The Download Link has been successfully sent to your Mobile Number. Please Download the App.
Continue log in with
By clicking Log In, you agree to Matrubharti "Terms of Use" and "Privacy Policy"
Verification
Download App
Get a link to download app
Book Review: काळे-करडे स्ट्रोक्स ______________________________ प्रणव सखदेव लिखित " काळे-करडे स्ट्रोक्स " ही एक आजच्या काळातील कादंबरी आहे. तरूण-वर्गात वापरली जाणारी इंग्रजीयुक्त भाषा हे तिचे वैशिष्ट्य. अगदी मोकळेपणाने ही कादंबरी आपल्याशी बोलते. सर्वसामान्य लेखनाच्या चौकटी मोडून काढत ती पुढे जाते. तरूण वर्गातील काही प्रातिनिधिक पात्रांभोवती ही कथा फिरते. ही कादंबरी आपल्याला खिळवून ठेवते, अस्वस्थ करते आणि पार घुसळून काढते. मुंबईतील रुईया कॉलेज आणि त्याचा सभोवताल हा ह्याचा महत्वाचा घटक आहे. लेखकाचा आणि कथेच्या नायकाचा हारुकि मुराकामी हा आवडता लेखक आहे, त्यामुळेच या कादंबरीवर त्यांच्या 'नॉर्वेजिअन वूड्स' या पुस्तकाची छाप आहे. तरीही लेखकाने आपली वेगळी शैली आणि भाषा यांचा खुबीने वापर केला आहे. या कथेत अनेक वळणं येतात, काही अपेक्षित तर काही मुळापासून हादरवून टाकणारे. घडणाऱ्या प्रत्येक घटनेचा कथेवर तसेच कथेचा नायक समीर याच्यावर खूप मोठा परिणाम होतो आणि तो आणखीनच गुरफटत जातो. उदासीनतेची एक वेगळीच छटा त्याच्या आयुष्यावर पसरते. ही कादंबरी वाचताना आपणही अंतर्मुख होऊन जातो. खरंच आपण जेवढं म्हणतो तेवढं आयुष्य सरळ-सोपं असते का? खरंच आयुष्य जितकं आनंदी रंगांमध्ये रंगवले जाते ते सत्य असते की निव्वळ भास ? असे नानाविध प्रश्न आपल्याला भंडावून सोडतात. इथे एक नेहमीपेक्षा पूर्णपणे भिन्न असा दृष्टीकोन अनुभवायला मिळतो. निराशा, उदासीनता, एकटेपणा अश्या विभिन्न भावनांचे हे मिश्रण चांगले जमून आले आहे. मराठी भाषेत पहिल्यांदा असे काही घडते आहे. जर असा वेगळा अनुभव घ्यायचा असेल तर नक्की हे पुस्तक वाचावं.
