***********१४******************** आज लखन एकटाच घरी बसला होता. शिवंण्या मरण पावली होती. तसा तो विचारच करीत होता. सर्वात मोठा कोण? सर्वात मोठा. जगात प्रत्येक जीवजंतू स्वतःला सर्वात मोठा समजतो. पेशेधारीही स्वतःला सर्वांत मोठे समजतात. नेत्यांची तर गोष्टच सांगायला नको. समजा एखादं युद्ध झालंच तर त्या युद्धाचे श्रेय नेत्यांनाच जातं. परंतु त्या युद्धातील विजय हा नेत्यांमुळं होत नाही. कारण लढणारा सैनिक मोठा असतो. सर्वात मोठा कोण? याबाबतीत देशाचा विचार केल्यास प्रत्येक जीवजंतूच मोठा असतो. परंतु काही राजकीय तत्व स्वतःला मोठे समजत स्वतःच्या मोठेपणाचा उदोउदो करतात. जंगलाचा राजा सिंह, पक्ष्यांचा राजा मोर, सृष्टीचा राजा प्रत्यक्ष विधाता आणि याहीपेक्षा मोठा कोण? लखन विचार करु लागला. विचारांती त्याला कळलं की सर्वात मोठा निर्माण कर्ता देवच आणि त्याहीपेक्षा मोठा साहित्यीक की जो देवालाही आकार देवू शकतो आपल्या कल्पनांनी. विधाता, शिल्पकार व साहित्यीक यापैकी सर्वात मोठे कोण? एके ठिकाणी मोठेपणावरुन गाजणारं प्रकरण. तसं पाहिल्यास श्रेष्ठत्वाच्या दृष्टीकोनातून हे तिन्ही सारखेच. या तीनपैकी महान कोण? महान तीनही. कारण विधाता साहित्यीकाला निर्माण करतो, तसाच तो शिल्पकारालाही निर्माण करतो, तर साहित्यीक विधात्याला निर्माण करतो. तसाच शिल्पकारही विधात्याला निर्माण करतो. विधाता कसा होता? त्यानं काय केलं? हे सांगतो साहित्यीक आणि त्याला सांगायला बाध्य करतो विधाता. म्हणतात की सर्वात आधी देव निर्माण झाला. परंतु देवाला कुणी निर्माण केलं असेल? तर त्याचं उत्तर आहे, शिल्पकारानं. परंतु शिल्पकारानं देवाला कसं तयार करावं? याचं तत्वज्ञान ज्या कोणं सांगीतलं. तो साहित्यीक. अर्थातच मार्गदाता. याच दृष्टीकोनातून साहित्यीक मोठा ठरत असतो. परंतु या दोघांनाही निर्माण करणारा विधाता. तोही एका दृष्टीनं कनिष्ठ ठरत नाही. साहित्यीक मार्गदर्शन करतो. शिल्पकार कृती करतो व त्यानुसार विधाता मुर्त स्वरुपात तयार होत असतो. विशेष म्हणजे जगात शिल्पकार व विधाता हे घटक सारखे वाटत असले तरी मोठे आहेत. त्यापेक्षा साहित्यीक मोठे असतात. कारण तेच सर्वांना लेखनी रुपानं मार्गदर्शन करीत असतात. हे जरी खरं असलं तरी बाकीचे दोन्ही घटक गौण ठरत नाहीत. तेही तेवढेच श्रेष्ठ आहेत. जेवढे साहित्यीक श्रेष्ठ असतात. हे तीनही सारखेच श्रेष्ठ आहेत. त्यापेक्षा बाकीचे सर्वच घटक इतिहास तपासून पाहिल्यास कनिष्ठ आहेत यात शंका नाही. स्वातंत्र्य टिकवायचे असेल तर...... लखनसिंहाला विचार आला. आपण आजही भेदभाव व द्वेष पुर्ण वातावरणात जगतो. परंतु विचार केलाय का की त्यानंच आपलं नुकसान होतं व आपण पारतंत्र्यात जातो. तो विचार करु लागला. अशातच त्याला आठवली एक कहाणी. ब्राम्हण, क्षत्रीय, वैश्य व शुद्र. हे चार घटक. चौघंही एकमेकांशी भांडत असत. त्यांचं भांडणं. श्रेष्ठत्वावरुनच व्हायचं. शेवटी त्यांनी ठरवलं. आपण वादविवाद स्पर्धा घेवू. जो जिंकेल, त्याला श्रेष्ठत्वाचं स्थान मिळेल. मग तो शुद्र का असेना. त्यानंतर ब्राम्हण, क्षत्रीय, वैश्य व शुद्रातील एक एक प्रतिनिधी वादविवाद स्पर्धेत बसले. चर्चा सुरु झाली. आमच्यापैकी श्रेष्ठ कोण? सर्वात आधी ब्राम्हण म्हणाला, 'आम्ही ज्ञान देण्याचं कार्य करतो. आम्ही जर ज्ञान दिलं नाही तर क्षत्रीय राज्यकारभार करु शकणार नाही. आपलं संरक्षण करु शकणार नाही. त्यातच आपण सुरक्षीत राहू शकणार नाही आणि आपण सुरक्षीत नसू तर आपल्याला माहीत आहे की आपण गुलाम असू एखाद्या राजवटीचे व गुलामाला किंमत नसेल. मग वैश्यही अन्न पिकवू शकणार नाही व शुद्रांनाही कष्ट करायची अनुमती मिळणार नाही.' ते झालं ब्राम्हण प्रतिनिधीचं बोलणं. त्यानंतर क्षत्रीयांनी मत मांडलं. जे ब्राम्हणांनी मांडलं होतं. त्याच स्वरुपाचं होतं. 'आम्ही जर नसेल तर राज्याचं रक्षण होणार नाही. आपण गुलाम बनू. मग ब्राम्हणांच्या वाणीला व शिकविण्याला किंमत उरणार नाही. वैश्यांना अन्न निर्मितीही करता येणार नाही. शुद्रांनाही कष्टाची कामे करायला परवानगी नसणारच.' त्यानंतर वैश्य म्हणाला, 'आम्ही जर अन्न पिकवलंच नाही आणि कोणाला खायलाच दिलं नाही तर कष्ट करण्यासाठी बळच प्राप्त होणार नाही. म्हणूनच आम्ही सर्वात श्रेष्ठ ठरतो.' वैश्यानं आपली बाजू मांडली. तो काही जास्त बोलला नाही. ब्राम्हण, क्षत्रीय व वैश्य प्रतिनिधींनी आपापली बाजू मांडली. त्यानंतर क्रमांक आला शुद्राचा. तोही स्वतःला कमजोर समजत नव्हता. तो म्हणाला, 'आम्ही कष्ट करतो. आम्ही जर या जगात नसेल तर कोणीच सुखानं राहू शकणार नाही. अहो, आम्हाला जरी शुद्र नावाच्या वेगळ्या वर्णात टाकलं असलं तरी सर्वच आमच्या बिरादरीतील आहेत. ब्राम्हण सल्ले देतो. अर्थात कष्ट करतो. म्हणजेच तेही शुद्रच आहेत. क्षत्रीय राज्याच्या सीमेचं रक्षण करतो म्हणजेच कष्ट करतात. म्हणजेच तेही शुद्रच आहेत. वैश्यही शेतजमीनीत कष्ट करतात. म्हणजेच तेही शुद्रच आहेत. यावरुन ठरवा, श्रेष्ठ कोण असेल. साहजीकच आम्हीच श्रेष्ठ ठरतो. बरं, ते जावू द्या. परंतु खुद्द आम्ही जर कामच करणं बंद केलं तर कोणालाच श्रेष्ठ म्हणायला वाव मिळणार नाही. त्यानंतर कोणीच श्रेष्ठ ठरणार नाही.' ब्राम्हण, क्षत्रीय, वैश्य व शुद्र. असे चार वर्ण. या चार वर्णानुसार चार वर्णातील सर्वच घटक हे महत्वाचेच घटक होते. पहिला घटक ब्राह्मण. ब्राह्मण त्याला म्हणत जो विद्या शिकवायचा. त्यानं जी विद्या शिकवली. त्यानुसार सैनिक अर्थात क्षत्रीय वर्ण राज्याची सुरक्षा करायचा. त्यानंतर वैश्यांनाही अन्ननिर्मिती करता यायची आणि शुद्रांनाही कष्ट करुन पोट भरता यायचं. सर्वच वर्ण सेवा करायचे. ब्राम्हण वर्ण ज्ञान देण्याचे काम करायचा. तो अति कठीण प्रसंगात क्षत्रीयांना सल्ले द्यायचा. ज्यातून ते राज्य अबाधित राहायचं. क्षत्रीयही ब्राम्हणांचे सल्ले ऐकून त्या पद्धतीनं वागून राज्याचे संरक्षण करायचा. वैश्य वर्ण अन्ननिर्मिती करायचा तर