Fakt tujyat sathi in Marathi Love Stories by Reshma books and stories PDF | फक्त तुझ्याच साठी - 3

The Author
Featured Books
Categories
Share

फक्त तुझ्याच साठी - 3

 

❤️फक्त तुझ्याचसाठी ❤️3


शांत पणे खाली उतरला.


पावसाचे थेंब त्याच्या सूटवर पडत होते.

समोर उभे असलेले लोक त्याच्याकडे पाहत राहिले.

कारण त्यांना अपेक्षा होती...

एक घाबरलेला उद्योगपती.भेदरून त्यांच्या कडे जीवनाची भिक मागेल...

पण त्यांना माहिती न्हवते त्यांच्या समोर उभ होत....

एक शांत वादळ.

त्याने समोरच्या माणसाकडे पाहिलं.

"तुला खरंच वाटतं..."

तो थांबला.

"...की मला घाबरवण्यासाठी इतकंच पुरेसं आहे?"

समोरचा माणूस काही बोलणार इतक्यात...

आर्यवीरची नजर त्याच्यावर स्थिर झाली.

त्या नजरेत इतका आत्मविश्वास होता की समोरच्याच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास कमी झाला....









रात्रीच्या त्या काळोख्या रस्त्यावर...

पावसाचा आवाज वाढत चालला होता.

समोर उभ्या असलेल्या माणसांना अजूनही विश्वास बसत नव्हता की हा तरुण एवढा शांत कसा काय आहे.

त्यांच्याकडे संख्या होती...हत्यार होती..

आणी तो एकटा निशस्त्र पण तरी ही इतकी हिम्मत...

त्याच्या डोळ्यांत काहीतरी वेगळंच होतं.

जणू तो परिस्थितीशी लढत नव्हता...

तर परिस्थितीला आपल्या इच्छेप्रमाणे वळवत होता.


एक गुंड पुढे आला.

"तुला अजूनही समजलं नाही वाटतं? आम्ही इथे चर्चा करायला आलो नाही.आम्हांला तुला मारायच आहे... आणी आम्ही आज तुला मारुनच जाणार...

त्याने त्याच्याकडे पाहिलं.

काही सेकंद तो काही बोललाच नाही.

ती शांतता त्या माणसाला जास्त अस्वस्थ करून गेली.

शेवटी आर्यवीर हळू आवाजात म्हणाला,

 "I was wondering... who gave you the courage to come here?"



तो माणूस चिडला... काय बोला रे हा...?..
त्याने त्याच्या माणसांला विचारलं..

"भाई समजलं नाही पण काहीतरी प्रश्न नक्की विचारला याने "..

"खूप प्रश्न विचारतोस."

आर्यवीरने हलकंसं स्मित केलं.

 "No. I ask questions only when I care about the answers."



तो थोडा थांबला.

"आणि तुमच्याबद्दल मला आता काहीही जाणून घ्यायची इच्छा नाही."


त्या शब्दांनी समोरचे लोक अजून संतापले.

कारण त्यांना पहिल्यांदाच जाणवत होतं...

हा माणूस त्यांना घाबरत नाही.

उलट...

तो त्यांना महत्त्वही देत नाही.

एकाने रागात पुढे पाऊल टाकलं.

पण तेवढ्यात त्याच्या नजरेनेच तो थांबला.

त्या नजरेत राग नव्हता...

फक्त एक इशारा होता.

"ही शेवटची संधी आहे."





"एकदा सुपारी घेतलेली त्याने आजवर सोडली न्हवती, नाही कधी त्याने शस्त्र खाली ठेवले होते...
पण आज त्याचे हात डगमगत होते...
आदेश मिळाल्यामुळे ते मागे हटू शकत नसल्याने त्याने आपल्या माणसानां ईशारा केला...



त्या क्षणी आर्यविरणे आपल्या बॉडीगार्डकडे पाहिलं.

तो अजूनही जखमी अवस्थेत होता.

तसा त्याच्या चेहऱ्यावर पहिल्यांदा बदल दिसला...

"त्याने धावून आलेल्या माणसाचा हात हवेत पकपडून गोल फिरवला..

