Farmhouse - 8 in Marathi Horror Stories by Shubham S Rokade books and stories PDF | फार्महाउस - भाग ८

Featured Books
  • નારદ પુરાણ - ભાગ 61

    સનત્કુમાર બોલ્યા, “પ્રણવ (ૐ), હૃદય (નમ: ) વિષ્ણુ શબ્દ તથા સુ...

  • લગ્ન ને હું!

    'મમ્મી હું કોઈની સાથે પણ લગ્ન કરવાના મૂડમાં નથી, મેં નક્...

  • સોલમેટસ - 10

    આરવને પોલીસ સ્ટેશન જવા માટે ફોન આવે છે. બધા વિચારો ખંખેરી અન...

  • It's a Boy

    સખત રડવાનાં અવાજ સાથે આંખ ખુલી.અરે! આ તો મારો જ રડવા નો અવાજ...

  • ફરે તે ફરફરે - 66

    ફરે તે ફરફરે - ૬૬   માનિટ્યુ સ્પ્રીગ આમતો અલમોસામાં જ ગ...

Categories
Share

फार्महाउस - भाग ८

तिच्या मधुर आवाजात ऐकत असताना त्याच्या समोर सारे शब्द दृश्यात रूपांतरित होत होते . शैला बोलत होती -

   " आता तू म्हणशील कि मला हे सारं कसं कळलं वगैरे ....?  तर ऐक , मीही एक प्रतिनिधीच आहे .  तुझ्या सारखी .  आपलं एकच काम आहे ते म्हणजे त्यांचा विनाश . ज्या दृष्ट आणि पाशवी शक्तींबरोबर आपला संघर्ष चालू आहे त्यांच्यासोबत एकटा-दुकटा लढू शकत नाही .  आपल्यासारखे अजूनही असतील त्यांचा ही त्या शक्तींविरुद्ध लढा चालू असेल . ज्याला-त्याला , ज्याच्या-त्याच्या कामगिरी वाटून दिल्या आहेत . आतापर्यंत तु तुझी कामगिरी करत होता ; मी माझी कामगिरी करत होते . आता आपल्याला मिळून एक कार्य पूर्ण करायचं आहे .  आपल्याबरोबर अजूनही येथील ,  पण तूर्तास तरी आपल्यालाच पुढची पावले टाकायला हवीत . तेही अगदी जपून .

" पण शैला मला एक सांग तुला माझ्या आणि गणेश च्या संदर्भात सारं कसं कळालं ...?
तो रामचंद्र इंगळे म्हणजेच पोलिस विचारत होता .

" तुम्हाला एखादं काम दिलं तर ते काम कसं करायचं हे सुद्धा सांगितलं जातं . आपल्याला फक्त सांगितलेलं करायचं असतं . एक मात्र खरं आहे आपल्याला ओळखायला यायला हवं की आपल्याला नक्की काय काम सांगितलेलं आहे....?
आणि सांगण्याच्याही बर्‍याच पद्धती असतात . ज्या त्या व्यक्तीच्या जाणिवा , मानसिक शक्ती ,  खंबीरता व कुवतीवर त्याला ते संदेश पोहोचवले जातात .  मला म्हणाल तर अंतरात जाणीव होते , काही चित्रे व रेखाटने साकारली जातात , त्याबरोबर काही शब्द लिहिले , जातात बऱ्याच वेळा सारं काही माहित असल्या सारखं मला आपोआप उमगंतं की आता आपल्याला काय करायला पाहिजे.....? "

" तेच म्हणतो मी काय करायचं .....?
पुन्हा इंगळे साहेब म्हणाले

गण्याच्या प्रश्नाची थोडीबहुत उत्तरे त्याला मिळाली होती .  पण अजूनही त्याच्यापुढे कृतीचा रस्ता अस्पष्टच होता .  त्याला मार्गच दिसत नव्हता .  अचानक त्याच्या ध्यानात बप्पां व त्यांचा मठ आला .

" आपण बप्पाच्या मठात जाऊया ; बप्पांनी आपल्यासाठी काहीतरी चिट्ठी वगैरे सोडली असेलच .  ते स्वत:ही असतील तिथे.

