Tanala mhana baay baay in Marathi Health by Anuja Kulkarni books and stories PDF | ताणाला म्हणा बाय बाय...

Featured Books
  • My Wife is Student ? - 25

    वो दोनो जैसे ही अंडर जाते हैं.. वैसे ही हैरान हो जाते है ......

  • एग्जाम ड्यूटी - 3

    दूसरे दिन की परीक्षा: जिम्मेदारी और लापरवाही का द्वंद्वपरीक्...

  • आई कैन सी यू - 52

    अब तक कहानी में हम ने देखा के लूसी को बड़ी मुश्किल से बचाया...

  • All We Imagine As Light - Film Review

                           फिल्म रिव्यु  All We Imagine As Light...

  • दर्द दिलों के - 12

    तो हमने अभी तक देखा धनंजय और शेर सिंह अपने रुतबे को बचाने के...

Categories
Share

ताणाला म्हणा बाय बाय...

ताणाला म्हणा बाय बाय...

अनुजा कुलकर्णी.

Copyright 2017

All Rights Reserved. No part of this book may be reproduced or utilized in any form or by any means, electronic or mechanical, including photocopying, recording, or by any information storage and retrieval system, without permission in writing from the publisher- Anuja Kulkarni.

This book is a work of fiction. Names, characters, places, and incidences are products of author's imagination or are used fictitiously. Any resemblance to actual events locales, or persons living or dead, is entirely coincidental.

प्रस्तावना-

"ताण" प्रत्येकाच्याच आयुष्यातला न टाळता येणारा. पण ताण किती आहे, त्या ताणाचे शहरावर आणि मनावर काय परिणाम होत आहेत हे पाहण देखील गरजेच असत. त्यामुळे हा विषय खरोखरच इतका महत्वाचा आहे का असा प्रश्न साहजिक आहे. आणि माझ्या मते अर्थात इतर कोणत्याही गोष्टी इतकाच ताण हा महत्वाचा विषय आहे. त्याच योग्य वेळी योग्य नियोजन कारण अत्यंत गरजेच असत. ताण हा प्रत्येकाच्याच आयुष्यातला महत्वाचा विषय असतो. खरच हल्लीच्या दिवसात लहान मुलांपासून अगदी वृद्ध व्यक्तींपर्यंत सगळेच ताणांनी ग्रासलेले असतात. आणि त्यावर फार काही उपाय योजले जात नाहीत. बऱ्याच वेळा ताणाकडे दुर्लक्ष केल जात आणि ताण अधिकाधिक वाढून त्या ताणाच रुपांतर एखाद्या गंभीर मानसिक आजारामध्ये होत. आजच्या काळात सगळेच मानसिक ताणाखाली जगत असतात. बहुतांश लोकांच्या बोलण्यातून ते सतत ऐकू सुद्धा येत असत. काही लोकं बोलून दाखवत नाईट पण ते त्यांच्या सवयी आणि शारीरिक समस्या पाहून लक्षात येऊ शकत. कधी कधी ताण खूप येतो म्हणून वाईट व्यसनं लागू शकतात. ताण घालवायला कोणत्यातरी वाईट सवयीचा आधार घेताला जातो आणि थोडा वेळासाठी का होईना आपण तणावमुक्त होत आहोत अस स्वत:ला सांगितलं जात. मग सिगरेट ओढणे, दारू पिणे हा दैनंदिन आयुष्याचा भाग बनतो आणि त्यामुळे आपण आपल आयुष्य अधिकाधिक खराब करतो आहोत ह्याकडे लक्ष राहत नाही. पण जर आपण ताण कमी करण्यासाठी काही वेगळे प्रयत्न करतो का? ह्याच उत्तर नाही असाच येईल पण ताण हा सहज सोडून देता येणारा विषय नाही. थोडा ताण प्रगतीसाठी गरजेचा असतो पण जर ताण नियंत्रणात असं देखील तितकाच गरजेच असत. ताणाच योग्य नियोजन केल तर त्याचा आपल्या आयुष्यावर नक्कीच सकारात्मक परिणाम दिसेल. फक्त स्वतःचा ताण कमी करण्यासाठी नाही तर इतरांचा ताण सुद्धा कमी कसा होईल ह्याकडे लक्ष देण गरजेच असत. कधी कधी घरातली एक व्यक्ती सुद्धा तणावग्रस्त असली तर तिच्यामुळे संपूर्ण घरातली शांत जाऊ शकते. हे टाळण गरजेच असत. घरातल्या प्रत्येक व्यक्तींनी तणावमुक्त आयुष्य जागल तर नक्कीच सगळीच घर आंनदी होतील. मी ह्या पुस्तकात ताणावर कस नियंत्रण ठेवता येईल याचे काही लेख लिहिले आहेत. ताण वेगवेगळ्या पद्धतीनी आटोक्यात ठेवता येऊ शकतो. आणि ताण कमी झाला कि त्याचा परिणाम तुमच्या बरोबर पूर्ण कुटुंबावरसुद्धा झालेला दिसून येतो. आणि ताण कमी करून आयुष्य अधिकाधिक सकारात्मक कस करता येईल हे सुद्धा सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मला आशा आहे माझा हा प्रयत्न उपयुक्त ठरेल आणि फायदा होईल. ह्या पुस्तक बद्दल तुमचे अभिप्राय किंवा तुमच्या काही सूचना असतील तर त्या माझ्या इमेल वर जरूर कळवा.