तुला शेवटची संधी देतो... 
गप निघून जा....
आर्यवीर शांत होता पण तरी ही त्याचे डोळे आग फेकत होते....

पण ते गुंड आपली शिकार सहजा सहजी थोडीच सोडणार होते..

आणी आपल्या माणसांवर हल्ला करणाऱ्यानां तो तर कधीच सोडणार न्हवता.......

जे त्याच्यासाठी निष्ठेने उभं रहात होते ...

त्यांच्यासाठी तो वेगळाच होता.



त्या गुंडाला क्षणात धूळ चारत त्याने सहज खिश्यातून फोन हातात घेतला.

आणि फक्त एक कॉल केला.

"Send the team."

एवढंच.

ना घाई...

ना घाबरलेपणा.

समोरच्यांना अजूनही वाटलं की आता तो मदत मागतोय.

पण त्यांना माहीत नव्हतं...

आर्यवीर खुराणा कधी मदत मागत नाही.

तो फक्त पुढची चाल खेळतो.


काही वेळात दूरवर गाड्यांचे आवाज ऐकू येऊ लागले.

हल्लेखोरांच्या चेहऱ्यावर पहिल्यांदा चिंता दिसली.

"हा कोण आहे?"

त्यांच्यातला एक कुजबुजला.

"आपण चुकी तर केली नाही ना?"

", पण त्यांना माहित न्हवते फक्त चुकीच नाही तर त्यांनी चुकीच्या माणसांशी पंगा घेतला होता..

"त्याने डोळ्यांचे पाते लवते न लवते तोच त्या सर्व गुंडाणा जमीन दोस्त केले होते फक्त मेन गुंड बाकी होता.. तो थरथरत त्याच्या कडे पहात होता... आणी आर्यवीर शांत पणे गाडीला टेकून सिगरेट पेटवत होता...

त्या गुंडाच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास ढळून गेलेला आत्ता त्याचा चेहरा भीतीने काळवंडलेला...

काही वेळापूर्वी ज्यांना वाटत होतं की त्यांनी एका श्रीमंत माणसाला घेरलं आहे...

आता त्यांनाच प्रश्न पडला होता—

"हा नेमका कोण आहे?"..

पण कोणी का असेना त्या गाड्या त्यांच्या जवळ येण्या आधी त्याला संपवणे गरजेचे होते..
त्याने लगेच खिश्यासातून बंदूक काढली आणी नेम धरला... ट्रिगल वरचे बटन तो दाबणार तोच ऐक नाईप त्याच्या कानाला चाटून गेला..
हे इतक्या जलद घडले होते की त्याला ही हे कसे घडले समजले न्हवते....

सिगारेटचे झूरके घेणाऱ्या त्याने कधी तो काढला आणी फेकला हे देखील त्याला दिसलें न्हवते...
तो वेदनेनी कळवळला... बंदूक तर कधीच हातची सुटली होती...

'कानातून रक्त वाहत होते... बहुतेक त्याचा कान अर्धा तुटला होता, तो समजून गेलेला... त्याचा नेम चुकला न्हवता... त्याला जर त्याला मारायचेच असते... तर तो चाकू क्षणात त्याच्या हृदयाच्या आरपार ही झाला असता...

त्याच वेळी काळ्या रंगाच्या काही गाड्या वेगाने येऊन थांबल्या.

त्यातून काही लोक भरभर बाहेर आले.

त्यांच्या हालचालींमध्ये शिस्त होती.

त्यांनी आर्यवीरला पाहताच मान झुकवली.

"Sir."

तो फक्त हलकासा मान हलवतो.

हल्लेखोरांच्या चेहऱ्यावर आश्चर्य पसरलं.

कारण आता त्यांना कळत होतं...

हा एखादा सामान्य उद्योगपती नव्हता.

आर्यवीरने आपल्या जखमी ड्रायव्हर कडे पाहिलं.

"Hospital मध्ये घेऊन जा."

"पण सर,"

बॉडीगार्ड काही बोलणार इतक्यात आर्यवीरने त्याला थांबवलं.

"तुझं काम तू केलंस."

त्याचा आवाज पहिल्यांदा थोडा मऊ झाला.

"आता माझं काम मी करतो."