Farmhouse - 2 in Marathi Horror Stories by Shubham S Rokade books and stories PDF | फार्महाउस - भाग २

Featured Books
  • નારદ પુરાણ - ભાગ 61

    સનત્કુમાર બોલ્યા, “પ્રણવ (ૐ), હૃદય (નમ: ) વિષ્ણુ શબ્દ તથા સુ...

  • લગ્ન ને હું!

    'મમ્મી હું કોઈની સાથે પણ લગ્ન કરવાના મૂડમાં નથી, મેં નક્...

  • સોલમેટસ - 10

    આરવને પોલીસ સ્ટેશન જવા માટે ફોન આવે છે. બધા વિચારો ખંખેરી અન...

  • It's a Boy

    સખત રડવાનાં અવાજ સાથે આંખ ખુલી.અરે! આ તો મારો જ રડવા નો અવાજ...

  • ફરે તે ફરફરે - 66

    ફરે તે ફરફરે - ૬૬   માનિટ્યુ સ્પ્રીગ આમતો અલમોસામાં જ ગ...

Categories
Share

फार्महाउस - भाग २

फार्महाउस भाग1 वाचला नसेल तर प्रकाशित साहित्य मध्ये जाऊन अवश्य वाचा ....

भाग 1 सारांश

【 बेटावरून गण्याला पोलिसांनी उचलले व तुरुंगात टाकले .  बप्पांनी गण्याला सोडवून आणले व तो सत्याचा शिपाई किंवा शिलेदार झाल्याचे सांगितले . पण गण्याला ते पटले नाही त्यामुळे तो गावाकडे जाऊन आला .  तेव्हा त्याला सत्याची जाणीव झाली कारण गावात त्याला कोणीही ओळखत नव्हते .  बेशुद्धावस्थेत अंजलीने गण्याला एक घर दाखवलं . तेच फार्महाउस होतं पण जेव्हा गणेश शुद्धीवर आला त्याच्या हातात एक शिंपला होता ....... 】

पुढे चालू

        त्या शिंपल्याचा लिबलिबीत स्पर्श त्याला तेव्हाच जाणवला . प्रतिक्षिप्त क्रिये मुळे त्याने तो शिंपला जोरात खाली आपटला त्यामुळे फुटलेल्या शिंपल्यातून सडलेल्या मासांचे शिंतोडे फरशीवरती उडाले व एक गोगलगाय सरपटू लागली .

   साधारणपणे सरपटत असताना चिकट पांढरा द्रव गोगलगाय मागे सोडते .  मात्र ही गोगलगाय रक्त सोडत होती ते रक्त क्षणात वाळत होते व त्याची दुर्गंधी सर्वत्र पसरत होती .  बाप्पांनी आपल्या पायाखाली तिला चिरडून टाकले तसा तिथे रक्तस्राव झाला . ते रक्तही क्षणात वाळून गेले पुन्हा एकदा घरात भयंकर दुर्गंधी पसरली . बाप्पा पळत जाऊन फिनाईल व कापड घेऊन आले . ते सडलेले  मांस बाप्पांनी कागदावरती भरून बाहेर फेकून दिले . फरशी पुसून घेतली .  तेव्हा कुठे दुर्गंधी कमी झाली .

       त्या क्षणभरात जो काही प्रकार घडला होता तो नक्कीच अमानवीय होता पण गाण्याच्या हातात तो शिंपला आलाच कसा ? कारण तो स्वप्न बघत होता , त्यामुळे स्वप्नातील सत्यात येणं शक्यच नव्हतं . मुळात स्वप्नातही कुणी शिंपला दिल्याचे त्यांना आठवत नव्हते . मग नक्की शिंपला त्याच्या हातात आला तरी कसा ..  ?

" गणपतराव तुमच्या अंजलीने भारीच मजा केली म्हणायची .

" अहो हा शिंपला अंजलीने नाही दिला...
आणि दिला असता तरी स्वप्नातला शिंपला
सत्यात कसा येईल......?

" गणपतराव ते स्वप्न नव्हतं ..."

तेव्हाच गण्याला अंजलीचे बोल आठवले

"  हे स्वप्न नाही ......

म्हणजे तो खरंच घरासमोर गेला होता की काय....? त्याने आपल्या पायाचे तळवे बघितले त्याला ओली माती चिटकली होती .....

" पण मी तिथे जाईलच कसा......? मी तर इथेच होतो ना तुमच्यासमोर बेशुद्ध पडलेला...."

"  बरोबर आहे तू बेशुद्ध होता पण तू इथे नव्हता ...

" मला काहीच कळेना तुम्ही काय म्हणताय ते ...

"  म्हणजे फकस्त तुझं शरीर इथं होतं , तू मनाने आत्म्याने तिथेच होता .....

" पण हे कसं शक्य होतं......"

"  कळल ,  हळू-हळू सगळ्या प्रश्नाची उत्तर एकदम मिळत नसतात.....    मला एक सांगा गणपतराव तो शिंपला तुमच्याकडे कोणी दिला ?

"  बप्पा मला काहीच आठवत नाही की कोणी दिला ....नि माझ्याकडे कसा आला....?

तेव्हाच किचनमधून भांडी पडल्याचा आवाज झाला...
बाप्पा पळतच किचनमधे गेले.

"  काय झालं बप्पा...?

" काय नाय गणपतराव मांजर आहेत ..

  थोडावेळ भांड्यांचा आवाज येत राहिला . नंतर सर्वत्र शांतता पसरली .  त्या शांत वातावरणात गण्या विचारांच्या गर्तेत हरवून गेला.

'  बरोबर आहे ते स्वप्न नव्हतं . म्हणजे खरंच होतं ते सारं... अंजली म्हणाली होती ते स्वप्न नाही .' तरी त्याच्याकडे शिंपला कसा आला...? त्याला काहीच आठवत नव्हतं . त्याने डोक्याला खूप ताण दिला तरीही त्याला काही सुगावा लागेना . जसं काही कुणीतरी त्याच्या जुन्या आठवणी पुसून टाकल्या होत्या.

थोड्यावेळाने बप्पा दोन दुधाचे ग्लास घेऊन आले . त्यांनी स्वतः एक घेतला व गण्याला दुसरा दिला .  ते गोड गरम दूध पोटात जाताच त्याच्या डोळ्यावर झोपेचा पडदा येऊ लागला .  अगोदर झालेली थकावट व मनावरच्या ताणामुळे तो लगेच झोपी गेला .

' टक-टक ' कुणीतरी दगडावर हातोड्याने घाव घालावेत असा आवाज येत होता . तो आवाज हळूहळू वाढतच गेला .   कानाचे पडदे फाडून मेंदूच्या सर्व संवेदना बधीर करत होता .   तो आवाज कुठून येतोय बघायला गण्याने डोळे उघडले .  कुणीतरी दारावरती टक टक करीत होते .  खोलीत अंधार होता .  खिडकीतून पडलेल्या चंद्राच्या मंद प्रकाशात समोरच्या घड्याळाचा काटा 12 वाजल्याचे दाखवत होता . म्हणजेच तो 12 तासांपेक्षा जास्त झोपला होता .  तो बेडवरून उठून दार उघडायला गेला . दार उघडलं तर समोर अंजली

" तू

"  चल माझ्याबरोबर

"  कुठे , आता .....?

"  चल गुपचूप महत्त्वाचं आहे

"  थांब मी बप्पाला उठवतो

"  नको तू एकटाच चल , चल लवकर नाहीतर उशीर होईल...

क्रमःश