Quotes by Shubham Davange in Bitesapp read free

Shubham Davange

Shubham Davange

@shubham.davange800gmail.c


#KAVYOTSOV -2
*भरल्या अभाळापूर्वी*
उद्या पाऊस पडणार आहे
मला माहित नाही पण
मी डोळे झाकून विश्वास ठेवलाय सारखे मुखवटे बदलणाऱ्या ढगांवर

गच्चीवरून दिसणारा गुलमोहोर आता थोडा रंग बदलणार आहे
त्याला माहितीये आता आभाळ भरणार आहे

कुठे बहर कुठे पानगळ तर कुठे  दिशाहीन पालापाचोळा
सगळ्यांना माहीत आहे
आपल्यातली ओल ओसरणार आहे

इथे पुन्हा नव्या तनूचच राज्य येणार आहे,
मावळतीला चाललेला आजचा सूर्य तो पुन्हा
नव्याने दिसणार आहे

पुन्हा खिडकीत वेल येणार आहे,
तिची-तिची तीच काचेवर पडदा करणार आहे
गेटसमोर डोह साचणार आहे

त्याच पाण्यात लहानपणीच्या होड्या वाहणार आहे
पुन्हा कोडी पडणार आहेत,
अंधारातल्या पावसाची गोडी नशेसरखी वाढणार आहे

परत जुना पाऊस कोरा होऊन पडणार आहे
नव्या थेंबाचे शहारे नवे असणार आहे
जुनी पानगळ मातीत साठणार आहे
diary पुन्हा उघडली जाणार आहे
त्यातळी ओल नितळ-उथळ होणार आहे
लाटेसारखी उसळून थोडी पांढरीशुभ्र आभाळ दाखवणार आहे
थोडी कोरी-थोडी ओली पण पुन्हा नव्याने भरणार आहे

उद्या पाऊस पडणार आहे
मला माहित नाही पण
मी डोळे झाकून विश्वास ठेवलाय सारखे मुखवटे बदलणाऱ्या ढगांवर
    
-shubham davange
#sd
#languageofmind .blogspot.com
#introvert_rain
#unspoken_drops

Read More

मी पुन्हा एकतो 
तुझ न बोलतांनाच सांगत
मला कळतयं हे
कदाचित,
स्वैर होतो यात...  
आता भास असतात ते फक्त 
आणि 
तुझ्या अभासाचं 
निमित्त होऊन जातात......
#छानसं_वाचलेल_आणि_सुचलेल
#sdlanguageofmind .blospot.com
#languageofmind_SD
#shubham_davange

Read More

एक रात्र असते 

जी आपल्यातल अंतर बनते

Msg windowत  

कैद असतो एक जीव आणि

खिडकीबाहेर

बसलेला असतो एक पक्षी 

निर्जन प्रांतातला

तो अनोळखी असतो पण 

काहीतरी ओळखीचं घेऊन आलेला असतो

क्षणात खिडकीबाहेरच्या दिसतो आणि 

अंगवळणी पडलेल्या सवइप्रमाणे 

दिसून नाहीसा होतो

तो एक पडलेला प्रश्न निर्मितो

एक नवं विश्व,

एक कोडं टाकतो 

रोज अंगणात येतो 

त्याच उत्तर मूर्खासारखं 

Msg window मध्ये

हुडकण्याचा निरर्थक  प्रयत्न

एक दिवस हे सांगायच होत 

खिडकीपल्ल्याड असलेल्या

तिला

पण 

कळत नव्हतं ती अनोळखी गोष्ट कशी शोधू

आज एक दिवस ठरवून म्हंटल 

आज  ते सांगूनच टाकू

शोधूनच बघू

खिडकीबरच्या पाखराला ओळखूनच घेऊ....

त्या दिवसापासून तो पक्षी कधी आलाच नाही 

सांगता आलंच नाही 

ओळखता आलच नाही त्याच्या 

पंखांच्या खूना 

क्षितीजात विलीन का होतात अनोळखी शब्दांचे जीव....?

तो मुक्त झाला पण msg windowत 

मात्र एक कैद झाला कायमचा

#block_bird

#strangr_bird

#sd

#original_by_shubham_davange

#insta_writers

#the_incomplet_beauty

Read More