शुद्र वर्ण अर्थात कष्टकरी मजूर वर्ग हा या तिनही लोकांजवळ मेहनत करायचा. परंतु नंतर सर्वच वर्णांना तोंड फुटलं व ते आपापसात काही बाही बोलू लागले. त्यांचे बोलणे एकमेकांना टोचून बोलल्यागत असायचे. परंतु शुद्र वर्ण मनातल्या मनात विचार करायचा की जर ब्राह्मण वर्गाला मोठं समजलं तर क्षत्रीय वर्गाचा अपमान होतो. कारण त्यानं रक्षणच केलं नाही राज्याचं तर राज्य गुलाम होईल. ज्यात ब्राह्मण वर्णातील लोकं अर्थात गुरुही असतील. सैनिकाला मोठं समजलं तर तोही मोठा ठरु शकत नाही. कारण त्याला गुरुनं शिक्षणच दिलं नाही तर त्याला लढता कसं येईल? येणारच नाही. म्हणून तोही महान ठरु शकत नाही. वैश्यानं अन्ननिर्मिती केलीच नाही तर सैनिकांना बळ कसं येईल. तेव्हा तोही लढू शकणार नाही. म्हणतात की सैनिक सर्वात मोठा आणि महान असतो. तो शेतकऱ्यांपेक्षाही मोठा असतो. तसं लाल बहादूर शास्त्री यांनी जय जवान व जय किसान अशी घोषणा दिली होती. त्यांच्या मते शेतकरी आणि सैनिक हे सर्वात मोठे आणि तेवढेच महान वाटत होते. शुद्र वर्णाच्या विचारानुसार सर्वच वर्ण हे श्रेष्ठ होते. तो इतर वर्णांना तेच सांगत होता. परंतु कोणीच त्याचं ऐकत नव्हतं. तसा त्याला बोलण्याचा अधिकारच नाही असं समजून त्याचेकडे लक्ष देत नव्हते. त्याच्या विचारावर अंमल करीत नव्हते. त्यातच त्या तिनही वर्णांनी आपापसातील हेवेदावे वाढवत काम करणं बंद केलं. याचाच फायदा विदेशी लोकांनी घेतला. त्यांनी लगेच संधीचा फायदा घेवून आक्रमण केलं. ज्यांच्यामध्ये असे वर्ण नव्हते. मग काय या तिनही वर्णांनी आपापले काम करणे बंद केल्याने शुद्रांना आत्मसंन्मान व रक्षणासाठी आदेशच मिळाला नाही. शेवटी ते चारही वर्ण विदेशी संस्कृतीचे गुलाम झाले. ब्राम्हण, क्षत्रीय, वैश्य व शुद्र हे चारही वर्ण गुलाम झाले होते. आता कोणाच्याच कोणत्याच मताला वाव नव्हता. कोणाच्याच कोणत्याच कामाला वाव नव्हता. त्यातच सर्वांनाच फक्त कष्टाचंच काम करावं लागायचं. जे काम आधी शुद्र वर्णधारी करायचे. अन् ती कामं न केल्यास पाठीवर चाबकाचे फटके पडायचे. आता कळलं होतं सर्वांना की आम्ही सर्वच वर्ण आपापल्या पातळीवर श्रेष्ठ होतो. परंतु आम्ही ते समजू शकलो नाही. आज समजत आहे. परंतु आता वेळ निघून गेलेली आहे. हे आम्हाला आज कळलं. कारण आज आमच्यावर संकट आलेलं आहे व संकटातच डोळे उघडतात असं जे म्हटलं जातं. ते आज खरं ठरलेलं आहे. सर्वात महान कोण? याबाबतीत विचार केल्यास सर्वच पेशाचे लोकं आपल्या स्वतःला महान समजत असतात. परंतु सर्वात महान कोणीही नसतो. सर्वच आपापल्या पातळीवर श्रेष्ठ असतात. परंतु कोणी ब्राम्हणांना महान समजतात. ते स्वतः महान असल्याचा दाखला देतात. कारण ते शिकविण्याचे काम करतात. यावरुन शिक्षक हे त्यांच्या वर्णात मोडतात व शिक्षक हे राष्ट्र घडवतात. त्यांनी जर कोणाला सल्लेच दिले नाही तर कोणीच शिकू शकत नाही. त्यातच त्याचं संपुर्ण जीवन अंधकारमय होवून जातं. खासकरुन प्राथमिक शाळेतील शिक्षक. ते सर्वांना अक्षरओळख करुन देतात. अक्षरओळख जर असेल तर व्यक्ती कोणत्याही गोष्टीत पारंगत होवू शकतो. अशांना पारंगत एक प्राथमिक शिक्षकच करु शकतो. परंतु आजच्या काळात विद्यार्थ्यांना हे प्राथमिक शिक्षकच आठवत नाहीत. जे बीट धरुन शिकवतात. आठवतात वरच्या वर्गातील शिक्षक. कारण त्यावेळेस त्यांना समंजसपणा आलेला असतो. शिक्षक हे शेतकऱ्यांनाच नाही तर सैनिकांनाही शिकवीत असतात. ते सर्वांनाच शिकवितात. त्यांनी शिकविल्यानुसार सैनिक तयार होतात व ते देशाचं रक्षण करतात. त्यांनी जर शिकवलंच नाही तर सैनिक देशाचं रक्षण करु शकणार नाहीत. पुर्वीच्या काळात ब्राह्मण वर्गाकडे शिकविण्याचं कार्य होतं. ज्यानुसार त्यांना महान समजलं जात असे. तेच गुरुस्थानी असायचे व त्यांच्याच सल्ल्याने राजेही राज्यकारभार करीत असत. कारण राजांना शिक्षण देणारा गुरु अर्थात ब्राह्मण वर्ग प्रशिक्षित करायचा. म्हणूनच शिक्षकाला महान समजलं गेलं व महानतेच्या कक्षेत त्यांना प्रथम स्थान देण्यात आलं. महानतेच्या क्षेत्राचा विचार करतांना दुसऱ्या क्रमांकावर टाकलं सैनिकांना. मुळात सैनिक हा एक राजाच असतो. त्याचा धर्म असतो आपल्या राज्याचं रक्षण करणं. त्यानं जर देशाचं रक्षणच केलं नाही तर देशातील सर्वच लोकं गुलाम होत असतात. अन् एकदा का राज्य गुलाम झालं की बस, त्या राज्यातील शिकविणाऱ्या गुरुलाही कोणी मोजत नाहीत. तोही गुलाम होतो. म्हणूनच राजा अर्थात सैनिक हा तेवढाच महान ठरतो. जेवढा महान गुरु ठरतो. महानतेच्या कक्षेचा विचार केल्यास तिसऱ्या क्रमांकावर टाकल्या गेलेला वैश्य वर्ण अर्थात शेतकरी अर्थात कृषकही तेवढाच महान ठरतो. कृषक याचा अर्थ उपज करणारा. उपज याचा अर्थ मशागत करुन त्यातून उत्पादन काढणे. म्हणतात की शेतीतील उत्पादन त्यानं काढलेच नाही तर कोणीच जगू शकणार नाही. म्हणूनच शेतकरी हा सैनिकाएवढाच महान ठरतो. परंतु तो सैनिकांपेक्षा जास्त महान ठरत नाही. कारण शेतकरी वर्गानं जरी पीक आपल्या शेतात पिकवलं नाही तरी लोकं जीवंत राहू शकतात. हे पुर्वीच्या काळाला लक्षात घेतल्यास समजेल. जसे पुर्वीच्या काळात लोकं कंदमुळं खावूनच जगत होते. कोणी झाडाचा झाडपालाच खावून जगायचे. जे झाड नैसर्गिकरित्या निर्माण होत असे. सृष्टी आपोआपच अन्नाची निर्मिती करीत असे आणि आजही करीत असते. तसाच याच महानतेच्या कक्षेत समाविष्ट झालेला चौथा वर्ण म्हणजेच शुद्र वर्ण. या वर्णानं जर वरील तिनही घटकांकडे काम केलं नाही तर जगात समुद्धीच राहणार नाही. विशेष सांगायचं झाल्यास ब्राम्हण, क्षत्रीय, वैश्य व शुद्र हे चारही वर्ण व त्या वर्णातील समाविष्ट करण्यात आलेले सर्वच लोकं श्रेष्ठ आहेत. कोणताच घटक हा कधीही कनिष्ठ ठरत नाही आणि कोणी तसं समजूही नये. या चारही घटकांचं कार्य आपापल्या ठिकाणी महत्वपुर्ण आहे. त्यामुळंच समाजात या वर्णावरुन जो भेदभाव आपण निर्माण करतो ना. तो बरोबर नाही. आपण तो भेदभाव संपुर्णतः समूळ नष्ट करुन एकमेकांशी