Vilakshan - 8 in Marathi Thriller by Balkrishna Rane books and stories PDF | विलक्षण - 8

Featured Books
Categories
Share

विलक्षण - 8

विलक्षण ८( गौरीची हकिकत.....) विश्वंभर कोटणीस तरुणपणात खूपच बिघडलेला होता.उन्मत्तपणा त्यांच्या अंगात ठासून भरला होता.त्यात  विसाव्या वर्षी त्याचे वडील वारले.सगळा कारभार त्याच्या हाती आला.त्याची लहान बहिण द्वारका हिचा विवाह दोन वर्षांपूर्वी वयाच्या सोळाव्या वर्षी कागल इथल्या सरदार घराण्यात झाला होता.विश्वंभरने कारभार हाती येताच.नोकरांवर जुलम - जबरदस्ती सुरू केली.आसपासच्या शेतकऱ्यांच्या जमिनी त्याने पैसा आणि बळ वापरून आपल्या ताब्यात घेतल्या.तो कसलेला पैलवान होता.तिन -चार जणांना तो सहज अंगावर घेऊन लोळवायचा. मारामारी करणे, धमक्या देणे, बळजबरी करणे असे त्यांचे धंदे होते.दुर्गाबाईला त्याने तिच्या शेतकरी बापाला धमकी देऊन पळवून आणली होती.एका हतूतूच्या सामन्यासाठी तो आपला संघ घेऊन आंब्रड या गावी गेला होता.तिथे पंधरा वर्षांची दुर्गा शेजारच्या मुलींसोबत सामना बघण्यासाठी आली होती.विश्वंभरला दुर्गा आवडली.त्याला जी गोष्ट आवडायची ती तो येन केन प्रकारे मिळवायचाच.तो दुर्गाच्या वडिलांना भेटला .ते एक गरीब शेतकरी होते.विश्वंभरचा इतिहास त्यांना माहित होता. त्यांनी विश्वंभरलाकाहीतरी कारण सांगून वेळ मारुन नेली.त्या क्षणी सगळ घरदार सोडून दुसरीकडे जाण्याची त्याने तयारी केली.पण ऐनवेळी कोणीतरी ही बातमी विश्वंभरला सांगितली.तो  रात्रीच सरळ दुर्गाच्या घरी आला. तिच्या बापाला माराहाण करून त्याने दुर्गेला पळवून नेले.खर तर दुर्गाला विश्वंभर आवडला नव्हता.पण बाप आणि इतर भावंडांना त्रास होईल म्हणून ती गप्प राहिली. विश्वंभरच्या आईने दुर्गा आणि विश्वंभरच लग्न करण्याचा आग्रह धरला.नाईलाजाने  विश्वंभर लग्नाला तयार झाला.या जोडप्याला सूर्यकांत आणि चंद्रकांत अशी दोन मुले झाली.या दरम्यान विश्वंभर ने एका तरुण शेतक-याला त्यांच्या एका छोट्या चुकीसाठी चिखलात तुडवून मारल.त्या मारहाणीत तो मेला.महिनाभरापूर्वी त्याच लग्न झालं होत.त्याची पत्नीने त्यांच्या जळत्या चिंतेत उडी घेऊन सती गेली. विश्वंभर ने हे ही प्रकरणं दाबून टाकले.सासू असेपर्यंत दुर्गेला घरात मान होता.        आईच्या मरणानंतर मात्र विश्वंभर तिला त्रास देवू लागला. घरची कारभारीण असूनही तिच्या शब्दाला फारसी किंमत नव्हती. घरची सगळं काम तिला बघावं लागे.दोन सूना घरात आल्या आणि दुर्गेला थोडी उसंत मिळाली.तिचा थोरला मुलगा बापाच्या वळणावर गेलाहोता तर दुसरा अगदी शांत होता.सूर्यकांतला तिने अनेकदा समज दिली होती.पण खानदानी रक्तातला गुणत्यांच्यात भिनला होता. दिवसेंदिवस विश्वंभर चे प्रतापवाढतच चालले होते.पण सूर्यकांतच्या मरणाने आणि चंद्रकांताच्या नाहिसे होण्याने तो आतून कोसळला होता.पण बाहेरून तो तसं दाखवत नव्हता.सूर्यकांतचेदिवस कार्य केल्यावर त्याने पुन्हा शेती वाडी ,जमिन ,जुमला यांच्या कामात लक्ष घालायला सुरुवात केली.तो सकाळी लवकर उठायचा . व्यायाम करायचा.नंतर पाणी तापवण्याच्या बंबाखालील चुलाणात ओंडके घालून आग पेटवायचा.त्या दिवशी त्याने बंबात लाकड घातली त्यावर थोडं रॉकेल टाकले व आग पेटवली.काही वेळात लाकडांनी पेट घेतला. विश्वंभर बाजूला उभा होता.