अनुजा कुलकर्णी.

Email id- kulkarnianujaa@gmail.com

Copyright 2017

अनुक्रमणिका-

१. प्रस्तावना

२. रोजच्या ताणाला म्हणा बाय बाय..

३. मानसिक आरोग्य उत्तम ठेवण आपल्याच हातात....

४. दैनंदिन आयुष्यातला ताण कमी करायचाय? हे करून बघा....

५. ताणाच व्यवस्थापन करा आयुर्वेदाचा आधार घेऊन..

६ शेवटचे शब्द..

७. Thanks for reading.

१. रोजच्या ताणाला म्हणा बाय बाय....

----------------------------------------------------------------------------------------------------

आजच्या काळात उठल्या उठल्या धावायची तयरी चालू होते. हल्ली आयुष्य एकदम धकाधकीच आणि धावपळीच झाल आहे. पुरुष असो किंवा स्त्री, आजच्या घडीला सगळ्यांनाच ताणाला समोर जाव लागतंय. आणि त्यात बायकांना घरच सांभाळून ऑफिस मधल काम ह्याचा अतिरिक्त ताण असतोच. ऑफिस ला जात नसाल तरी घराच्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडण ह्यामुळे तणावाला समोर जाव लागताच! कित्येकदा तर अनेक गोष्टींचा आपल्यावर ताण येत असतो, हेच आपल्या लक्षात येत नाही. आधुनिक शैली मुळे आपल्या आयुष्यात बरेच फरक पडले आहेत पण त्याचबरोबर ताणतणाव किंवा स्ट्रेस ही आधुनिक शैली बरोबर मिळालेली एक विपरीत देणगी आहे. ह्यावर उपाय आहे तो म्हणजे कोणत्या गोष्टीचा आपल्याला ताण येतो हे शोधून ताण कमी करण्यासाठी पाऊल उचलण आणि आयुष्यातला ताण कमी करून घेण.