" कोण बप्पा..?
दोघेही एकदमच म्हणाले

" चला गाडी काढा ,.जाता - जाता सांगतो ....

पुन्हा एकदा ते मठाकडे निघाले

     गाडी मठापाशी पोहोचली .  गण्या उतरून पळतच निघाला . उत्सुकतेपोटी त्याला दोघांचेही भान राहिलं नाही . त्याने दार उघडलं आणि आत पाऊल टाकले .  त्याच्या डोळ्यावर विश्वास बसेना तो मठ नव्हताच . अगोदर जे पाहिले ते वेगळेच आणि आता पाहतो तर त्या जागेचे रुपच बदलले होते . सर्वत्र जाळ्या लागल्या होत्या .   जणु काही तो बंगला कैक वर्षे बंद होता . सर्वत्र धूळ नि पालापाचोळा साचला होता .  कोणीही ती जागा पाहून जराही विचार न करता सांगितलं असतं की ती जागा कैक वर्षे मानवी वापरात नव्हती  . मानवी वास्तव्याची पुसटशीही खून  त्याठिकाणी दिसत नव्हती .  गाण्याला कळालच नाही की तो फक्त एकटाच त्या खोलीत आला होता . ती खोली बाप्पांच्या माठातील नव्हतीच . त्याला अंजलीने येथे आणले होते .  फक्त त्यालाच.....

" गणेश .....
कातळ काळोखातील घनगंभीर शांततेला चिरत आलेल्या आवाजाने गण्या दचकला . जेव्हा अंजलीचा आवाज त्याने ओळखला तेव्हा निर्धास्त होऊन त्या आवाजाला त्याने प्रतिसाद दिला

" मला इथे का आणले ...?

" तुला काहीतरी सांगायचं , काही तरी दाखवायचंय.....

"  काय...?

ती सांगू लागली -
" तू मला नेहमी विचारतोस ना ...  लहानपणा नंतर मी कुठे गेले...?  माझ्यासोबत नंतर काय झालं ...? मी ही अशी का झाले ..? आणि माझी मुक्ती कशी होणार...? मला तुला सारे काही सांगायचं .  सांगायचं आहे म्हणण्यापेक्षा ,  दाखवायचं आहे .  तुला मी सारं काही दाखवते ; त्यानंतरच तू ठरव तुला व तुझ्या साथीदारांना काय करायला पाहिजे .

  तो मध्यभागी एका सिंहासन सारख्या दिसणाऱ्या सोनेरी , मखमली  खुर्चीवर बसला . त्याच्या चारी बाजूंना अंधार होता . कुठेतरी एक सोनेरी प्रकाश शलाका चमकली ; व छोटासा विस्फोट झाला .  त्यानंतर त्याच्या चारी बाजूला तेच सोनेरी रंगाचे विस्फोट होत गेले .  त्यातून विविध रंग बाहेर पडू लागले व पसरू लागले   . जणू काही कोणतातरी चित्रकार त्याच्या कुंचल्याच्या फटक्याने त्रिमितीय चित्र काढत होता....

  किती रमणीय देखावा होता .  ते मोठे वडाचे झाड होते .  त्याच्या पारंब्या जमिनीपर्यंत पसरल्या होत्या . त्या वडाच्या झाडाला कितीतरी पक्षांनी आपलं घर बनवलं होतं . त्यांच्या त्या किलबिल आवाजाला दोन मुलांच्या खेळण्या चा आवाज साथ देत होता .  त्यात एक मुलगा व एक मुलगी होती .  त्यांचा शिवाशिवीचा खेळ चालू होता . मुलगा पुढे पळत होता व मुलगी मागे . मुलगा भरभर पारंब्यावरून चढत जात होता .  तोच गणेश , त्याने स्वतःला ओळखलं . त्याच्यामागे तीच होती , अंजली .  तीपण  पारंब्या वर चढत होती .  तो वरपर्यंत पोहोचला . तिला सापडू नये म्हणून तो जोरात पळू लागला . पण त्याचा पाय घसरला . तो पडणारच होता , पण किती चपळतेने उडी मारून  त्याचा हात धरून तिने त्याला वर घेतले .....

