मेजर या पुस्तकाविषयी मेजर कादंबरी ही वाचकांच्या पुढे ठेवतांना मला अतिशय आनंद होत आहे. ही माझी एकशे अठरावी पुस्तक आहे व ही पुस्तक एका सैनिकावर आधारीत आहे. मेजर...... तो मेजरच होता सैन्यातील. त्याच्या अंगात शिस्त पुरेपूर भिनली होती. त्याला वाटत होतं की युद्ध होवू नये. परंतु युद्ध होणारच होतं. कारण सर्वांमध्ये स्वार्थ कुटकूट भरला होता. मेजरचं कथानक बोलकं कथानक नाही. ते वास्तववादी कथानक आहे. मेजर नावाचा असाही एक व्यक्ती होवून गेला की ज्यानं कलियुगात आपल्या दानाच्या भरवशावर नाव कमावले. आपण द्वापर युगातील कर्णाचं नाव ऐकलंय. त्याचं नाव का घेतलं जातं? त्याचं कारण आहे कर्णाचे शुरपण आणि त्याची दानशुरता. मेजरही त्याच पटीतील. कर्णानं फक्त इंद्राला कवचकुंडलंच दानात दिली. परंतु या कलियुगातील मेजरनं आपलं अख्खं शरीरच दानात दिलं. शिवाय पैसे, मालमत्ता आणि गाडीही, या व्यक्तीनं दानात देवून टाकली. आपल्याजवळ शिल्लक असं काहीच ठेवलं नाही. एक सैनिक असणारा व्यक्ती. आजच्या स्वार्थपणाच्या काळात आपल्याजवळचं सर्वकाही देतो. ही वाखाणण्याजोगीच गोष्ट आहे. परंतु हे जरी खरं असलं तरी हा माणूस उपेक्षीतच राहिला समाजापासून. कारण त्यानं आपल्या प्रसिद्धीची हौसच बाळगली नव्हती. तो दानाच्या कक्षेचं मापदंड करतांना द्वापरयुगातील कर्णापेक्षाही महान होता. कर्णासारखाच शुरवीर असल्यानं त्यानं सैन्यात चांगलं कर्तृत्वाला शोभेल असं कार्य केलं. हवं तर त्यानं आपली प्रसिद्धी केली असती तर तो भारतरत्नच्या लायकीचाही ठरला असता. परंतु त्याला आपली स्वतःची प्रसिद्धी करायची नव्हती. अशा या कर्तृत्ववान पुरुषच नाही तर कलियुगातील महापुरुषाची गोष्ट. मी कादंबरीरुपात आणलेली आहे. हा व्यक्ती काल्पनिक नाही व ना ही ही पुस्तक काल्पनिक आहे. याला वास्तव्याची जोड आहे. पात्रांची नावं तेवढी बदललेली आहेत. पुस्तकाच्या विस्तारासाठी काही भाग काल्पनिक लिहिले गेले आहेत. परंतु ते आपल्याला कळणार नाही. आपण वाचावी व अशा कलियुगातील महान दानशूर व्यक्तीचा इतिहास वाचावा. तो इतिहास आपल्याला आनंद देईलच. व्यतिरिक्त आपल्याला तेवढा बोधही देईल. हे तेवढंच खरं. कदाचित आपल्याला ही पुस्तक आवडल्यास आपण एक फोन अवश्य लावावा ही विनंती. इतिहास महापुरुषच घडवतात व महापुरुष इतिहास घडवितात. एका सत्यावर आधारीत हे कथानक कदाचित आपलं मनोरंजन करेल. असं वाटतं. ही पुस्तक लिहिण्यामागं प्रेरणा त्यांच्या कर्तृत्वाची. बरेच दिवसांपासून ही पुस्तक लिहावी व प्रसिद्ध करावी असं वाटत होतं. परंतु म्हणतात ना की कोणताही व्यक्ती प्रसिद्ध पावायचा असेल तर तो मरणानंतरच पावतो. तेच घडत आहे या पुस्तकरुपाने त्याच्याबद्दलही. जेव्हा मी त्याच्या अंत्यविधीला गेलो. तेव्हा तेथील प्रसंग पाहून वाटलं की या थोर माणसाबद्दल आपण पुस्तक लिहावी व या माणसाला मरणोपरांत का असेना, न्याय मिळवून द्यावा. म्हणूनच लिहित बसलो ही पुस्तक व लिहिण्याचा ओघ एवढा होता की त्याच्या मरणानंतर पंधरा दिवसात लिहून पुर्ण झाली. आपण ही वाचावी. त्या व्यक्तीला समजून घ्यावं. वाटल्यास ही पुस्तक शेअर करावी. जेणेकरुन इतरांनाही त्या व्यक्तीची माहिती होईल. त्यातच आपणाला बोध घेता येईल एवढेच या पुस्तक रुपाने मांडणे आहे. आपला नम्र अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०मेजर (कादंबरी) अंकुश शिंगाडे तो मेजर होता. तो सैन्यात नोकरी करीत होता. त्यानं मोठमोठे पराक्रम गाजवले होते. ज्यामुळं त्याला मेजर पदवी मिळाली होती. त्याला शत्रूंचा राग येत नव्हता. तो काम, क्रोधापासून दूरच होता. परंतु तरीही तो शत्रूंशी लढत असे. ज्यात रक्तपात होत असे. झालेला तो रक्तपात त्याला पाहावासा वाटत नसे. परंतु पर्याय नव्हता. जर युद्ध झालंच तर तो शत्रूंनाही कापून फेकत असे. त्यात तमा बाळगत नव्हता. परंतु युद्ध...... युद्ध हे कोणत्याही देशाच्या सुरक्षेचा आधार नाही. असं त्याला वाटत असे. त्यासाठीच आज तो कापडी पिशव्या घेवून त्यावर क्रोध करु नका. क्रोधापासून नुकसान होतं. असं लिहून शांततेचा प्रसार करीत होता. मेजरला स्पष्ट बोलणं आवडत होतं. त्यातच आवडत होती शिस्त. तसं पाहिल्यास तो एखाद्या दुःखद प्रसंगात विनोद करुन कुणालाही हसवत असे आणि मिशीवर ताव देत म्हणत असे. 'आपण भाडखाऊ सैनिक नाही. इमानदार सैनिक आहोत. आपण आहोत. म्हणूनच देश आहे. आपण नसतो तर देशही नसताच.' ते त्याचं बोलणं. ते बोलणं महत्वाचं होतं आणि त्याचा पेशाही महत्वाचा होता. तसं पाहिल्यास सैन्यात वेगवेगळ्या जातीधर्माचे व वेगवेगळ्या प्रांतातील लोक आले होते. काही लोकं नोकरी मिळत नसल्यानं नोकरीसाठी पर्याय नसल्यानं आले होते. तर काही लोकं गरीब, दारिद्र्य रेषेखालील असल्यानं आले होते. मात्र मेजर हा स्वखुशीनं आला होता सैन्यात. त्याला अगदी लहानपणापासूनच लढाई आवडत होती. परंतु लढाई ही शांततेची आवडत होती. तसा बालपणापासूनच तो शिस्तीत राहायचा व शिस्तीतच वर्तन करीत असायचा. ते पाहून त्याच्या एका शिक्षकानं त्याला सैनिकच बनावं असा सल्ला दिला होता. मेजर आज निवृत्त झाला होता. त्याची पत्नीही आज जीवंत नव्हती. ती केव्हाच मरुन गेली होती. त्यातच त्याला आठवायची त्याची ती पत्नी. त्यासोबतच आठवायचे ते प्रसंग. जे जीवनात त्यानं अनुभवले होते. तो प्रेमदिवस होता व लोकं त्याला व्हॅलेंटाइन डे म्हणत असत. त्या दिवशी लोकं आपल्या प्रेयसीला गुलाब देत असत व आपल्या प्रेमाचा इजहार करीत असत. तसं त्याचं प्रेम अमर होतं, शिवंण्याशी झालेलं. शिवंण्या आवाज देते. तीन महिन्यापासून नित्य नेमानं त्यांचं बोलणं. तसं पाहिल्यास त्यांचं शिवंण्यावर निरतिशय प्रेम होतं. त्या प्रेमाखातर तो जगत होता. तसा तो आपल्या नातेवाईकाच्या घरी राहात होता आणि सुखात होता. परंतु जेव्हा प्रेम दिवस जवळ येत होता. त्या प्रेमाच्या दिवसाला तीन महिने अवधी होता. त्याही पुर्वी शिवंण्याची आठवण आली व शिवंण्याला भेटण्यासाठी त्यांचं मन ओढ घेवू लागलं होतं. शिवंण्या आता जगात नव्हती. ती केव्हाच देवाघरी निघून गेली होती. तिच्या आठवणी उरल्या होत्या आणि तिची दोनचार कामंही उरली होती. शिवंण्या मरण पावली होती. तिची काही कामं उरली होती. त्यातच तिची उरलेली कामं करण्यासाठी देवानं त्यांना अवनीवरच ठेवलं होतं जीवंत. तसं पाहिल्यास शिवंण्यापेक्षा तो वयानं मोठा होता. शिवंण्या मरण पावली होती. तरीही ती दिसत होती त्याला. ती अमर झाली होती. तिचं निशाण नव्हतं. तरीही तिचं अस्तित्व जाणवत होतं त्याला. तोच तो प्रेमदिवस उजळला. तो प्रेमदिवस, ज्याला आपण व्हॅलेंटाइन दिवस म्हणतो. तसं पाहिल्यास दोनचार दिवसांपासून त्याला अस्वस्थ वाटत होतं. आज जास्तच अस्वस्थ वाटत होतं. शिवण्याला भेटण्याची हूरहूर लागली होती. अशातच ती वेळ उजडली. ती वेळ व त्याच वेळेची तो बऱ्याच वेळेपासून वाट पाहात होता. ती वेळ. तो झोपला होता. गाढ झोपेत होता. तोच तिथं शिवंण्याचं आगमण झालं. जी एक वर्षापुर्वी मरण पावली होती. ती त्याच्या पुढ्यात आली. म्हणाली, "नाथ, आपणाला मी भेटायला आलीय. आज व्हॅलेंटाइन दिवस आहे. आज आपल्याला फिरायला जायचंय. परंतु आज फिरायला पृथ्वीवर नाही, तर स्वर्गात फिरायला जायचंय." ती पुढ्यात आलेली शिवंण्या. ते स्वप्न आहे की वास्तविकता हे त्यालाही माहीत नव्हतंच. ती येताच दोनचार गोष्टी तो तिच्याशी बोलला. म्हणाला, "मला तुझी फार आठवण येत होती. परंतु मी अभागी. मी तुला भेटायला आतूर जरी असलो तरी येवू शकत नव्हतो. कारण तुझी बरीच कामं मागं राहिली होती, तू गेल्यानंतर. ती करायची होती. ती करणं भाग होतं. त्यामुळं मला तुला भेटायला येणं शक्य नव्हतं. परंतु आता तुझ्या पश्चात तुझी उरलेली सर्व कामं झालेली आहेत. आता मी तुझ्यासोबत फिरायला येण्यास तयार आहे." ते तिचं म्हणणं. तोच त्याचे डोळे उघडले. तसे डोळे उघडताच शिवंण्या त्याला त्याच्या समोर दिसली नाही. तसं क्षणभर वाटलं. वाटलं की ही शिवंण्या नव्हती. ती स्वप्नात आली होती. डोळे उघडले व झोपही उघडली. तोच त्याला आठवलं ते तरुणपण. ज्या तरुणपणात शिवंण्या त्याला भेटली होती. त्याचं नावंच मुळात लखन होतं. लखन नाव त्याच्या आईवडीलांनी ठेवलेलं. परंतु लोकं त्याला मेजरच म्हणत होते. मेजर नाव हे अगदी लहानपणापासूनच पडलं होतं त्याचं. तो जेव्हा लहान होता. तेव्हा तो मेजरचेच खेळ खेळायचा. त्यासाठी तो लहान लहान मुलांना गोळा करुन ऐटीत आर्डर सोडायचा. जसा तो एखाद्या तुकडीचा मेजरच आहे. तीच शिस्त व तेच संस्कार अगदी लहानपणापासूनच त्याच्यात रुजत चालले होते नव्हे तर रुजले होते.