Quotes by Umakant Deshpande in Bitesapp read free

Umakant Deshpande

Umakant Deshpande

@umakantdeshpande224929


"### स प्त प दी ###", वाचा मातृभारती वर :
https://www.matrubharti.com
भारतीय भाषेतील अमर्याद साहित्य वाचा, लिहा आणि ऐका अगदी विनाशुल्क!

Read More

". :::::::::: झाले मोकळे आकाश ::::::::::", वाचा मातृभारती वर :
https://www.matrubharti.com
भारतीय भाषेतील अमर्याद साहित्य वाचा, लिहा आणि ऐका अगदी विनाशुल्क!

Read More

हे निरागस हास्य तप्त मनावर प्रेमाचा शिडकावा करत तेव्हा वाटतं दुखवू देत जग मला कितीही मला काहीच फरक पडणार नाही कारण माझे हे लेकरू मला दुःखातून बाहेर काढायला पुरेसे आहे.

Read More

आज मकर संक्रांत.संक्रमणाचा दिवस .जुन्या वर्षातून नवीन वर्षात संक्रमण, एका ऋतूतून दुसर्या ऋतूत संक्रमण.

खरं तर आपल्या आयुष्यात संक्रमण हे क्षणोक्षणी घडतच असत .आपल्या कळत नकळत. आता मनात असलेल्या विचारांची जागा दुसऱ्या क्षणी दुसऱ्या विचाराने घेतलेली असते.आता हातात असलेली वस्तू पुढील क्षणी आवडेलच याची खात्री नसते.

संक्रमण, बदल हा विश्वाचा ठायी भाव आहे. गेल्या क्षणाला तिलांजली देऊन येणाऱ्या क्षणाचं तिळगुळ देऊन आनंदाने स्वागत करायच ही आपली हिंदु परंपरा. युगानुयुगे चालत आली आहे.

आयुष्यात बर्याच बर्यावाईट घटना घडतात, कळत नकळत, जाणून बुजून एकमेकांना दुखावल जात. अनाहूतपणे एकमेकांना अपमानित केलं जात.

कसही असलं तरी जखमा ह्या होतातच. त्या जखमांचा निचरा होणं हे तितकेच महत्त्वाचे असते म्हणूनच आपल्या पुर्वासुरींनी मार्गदर्शन ही केले आहे.

सणवार, व्रतकैवल्ये, तीर्थविधी,प्रायश्चित्त असे अनेकानेक मार्ग सुचविले आहेत .त्याचाच अवलंब करून आपण आपले जीवन सुसह्य करण्यासाठी प्रयत्न करतो.

त्यातलाच आजचा हा दिवस... मकर संक्रांत.

चला तर मग सारं सारं विसरून हा दिवस आनंदाने साजरा करु या!
हा घ्या माझ्या कडून प्रेमरुपी तीळगूळ.

तीळगूळ घ्या गोड बोला.

Read More

आज दुपारी टी.व्ही.वर एलियंसचा कार्यक्रम सुरू होता. त्यांच्या अस्तित्वाची चर्चा चालू होती. काहीनाच कसे दिसतात आणि सर्वांनाच का दिसत नाही हा विषय होता.

दिवसभर हाच विचार मनात घोळत होता. खरचं एलियंस असतील का? असतील तर ते कसे दिसत असतील? अशा विचारातच झोप लागली.

स्वप्नात माझ्या शरीरातून एक अनोळखी आक्रुती उठून उभी राहिली. असा चेहरा मी आयुष्यात पहिल्यांदाच पहात होतो. चेहरा एकदम मोठा .चेहर्याशी विसंगत गोलगरगरीत मोठे डोळे, निमूळती हनुवटी, हडकुळी बुटकी शरीरयष्टी. सगळच विचीत्र होत.

मी घाबरून त्याला विचारले, अरे कोण आहेस तू?

अरे मी तोच ज्याचा तु दिवसभर विचार करत होता. एलियंस. मंगळावरचा माणूस. आणि एक सांगू ? मी तुला जसा दिसतोय ना तसाच तूही मला दिसतोस. अगदी माझ्या सारखाच. भारतीय एलियंस. हा..हा..हा..

माझी झोप उडाली .छाती धडधडत होती. सगळ्या अंगाला घामाच्या धारा लागल्या होत्या. खरचं मी तसा दिसतो का?

मोबाइल घेतला आणि सेल्फी काढली.

बघून डोळे विस्फारले.मी असा दिसत होतो.

बघायचा माझा फोटो? बघाच तर मग.




