Quotes by Surendra Patharkar in Bitesapp read free

Surendra Patharkar

Surendra Patharkar

@surendrapatharkar195534
(14)

अंतिम लढत
. एक अनेकांना आवडलेली प्रसिद्ध कथा.

*मानवी शरीर अदभुत आहे.*
🔸 *मजबुत फुफ्फुस*
आपलं फुफ्फुस दररोज २० लाख लिटर हवेला फिल्टर करते. आपल्याला याचा अंदाज पण नाही येत. जर फुफ्फुसाला खेचुन लांब केलं तर ते टेनिस कोर्टचा एक हिस्सा पुर्ण व्यापुन टाकेल.
🔸 *अशी कोणतीही फॅक्टरी नाही*
आपले शरीर दर सेकंदाला २५ करोड नविन सेल बनवते. दररोज २०० अब्जापेक्षा जास्त रक्त कोषिकांचे उत्पादन करते.सतत शरीरात २५०० अब्ज रक्त कोषिका असतात. रक्ताच्या एका थेंबात २५ करोड कोषिका असतात.
🔸 *लाखो किलोमीटर चा प्रवास*
मानवाचे रक्त शरीरात दररोज १९२००० किलोमीटर चा प्रवास करत असते. आपल्या शरीरात साधारण पणे ५.६ लीटर रक्त असते. जे दर २० सेकंदाला एकवेळा संपुर्ण शरीराचे भ्रमण करते.
🔸 *धडधड*
तंदुरुस्त व्यक्तीचं ह्रदय दररोज १००००० वेळा घडकतं. वर्ष भरात ३० करोड पेक्षा जास्त वेळा धडकतं. हृदयाच्या पंम्पिग चा दाब एवढा जास्त असतो की,रक्ताची चिळकांडी ३० फुट वर उडु शकते.
🔸 *सर्व कॅमेरे आणि दूर्बिणी निष्फळ*
मानवाचे डोळे एक करोड रंगांना ओळखुन लहानातला लहान फरक ओळखु शकतात. अजुनपर्यत जगात अशी कोणतीही मशीन नाही जी यांच्या बरोबर स्पर्धा करु शकेल.
🔸 *नाकात एअर कंडीशनर*
आपल्या नाकात नैसर्गिक एअर कंडीशनर आहे. जी थंड हवेला गरम आणि गरम हवेला थंड करुन फुफ्फुसात पाठवते.
🔸 *ताशी ४०० कि.मी. ची गती*
चेतनातंत्र शरीराच्या बाकी हिश्यात तासाला ४०० की.मी. गतीने तडक उपयुक्त सुचनाचं प्रसारण करतं. मानवाच्या मेंदुत १०० अब्ज पेक्षा जास्त नर्व सेल्स आहेत.
🔸 *जबरदस्त मिश्रण*
शरीरात ७० % पाणी आहे. या शिवाय मोठ्या प्रमाणात कार्बन, जस्त, कोबाल्ट, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फाॅस्फेक्ट, निकल आणि सिलिकॉन आहे.
🔸 *अजब शिंक*