गुण्यागोविंदानं राहावे. यातच विजयश्री आहे. मी ब्राम्हण, तो शुद्र. असा भेदभाव समाजात नसावाच. कारण अशाच प्रकारच्या भेदभावात्मक वातावरणाचा फायदा विदेशी शक्ती घेते व आपल्यावर गुलामीचे राज्य लादवते. हेच आजपर्यंत आपण पाहात आलेलो आहे. कधी अरबांनी येवून राज्य केलं तर कधी इंग्रजांनी येवून राज्य केलं. ज्याचा त्रास आपल्यालाच झालेला आहे. तेव्हा आज अशाच विदेशी शक्तीवर मात करुन आपण स्वातंत्र्य मिळवलं. तेव्हा हे स्वातंत्र्य अबाधित राखायचं आहे आणि हे स्वातंत्र्य अबाधित राखायचं असेल तर आपल्याच देशातील आपले सर्वच प्रकारचे वैमनस्य, भेदभावपुर्ण वातावरणाचे भाग आपल्याला विसरावे लागतील. जेणेकरुन आपले सार्वभौमत्व सारस्वत, सार्वकालिक टिकेल. यात शंका नाही. सर्वात मोठा कोण? अलिकडील काळात स्पर्धा लागलेली आहे. ही मोठेपणाची स्पर्धा आहे. सर्वात मोठं समजण्याची. सर्वात मोठा कोण? याबाबत कधीकधी हास्याचाही विषय होतो. सर्वात मोठा कोण? देशाचा विचार केल्यास सर्वात मोठा राजा असतो. असं लोकं म्हणायचे. कारण तो नेतृत्व करायचा. याच अनुषंगानं आज सर्वात मोठा कोण? याबाबतीत विचार केल्यास सर्वात मोठा राष्ट्रपती ठरतो. अन् राष्ट्रपतीला अधिकार नसल्यानं व तो नाममात्र शासनप्रमुख असल्यानं देशाचा पंतप्रधान हा सर्वात मोठा ठरतो. मात्र पुर्वी असं नव्हतं. पुर्वी राजा मोठा असायचा. त्यालाच परमेश्वर मानलं जायचं. सर्वात मोठा राजा. कारण तोच देशाचं म्हणजेच त्या त्या राज्याचं रक्षण करायचा. कोणत्या देशानं त्याचेवर आक्रमण केल्यास तो आपल्या अस्तित्वासाठी युद्ध लढायचा. ज्यात युद्ध जिंकणे हा पर्याय ठरायचा. त्यातच हे युद्ध जिंकण्यासाठी तो साम, दाम, दंड व भेद या कुटनीतीचा वापर करायचा. तो रसद पुरवायचा. त्यातच असे बोल बोलायचा की त्या बोलानं सैन्यात असलेली ताकद दहा पटीनं वाढायची. आपल्याला माहीत असेल की कोंढाण्याची लढाई करतेवेळेस तानाजी मालुसरे धारातीर्थी पडताच सगळे मावळे कल्याण दरवाजाच्या मार्गानं पळत सुटले होते. त्यावेळेस तिथं त्यांना भेटलेला सुर्याजी म्हणाला की असे भागूबाईसारखे का पळता. मागे फिरा. मी कड्यावरील दोर कापून टाकलेला आहे. आता एकतर कड्यावरून उडी मारून मरा, नाहीतर शत्रुंशी लढून मरा. ते सुर्याजीचे बोल. मावळ्यांना भागूबाई म्हणण्याची कृती. ती त्यांना चिडविण्यासारखी कृती होती. परंतु त्या कृतीनं मावळ्यांना स्फुरण चढलं. त्यांनी विचार केला की असं कड्यावरून उडी टाकून मरण्यापेक्षा आपण शत्रुशी लढून मेलं तर बरं. कदाचित आपल्या बलिदानातून नवा इतिहास तर घडेल. कोणी आपल्याला भागूबाई तर म्हणणार नाही. ते मागे फिरले व लढले. तेव्हाच कोंढाणा जिंकता आला. यावरुन हे लक्षात येते की सर्वात मोठे मार्गदाते असतात की जे आपल्यातील कौशल्यानं लढाई जिंकून आणतात. त्यांनी जर जिंकण्याचा विचार केला तर...... फक्त टेकू हवा असतो. तो टेकू लावण्याचं काम ते करतात. म्हटलं जातं की जगात देव आहे आणि भूतही आहे. हीच भीती दाखवली जाते नेहमी सर्वांना. आजपर्यंत हीच भीती दाखवली जात होती. गावात प्रवेश केला की म्हटलं जात होतं, चिंचेच्या झाडावर भूत आहे. अमक्या ठिकाणी वाघोबा आहे. पाण्याचा भाग असेल तर पानबुड्या आहे. नक्टोबा, गिड्डोबा, हडळ अशी वेगवेगळी भुतांची नावं सांगीतली जात होती. अमावस्येची रात्र म्हणजे भुताटकी असलेली रात्रच मानण्यात येत असे. अशातच अमावस्येच्या रात्री कोणीच बाहेर पडत नसे. अशावेळेस सर्वात मोठं समजणाऱ्या नव्हे तर स्वतःला आलमवीर मानणाऱ्या औरंगजेबावर अमावस्येच्याच रात्री गनिमी काव्यानं युद्ध करुन शिवाजी महाराजांनी शह दिला व पिसाळून सोडले. त्यातच पिटाळूनही लावले. मराठे केव्हाही हमले करतात. ते वाघासारखे येतात व हमले करुन निघून जातात. मी जर महाराष्ट्रात गेलो तर ते येतील व मलाच यमसद्नी पोहोचवून श्वास घेतील. या भयानं औरंगजेब शिवाजी महाराज जीवंत असेपर्यंत महाराष्ट्रात आला नाही. याचाच अर्थ शिवाजी महाराज मोठे व सरस ठरले होते औरंगजेबावरुन. जर त्यांनी चिंचेच्या झाडावर भूत असतं. अशी अंधश्रद्धा जर बाळगली असती तर कदाचित शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनच करता आलं नसतं. तशा बऱ्याचशा मोहिमा त्यांनी अमावस्येच्या रात्रीच यशस्वी केल्यात. शिवाजी महाराज हे कुशल नेतृत्वाचे धनी होते. त्यातच औरंगजेबाजवळ विशाल सैन्य होते. परंतु शिवाजी महाराजांच्या कुशल नेतृत्वानं औरंगजेब पराभवी ठरला व शिवाजी महाराज जिंकले. कारण होतं मार्गदाता. त्यांना जिजाऊ मातेनं मार्गदर्शन केलं होतं. असाच महाभारतातीलही एक प्रसंग आहे. महाभारताचं युद्ध छेडताच आपल्याला मथुरेची मदत व्हावी म्हणून दुर्योधन व अर्जून मदत मागायला मथुरेला गेले असता दुर्योधनानं मथुरेत असलेली नारायणी सेना मागून टाकली. विचार केला की नारायणी सेना प्रत्यक्ष युद्ध लढेल व क्रिष्ण लढणार नाही. मग क्रिष्ण कोणत्या कामाचा? तेव्हा क्रिष्णाला मागू नये. मात्र अर्जुनानं प्रत्यक्ष क्रिष्णाला मागितलं. कारण त्याला माहीत होतं की सारथी असाच असावा. जो कुशल असावा व त्यानं उत्कृष्ट मार्गदर्शन करावं. जेणेकरुन आपल्याला युद्ध जिंकताच येईल आणि तसंच झालं. नारायणी सेना अवश्य लढली. परंतु त्यांना योग्य मार्गदर्शन करणारं नेतृत्व न मिळाल्यानं ती परास्त झाली. तसाच अर्जुन जिंकला. कारण अर्जुनाला जिंकविण्यासाठी मार्गदर्शन करणारं कुशल नेतृत्व क्रिष्ण रुपानं त्याच्याजवळ होतं. क्रिष्ण........ क्रिष्णानं महाभारताचं युद्ध जिंकवलं. कारण त्यांना कौरव सेनेतील कमजोऱ्या माहीत होत्या. त्याच कमजोऱ्यांबद्दलचं मार्गदर्शन क्रिष्णानं अर्जुनाला केलं. जसं भिष्माला मारतांना श्रीखंडी पुढे आणला. जो तृतीयपंथी होता. ज्या तृतीयपंथी समोर पितामहा भिष्म शस्र टाकणार होते. हे क्रिष्णाला माहीत होतं. त्यांनी अर्जुनाला तीच गोष्ट सांगीतली व पर्यानानुसार ते घडलंही. दुसरा महान योद्धा होता द्रोण. द्रोणाला मारणं कठीण होतं. परंतु अश्वत्थामा नावाच्या हत्तीला मारुन युधीष्ठीरला नरो वा कुंजरवा म्हणायला लावणारा क्रिष्णच होता. तिसरा महान वीर योद्धा होता कर्ण. त्यालाही मारणं अशक्य होतं. परंतु त्याच्या गाडीचं चाक चिखलात फसवणं. ही एक लीलाच होती क्रिष्णाची. त्यातच तो निःशस्र असतांना युद्धाच्या नियमानुसार त्याच्यावर वार करणं अशक्य होतं. ते करायला लावलं क्रिष्णानं. क्रिष्णानं कौरव सेनेचे मोठमोठे वीर योद्धेच धराशायी केले. एवढंच नाही तर त्यानं दुर्योधनाला मारतांना वार कुठं करावा. हेही सांगीतलं. मात्र त्यासाठी कोणतेच शस्र हातात घेतले नाही. फक्त मार्गदर्शन केलं एवढंच. त्यातच त्यानं पांडवांचे निरागस पुत्र मारणाऱ्या अश्वत्थामाला शिक्षा म्हणून त्याच्या डोक्यावरील निलमणी काढून घेतला. यावरुन मार्गदाता किती महान असतो. हे लक्षात येते. राजा हा महान आणि मोठा असतो. तो सर्वात मोठा असतो. हे जरी खरं असलं तरी सर्वात मोठा मार्गदाता असतो, मग तो सारथी का असेना. हे सिद्ध होते. देशाचा सर्वात मोठा व्यक्ती जसा राजा असतो. तसाच सृष्टीचा सर्वात मोठा व्यक्ती हा देव असतो. जो सृष्टी निर्माण करतो. परंतु त्या देवापेक्षाही मोठा असतो मार्गदाता. जो एक साहित्यीक असतो. जो मार्गदर्शन पर बोध लिहून ठेवतो वहीच्या पानावर. जो देवाचं अस्तित्व कसं असतं, जो देवाची रचना कशी असते. हे लिहून ठेवतो. साहित्यीक हा प्रेरणा देण्याचं काम करतो. तो लोकांमध्ये उत्सुकता भरतो. एवढंच नाही तर त्या उत्सुकतेच्या भरवशावर त्याच्या कक्षात येणाऱ्या इतर जीवांना काम करण्याची उर्मी येते व ते जीवं नव्या उमेदीनं काम करीत असतात. आपण पाहिले आहे भारत स्वतंत्र होण्यापुर्वीचा इतिहास. त्या काळात प्रत्येक भारतीयांना मनामनात क्रांतीचे रणशिंग हे एका साहित्यीकानं फुंकले. त्यासाठी त्यानं शायऱ्या लिहिल्या. कविता लिहिल्या. तो लढला. प्रत्यक्षात तलवारीनं जरी तो लढला नसेल तरी शब्दानं लढला. शब्द ही ताकद ठरली त्याची. शब्द हे तलवार ठरले. आपल्याला माहीतच असेल की वंदेमातरम नावाच्या एका गीतानं किती खळबळ उडवून दिली होती. ज्यातून इतरांना प्रेरणाच मिळाली. तो काळ व त्या काळात साहित्यीक हा शाहीर बनून लढला. कवी बनून लढला. एक लेखक बनून लढला. याबाबतीत एक उदाहरण. पृथ्वीराज चव्हाणला आंधळे केल्यानंतरही त्यानं शब्दभेदी बाण मारुन घोरीला पाडलं. ही आहे शब्दात ताकद. पृथ्वीराज चव्हाणला आंधळं केल्यानंतर त्यांच्या काळात होवून गेलेल्या प्रसिद्ध कवी चंदवरदाईनं ही कविता महाराज पृथ्वीराज चव्हाणला ऐकवली व त्याच कवितेचा अर्थ लावून पृथ्वीराज चव्हाणने बाण मारला. जो मोहम्मद घोरीच्या मस्तकाला लागला. ज्यातून मोहम्मद घोरी मरण पावला. चंदवरदाई प्रत्यक्षात लढला नाही घोरीशी. परंतु त्याच्यामुळेच मोहम्मद घोरी मरण पावला. हे पाहून चंदवरदाईलाही कैद केलं व त्याची हत्या केली. पुढं संभाजीच्या काळातही तेच घडलं. संभाजीच्या खांद्याला खांदा लावून असलेला त्याचाच एक सोबती कवी कलश, त्याचीही औरंगजेबानं तो कविता म्हणतो म्हणून जीभ कापली. एवढंच नाही तर त्याचीही संभाजीसारखीच क्रूर हत्या केली. प्रत्येक साहित्यीक हा सैनिक असतोच. असं म्हटल्यास आजच्या काळात लोकांना साहित्यीकांबद्दल आतिशयोक्ती वाटल्यासारखीच राहणार नाही. परंतु ते खरं आहे. कारण सैनिक ज्याप्रमाणे युद्धभुमीवर लढत असतो. तो जर नसेल तर देशातील जनता ही सुरक्षीतपणे श्वास घेवू शकत नाही. तसंच साहित्यीकांच्याही बाबतीत सांगता येतं. साहित्यीकही समाजाचा आरसा असून तोही समाजातील अंतर्गत असलेल्या समस्येशी पत्रकार बनून लढा देतो. समाजात पसरलेला अंधाधूंदपणा तो आपल्या लेखनीनं दूर करतो नव्हे तर लोकांना न्याय मिळवून देतो. साहित्यीकांचे अनेक प्रकार आहेत. त्याला कवी, लेखक, शाहीर, नकलाकार, चित्रकार, कादंबरीकार, पत्रकार, वार्ताहर, संपादक, प्रकाशक, समीक्षक, नाटककार, पटकथाकार अशा वेगवेगळ्या नावानं ओळखलं जातं. याचाच अर्थ असा की जो लिहितो, रेखाटतो वा लेखन करुन नवनिर्मिती करतो, त्यालाच साहित्यीक असं नाव आहे. त्याला अनेक कला येत असतात. जसे, त्याला एक शब्द सुचला की त्या एका शब्दावरुन एक कादंबरी लिहू शकतो. ज्याला कादंबरीकार म्हणतात. तसाच तो एका संबंध पुस्तकांचा अर्थ दोन किंवा चार ओळीत सांगू शकतो. ज्याला चारोळीकार म्हणतात. तसाच तो एकादा दिर्घ प्रसंग संवादातून सांगत असतो. त्याला पटकथाकार वा नाटककार म्हणतात. तो एका लेखकाच्या संबंध पुस्तकाची जाहिरात करु शकतो. ज्याला प्रकाशक म्हणतात आणि अनेक लेखकाच्या लेखकाची जाहिरात करतो, त्याला संपादक म्हणतात. एवढंच नाही तर तो जर त्या पुस्तकात जे लिहिलं आहे. त्यातील गुणदोष काढतो. त्याला समीक्षक म्हणतात. साहित्यीकांचे कार्य हे सैनिकांसारखे असते. समाजात जेव्हा विपरीत परिस्थिती निर्माण होते. तेव्हा त्या विपरीत परिस्थितीचा साहित्यीक व्यक्ती अभ्यास करतो व ती विपरीत परिस्थिती आपल्यातील कौशल्य वापरुन लिहितो. ती बाब शासनाच्या लक्षात आणून देतो व त्या परिस्थितीवर विजय मिळवून देतो. म्हणूनच तो सैनिक ठरतो. तसेच सैनिक जसा युद्धभुमी कशी आहे. हे लढतांना विचार करीत नाही. कधी कधी युद्ध सांगून येत नाही. कधीकधी युद्ध हे वाळवंटात होते की ज्या ठिकाणी रेताड भाग असतो. सतत वावटळ उठत असतात. वरुन सुर्य आग ओकत असतो. प्यायलाही पुरेसे पाणी मिळत नाही. तसंच कधी त्या वावटळ उठलेल्या रेताड जागेत वावटळाच्या साहाय्याने केव्हा मृत्यू होईल हे सैनिकाला माहीत नसतं. तसंच कधी युद्ध पर्वतीय जंगलाच्या भागात होतं की ज्या भागात शत्रू सैनिकांच्या हातून मरण न येता एखाद्यावेळेस एखाद्या जंगली प्राण्यांच्या हिंसक आक्रमणानं मृत्यू येतो, तर कधी पर्वतात युद्ध करीत असतांना सतत धावपळीनं श्वास थांबल्यानं मृत्यू येतो. कधी एखाद्यावेळेस बर्फात दबल्यानं मृत्यू येतो. एका सैनिकाला असं कधीच म्हणता येत नाही की अमुक अमुक भागात बर्फ आहे. मला तो सहन होत नाही. मी तिथं जात नाही किंवा