Tanala mhana baay baay - 4 in Marathi Health by Anuja Kulkarni books and stories PDF | ताणाला म्हणा बाय बाय..-४

Featured Books
  • My Wife is Student ? - 25

    वो दोनो जैसे ही अंडर जाते हैं.. वैसे ही हैरान हो जाते है ......

  • एग्जाम ड्यूटी - 3

    दूसरे दिन की परीक्षा: जिम्मेदारी और लापरवाही का द्वंद्वपरीक्...

  • आई कैन सी यू - 52

    अब तक कहानी में हम ने देखा के लूसी को बड़ी मुश्किल से बचाया...

  • All We Imagine As Light - Film Review

                           फिल्म रिव्यु  All We Imagine As Light...

  • दर्द दिलों के - 12

    तो हमने अभी तक देखा धनंजय और शेर सिंह अपने रुतबे को बचाने के...

Categories
Share

ताणाला म्हणा बाय बाय..-४

४. ताणाच व्यवस्थापन करा आयुर्वेदाचा आधार घेऊन-

-----------------------------------------------------------------------------------------------------------------

ताण तणाव प्रत्येकाच्याच आयुष्यात असतात. पण ताण म्हणजे काय? ताण म्हणजे परिस्थितीला शरीर देत ती प्रतिक्रिया! शरीर प्रत्येक परिस्थितीला प्रतिसाद तर देतोच. आयुष्यात ताण तणाव येत स्वाभाविकच असत. बदलाशी जुळवून घेताना आपल्या शरीराला सहन करावे लागणारे आघात म्हणजे ताण. ताणतणावांचे योग्य व्यवस्थापन करणे आरोग्याच्यादृष्टीने अत्यावश्‍यक गोष्ट आहे. काही ताण हे तात्कालिक असतात, तर काही खूप काळ टिकणारे. ताणतणावांचे व्यवस्थापन करणे म्हणजे ताण नाहीसा करणे नाही, तर ताणाशी जुळवून घेणे किंवा तो योग्य प्रमाणात ठेवणे. ताणाचे दोन प्रकार आहेत. चांगला ताण आणि वाईट ताण चांगल्या ताणाचे उदाहरण म्हणजे नोकरीमध्ये योग्य बढती मिळणे आणि वाईट ताण याच उदाहरण म्हणजे जेव्हा तुमचे कोणाबरोबर तरी भांडण होते. तुम्हाला जेव्हा शारीरिक किंवा मानसिक आव्हानांना समोर जाव लागत तेव्हा त्या परिस्थितीशी जुळवून घेण्याकरता अड्रेनालाइन नावच केमिकल सोडते ज्या मुळे तुम्ही परिस्थितीशी लढा देऊ शकता. त्यामुळे घाम येणे, चेहरा लाल होणे इत्यादी परिणाम दिसून येऊ शकतात. पण अस म्हणल जात, माणसाच्या विकासासाठी थोड्या प्रमाणात येणारा ताण हा हवाच.. पण त्याचबरोबर जर तो ताण जास्त प्रमाणात किंवा खूप दिवस चालत राहिला म्हणजेच दीर्घकालीन ताण राहिला तर मात्र त्याचे वाईट परिणाम मनावर आणि शरीरावर दिसून येऊ शकतात.

* तुम्हाला ताण आला आहे हे कसे ओळ्खल?- ताणाची काही लक्षणे

*डोकेदुखी आणि पाठदुखी- डोकेदुखी किंवा पाठदुखी ह्याचा वारंवार त्रास होत असेल तर तुम्ही समजू शकता कि तुम्हाला खूप ताण आला आहे.

*झोप न येणे- जर नीट झोप लागंत नसेल तर त्याच महत्वाच कारण म्हणजे ताण असत.

*राग किंवा नैराश्य येणे- काही करायचा कंटाळा येण हे ताण आल्याच एक लक्षण आहे.

*एकाग्रता करता न येणे- जर तुम्हाला एकाग्रातेनी काम करता येत नसेल तर तुम्ही समजू शकता कि तुम्हाला ताण आला आहे.

*पोटाची अस्वस्थता आणि अल्सर्स- जास्ती ताण आल्यामुळे वारंवार पोटाचे प्रोब्लेम्स किंवा अल्सर चा त्रास होऊ शकतो.

*पुरळ- जास्ती ताणामुळे शरीरावर पुरळ उठू शकतात.

*उच्च रक्तदाब, हृदयरोग आणि स्ट्रोक- अतिरिक्त ताणामुळे रक्तदाब वाढू शकतो. त्याचबरोबर, हृदय रोग किंवा अगदी स्ट्रोक सुद्धा येऊ शकतो.

