Vilakshan - 1 in Marathi Horror Stories by Balkrishna Rane books and stories PDF | विलक्षण - 1

Featured Books
  • विलक्षण - 1

    विलक्षण १ जानेवारी २०२५जानेवारीचा महिना हवेत खुप गारवा होता....

  • आसरा

    आज त्याचा वाढदिवस होता अप्पाना माहित होते की, आज तो येणार भे...

  • पत्र सुमने..तुझी खास वाक्ये भाग ६

    प्रिय सोनाआपले शेजारी वर्षातील बरेच दिवस बाहेरगावी असतघरी आल...

  • मोफत मिळालं की महान

    मोफत मिळालं की महान: मानवी मानसिकतेवर एक शुद्ध विनोदी प्रहार...

  • Marine Drive

    आज Marine Drive ला भेटायचं ठरलं होतं. संध्याकाळी सात वाजता भ...

Categories
Share

विलक्षण - 1

विलक्षण १ जानेवारी २०२५जानेवारीचा महिना हवेत खुप गारवा होता. रात्रीचा एक वाजले  होते.अमावस्या असल्याने सभोवताली काळोख होता.अश्या वेळी गोव्यावरून एक कार मुंबईच्या दिशेने हायवेवरून जात होती.कारमध्ये एकूण पाच व्यक्ती होत्या.सुभाष कोटणीस जे स्वतः कार चालवत होते.त्यांच्या बाजूला त्यांची पत्नी रेखा बसली होती.पाठीमागे त्यांची दोन मुले व वडील तानाजीकोटणीस बसले होते.सुभाष सोडून सारे झोपले होते.गाडी हुमरमळा या ठिकाणी आली आणि सुभाषला समोर रस्त्यावर एक स्री दिसली. केस  मोकळे सोडलेली.. हिरवे लुगडं ...निळा ब्लाऊज...हातात हिरव्या बांगड्या असलेली.सुभाषने हॉर्न वाजवला.त्या स्रीच लक्षच नव्हतं.ती आपल्याच धुंदीत होती.तिला टाळण्यासाठी त्याने गाडी उजवीकडे घेतली.पण गाडी उजवीकडे न वळता कोणीतरी हात धरून स्टेअरींग वळल्यासारखी झपकन डावीकडे वळली.रस्ता सोडून गाडी...शेतात घुसली.. दोन फूट उंच बांधावरून मोठा आवाज करत ...गाडी पलटी झाली.त्या पाठोपाठ...काही किंकाळ्या...काचा फुटण्याचे आवाज...गाडीची धडधड...थरथरणारी हेडलाईटस ...पाणी...पाणी..असे आवाज ऐकू येत होते.सुभाषने बेशुद्ध होताना एवढंच पाहिलं की ती स्त्री समोर उभी होती .ती विचित्र पणे हसली आणि तिचं मान डाव्या बाजूला झुकली व डोकं खांद्यावर लटकायला लागलं.--------****------*****-----****-----***एप्रिल २०२६   पुण्यात चालू असलेल्या पुरातत्व विभागाच्या एका कार्यक्रमात मी निमंत्रित होतो.मी माझे आजपर्यंतचे संशोधन व माझे अनुभव मांडले.अर्थात सांगताना मी सगळेच अनुभव सांगू शकलो नाही.कारण काही अनुभव एवढे गूढ व अतर्क्य होते की एकतर ते कोणालाच पटले नसते.दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्या अनुभवाच्या आठवणी मलाही नको वाटतं होत्या.( संदर्भ -गूढ,लालसा,ओझं,त्या तिघीजणी ,तांडव इ.कथा)कार्यक्रम आटोपल्यानंतर मी कोल्हापूरला माझ्या घरी जाण्यासाठी बाहेर पडलो.