अमुक अमुक भागात रेताड भाग आहे. मला ऊन सहन होत नाही वा पर्वतीय प्रदेशात पर्वताची चढण होत नाही वा जंगली प्राण्यांची भीती वाटते. मी तिथं जात नाही. हे कोणत्याच सैनिकांचं म्हणणं नसतं. व्यतिरिक्त सर्व सैनिक, त्यांना कुठंही पाठवा, ते अगदी आनंदानं जायला तयार होतात. त्यांना ऊन, वारा, वादळ, पाऊस, पूर, भूकंप, त्सुत्सामी, पर्वत चढणे, उतरणे, हिंस्र श्वापद, बर्फाळ भागात काम करणे, रेताड प्रदेशात काम करणे. या कोणत्याच विषयाची भीती नसते. तसंच साहित्यीकांचंही काम आहे. साहित्यीकही समाजात उद्रभवलेल्या कोणत्याच भयावह परिस्थितीला घाबरत नाही. युद्धादरम्यान टिपले जाणारे प्रसंग, तिथं जावून नोंद करुन टिपतो. तसंच ते वर्णन, तो साहित्यीक नोंद करुन लोकांना दिशा देण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून लोकांसाठी उपलब्ध करुन देतो. त्यावेळेस त्याला एखादा बॉंबगोळा डोक्यावर पडून त्यात अंत होण्याची भीती असते. तरीही तो ते कार्य करीत असतो. एखादं आंदोलन असो वा एखादा भुकंप देशात आलेला असो. एखाद्या ठिकाणी भुस्खलन झालेलं असो वा एखाद्या ठिकाणी पूर आलेला असो. देशात कुठे आंतकवादी हमला झालेला असो, कुठे खुन झालेला असो वा न्यायालयातून कुणी बा इज्जत बळी पडत असो, साहित्यीक हा जळी, स्थळी, पाताळीही असतोच. म्हणतात की जिथे रवी पोहोचत नाही. तिथं कवी पोहोचतो. असा असतो साहित्यीक. साहित्यीक कुठेही आपला जीव धोक्यात टाकून जात असतो. ज्याप्रमाणे सैनिक जात असतो. तसाच साहित्यीकांना वेळेचं बंधन नसतंच. तो अहोरात्र काम करीत असतो. जसा सैनिक करीत असतो. विशेष म्हणजे सैनिक ज्याप्रमाणे आपल्या देशाच्या कल्याणासाठी कार्य करतो. तसेच कार्य एक साहित्यीकही करीत असतो. जसा सैनिक देशाची सेवा करतो. तशीच सेवा साहित्यीकही करतो. परंतु खेद असा की सैनिकांना त्यांच्या कामाच्या मोबदल्यात फुल नाही फुलाच्या पाकळीच्या स्वरुपात वेतन तरी मिळतं. मात्र साहित्यीकांना तसं काहीच मिळत नाही. तरीही तो विनामुल्य देशाची आपल्या लेखनीनं सेवा करीत असतो. मोबदला घेतच नाही. तो होता म्हणून इतिहास आपल्याला माहीत झाला. तो होता म्हणूनच देव, दानव आपल्याला माहिती झाले. कारण त्यानंच तशा स्वरुपाच्या नोंदी करुन ठेवल्या. ज्या आपण आजही वाचू शकतो. तो जर नसता तर आजही आपण अशा सखोल स्वरुपाच्या ज्ञानापासून अनभिज्ञ असतो. महत्वाचं सांगायचं झाल्यास साहित्यीक हा सैनिकच आहे लढणारा. प्रसंगी तो तलवारीनं लढत नाही. परंतु शब्दानं तर लढतो. त्यानं लिहून ठेवलेलं ज्ञान अमर स्वरुपाचं असतं आणि त्या साहित्यकृतीसोबत तोही अमर होतोच. जसं, रामायण, महाभारत व तत्सम ग्रंथ आणि ते लिहिणारे महर्षी वाल्मिकी व वेद व्यास व इतर सर्व लेखन करणारे लेखक कवी. त्यातच असे बरेच साहित्यीक आहेत की ज्यांची नाव लिहितांना वहीची पानं कमी पडतील. खरं तर अशा साहित्यीकांची आजपर्यंत उपेक्षाच होत आली. प्रत्येक काळात आणि युगातही. तो सैनिक म्हणून लढत असला तरी त्याच्या लेखनीला भाव मिळाला. परंतु त्याला पाहिजे त्या प्रमाणात भावच मिळालेला नाही. विशेष म्हणजे साहित्यीकांची ही उपेक्षा लक्षात घेवून जर सरकारनं प्रत्येक साहित्यीकांस मानधन सुरु केलं तर त्यालाही बरं वाटेल व त्याला खऱ्या स्वरुपात न्याय मिळाल्याचे समाधान त्याला प्राप्त होईल यात शंका नाही. साहित्यीक हे असे व्यक्तिमत्त्व आहे की जे इतिहास लेखन करतात. सृष्टी कशी निर्माण झाली ते दाखवतात. सुर्य कसा, चंद्र कसा, ब्रम्हांड कसे निर्माण झाले? याबाबतीत लिहितात, सांगतात आणि मांडतातही. महत्वपुर्ण बाब ही लक्षात घेण्यासारखी आहे की जगात राजाला जरी सर्वात मोठे वा देवाला जरी सर्वात मोठे मानले गेले असले तरी सर्वात मोठे असतात साहित्यीकच. कारण साहित्यीक हेच सृष्टीचे रचियते असतात नव्हे तर राजांचंही अस्तित्व शाबूत ठेवतात. ते जर नसतील तर इतिहास लिहिला जाणार नाही. राजाला कोणी ओळखणार नाही. राजा कसा होता, हे समजणार नाही. तसंच ते जर नसते तरही कोणी राजाला आज ओळखलं नसतं आणि देवालाही कोणी ओळखलं नसतं. तसेच तेच खरे मार्गदातेही ठरतात. यातही शंका नाही. परंतु हे जरी खरं असलं तरी शिल्पकार व देव हे श्रेष्ठत्वाच्या दृष्टीकोनातून गौण ठरत नाहीत. तेही तेवढेच श्रेष्ठ व मोठे आहेत. शिल्पकार व साहित्यिकाला मानाचा दर्जा देत लखनसिंहानं साहित्य लेखनाची सुरुवात केली. त्याला वाटत होतं की जगात सर्वात मोठा जर कोणी असेल तर तो साहित्यीक. कारण तोच नोंद ठेवत असतो. नेमका त्या काळात कोणता राजा झाला, कोणता नाही. तोच देवाचं अस्तित्व लिहून ठेवतो. साहेबसिहच्या बोलण्यावरुन त्यानं साहित्यीक बनायचं ठरवलं. त्यामागं मोठेपण हा दागीणा नव्हता. कारण मोठेपण मानून घेतल्यानं आपल्या मनात अहंकार निर्माण होतो, हे त्याला माहीतच होतं. तो साहित्यीक बनणार होता. कारण त्याला समाजाला न्याय मिळवून द्यायचे होते. त्याला साहित्यीकच बनायचे होते. कारण समाज सैनिकांना जास्त प्रमाणात भावच देत नव्हता. त्याला वाटत होतं की जो सैनिक रात्रंदिवस जागली करुन देशाची सेवा करतो. देशातील जनता सुखानं झोपते. त्या सैनिकांची देशात उपेक्षा केली जाते. ही त्याचेसाठी परवडणारी गोष्ट नव्हती. त्यामुळंच की काय, त्यानं साहित्यीक बनायचं ठरवलं. तशी त्याची लेखनीही सळसळतच होती. अशातच तो एक दिवस उजळला. त्या दिवशी त्यानं लेखनी हातात घेतली व जीवनाचे अनुभव लिहू लागला होता. अशातच उतरत गेले ते शब्द. जे त्याच्याच अनुभवाचे बोल होते. ज्यात त्यानं केलेलं युद्ध, त्याचं वर्णन, त्यांच्या महत्वाकांक्षा, त्याची मदत आणि शेवटी लिहिला त्यानं देहदानाचा संकल्प. कदाचित लोकांना वाटायला हवं की एक सैनिक, हा दानी असतो. तो फक्त दान करतो आणि दानासाठीच जगतो.