आयुर्वेद मध्ये वात, कफ आणि पित्त हे ३ दोष सांगितले आहेत. शरीरात ह्या तिन्ही दोषांचा समतोल अत्यंत महत्वाचा असतो. आयुर्वेदा मध्ये ताणाचा समतोल राखण्यासाठी बरीच औषध सांगितली आहेत. त्याबरोबर शरीरातल्या दोषांचा समतोल कसा राखता येतील याची सुद्धा माहिती आयुर्वेदा मध्ये सापडते. ताणामुळे बऱ्याच रोगांना आमंत्रण मिळत. शरीरावर किंवा मनावर ताण आल्या मुळे शरीराची प्रतिकारक शक्ती कमी होऊ शकते आणि यामुळे शरीर निरोगी राहत नाही. आयुर्वेदिक उपचारांबरोबरच प्राणायाम, योग आणि मेडीटेशन केयामुळे रोजच्या ताणाशी असलेली लढाई सहजपणे जिंकता येऊ शकेल.

* आयुर्वेद मधले उपचार ज्याचा उपयोग ताणामुळे होणाऱ्या प्रोब्लेम्स वर करता येऊ शकतो-

१. पंचकर्म चिकित्सा- ताणा संबंधी प्रोब्लेम्स साठी पंचकर्म चा खूप उपयोग होतांना दिसून येतो. पंचकर्म मध्ये शरीरातल्या प्रोब्लेम्स च मूळ जाणून शरीरातल्या दोषांचा समतोल केला जातो. अभ्यंग,शिरोभ्यंग,शिरोवस्ती ह्यांचा उपयोग ताणासाठी केला जातो. अभ्यंग केल्यानी शरीरशक्‍ती वाढते, स्टॅमिना वाढतो, खूप काम केले तरी थकवा वाटत नाही. शिरोभ्यंग मान व डोक्‍याचा हा मसाज ताण घालवण्यासाठी सर्वश्रेष्ठ होय. यात केसांच्या मुळाशी हलक्‍या हाताने मसाज केला जात असल्याने केसांचे पोषण होण्यासही मदत मिळते.

२. हर्बल औषधांमध्ये ब्राह्मी हे अत्यंत गुणकारी आहे. ब्राम्ही मुळे मेंदूच्या दोन्ही बाजूंचा समतोल राखला जातो आणि 'सहस्त्रार चक्र' म्हणजेच 'क्राऊन चक्र' जागृत होण्यास मदत होते.

३. चंदनामुळे शरीराबरोबरच मनाला थंडावा मिळतो आणि पित्त दोष कमी व्ह्यायला मदत होते.

४. अश्वगंधा हे अत्यंत महत्वाची औषधी वनस्पती आहे ज्यामुळे मेंदूतल्या केमिकल चा समतोल राखला जातो आणि त्याचबरोबर अश्वगंधा हे ताण आणि थकवा दूर करण्यास्तही अत्यंत उपयुक्त आहे.

५. यष्टीमधु मध्ये बरेच औषधी गुण आहेत. यष्टीमधु मुळे पित्त दोषाच संतूलन राखल जात.

६. ह्या सगळ्या औषधी वनस्पतींबरोबर शंखपुष्पी, वाचा, आमलकी, गुडूची यांचा उपयोग सुद्धा ताणामुळे होणाऱ्या प्रोबेल्म्स वर केला जातो.

धकाधकीच्या जीवनात अश्या काही घटना घडू शकतात कि ज्यामुळे शरीरावर आणि मनावर ताण येऊ शकतो. हल्ली काम करण्याच्या वेळा सुद्धा इतक्या वाढल्या आहेत ज्यामुळे शरीराला विश्रांती मिळत नाही. आणि ताण वाढून संधिवातासारखे रोग होऊ शकतात.

आयुर्वेदात अस मानल जात कि शरीरावर ताण येण आणि शरीराच्या वेदना ह्याचा सरळ संबंध शरीरातल्या ऊर्जेशी, दोषांचा समतोल बिघडल्याशी असतो. त्याचबरोबर, जेवणाच्या सवयी,व्यायामाचा अभाव आणि रुटीन नीट नसल्यामुळेही ताण येऊ शकतो. ताणासाठी आयुर्वेदामध्ये काही सल्ले दिलेले आहेत-

१. ज्या भागात दुखत असेल त्या भागात आयुर्वेदिक तेलानी मसाज केल्यामुळे टिशू मधली अशुद्धी विरघळवून रक्तातून बाहेर काढली जाते. त्यानी वेदना कमी होण्यास मदत होते.

२. तुम्ही जो आहार घेता त्या आहाराच नीट पचन होऊन शरीरात नीट शोषले जाऊ शकते. त्यामुळे शरीरातील दोषांचा समतोल राखण्यास मदत होते. पण योग्य आहार घेतला नाही तर दीर्घकालीन ताणाला समोर जायला लागू शकत.