*********************१********************* आज लखन तरुण झाला होता. तो महाविद्यालयात शिकत होता. त्याच महाविद्यालयात शिकत असतांना त्याला एक मुलगी त्याच महाविद्यालयात आलेली दिसली. ती मुलगी अकरावीत नुकतीच प्रवेश घेवून आली होती आणि तो त्याच महाविद्यालयाच्या द्वितीय वर्षाला होता. ज्या महाविद्यालयात एन सी सी नावाचा कॅडेट कोर्स शिकायला मिळत होतं. लखन हा उंच असणारा मुलगा. तशी त्याची शरीरयष्टी चांगली होती व तरुणपणात तो अगदी धिप्पाड दिसायचा. ज्यातून त्याला महाविद्यालयानं एनसीसी मध्ये घेतलं होतं. तसं पाहिल्यास त्याला शिस्तही होती आणि त्याच्यात बालपणापासून संस्कारही कुटकूट भरलेले होते. लखन एनसीसी कॅडेट कोर्समध्ये संचलन करायचा. त्यातच संस्कार स्वतःमध्ये कुटकूट भरलेले असल्यानं तो स्वतः संस्कारानं राहायचा. बाकीच्या एन सी सी मधील मित्रांना त्याच शिस्तीनं व संस्कारानं वागवायचा. ती शिस्त व ते वागणं केवळ एन सी सी शिकण्यापुरतंच मर्यादित नव्हतं. तर ती शिस्त दिवसभरही त्याच्यात दिसायची. तेच पाहिलं शिवंण्यानं व शिवंण्याला तो आवडायला लागला होता. हे त्यालाही माहीत नव्हतं. तसा तो एक दिवस उजळला. लखन मित्रमंडळीत बसला होता. ते महाविद्यालयाचंच मैदान होतं. तोच कोणीतरी मित्र म्हणाला, "लखन, आजकाल तू अतिशय स्मार्ट दिसतोय." "स्मार्ट! नाही रे." ते लखनचं बोलणं. त्यावर तो मित्र म्हणाला, "अरे असं मी नाही म्हणत." "मग कोण म्हणतंय?" तो लखनचा प्रश्न. "अरे ती मुलगी म्हणतेय." "कोणती मुलगी?" "ती अकरावीत आपल्याच महाविद्यालयात प्रवेशीत झालेली मुलगी." "तुला कसं माहीत?" "अरे, काल मी प्रत्यक्ष आपल्या कानानं ऐकलंय." "हो का? अन् केव्हा ऐकलंय आपल्या कानानं?" "काल मी वर्गात अभ्यासिकेला जात असतांना त्या मुलीही जात होत्या अभ्यासिकेला. तेव्हा त्या बोलत होत्या. तेच बोलणं ऐकलं मी." लखनला विचार आला. विचार आला की अशी कोण मुलगी असावी की जी आपल्याबद्दल अशी म्हणत असेल. स्मार्ट वैगेरे दिसते म्हणत असेल. तोच त्यानं पुन्हा प्रश्न केला. "कोण आहे ही मुलगी? मला स्मार्ट आहे असं म्हणणारी. जरा दाखवशील का?" तो लखनचा त्याला प्रश्न. तोच मित्रानं ती मुलगी कोण आहे, हे दाखवायचं वचन दिलं व एक दिवस संधी येताच त्यांनी दुरुनच तिला दाखवलं. तो चेहरा दुरुन का असेना, लखननं लक्षात ठेवला. आता संपर्क साधणं तेवढं बाकी होतं. तशी ती वेळ यायची होती. तो एक दिवस. तो व्हॅलेंटाइनचाच दिवस होता. महाविद्यालय सुरु होतं. सर्व मुलं मुली कॉलेजच्याच मैदानावर व्हॅलेंटाइन दिवस साजरा करीत होते. ज्यांची प्रेयसी आहे ते चांगल्या पोशाखात आले होते व एकमेकांना लाल रंगाचं गुलाबाचं फुल देत होते. काहीजण महाविद्यालयातील कॅटींगमध्ये बसले होते. काही मात्र मैदानावर बसले होते. ज्यांना प्रेयसी नव्हती. लखनही त्याच गटातील मुलगा होता. त्याला प्रेम आवडत होतं. परंतु प्रेमात कुणाचा विश्वासघात करणं आवडत नव्हतं. त्यातच आवडत नव्हता तो प्रेमविवाह. जो आईवडीलांनी जोडलेला नसेल वा ज्याला आईवडीलांची संमती नसेल. अशातच तोही बाकी विद्यार्थ्यांसारखा महाविद्यालयातील मैदानावर बसला होता. तसं पाहिल्यास त्याच्या वर्गातील बरीचशी मुलं ही फिरायला गेली होती, आपल्या आपल्या प्रेयसींना घेवून. महाविद्यालयात असं उपस्थित असणारं कुणीच नव्हतं. असं वाटत होतं की आज महाविद्यालयाला सुट्टीच असावी. त्यातच महाविद्यालयात मुलंच नसल्यानं लखनची तासिकाही झाली नव्हती. अशातच तो महाविद्यालयात मैदानावर बसलेला असतांना एक मुलगी हातात एक गुलाबाचं फुल घेवून त्याच्या पुढ्यात दिसली. म्हणाली, "सर." लखन महाविद्यालयातील मैदानावर एका झाडाखाली खाली मान टाकून बसला होता. त्याच्या मनात विचार होता. आपल्यालाही प्रेयसी असायला हवी होती. परंतु आपण अभागी. आपल्याला अशी प्रेयसी ठेवण्यासाठी घरुन परवानगी नाही. तसे संस्कारही नाही माझ्यात आणि ठेवतोही म्हटले तर आपल्याला कुणीच मुली पसंत करीत नाही. प्रेम व्हायला मुलींना वात्रट वातावरणातील मुलं हवीत. आपण तसे नसेल कदाचित. म्हणूनच कोणत्याच मुलीनं आपल्याला आजवर पसंत केलेलं नाही. लखनचा तो विचार चालला होता मनात. तोच त्याला 'सर' नावाचा शब्द ऐकायला आला. त्यांनं लगेचच वर पाहिलं. तोच त्याचा त्याच्या समोर दिसली ती मुलगी. जिचा चेहरा त्याला एकदा त्याच्या मित्रानं दाखवला होता व सांगीतलं होतं की ती मुलगी त्याला स्वतःला स्मार्ट म्हणतेय. लखननं समोर पाहिलं व तो त्या मुलीला पाहून स्वप्नातच हरवून गेला. कारण तिचं असलेलं सौंदर्य. ती मुलगी म्हणजे नाविण्याचा एक कलाविष्कार होता. तिचे केसं विखूरले होते. त्यातच तिनं आपले केस मोकळे सोडले होते. ती फॅशनच होती त्या काळात बॉपकट केसं ठेवण्याची. त्यातच ते तरुणपण असल्यानं तिचा चेहरा अधिक खुलून दिसत होता. तो तिनं भरजरी पोशाख वापरलेला होता. त्यातच कपाळावरील गंध खुलून दिसत होता. ती मुलगी जशी सुंदर दिसत होती. तसंच सुंदर दिसलं तिच्या हातातील ते गुलाबाचं फुल. जे त्याच्या समोर होतं. लखननं ते सगळं पाहिलं. विचार आला की ही मुलगी कोण असेल, जी आपल्यासमोर गुलाबपुष्प घेवून उभी आहे. सर म्हणत आहे. तोच त्यानं विचारलं. "बोला, काय काम आहे?" "आपल्याला हे फुल द्यायचंय." "का बरं?" "मला आवडतंय असं फुल देणं." "हो, ठीक आहे. परंतु आजपर्यंत नाही आणि आजच का?" "आज त्या फुलाला मान आहे. आजचा दिवस त्याचाच आहे." "हो का?" "होय." "ठीक आहे तर." "घ्या ना फुल." तिनं म्हटलं. तसं त्यानं फुल घेतलं व ते फुल घेत त्यानं तिला तिची माहिती विचारली. म्हटलं, "काय नाव तुमचं?" "शिवंण्या." "कोणत्या वर्षाला शिकता?" "म्हणजे?" "कोणत्या वर्गात आहात म्हटलं?" "अकरावीला." "हे फुल म्हणजे मी काय समजू?" "काहीही समजा." "हो का?" "होय." ती ओशाळली. तशी ती निघून गेली. आजचा दिवस लखनसाठी अतिशय आनंदाचा दिवस होता. ती निघून जाताच त्याला अगदी गुदगुल्या झाल्यासारखं वाटत होतं. वाटत होतं की तिला आपण चहानाश्त्याची पार्टी द्यायला हवी होती. परंतु ते लखनला सुचेल तेव्हा ना. मात्र ती गेल्यानंतर चहा व नाश्त्यावर त्याला पश्चाताप होत होता. ती गेली होती आणि तो प्रेमदिवस होता. परंतु तो प्रेमदिवस असला तरी त्या दिवशी प्रेम जाहीर झालं नाही. तसं तिनं त्याला गुलाबाचं फुल दिलं होतं. परंतु त्यावरुन प्रेम थोडं ना कळत होतं. मात्र त्या गुलाबावरुन त्याच्या मनात जे कुतूहल निर्माण झालं होतं. तेच प्रेम होतं. आता लखन तिच्या प्रेमात पडला होता. सायंकाळ झाली होती. तसा लखन उशिराच महाविद्यालयातून निघाला. आज त्याला घरी जायचीच इच्छा होत नव्हती. सतत तिच आज त्याच्या डोळ्यासमोर तरळत होती. परंतु घरी जाणंही भागच होतं. त्यानं गाडी काढली. तसा तो जायला निघाला. तोच त्याला ती दिसली. वाटलं बोलावं. परंतु हिंमत झाली नाही. तोच ती म्हणाली, "सर, आज आपण गेला नाहीत?" तो तिचा प्रश्न. त्यावर काय उत्तर द्यावं ते त्याला कळलं नाही. तोच काही वेळानं ती परत म्हणाली, "सर, आपण दररोज घरी जाता. परंतु आज आपल्याला उशीर झालेला दिसतोय. काही कारण आहे काय?" "नाही, नाही. अगदी सहज. आज थांबलो होतो. आता निघालोय घराला." ते त्याचं बोलणं. तोच त्यानं सायकलला पायडल मारली व तो निघून गेला. त्यानंतर तिही पायी पायी आपल्या घरी मैत्रीणीसोबत जायला निघाली होती. *********************२******************* लखन रस्त्यानं सायकल चालवत जात होता. तसा त्याच्या मनात विचार आला. विचार आला की मी आज उशिरा निघालोय महाविद्यालयातून. दररोज लवकर निघतोय. परंतु ही गोष्ट तिला कशी माहीत पडली असेल? कदाचित ती माझ्यावर प्रेम तर करीत नसेल ना. म्हणूनच तिला माझ्या बारीकसारीक गोष्टी माहीत असेल. म्हणूनच ती तशी बोलली असेल. लखनच्या मनातील तो विचार. सकाळी फुल देण्याची कृती आणि आताची ती कृती लखनला स्वस्थपणे सायकल चालवू देत नव्हती. ती कृती आज प्रेमदिवशी प्रेम जाहीर करणारी कृती होती. कदाचित त्याच दोन कृतीनं त्याच्या मनात प्रेम निर्माण झालं होतं. लखन घरी पोहोचला होता. त्यानं हातपाय धुतले व लगबगीनं तो अभ्यास करण्याच्या निमित्यानं घरात गेला. त्यानं पुस्तक काढलं. परंतु विचार तोच होता. ज्या कृती आज घडल्या होत्या. तो विचारच करीत होता. तोच आईनं आवाज दिला. "लखू जेवन तयार झालं. जेवायला ये." आईनं जेवनासाठी दिलेला आवाज. तो आवाज ऐकून त्यानं पुस्तक बंद केली व तो जेवायला आला. तो ताटावर बसला आणि एकेक घास पोटात कोंबू लागला. परंतु आज त्याला ते गिळणं अशक्य गोष्ट होती. त्याला जेवन जात नव्हतं. सारखा तिचाच विचार होता. तशी आई म्हणाली, "लखू काय झालं? जेवन का करीत नाहीस तू?" तो आईचा प्रश्न. काय उत्तर द्यावं ते कळत नव्हतं. परंतु उत्तर तर द्यावच लागणार होतं. तोच तो म्हणाला, "आई, आज व्हॅलेंटाइन दिवस होता ना. आम्ही विद्यार्थ्यांनी व्हॅलेंटाइन दिवस साजरा केलाय. पार्टी केलीय शाळेत. म्हणूनच पोट भरल्यासारखं वाटतंय." असं म्हणत तो जास्त जेवन न करता ताटावरुन उठला व तो लगेच अंथरुणावर शिरला. परंतु अंथरुणावर तरी त्याला झोप कशी का येणार. त्याच्या मनात आग लागली होती आणि आता ती आग पसरत चालली होती त्याच्या मनाच्या अंतरंगात. मात्र तिचं खरंच त्याच्यावर प्रेम होतं की निव्वळ एक भास, हे कळायला मार्ग नव्हता. रात्र झाली होती. मात्र लखनला झोप येत नव्हती. त्याचं कारण होतं ती आग. जी आग त्याच्या मनात लागली होती. प्रतिबिंबित झाली होती. काय करावं सूचत नव्हतं. तसा बराच वेळ तो जागा होता आणि बऱ्याच उशिरा त्याला झोप आली होती. सकाळ झाली होती. बाहेर लख्खं सुर्याची किरणं पसरली होती. दिवस उजाडला होता. रात्री उशिरा झोपल्यानं आज जरा झोपेतून उठायला वेळच झाला होता. दररोज ऐकायला येणारा पक्ष्यांचा किलबिलाट आज वेळ झाल्यानं ऐकायला येत नव्हता. त्यातच लगबगीनं तो उठला व लवकरच तयारी करुन तो महाविद्यालयात जायला निघाला. कारण तिला भेटण्याऐवजी तिचा चेहरा पाहणे गरजेचे होते. अन् ते गरजेचे आहे. असं त्याला वाटत होतं. आज तो लवकरच महाविद्यालयात गेला होता. महाविद्यालय सुरुच व्हायचं होतं. तासिकेलाही बराच अवधी होता. परंतु लखन तिथं गेला होता. त्यातच तो तिच्या येणाऱ्या रस्त्यावर तिची वाट पाहात होता. तसा बराच वेळ झाला व बऱ्याच वेळानं ती महाविद्यालयात आली. आज तशी ती साध्याच पोशाखात आली होती. परंतु ती त्याला कालच्या कृतीनं आवडली असल्यानं त्याला सुंदरच वाटत होती. तशी ती त्याला दिसली व ती दिसताच तो तिलाच पाहात राहिला. तशी ती त्याचेकडे न पाहता खाली मान टाकून आपल्या मैत्रीणीसह तासिकेला गेली. दिवसागणिक दिवस जावू लागले होते. आग लागली होती प्रेमाची. प्रेम जाहीर करता येत नव्हतं. दररोज त्याची तीच अवस्था असे. दररोज तो लवकर महाविद्यालयात यायचा व तिची वाट पाहात तिच्या येणाऱ्या मार्गावर उभा राहायचा. ती दिसली व तिचा चेहरा पाहिला की त्याला बरं वाटायचं. मात्र तो तिच्याशी बोलायचा नाही. बोलण्याची हिंमतच व्हायची नाही. तसाच सायंकाळी ती गेल्याशिवाय तोही घरी परतायचा नाही. घरी दारी त्याला तीच आठवायची. अन्नही