तेवढ्यात एक निम गोरा...मध्यम उंचीचा... कुरळ्या केसांचा प्रौढ इसम माझ्या जवळ आला." रत्नकांत सर,मला तुमच्याशी बोलायचे आहे."" मला फक्त रत्नकांत म्हणा .मी तुमच्यापेक्षा खूप लहान आहे. बोला...! काय बोलायचं तुम्हाला माझ्याशी?"" इथे नको.इथून दहा मिनिटांवर माझं घर आहे. माझी कार आहे .चालेल...?"मी थोडा वेळ विचार केला.नसती ब्याद पाठी लावून घेण्यापेक्षा सरळ नाहीं म्हतलेले बरे असं क्षणभर मला वाटलं.पण उत्सुकता आणि नव्या साहसाची संधी मिळेल म्हणून मी गुपचूप त्यांच्या सोबत त्यांच्या घरी गेलो.पुण्यात त्यांचं स्वतःचं दिड गुंठ्यांत एक टुमदार घर होतं. बेल वाजवल्या वर एका प्रौढ स्त्रीने दरवाजा उघडला. ४० ते ४५ वर्षांची ती असावी.गोरी म्हणावी एवढी उजळ...शांत व हसरा चेहरा...काळेभोर डोळे..छान व्यक्तिमत्त्व होतं त्यांचं."उज्वला हे रत्नकांत... पुरातत्त्व अभ्यासक."" म्हणजे तांडव कथेतले...वसुदेव पेला आणि यक्षाची विलक्षण मूर्ती मिळवलेले."" होय."" या,  तुम्हाला प्रत्यक्ष भेटून आनंद झाला...बसा...चहा आणते."     आम्ही त्यांच्या अभ्यासिकेच्या खोलीत जाऊन बसलो." मी, रघुनाथ पुजारे...सरळ मुद्द्यावर येतो."त्यांनी समोरच कपाट उघडून एक फोल्डर बाहेर काढला.आणि तो माझ्या हाती दिला.त्या फोल्डर मध्ये दहा बारा जुनाट कागद होते." मी कोकणात कुडाळ व ओरस या दरम्यान एक दहा गुंठे जमीन व एक तयार घर घेतले. या घराच्या पाठीमागे मी सामान ठेवण्यासाठी खोली काढत होतो.त्या खोदकामा वेळी पत्र्याच्या छोट्या ट्रंकेत मला हे कागद सापडले."मी ते कागद बाहेर काढले व निरीक्षण केले." मला सुरुवातीला ही मोडी भाषा वाटली... म्हणून मी पुण्यात हे कागद दोन मोडीच्या जाणकारांना दाखवले.ते म्हणाले ही मोडी भाषा नाही. "खरच ती मोडी सारखी भासणारी पण वेगळी अशी लिपी होती.पण पध्दतशीर प्रयत्न केल्यास ती वाचता येईल असं वाटलं." मी प्रयत्न करतो पण थोडा वेळ लागेल.पण हे कागदवाचून काही मोठी पुरातन माहिती वैगरे मिळेल असं  प्रथम दर्शनी वाटत नाही."" नाही तेवढंच नाही तर..." तेवढ्यात त्यांची पत्नी सौ.उज्वला चहा व बंगाली खाजे घेऊन आल्या.ती येताच श्री.रघुनाथ गप्प झाले. मला वाटलं की त्यांना जे सांगायचे आहे ते तिच्या समोर सांगायचं नव्हते." अगं, छान जेवण कर.आज रत्नकांत इथेच जेवणकरेल. होय...ना?" ते माझ्याकडे बघत म्हणाले." आणि हो लोणचं संपलय.जरा कोपर्यावरून घेऊन ये."ते आपल्या पत्नीला म्हणाले.    ती दरवाजा उघडून बाहेर गेल्यावर ते म्हणाले..." रत्नकांत,मी दोन वेळा तिथे काही दिवस राहिलो आहे...पण प्रत्येक वेळी मला विचित्र अनुभव आलेत.रात्रीच्या वेळी कुणी स्री रडत असल्याचे आवाज.... लहान मुलाच्या रडण्याचा आवाज येतो.