्हा एकजण बोलला की, "कॉलेजच्या ऑडीमध्ये असेल. बघ एकदा तिकडे." मी धावत पळत गेले. ऑडीमध्ये कोणीच नव्हत, होता तो फक्त काळोख. मी मागे फिरणारच होते की मला स्टेजवर कोणी तरी असल्याचे जाणवले. मी पुढे आली तर मला निशांत दिसला. मी बोलण्यासाठी पुढे सरसावले.


"हॅलो निशांत...!!" मी प्रांजल. मला थोडं बोलायच होत तुझ्याशी. "हे बघ थँक्स बोलायला आली असशील तर जा.. मला नको आहे तुझं थँक्स." मी हे फक्त तुझ्या एक्साम चांगल्या जाव्यात म्हणुन केलं आहे. आणि खर तर तु मला सॉरी बोललं पाहिजे. त्या दिवशी ते बुक मला दिल असतस तर हे सगळं झालं नसत. माझा ही खूप अभ्यास राहिला आहे. हे सगळं तो एका दमात बोलला. "बापरे थकला नाहीस का..?" एवढं सगळं बोलून. तेही एकाच दमात. मी त्याला पाण्याची बाटली दिली. ती पण त्याने एकाच घोटात संपवली.


"सॉरी.. खरच मनापासून माफ कर मला." माझ्यामुळे तुला तुझ्या स्टडीमध्ये एवढे प्रॉब्लेम आले. तु बोलतोस तर कान धरू का.. थांब उठाबशाच काढते. अस बोलताच तो हसला.
"वेडी आहेस..., बाय द वे हाय....मी निशांत चिटणीस." मग मी देखील लगेच माझा हात पूढे करत स्वःताच नाव सांगितले. "हॅलो मी प्रांजल प्रधान.


" बाय द वे तु ईथे अंधारात काय करत होतास." "अरे ते कॉलेजचे डान्सचे फंक्शन होणार आहेत ना त्याची प्रॅक्टिस." एक मदत करशील. म्हणजे बघ तुला वाटलं तर हा. नाहीतर बोलशील मी केली म्हणून बोलतोय. खर तर मला एक पार्टनर हवीये. पण मी अजून कोणाला विचारलं नाहीये. तुलाच पहिल्यांदा विचारतोय. माझ्या काही मैत्रिणी आहेत, पण मी त्यांच्यासोबत नेहमीच करतो ना म्हणून तुला विचारल. बघ विचार करून सांग मला. एवढं बोलुन तो निघून गेला. मग मी ही त्याच्या नंतर निघून घरी गेले. घरी फक्त एकच विचार. हो की नाही. नक्की काय करू सुचत नव्हतं, म्हणून हर्षु ला कॉल केला. माझी कॉलेज ची मैत्रीण.


"ए हर्षु एक ना ग.., मग मी आज काय काय घडलं आणि त्याने मला डान्ससाठी विचारले अस सगळ तिला सांगितलं.
"यार प्राजु तु कसली लकी आहेस ग..",त्याने तुला विचारल मी असते तर लगेच हो म्हटले असते. तुला म्हाहित आहे का तो कॉलेज मधला सर्वांत भारी डान्स करणारा मुलगा आहे. प्रिन्सिपल देखील नेहमी त्याचच ऐकतात. कॉलेज च्या प्रत्येक स्पर्धेत तो असतो. तु नक्की हो बोल, नाही तर मी त्याला जाऊन विचारेन. तुला म्हाहित आहे ना मला किती आवडतो तो डे वन पासुन.... मग इकडच्या- टिकडच्या गोष्टी करून मी फोने कट केला.


ही होती आम्हची पहिली भेट. मी सगळ्यांकडे बघुन समोर ठेवलेला पाण्याचा ग्लास उचलला. सगळ्याजणी टाळ्या वाजवू लागल्या. मस्तच झाली हा तुमची पहिली भेट......,


to be continue.......,


मैत्रीतून बहरलेलं प्रेम....!! प्रेम आनंद देत, तर तेच प्रेम दुःख ही... पण प्रत्येकाला हव हवसं वाटणार हे प्रेम प्रत्येकाने करून पाहावं.......,

to be continued.........