गोड लागायचं नाही. अन् प्रेमही जाहीर करताच येत नव्हतं. काय करावं सूचत नव्हतं. मात्र त्याचं हे पाहाणं तिच्या मैत्रीणींना कळलं होतं व ते तिची गंमत घेवू लागले होते. अलिकडील काळात जो व्यक्ती सैनिक बनून आपलं रक्षण करतो. तो निवृत्त झाल्यावर आपल्या घरी जेव्हा परत येतो. तेव्हा खरं तर त्याची समाजात इज्जत करायला हवी असते. परंतु तसं घडत नाही. त्याच्याच आजुबाजूचा समाज हा त्यांची हेळसांड करते. त्याला इज्जत प्रदान करत नाही. त्यातच त्याचा सन्मान होत नाही. हे वास्तविक सत्य चित्र आहे. विशेष म्हणजे तो आपल्यासाठी प्राणाची बाजी लावतो ना. मग त्याचाही सन्मान करायला हवंच. कारण तो आहे, म्हणून आपण आहोत. तो जर नसता तर आपण गुलाम असतो आणि गुलामाला कवडीभरही इज्जत नसते. हे आपण मानायला हवे आणि हेच सत्य आहे. सैनिक...... देशाच्या सुरक्षेचे आधारस्तंभ. काय मिळतं त्यांना. वेतन ! किती? तेही भरपूर. म्हणतात की सैनिकांना वेतन भरपूर असतं. परंतु जे वेतन मिळतं ना. ते वेतन त्यांच्या जीवाच्या किंमतीपेक्षा अतिशय अल्प असतं. कारण त्यांना जी ड्युटी करावी लागते. त्या ड्युटीची शाश्वतीच नसते. एकदा का सैनिक घरातून बाहेर पडलाच तर तो परत घरी येईलच. असं वाटत नाही. सैनिकांची ड्युटी तसं पाहिल्यास कोणीच स्वखुशीनं करायला पुढं येत नाहीत. ती नोकरी लोकं मजबुरीनं करतात. कोणी वेतन जास्त आहे, असं समजून नोकरी करतात. कोणी घरची परिस्थिती दयनीय आहे म्हणून नोकरी करतात तर कोणी नोकरीच लागत नाही म्हणून नोकरी करतात. परंतु ही नोकरी करतांना ज्या हालअपेष्टा होतात. त्या असह्य असतात. तो वाळवंटी भाग. ती रेताड भुमी. वरुन सुर्याचं प्रखर ऊन. त्यातच कधी पाण्याचा अभाव. कधी तिथं वादळाची भीती आणि त्या वाहणाऱ्या वावटळानं उडणाऱ्या रेतीनं दबून जाणारं आपलं शरीर. त्यातच कधीही शोध न लागणारं पार्थिव. या सर्व गोष्टी वाळवंटात घडत असतात. तरीही देशाचा सैनिक अशा वाळवंटी प्रदेशात उन्हातान्हाचा त्रास न बाळगता आपली नोकरी इमानीइतबारे करीत असतो. ही झाली वाळवंटी भागातील नोकरी. बर्फाच्छादित भागातही अशीच नोकरी करावी लागते, जीव मुठीत घेवून. तो वरुन पडणारा बर्फ. ती अंगातील रक्त गोठविणारी थंडी. कधी त्या बर्फात कोण दबून पडेल. हे सांगायला पर्याय नसतो. तहान जर लागलीच तर बर्फाशिवाय प्यायला पाणी नसतं. तापमान एवढं शुन्य अंश सेल्सिअस पेक्षा कमी असतं की तिथं बर्फ वितळवून त्याचं पाणी बनवायलाही वेळ लागतो. त्यातच बर्फ वितळल्यानंतर ते पाणी शुद्ध स्वरुपात प्यायला मिळेलच याची शाश्वती नसते. अशा ठिकाणी सैनिक काम करीत असतात. तसं काम करणं कठीण असतं. परंतु उपाय नसतो. तसं पाहिल्यास साऱ्याच ड्युट्या कठीण असतात. सर्वांनाच वाटते की माझी ड्युटी कठीण. परंतु सर्वात कठीण जर ड्युटी असेल तर ती आहे सैनिकांची ड्युटी. समजा बर्फाच्छादित वा रेताड वाळवंटातील भाग सोडला तर बाकी ठिकाणच्याही ड्युट्या करणं सैनिकांसाठी सोपं नसतं. समजा ज्या ठिकाणी बर्फ पडत नसेल, ज्या ठिकाणी रेतीचा भाग नसेल, परंतु जंगलाचा मैदानी जर भाग असेल तर तिथंही धोका संभवतो. तिथं हिंस्र श्वापदांचा धोका असतो. ते हिंस्र प्राणी पाठीमागून हल्ले करतात व सैनिकांना मारुन मोकळे होतात. एक प्रकारचे शत्रू परवडतात की ज्यांचा हमला दिसू तरी शकतो. परंतु हिंस्र श्वापदांचा हमला दिसून पडत नाही. प्रतिकार जरी करतो म्हटलं तरी प्रतिकार करायला पुरेसा वेळच मिळत नाही. हा झाला मैदानी प्रदेशातील जंगलाचा भाग. कधीकधी त्यांची ड्युटी पर्वतीय प्रदेशात लागते. ज्या प्रदेशात हिंस्र प्राण्यांची तर भीती असतेच. व्यतिरिक्त चढण्या उतरण्याचीही कसरत असते. पर्वत चढायला व उतरायला नाकीनव येतं. तरीही ती ड्युटी करावीच लागते. पर्याय नसतो. त्यातच याही ठिकाणी हिंस्र श्वापद जेरीस आणत असतात सैनिकांना. सैनिकांची ड्युटी भयावह स्वरुपाची असते. त्यांना चारही बाजूनं दक्ष राहावं लागतं. ते जर सावध नसतील तर अनर्थ होतो. कधी बंदूकीची गोळी त्यांचा समाचार घेते तर कधी हिंस्र श्वापदं. आपली ड्युटी तेवढी भयावह नाही. तरीही आपण आपल्या ड्युटीला भयावह समजतो. त्यातच कोणी चांगली जर ड्युटी करीत असेल तर त्याच्या ड्युटीमध्ये अडथडा आणत असतो. त्यातच असं दाखवतो की आमचीच नोकरी कठीण आहे. इतरांची नाही. परंतु कधीतरी सैनिकांच्या जीवनात जावून पाहा. कळेल नोकरी म्हणजे काय? नोकरी करणं किती कठीण असतं. विशेष सांगायचं झाल्यास सैनिक हे तलवारीच्या धारेवर चालत असतात नोकरी करतांना. त्यांना दिवस आणि रात्र कोणती ते कळत नाही. याचाच अर्थ असा की त्यांना झोप घ्यायला पुरेशी उसंत मिळत नाही. चोवीस तास सतत पहारा देत राहावं लागतं. त्यातच जेवनही बरोबर पोटात जात नाही. कधी किड्या मुंग्यावरचं जीवन तर कधी झाडाचा पालापाचोळा, कधी जनावरांचं सडलेलं मांस यावर गुजराण करावी लागते. म्हणूनच सैनिक जीवन हे आपण समजून घ्यायला हवे. त्यातच त्यांचा सन्मान जर आपल्याला करणं जमत नाही तर निदान त्यांची आपण हेळसांड तरी करु नये. त्यांनाही सन्मान द्यावा. हे तेवढंच खरं. जेणेकरुन त्यांचं जे आपल्यावर कर्ज झालेलं असेल, ते तरी चुकवता येईल. *******************३********************* शिक्षण वाघिणीचं दूध आहे असं डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. म्हणूनच ते निःशुल्क नाही तर महागडे आहे असंही म्हटलं जातं आणि ते खरंही आहे. मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना तो अर्थ अभिप्रेत नव्हता ना ही त्यांनी तो अर्थ योग्य समजून तसं विधान केलं. परंतु आजच्या काळाचा विचार केल्यास ते वाघिणीचंच दूध भासतं. कारण ज्याप्रमाणे वाघिणीचं दूध सहजासहजी मानव प्राण्यांना उपलब्ध होत नाही. त्याप्रमाणेच शिक्षणाचंही आहे. वाघीणीचं दूध...... वाघिणीचं दूध तसं पाहिल्यास कोणालाच मिळू शकत नाही आणि मिळवायचा प्रयत्न केल्यास आपण स्वतः मिटून जावू अशी अवस्था. तसं शिक्षणाचं आहे. शिक्षणरुपी उच्च शिक्षणाचं बाळकडू गरिबांना मिळू शकत नाही. अन् मिळवायचं झाल्यास उभी हयात निघून जाईल. तरीही मिळत नाही. अशी गरीब घरच्या लोकांची अवस्था. ज्याप्रमाणे वाघिणीचं दूध मिळवितांना कदाचित त्या वाघिणीला बेशुद्ध तरी करावं लागेल. तेव्हाच ते मिळू शकेल. ज्यातून वाघिणच नष्ट होवू शकण्याचं भय असेल. तशीच शिक्षणाचीही अवस्था आजच्या पुढाऱ्यांनी केलेली आहे. आजच्या काळात शिक्षण हे श्रीमंतांची मक्तेदारीच बनत चाललेली असून ज्यांच्याकडे अपार पैसा आहे. तोच उच्च शिक्षण मिळवू शकतो. यातूनच लोकांनी शिक्षणाचा उद्देश हा पैसे कमविणे असा ठेवलेला आहे. अलिकडील काळात दिसतं की शिक्षण हे महागडे झालेले आहे. त्यामुळं आजच्या काळात शिक्षणाची गरज काय? असं कोणालाही वाटू शकते. कारण शिक्षणाचा उद्देश फक्त लोकं उच्च शिक्षण शिकवून पैसे कमविणे असा करतात. स्वतः आपल्या पायावर उभं राहून आत्मनिर्भर होण्याला शिक्षण समजतात. तसं आत्मनिर्भर होणं वा पैसा कमविण्याच्या गोष्टी करण्यासाठी जास्तीच्या शिक्षणाची गरज नाही. तसं पाहिल्यास शिक्षणाचीच गरज नाही. कारण पैसा आणि तोही उच्चतम स्वरुपात एखादा अडाणी असलेला माणूसही कमवू शकतो. मग लोकं शिक्षणाला एवढा भाव का देत असावेत? शिक्षण अन् तेही उच्चतम का शिकत असावेत? त्यासाठी महागडे शिक्षणासाठी असलेले शुल्क का भरत असावेत? कारण जे लोकं आजच्या काळात अज्ञानी असतात. त्यांना अनुभव विपूल असतो. एवढा अनुभव असतो की त्यांनी एखादा उद्योग उभारल्यास त्या कारखान्यात वा उद्योगात कितीतरी शिकलेली मंडळी काम करुन अशा अज्ञानी मालकांना सलाम करीत असतात. म्हणजेच शिक्षण हे श्रीमंत लोकांच्या पायाशी लोळण घेत असतं. शिवाय ज्यांच्याकडे जास्त पैसा. त्याची वस्तीत, परीसरात इज्जतही होत असते. त्याला मानसन्मानही मिळत असतो. असे असतांना शिक्षणाला लोकांनी आपली गरज का समजावी? तर त्याचं उत्तर आहे, शिक्षणाचा होत असलेला फायदा. शिक्षण आणि तेही उच्च शिक्षण शिकण्याचे बरेच फायदे आहेत. कोणाच्या कारखान्यात जरी उच्च शिकलेली मंडळी काम करीत असतील. त्याची कारखान्यात तेवढी इज्जत नसेल, त्यांचा मालक जरी अज्ञानी असेल आणि तो त्याची हेळसांड करीत असेल तरी शिक्षणानं त्याचं कौशल्य एवढं वाढलेलं असतं की तो मालकांच्या दबावात राहात नाही. कारण त्याचं शिक्षण हे त्याला नियमांची माहिती करुन देतं. जी माहिती कमी शिकलेल्या माणसांना नसते. त्यांना नियमांसाठी इतर शिकलेल्या लोकांवर अवलंबून राहावं लागतं. दुसरा महत्वपुर्ण फायदा असा की शिक्षण जर असेल तर तो व्यक्ती जगात कुठेही असला तरी आपली उपजीविका चालवू शकतो. तो संकटातून मार्ग काढू शकतो. वेळप्रसंगी त्याची भीती नष्ट होत असते. तसाच शिक्षणाचा तिसरा फायदा म्हणजे कोणत्याही ठिकाणी चार चौघात आपल्याला टिकून राहायचं असेल तर शिक्षणच उपयोगात येतं. पैसा नाही. शिक्षण जर असेल तर माणूस ताठ मानेनं कुठंही वावरु शकतो. त्याला कुठंच कधीही मान खाली घालून वावरावे लागत नाही. ही वास्तविकता आहे. हाच अर्थ काढला बाबासाहेबांनी. म्हणूनच याच अनुषंगाने बाबासाहेब शिक्षणाला वाघिणीचं दूध समजतात. शिक्षण जर असेल तर माणूस हा नवनवीन काहीतरी शोधून आणत असतं. याचाच अर्थ असा की शिक्षणानं नवनिर्मिती सुद्धा करता येवू शकते. तशी नवनिर्मिती कमी शिकलेल्या वा शिक्षण नसलेल्या माणसांना करताच येत नाही. शिक्षण आजच्या काळात अतिशय मौल्यवान गरज. शिक्षणाचे महत्त्व वर्णित करतांना एक उदाहरण देता येईल. एखाद्यावेळेस एखाद्या गावाला प्रवास करतांना जर एसटीवरील गावाचे नाव वाचणं आपल्याला जमलं नाही तर आपण व्यवस्थित प्रवास करु शकत नाही. कारण ज्याला आपण विचारतो. ते घटक व्यवस्थित पत्ता सांगत नाहीत. एक व्यक्ती असाच पुण्याला गेला असतांना त्याला जिथं जायचं होतं. तेथील एसटी शोधायची होती. परंतु ती एसटी कोणत्या थांब्यावर थांबते