कोणीतरी घरात वावरत असल्याचा भास.. आणि हो त्या ट्रंकेत फक्तकागद नाहीत तर दोन छोटे पायातले चांदीचे वाळे सापडले आहेत."त्यांनी कपाटात लपवलेले दोन वाळे मला दिले.त्या वाळ्यांचा स्पर्श होताच माझ्या अंगातून एक अनामिक शिरशिरी आली.काहीतरी वेगळं असं त्या वाळ्यांच्या स्पर्शाने मला जाणवलं." तुम्ही तुमच्या पत्नीला याची कल्पना दिलेली नाहीअसं मला वाटतं." हो, हे नेमकं काय आहे ते कळल्याशिवाय मला ते तिला सांगायचे नाहीय.उगाचच ती घाबरेल. मला वाटतं मला झालेले भास...हे वाळे, यांचं नातं त्या कागदावरील माहितीशी असावं."" आताच नाही सांगता येणार." मी म्हणालो.मी त्या कागदांचे फोटो घेतले.ते व्यवस्थित आले याची खात्री केली." कागद नेले असते तरी चालल असत.""नको, मी पाच ते सहा दिवसांत तुम्हाला फोन करेन "तो पर्यंत सौ.पुजारे परत आल्या होत्या.आम्ही नंतर बर्याच गप्पा केल्या.मी तिथेच जेवण केले.सौ.पुजारेंच्या हातालाछान चव होती.------------------******----------------******------पुढच्या पाच दिवसांत मी माझं सर्व ज्ञान व अनुभव पणाला लावल आणि ती भाषा उलगडण्यात यश मिळवलं.पण त्या कागदांवर जे लिहीलेले होते ते वाचून मी फक्त हादरलोच नाही...तर निराश झालो.. विषण्ण झालो.त्या बरोबर संतापाने बेभान ही झालो होतो.मला कोकणातल्या त्या घराला भेट द्यायची होती.मी पुजारेंना फोन लावला व माझं म्हणणं सांगितले." तिथे बर्वे नावाचे पुजारी आहेत.ते रोज देवपूजा करण्यासाठी येतात.त्यांच्याकडे चावी आहे."त्यांनी जराही विचार न करता सांगितले.मी दुसर्या दिवशी सकाळी  सर्व तयारीनिशी बाहेर पडलो.या वेळी मी आंबोली मार्गे सावंतवाडी गाठली.सावंतवाडीत नाष्टा करून मी सरळ झाराप झिरो पॉइंट वरून हायवेवर येत हुमरमळा गाठलं.तिये रस्त्याच्या डाव्या बाजूला तिस एक मीटरवर मला निटनेटका बंगला दिसला.त्याच्या पाठीमागे एक छोटी टेकडी होती.मी बर्वे यांना फोन लावला.ते जुनी एम.एटी. स्कूटी घेऊन पंधरा एक मिनिटात आले." मी म्हणतो असं काय काम पडलं त्या पुजारेला?"मी त्यांना सांगितले की मला तिथे लिखाण करण्यासाठी राहायचं आहे.मी कुलूप उघडून आत शिरलो. एक  हॉल त्याच्या डाव्या बाजूला छोटं देवघर.. एक रुम व किचन तर उजव्या बाजूला बाजूला बेडरूम ,वॉश रूम होती.वर गच्ची होती.बंगल्याच्या मागच्या बाजूला एक स्टोअर रूम होती.मी माझं सामान डावीकडच्या रूममध्ये ठेवले.थोडी विश्रांती घेतली.मी घराचे व आतल्या खोल्यांचे फोटो घेतले.दुपारी एक वाजता मी ओरसला जेवण घेतले.पुन्हा येत होतो तेव्हा गेटच्या बाजूला असलेल्या गुलमोहरच्या झाडाखाली उभा असलेला एक गुराखी दिसला .