Gosht aajichi - 1 in Marathi Moral Stories by Anuja Kulkarni books and stories PDF | गोष्ट आजीची..- १

Featured Books
Categories
Share

गोष्ट आजीची..- १

गोष्ट आजीची..- १

"अजय, आत्ताच्या आत्ता ह्यांना अॅडमिट करायला पाहिजे रे.. तुम्हाला यांना होणारा त्रास डोळ्यांना दिसत नाही का? हे काही बोलत नाहीत पण तुम्हाला काही समजू नये?" आजी बोलली

"विजय ला सांग ग आई.. मला आत्ता खरच वेळ नाही आहे! माझ काम इतक चालू आहे! मला बाबांकडे बघायला सुद्धा वेळ नाहीये! आणि त्यांच वय झालाय.. छोट्या कुरबुरी चालणारच ना... लगेच अॅडमिट करायची गरज नसते!" अजय नी उत्तर दिल...

"काय? त्याच वय झालाय आणि त्यांच्या छोट्या कुरबुरी चालणारच? तुला हे अस बोलतांना लाज नाही का वाटत अजय?" आजी चिडून बोलली, "तू मोठा मुलगा आहेस! आणि आम्ही तुझ्याकडे राहतो.. मग तुलाच सांगणार ना? आणि कसा विसरलास तुला बर नसायचं तेव्हा तुझे बाबा तुझी किती काळजी घ्यायचे?"

"काही विसरलो नाहीये ग आई... पण मला काम आहे तर मी काय करू? आणि तुम्ही माझ्याकडे राहता म्हणजे सगळी जबाबदारी फक्त माझीच आहे अस थोडी आहे? बाबांचा सारख दवाखाना आणि औषध चालू असतात. तेव्हा मीच बघतो ना.. आणि विजय मोकळाच असतो की.. त्याला थोड बघू दे की बाबांकडे.. आणि बाबांची बरीच वर्ष सेवा केलीच आहे की मी.. आता विजय ला थोडी सेवा करू दे.. अस म्हणल तर माझ कुठे चुकल?" उद्धटपणे अजय बोलला...

"तू सेवा केलीस? ह्यांची तब्येत एकदम ठणठणीत होती! काही दिवस झाले त्यांना गोळ्या आणि दवाखाना चालू झाला.. आणि मला सांगताय खूप केलय तू? काय केलात रे तुम्ही इतक बाबांसाठी? आणि ठीके.. मी विजयशी बोलते! तू कर तुझ काम.. आणि एक विचारायचंय! म्हणजे देव न करो अस काही होवो! राधा म्हणजे तुझी बायको किंवा ऋता तुझी मुलगी आजारी पडली तर हेच बोलशील का? तेव्हा पण तुझ्याकडे वेळ नसेल का?"

"का अभद्र बोलती आहेस आई.. ऋता आणि राधाला काही होणार नाही! त्यांना मध्ये आणायचा संबंध नाहीये! आणि विजय नी बाबांकडे पाहिलं तर कुठे बिघडलं? विजय ला बाबांकडे पाहायला सांगितलं तर इतकी का चिडलीस?" आईच्या अंगावर खेकसत अजय म्हणाला..

"ऋता किंवा राधा ला काही होवो अशी माझी इच्छा नाहीच पण.. जाउदेत! वडिलांनी तुमच्यासाठी इतक केल आणि त्यांच्या आजारपणांत त्यांची काळजी सुद्धा घेता येत नाही! खरच जाउदेत आता.. माझी चूक मी तुला सांगितलं! मी बोलते विजय शी! तू मोठा मुलगा आहेस म्हणून तुला सांगितलं पण तुझी वडिलांना दवाखान्यात न्यायची इच्छा नसेल तर ठीके.. मी बळजुबरी तर नाही करू शकत..." आई च्या डोळ्यात पाणी आल.. ती अजय समोर न थांबता तिथून निघून गेली..

आईनी लगेच विजय ला फोन लावला.. विजय नी फोन लावला.. तेव्हा आई ला खिदळण्याचे आवाज येत होते.. आई बोलली,

"विजय.. ह्यांना खूप अस्वस्थ वाटतंय! तू आत्ता ह्यांना अॅडमिट करायला येऊ शकतोस?"