हे त्याला कोणीच व्यवस्थित सांगत नव्हतं. तसंच एसटीवर फक्त नंबर लिहिलेले असायचे. त्यामुळंच ती एसटी नेमकी कुठं जाते. तेही कळायला मार्ग नव्हता. तसाच दुसरा प्रसंग असा घडला. त्या प्रसंगात एक व्यक्ती पुण्यालाच असतांना मेट्रोनं जाण्याचा योग आला. परंतु इतर ठिकाणी जशी तिकीट दालनातून काढण्याची सोय असते. ती तिथं नसल्यानं त्याला व्यवस्थीत काढणं जमत नव्हतं. कोणी सांगायलाही तयार नव्हतं. बरं झालं की त्याला शिक्षण होतं. तसं तेथील सुचनेचं लिखाण हे इंग्रजीतून होतं. तद्नंतर काही वेळानं त्यानं व्यवस्थित सुचना वाचल्या व तिकीट काढली. शिक्षण ही काळाची गरजच आहे. आता तर डिजीटल शिक्षण आवश्यक झालं आहे. आता पुणंच नाही तर इतरही प्रांतातही डिजीटल पद्धती जोर पकडू पाहात आहे. शिक्षण असेल आणि आपल्या खिशात एक दमडी जरी नसेल तरी आपली अडवणूक होत नाही. आपण देशाच्या कोणत्याही भागात असलो तरी परत आपल्या घरी सुखरुप येवू शकतो. शिक्षण जर असेल तर कोणी आपल्याला सहजासहजी फसवू शकत नाही. घरादारात परीसरात जेवढी इज्जत श्रीमंतांची असते. तेवढीच इज्जत शिकलेल्या व्यक्तींचीही असते. शिकलेले लोकं हे व्यवसायात यशस्वी होत असतात नव्हे तर ते जीवनातही यशस्वी ठरत असतात. म्हणूनच शिक्षण अनिवार्य गरज ठरत आहे. त्यासाठी लोकं आपल्या पाल्यांना शिकवितात. प्रसंगी शिक्षण महागडं असलं तरी शिक्षण देतात. अलिकडील काळात आपल्या स्थानिक भाषेत लोकं शिकवायला पाहात नाही. शिक्षणासाठी असलेली देशातील विविध राज्यातील त्यांची भाषा ही शोभेची वस्तू ठरलेली आहे. त्यातच इंग्रजी भाषेतील शिक्षणाला महत्व आलेलं आहे. म्हणूनच लोकं प्रसंगी पैसे खर्च करतात आणि कॉन्व्हेंटमध्ये असलेल्या इंग्रजी भाषेतील शिक्षणाला जास्त प्राधान्य देतात. त्याचं कारण आहे त्यांचं मुल व त्याला हवं असलेलं शिक्षण. प्रत्येक पालकांना आज वाटते की माझा मुलगा जर विदेशात गेला किंवा जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात गेला. तरी त्याला तिथं अडचण येवू नये. कारण आता जागतिक दर्जाची भाषा म्हणून राजभाषेला दर्जा नाही. इंग्रजीला दर्जा आहे. त्यासाठीच इंग्रजी भाषेतील शिक्षण जरी महागडे असले तरी ते द्यायला लोकं तयार आहेत. प्रसंगी जेवढे पैसे लागतील तेवढे पैसे मोजायला ते तयार आहेत. यावरुन आपली राजभाषा गौण ठरत नाही. राज्यातील व्यवहार करायचा असेल तर तीच कामात येते. विशेष सांगायचे म्हणजे शिक्षण हे गरजेचे आहे. मग ते कोणत्याही भाषेतील का असेना. आपण शिकलोच नाही आणि कितीही पैसा आपल्याजवळ असेल तरी तो काही कामाचा नसतो. कारण शिक्षण जर नसेल तर तो पैसा कसा सांभाळायचा. तेच आपल्याला कळत नाही. म्हणूनच शिक्षण शिकणं ही काळाची गरज आहे. त्याव्यतिरिक्त दुसरं काही आपल्याजवळ कितीही असेल तरी ते काही कामाचं नाही. बरेच दिवस झाले होते. लखन सैन्यात होता. तसा तो तिथं पत्नी सोडूनच राहात असे. अशातच त्याला आठवले ते महाविद्यालयातील दिवस. त्याच्याच महाविद्यालयातील ती एक मुलगी व आठवला तो महिलादिन. अन् तिनं तद्नंतर केलेलं कृत्य. आज त्याच्याच एका मित्राला महिलादिनी त्याच्याच महाविद्यालयातील एका मुलीनं मारुन टाकलं होतं. लखनला आठवत होतं. तो महिलादिनच होता. त्याच महिलादिनी तिनं त्याला संपविण्याचा विचार केला होता. सर्वत्र ठिकाणी महिला दिनाची रेलचेल होती. लोकं शुभेच्छा देत होते. सर्व महिला भगिनींना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. असं लिहिलं जात होतं. तीच परिस्थिती व्हाट्सअपवर, फेसबुकवर व इंन्ट्राग्रामवरही होती. मेघदूत त्याचं नाव. ती स्वाती नावाची महाविद्यालयातील मैत्रीण. त्याचं स्वातीवर प्रेम होतं निरतिशय. परंतु तिला त्याचेतील कळसुत्री बाहुलेपण हवं होतं. ते त्याच्यात नव्हतं. तो तिचं जास्त ऐकायचा नाही. त्यातच तिचं प्रेम तुटलं. ज्याची परियंती जीवनभर तिच्या मनात राग धुमसण्यात झाली. मेघदूत असाच एक विद्यार्थी. तो हुशार होता. परंतु पअरेम कुणाला होत नाही. त्यालाही झालं. त्यालाही महिलादिनाच्या शुभेच्छा द्यायच्या होत्या. परंतु त्याला महिला आवडत नव्हत्या. त्याचं कारण म्हणजे स्वातीचं वागणं. स्वातीशी त्याचा विवाह झाला होता व तो संसारात रमला होता. मात्र संसारात रमत असतांना त्यानं प्रत्यक्ष तिचा त्रास पाहिला होता. जो त्याला झाला होता. जो त्रास खुद्द त्याच्याच आईलाही झाला होता. तिनं त्याच्या आईला वृद्धाश्रमात टाकलं होतं व स्वतः त्याला गुलामागत वागविण्याचा प्रयत्न करीत होती. वाद होत होते व अशातच एक दिवस वादातून ती घरुन निघून गेली होती. त्यानंतर तिनं आपला दुसरा विवाह करुन टाकला होता. मेघदूतनं आपला विवाह साजरा केला होता. वाटलं होतं की घरी येणारी माझी पत्नी एक महिला असून ती महिला माझी भाग्योदय ठरेल. तसा विचार करणं साहजीकच होतं. कारण आजपर्यंत अशाही इतिहासात बऱ्याच महिला होवून गेल्या होत्या की ज्यांनी आपल्या पतीची अब्रू सांभाळली होती. त्यांना त्रास दिला नव्हता. उलट त्यांच्या उद्धारासाठी प्रयत्न केला होता, नव्हे तर राज्यही सांभाळलं होतं. आज त्याच्यासमोर उभा होता चितोडच्या महाराणीचा इतिहास. ज्या महाराणीचं वर्णन तिच्याच दरबारातील राघवने देशनिकाला झाल्यानंतर अलाउद्दीन खिलजीला केलं होतं. ज्यातून अलाउद्दीन खिलजीच्या मनात तिच्याबद्दल प्रेम निर्माण झालं होतं. परंतु ती कुनजर होती अलाउद्दीन खिलजीची. त्यातच अलाउद्दीन खिलजीनं तिचा पती राजा रतनसिंगला बंदी बनवताच तिनं स्वतःचा जीव धोक्यात घालून त्याला बंदिवासातून सोडवलं नव्हे तर शत्रूच्या हातात न लागता स्वतः जोहार पत्करला होता. तसंच दुसरं उदाहरण त्याच्यासमोर होतं. ते म्हणजे महाराणी ताराबाईचं. जी पती राजारामाच्या मृत्यूनंतर आपल्या अवघ्या चार वर्षाच्या मुलाला राजगादीवर बसवून औरंगजेबाला या महाराष्ट्र भुमीत सळो की पळो करुन सोडलं होतं. स्वतः घोड्यावर बसली. तलवार चालवली व शत्रूला जेरीस आणलं होतं. ज्यातून औरंगजेब याच महाराष्ट्राच्या मातीत धुळीस मिळाला होता. मेघदूतसमोर अशा बर्याच महिला होत्या की ज्यांनी आपल्या पतीची अब्रू राखली होती. परंतु अशाही काही महिला होत्या की ज्यांनी आपल्याच पतीची अब्रू धुळीस मिळवली होती. त्यामुळंच मेघदूत अशा महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा देवू पाहात नव्हता. तो इतिहास. तो काळ गेला होता. ज्या काळात स्वतः महिला जोहार करीत, आपल्या पतीचं निधन झाल्यानंतर. त्याचं कारण होतं, त्यांची अब्रू न जाणं. समाजानं त्यांना वाळीत न टाकणं. इज्जत आणि इभ्रत राहाणं. तो काळ गेला होता आणि आता परीवर्तनशील बदलाचा काळ आला होता. ज्या काळात कालची महिला आज शिरजोर झाली होती. ती पतीची इज्जत करीत नव्हती. त्यातच कोणत्याच पुरुषांची इज्जत करीत नव्हती. भरल्या वस्तीत किंवा बाजारात पतीची वा पुरुषांची, काही गुन्हाही नसतांना धिंड काढत होती. सासू असलेल्या साजस महिलेला त्रास देत होती. त्यातच ती त्यांना वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवत होती. शिवाय पतीलाही ती काही बाही बोलत होती. कारण होतं, अशा पुरुषांनी तिचं कळसुत्री बाहुलं बनून राहावं. ती जशी म्हणेल, तसं वागावं. मेघदूतलाही महिला दिनाच्या शुभेच्छा द्यायच्या होत्या व त्यानं अंततः महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. म्हटलं की महिला असलेल्या सर्व महिला भगीनींना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. कारण काही काही महिला नसतातच. ज्या पुरुषांना कळसुत्री बाहुलं समजून धाकात ठेवतात. त्याच्या मते 'म' अर्थात महान असलेली, 'हि' हिताची असलेली आणि 'ला' संसारच नाही तर सर्व बाबतीत लाभदायक असलेली. परंतु त्या शुभेच्छा काही काही महिलांना आवडल्याच नाहीत. त्याचं कारण होतं त्यांचं वागणं. त्यातच त्याचं महिलांना उद्देशून वात्रटपणे म्हणणं की काही काही महिला नसतातच. ज्या पुरुषांना कळसुत्री बाहुलं समजून धाकात ठेवतात. तेच खुपलं त्या ग्रुपमधील एका महिलेला. जी आपल्या घरात आपल्या पतीसोबत दुर्व्यवहार करीत होती. जी इतरही पुरुषांना कळसुत्रीच बाहुलं समजायची. जी त्याचेवर तरुणपणात प्रेम करायची. जी त्याचीच तरुणपणात पत्नी बनली होती. जिच्या अपेक्षेनं तो बरा वाटायचा, तरुणपणात. परंतु जेव्हा मेघदूत तिच्या विचारसरणीचा निघाला नाही. तेव्हा प्रेम तुटलं विवाह झाल्यानंतरही व राग मनात राहिला. तोही धुमसत धुमसतच. ती महिलादिनाची शुभेच्छा. त्यातच त्या ग्रुपमधून ते सकाळी मेघदूतनं टाकलेले बोल, ते बोल तिचे वाचले जाणं. मग राग. रागाचा भडका एवढा उडाला की तिनं ठरवलं. ठरवलं मेघदूताला संपवणं. मग काय, ती त्याला संपविण्याचाच विचार करु लागली. तशी संधी शोधू लागली. परंतु संधी मिळेना. हे वर्षभर चालत राहिलं. तिनं आपली ओळख न दाखवता त्याचेशी फोनवरच संपर्क साधला. वर्षभर व्हाट्सअपवर बोलणं झालं. मग काय, असाच तोच एक दिवस उजळला. हा दुसऱ्या वर्षातील महिला दिवस. आठ दिवसावर महिलादिन होता. तिनं योजना बनवली. प्रेमाचं नाटक रचलं. आपल्या पतीला त्याच्याबाबत काहीबाही सांगीतलं. तिनं आपल्या पतीलाही कटात सहभागी करुन घेतलं व त्याला भेटायचं ठरवलं. मनात योजना ठरवल्याप्रमाणे तिनं त्याला फोन केला. म्हटलं, "मी अमुक अमुक बोलतेय. माझा विवाह झाला म्हणून काय झालं. माझं आताही तुझ्यावर प्रेम आहे. मला तुला भेटायचं आहे. जरा भेटशील का?" ती तरुणपणातील मेघदूतची पत्नी. महाविद्यालयातील तरुणी, नव्हे तर त्याची प्रेयसी. आज ती पत्नी बनून बोलत नव्हती. तिनं त्याला ओळखही दाखवली नव्हती. त्यातच त्याला तिचा फोन येताच त्यानं होकार दिला. होकारार्थी त्यानं तिला भेटायचं ठरवलं. तशी जागाही ठरली व तो तिला भेटायला गेला. मग काय, त्यांचं बोलणं सुरु झालं. बरेच दिवस झाल्यामुळं तिच्या चेहर्यावर थोडाफार बदल झाला