❤️फक्त तुझ्याच साठी ❤️
हॉटेलच्या पोर्चमध्ये...
एकामागून एक जगप्रसिद्ध उद्योगपतींच्या गाड्या थांबल्या होत्या
मीडिया कॅमेऱ्यांचे फ्लॅश सतत चमकत होते...
सगळे बिझनेस टायकून आलेले होते.. पण ते लोक ज्याची वाट पहात होते.. तो अजून आला न्हवता..
अचानक...
दूरवरून काळ्या रंगाच्या आलिशान गाड्यांचा ताफा वेगाने हॉटेलकडे येताना दिसला.
पहिली...
दुसरी...
तिसरी...
पूर्ण ताफा हॉटेलसमोर येऊन एका रेषेत थांबला..
आणी इतका वेळ आळसलेले मीडिया वाले पटपट पुढे आले... त्याचा एक फोटो घेण्यासाठी सगळ्यांची धडपड सुरु होती..
क्षणात ब्लॅक सूटमधील कमांडोज गाड्यांमधून उतरले.
संपूर्ण परिसर त्यांच्या संरक्षण कवचात गेला.
मीडियाचा गोंधळ एका क्षणात शांत झाला.
सर्वांच्या नजरा त्या मधल्या गाडीवर खिळल्या.
ड्रायव्हर सीटमधून एक तरुण खाली उतरला.
उंच बांधा...
तल्लख नजर...
काळा सूट...
तो होता...
कबीर.
आर्यवीरचा सर्वात विश्वासू माणूस...
मित्र...
पर्सनल सेक्रेटरी...
आणि त्याच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी सांभाळणारा.
त्याने आजूबाजूला एक नजर फिरवली.
कमांडोजना हलकासा इशारा केला.
"Clear."
त्याच्या एका शब्दासोबतच सर्व सुरक्षा कर्मचारी सावध झाले.
कबीर पुढे आला...
आणि त्या काळ्या रोल्स-रॉईसचं मागचं दार आदराने उघडलं.
दोन सेकंद...
तीन सेकंद...
आणि...
चमकदार काळ्या बुटांनी जमिनीला स्पर्श केला.
हळूहळू...
आर्यवीर खुराना गाडीतून खाली उतरला.
काळा थ्री-पीस सूट...
हातात महागडं घड्याळ...
चेहऱ्यावर ना हसू...
ना राग...
फक्त असा शांत आत्मविश्वास...
जो समोरच्याचा आवाजही बंद करेल.
कबीरने त्याच्याकडे पाहत हळू आवाजात म्हटलं,
"वीर ... everyone is waiting."..
या जगात त्याला वीर म्हणणारे खूप कमी होते.. त्यातीलच कबीर ऐक होता...
आर्यवीरने कोटाचं बटण लावत त्याच्याकडे पाहिलं.
"Let them wait..."
क्षणभर थांबून तो हलकंसा हसला.
"A king never arrives early..."
"...He arrives when the moment belongs to him."
कबीरच्या ओठांवर हलकीशी स्मित उमटल....
त्याने पुन्हा पुढे होत ग्रँड हॉलचं विशाल दार उघडलं.
"Welcome, ."
आर्यवीरने एकही शब्द न बोलता आत पाऊल ठेवलं...
आणि त्या एका पावलासोबत...
संपूर्ण हॉलमध्ये एकदम शांतता पसरली..कारण तो आत येण्या अगोदर त्याच्या औऱ्याची दहशत तेथे पोहचलेली.
...
.
क्षणभरापूर्वी...
हशा...
कुजबुज...
डील्स...
आणि टाळ्यांचा आवाज घुमत होता...
पण...
दार उघडताच...
सगळं एका क्षणात थांबलं.
जणू वेळेनेच स्वतःचा श्वास रोखला होता.
आर्यवीर खुराना...
अत्यंत शांत पावलांनी आत चालत आला.
टक... टक... टक...
त्याच्या बुटांचा आवाज...
त्या शांततेत आणखी भयाण वाटत होता.
हॉलमध्ये बसलेल्या प्रत्येकाची नजर...
त्याच्यावर खिळली होती.