"काय झाल बाबांना?"

"त्यांच्या छातीत दुखतंय! आणि त्यांना हार्ट चा त्रास आहेच.. काही सिरिअस होण्या आधी डॉक्टर कडे गेलेलं चांगल.."

"फक्त छातीत दुखतंय ना? बाकी काही त्रास होत नाहीये ना? मला वाटत गॅस झाले असतील.. त्यांना म्हणाव थोड चाला.. मग त्यांना बर वाटेल!"

विजय च उत्तर बघून आई रडवेली झाली..

"अरे, ह्यांना श्वास घ्यायला सुद्धा त्रास होतो आहे.. चालू शकतील का? आणि तू थोड चालू दे काय म्हणतोयस? बाबांना बर वाटत नाहीये म्हणून तुला फोन केला ना? तू कामात बिझी आहेस का?"

"हो ग आई.. आत्ता काम आहे!" तितक्यात आईनी मागून नीता म्हणजे त्याच्या बायकोचा आवाज ऐकला... ती बोलत होती,

"विजय कोण आहे रे फोन वर? ये ना... आपले सगळे मित्र जमले आहेत! सगळे तुझी वाट पाहतायत! ड्रिंक्स घ्यायला त्यांना तू पण हवा आहेस! तुझ्याशिवाय ते ड्रिंक्स नाही घेणार अस म्हणतायत!"

आई नी नीता च बोलण ऐकल आणि तिनी काही न बोलता फोन ठेवला.. तिथे विजय नी आईनी फोन ठेवण्यावर हुष केल आणि पार्टी मध्ये जाऊन ड्रिंक्स एन्जॉय करायला लागला..

त्यादिवशी आईला आपल्या संगोपनबद्दल मनात शंका आली. तिची मुल इतकी स्वार्थी होतील अस तिला स्वप्नात सुद्धा वाटल न्हवत. ह्याक्षणी काय कराव हे तिला कळत न्हवत. तितक्यात आजोबांनी तिला हाक मारली,

"शकू, इथे बस माझ्यापाशी!"

"आले हो.." आजी आजोबांपाशी आली.. "तुम्हाला काही हवय? काही आणून देऊ का? पाणी हवय?"

"नाही ग.. काही नको! फक्त माझ्यापाशी बैस!"

"आता तुम्हाला बर वाटतंय का? अजय आणि विजय दोघांना तुमच्यासाठी वेळ नाही! आणि मी सुद्धा अशी. सगळ्यांवर अवलंबून. तुमच्यासाठी काही करू शकत नाही... याच मला वाईटच वाटत.."

"तू किती करतेस शकू.. अस अजिबात बोलू नकोस!" क्षीण आवाजात आजोबा बोलले..

"मी अजय आणि विजय ला सांगितलं की अॅडमिट करा पण दोघांनाही तुमच्याकडे पाहायला सुद्धा वेळ नाहीये! आपण आपल्या मुलाचं संगोपन नीट नाही केल असच वाटतंय... आणि मी हि अशी! बाहेर वावरले नसल्यामुळे माझे निर्णय स्वतः घेऊ शकत नाहीत! तुम्ही होतात त्यामुळे मला कधी घराबाहेर पडायची कधी वेळ आलीच नाही.. तुम्ही नेहमी माझ्यासाठी तयार असायचा.. त्यामुळे मी फक्त घर काम आणि मुल हेच बघत होते...बाहेरच्या जगाशी कधी संपर्क आलाच नाही माझा." आजी तिच्या डोळ्यातलं पाणी थांबवू शकली नाही.

"रडू नकोस शकू.. तू खूप केलास माझ्यासाठी आणि घरासाठी... आणि अजय विजय च म्हणशील तर त्यांनी सुद्धा बरंच केलाय की माझ्यासाठी... आता त्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या आहेत मग मी तर त्याच्यांकडून अपेक्षा ठेऊ?" आजोबा बोलले..

"तुम्हाला तुमच्या मुलाचं फार कौतुक आहे. पण त्यांना दिसत नाही का की आपले वडील ज्यांनी आपल्यासाठी इतक केल ते आत्ता किती वेदनेमध्ये आहेत.."