३. शरीरात वाताचा समतोल बिघडला कि वेदना होऊ शकतात. वेदना होण हे वात वाढल्याच लक्षण असू शकत. पण जर योग्य आयुर्वेदिक औषधी वनस्पनीचा वापर केला तर तो त्रास कमी होऊ शकतो. त्याचबरोबर, तुमच्या दिनक्रमात योगासन आणि मेडीटेशन चा वापर केला तर वाताचा समतोल राहू शकतो.

४. आयुर्वेद मध्ये काही विशिष्ठ योगासनाचे प्रकार दिले आहेत ज्या मुळे ताण हलका करण्यासाठी मदत होऊ शकते. त्याचबरोबर, गरम तेलाचा मसाज सुद्धा उपयुक्त ठरू शकतो.

५. आयुर्वेदामध्ये मानसिक ताण कमी करण्यासाठी सुद्धा काही उपचार दिले आहेत. आलं,अश्वगंधा, लसूण इत्यादी औषधी वनस्पतींचा वापर दैनंदिन जीवनात केला तर त्याचा उपयोग दिसून येतो.

*दैनंदिन ताणासाठी आयुर्वेदात रसायन थेरेपी-

आयुर्वेदात ताणाच व्यवस्थापन करण्यासाठी रसायन थेरपी सुद्धा सांगितली आहे. शरीर पंचकर्म करून शुद्ध केल कि शरीर पोसण्यासाठी रसायन थेरपी वापरी जाते.

१. तोंडातून घायची औषधे-

औषधे जी ताणाच व्यवस्थापन करण्याकरता आणि मनाचा कंट्रोल करण्यासाठी वापरली जातात ती शुद्ध हर्ब्स आणि नैसर्गिक पदार्थ वापरून केली जातात.

२. जेवायच्या सवयी मध्ये बदल-

ज्या लोकांमध्ये ताण जास्त प्रमाणात दिसून त्यांना आयुर्वेदिक आहार घेण्याचा सल्ला दिला जातो. त्या आहारात प्रथिने आणि कर्बोदके यांचा जास्त प्रमाणात समावेश असतो आणि कोलेस्ट्रोल किंवा फॅटस कमी प्रमाणात असते. तंबाखू, मीठ,साखर किंवा गोड वर्ज्य असते.

प्रत्येकाच्याच आयुष्यात ताण असतोच. आणि ताण हा अत्यंत गरजेचा सुद्धा असतो. पण त्या ताणाचा अतिरेक झाला तर मात्र तो घातक ठरू शकतो. त्यामुळे ताण वेळीच ओळखून त्यावर योग्य उपाय कारण गरजेच असत. अश्यावेळी आयुर्वेदाचा आधार घेतला तर त्याचा नक्कीच उपयोग झालेला दिसून येऊ शकतो. मनानी औषध घेण्यापेक्षा आयुर्वेदिक डॉक्टर चा सल्ला घेतला तर ते कधीही हितकारक ठरेल आणि ताणाच योग्य नियोजन करण्यात मदत होईल.

*****************************************************************

शेवटचे शब्द-

----------------------------------------------------------------------------------------------------

शेवटी काय, महत्वाच असत तर ताणाला नियंत्रणात ठेवण. आपल्याला काय केल्यानी ताण येतो आणि तो ताण जाण्यासाठी आपण काय प्रयत्न करतो हे महत्वाच. ताण हा आयुष्यातला अविभाज्य घटक आहे पण आपण ताणात राहूनच आयुष्य जगायचं का ताणाला फेस करून अधिकाधिक प्रगती करायची ते आपल्याच हातात असत. त्यासाठी आपणच प्रयत्न केले पाहिजेत. लहान मुलांपासून अगदी आज्जी आजोबांपर्यंत सगळेच ताणानी ग्रासलेले असतात. पण जर वेळीच ह्या ताणावर नियंत्रण ठेवलं नाही तर त्याचे दुष्परिणाम आपल्यालाच भोगावे लागतात आणि साहजिकच आयुष्य उदास बनू शकत. त्यामुळे अति ताण वेळीच ओळखून तो कमी करायचा प्रयत्न झाला पाहिजे. म्हणजे आयुष्य अधिकाधिक उत्तमरीत्या जगता येईल आणि आयुष्यातल्या प्रत्येक टप्यात आनंदी राहून जगता येईल. आपण प्रयत्न करत राहायचं आणि आपल आयुष्य अधिकाधिक सुंदर बनवायचं आपल्याच हातात असत. आपल्या बरोबर जर अजून कोणाला गरज असेल तर त्यांना सुद्धा ताणापासून दूर ठेवायला मदत करा आणि त्यानी सगळ्यांचाच आयुष्य आनंदी होण्यास मदत करता येऊ शकते.

Enjoy stress free life... :-)

Thanks for reading.

Thank you for reading this eBook. If you enjoyed this book, please consider leaving a review where you purchased the eBook. And if any suggestions about this book, feel free to mail me at-

kulkarnianujaa@gmail.com