  पुन्हा एकदा डोळे दिपवणारा प्रकाश चकाकला . त्याची तीव्रता इतकी होती , की काही सेकंद त्याने डोळे उघडले नाहीत . त्याच्या झाकलेल्या डोळ्यापुढे काळ्या , निळ्या जांभळ्या , लाल नि गुलाबी ज्वाला झळकत होत्या . त्याने डोळे उघडले तेव्हा त्याच्यापुढे एक खोली होती . त्याला आठवलं की ती  अंजलीच्या घरातील खोली होती  . एक दारुडा  रंग झडून गेलेल्या सतरंजीवर आणि पापुद्रे निघालेल्या भिंतीला टेकून ;  त्याच्या  घाणेरड्या हाताला न शोभणाऱ्या चकाकणाऱ्या काचेच्या ग्लासात उंची दारू पीत होता . त्याच्यापुढे रंग उडालेल्या खुर्चीत एक माणूस सिगारेट फुकत बसला होता .  त्या खोलीत डोकावून दुसरे एका माणसाने सांगितले ....' चल बे काम झाले ' . दूर कुठेतरी लहान मुलीच्या रडण्याचा आवाज येत होता . त्याला कळालं अंजलीच्या दारुड्या बापाने काही पैशासाठी स्वतःच्या मुलीला म्हणजे अंजली विकलं होतं .....!

    पुन्हा एकदा समोरचा देखावा पालटला . आता ते एखाद्या संस्थेच्या कार्यालयात होते .  एका खुर्चीवर पन्नाशी ओलांडलेला म्हातारा बसला होता .  त्याच्या पुढे दोन इसम होते . तेच ते दोघे ज्यांनी अंजलीला विकत घेतलं होतं .
" थोड्या दिवस राहू दे तुझ्या अनाथाश्रमात , कळीचं फूल होईपर्यंत ....
" आता रेट वाढवलेला आहे आपण , जास्त पैसे द्यावे लागतील ....
तो पन्नाशी उलटलेल्या माणूस बोलला
" ठीक आहे......  कळतात सारे तुझे पण नखरे ......असू दे तरीपण .....

पुन्हा एकदा देखावा बदलला जिथे तो बसला होता त्या खोलीत आला......

" मी इतकी ही लहान नव्हते की काय चाललंय ते कळू नये....  मला सारं कळत होतं . पण मी काय करू शकत होते..?  कुठे जाऊ शकत होते ..? माझा एकुलता एक आधार तो माझा बाप . त्यांनेच मला विकलं , मी त्यावेळी खरच अबला होते .  मला कोणाचाच आधार नव्हता .  बाहेरच्या जगात जगण्यासाठी ना माझ्याकडे कोणती कला होती , ना काम होतं ,  ना मला काही करता येत होतं ..... बाहेरच्या जगात माझ्या शरीरांवरती बोचणाऱ्या नजरा मला पदोपदी जाणवत होत्या .  त्यामुळे तिथून पळून जायचं मी मुळीच प्रयत्न केला नाही .  उलट तिथेच जमवून घेतलं अनाथाश्रमाच्या शाळेत शिकू लागले . चांगले गुण मिळवू लागले . मी मॅट्रिकला पहिला नंबर काढला . अनाथाश्रम चालवत होते त्यांच्या नजरेत मी आले . त्यांनी मला तिथून काढून दुसऱ्या वस्तीगृहात टाकले . मी त्या दलदलीतून इतक्या सहज सुटले कि मला आकाशही ठेंगणे वाटू लागले . मला घेऊन जाताना त्या म्हातारऱ्याने विरोध करायचा प्रयत्न केला . पण शेवटी त्याला झुकावं लागलं . नंतर मला कळाले की त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली ; पण मला माहित होतं ज्या दोघांनी मला विकत घेतलं होतं त्या दोघांच्या हातून मी नसल्यामुळे त्या म्हाताऱ्याचा त्यांनीच खून केला होता ....