शिंकताना बाहेर येणारी हवेची गती प्रती ताशी १६६ ते ३०० कि.मी. पर्यंत असु शकते. उघड्या डोळ्यांनी शिंकणे निव्वळ अशक्यच आहे.
🔸 *बॅक्टेरियाचे गोदाम*
मानवाच्या शरीराच्या १०% वजन हे त्याच्या शरीरात असलेल्या बॅक्टेरियाचे असते. एक चौरस इंच त्वचेमध्ये सुमारे ३.२ कोटी बॅक्टेरीया असतात.
🔸 *विचित्र विश्व*
डोळ्याचा विकास लहानपणीच पुर्ण झालेला असतो. नंतर त्याचा विकास होत नाही. पण नाक, कानाचा विकास संपुर्ण जीवना पर्यंत चालुच राहतो. कान लाखो आवाजाचे फरक जाणु शकतात. कान १००० ते ५०००० हर्टज आवाजांना ओळखु शकतात.
🔸 *दातांची काळजी घ्या*
मानवी दात दगडा सारखे मजबुत असतात, पण शरिराचे अन्य भाग स्वःताची काळजी स्वःताच घेतात. तसे दात आजारी पडल्यावर स्वःताची सुधारणा करण्यासाठी सक्षम नसतात.
🔸 *तोंडातली लाळ*
मानवाच्या तोंडात दररोज १.७ लिटर लाळ बनते. लाळ भोजन पाचन करण्यास मदत करते. जीभेत असलेली लाळ १०००० पेक्षा जास्त स्वाद ग्रंथीना ओली ठेवते.
🔸 *पापण्या झपकणे*
वैज्ञानिक सुद्धा मानतात की पापण्या झपकल्यास कचरा निघतो यामुळे डोळ्यांच्या दृष्टीत फारच फरक जाणवतो.
🔸 *नखांची कमाल*
अंगठ्याचे नख सर्वात हळु वाढते आणि मधल्या बोटाचे नख सर्वात वेगाने वाढते.
🔸 *दाढीचे केस*
पुरुषांच्या दाढीचे केस सर्वात वेगाने वाढतात. जर कोणी व्यक्ती संपुर्ण जीवन दाढी नाही करत तर ती ३० फुट लांब होवु शकते.
🔸 *जेवणाचे गणित*
व्यक्ती सामान्यरित्या जेवणासाठी ५ वर्षाचा वेळ खर्ची करतो. जीवनापर्यंत आपण आपल्या वजनाच्या ७००० पट जेवण खालेलं असते.
🔸 *केस गळण्याचा त्रास*
एका तंदुरस्त माणसाच्या डोक्यातले 80 केस दररोज गळतात.
🔸 *स्वप्नाची दुनिया*
बाळ जगात येण्या आधी पासुनच आईच्या गर्भाशयातच स्वप्न पाहायला सुरुवात करते. वसंत ऋतुमध्ये बाळाचा विकास वेगाने होतो.
🔸 *झोपेचे महत्व*
झोपे दरम्यान माणसाची उर्जा वाढते. मेंदु महत्वपुर्ण माहिती गोळा करतो. शरीराला आराम मिळतो डागडुजीचे काम पण होते.