Read More

अरे बाळा, जन्माला आलास खरा.अभिनंदन ही करावसं वाटतंय पण खरं सांगायचं तर तुझी काळजीच जास्त वाटते.
आज आम्ही आमच्या स्वार्थासाठी एकमेकांच्या तंगड्या ओढतो आहोत.
कधी नव्हे एवढ्या हिन शब्दांत उणीदूणी काढून एकमेकांचे वस्त्रहरण करतो .
लोकांना काडीमात्र इंटरेस्ट नसलेल्या विषयांचे ढोल दुरदर्शनवर रात्रंदिवस बडवत आहोत.
सत्तेच्या खुर्चीसाठी कसलाही विधीनिषेद न बाळगता एकमेकांना नागडे करण्यात धन्यता मानतो आहोत.
ताकदीच्या जोरदार दुसऱ्यांचा तोंडचा घास हिरावून घेत छद्मीपणे हसत दुसर्याला हिणवले जाते आहे.
अरे किती ह्मणून सांगायचे.
ह्मणुनच तुझं स्वागत करायला भीती वाटते रे.
आम्ही केलेल्या या पापांचे ओझं सावरत तुला पुढील वाटचाल करायची आहे.
आम्ही फक्त शुभेच्छा देऊ शकतो. निस्तरायचं तुलाच आहे.
शुभास्ते पंथानः सन्तु ।

Read More

संपले हे वर्ष पुन्हा
पुन्हा कधी यायचे
आठवणी गोड कटू
स्मरत मनी रहायचे
स्मरत मनी रहायचे ।

चुकलेले निर्णय ते
पुन्हा कधी न घ्यायचे
सोसले जे दुःख कधी
मनातूनी पुसायचे
मनातूनी पुसायचे ।

गेलेले येतील ना
परत या जगी कधी
आठवणी जागवित
पुन्हा पुन्हा हसायचे
पुन्हा पुन्हा हसायचे ।

करतील जरी द्वेष तुझा
शांतपणे सहायचा
क्षमाशील होऊनिया
आशिर्वाद द्यायचा
आशिर्वाद द्यायचा ।

वर्ष नुतन पातले
स्वागत ही करु पुन्हा
सुख, शांती, समाधान
लाभो तव पुन्हा पुन्हा
लाभो तव पुन्हा पुन्हा ।

Read More

एक स्वप्न माझे होते
फारसे न मोठे
झोपडी असे ना का ती
पण प्रेम तिथे मोठे

नसे न का पैसा अडका
नको रेलचेल
दोनघास आनंदाने
सुखे मिळो तेथ

दोन जीव त्यांचा तेथे
नित्य प्रेम भाव
नको रागद्वेषांनाही
किंचितसा ठाव

कुणी येवो जावो तेथे
असो सुखे वास
घासातून त्यांना द्यावा
प्रेमभरे घास

सुखदुःख वाटून घ्यावे
आनंदाने तेथे
हेच जीवनाचे माझ्या
लक्ष एक मोठे

स्वप्न पूर्ण झाले माझे
जाहलो निवांत
पांडुरंगा,ठाव देई
तुझ्या चरणात.

Read More

वय झाल्यावर जर तुम्हाला कोणी म्हणेल की तुम्हाला काही कळत नाही तर तर नक्की समजा तुम्हाला आयुष्यात खरच काही कळल नाही.
मुलांना शाळेत घेऊन जातांना मुलांच्या हातात दिलेले बोट ते केव्हा तरी सोडणार आहेत हे तेव्हाच कळायला पाहिजे होते.
मर मर मरुन मुलांना सुशिक्षित करतांना ते पुढे आपल्यालाच अशिक्षित ठरवतील हे तेव्हाच कळायला पाहिजे होते।
मोठ्या उत्साहात , आनंदाने सुन घरात आणतांना आपणच आपल्या घरात परके होऊ हे तेव्हाच कळायला पाहिजे होते.
आयुष्यभर खस्ता खाऊन,जमविलेली कवडी कवडी मुलावर उघळतांना आम्ही च तुम्हाला पोसतो हे ऐकायला लागेल हे तेव्हाच कळायला पाहिजे होते.
हे सगळं तेव्हाच कळलं असते तर आज हे मानहानीकारक जीवन वाट्याला आलं नसते.
तरूणानो, सावध व्हा. तुम्ही पण म्हातारे होणार आहात.

Read More

साधारण साठ साली हजाराची नोट म्हणजे म्रुगजळ होत. दिसले तरी भाग्य म्हणायचं हाताळणे तर दुरच.दिवस बदलत गेले आणि त्या नोटेच अवमूल्यन सुरू झाले. सामान्य माणसाच्या हातातही नोट दिसू लागली. मा. नरेन्द्र भाईनी तर तिला हद्दपार केले. पण ती कसली हार मानणार? परत तिने जन्म घेतलाच. नाण्याच्या स्वरूपात.पहा तीचं हे गोंडस रुप.पण परत तेच. ज्यांना हातात पडेल तो भाग्यवान.

Read More