होताच. त्यानं तिला ओळखलंही नाही. अन् बोलता बोलताच तिचं त्याला काहीबाही बोलणं झालं. ज्याची ती वाट पाहात होती. मग काय वाद झाला व वादाचं रुपांतर हत्येत. तो वाद, तिच्यासोबत झालेला. मग काय, तिनं त्याच वादाच्या ठिणगीत स्वतःच्या अस्तनीत लपविलेला चाकू काढला. त्यानंतर ती त्याचेवर सपासप वार करु लागली. परंतु ती महिला. तिची शक्ती क्षीण होती. त्यातच त्यानं प्रतिकार केला व तिच्या हातातील चाकू हिरावला. तोच तिथं लपूनच बसलेला तिचा पती, जो कटात सहभागी होता तिच्या. जो तिच्याच हातचा कळसुत्री बाहुलं होता. तो ताबडतोब तिथं आला व तो बेसावध असतांना त्यानं त्याचेवर मागवून चाकूनेच सपासप वार केला. अशातच रक्तबंबाळ झालेलं शरीर. त्यातून रक्त वाहात गेल्यानं त्याची शक्ती क्षीण झाली व क्षणातच तो गतप्राण झाला. मेघदूत मरण पावला होता. तशी तपासाची चक्र फिरली. सी आय डी तपासातून आरोपींना पोलिसांनी पकडलं व त्यांच्या तोंडून खुनाचं रहस्य उलगडविलं. खुनाचा विषय होता कळसुत्री बाहुलेपण. ज्यातून मेघदूत संपला होता, स्वातीला पृथ्वीवरच सोडून. मेघदूत संपला होता. स्वाती मात्र जीवंत होती. आज स्वाती तुरुंगात खडे फोडत होती. ती शिक्षा भोगत होती, तिनं केलेल्या कर्माची. ज्या महिलादिनी तिनं एका निष्पाप जीवाची हत्या केली होती. ती अशीही महिला होती की जिनं महिला म्हणून जन्म घेवूनही आपलं कर्तव्य निभावलं नव्हतं. तिनं आपल्याच पतीला कळसुत्री बनवण्याच्या नादात सोडलं होतं, नव्हे तर त्याचा अंतही केला होता. त्याचा काहीही गुन्हा नसतांना. आज तिला तिच्याच स्वकर्माचा राग येत होता व तेवढाच पश्चातापही वाटत होता. लखनला ते आठवलं. तसे त्याचे डोळे पानावले. वाटलं की तिच्यामुळं एका पुरुषाचा अनाहूतच जीव गेला. जर औओ सैनिक बनला असता तर....... कदाचित देशाच्या तरी कामात आला असता. ************************४****************** सैन्यात सर्वांनी जायला हवं. परंतु बरीचशी मंडळी सैन्यात जात नाहीत. समजतात की सैनिकांना केव्हा मरण येईल हे सांगता येत नाही. शिवाय त्याची पात्रता परिक्षा कठीण असते. त्यातच जो सैनिक असतो. त्याला नोकरी असतांना व ते निवृत्त झाल्यानंतर सन्मान मिळत नाही. त्यातच कोणी आपली उच्च वेतनाची देशातंर्गत असलेली नोकरी सोडून जात नाहीत सैन्यात. सैन्यात जायला हिंमत लागते. मानसिकताही लागते आणि तेवढीच महत्वाकांक्षा. कारण सैन्यात गेल्यानंतर शत्रू सैनिकांच्या हातात पडल्यास एवढे हाल होतात. त्यातूनही प्रत्यार्पणासाठी विशेष प्रयत्न केले जात नाहीत. संभाजी महाराज हे एक सैनिकच होते. आपल्या स्वराज्यासाठी लढणारे. ते जेव्हा शत्रूच्या हातात पडले. तेव्हा त्यांचे अनन्वीत हालहाल झाले. त्यांना त्यातून सोडविण्याचे पुरेसे प्रयत्न झाले नाहीत. हेच पाहतात आजचे तरुण. म्हणूनच कोणीही सैन्यात नोकरी करायला तयार होत नाहीत. देशात सैनिक तयार व्हायलाच हवेत. त्या सेवेत तरुणांनी जायलाच हवं. परंतु प्रत्येक तरुण सैन्यात जातो काय? तो जात नाही. जायला धजत नाही. कारण असतं युध्द. युध्द झालंच तर केव्हा कोणत्या सैनिकांची जीव जाईल. ही गोष्ट नाकारता येत नाही. आज सेवेला काहीही अर्थ उरलेला दिसत नाही. सेवेला निरर्थक समजलं जातं. कारण लोकांना आजच्या काळात मोबदला हवा आहे. तो सेवेतून मिळत नाही. सेवा..... अलिकडील काळात मायबापाचीच सेवा होत नाही. त्यातच लोकं मायबापांनाही 'काय दिलं मला' असा जबाब विचारतात व त्यांची म्हातारपणात सेवा न करता मोकळे होतात. बरीचशी मुलं अशी आहेत की ती आपल्या मायबापाला सोडून, त्यांनी केलेले त्यांच्यावरील उपकार विसरुन आपल्या पत्नीसोबत वेगळे राहायला निघून जातात. त्यात मी, माझी पत्नी व माझी मुलं एवढाच त्यांचा संसार असतो मायबापाची सेवा. जे मायबाप आपल्या बाळाला उन्हातून सावलीत नेतात. अनमोल महागडे शिक्षण शिकवितात. मुलं त्यांचीच जिथं होत नाही. ती मुलं देशाची का होतील? तसं पाहिल्यास देशाची सेवा महत्वपुर्ण. परंतु मोबदला कमविण्याच्या नादात असलेली मुलं प्रसंगी साध्या मंदिराच्या नावावर वस्तीत वर्गणी गोळा तर करतात. परंतु सेवा करण्याऐवजी गोळा झालेल्या पैशातून तीच मुलं आपल्या शौकाकडे लक्ष ठेवून मंदिरात दानात आलेल्या पैशातून दारु ढोसतात. ही वास्तविकता आहे. ती मुलं देशाची सेवा कशी करतील? ती मुलं देशाची सेवा करायला मागेपुढे पाहात असतात. नोकरी....... तिही साधी सोपी व कमी वेतनाची नाही. चांगल्या वेतनाची. तसं पाहिल्यास आजच्या काळात कोणीही कधीही नोकरी मिळवीत असतांना सैन्यात नोकरी मिळवीत नाही. जातच नाहीत व म्हणतात की सैन्यात गेलोच तर भविष्य अंधकारमय आहे. सैन्यातील व्यक्ती हा जास्त दिवस जीवंत राहीलच. ही शाश्वती देता येत नाही. ते नोकरी मिळवितात देशातीलच अंतर्गत बाबींतील. सैन्यात सर्वांनी जायला हवं. लखन विचारच करीत होता. तोच आठवला त्याला त्याच्याच महाविद्यालयातील आणखी एक मित्र. ज्याचं नाव प्रथमेश होतं. तो इंजिनिअर होता. परंतु तो तेथे न रमता सैन्यात आला होता. प्रथमेश...... ज्याला नोकरी मिळाली. जी इंजिनिअरची होती. त्यात वेतन भरपूर होतं. प्रथमेशला सैन्यात जायचं होतं. ती आस आणि आवड त्याला लहानपणापासूनच होती. प्रथमेशला आधी नोकरी लागली. तो इंजिनिअर बनला. वेतनही भरपूर होतं. परंतु तिथं मन मानलं नाही. तसं पाहिल्यास सैन्यात नोकरी करणे. ही बाब देशाच्या एका महत्वपुर्ण सेवेत समाविष्ट होते. त्यानंतर त्यानं फॉम भरला व तो पंचवीसव्या वर्षी सैन्यात लेफ्टनंट अधिकारी पदावर कार्यरत झाला. लखन विचार करु लागला. देशसेवेसाठी नाही तर सैन्यात जाण्यासाठी प्रथमेशनं आपल्या भक्कम व सुखी जीवनाच्या नोकरीचा त्याग केला. ही बाब देशातीलच इतर लोकांसाठी प्रेरणादायी बाब होती. प्रथमेशनं दाखवून दिलं होतं की व्यक्ती आणि त्याचं वेतन महत्वपुर्ण नाही तर महत्वपुर्ण आहे देशाची सेवा. ही देशाची सेवा करतांना वीरमरण जर आलं. तर ते वीरमरण शहिदात गणलं जाईल. अन् देशात राहात असतांना व जीवन जगत असतांना कितीही वेतन मिळालं वा कितीही उच्च पदाची नोकरी असली आणि समजा एखाद्यावेळेस मरण आलंच तर ते मरण वीरमरणात समाविष्ट होणार नाही. शिवाय मरण हे कधी ना कधी येणारच आहे. मग सैन्यातील नोकरी नाही पत्करली तरीही. त्यापेक्षा सैन्यात नोकरी पत्करणं बरं. परंतु आज सैन्यात कोणी जायला तयार होत नाहीत. विचार वेगळाच असतो. विचार मरणाचाच असतो. शिवाय जर जास्त वेतनाची नोकरी देशातंर्गत असेल तर कोणीच देशाची सेवा करायला व जीव धोक्यात घालायला तयार होतच नाही. त्याचं कारण म्हणजे सैन्यात असलेला त्रास. शिवाय ही देशसेवा करणाऱ्या व्यक्तीचा देशांतर्गत भागात सन्मान व्हायला हवा. परंतु तसा सन्मान प्रत्येकांचा होतांना दिसत नाही. ते करीत असलेली त्यांची नोकरी विशेष असली तरी लोकं त्यांना सामान्य लोकांसारखंच समजतात नव्हे तर सामान्य लोकांसारखंच वागवतात. ज्यातून ही नोकरी करायला तरुण पुढे येत नाहीत. शिवाय ही नोकरी पत्करल्यानंतर समजा दुर्दैवानं एखाद्यावेळेस एखादा सैनिक शत्रूराष्ट्राला सापडलाच तर त्याचे एवढे हालहाल होतात. ही विचारात घेण्यालायक बाब असते. तेव्हा त्या सैनिकांबाबत विचार करतांना पुरेसे प्रत्यार्पणाचे प्रयत्न होत नाहीत. ज्यातून अशा सैनिकांना हेर समजून त्याला अनन्वीत जीवघेण्या यातना मिळत असतात. व्यतिरिक्त अशा सैनिकांचे परत आपल्या मातृभुमीत परतणे कठीण असते. सैन्यातील नोकरी. एक तरुण जेव्हा सैन्यात भरती होतो. तेव्हा त्याला आपला संपुर्ण परिवार विसरावा लागतो. विसरावं लागतः आपलं तरुणपण. आपली प्रेयसी, विवाह करणे आणि त्या विवाहातून एखादं अपत्य जन्मास घालणे. मायबाप, मित्रमंडळी सारेच विसरावे लागतात. फक्त देश आणि देशसेवा, हेच ब्रीद ठेवावं लागतं त्यांना. शिवाय मरणाचीही भीती बाळगावी लागत नाही. मित्र असतात. परंतु जे सैन्यात असतात. जे त्याच्या बरोबर काम करतात, तेच. बाकीचे बालपणापासून असलेले. सारेच मित्रमंडळ त्याच्या देशसेवेच्या धैर्यासमोर कुचकामी ठरतं. ते सेवाच करतात, देशाची. अन् अशी सेवा करुनही बदल्यात काय मिळतं? तिरस्कार व द्वेष. एखाद्यावेळेस एखादा सैनिक रेल्वेनं जरी प्रवास करीत असेल तरी त्याला उठवलं जातं. जसं त्यानं सैन्यात जावून खुप मोठं पापच केलं. शिवाय देशातंर्गत भागातही तो निवृत्त झाल्यावर पाहिजे त्या प्रमाणात सन्मान देत नाहीत लोकं. ना त्याला बसायला खुर्च्या मिळत, ना त्याच्याकडे आत्मीयतेनं पाहिलं जात. शिवाय स्वतःच्या अर्थपुर्ण जीवनासाठी काही कागदपत्र बनवितांना त्याला अनेक साऱ्या अडचणींना सामोरे जावे लागते. विशेष सांगायचं म्हणजे आपण म्हणतो की देशात सैनिक तयार व्हायला हवेत. परंतु असे सैनिक तयार झाल्यानंतर आपण त्यांना खरंच सन्मान देतो का? हा एक गंभीर प्रश्न आहे. याचे उत्तर नाही असंच येतं. शिवाय त्यांची सैन्यात जेव्हा नियुक्ती होते. तेव्हा तर पात्रतेसाठी त्यांना बरीच मेहनत करावी लागते. सैन्यात नोकरीसाठी पात्र होत असतांना कितीतरी वेळा चाबकाचे फटके खावे लागतात. कितीतरी वेळ अपमान सहन करावा लागतो. शिव्यांची लाखोली खावी लागते. पात्र होत असतांना या सर्व गोष्टी घडतात आणि त्या गोष्टी घडणंही बरोबरच आहे. कारण अशा गोष्टी जर पात्रतेच्या वेळेस घडल्या नाहीत तर तो शत्रूच्या गोटात सापडलाच तर त्याला दिल्या जाणाऱ्या वेदना, ती शिव्यांची लाखोली आणि ते अपमानास्पद शब्द तो सहन करु शकणार नाही. हा उद्देश. महत्वाचं म्हणजे देशात सैन्यात सर्वांनी आनंदानं जायला हवं. कारण ती एक सेवा आहे. देशाची सेवा. जर वीरमरण आलंच तर ती दुःखाची बाब मानू नये. ती आनंदाचीच बाब मानावी सर्वांनी. सैनिक तयार व्हायलाच हवेत. देशाला त्याची गरज आहे. अन् ते होतीलही. जेव्हा ते सैनिक असतांना वा त्यातून निवृत्त झाल्यानंतर त्यांना विशेष असा सन्मान मिळेल. त्यांचा दर्जा टिकून