कॉलेज झालं .  तिथेही मी चमकलेच  . नंतर ग्रॅज्युएशनसाठी माझा नंबर एमबीबीएसला मेरीट मध्ये बसला . तिथेच असताना माझ्या आयुष्यात तो आला .  माझ्या निराधार मनाला त्याने आधार दिला . तो माझा ,  माझ्या आयुष्याचा साथीदार बनला .  आमच्या लपून-छपून गाठीभेटी होऊ लागल्या ....
आणि आवाज थांबला . पुन्हा एकदा आजूबाजूचा देखावा पालटला

ती एक बेडरूम होती .  मधुचंद्रासाठी सजवतात तशी सजवली होती .  तीच ती रूपवती अंजली बसली होती . गाण्याच्या काळजात नकळत एक घाव पडलाच पण पुढची दृश्य पाहून त्याचं ह्रदयच पिळवटून निघाले   . त्या खोलीत तिचा तथाकथित साथीदार आलाच नाही . आलं होतं ते दुसरीच कुणीतरी ,   कोणीतरी म्हणण्यापेक्षा काहीतरी  ....
काळा आकार,  पोत्यामध्ये माती भरावी तसा , अवाढव्य अस्ता- व्यस्त ,संपूर्ण शरीरावर ती लांब लांब काळे केस ते मानवी शरीर नव्हतंच .... काही दृश्य त्याच्या अंतर्मनावर उमटताच त्याने डोळे मिटून घेतले . नंतर खोली तिच्या किंचाळण्याने ,  भयानक दुर्गंधीने , रक्ताचे शिंतोडे आणि  ग्लब-ग्लब करून काहीतरी खाण्याच्या आवाजाने  भरून गेली.....
मी ज्याच्यावर ती सर्वस्व अर्पण केलं होतं ;  त्यानं मला एका बळीसाठी अर्पण केलं .  तो एका नीच , अधम पंथाचा उपासक होता . त्याने बळीसाठी ठराविक अटींमुळे माझी निवड केली होती .  हेतुपूर्वक माझ्याभोवती जाळे गुंफले होते .  त्या पिशाच्याच्याने माझा  उपभोग घेऊन मलाच भक्ष्य बनवलं .  माझा मृत्यू झाला खरा पण मी मुक्त झालेच नाही  . मला कळालं नाही की मी भूत बनून का वावरत होते ....? मला राग आला . भयानक राग आला . माझा बळी दिला होता आणि ज्याने घेतला होता त्यांचा....  मी रागाने दोघांवरही चाल करून जाणार होते . माझं काहीही हो,  मला त्यांना सोडायचं नव्हंतं . पण मला तेव्हाच इतकी तीव्र अंतर-प्रेरणा झाली की ~'  योग वेळेसाठी थांब .  प्रत्येकाला त्याने केलेल्या कर्माचे फळ मिळतं .  कुणीही कितीही वाईट असू दे , पापाचा घडा भरला की तो संपतोच .  म्हणून तू प्रतीक्षा कर.  योग्य वेळेची वाट पहा .' मग वेळोवेळी अशा गोष्टी जाणवतच गेल्या . अशा गोष्टी मुळेच मी तुला वाचवायला त्या टेकडीवर पोहोचलो जिथे तू स्वतःहून बळी जायला निघाला होता . नंतर  मी वेळोवेळी तुझ्या स्वप्नात आले , घडणाऱ्या गोष्टी सांगितल्या , या सर्व गोष्टी त्यांनी घडवून आणल्या आहेत . या सर्व गोष्टी मागे त्यांचा हात आहे . त्याच शक्ती ,  ज्या  दुष्ट अमानवी पाशवी   अमंगलमय शक्ती विरुद्ध लढत आहेत.

आत्ताच ती वेळ आली आहे . त्यांच्या नाशाचा काळ जवळ आला आहे . त्यांचे विनाशक आपणच आहोत .   आपल्यामागे त्या शक्‍तींचा बळ आहे . फक्त तु तुझ्या साथीदारांना घेऊन योग्य जागी पोहोचायचयं....

"  कोणती जागा ....?

"  तीच ती , मी पहिल्यांदा तुला घेऊन गेले होते ती ...

" _ _  व फार्महाउस .... ?

"  हो तेच तेच ते फार्महाउस आहे जिथे माझा व माझ्यासारख्या कित्येकांच्या बळी दिला गेला आहे.....!