आज काल, विशेषत: शहरी लोकांचं रोजचंच आयुष्य ताणतणावांनी भरलेलं आहे. ताण हा बऱ्याच गोष्टींमुळे येतांना दिसतो. अगदी रोजच्या जबाबदाऱ्या पार पडतांना सुद्धा तुम्हाला ताणाला समोर जाव लागत असेल. काम, घर, शिक्षण, मुलांच्या जबाबदाऱ्या, डेडलाईन्स या प्रत्येक गोष्टीचाच ताण आपल्यावर येतो. काही वेळा योग्य प्रमाणातला ताण कामे आणि जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी चांगला ठरतो. परंतु, ताणाचा अतिरेक होता कामा नये. सततच्या तणावामुळे आल्याला आरोग्याच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. आपला संपूर्ण दिवस कितीही बिझी आणि धावपळीचा असला, तरी त्यातही काही विशिष्ट गोष्टी आपल्यावरचा ताण वाढवण्याचं काम करत असतात. त्यात भर पडली आहे ती सोशल नेटवर्किंग ची. वोट्सअप किंवा फेस्बुक ह्याचा योग्य वापर केला तर त्याचा आयुष्यावर उत्तम परिणाम दिसून येतो पण अर्थात ते फक्त मध्यम न राहता त्या गोष्टींचा इतका अतिरेक होतो कि त्याच व्यसनच जडत आणि सतत मनावर ताण जाणवायला लागतो. पण त्या गोष्टी नियंत्रणात ठेवल्या, कोणत्या गोष्टींनी ताण येतो अश्या गोष्टींची जाणीव ठेवली अकारण येणारा तणाव कमी करता येऊ शकतो. तज्ज्ञांनी ताण वाढवणाऱ्या गोष्टींचा अभ्यास करून काही निष्कर्ष मांडले आहेत. त्याचबरोबर आपल्याला क्षुल्लक वाटणाऱ्या परंतु जास्तीत जास्त तणाव वाढवणाऱ्या दिवसभरातील काही बाबीही समोर आणल्या आहेत. या बाबी कोणत्या आणि त्यावर काय उपाय करता येतील याविषयी जाणून घेऊया…

* सकाळी उठण्याची गडबड- अलार्म लावा पण...

बऱ्याच वेळा झोपेत सुद्धा सकाळी लवकर उठून पूर्ण बिझी दिवसाला सामोर जायचं आहे असे विचार चालू असतात. सकाळी वेळेत जाग यावी म्हणून गजर लावायची तुम्हाला सवय असेल. पण बऱ्याच वेळा कर्कश गजरामुळे तुम्ही झोपेतून खडबडून जागे होता. आणि नजर घडाळ्यावर स्थिरावली कि दिवसाची धावपळ डोळ्या समोर यायला लागते. घड्याळाकडे लक्ष गेलं की दिवसभरातील कामांच्या विचारानेच तणाव वाढण्यास सुरुवात होते. कामाची भली मोठी यादी डोळ्यासमोर येते आणि माझ्याकडे आता किती कमी वेळ आहे, कशी संपणार सगळी कामं असे विचार मनात यायला लागतात. त्यामुळे साहजिकच आपला गोंधळ जास्तच वाढतो. अशा गोंधळलेल्या मानसिक स्थितीत कामेही नीट होत नाहीत आणि त्याचबरोबर मनावरचा ताण आणखी वाढत जातो. ह्यावर एक उपाय म्हणजे गजर न लावताच उठायची सवय लावा. म्हणजे दचकून जाग आली नाही कि साहजिकच एकदम नकारात्मक विचार मनात येत नाहीत. जर हे शक्य नसेल तर अलार्म ची धून कर्कश नाही ना हे तपासून बघा. अलार्म कर्कश किंवा मन विचलित करणारा असेल तर तो बदलून शांत आणि मनाला ताजतवान करणारा ठेवा. उठतांना मन फ्रेश असेल तर साहजिकच ताण रोखण्यास मदत होईल. त्याचबरोबर सकाळची ताजी हवा आणि बाहेरचा उजेड तुमच्या खोलीत येईल ह्याची दक्षता घ्या. यामुळे तुम्हाला आपणहून जाग येईल. इतक करून सुद्धा कधी चुकून उठायला उशीर झालाच, तर ताण घेऊ नका. जो वेळ गेलाय तो तुम्हाला परत मिळणार नाहीये हि गोष्ट लक्षात ठेवून जितका वेळ आपल्या हातात आहे त्याच योग्य नियोजन करा. जाग आल्या आल्या उठायची घाई करू नका. आणि उठल्या उठल्या आधी मोबाईल बघू नका. सगळ्यात आधी बेडवरच बसून दीर्घ श्‍वसन करा. दीर्घ श्वसन केल्यामुळे शरीराला ऑक्सिजन मिळून ताजतवान वाटण्यास मदत होते. त्यानंतर मनामध्ये दिवसभरातल्या कामांचा नीट आढावा घ्या आणि अत्यावश्‍यक कामांची यादी करा. दिवसाची सुरवात योग्य सुरवात झाली कि आपसूकच ताणापासून लांब राहता येण्यास मदत नक्कीच होईल.