"जाउदेत शकू.. आता त्यांचा विषय नको! मला तुझ्याशी बोलायचं! महत्वाच.."

"बोला.. आणि महत्वाच?" आजी थोडी घाबरून बोलली..

"ऐक.. तू कधी पैश्यांच्या बाबतीत लक्ष घातलं नाहीस! तुला तुझ्या नावावर काय आहे त्याची सुद्धा कल्पना नाहीये!"

"मी काय करू हो... पैश्याविषयी जाणून घेऊन? त्यासाठी तुम्ही आहात की.. मला तुमच्या बरोबर राहायचं फक्त!"

"तू ऐक.. मला कधी काही झाल तर तुला माहिती पाहिजे! आणि तुला कोणी फसवल तर ते मला आवडणार नाही.."

"मला कोण फसवणार आहे?" आजी विचार करायला लागली...

"कोणीही फसवू शकत.. अगदी आपली मुल सुद्धा! म्हणूनच सगळ्यात माझ्यानंतर तुझ नाव दुसर आहे. आणि तुझ्या नावावर सुधा बराच काय काय आहे. ते तू नीट सांभाळून ठेव... आता डोळे उघडे ठेऊन काम कर! आपल घर आहे ते माझ्या नावावर आहे आणि त्यात तुझ नाव दुसर घातलं आहे. माझ्या नंतर तुला काही त्रास झालेला मला आवडणार नाही... मी विल मध्ये काय काय लिहील आहे ते तुला सांगून ठेवतो!"

"तुम्हाला काही होणार नाही हो.. आणि विल? मला उगाच रडवू नका.." आजी खरोखर रडायला लागली,

"रडू नकोस शकू.. पण तुला जे आहे ते मान्य कराव लागेलच ना.. मी आज आहे आणि उद्या नाही! तेव्हा तू मनानी खंबीर हो आणि सगळे पैश्याचे व्यवहार समजून घे.. आणि सगळी जबाबदारी घे!"

"ठीके.. तुम्ही आता जास्ती बोलू नका! उगाच दम लागेल.. आधीच तुम्हाला श्वास घ्यायला सुद्धा त्रास होतो आहे.."

"मी ठीक आहे ग.. माझ आधी चुकलंच.. तुल पैश्याचे व्यवहार समजून नाही सांगितले..." हळू हळू आजोबांनी आजीला सगळ समजाऊन सांगितलं. विल मध्ये काय लिहील आहे ते सुद्धा! आजी ऐकत होती पण तिला खरच पैश्यात काहीही रस न्हवता.

"पैसे पैसे.. मला नको पैसे.. मला तुमची इतकी मोलाची साथ मिळाली ती पैश्यापेक्षा खूप पटींनी मोलाची आहे माझ्यासाठी.. तुम्ही आता शांत पडा पाहू.. तुम्हाला ज्यूस आणून देऊ का?"

"नको काही नको.. छातीत थोड दुखतय.. तू काळजी नको करूस! मी आता शांत पडतो! तू बस माझ्या जवळ.. अनिता लक्षत ठेव. सगळे व्यवहार तू पाहायचे. मला काही कळत नाही म्हणून नुसत बसून राहायचं नाही. तुला गरज पडली तर माझे विद्यार्थी आहेत. ते तुला सगळ समजून सांगतील. माझ्यानंतर तू सगळ पाहायचं आहेस. आणि ते तू उत्तमरीत्या करशील, मला खात्री आहे. "

"ठीके.. झोपा तुम्ही..आधी तुम्ही बरे व्हा मग बघू अपान पैश्याच. पैसे कुठे पळून जात नाहीत. आणि मी आहे इथेच!" आजोबांना झोप लागली.. त्यांच्या जवळच आजी बसली होती.. बसल्या बसल्या तिला सुद्धा डुलकी लागली..आजीला जाग आली तेव्हा तिनी पाहिलं तर आजोबांची हालचाल अजिबातच होत न्हवती. आजी घाबरलीच! तिनी अजय ला हाक मारली..

अनुजा कुलकर्णी.