मी गाडी थांबवली." आजोबा,तुम्ही इथेच राहता ? "" नाही .पलीकडच्या वाड्यात.""बरं. या घराबद्दल काही माहिती आहे?"त्या माणसाने जे सांगितले ते थोडफार मला त्या कागदातल्या माहितीवरून कळलं होत.म्हणजे हे मूळ घरकोटणीस नावाच्या सरदार घराण्याचं होते.पण नंतर तीन चार जणांनी ही जमीन व घर विकत घेतले.पण कोणच जादा काळ घरात टिकलं नाही." साहेब,जरा अलिकडे या.तिथे उभं राहू नका."" का? इथे काय आहे?"क्षणभर थांबून तो म्हणाला..."  या ठिकाणी काही ,अपघात झालेत. गाड्या खाली शेतातकोसळतात."त्या जागी उजवीकडे नॉर्मल वळण होत मग गाड्या डावीकडे कश्या कोसळतात हा प्रश्नच होता." अहो त्या बर्वे भटजी कडे बघा.पूजा करायचा आळस म्हणून खिडकीच्या बाहेर उभा राहतो आणि फूल नेम धरून देवाच्या पायावर फेकतो.मी ब-याच वेळा पाहिलंय.  पैसे घेतो ना?"मला हसू आलं.बर्वे तसा इरसालच वाटत होता.पण फूल फेकून पूजा करणे म्हणजे अतिच झालं.    मी पुन्हा बंगल्यावर आलो.देवघराकडे गेलो.दरवाजा उघडला तर देवासमोर सुकलेल्या फूलांचा सडा होता.एक दोन फुल ओलसर होती ती कदाचित काल परवा फेकलेली असावित. मी ती सगळी फुलं गोळा केली.देव्हारा साफ केला. अंगणातली जास्वंदीची फुल आणून देवाला वाहिली.मला थोड बरं वाटलं.   मी पुन्हा एकदा सगळ्या घराची पहाणी केली.मूळ वाडापूर्णपणे नष्ट करून पुजारींनी हे घर बांधलं होतं.त्यामुळे जुन्या खाणाखुणा दिसत नव्हत्या.दुपारी मी छानशी झोप घेतली. सायंकाळी उठल्यावर त्यामागचा सगळा परीसर फिरून काढला.जिथे पेटीत कागद सापडले होते ती जागाही मी शोधून काढली.तिथे पूर्वी एखादं छोट घर असावं.त्यात राहणा-या कुणीतरी ती कागदाची पेटी तिथे ठेवली असणार.रात्री जेवण झाल्यावर मी रात्री गच्चीवर जाऊन बसलो.सभोवार काळाकुट्ट अंधार.... हायवेवरून जाणा-या गाड्यांच्या मध्येच चमकणा-या लाइट्स झाडांवर पडून चमकत होते.वर आकाशात असंख्य चांदण्या चमकत होत्या.मध्येच एखादं दुसरी उल्का चमकून खाली कोसळत होती.अजून चांदणं पडलं नव्हतं.मी असा किती वेळ बसलो ते मलाही कळले नाही.डोळ्यांवर झोपेची गुंगी चढायला सुरुवात झाली होती.तेवड्यात खाली कसली तरी हालचाल चालू असल्याची जाणीव मला झाली.कुणीतरी हलकेच चालतं असल्यासारखा आवाज...सोबत हातातल्या बांगड्यांची किणकिण...त्यानंतर पुन्हा पावलांचा आवाज हा पुरुषी पावलांचा आवाज होता.मग एक अस्पष्ट किंकाळी... सुरूवातीला ती एखाद्या लहान मुलीची वाटत होती.पण ती एका स्त्रीची होती कुणीतरी तिचा गळा दाबल्यावर जसा आवाज येईल तसा.     माझी झोप उडाली.मी गच्चीवरून खाली उतरलो.हॉलमध्ये आलो.नाईटलॅम्पच्या मंद प्रकाशात मी सगळीकडे नजर फिरवली पण सारे अगदी शांत होत.