Book review: शंभू बावनी _______________________ छत्रपती संभाजी महाराजांवर मराठी भाषेत लिहिल्या गेलेलं काव्य तसं पाहिलं तर कमी प्रमाणात आहे. मात्र ओंकार पांडव यांनी हे कार्य उत्तमरित्या पेललं आहे. ह्या पुस्तकाचे नाव सार्थ ठरवत हे पुस्तक आपल्यासमोर श्री शंभूराजांची शौर्य गाथा काव्य रूपात मांडते. लेखकांनी ही रचना करताना शिवकालीन कवी भूषण ह्यांच्या छंदांची शैली वापरली आहे. त्यामुळे आपल्याला शिवकालीन काव्याचा भास होतो. अनेक श्लोक हे मराठीसह हिंदी भाषेत आहेत. शंभूराजांचे पराक्रम, मुघल सत्तेला वाटणारी त्यांची भीती हे अत्यंत गीतमय पद्धतीने इथे मांडलेले आहे. ह्यातील वीररसाचा उत्तम वापर ही आणखी एक जमेची बाजू. ही शंभूगीते जर नव्या पिढीने आत्मसात केलीत तर शंभूराजांची कीर्ती आणखी दूर पसरेल ह्यात शंका नाही. शिवकालीन भाषा समजणे सामान्य लोकांना अवघड जाऊ शकते हे लक्षात घेऊन प्रत्येक श्लोकाचा मराठी अर्थ आणि भाव-विशेष मांडलेले आहेत. त्यामुळे पुस्तक अधिक वाचनीय होते. पुस्तकातील भोसले कुल-वर्णन काव्य, छत्रपती शिवाजी महाराजांवर रचलेले “शिवराज अष्टक” अश्या इतर रचनांमुळे हे पुस्तक परिपूर्ण झालेले आहे. तेव्हा छत्रपती संभाजी महाराजांचे गुण-दर्शन करणारे हे पुस्तक नक्की वाचावे आणि संग्रही ठेवावे असे आहे. लेखक: बाजी (ओंकार) पांडव Insta: @baaji.pandav_writes प्रकाशक: मुलुखगिरी प्रकाशन
आज येथे प्रस्तुत करत आहे एक कथा. जी चार कवितांच्या रूपात लिहिली आहे. हा संवाद आहे दोन प्रेमी जीवांचा...तशी ही एक विरहकथा...पण दोघांच्याही नजरेतून पाहिलेली...या संवादात रुसवे आहेच पण जसा घटनांचा क्रम समोर येतो तसा तो दुरावाही कमी होतो. _______________________________ ही आहे पहिली कविता : विरह संपला कवितेच्या नायकाला अनपेक्षितपणे ती दिसते व त्याच्या मनात कल्लोळ माजतो. काय असेल त्याच्या मनात? _________________ विरह संपला _________________ अतूट त्या साखळ्या निखळल्या अंतरी खूण ही पटली मनाला ती तूच आहे खरी पळालो, थांबलो तुला मी का दिसेना भांबावलो,थकलो परी मन काही भरेना। मी गुंतलो, गुरफटलो कशाचे हे धागे तुटता तुटेना, सुटता सुटेना कोडे हे माझे भावनांचे बंध हे बांधती माझ्या मना अश्रूंचे तलम तंतू अडविती वेदना। विरह हा संपला तरी वसंत का फुलेना हास्य उमटले जरी का न उमटती भावना दूर मी होतो तरी किंतु हा नसावा का तुझ्या डोळयांत मला अनोळखीपणा दिसावा? (क्रमशः) ©2026, मंदार कुळकर्णी First published on Instagram @maziya_angani
मी शोधत बसतो. माझ्या मनातल्या एका हरवलेल्या पाखराला ज्याला खूप उंच उडायचं होतं,गरुडापेक्षाही वर.. करायच्या होत्या त्याला ढगांशी गुजगोष्टी आणि वाऱ्याशी स्पर्धा.. पण प्रयत्नच केला नाही त्याने कधी घरट्यातून बाहेर पडून उडण्याचा…(१) बळ होते त्या वाघाच्या पंजात पण, त्याने कधी एका पावलापुढे उडी मारलीच नाही.. एकाच झडपेत ध्येय मिळवायचे होते त्याला, तरीही तो छोट्या शिकारींवरच समाधान मानत राहिला.. शेवटी त्याची डरकाळी विरून गेली…(२) अजूनही तोच उत्साह त्याच्या मनात आहे.. त्या मोराला आपला पिसारा जगाला फुलवून दाखवायचा आहे पण, आकाशात श्यामवर्णी मेघ दाटून येण्याची वाट बघत तो नुसताच उभा आहे…(३) ©2026, मंदार कुळकर्णी First published @ thewavesofwords.wordpress.com
Copyright © 2026, Matrubharti Technologies Pvt. Ltd. All Rights Reserved | Powered by Custom Web Development Company India.
Copyright © 2026, Matrubharti Technologies Pvt. Ltd. All Rights Reserved.
Please enable javascript on your browser