******************१५********************** लखनसिंह पुस्तकं लिहू लागला होता. त्याच्या पुस्तकानं वलय पकडलं होतं. तसं पाहिल्यास त्या पुस्तकाची पहिली वाचक होती शिवंण्या. ती ते पुस्तक वाचायची व त्याला त्या पुस्तकावर मार्गदर्शन करायची. हे बरेचदा घडलं होतं. ज्यातून तो उभारत चालला होता. त्याला वाटत होतं की साहित्यीकच जगात सर्वात मोठा असतो. मात्र अशातच तो काळा दिवस उजळला. सकाळ झाली होती. शिवंण्याची प्रकृती बरेच दिवसांपासून खराब होती. ती आजपर्यंत जीवंत होती. परंतु आज काळ आला होता व काळ आज तिचीच वाट पाहात होता. सकाळ झाली होती. तसं आज तिला कासावीसच वाटत होतं सकाळपासूनच. श्वास घ्यायला अडचण येवू लागली. मग काय, हळूहळू तिचा श्वास वाढला व बस ती वेळ आली. ती म्हणाली, "लखनराव, मेजर लखनसिंह. आता मी काही वाचू शकत नाही. काळ मला बोलावतंय. मला जावंच लागेल." ते तिचं बोलणं. तो तिच्याकडेच पाहात होता. त्यातच त्याच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. विचार आला की ही गेल्यावर माझं कसं होईल? मी हिच्याशिवाय जगू शकेल काय? लखनसिंहाला स्वतःची मुलं नव्हती. ना ही तो आपल्या पाल्य कन्येच्या घरी राहात होता. ना ही तो कुणात राहात होता. ना ही तो कुणात राहू शकत होता. तसा तो बराच स्वाभिमानी होता. त्यानं सैन्यात असतांनाही कोणाची वटवट कधी ऐकली नव्हती. प्रामाणिक असल्यानं कोणाची गिजबीज ऐकायला त्याचेजवळ वेळही नव्हता. तो लखनसिंह व त्या लखनसिंहाच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागताच त्याला आठवायला लागला होता तो काळ. ज्या काळापासून शिवंण्या त्याच्या सोबत होती. ती त्याचेवर प्रेम करीत होती आणि तोही तिच्यावर प्रेम करु लागला होता. त्या त्याच्या अश्रुधारा. त्यातच एक जोराचा धसका आला तिला व क्षणातच डोळ्याची पापणी लवते न लवते तिचे अंग फडफडायला लागले व क्षणातच ती गतप्राण झाली. शिवंण्या मरण पावली होती. आज ती जगात नव्हती. तो आता एकाकी झाला होता. तशी त्याला तिच्या मृत्यूची पुष्टी झाली नाही. परंतु वृद्धाश्रम प्रशासनानं त्याला तिच्या मृत्यूची पुष्टी करुन दिली व कळलं की ती मरण पावलेली आहे. लखनसिंह व शिवंण्या. एकमेकांवर प्रेम करणारे गृहस्थ. कालांतरानं ते वृद्धाश्रमात आले. तिथंच ते कायमचे राहू लागले. त्यातच सैनिक हा महत्वाचा असतो. तो दानच करीत असतो. हे दाखविण्यासाठी लखनसिंहानं जेव्हा आपलं शरीर दान केलं. तेव्हा त्यानं शिवंण्यालाही तिचं शरीर दान करायला लावलं होतं व त्याच्याच पावलावर पाऊल टाकून शिवंण्यानंही आपलं शरीर दान केलं होतं. शिवंण्या जेव्हा मरण पावली व तिच्या मृत्यूची पुष्टी जेव्हा त्याला झाली. तेव्हा तिच्या मृत्यूची बातमी त्यानं स्वतः व्हायरल केली. त्यावेळेस तिच्या प्रेताच्या अंत्यविधीसाठी लोकांची रिघ लागली. लोकं वृद्धाश्रमात येवू लागले होते. लोकांची ती वृद्धाश्रमात लागलेली रिघ. परंतु जेव्हा लोकांना तिच्या प्रेताचा अंत्यविधी नाही हे कळलं. तेव्हा लोकं तिच्या पार्थिवावर फुल वाहून निघून जावू लागले. त्यातच कोणीतरी म्हणू लागलं होतं की अंत्यविधी असता तर बरं झालं असतं. तिचा तो अंत्यविधी. संपुर्ण शरीर दान दिल्यानं डोळे रात्रीच काढून नेले होते व आता शरीर बाकी राहिलं होतं. ते नेण्यासाठी गाडी आली होती. थोड्याच वेळात गाडीमध्ये प्रेत टाकलं गेलं व गाडी हॉस्पिटलकडे रवाना झाली. मात्र ती रवाना होत असतांना लखनसिंहाच्या डोळ्यात अश्रू होते. ती शिवंण्या होती की जिनं केवळ लखनसिंहाला मेजरच नाही तर त्याच्या सुखदुःखात ती सहभागी झाली होती नव्हे तर तिनं लखनसिंहच्या भावाच्या मुलींनाही आपल्या मुलागत सांभाळून आदर्शपणाचं उदाहरण दिलं होतं. शिवाय त्यांच्याकडून कोणतीच अपेक्षा ठेवली नव्हती. जेव्हा वय झालं. तेव्हा त्यांच्याकडे ओझं बनून न राहता ते दांपत्य वृद्धाश्रमात राहायला आले होते. शिवंण्याचा अंत्यविधी आटोपला होता. आता लखनसिंह निव्वळच एकाकी झाला होता. त्याला ठेवायला त्याचे आप्त आर्जव करीत होते. परंतु त्यानं लगेच वृद्धाश्रम सोडलं नाही. काही दिवस तो तिथंच राहिला. अशातच काही दिवस गेले. त्याला करमेनासं झालं व तो आपल्या एका आप्ताच्या घरी गेला. ते त्याच्या आप्ताचं घर. तो आप्ताकडे राहायला गेला. परंतु त्याचं मन तिथंही रमत नव्हतं. सारखी तिचीच आठवण येत होती. तसा तो तिच्याच आठवणीनं मानसिकरित्या आजारी पडला. त्याला तीच दिसत असे व वाटत असे की ती वृद्धाश्रमातच वावरते. ती मला दिसेल. मला तिला भेटायचंय. ते त्याचं विचार करणं. शिवंण्या मला आवाज देते म्हणणं. शिवंण्या वृद्धाश्रमातच वावरते म्हणणं. ते वारंवार आप्ताला सांगणं. एखाद्या बाळबोध लेकरासारखं लखनसिंहचं बोलणं. त्यातच घरात होणारी किरकीर. शेवटी आप्त त्याच्या बोलण्यानं तंग झाले होते. ते त्याचेवर ओरडायचे. त्यातच त्यालाही वाटायला लागलं होतं की आपण वृद्धाश्रमातच जावं. तिथंच राहावं. तिथंच शिवंण्याला भेटावं. आयुष्यातील काही क्षणाचा तिथंच श्वास घ्यावा. मेजर लखनसिंह आता वृद्धाश्रमातच आला होता राहायला. त्याला तिथं आता करमायला लागलं होतं. परंतु कधीकधी तो तिथंच व्यथीतही होत असे. जेव्हा त्याला तिची आठवण यायची. जीव अगदी कासावीस वाटायचा. वाटायचं शिवंण्या आज जगात असती तर....... तिच्याशी बोललो असतो. जसे पुर्वी बोलत होतो. एकमेकांचे दुःख शेअर करीत होतो. चिमणीच्या जोडप्यागत किलबिलाट करुन राहात होतो. शेवटी तो त्याचा विचार. तो आप्ताचं घर सोडून शेवटी वृद्धाश्रमातच आला. तिथं राहू लागला. स्वप्नात येणाऱ्या शिवंण्याशी बोलू लागला. मनात तिला वास्तविक भेटण्याची तीव्र इच्छा असायची. वाटायचं की असं एकाकी जगण्यापेक्षा जर मीही मरण पावलो तर बरं होईल. तशी त्याच्या मनात तीव्र इच्छा होतीच. आज प्रेमदिवस होता व लोकं त्याला व्हॅलेंटाइन डे म्हणत असत. त्या दिवशी लोकं आपल्या प्रेयसीला गुलाब देत असत व आपल्या प्रेमाचा इजहार करीत असत. तसं त्याचं प्रेम अमर होतं, शिवंण्याशी झालेलं. शिवंण्या आवाज देते. तीन महिन्यापासून नित्य नेमानं त्यांचं बोलणं. तसं पाहिल्यास त्यांचं शिवंण्यावर निरतिशय प्रेम होतं. त्या प्रेमाखातर तो जगत होता. तसा तो आपल्या नातेवाईकाच्या