तेवड्यात चुलाण्यातून अग्नीच्या दोन ज्वाळा लवलवत बाहेर आल्या. या ज्वाळांचा आकार मानवी हातांसारखा होती.लाल रसरशीत लांबसडक अग्नीमय बोटे ....लाल जळत मनगट सरसरत विश्वंभरच्या पायापर्यंत आलं.त्या उष्णतेने त्याचे पाय भाजल्यासारखे झाले.तो घाबरून मागे सरकला.त्यावेळी आजुबाजुला वारा नव्हता मग आग अशी आपल्या दिशेने का सरकलीहे त्यांना कळेना.     मध्ये दोन दिवस गेले. तिस-या दिवशी सायंकाळी तो शेतात नोकरांकडून भाजणी करून घेत होता.कुणग्यांतकवळे टाकली होती.अगदी व्यवस्थित रांगेत पसरली होती.नोकरांनी कवळांना आग लावली. विश्वंभर बांधावर उभा राहून देखरेख करत होता.पेटत्या कवळांची लाल किटांळ वर हवेत उडत होती.पिवळ्या सूर्यकिरणांमुळे तीचमकत होती. अचानक अशी पेटती अनेक किटाळे एकत्र येऊन दोन्ही बाजूंनी सरकत विश्वंभरच्या दिशेने वार्याबरोबर सरकली.विश्वभंर ओरडत बांधावरून पळाला. बरोबरचे नोकर आवक् होऊन हा प्रकार पाहत होते.काही अंतर जाऊन ती अग्नीमय किटाळ राख होऊन खाली पडली.आता मात्र विश्वंभर हादरला होता. या दोन अनुभवांमुळे तो आगीपासून दूर राहायला लागला.  तो अग्नी पासून दूर राहत होता पण अग्नी त्याच्या जवळ येत होता.तो त्याला सोडत नव्हता.झाल असं कीतो रात्री नेहमी प्रमाणे वाड्याचा लोखंडी दरवाजा बंद करण्यासाठी कंदिल घेऊन बाहेर पडला.त्याने दरवाजा बंद केला त्याला भर मोठं गोल पितळी कूलूप लावल.चावी कमरेच्या दो-यात अडकवली. परत येताना हातातल्या कंदिलांची वात आपोआप मोठी झाली व आग भडकली.त्याच्या ज्वाळा माणसापर्यंत आल्या.हात ब-यापैकी भाजला.त्याने झटकन कंदिल दूर फेकला.रात्रपाळीचा नोकर धावत आला व त्याने कंदिल विझवला.       रात्रीच्या वेळी खोलीतला कंदिलही  पेटवून ठेवणे त्याने बंद केले होते.भाजलेल्या हातावर थोडे तूप लावून तो झोपायला गेला.हातातली बॅटरी उशाजवळ ठेवत तो झोपी गेला.रात्री दोन एक वाजता त्याला जाग आली.खोलीत मंद प्रकाश होता.त्यानेबाजूला पाहिले.तिथे लाकडी छोट्या टेबलवर कंदिल मंदपणूपेटत होता.विश्वंभरचा थरकाप उडाला.त्याने कंदिल पेटविला नव्हता शिवाय कंदिल भिंतीवर असतो तो टेबलवर कसा आला हेच त्याला कळेना.कंदिल विझविण्यासाठी धडपडून तो उठला.पण त्याचा हात कंदिलावर पडला.कंदिल पलंगावर ओढला गेला. त्याची काच फुटली आणि हिंदकळून रॉकेल पलंगावर पसरलं.काही कळण्याच्या आत कापसाच्या गादीने पेट घेतला .बघता बघता चादर पेटली.यातून सुटण्याचा प्रयत्न करत असलेला विश्वंभरचा मेंदू काम देईना झाला.त्याच्या कपड्यांनी पेट घेतला.तोओरडत दरवाज्याकडे धावला पण दरवाजा उघडेना झाला.त्याच्या नाका तोंडात धूर गेला.घसमटल्यामुळे तो ठोकू लागला धुरामुळे काही दिसेना झाले होते.शेवटी घुसमटून तो बेशुद्ध पडला.त्याच्या शरीराने पेट घेतला.अख्खी खोली त्यातल्या सामाना संकट धडधडा पेटत होती.त्याच वेळी एक शुभ्र वायुरूप आकृती तिथून बाहेर पडली." मी ही अशीच पेटले होते.जीवंत शरीर जळताना काय होतं ते आज यांना कळलं असेल."ती आकृती पुटपुटली.गौरी थांबली.या क्षणी तिचा चेहरा रागाने लालेलाल झालाहोता.माझ्या मनात अनेक प्रश्न होते.जर गौरीचा सूड पूर्ण झाला होता तर ती अजून मुक्त का झाली नव्हती?दुर्गा व भामिनीच पुढे काय झाले? यांची उत्तरे शोधली पाहिजे होती.------*****-------*****--------******-----*****    बाळकृष्ण सखाराम राणे ( शेवटच्या भागात काही रहस्यभेद आणि गौरीच्या भटकंतीला मुक्ती.)