*🙏🌹🌹🙏*

Copy pest

Read More

१) स्वर्गात जायचे असेल तर आईचे पाय दाबून झोपत जा.. मग ती आई तुमची असो वा तुमच्या पोरांची..😂
२) काही चेहरे मॉर्निंग वॉकला जाण्यासाठी भाग पाडतात..😂
3) काही लोक खरेदीला गेल्यावर कधीच डिस्काउंट मागत नाहीत..फक्त दुकानातून बाहेर जायची ॲक्टिंग करतात.
४) रडल्यानंतर मन मोकळं होवो ना होवो पण.. नाक मात्र नक्की मोकळं होत..😂
५) चष्मे लावणाऱ्या लोकांचं अर्ध आयुष्य.. "माझा चष्मा कुठं आहे" हे शोधण्यातच निघून जातं.. 😂
६) तुम्ही कितीही महागातली सुपरफास्ट बाईक घेतली तरी.. ती ॲक्टिवा च्या मागेच चालणार..😂
७) मटणाच्या रांगेत उभ्या असलेल्या व्यक्तीला.. Corona ची किंचित ही भीती नसते..😂
८) कुंडली तर सासू अन् सुनेची जुळली पाहिजे.. मुलगा तर बिचारा कुठेही adjust करून घेतो..😂
९) ज्यांच्या आयुष्यात कायम चढ उतार येतात.. त्यांना ट्रेकिंगला जायची गरज नसते..😂
१०) लग्नात मुलीचे मामा अन् नवरी सोबत असलेली करवली.. या दोघांच्या attitude ची बरोबरी कोणीच करू शकत नाही..😂
११) आज कालच्या पोरा पोरींपेक्षा संस्कारी तर मच्छर आहेत.. सातच्या आत घरात येतात..😂
१२) ज्यांचं मन साफ असतं ना.. त्यांना रोज आंघोळ करायची गरज नसते...😂
१३) जिथे मारामारी करणं शक्य नाही.. तिथे टोमणे तरी मारूनच यायचं.. सोडायचं नाही अजिबात..😂
१४) आयफोन वाल्यांच अर्ध आयुष्य.. मिरर सेल्फी काढण्यात अन् आयफोन चा EMI भरण्यातच निघून जातं...😂
१५) वर्षभर Dp न बदलणारे.. जेव्हा २-२ दिवसात Dp बदलतात.. तेव्हा समजून जायचं.. कोणीतरी नवीन 'जेवलीस का ' add झाली आहे..😂
१६) पोट आणि Ego कमी असेल तर.. माणूस कोणालाही मिठी मारू शकतो.. 😂
१७) गाढ झोपेत काहीच ऐकू न येणाऱ्या लोकांना.. "तिकडे सरक" हा शब्द कसा काय ऐकू जातो..? 😂
१८) काही लोक रोज सकाळी लवकरच उठतात.. फक्त त्यांना शुद्धीवर यायला १-२ तास लागतात.. 😂
१९) आपल्या सोबत गाडीवर मागे बसलेली व्यक्ती फक्त Hmm Hmm करत असतो.. त्याला काहीच ऐकू येत नसतं..😂
२०) जर तुम्हाला तुमचं घर लहान वाटत असेल.. तर एखाद्या दिवशी फरशी पुसून बघा..😂
२१) जेव्हा आपण Sad Mood मध्ये असतो.. तेव्हा गाणं गातो नंतर आपल्याला कळतं..की आपला आवाज तर आपल्या Condition पेक्षा पण खराब आहे.. 😂 😄
*आजचे ज्ञान समाप्त.....*
*From: "आउष्य" सुनील पंडित

Read More

नाती कशी असावीत?

नाती पाकात मुरलेल्या #गुलाबजाम इतकी गोडच असावीत असं नाही. खरंतर ती तशी गोड मिट्ट असूच नयेत. कारण

ती गुलाबजामसारखीच महाग आणि मर्यादितच असतात.

नाती टपरीवरच्या #कांदाभजीसारखी असावीत अगदी साधी पण हवीहवीशी. कधीही कुठंही हाकेला ओ देऊन धावत येणारी.

नाती असावीत गरमागरम #चहासारखी , एकदा भुरका मारला की डोकं आणि मन फ्रेश करुन देणारी.

नाती असावीत साध्या #वरणासारखी अहंपणाचा मसाला भरलेल्या कटाच्या आमटीसारखी तिखट आणि जळजळीत असू नयेत. कटाची आमटी पिताना मजा वाटते खरी पण दुस-या दिवशी आमटी तिचा प्रताप दाखवते.

नाती पुरणासारखी पचायला जड असू नयेत. ती जितकी #मक्याच्या -लाह्यांसारखी हलकी असतील तेवढी दिवसेंदिवस फुलत जातात.

नाती सीताफळासारखी असू नयेत.समज कमी नि गैरसमज जास्त.एकवेळ ती #फणसासारखी असतील तरी चालेल.वरुन काटेरी आतून रसाळ

नाती असावीत #सुधारसासारखी , आपल्या आर्थिक चणचणीच्या काळात पक्वान्न खाल्ल्याचं समाधान देणारी.

नाती कडूही असावीत पण कारल्याइतकी असू नयेत. ती #मेथीच्या -भाजीइतकी कडवट असावीत त्यांचा कडवटपणाही जीभेला चव आणणारा असावा.

नाती श्रीखंडासारखी श्रीमंत नसली तरी चालेल पण #ताकासारखी शिणवटा दूर करणारी असावीत.

#कैरीसारखं एखादं नातं असेल तर त्याचा मुरांबा मात्र आपल्याला करता यायला हवा.

#आंब्यासारख्या मधुर नात्यावर काही प्रक्रीया करण्याची गरजच नसते. ते उपजतच सर्वांगसुंदर आणि राजेशाही थाट मिरवणारं असतं.