राहील. तेव्हाच खऱ्या अर्थानं सैनिक बनल्याचं सार्थक वाटेल. यात शंका नाही. लखनचा तो विचार. तो कुतूहलानं आपल्या नोकरीकडे पाहात होता आणि तेवढ्याच कुतूहलतेनं तो प्रथमेशचा विचार करीत होता. *********************५********************* लखन एन सी सी कॅडर होता. तसे महाविद्यालयातील मुलं त्याला मेजरच म्हणत असत. कारण तो संपुर्ण टीमचं महाविद्यालयातच नेतृत्व करीत होता. शिस्त तर त्याच्या मनात कुटकूट भरली होती. तीच शिस्त आवडली होती शिवंण्याला व तिही त्याचेवर प्रेम करु लागली होती. शिवंण्या त्याच्याच महाविद्यालयातील हुरहुन्नरी मुलगी. ज्याप्रकारे लखनवर घरचे संस्कार होते. तसेच संस्कार तिचेवरही घरचे होतेच. प्रेम तिलाही आवडत होतंच. परंतु जात बिरादरीच्या बंधनातच ती वाढली होती. विवाह करायचाय तर जातीच्याच व गोत्राच्याच मुलाशी करावा असं तिच्या परीवाराचं म्हणणं होतं. तशी ती जात सांभाळून होती. शिवंण्या यावर्षी प्रथमच महाविद्यालयात आली होती. तिनं पाहिलं होतं की महाविद्यालयात आलेल्या बऱ्याचशा मुली व तिच्या मैत्रीणी मुलांच्या प्रेमात पडलेल्या आहेत. त्यांना प्रेम आवडत आहे व त्या तिच्याच समोर आपल्या प्रेमाच्या गोष्टी करतात आहे. शिवंण्यासमोर प्रेमाच्या गोष्टी करणाऱ्या त्या मुली. त्या मुली आपलं दहावीचं प्रेम व आपण तसं प्रेम का केलं? आपल्याला त्या प्रेमात कोणकोणता अनुभव आला? या सर्व गोष्टी विषद करुन सांगत असायच्या. आताही त्यांचे बॉयफ्रेंड त्यांना महाविद्यालयात मधल्या सुट्टीत भेटायला येत असत. ते दृश्य ती पाहात असे. शिवंण्यावर घरचे संस्कार होते. परंतु ते संस्कार कुणावर प्रेम करु नये. असं सांगत नव्हते. प्रेम करावं. परंतु जात बिरादरीतील मुलांशीच करावं, असं तिच्या घरच्यांचं म्हणणं होतं. त्यातच असं प्रेम करण्यानं आपली इज्जत अब्रू जात नाही. ती टिकून राहाते असंही तिच्या घरच्यांचं म्हणणं होतं. शिवंण्या सुंदर होती. तसे तिचे विचारही सुंदर होते. तिला प्रेम करायला जात, बिरादरी आडवी येत होती. तिलाही प्रेम करावंसं वाटत होतं. परंतु करावं कुणावर. आपल्या जातीचा एखादा तरुण मिळेल तेव्हा ना. अन् तो तेवढाच संस्कारीही असावा. हे तेवढंच महत्वाचं वाटत होतं तिला. त्यातच तिनं पाहिलं. लखन एन सी सी कॅडर आहे व तो एन सी सीचं संचालन करतोय व शिस्तीत राहतोय. त्याची शिस्त वाखाणण्याजोगीच आहे. शिवंण्याचा संस्काराचा प्रश्न सुटला होता. ती त्याला आदर्श मानू लागली होती. त्यातच मुलींच्या म्हणण्यानुसार ती त्याचेवर प्रेम करु लागली होती. परंतु ते प्रेम एकतर्फी होतं. कारण तिला त्याची बिरादरी माहीत झाली नव्हती. अशातच कोणीतरी सहज बोलता बोलता म्हटलं की तो अमूक अमूक जातीचा आहे. आता तिचा प्रश्न सुटला होता. वाटत होतं की तोच तिच्या लायक असून त्याचेवरच प्रेम करावं. अन् हे प्रेम जाहीरही करावं. परंतु हिंमत होत नव्हती. काय करावं? कसं बोलावं हे सुचत नव्हतं. अशातच तो प्रेमदिवस येवू लागला होता. तो प्रेमदिवस. तो प्रेमदिवस उद्यावर होता. तशा मैत्रीणीच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. 'उद्या व्हॅलेंटाइन डे. आम्ही चांगले कपडे घालून येणार. लाल गुलाब घेवून येणार. अन् ते आपल्या प्रेमवीरांना देणार. उद्याचा दिवस चांगला असेल, आमच्यासाठी.' बस, त्याच दिवसभराच्या त्यांच्या गोष्टी. मग काय, शिवंण्यानंही मनात विचार केला. विचार केला की आपणही चांगले कपडे परिधान करुन यायचे. एक गुलाब आणायचा विकत व आपणही गुलाब द्यायचा. परंतु देणार कोणाला? तसं तिला आठवलं. आपण गुलाब लखनला द्यायचा. जो शिस्तप्रिय आहे. तिचा तो विचार. परंतु दुसऱ्याच क्षणी विचार आला. कदाचित त्यानं आपल्याला ते फुल का दिलं. असा प्रश्न विचारला तर....... तर काय उत्तर द्यायचं. ती त्यावर विचार करु लागली. तोच तिला आठवलं. जर त्यानं तसं विचारलं तर मला फुल देणं आवडतं असं म्हणावं. तसा प्रश्न सुटला व ती दुसऱ्या दिवसाची वाट पाहू लागली. त्यातच दुसरा दिवस उजाडला. आज तो व्हॅलेंटाइन दिवस होता. ती लवकरच तयारी करुन महाविद्यालयात जायला निघाली. त्यासाठी तिनं चांगले कपडेही परिधान केले होते. महाविद्यालयात येत असतांना तिनं महागडा गुलाब विकत घेतला. आज व्हॅलेंटाइन डे असल्यानं त्या फुलाचा दरही जरा जास्तच वाढला होता. शेवटी ती महाविद्यालयात आली व त्याला शोधू लागली. परंतु तो काही अद्यापपर्यंत महाविद्यालयात आला नव्हता. त्याची येण्याची वेळ व्हायचीच होती. कदाचित तो येतो की नाही. हेही तिला माहीत नव्हते. परंतु तो येणारच. याची तिला शाश्वती होती. अशातच तो आला. त्यानं आपली सायकल महाविद्यालयातील स्टँडवर लावली व तो तासिकेसाठी वर्गात गेला तर पाहतो काय, तिथं कोणीच नव्हतं. सर्वजण बाहेरच होते. कोणी रेस्टॉरेंटमध्ये तर कोणी फिरायला गेले होते आपआपल्या बॉयफ्रेंडसोबत. त्याला प्रेमिका नव्हती. त्यामुळंच तो उदास होवून महाविद्यालयातील मैदानावर बसला होता. तेच तिनं हेरलं व हिंमत करुन ती त्याचेजवळ गेली. तसं तिनं हिंमत करुन त्याला गुलाबपुष्प दिलं. तसा त्यानं तिला प्रश्न विचारताच ते फुल तिला देणं आवडतंच. असं ठरल्याप्रमाणे उत्तर दिलं व ती मोकळी झाली. त्यावेळेस तिच्या मनात लड्डू फुटत होते. वाटत होतं की तो तिचं त्याचेवर प्रेम आहे का? असं विचारेल. तिला फिरायला चाल म्हणेल व ती त्याचेसोबत फिरायला जाईल. परंतु त्या सर्व कल्पना होत्या तिच्या आणि त्या कल्पना तिच्या मनातल्या मनात विरल्या होत्या. तो प्रेमदिवस. तिनं त्याला फुल तर दिलं. ज्या फुलानं त्याला झोप आली नव्हती. दिवसभर त्याचा अगदी बेचैनीत गेला होता. मात्र आनंदाच्या उकळ्या त्याच्या मनात फुटत होत्या व त्याच गोष्टीनं त्याला रात्री झोप आली नव्हती. प्रेमाची आग लागली होती त्याच्या मनात. तसं तिच्या मनात घडलं नाही. तिला स्वतःच स्वतःची लाज वाटत होती. वाटत होतं की तिच्या मनात निर्माण झालेलं प्रेम, तिनं त्या प्रेमाला आज त्याच्यासमोर जाहीर करायचं होतं. तिच्या आयुष्यातील महाविद्यालयातील तो पहिला प्रेमदिवस. तो प्रेमदिवस गेला होता व लखनच्या मनात तिच्या फुल देण्यानं आग लागली होती प्रेमाची आणि त्यासाठीच तो तिच्याकडे पाहू लागला होता. तशी आग तिच्याही मनात लागली नव्हती. परंतु त्याचं रोजरोजचं न्याहाळणं तिच्या मैत्रीणींनी हेरलं व एक दिवस त्या मैत्रीणी तिला म्हणाल्या, "शिवंण्या, लखन सारखा तुझ्याकडेच पाहात असतोय. कारण काय?" "नाही गं. तसं काही नाही. तो पाहात नाही माझ्याकडे. तुम्हाला भास होतोय." "ठीक आहे तर आणि हे खरं निघालंय तर तू आम्हाला काय देणार? नाश्त्याची पार्टी द्यावी लागेल बरं." "ठीक आहे. हे खरं निघालं तर मी तुम्हाला नाश्त्याची पार्टीच देणार. परंतु हे खरं निघायला हवं ना." "ठीक आहे, तू जेव्हा महाविद्यालयात येते ना. तेव्हा पाहशील अन् हे दररोज पाहशील. लखन सारखा तुझ्याकडेच पाहात असतो. आम्ही खोटं बोलत नाही. उद्या पाहाच तू." ते मैत्रीणीचं बोलणं. त्यावर विचार करुन तिनं त्याची पडताळणी घ्यायचं ठरवलं. तसा दुसरा दिवस उजळला. ती आपल्या मैत्रीणीसह महाविद्यालयात प्रवेशली. तशी तिच्या मैत्रीणीनं कालच्या गोष्टीची तिला आठवण करुन दिली. तेव्हा तिनं पाहिलं. पाहिलं की लखन ती तासिकेसाठी वर्गात जाईपर्यंत तिच्याकडे पाहात होता. त्यातच ती जेव्हा वर्गाच्या दरवाज्यावर पोहोचली. तेव्हाही तो पाहातच होता. लखन महाविद्यालयात होता. तिथंही तो एन सी सी चं नेतृत्व करायचा. त्यामुळं तिथंही त्याला कधीकधी मुलं मेजरच म्हणायचे. शिवंण्याला आपल्या मैत्रीणीनं म्हटलेलं बोलणं पटलं होतं. परंतु तिच्या मनात संभ्रम निर्माण झाला. कदाचित लखन आजच पाहात होता की दररोज पाहतो. त्याही गोष्टीची तिनं पडताळणी करण्याचा विचार केला व ठरलं की पुरते आठ दिवस आपण याचा पडताळा घ्यायचा. आठ दिवस झाले होते. लखन त्याच जागी उभे राहून तिला न्याहाळत असायचा. तेच तिनं पाहिलं व तिची पुष्टी झाली की लखन तिच्याकडे पाहतो. तसा ती विचार करु लागली. तो का बरं पाहात असेल माझ्याकडे? तिचा तो विचार. तोच तिला त्याचं उत्तर सापडलं नाही. तोच तिनं आपल्या मैत्रीणींना विचारलं, "मैत्रीणींनो, माझी पुष्टी झालीय की तो माझ्याकडे सारखे पाहात असतो. तशी मी तुम्हाला पार्टी देणारच आहे नाश्त्याची. परंतु माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दिलं तर....." "विचार मग प्रश्न." मैत्रीणी म्हणाल्या. "तो मेजर माझ्याकडेच का पाहात असावा?" "सोपं आहे या प्रश्नाचं उत्तर. " "म्हणजे?" "अगं तो तुझ्यावर प्रेम करु लागला आहे. त्याला प्रेम झालं आहे तुझ्यावर. म्हणूनच तो पाहात असतो तुझ्याकडे सतत आणि सारखा." एक मैत्रीण म्हणाली. "हो का? असं आहे का?" ती म्हणाली व तिनं प्रकरण बंद केलं होतं. ती विचार करीत होती. विचार होता की तो जर पाहात असतो आपल्याकडे तर त्याचं आपल्यावर प्रेम असेलच. परंतु ते प्रेम आपल्याला दिसायला हवं. परंतु दिसणार कसं? ते त्याला विचारायला हवं. परंतु विचारणार कसं? ते प्रेम समजणार कसं? ती विचार करु लागली. तोच तिला वाटलं की आपण प्रेम विचारावं. तशी ती त्याबाबत संधी शोधू लागली. तसा तो दिवस उजडला. तो दिवस फ्रेंडशिप दिवस नव्हता. परंतु त्या दिवशी तो एकटाच बसला होता महाविद्यालयात. त्यातच तिनं त्या दिवशी फ्रेंडशिपचा धागा घेतला व ती त्याचेजवळ गेली. हिंमत करुन म्हणाली, "सर, आपण नित्यनेमानं उदास दिसता. काय कारण आहे. कळेल काय?" तो तिचा प्रश्न. तो प्रश्न ऐकताच त्यानं उत्तर दिलं. तो म्हणाला, "असं वैगेरे काही नाही." "मग एकटेच का? मित्र कुठं गेलेत?" "अं, आहेत म्हणावं. गेले असतील फिरायला." "कुठं गेले असतील?" "अं, रेस्टॉरेंटमध्ये. रेस्टॉरेंटमध्ये गेले असतील." "आणि आपण? आपण नाही गेलात का?" "नाही." "का बरं?" "अं, सहज. सहजपणे नाही गेलो मी." "सर, इच्छा झाली नाही का जायची?" "नाही." "सर, खोटं बोलू नका." "म्हणजे?" "सर, असं म्हणा की एखादा सोबती सापडला नाही." "होय, तसंच समजा." "सोबती की सोबतीन?" तिनं म्हटलं. तसा तो म्हणाला, "नाही, तसं नाही." "सर, आणखी खोटं? किती खोटं बोलाल. असं म्हणा की सोबतीन मिळाली नाही. म्हणूनच आपण रेस्टॉरेंटमध्ये गेले नाही." थोड्या वेळाचा अवकाश. थोडा वेळ शांतता होती. थोड्या वेळानं ती म्हणाली, "सर, आपल्याला सोबतीला एखादी मैत्रीण मिळाली तर..... तर आपण जाणार काय रेस्टॉरंटमध्ये?" ".........." तो काहीच बोलला नाही. तशी ती म्हणाली, "सर, खर्चाला घाबरता काय? खर्च सोबतीनच करणार." "तसं नाही. परंतु तशी मैत्रीण असावी ना दिलदार." "होय, तेही खरंच." "हो, ना. म्हणूनच तर मी बसलो आहे एकटा. मैत्रीण न धरता." "हे बघा, जर आपल्याला अशी मैत्रीण मिळालीच तर आपण मैत्री कराल काय?" "करु. परंतु तशी मैत्रीण मिळायला हवी ना." "मी करेल अशी मैत्री. कराल का माझ्याशी मैत्री? बनवाल का मला मैत्रीण?" 