घरी राहात होता आणि सुखात होता. परंतु जेव्हा प्रेम दिवस जवळ येत होता. त्या प्रेमाच्या दिवसाला तीन महिने अवधी होता. त्याही पुर्वी शिवंण्याची आठवण आली व शिवंण्याला भेटण्यासाठी त्यांचं मन ओढ घेवू लागलं होतं व तो परत पुन्हा वृद्धाश्रमात आला. शिवंण्या आता जगात नव्हती. ती केव्हाच देवाघरी निघून गेली होती. तिच्या आठवणी उरल्या होत्या आणि तिची दोनचार कामंही उरली होती. शिवंण्या मरण पावली होती. तिची काही कामं उरली होती. त्यातच तिची उरलेली कामं करण्यासाठी देवानं त्यांना अवनीवरच ठेवलं होतं. तसं पाहिल्यास शिवंण्यापेक्षा तो वयानं मोठाच होता. शिवंण्या मरण पावली होती. तरीही ती दिसत होती त्याला. ती अमर झाली होती. तिचं निशान नव्हतं. तरीही तिचं अस्तित्व जाणवत होतं त्याला. तोच तो प्रेमदिवस उजळला. तो प्रेमदिवस, ज्याला आपण व्हॅलेंटाइन दिवस म्हणतो. तसं पाहिल्यास दोनचार दिवसांपासून त्यांना अस्वस्थ वाटत होतं. आज जास्तच अस्वस्थ वाटत होतं. शिवण्याला भेटण्याची हूरहूर लागली होती. अशातच ती वेळ उजडली. ती वेळ व त्याच वेळेची तो बऱ्याच वेळेपासून वाट पाहात होता. ती वेळ. तो झोपला होता. गाढ झोपेत होता. तोच तिथं शिवंण्याचं आगमण झालं. जी एक वर्षापुर्वी मरण पावली होती. ती त्याच्या पुढ्यात आली. म्हणाली, 'नाथ, आपणाला मी भेटायला आलीय. आज व्हॅलेंटाइन दिवस आहे. आज आपल्याला फिरायला जायचंय. परंतु आज फिरायला पृथ्वीवर नाही, तर स्वर्गात फिरायला जायचंय.' ती पुढ्यात आलेली शिवंण्या. ते स्वप्न आहे की वास्तविकता हे त्यालाही माहीत नव्हतंच. ती येताच दोनचार गोष्टी तो तिच्याशी बोलला. म्हणाला, 'मला तुझी फार आठवण येत होती. परंतु मी अभागी. मी तुला भेटायला आतूर जरी असलो तरी येवू शकत नव्हतो. कारण तुझी बरीच कामं मागं राहिली होती, तू गेल्यानंतर. ती करायची होती. ती करणं भाग होतं. त्यामुळं मला तुला भेटायला येणं शक्य नव्हतं. परंतु आता तुझ्या पश्चात तुझी उरलेली सर्व कामं झालेली आहेत. आता मी तुझ्यासोबत फिरायला येण्यास तयार आहे.' ते तिचं म्हणणं. तोच त्याचे डोळे उघडले. तसे डोळे उघडताच शिवंण्या त्याला त्याच्या समोर दिसली नाही. तसं क्षणभर वाटलं. वाटलं की ही शिवंण्या नव्हती. ती स्वप्नात आली होती. लखननं डोळे उघडले व त्याची झोपही उघडली. सकाळ अद्याप झाली नव्हतीच. रात्रीचे तीन वाजले होते. तहान जाणवत होती. तसं त्याच्याजवळ कोणीच नसल्यानं व त्याला उठताही येत नसल्यानं पाणीही घेता येत नव्हतं. तरीही कसाबसा करुन तो संपुर्ण ताकद लावून तो उठला. ग्लासात असलेलं पाणी त्यानं हातात घेतलं. त्यातील दोन घोट पाणी प्यायल्यावर ते ग्लास तसंच ठेवलं. तसा हुंदका भरुन आला. त्याचाही श्वास शिवंण्यासारखाच दाटला. मग काय, त्याच्यासमोर आता प्रत्यक्षात शिवंण्याची आकृती दिसायला लागली. म्हणत होती, 'चला. आज व्हॅलेंटाइन दिवस आहे. मी तुम्हाला न्यायला आलोय.' ती बोललीय. तसा तिनं आपला एक हात पुढे केला. म्हणाली, 'नाथ, आता पुरं झालं. आता तुमची पुरती कामंही झालेली आहेत. आता चलाच तर...... बोट पकडा. मी व्यवस्थितपणे नेतोय तुम्हाला स्वर्गात. कुठेच भटकायची गरज नाही.' ते तिचं बोलणं. त्यानंतर त्यानं तिच्याकडे पाहिलं. त्यातच त्यानं तिचं बोट धरलं. तशी त्याच्या शरीराची हालचाल तीव्र झाली. शरीरात श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला. त्यातच क्षणातच तो गतप्राण झाला. लखनही शिवंण्यासारखाच गतप्राण झाला होता. त्यानंही देहदानाचा संकल्प केला होता. त्यामुळं त्याचेही डोळे काढले गेले होते आणि त्याचंही पार्थीव देहदानासाठी रुग्णालयात नेलं गेलं होतं. लखन आता जगात नव्हता. तो केव्हाच वर गेला होता. त्याच व्हॅलेंटाइन दिवशी. ज्या व्हॅलेंटाइन दिवशी शिवंण्या व लखन दोघंही महाविद्यालयात भेटले होते. त्यातच त्याचे ह्रृदय एकत्र झाले होते. आज लखनच्या मृत्यूनं ते दोघंही व्हॅलेंटाइन दिवशी एकमेकांना भेटले होते. तशी त्याच्या शरीराची हालचाल तीव्र झाली. शरीरात श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला. त्यातच क्षणातच तो गतप्राण झाला. शिवंण्या जेव्हा मरण पावली होती. तेव्हा तिचेही डोळे आणि शरीरातील काही मुख्य अवयव काढले गेले होते. ते अवयव गरजू लोकांना दान दिले गेले होते. तसंच आजही घडलं होतं. आजही मेजर लखनसिंहचे डोळे व ह्रृदय काढण्यात आले होते. ते गरजूंना देण्यात आले होते. त्यांचं शरीर रुग्णालयात दान म्हणून देण्यात आल्यानं त्या शरीरावर विद्यार्थी शिकायला लागले होते. लखन मरण पावला होता. त्यावेळेस जनसागर त्यांच्या अंत्यविधीचं दर्शन घेण्यासाठी गोळा झाला होता. जनसागरातील काही लोकं रडत होते. ज्यांनी ज्यांनी त्यांची मदत घेतली होती. ज्यांना ज्यांना त्यांची मदत झाली होती. आज ते दोघंही जगात नव्हते. परंतु त्यांनी केलेलं दान आज जगात होतं. त्यांचे डोळे आज जगात होते. कोण्या अंधाचा आधार बनून ते डोळे पाहात होते सृष्टीला. दोघांचे दोन दोन डोळे चार लोकांचे आधार बनले होते व तेच डोळे शिवंण्या आणि लखनला शोधत होते माणसांच्या गर्दीत.