नाती दूधासारखी नासणारी नकोत. #तूपासारखी अमर हवीत. पाण्याचा शिबका मारला की कडकड आवाज करणारं तूप त्याच्या घमघमाटानं घर भरुन टाकतं. तशी नातीसुद्धा पुरेपूर कढलेली आणि सुगंध पसरवणारी असावीत.

नाती चायनिज आणि इटालियन सारखी आधुनिक ढंगाची असली तरी हरकत नाही पण त्यातही कण्या आणि आंबिलीतली सात्विकता हवी. पौष्टिकता हवी.

नाती असावीत देवाला दाखवलेल्या #नैवेद्याच्या पानासारखी. मात्र नैवेद्याच्या पानात वेगळं मीठ वाढलेलं नसतं. कारण पदार्थांमधलं मीठ बरोबर असतं. हे चवीपुरतं मीठ प्रत्येक पदार्थात असावंच लागतं.

नैवेद्याचं पान देवाने उष्टं केलेल, त्याला सर्वच मान देतात. मग चटणी कोशिंबीर असो वा पोळीभाजी, नैवेद्याच्या पानातल्या सर्वांना अगदी आदराची, पावित्र्याची वागणूक मिळते. नैवेद्याचं पान खायला मिळणं भाग्यात असावं लागतं हेच खरं!
संग्रहीत पोस्ट
विवेक कुलकर्णी यांचा आभारी आहे.cp

Read More

जीवन जगण्याचे काही सुंदर तत्व

1..भुंकणारे कुत्रे कधी चावत नाही!!
2..एक निंदक घरात असावा!!
3..किड्यामुंग्या सारखे जगू नका!!
4..पडेल ते काम करा!!
5..कोणतेही ही काम लहान किंवा मोठे नसते..
6..हसतील त्यांचे दात दिसतील!!
7..खरं बोलायला कधीच घाबरु नका!!
अन् खोटं बोलण्याने कोणाचं भल होणार असेल तर वेळप्रसंगी जरूर खोटं बोला!!
8..अशक्य असे काहीच नाही!!
9..चालायला लागेल तर दोनच गोष्टी घडत असतात
एक तर वाट चुकते किंवा थेट नेऊन सोडते!!
अन् वाट चुकली की काही तरी कानाला खडे लावणारं शिकवुन जाते!!
10..जे पेराल तेच उगवेल
11..आळशी माणसाचा नादी लागत बसु नका!!
12..बोलुन तोंड खराब करू नका!!
13..पण जर एखादा उलट्या डोक्याचा माणूस असेल तर जमतील तितके बोल लावा!!
14..कुणापुढे हात पसरू नका , वेळ प्रसंगी उपाशी रहा, पण भीक मागुन खाऊ नका!!
15..लाथ माराल तिथे पाणी काढण्याचे सामर्थ्य स्वतः मध्ये तयार करा!!
16..तुमचा शिल्पकार कोणी बाहेरून येणार नाही
तुम्हालाच तुमचा शिल्पकार बनवा लागेल!!
17..चरित्र हा सगळ्यांत मोठा दागिना आहे, कुणी त्याच्यावर डाग लावायला गेला, तर त्यांचे त्याला असे काही खणखणीत उत्तर द्या! की पुढच्या वेळी तुमच्याकडे डोळे वर करून पाहण्याची हिंमत झाली नाही पाहिजे !!
18..जर कोणी तुमच्यावर विश्वास ठेवत नसेल तर त्यानें तुमच्यावर विश्वास ठेवावा म्हणून त्याचे पाय धरायला जाऊ नका!!
एक लक्षात घ्या जर तुम्ही सच्चे असाल तर ते सिध्द करावे लागणार नाही असे नाही पण ते सिध्द करण्यासाठी तुमचा स्वाभिमान गहाण टाकण्याची गरज नाही..
19.. सोबत काही आणले नाही अन् सोबत काही नेणारं नाही, त्यामुळे उगाच मोह करत बसु नका!!
20.. अन्न हे पूर्णब्रह्म आहे.. ताटात पडेल ते आवडीने खा!!
21.. तुमचं हक्काचं असे या भूमीवर काहीच नाही. सगळ मातीतून आले आहे अन् मातीत जाणार आहे..
22.. एकच करा माणसाला माणूस जोडत जा!!
23.. वाईट मार्गाने पैसा कमवू नका, कारण वाईटाला हजार पळवाटा!!
24.. जे हक्काचे आहे ते सोडू नका अन् जे तुमचे नाही त्यावर हक्क गाजवायला जाऊ नका!!
25.. अन्न,वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा आहेत.. बाकी सगळे शौक!!
26.. माझे माझे अन् मातीत जा जे!!
27.. ओझे बननण्या पेक्षा आधार बना!!
28.. स्वाभिमान अन् अभिमान ही दोन्ही तत्वे वेगळी आहे..
29.. लोकांस सांगे ब्रम्हज्ञान अन् स्वतः मात्र कोरडे पाषाण असे बनू नका!!