'बनवाल का मला मैत्रीण' ते तिचं बोलणं. त्यावर उत्तर देत तो म्हणाला, "का नाही बनविणार मी आपणाला मैत्रीण. जर आपण अशी निखळ मैत्री करायला तयार असाल तर...... तर मी मैत्रीण बनवायला तयार आहे तुम्हाला. परंतु तुम्ही. तुम्ही खरंच तयार आहात काय?" "मीही तयारच आहे मित्र म्हणून तुम्हाला स्विकारायला. तसे आपण मला आवडताच आणि विशेषकरुन आपली शिस्त आवडते मला. आपण जर मैत्री करायला तयार असाल तर मिही तयारच आहे मैत्री करायला." तिनं म्हटलं व ती चूप झाली. तिचं ते बोलणं. ते तिचं हक्काचं बोलणं होतं. ते बोलणं झाल्यानंतर ती चूप बसली. त्या दिवसापासून ती लखनची प्रेयसी बनली होती. त्यांचं प्रेम वृद्धींगत होत चाललं होतं. शिवंण्या आता नित्यनेमानं त्याला भेटायची. त्याच्याशी चांगलं चांगलं बोलायची. बोलता बोलता कधी प्रेमाच्याही गोष्टी व्हायच्या. अशाच प्रेमाच्या गोष्टी करता करता तिनं त्याला त्याच्या जाती व गोत्राबद्दल विचारलं. त्यातच तिला कळलं की तो तिच्याच जाती व गोत्राचा आहे. मग ठरलं. ठरलं की आपण त्याचेशीच विवाह करावा. विवाहासाठी तो तिच्याच जाती व गोत्राचा आहे व तो तिला सोईस्करही होऊ शकतो. मग तिनं ठरवलं की आपण त्याच्याशीच विवाह करावा. कारण तो संस्कारी आहे व तेवढाच शालीनही. एक दिवस असाच उघडला. त्या दिवशी ती महाविद्यालयातील मैदानावर बसली होती. तेव्हा तिच्याजवळ तो गेला. त्यातच गोष्टी सुरु झाल्या. गोष्टी करता करता तो तिला म्हणाला, "शिवंण्या, हे माझं अंतिम वर्ष. माझी परिक्षा जवळ येत आहे. मी परिक्षा दिल्यावर हे महाविद्यालय सोडून जाणार आहे. मग आपली भेट शक्यतोवर होणार नाही. संपर्कही होणार नाही. वाटल्यास मी तुला भेटायला येईल याच महाविद्यालयाच्या मैदानात. परंतु तरीही मला दुःख आहे. दुःख आहे की मी तुला सोडून जाणार. परंतु एक महत्वाचं. मी तुला पत्ता देतोय आणि फोन नंबर तर आहेच. हा पत्ता म्हणजेच माझ्या संपर्काचा पत्ता." तो म्हणाला. मात्र तसं बोलत असतांना त्याच्या मनातील वेदना तीव्र जाणवत होत्या आणि तिलाही दुःख झालेलं वाटत होतं. ***********************६******************** दरवर्षी व्हॅलेंटाइन येत होता व दरवर्षी ती नित्यनेमानं त्यांना फुल देत होती. त्या फुलाचा रंग गडद लालच असायचा. अशातच लखननं परिक्षा दिली व तो आपलं शिक्षण पुर्ण करुन नोकरीसाठी प्रयत्न करु लागला होता. त्याचं शिक्षण पुर्ण झालं व तो नित्यनेमानं आपल्याला नोकरी मिळावी म्हणून प्रयत्न करु लागला. त्यातच हुशार व बॉडीदार असल्यानं लवकरच त्याला सैनिकाच्या नोकरीचा जॉब आला व तो सैनिकांच्या नोकरीवर रुजू झाला होता. लखनला नोकरी लागली होती. शिक्षण पुर्ण झालं होतं. तसा तो सैन्यात रुजूही झाला होता. त्यातच सैन्यात नोकरीला लागल्यानंतर तो संपुर्ण सैन्यात बांधील झाला होता. त्यानंतर तो नोकरीत रुजू झाल्यानंतर बांधील झाल्यानं तो तिला पुरेसा वेळ देवू शकत नव्हता. अशातच कधीकधी त्याला तिची आठवण यायची व तो तिच्याशी संपर्क करायचा. कधीकधी फोन लावायचा. तिची हालचाल विचारायचा. त्यातच त्याचं प्रेम वाढायचं. शिवंण्याचं प्रेम वाढत चाललं होतं. त्यातच तिला त्याची हालचालही कळत चालली होती. तोच जोश व उर्मी त्याच्या मनात निर्माण होत असे तिच्याशी बोलतांना. शिवंण्याही शिकत होती. आता ती एवढी शिकली होती की ती प्राध्यापिका बनण्यालायक बनली होती. तिला जॉब लागला नव्हता. त्यातच दोघंही नोकरीवर लागले नव्हते. परंतु त्यांचं वयही होत आलं होतं. शिवंण्याचं होत आलेलं वय. त्यातच त्याचंही होत आलेलं वय. तसं पाहिल्यास ते दोघंही एकाच जाती व गोत्रातील. मग ठरलं, आपण विवाहबद्ध व्हायचं. परंतु होणार कसं? त्यांच्या मनानुसार कसा होणार होता विवाह? विवाह करतांना घरातील जेष्ठ मंडळींची संमती हवी होती. ती मिळणार कशी? हाही एक प्रश्नच होता. त्यातच काय करावं, हा विचार होता त्याच्या मनात. शेवटी ठरलं. दोघांनीही आपल्या आईवडिलांना त्याची माहिती द्यायची. अन् सांगायचं की आमचं दोघांवर प्रेम आहे व आम्हाला विवाह करायचा आहे. तशी त्यांची जातही व गोत्रही एकच आहे. दिवसामागून दिवस जात राहिले. एक दिवस लखन सुट्टीवर गावी आला होता. त्यातच त्यानं आपल्या आईजवळ गोष्ट काढली. मला विवाह करायचाय. मुलगी बघायची गरज नाही. मी मुलगी बघितलीय. तसं तो बोलताच आईनं त्याचेजवळ शिवंण्याची विचारपूस केली. ती कशी आहे? कुठे राहते? काय करते? सारेच प्रश्न विचारले. त्यावर त्यानं तिची इत्यंभूत माहिती दिली. माहिती दिली की ती आणि मी एका महाविद्यालयात शिकलो. ती शिकता शिकता प्राध्यापिका बनण्यालायक बनली. ती सालस व सुंदर आहे. तशीच ती संस्कारीदेखील आहे. आपल्याच जाती व गोत्राची आहे. तिला आपल्या घरी आणल्यास काहीही हरकत नाही. मात्र तिनं त्याच्या वडिलांना मनवावं. सायंकाळ झाली होती. वडील घरी आले होते. त्यातच त्याचे वडील जेवायला बसले होते. तोही शेजारीच बसला होता जेवायला. अशातच तिनं तिच्या पतीला म्हटलं, "अहो, ऐकाल का?" "काय?" "आपला मुलगा नोकरी करतोय." "मग." "तो तरुण झालाय." "मग." "त्याचे दोनाचे चार हात करावे लागतील." "म्हणजे?" "लग्न करावं लागेल त्याचं." "अर्थात?" "लग्न. लग्न करावं म्हणतो मी." "मग." "मग आपल्या मुलासाठी मुलगी पाहा." "पाहू." "मी एक सुचवू का स्थळ. चांगलं स्थळ आहे." "पाहून ठेवली आहे का मुलगी? तुझी नातेवाईक आहे का ती?" "नाही." "मग कोणती मुलगी आहे?" "आपल्याच मुलाच्या ओळखीची. म्हणतो की ती त्याच्या महाविद्यालयात शिकली. चांगली शिकली आहे." "म्हणजे आपल्या लेकराला प्रेम झालं तर......" "तसं नाही हो." "मग?" "महाविद्यालयातील आहे त्याच्या. असं म्हटलं मी." "ही महाविद्यालयातील मुलगी. ना जातीची ना पातीची. मग कसं करावं तिच्यासोबत आपल्या मुलाचं लग्न?" "ते बरोबरच. परंतु ती आपल्याच, आपल्याच जातीची व गोत्राची आहे, असं आपल्या मुलाचं म्हणणं." "राहू दे, राहू दे. तो एवढा मोठा नाही झाला की त्याला गोत्र समजेल. अन् हो, यात तुझ्या लाडाचा अतिरेक होतोय. तुझ्या लाडानं तो वाया जात असलेला दिसतोय." "लाड नाही हो. आपण चौकशी नाही का करणार." "नाही. अजिबात नाही. जरी चौकशीअंती ती जातीची आणि गोत्राची निघाली, तरी लोकं आपल्यावर नावबोटं ते ठेवतीलच. म्हणतील की हा प्रेमविवाह आहे. नकोच मला प्रेमविवाह झालेला." "हो ठीक आहे, नाही आवडत तुम्हाला प्रेमविवाह. परंतु त्यात आपल्या लेकराच्या भावनेचा बळी का? आपल्या लेकराला ती पसंत आहे ना. मग तर झालं आणि लोकं तर पळून जातात. आपले नाक कापतात. आपल्या मुलानं तसं केलं काय? आपल्या मुलानं आपल्याला सांगीतलं बाइज्जत. त्याचा तर विचार करा थोडासा. मग ठरवा काय ते. जरा विचार करा. अन् माझं ऐका. अहो, आपण हो म्हटल्यानं नाही होत. ते तिच्याही मायबापाला पसंत पडायला हवं ना. विचार, विचार करा. आपला मुलगा सैन्यात आहे. तसंही सैन्यात नोकरीला असलेल्या माणसाला कोणी मुली देत नाहीत. म्हणतात की मुलगा लढाई करतांना मरतो आणि संपुर्ण आयुष्य मुलीला विधेवेपणानं काढावं लागतं. अन् हो, तिचे आईवडिल आपल्या मुलासाठी ती मुलगी द्यायला कबूल करतील. तरंच होईल ना विवाह? होकार असू द्या तुमचा. मग समोरची पावलं." ते लखनच्या आईचं बोलणं. ते बोलणं ऐकताच त्याचे वडील त्यावर विचार करु लागले. शेवटी ते म्हणाले, "तू म्हणतेस. ते बरोबरच आहे. मी होकार देईल या विवाहाला. परंतु ......" ते थोडा वेळ थांबले. तशी प्रश्नांकित चिंता असलेली त्याची आई म्हणाली, "परंतु. परंतु काय?" "परंतु हा विवाहाचा योग कोण घडवून आणेल? तसंही विवाहाला मध्यस्थी लागतोय ना. ते कसं जुळवून आणायचं?" "ते पाहूच आपण. फक्त तुम्ही होकार द्या." लखनच्या वडिलांनी आपल्या पत्नीला होकार दिला. त्यानंतर ती गोष्ट त्याच्या आईने त्याला सांगीतली व ते लग्नकार्य स्वतः जोडण्यासाठी तो तयार झाला. आता वाट होती तिच्या घरच्यांच्या होकाराची. तसं पाहिल्यास तिचा होकार होता. परंतु तिच्या आईवडिलांचा होकार येणे तेवढं बाकी होतं. त्याची जुळवाजुळवही अजून सुरुच झाली नव्हती.