“ते” बुचाचं झाड...
“ते” बुचाचं झाड आजही माझ्या आठवणीतून जात नाही. पाऊसा मध्ये जरा जास्तच प्रकार्ष्यानी आठवण येते त्या झाडाची.. आणि झाडाची आठवण आली कि नकळत डोळ्यातून अश्रू बाहेर येतात. आमच्या घरा समोर एक मोठ्ठ बुचाच झाड होतं. लहानपणीपासुनाच्या खूप आठवणी आहेत त्या बुचाच्या झाडाच्या.... उंच च्या उंच होतं ते झाड. एकदम रुबाबदार दिसायचं.. त्या झाडाकडे एक टक पाहत राहव असाच वाटायचं... पाऊसा मधे तर झाड फुलांनी अगदी भरून जायचं.. पाऊस पडला कि खाली मस्त फुलांचा सडा पडलेला असायचा कि ती फुल वेचून आणायचा इतका मोह ह्यायाचा. मोह आवरता न घेत मी ती फुल वेचून खोलीत ठेऊन द्यायचे....मस्त सुगंध पसरायचा खोलीत.. आणि मग मी अभ्यास करत बसायचे! मी अभ्यास करत बसले कि खिडकीतून बरोबर ते झाड दिसायचं. मधेच वारा आला कि फुलांचा वेड लावेल असा सुगंध यायचा!! रात्री पाहिलं कि कधी कधी भीती ही वाटायची पण भीती क्षणीकचं .. कारण त्या झाडाशी नातं तर लहानपणापासूनच जुळलं होतं... वेळ झाला कि न चुकता रोज गप्पा ह्यायाच्याच त्या झाडाशी मग नातं हे होणारच होत ना... आणि अभ्यास असेल तरी अभ्यासातून मधेच वेळ काढून झाडाशी न चुकता गप्पा मारायचेचं. गप्पा म्हणजे,अगदी कोणत्याही विषयावरच्या गप्पा..त्या झाडाशी गप्पा मारल्याशिवाय चैनच नाही पडायचं मला ..झाडाशी गप्पा मारल्या कि अभ्यास असो वा इतर ताण कुठच्या कुठे पळून जायचे! मला एकदम प्रसन्न वाटायचं.. आणि नंतर अभ्यास एकदम मस्तचं ह्यायचा!...
बुचाच्या झाडावर,मस्त पक्षी यायचे! अभ्यास करता करता पक्ष्याचे आवाज यायचे.. असंख्य प्रकारचे पक्षी एकाच वेळी एकाच झाडावर पाहून मी थक्क ह्वायाचे! मला पक्षी निरीक्षणाची आवड नुकतीच निर्माण झालेली.. “कावळे”,”चिमणी”,“बुलबुल”,“कोकीळ”,”कोकिला”,”पोपट” आणि कधी कधी तर “धनेश” सुद्धा यायचे. अभ्यास करता करता पक्ष्यांचा किलबिलाट सतत ऐकू यायचा.....खूप मस्त वाटायचं!!! दिवसेंदिवस झाडाशी नातं अजूनच घट्ट होत होतं पण पाऊसातला तो एक दिवस, जो मी कधीही विसरणार नाही.. दुपारची वेळ होती... मी नेहमीप्रमाणे अभ्यास करत मध्ये मध्ये झाडाकडे पाहत होते! तेह्वा खूप जोरात वार सुटल..वारा कसला,वादळच होतं ते..भीती वाटावी अस वादळ..... तेह्वा मात्र मी माझा अभ्यास जरा वेळ बाजूला ठेवला आणि मी बाहेरचं पाहत होते बुचाच्या झाडाकडे....जोरजोरात हलत होतं ते वाऱ्यानी...त्या वादळाकडे पाहून छातीत अगदी धस्स होत होतं... माझी नजर त्या बुचाच्या झाडावरच होती... तेह्वा माझी पापणी लवेपर्यंत जोरात आवाज झाला... आणि मला काही कळायच्या आत, एका क्षणात, माझ्या डोळ्यासमोर ते झाड कोलमडून पडल..सगळ माझ्या डोळ्यासमोरच... ते दृश्य पाहिलं आणि एका क्षणात माझे डोळे पाण्यानी भिजले... मी डोळ्यातले अश्रू थांबवू शकले नाही! आजही तो दिवस आठवला कि डोळे पाणावतात...इतके वर्ष जे झाड माझ्यासमोर मोठ्ठ झालेलं ते क्षणार्धात तुटून पडल होतं... इतके वर्ष जे झाड मला आनंद देत होतं,ज्याच्याशी माझा पक्क नातं निर्माण झालेलं ते झाड क्षणार्धात नाहीस झालेलं... सगळच अनपेक्षित...आता परत कधीही ते झाड दिमाखात उभ असलेल मला दिसणार न्हवत... परत कधीही मला त्या झाडाची फुलं दिसणार न्हवती..परत कधीही त्या झाडाच्या फुलांचा सुगंध मला वेडं करणार न्हवता....परत कधीही त्या झाडावर पक्षी किलबिलाट करणार न्हवते.... परत कधी त्या झाडाशी गप्पा मारनर न्हवते! सगळ एका क्षणात नाहीस झालेलं...क्षणभर मी सुन्न झालेले... सगळ्यांसाठी ते फक्त एक झाड होत पण माझ्यासाठी ते फक्त एक झाड न्हवत! ते माझा आयुष्याचा हिस्सा होत! त्या झाडाशी माझ नात निर्माण झाल होत... कधीच न तुटणारं नात! त्याच झाडानी मला खूप आनंद दिला ते आता कधीच दिसणार न्हवत मला...आता ते झाड नाहीये..आता फक्त आठवणी...पण आजही बाहेर पाहिलं कि त्या झाडाची आठवण येते.. आणि डोळे पाणावतात! आज किती तरी वर्ष झाली पण आज ही त्या झाडाच्या सुंदर आठवणी मात्र माझ्या मनात ताज्या आहेत आणि पुढेही ताज्याच राहतील.... आणि ते झाड माझ्या मनात आणि माझ्या आठवणीत जिवंत राहिल हे नक्की!
अनुजा कुलकर्णी.
Email id-