!!वनमाला औटी/ हतवळणे!!
जय श्री स्वामी समर्थ महाराज..
🙏🙏🙏🙏

Read More

एका बापाने मुलाला लिहिलेले पत्र
cp
"माझ्या लाडक्या मुला. मी हे असं तुला पत्र लिहितोय बघ, वाच, आणि ठरव....

जगणं, नशीब आणि अपघात या तीन गोष्टी कधी घडतील-बिघडतील सांगता येत नाही. सगळंच अर्त्यक्य आपण अमुक इतके दिवस जगू हे कुणी सांगू नाही शकत. त्यामुळे काही गोष्टी वेळेवर बोललेल्या बऱ्या.
मी बाप आहे तुझा, मी तुला जे सांगेन ते इतर कुणी कदाचित कधीच नाही सांगणार.

मी माझ्या आयुष्यात ज्या चुका केल्या त्या तुला टाळता आल्या तर तुझे कष्ट, जिवाचे चटके आणि मनाचा त्रास बराच कमी होईल, म्हणून काही गोष्टी तुला सांगतोय.

माणसांविषयी मनात आकस ठेवू नको, कुणाचा द्वेष करू नकोस. तुझ्याशी कायम चांगलंच वागलं पाहिजे अशी इतर लोकांवर काही आपण सक्ती नाही करू शकत. त्यामुळे ते असंच का वागतात असं म्हणून तणतणू नको. तुझ्याशी कायम चांगलं वागण्याची जबाबदारी फक्त माझी आणि तुझ्या आईचीच आहे. जेंव्हा जी माणसं तुझ्याशी चांगलं वागतात, त्यांच्याशी तु चांगलं वाग. पण हे कायम लक्षात ठेव की प्रत्येक माणूस प्रत्येक गोष्ट कुठल्या ना कुठल्या हेतूपोटी करतो. त्यामुळे जी माणसं गोड बोलतात, तुझ्याशी कायम चांगलीच वागतात त्यांना तू खरंच आवडतो असं काही नसेलही. जरा माणसं तपासून बघ, पटकन मित्र बनवून पूर्ण विश्वास टाकण्याची घाई करू नकोस.

जगणं कशानेच कुणामुळेच थांबत नाही. त्यामुळे माणसं तुला सोडून जातील. नाकारतील, झिडकारतील किंवा ज्यांच्यावर तू जीव तोडून प्रेम केलंस तेच तुझ्या आयुष्यातून निघून जातील. तेव्हा हेच कायम लक्षात ठेव की, कुठल्याही माणसामुळे आपलं जगणं थांबत नाही. कधीच नाही.
आयुष्य फार छोटं आहे आणि तीच तुझी खरी पुंजी आहे. त्यामुळे आज वाया घालवलास तर उद्या कदाचित जगणंच तुला सोडून जाईल. त्यापेक्षा आज मनापासून, भरभरून जग. आनंदी राहा.