********************१६******************** क्रोध....... क्रोधामुळं नुकसान होते. असं लखनसिंहचं म्हणणं. त्यासाठी त्यांनी कापडी पिशव्या विकत घेतल्या. त्यावर क्रोधापासून नुकसान होतं. जरा सावध व्हा. असं छापलं होतं त्यानी व ते लोकांना विनामुल्य वाटू लागले होते. एका सैन्यात जे गुण असतात. तेच गुण त्यांच्या अंगी होते. तेच गुण त्यानं आपल्या आयुष्यात आयुष्यभर टिकवले. स्पष्टपणा, शिस्तपणा, नीटनेटकेपणा त्याच्या अंगी होता. तसा तो फार रागीट दिसायचा. परंतु तो वरवर रागीट जरी दिसत असला तरी अंतर्मनातून हसऱ्या स्वभावाचा होता. त्याला विनोद करणं फार आवडत असे आणि बोलतांनाही कधी कुणाला राग येईल असे ते बोलत नव्हते तर बोलतांना हास्य पिकत असे व मनात आलेला कंटाळा दूर जात असे. ते आज जगात नव्हते. परंतु त्यांनी केलेल्या सुधारणा जगात होत्या. त्यांनी राबविलेली देहदान संकल्प योजना जगात होती. तसंच त्यांनी जगलेलं वास्तव जगात होतं. त्यांनी दिवंगत व्यक्तीच्या भावाच्या सर्व मुलांचं पालनपोषण करुनही. त्यांनी त्यांच्याकडून सेवेची अपेक्षा न करणे. प्रसंगी वृद्धाश्रमात राहणे. त्यातच आपलं संपुर्ण जीवन राष्ट्रासाठी अर्पण करणे नव्हे तर आपलं मृत शरीरही रुग्णालयाला बहाल करणं. जणू त्या वृद्धाश्रमात राहिलेले ते दांपत्य वृद्ध लोकांना वास्तव्याचं जगणं शिकवीत होते. जर एखाद्या मुलानं आपली सेवा म्हातारपणी न केल्यास त्यांनी हार मानू नये. हेच त्यांनी शिकविलं होतं सर्व वृद्धांना. तसंच आपण प्राणीमात्रा आणि पक्ष्यांसारखं वागावं. मुलांवर अवलंबून राहू नये. त्यांच्यावर अपेक्षांचं ओझं ठेवू नये. हेही त्यांनी सांगीतलं होतं. देहदानातून ते हेच सांगत होते की दान करा. दान करा, केवळ धनच नाही तर आपले नेत्र आणि शरीरही दान करा. जर तुम्ही शरीर दान कराल तर त्या शरीरावर देशातील लाखो विद्यार्थी शिकतील आणि डॉक्टर बनतील. जर ते शरीर दान केलं नाही तर तेच शरीर उद्या अंत्यविधीत समाप्त होईल. त्याची राख बनेल. जी नदीत प्रवाहीत होईल. ते शरीर नदीत प्रवाहीत झाल्यावर नष्ट होईल. असं सर्वांनीच केलं तर कोणालाही शिकता येणार नाही व कोणीच डॉक्टर बनणार नाही. त्यांनी रक्तदानही बरेचवेळेस केलं होतं आणि आता शरीर दान केलं होतं. त्यातच देहदान करण्याबाबत त्यांनी आपल्या पुस्तकात लिहूनही ठेवलं होतं. ते म्हणत असत. मुलं शिकायला हवी. ती डॉक्टर बनायला हवी. असं तर वाटत असेल तर शरीर दान करायला हवं. आज शिवंण्या व लखन मरण पावले होते. ते या जगात नव्हते. परंतु त्यांनी दान दिलेले डोळे हे जगाचे भविष्य न्याहाळत होते. ते डोळे जीवंत असल्यानं तेच जीवंत आहेत. असं सर्वांना वाटत होतं. कालची अंत्ययात्रा. मेजर लखनसिंहाची अंत्ययात्रा जेव्हा रुग्णालयाकडे रवाना झाली. त्यावेळेस त्याला सलामी देण्यासाठी बंधूकीचे बार उडवले गेले. कुणी श्रद्धांजली म्हणून चक्रही वाहिलं. त्यानंतर सर्वजण आपआपल्या घरी रवाना झाले. तसा दुसरा दिवस उजळला. आज दुसरा दिवस होता. सुर्य कालच्यासारखा आजही उगवला होता. परंतु कालच्या सुर्यात आणि आजच्या सुर्यात थोडासा फरक होता. तो थोडा बदलला होता. आजच्या सुर्यात काहीसं तेज भासत नव्हतं. माणसं बदलली नव्हती. जनसागर काल जसा रस्त्यावरुन चालत होता. तसाच आजही चालतच होता. मेजरच्या जाण्यानं पृथ्वीवरील काहीच बदललं नव्हतं. त्यातच सर्वजण आपआपल्या कामाला लागले होते. काही दिवस गेले. काही दिवसानंतर लोकांना परत मेजरची आठवण आली. त्यांच्या कार्याची आठवण आली. अन् असं जेव्हा घडलं. तेव्हा दोन लोकं पुढं आले. विचार करायला लागले की मेजर लखनसिंहचं अस्तित्व या धरणीवर असावं. जे अस्तित्व कलियुगातील लोकांना शिकवण होईल. कलियुगात असेही दानदाते झाले की त्यांनी आपली संपत्तीच नाही तर आपलं संपुर्ण शरीरही राष्ट्रासाठी अर्पण केलं. लोकांच्या विचारांचा अवकाश. लोकांनी आपलं एक शिष्टमंडळ काढलं. त्याला नाव दिलं. मिशन लखनसिंह. एक दिवस सवड काढून ते शिष्टमंडळ त्याच वृद्धाश्रमात गेले. ज्या वृद्धाश्रमात ते राहात होते. त्यांच्या स्मृती त्या वृद्धाश्रमात होत्या. ज्या स्मृती त्यांच्या अस्तित्वाची साक्ष देत होत्या. ते शिष्टमंडळ वृद्धाश्रमात जाताच त्यांनी वृद्धाश्रम प्राधिकाऱ्यांची भेट घेतली. भेटीदरम्यान त्यांनी लखनसिंहाच्या कमऱ्याची पाहणी केली. कमरा जसाच्या तसा होता. त्यात लखनसिंहच्या अस्तित्वाच्या खुणा होत्या. मग शिष्टमंडळानं वृद्धाश्रम प्रशासनाला विनंती केली. विनंती केली की त्यांनी त्या वृद्धाश्रमातील ते घर राष्ट्रासाठी अर्पण करावं. जेणेकरुन त्या स्थळाला कोणी भेट जर दिली तर त्यांना त्या स्मृतीपासून काहीतरी बोध नक्कीच घेता येईल. तसा प्रस्तावही त्यांना दिला. सुरुवातीला वृद्धाश्रम प्रशासनानं थोडासा नकार दर्शवला. परंतु नंतर त्यांनी आपला होकार दर्शवला. आज त्याच इमारतीच्या समोर लखनसिंह व शिवंण्याचे पुतळे उभारले गेले. जे पुतळे व ते घर लखनसिंह व शिवंण्याच्या अस्तित्वाची साक्ष देत होते. आज ज्या मेजर लखनसिंह व शिवंण्या यांनी आपलं शरीरच नाही तर आपली संपुर्ण मालमत्ता सर्वांना वाटून दिली होती. त्याच मेजर व शिवंण्याच्या अस्तित्वाची साक्ष म्हणून जे पुतळे उभे राहिले होते वृद्धाश्रमात. तेच पुतळे वारंवार लोकांना खुणावत होते की आयुष्य जगावं लखनसिंह सारख्या सैनिकांसारखं आणि शिवंण्यासारख्या प्राध्यापिकेसारखं. ज्यांनी प्राणपणानं सैन्यासारखंच जीवनाशी लढून आयुष्याचं युद्ध लढलं होतं नव्हे तर त्यांनी विजयश्री खेचून आणली होती. त्यांनी आपल्या लेखनीनं साहित्यीक हा सर्व जीवजंतूहून श्रेष्ठ असून तो कधीही मरत नसतो. हे सिद्ध केलं होतं. आज ते जरी मरण पावले असले तरी डोळ्याच्या रुपानं जीवंत असल्यानं आज ते जगात होते आणि पुतळे रुपानंही जीवंत असून कलियुगातील दानविरांच्या शौर्याची गाथा सांगत होते लोकांना. शिवंण्या व मेजर लखनसिंह आज जीवंत नव्हते. परंतु ते दिपस्तंभ झाले होते सुर्यासारखे. त्यांच्यापासून प्रेरणा घेवून आज लोकं स्वतः आपल्या लेकरांना शिक्षण शिकवून मोठे तर करत. शिवाय मोठे करुन आत्मनिर्भरही करीत असत. परंतु त्या मुलांनी आपली सेवा करावी. याची अपेक्षा ते बाळगत नसत व स्वतः आनंदानं वृद्धाश्रमाचा रस्ता पकडत असत. आजची मंडळी त्यांच्यापासूनच प्रेरणा घेवून जसे वृद्धाश्रमाचा मार्ग धरत. तसेच ते आनंदानं वृद्धाश्रमात राहात असत. त्यातच आता ना कुण्या स्नुषेची त्यांच्यासमोर कुरकूर राहायची. ना कोणी मुलंही त्यांच्यावर कुरकूर करीत असत. आज सगळी वृद्ध मंडळी वृद्ध होवूनही अगदी गुण्यागोविंदानं वृद्धाश्रमात राहात असत नव्हे तर आपली स्वप्न साकार करीत असत. जो आनंद लखनसिंह आणि शिवंण्या या जोडप्यामुळं द्विगुणित व वृद्धींगत होत चालला होता.*****************************************************************समाप्त *****************