काही उद्योगपती नकळत आपल्या खुर्चीत ताठ बसले...
काहींनी घाईघाईने समोरच्या फायली बंद केल्या...
काहींनी आपल्या कपाळावर आलेला घाम रुमालाने पुसला...
तर काहींच्या हातातला कॉफीचा कप हलक्या थरथरीने हादरू लागला.
काही क्षणांपूर्वी...
जे लोक विक्रम मल्होत्राच्या भोवती उभे राहून मोठमोठ्या गोष्टी करत होते...
तेच आता...
नजरही वर करून आर्यवीरकडे पाहण्याची हिंमत करत नव्हते.
हॉलच्या शेवटच्या रांगेत बसलेला एक विदेशी गुंतवणूकदार...
हळू आवाजात आपल्या शेजारच्या व्यक्तीला विचारलं...
"Is he... Aryaveer Khurana?"
समोरचा उद्योगपती फक्त एवढंच म्हणाला...
"Don't mistake his silence for kindness..."
"He built an empire because people fear breaking their word to him."
त्या शब्दांनी...
त्या विदेशी व्यक्तीने नकळत गळ्यातील टाय सैल केली.
वातावरणात एक विचित्र दडपण पसरलं होतं.
आर्यवीर मात्र...
नेहमीप्रमाणे शांत होता.
ना कोणाकडे पाहिलं...
ना कोणाला अभिवादन केलं...
तो फक्त आपल्या जागेकडे चालत होता.
त्याच्या प्रत्येक पावलासोबत...
काही लोक विक्रमपासून थोडं थोडं अंतर ठेवू लागले.
हे पाहून...
विक्रमच्या कपाळावरही घामाचा एक थेंब ओघळला.
त्याने आयुष्यात पहिल्यांदाच जाणवलं...
आर्यवीरची खरी ताकद त्याच्या पैशात नव्हती...
तर त्याच्या उपस्थितीत होती.
मुंबईच्या त्या सर्वात आलिशान सेव्हन स्टार हॉटेलचा ग्रँड बॉलरूम मध्ये
देशातील टॉप उद्योगपती, अब्जाधीश, विदेशी गुंतवणूकदार, आणि इंटरनॅशनल बिझनेस ग्रुप्स त्या हॉलमध्ये उपस्थित होते.
आजची मीटिंग एका कंपनीची नव्हती...
तर भारतातील अब्जावधी रुपयांच्या एका मेगा प्रोजेक्टची होती...
जो हा प्रोजेक्ट जिंकेल...
पुढची दहा वर्षे भारतीय बिझनेस जगतावर त्याचं वर्चस्व राहणार होतं.
हॉलच्या मध्यभागी...
काळ्या सूटमध्ये बसलेला...
विक्रम मल्होत्रा... काही वेळा पूर्वी खूप खुश होता... जरी आर्यवीर त्या हमल्या मधून वाचला असला तरी...त्याच्यावर हमला करण्याची ताकद ठेवणारा कोणी तरी आहे... हे त्याने नकळत सगळ्यांना दाखवून दिलेले... कदाचित त्याच मुळे आत आपली ही दहशत निर्माण झाली असणार..
या विचारानेच त्याची छाती भुगलेली...
पण त्या भुगलेल्या छातीचा पिंजरा आर्यवीरच्या येण्यानेच दबून गेलेला...
काही वेळा पूर्वी जे मोठे उद्योगपती त्यांचे अभिनंदन करत होते...
"Congratulations Mr. Malhotra..."
"आज प्रोजेक्ट तुमचाच आहे..."
"आर्यवीरवर सकाळी हल्ला झाला म्हणे..."
"तो आज येणार नाही..."
प्रत्येक जण त्याच्याशी हस्तांदोलन करत होता.
त्यामुळे
विक्रमच्या चेहऱ्यावर विजयी हास्य पसरले होते...
पण आत्ता त्याच चेहऱ्यावर भीतीचे सावट पसरलेले.....
ज्या आर्यवीरचा "Game ओव्हर झाला असे त्याला वाटत होते त्याला अस समोर पाहून त्याचा ही आत्मविश्वास डळमळला होता...