* सकाळचा नाश्ता-

सकाळच्या नाश्त्यातून दिवसभर लागणारी उर्जा मिळत असते. पण कधी कधी घाई झाली, किंवा ऑफिस वेळेवर गाठायच आहे अश्या विचारांनी बऱ्याच वेळा गृहिणी सकाळचा नाश्ता न करताच बाहेर पडतात. कधी कधी हे पुरुषांबरोबर सुद्धा घडू शकत. खर तर, सकाळच्या वेळात दिवसभरातल्या कामांचा सर्वांत जास्त ताण गृहिणींवर पडतो. स्वाभाविकच त्याचे परिणाम त्यांच्या मानसिकतेवरही दिसतात. कधी वेळ नाही म्हणून नाश्ता केला जात नाही. आणि पोट रिकाम राहून त्याचा शरीराला त्रास होऊ शकतो. नाश्ता केला नाही कि भूक लागली कि कामात लक्ष लागत नाही, चीड चीड व्हायला लागते आणि शरीरातली उर्जा कमी होते. त्यामुळे आपसूकच कामाचा ताण अधिक जाणवायला लागतो. हे टाळायच असेल तर घरातून निघतांना हेल्दी ब्रेकफास्ट न चुकता केला पाहिजे. कितीही घाई असली तरी नाश्ता करण अत्यंत गरजेच असत. त्यामुळे शरीर सुदृढ राहत आणि त्याचबरोबर मनही ताजतवान राहण्यात मदत होते. पण नाश्ता करतांना टीवी वरच्या बातम्या किंवा चर्चा पाहण टाळा. त्यामुळे मनावर उगाचच नको तो ताण येतो आणि दिवसभराच्या कामावर त्याचा परिणाम दिसून येतो. नाश्ता करतांना शांत म्युझिक ऐकल तर त्याचा खूप फायदा दिवसभराच्या मूड वर दिसून येईल. आणि नाश्ता करतांना मोबाईल किंवा अन्य इलेक्ट्रोनिक उपकरण वापरान टाळलेल कधीही चांगलच. शक्यतो नाश्ता घरातल्या लोकांसमवेत करा त्यामुळे घरात संवाद राहतो आणि त्यामुळे सकारात्मक उर्जा मिळायला उपयोग होतो.

