Quotes by Subhash Mandale in Bitesapp read free

Subhash Mandale

Subhash Mandale Matrubharti Verified

@subhashmandale6170
(98)

सये गं शुक्राचं तू चांदणं...

epost thumb

येरळामाई पंचक्रोशी महादेव मंदिर, हणमंत वडीये...

epost thumb

आपल्या आयुष्यातून माणूस निघून गेला,की मग त्याच्या विषयीचं सगळं निट लिहून काढलं की त्याच्या जाण्याचा खरा अर्थ आपल्याला समजतो.

माझ्या कवितेचं भावस्पर्शी सादरीकरण केले आहे, श्रीमती रत्ना हिले मॅडम यांनी.

Read More
epost thumb

चुपके से चांद की रोशनी छू जाए आपको,
धीरे से ये हवा कह जाए आपको |
दिल से जो चाहे मांग लो खुदा से ,
हमारी दुआ है, इस ईद वो मिल जाए आपको |

मेरी और मेरे परिवार की तरफ से *ईद मुबारक*
✨✨💫✨💫✨💫✨🌠🌃

Read More

माझ्या गावची वाट
न्याराच तिचा घाट
कड्याकपारीतून वाहती
फेसाळलेल्या दुधाचे माठ
शहाण्याला येडं आणि येड्याला आपलंसं करणारी हिच ती,
माझ्या गावची वाट.........
#उन्नति

Read More

अगर ये प्यार का बंधन होता,तो जिंदगी भर तुम्हारे गुलाम बनकर रहना पसंद करते.

जीवन या रंगमंचावरचे आपण सर्वच कलाकार.रंगमंचावरुन कधी ना कधी आपली exit होणारच आणि हा रंगमंच जिथल्या तिथं राहणार.

Read More

🙏काटे टोचणारं जबरदस्तीचं गुलाब नकोय मला...

तुझ्याशिवाय....


जीवन तुला काय कळाले,
कठीण प्रसंगी सगळे पळाले.
सगळे मनासारखे घडले पाहिजे,
असे कुठे असते का?

               मखमली जीवनात सुख-दुःखाचा,
पाठशिवणीचा खेळ चालनारच.
दुःखाचा डोंगर सरत नाही,
              म्हणून कोणी मरतं का?

आपण मेलं की काही नाही उरत,
थोड्या दिवस उरतात त्या फक्त आठवणी
तुझ्यासोबत खूप शिव्या दिल्या सरणाला,
आता मात्र कवटाळून बसावसं वाटतंय मरणाला.

               तु माझ्यासाठी रोज नटत होतीस,
प्रसन्न जीवन जगण्यासाठी रोज भेटत होतीस.
माझं गुलाबी मन उन्हाने होरपळून निघतंय,
              तुझ्या आठवणीत माझं मन रोज मरतंय.

उजेड संपला, अंधार दाटला,
सारा मायेचा पाझर आटला.
काय करु? कुणाला सांगू?,
माझं हृदय लागलंय फाटू. 

तू मला सोडलं असतं, वाईट वाटलं नसतं,

वाईट वाटतंय, जीवन जगणं सोडलंस.
तू गेलीस,पण मी नाही जाणार,कारण
देवाला,तू जाण्याचा जाब कोण विचारणार.........

(आपल्या आयुष्यातून माणूस निघून गेला,की मग त्याच्या विषयीचं सगळं निट लिहून काढलं की त्याच्या जाण्याचा खरा अर्थ आपल्याला समजतो)

                                     _"दि सुभाष"

Read More

जगाच्या अफाट पसाऱ्यात कुठे तरी आपण आपल्याच हरवून बसतो,

 तेव्हा आपण आत्मचिंतनासाठी एकांत शोधतो,

एकांतात समजते आपल्यांची ओढ,
मग तळमळतो प्राण..

मग कळून चुकतं
आपली मातृभूमी हीच आपली जीव की प्राण...

Read More