Quotes by Its_anu_lekha in Bitesapp read free

Its_anu_lekha

Its_anu_lekha

@anujakiranrokade5181


पाऊस येतो अन् आठवण करून देतो,
आपल्या पहिल्या भेटीची..
त्या पहिल्या नजरबंदीची अन्
त्या पहिल्या प्रेमळ मिठीची..

-Its_anu_lekha

Read More

दुरून तुला मनात साठवण,
एकांतात तुला आठवण..
तुझा आवाज ऐकून गुंतून जाणं,
तु पाहिलं की नजर वळवण..
तु हसला की नकळत खळी उमटन,
तुला यातना झाल्या की अस्वस्थ होण..
तु न दिसता मन व्याकुळ होण,
कदाचित हेच असावं अबोल प्रेमातल झुरण..

-Its_anu_lekha

Read More

प्रिय .....✨ ,
आज सहज विचार आला तुला पत्र लिहायचा , तस तर मी रोजच बोलते तुझ्याशी. तरीही पत्रातून व्यक्त व्हावं वाटलं. काय म्हणू तुला मित्र, जीवलग, प्रियकर की आणखी काही ? खरंच कधी कधी कळतच नाही आपल्यातलं नातं नक्की काय आहे ?
तु नक्कीच माझा आहेस. पण कोण आहेस माझा ? आपल्यातल्या नात्याला काही नावंच नाही. नाव द्यावं वाटतं ही नाही. कारण, त्या भावना इतक्या सुंदर आहेत ना त्यांना टॅग लावून मला त्यांची सुंदरता, निखळता नाही मलीन करायची.
मी तर म्हणते नात्याला नावंच नसलेलं चांगलं आहे. कारण, नात्याला नाव भेटलं की एक अदृश्य चौकट तयार होते आणि ती चौकट तयार झाली की नात्यातला मोकळेपना नाहीसा होतो .
त्यापेक्षा मला हे निनावी नातंच ठीक वाटतं. तु माझा आहेस. ही भावनाच खूप सुंदर आहे. मग कशाला नको तो आटापिटा करू.
माझी बरीचशी मते तुझ्या मतांशी जुळत नाहीत. तरीही तू समजुन घेतोस मला. कारण, तुला मी जास्त महत्त्वाची वाटते बाकी गोष्टींपेक्षा, आणि हेच कारण आहे जे मला माझ्याही नकळत तुझ्यात गुंतवत जात. हो.. गुंतले आहे मी तुझ्यात. हे प्रेम आहे की नाही मला नाही माहीत. ना ही मला ते जाणून घ्यायचंय.
बस तू माझा आहेस, माझ्या सोबत आहेस. यातच मी समाधानी आहे. तु कधी पर्यंत सोबत असशील नाही माहीत मला, पण एक नक्की आहे. तु खुप खास आहेस आणि तुझ्या सोबत ची प्रत्येक आठवण खूप अनमोल आहे. तुझ्या सोबतचा संपूर्ण काळ माझ्या आयुष्यातला अवर्णनीय असा काळ आहे.
तुला दुखवायच नाही मला, काही चुकलं असेल तर माफ कर. बस आज तुझ्याशी या पत्रामार्फत व्यक्त व्हावं वाटलं. बाकी तुला काही मी इतक्यात माझ्या जाचातून मुक्त करत नसते, त्यामुळे काळजी करू नकोस.

तुझीच वेडी ...🌸

Read More

चंद्र आहेस तू माझा.. चांदणी मी तुझी होईन..
हो.. सख्या.. आयुष्यभराची साथ तुला देईन..

खळाळता समुद्र आहेस तू .. तुझा शांत किनारा मी होईन..
हो.. सख्या.. आयुष्यभराची साथ तुला देईन..

अवखळ वारा आहेस तू.. रातराणीचा सुगंध मी होईन..
हो.. सख्या.. आयुष्यभराची साथ तुला देईन..

अर्धांग आहेस तू माझा.. अर्धांगिनी तुझी मी होईन..
हो.. सख्या.. आयुष्यभराची साथ तुला देईन..


-Its_anu_lekha

Read More

आवाज तुमचा ऐकता
मदहोश आम्ही झालो,
कळलेच नाही आम्हाला
कधी तुमच्यात इतके गुंतलो..
its_anu_lekha

नको होते रे ते प्रेमात पडणे..
नको होते ते तुझ्या नजरेत हरवणे..

नको होते रे ते ह्रदयाचे गुंतणे..
नको होते ते एकमेकांविना झुरणे..

पण शक्य आहे का कोणाला?? ?
नियतीच्या पुढे जाणे..

म्हणून मान्य आहे मला ,
आयुष्यभर तुझीच होऊन जगणे..

Read More

प्रत्येक हक्काची गोष्ट नशिबात असेलच असं नाही.. त्यामुळे आहे ती परिस्थिती स्विकारली की त्रास नक्कीच कमी होतो.. ✨

-Its_anu_lekha

Read More

वचन (अलक)

ओठांवर गोड हसू आणि डोळ्यात अश्रू घेऊन समोर एकटक लग्नमंडपाकडे पाहत होती ती.
तिच्या प्रेमाला कोणा दुसरीचा होताना बघत होती.
कारण तिनेच तर त्याच्याकडून वचन घेतलेल, जेव्हा केव्हा अशी वेळ येईल ज्यामध्ये त्याला त्याचं कुटुंब किंवा त्यांचं प्रेम यापैकी एकच निवडता येईल, तेव्हा तो त्याचं कुटुंब निवडेल.

-Its_anu_lekha

Read More

तुझ्या प्रेमात पडताना,
स्वतः चे भान विसरताना..
तुझ्या रंगात रंगताना,
स्वतः चे रंग पुसताना..
तुझ्या श्वासात भिनताना,
स्वतः चे श्वास विरताना..
तुझ्या डोळ्यात हरवताना,
स्वतः ची द्रुष्टी मिटवताना..
तुझ्या मायाजालात अडकताना,
स्वतः चे स्वत्व हरवून बसताना..
कसे कळाले नाही या वेड्या मना,
स्वतः चे जीवन अनोळखी च्या हवाली करताना..

-Its_anu_lekha

Read More

पाहता डोळ्यात तुझ्या,
मन हरवते ना..
विसरुन सारे काही,
तुझ्यात रमते ना..
तुझ्या भेटीच्या ओढीने,
रात्रभर तळमळते ना..
दूर जाण्याचा प्रयत्न करता,
तुझ्या जवळचं येते ना..
सांग ना मी तुझा,
अन् तू माझीच होणार ना..?

-Its_anu_lekha

Read More