* ऑफिस ला पोहचे पर्यंत लागणारा ट्राफिक-

हल्ली कामच ठिकाण राहत्या घरापासून बराच लांब असल्याच दिसून येत असेल. आणि बराच प्रवास करून ऑफिस गाठून काम करण कंटाळवाण होत. त्यामुळे साहजिकच मानसिक तणाव वाढीस लागतो. कधी ऑफिस ला पोचून काम संपेल हि चिंता मनाला लागून राहते. सकाळी ऑफिसला पोचण्याची घाई आणि संध्याकाळी दिवसभराच्या थकव्यानंतर रस्त्यावरच्या प्रदूषणाचा सामना करणे हे आपल्या शरीरासाठी आणि मेंदूच्या क्षमतांसाठी वाटते तेवढे सोपे नसते. शरीर आणि मन थकल कि चिडचिड चालू होते आणि मानसिक स्वास्थ आपसूकच खराब होऊ शकत. त्याचबरोबर प्रवासातला हा तणाव मान किंवा पाठदुखी ह्यांना आमंत्रण देतो आणि त्याचबरोबर इतर तक्रारींना आमंत्रण दिले जाते. त्यात थकवा, चिडचिड, भूक न लागणे ह्या तक्रारी दिसून येतात. त्यावर उपाय आहे आणि तो म्हणजे जातांना आणि येतानाचा प्रवास आनंदी करण्याचा प्रयत्न करावा. कधी कधी ट्राफिक लागल कि मनस्वास्थ बिघडू न देता त्या ट्राफिक कडे दुर्लक्ष करायला शिका. सारखा किती गर्दी आहे हा विचार मनावरचा ताण वाढवू शकतो. गर्दी तर तुम्ही टाळू शकत नाही त्यामुळे त्याचा विचार करून मनस्वास्थ खराब करण्यात काहीच उपयोग नसतो. त्यामुळे ज्या गोष्टी बदलता येणार नाहीत त्याचा विचार कारण सोडून देन गरजेच असत. त्यापेक्षा काही चांगल्या गोष्टी आठवून मन आनंदी करायचा प्रयत्न करा. कधी कधी प्रयत्न करूनही गर्दी चे विचार जात नाहीत. अगदी गर्दी चा विचार मनात नाही आला तर जास्ती करून नकारात्मक विचार मनात येऊ शकतात आणि ते विचार थांबवण शक्य झाल नाही तर मनावर भयंकर ताण येऊ शकतो. आणि सहाजिकच त्याचा परिणाम कामावर दिसून येऊ शकतो. ट्राफिक कडे दुर्लक्ष करण्यासाठी क्रोशाच किंवा लोकरीच विणकाम केल तर वेळ कसा जातो हे कळणारही नाही आणि त्याचबरोबर वेळ सत्कारणी लागेल. मन कश्यात तरी गुंतलेल असेल तर साहजिकच चिडचिड होणार नाही आणि मनावरचा ताण वाढणार नाही. विणकाम शक्य नसेल तर गाणी ऐकण मन शांत ठेवण्यासाठी उपयोगी ठरेल आणि मनावर कोणत्याही प्रकारचा ताण येणार नाही.

* ताणताणाव जास्ती झाला, तो नियंत्रणाच्या बाहेर गेला तर ताण कधीही वाईटच असतो. अति ताणामुळे बऱ्याच शारीरिक समस्यांना समोर जायला लागू शकत. त्यातल्या काही समस्या गंभीर रूप धारण करू शकतात. अस्वस्थता, डोकेदुखी, हृदयविकार, उच्च रक्‍तदाब, जिभेला कोरड पडणं, अपचन, ऍसिडिटी, कोलेस्टोरॉलचं प्रमाण वाढणं, पाठदुखी, पोटदुखी, कंबरदुखी, आणि अल्सर इत्यादी त्रास अति ताणामुळे उद्भवू शकतात. त्यामुळे आपण ताणताणावा पासून दूर राहण्याकरता थोड प्रयत्न केला पाहिजे. आयुष्य आपल्याला जगायचं असत आणि ते अधिकाधिक सुंदर कारण सुद्धा आपल्याच हातात असत. पण ह्यासाठी गरज असते वेळीच ताणाची लक्षणे ओळखून त्यावर नियंत्रण आणणे महत्त्वाचे असते. ताण कमी करण्यासाठी वैद्यकीय मदतही घेता येईल. त्याचबरोबर प्रत्येकानेच स्वत:ही सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करण्याची सवय लावून घेतली पाहिजे. सकारात्मक विचारांनी मन ताजतवान राहण्यास मदत होते. आणि रोजचा विनाकारण येणारा ताण कमी होईल. त्याचबरोबर आयुष्य आनंदी राहण्यास मदत होईल हे नक्की!