प्रेम ही एक क्षणिक आणि चंचल भावना आहे. ती काळाप्रमाणे आणि मूडप्रमाणेही बदलते. ज्यांच्यावर तू जिवापाड प्रेम करतोस तेच समजा तुला सोडून गेले तर जरा धीर धर. काळाच्या मलमानं या जखमाही भरून निघतील. प्रेमात पडलास म्हणजे तेच सगळ्यात सुंदर आणि अतीव चांगलं असं समजू नकोस आणि प्रेमभंग झाला म्हणून त्या दु:खालाही जास्त कवटाळून बसू नकोस.

अनेक यशस्वी माणसांनी शिक्षण अर्धवट सोडलं, तरी ते यशस्वी झाले अशा कहाण्या तू वाचल्या असशीलच ! पण याचा अर्थ असा नाही की, एक शिक्षण सोडलं की तूही यशस्वी होशील. नॉलेज, ज्ञान हे एक शस्त्र आहे हे लक्षात ठेव. शून्यातून स्वर्ग निर्माण करता येतो हे खरंय, पण कुठल्या तरी शून्यापासून आधी सुरुवात तर करायला लागतेच ना.
माझी अपेक्षाच नाही की मी म्हातारा झाल्यावर तू मला सांभाळावंसं. मीही तुला जन्मभर पोसणार नाहीच. तू स्वत:च्या पायावर उभा राहू शकशील तोर्पयत तुला सपोर्ट करणं ही माझी जबाबदारी. त्यानंतर तुला बसमधून फिरायचं की लिमोझीनमधून, गरीबच राहायचं की श्रीमंत व्हायचं हा निर्णय तुझा तू घ्यायचा.
आणखी एक, मीही अनेकदा लॉटरीचं तिकीट काढलं, ते कधीच लागलं नाही. एका रात्रीत श्रीमंत होता येत नाही. श्रीमंत व्हायचं तर मेहनत करावीच लागते. जगात फुकट कधीच काहीच मिळत नाही.
बाळा कदाचीत तुला हे पाठविलेले पत्र आवडेल कि नाही हे माहीत नाही पण हे पत्र तुझ्या आयुष्याची शिदोरी नक्की बनेल हे मात्र पक्क. म्हणुन बाळा हे पत्र तुला आवडो वा ना आवडो लगेच फेकुन देऊ नकोस या पत्राला तु नेहमी तुझ्या सोबत ठेव व वेळ मिळेल तेंव्हा पुन्हा पुन्हा वाच.....
फक्त तुझेच वडील

Read More

*मी देवाला म्हटलं की माझ्या मित्रांना येणाऱ्या 2022 वर्षात सुखी ठेव.*
…☺️
*देव म्हणाला - ठीक आहे पण* *फक्त ४ दिवस. ....*
*ते चार दिवस तू सांग ...*
…🤗
*मी म्हटलं……*
*1) Summer Day*
*2) Winter Day*
*3) Rainy Day*
*4) Spring Day*
...🥰
*देव confused झाले आणि म्हणाले - नाही फक्त ३ दिवस....*
*…😋*
*मी म्हटलं ठीक आहे……*
*1) Yesterday*
*2) Today*
*3) Tomorrow*
…♥️
*देव पुन्हा confused होऊन म्हणाल - फक्त २ दिवस……*
*…😋*
*मी म्हटलं ठीक आहे……*
*1) Current Day*
*और*
*2) Next Day*
…💞
*देव पुन्हा confused होऊन म्हणाले- नाही फक्त एकच दिवस……*
*मी म्हटलं*
*1) Everyday*
...😍
*देव हसले आणि म्हणाले अरे बाबा माझा पिछा सोड- तुझे मित्र नेहमी खुश आणि सुखी राहतील.
**************************
नवीन वर्षाच्या सुरुवातीला माझ्या सर्व मित्रांना शुभेच्छा.आपला आणि आपल्या सर्व परीवाराचा प्रत्येक दिवस आनंदाचा, सुखद जावा हिच परमेश्वर चरणी प्रार्थना.💐🙏

Read More