मी हॉलमधली लाईट ऑन केली जे मला दिसलं त्यांनी माझ्या अंगावर काटा उभा राहिला.किचन पासून बेडरूम पर्यंत कुणा स्त्रीच्या पावलांचे अस्पष्ट ठसे होते.टाचेच्या मधोमध सौम्य असा गोल केसरी रंग दिसत होता.कदाचित त्या स्त्रीने पावलांना खालून ताजी मेहंदी लावली असेल.पालीच्या थंडगार स्पर्शाने अंग शहारत तसं माझं अंग शहारल. कोण होती ती स्त्री? आणि यावेळी तीया घरात काय करत होती ? पुरुषी पावलांचा आवाजही आला होता.पण त्याचा कोणताही मागोवा सापडत नव्हता.त्या रात्री मी बेडरूममध्ये न झोपता हॉलमध्ये सोफ्यावर झोपलो.सोबत बॅटरी होती.या पूर्वीही मी अश्या प्रसंगातून गेलो होतो.पण आज रात्रभर मी मध्ये मध्ये दचकून जागा होतो होतो.-----***------***-----***----***----****---- दुस-या दिवशी सकाळी सात वाजता मला जाग आली.एरव्ही मी रोज साडेपाचला उठतो.पण कालच्या प्रसंगामुळे मी चांगली झोप घेऊ शकलो नव्हतो.जाग येताच मी समोर पाहिले.तिथे आता पावलांचे ठसे किंवा केसरी रंगाचा ठिपका काहिच दिसत नव्हते.मी झटपट आंघोळ केली.तेवड्यात बेल वाजली.दार उघडले तर समोर बर्वे भटजी..." अहो,रोजची पुजा... चुकली तर थार होत नाही."ते हसून म्हणाले." ठिक आहे.या..." आज ते सगळं पुजेचे साहित्य घेऊन आले होते.मला उगाचच हसू आलं." हे बघा, गुरूजी मी चार दिवस आहे . तोपर्यंत मी पुजाकरेन.जाताना तुमच्याकडे चावी ठेवून जाईन." गुरूजींची पुजा होईपर्यंत मला थांबावं लागलं.रोज बाहेरून फूल फेकणा-या गुरूजींनी आज साग्रसंगीत पुजा केली.मी तिथून कुडाळ पोलीस स्टेशनला गेलो.तिथले सब इन्स्पेक्टर कुमठेकर यांना भेटलो.मी कशाला आलोय व मी कोण ते त्यांना सांगितले.त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना हुमरमळा येथल्या अपघातांची डिटेल्स आणायला सांगितली.एकूण तिन अपघात त्या ठिकाणी चार वर्षांत झाले होते.मी बारकाईने फाइल्स पुन्हा पुन्हा चाळल्या.थोडा वेळ मी शांत बसलो.अचानक मी चमकलो.खात्री करण्यासाठी मी पुन्हा त्या फाइल्स चाळल्या." अरेच्च्या ! हा योगायोग आहे की आणखी काही."कुमठेकरांनी चमकून माझ्याकडे पाहिलं." म्हणजे?"" साहेब,या अपघातात जे गंभीर जखमी झाले होते.त्या तिघांच आडनाव कोटणीस आहे.तिघेही पंचावन्न ते पासष्ट वयोगटातील आहेत." कुमठेकरांनी दचकून फाइल्स आपल्याकडे घेतल्या.त्यांनी स्वतः खात्री केली." खरच...पण हा योगायोग असेल.ह्या अपघातांची सगळी चौकशी होऊन फाइल्स बंद झाल्यात."मी फक्त हसलो. मी त्या गाड्यांच्या मालकांचे फोन नंबर घेतले.कुमठेकरांचे आभार मानून मी तिथून बाहेर पडलो.--------****-----*****-------*****------****---येताना माझं विचार चक्र चालू होत.भाग १ समाप्त

       ाळकृष्ण सखाराम राणे 

8605678026