Hey, I am on Matrubharti!

आई

किती बोलवे तुला
किती लिहावे तुझ्यासाठी ,
तुझ्या इतकी माया .
नाही ग कोण लावीत या जगी कोणी .

9 महिने तू सोसल्या कळा
दिवस रात्र जागून भरविले घास मला
तुरुतुरु रांगायला शिकलो,
तू बोट धरून चालायला.

चिमुकला घास भरवित
अंगाई गायची मला.
चुरुचुरू बोलायला शिकलो पहिलं म्हणलो होतो बाबा,
काग आई! दिवस रात्र तू सांभाळ केला तरी मी बाबा पहिला उच्चार केला .
धुळुधुळू पळायला शिकलो
तुझ्या आधाराने चालायला शिकलो .
खेळत बागडत मोठा झालो
एवढ सहन फक्त तूच केलं .

तुझ्या छायेतच मोठा झालो,
खरं सांग आई ?
तुझ्या विना वाली मला आहे आहे काग कोणी.

Read More

वर्दी

कष्टा चा माझा बजार उठवला,
तुझ्याकडून होणार नाही हे ही ऐकवल.
मी ही जिद्दीला पेटून उभा राहिलोय
आता 1600 मारून खूप थकलोय
प्रत्येकाला उत्तर देयला मी गरिबी नाही तर
कष्टाने कमावलेल्या खाकी वर्दिनी ची वाट बघतोय
एक दिवस नाव कोरल या रुद्यावर
#महाराष्ट्र पोलीस
महाराष्ट्राची शान आणि माझा मान आहे.
- Bhavana kamble

Read More

उखाणा

मोठं ताट त्यात ठेवला करंडा
करंड्यात ठेवलं हळदी-कुंकू
हळदीने भरला मळवट
कुंकू लावलं सवासणीं ना
सावसनीं नी घेतला उखाणा , उखाण्यात होत नंदेच नाव , नंदेणं घेतलं कुंकवाच ताट
धरलं आडून घराच दार
आता मी थकलेय नाव घेते मोठ्याने.... रावांची बायको मी.
सासूबाई येऊ का लक्ष्मीच्या पाऊलांनी घरात.
- Bhavana kamble

Read More

अपूर्ण कहाणीचा पुर्ण प्रवास

किती ते प्रेम , प्रेमाला नाव काय देऊ,
तू म्हणशील आयुष्य तर आयुष्यभर मला पाहिजे तुझी साथ,
तू म्हणशील सखे व्याख्याच नको
प्रेमाची
नाव दिल तर अपूर्ण राहील कहाणी माझी.
जीवनाच्या वाटेवर
अर्धांगी नी होशील का माझी प्रेयसी तर होतीच आता शेवटच्या श्वासापर्यंत फक्त तू माझीच असावी.
- Bhavana kamble

Read More

योद्धा
का झुरावे, किती झुरावे कळले नाही मनाला?
'तू कोण? मी कोण?' हे ऐकूनच अर्धं आयुष्य आलं पणाला.
किती वनवास, किती ध्यास तो स्वप्नांचा!
निघून गेलं सारं आयुष्य बघितलेली स्वप्नं पूर्ण करण्याच्या.
कोणी करतो भरती, कोणी करतो चाकरी तर कोणी करतो नोकरी,
'स्वतःचं उभं करायचं' म्हटल्यावर देईल का ओ कोणी साथ खरी?
कोण नसतं कोणाचं, कमावलेलं सगळं इथेच राहतं,
फक्त बघतोय स्वप्न स्वतःचं नाव मोठं करायचं, पण तिथेही लोक पाय ओढून धरत आहेत.
इच्छा उरी घेऊन जगत आहे, मन आतून तुटलं आहे,
त्याला सावरून स्वतः धीट होत आहे.
फक्त "तू करू शकतो" एवढं म्हणावं आई-बापांनी,
मी ही आकाशात उंच भरारी घ्यायची स्वप्नं बघत आहे.
होतील जेव्हा ती खरी, तेव्हा प्रत्येक जण शाबासकी देईल;
पण मला माहीत आहे आयुष्यात किती संघर्ष आणि साथ मला कोणी दिली.
नसतं ओ कोण कोणाचं, साथ फक्त आई-बापाची,
आज ना उद्या मी ही कमावेल, फक्त 'लढ' म्हणायची ताकद हवी.

Read More

तू आणि मी

सोबती सखा तूच,
तूच आयुष्याचा साथी.
प्रत्येक ओढ तूझी,
तुझ्या मिठीत हसू एकांती.
आयुष्याच्या वळणावर लाखो हात साथीचे असतील ,
तुझ्या सुखाची व्याख्याच वेगळी फक्त ती तुझ्या सोबतच न्यारी.
कोण नको फक्त तूच हवा जगण्याची साठ
मिठी मध्ये घे आणि म्हण तूच माझी आयुष्यं भराची अर्धांगिनी.
- Bhavana kamble

Read More