**********************७********************* उन्हाळा नुकताच सुरु झाला होता. सर्वत्र विवाहाची धामधूम होती. त्यातच लखन फोनद्वारे तिच्याशी बोलत होता. तिचे हालहवाल विचारत होता. तसा विवाहाचा तो हंगामच होता. लोकं उन्हाळा लागण्यापुर्वीच म्हणजे हिवाळ्यातच विवाह जोडत असत व गुढीपाडवा झाला की विवाहाची कामं उरकवीत असत. परंतु त्याच्या विवाहाची जोडणी करतांना अख्खा हिवाळा निघून गेला होता. आता जर विवाह जोडला गेला नाही तर हा विवाह पुढील वर्षीच करावा लागेल असं त्याला आणि त्याच्या आईला वाटत होतं. वडील मात्र निश्चिंत होते. तसं पाहिल्यास त्यानं शिवंण्याला आपल्या वडिलांनी होकार दिल्याचं स्पष्टपणे सांगून टाकलं होतं आणि हेही सांगीतलं होतं की तिनं आपल्या आईवडिलांनाही तयार करावं. परंतु ती आपल्या आईवडिलांना विचारेल तेव्हा ना. तिची हिंमत होत नव्हती व ती म्हणत होती त्यांना की त्यांनीच एखादा दूत तिच्या घरी पाठवावा. जेणेकरुन त्यांचा विवाह होवू शकेल वा घडवून आणता येईल. तिचं ते म्हणणं. त्यावर ती गोष्ट लखननं आपल्या आईला सांगीतली व त्याच्या आईनं आपल्या भावाला तयार केलं विवाहाची बोलणी करण्यासाठी. मग काय, तिचा भाऊ मध्यस्थी म्हणून शिवंण्याच्या घरी गेला. जो पत्ता त्याच्या बहिणीनं त्याला दिला होता. पत्ता शोधत शोधत गेलेला तिचा भाऊ. त्यानं तिच्या घराचा शोध लावला. रामरुमाई झाली व लगेचच चर्चा सुरु झाल्या. त्यानं आपल्या प्रिय भाच्याची ओळख तिच्या घरी दिली. म्हटलं की तो सरकारी नोकरीवर आहे. सैन्यात आहे. त्यातच कोणताच शौक नाही त्याला. संस्कारी व शिस्तप्रियही तेवढाच आहे. त्यानंतर तिच्या आईवडिलांनी त्यावर दुजोरा देत आपण यावर विचारविमर्श करुन तसं कळविण्याबद्दल सांगीतलं व त्यानंतर लगेचच लखनचे मामा आपल्या गावी रवाना झाले. सायंकाळ झाली होती. शिवंण्याचे वडील कामावरुन आले होते. आज दुपारचा विचार त्यांच्या मनात होता. तसे हातपाय धुवून ते खाटेवर बसले. तशी चर्चा सुरु झाली. चर्चेत वडील म्हणाले, "मगाशी पाव्हणं आलंय. त्यांनी निरोप सांगीतला आपल्या शिवंण्यासाठी. म्हटलं की मुलगा सरकारी नोकरीवर आहे. सैन्यात आहे. मुलासाठी आपल्या मुलीची मागणी घातलीय. काय करावं बरं. मला सुचत नाही आहे. तसंही हे स्थळ स्वतः चालून आलेलं दिसतं. कारण आजच्या काळात मुलीची चिंता साऱ्याच आईवडिलांना असते. मुलीला लवकर मुलं मिळत नाहीत आणि सालस व संस्कारी मुलं तर अजिबात मिळत नाहीत. काय करावं सुचत नाही." ते वडिलांचं म्हणणं. त्यावर तिची आई म्हणाली, "हो ना. तुमचं म्हणणं बरोबर आहे. परंतु एक बाब विचारात घेण्यालायक आहे. मुलगा सैन्यात आहे. द्यायचं कसं?" "हो ना, मी तेच म्हणतोय. जर तो सैन्यात असतांना एखादी लढाई झालीच आणि मरण पावला तर ....... आपली मुलगी विधवा होईल. तिला संपुर्ण आयुष्य विधवेपणानं जगावं लागेल. ती आपल्यालाच कोसेल. काय करावं, विचार आहे." तो विचार. तसा विचार येताच तिथंच बसलेली व तो संवाद ऐकत असलेली शिवंण्या म्हणाली, "बाबा, माझ्या विवाहाचा विषय आहे ना हा?" "होय." "मग ते माझ्या भाग्यावर सोडून द्या." "भाग्य! का बरं?" "बाबा, भाग्य मोठंच. भाग्याशिवाय कोणत्याच गोष्टी मोठ्या नाहीत. विवाह मला करायचाय. माझ्या भाग्यात जे असेल, ते घडेलच. जर माझ्या भाग्यात माझ्या पतीचं निधन असेल तर आपण त्यांना वाचविणारे कोण? समजा मरण समोर ठेवून मी एका सैनिकाशी विवाह केला नाही आणि इतर कोणाशी विवाह केला तर तो मरणार नाही कशावरुन? समजा इतर कोणाशी आपण विवाह केला आणि तो मरण पावला तर मला नाही का विधवेचं जीवन जगावं लागणार? अन् हो, तो जर माझ्याआधी मरण पावला तर मला एका शहिदाची पत्नी म्हणतील. हे विसरु नका." मुलीचा तो विचार. तो विचार ऐकून शिवंण्याचे वडील म्हणाले, "मुली तू ग्रेटच. परंतु एक पिता आपल्या मुलीच्या विवाहाचा विचार करतेवेळेस या सर्व गोष्टी पाहणारच ना. मलाही त्याच गोष्टी पाहाव्या लागणार की नाही? अन् उरला भाग्याचा विषय, तर यावर सांगतो की भाग्य हे आपण बनवतो. निसर्ग बनवीत नाही. तेव्हा भाग्यावर विश्वास करणं म्हणजे आपलंच मुंडकं उखळात टाकणं होय. अन् असं आपल्याच मुलीचं मुंडकं उखळात कसं टाकता येईल मला?" "बाबा, ते सगळं बरोबर आहे. परंतु मला सैनिक आवडतात. आवडते त्यांची शिस्त. बाबा, समजा उद्या ते मरण पावलेच तर मला सन्मानानं जगता येईल. म्हणता व मानता येईल की मी शहिदाची पत्नी आहे. शहिदाची पत्नी म्हणून माझा गौरव होईल." "हो पण बाळ." "बाबा, ते काही नाही. मला आवडेलच त्यांची पत्नी बनणं. सन्मानासाठी. शिवाय मी त्यांची पत्नी बनून कधीच उपाशी राहणार नाही. त्यांच्या मृत्यूनंतर लागू होणारा पैसा हा मला पेन्शन म्हणून लागू होणार. त्यातच उर्वरित आयुष्य माझं चांगलंच जाणार. परंतु एक गोष्ट मला कळत नाही की आपण आताच माझा विवाहही जुळलेला नसतांना त्यांच्या मरणाबाबतीतील विषय का छेडता? तो मृत्यू येईल तेव्हा येईल. तसं पाहिल्यास अलिकडील काळात युद्ध होत नाहीत आणि झालेच तर जास्त सैनिक मृत्यू पावणार नाहीत. असा मला विश्वास आहे. केवळ विश्वासच नाही तर निश्चित खात्री आहे. तेव्हा आपण माझ्या विवाहासाठी त्यांचा विचार केलेला बरा. तसं पाहिल्यास बाबा, माझ्यारुपानं एक मुलगी तरी खपून जाईल. तुम्हाला चिंता असणार नाही." "हो बाळ, तुझं म्हणणं बरोबर आहे. परंतु ........" "परंतु काय बाबा?" "परंतु तू खुश राहशील काय त्याचेसोबत." "होय बाबा." तिचं ते मत. त्या मतानुसार तिची परवानगी घेवून तिच्या वडिलांनी तिच्या बाबतीतील निरोप त्याच्या मामाला दिला. त्यातच शिवंण्यानं आपल्या वडिलांना आपलं त्याचेसोबत प्रेम आहे. असं सांगीतलं नव्हतं. परंतु तिला ते सगळं माहीत होतं. योजना तडीस जाणार होती व ठरल्याप्रमाणे योजना तडीस जात आहे. हे तिलाही कळत होतं. तसं पाहिल्यास त्याच्या मामानं तो निरोप पुरता आपल्या बहिणीला सांगीतला व त्यानुसार एके दिवशी साखरपुडा पार पाडायचं ठरवलं व तोच निरोप देत मामा तिच्या आईवडिलांच्या घरी पोहोचला. त्याचं चांगलं आगत स्वागत झालं. त्यानंतर विषय निघाला. परंतु मुलीवाले म्हणाले की हे शक्य नाही. कारण आता साखरपुडा केल्यास आम्ही लटकून राहू. विवाहाचा योग आता नाही. आता फक्त विवाह जोडून ठेवणं आहे. कारण पावसाळा आहे व पाऊस संपल्याशिवाय आणि दिवाळी झाल्याशिवाय विवाह संपन्न होणार नाही. परंतु त्याच्या मामाचं म्हणणं होतं की आता साखरपुडा करु आणि तुळशीचे लग्न होताच लग्न करु. त्या गोष्टीला तिचे आईवडील तयार नव्हते. परंतु लखनचं म्हणणं होतं की त्याला तेवढे दिवस वाट पाहाणं शक्य नाही. प्रथा, परंपरा आपल्या जागेवर ठेवाव्यात आणि आमचा विवाह लावून द्यावा. प्रथेच्या आहारी गेलेली ती मंडळी. लखनचं काही एक ऐकायला तयार नव्हते. त्यातच त्याच्या मामाचंही काही ऐकायला तयार नव्हते. त्याचे आईवडील व तिचे आईवडील परंपरावादी होते व त्या प्रथा परंपरेत त्या दोघांच्या भावनांचा व प्रेमाचाही बळी जात होता. वाटत होतं की या दरम्यान एखादा व्यक्ती तिला पाहायला आल्यास वा तो तिच्या आईवडीलांना पसंत पडल्यास ती दुसऱ्याची होवून जाईल तिची इच्छा नसतांनाही. तिलाही अगदी तेच वाटत होतं. एखाद्यावेळेस त्यालाही आपल्यापेक्षा सुंदर मुलगी गवसताच तोही असाच आपल्या प्रेमाला तिलांजली देवून निघून जाईल. लखनचा मामा घरातच बसला होता. त्याचं संभाषण सुरु होतं, तिच्या आईवडिलांसोबत. तिचे आईवडील साखरपुड्याला नकारच देत होते आणि ती ते संभाषण गुपचूपपणे ऐकत होती. तिचे आईवडील साखरपुड्याला नकारच देत होते. शेवटी पाहुणा उठून जाईल, याची चिन्हं दिसताच ती आपल्याच आईवडीलांच्या व पाहुण्यांच्या मधातच बोलली, "मामा, आपली गोष्ट माझ्या आईवडिलांना जरी पटत नसली तरी आपली गोष्ट मला पटलीय. आम्ही आजही प्रथेत व परंपरेतच शिरुन वावरतोय. आम्ही शिकतोय. उच्च शिक्षण घेतोय. परंतु आमच्या उच्च शिक्षण घेण्याचा काय उपयोग? मामा, आपण साखरपुड्याची तयारी करा. मी तयार आहे, साखरपुडा करायला. महत्व आजचं आहे. उद्याचा दिवस कोणं पाहिला? तसंही मी प्रथा परंपरा पाळत नाही. अन् पाळणारही नाही." ते तिचं बोलणं. त्यावर त्याचा मामा काहीच बोलला नाही. तिचे आईवडील म्हणू लागले की असं मुलीनं उतावीळ होवू नये. मुलीनं उतावीळ होवून कोणतेच निर्णय घेवू नये. शिवाय मुलीनं बुजूर्गांच्या मधात बोलू नये. ते तिच्या आईवडिलांचं बोलणं. परंतु तिनं जिद्दच पकडली होती. शेवटी ती त्या पाहुण्यांसमोरच म्हणाली, "जर आपण प्रथे परंपरेत शिरुन साखरपुडा उरकवीत नसाल तर मी त्याचेसोबत पळून जाईल व पळून जावून विवाह करेल. मग आपण माझ्या मुलीनं माझं नाक कापलं म्हणाल नको." ती शिवण्याची जिद्दच. त्या जिद्दीपुढं तिचे आईवडील नतमस्तक झाले व त्यांनी तिच्या जिद्दीला नमन करुन तिचा साखरपुडा ठरवला व ठरल्या दिवशी तिचा साखरपुडा पार पाडला होता. साखरपुडा पार पडला होता. आता लग्नाची तारीख काढणं बाकी होतं. परंतु लग्नाची तारीख काढावी कशी? उन्हाळा संपत आला होता. पावसाळ्याला नुकतीच सुरुवात झाली होती. अशातच मुलीला धागा बांधून ठेवणे बरोबर वाटत नव्हतं. दिवाळीला बराच वेळ होता. त्यातच तुळशीच्या विवाहालाही बराच वेळ होता. पुन्हा प्रश्न उद्भवला होता की या दरम्यान मुलगी त्याचेसोबत पळून गेली तर...... आपलं नाक कापण्यासारखीच गोष्ट होईल. शेवटी त्याचाच विचार करुन तिच्या आईवडिलांनी दिवाळी येण्याची वा तुळशीचे लग्न व्हायची वाट न पाहता भर पावसाळ्यात तिचं लग्न लावून दिलं लखनशी व लखन तिच्यासोबत विवाहबद्ध झाला होता.*********************८********************* विवाह झाला होता व विवाहानंतर शिवंण्या त्याच्या घरी आली होती राहायला. त्यातच शिवंण्या काही दिवसपर्यंत त्याच्या घरीच राहिली. काही दिवसानंतर लखन तिला घेवून आपल्या अधिवासाच्या ठिकाणी गेला व तिथंच तिच्यासोबत राहून तो आयुष्याची स्वप्न रंगवू लागला होता. दिवसामागून दिवस जावू लागले होते. त्यातच असे दिवसामागून दिवस जात असतांना लखनच्या सर्व भावाचे विवाह झाले होते. त्यातच शिवण्याच्याही सर्व भावाबहिणीचे विवाह झाले होते. सर्वांना मुलंबाळं झाली होती. काहींची मुलं मोठी झाली होती तर काहींची मुलं ही लहान होती. अशातच तो काळा दिवस उजळला. तो काळा दिवस. त्या दिवशी घात झाला होता. तो काळाच दिवस होता. त्या दिवशी त्याचा मोठा भाऊ आपल्या स्कुटरवर आपल्या पत्नीसोबत बाजारात जात होता. अशातच घात झाला. मागवून येणाऱ्या ट्रकने त्याच्या स्कुटरला धडक दिली. ज्यात ते पती पत्नी मरण पावले. त्याचा मरण पावलेला भाऊ. सोबत त्याची पत्नीही मरण पावली होती. त्याला चार मुली होत्या. त्या लहान लहान होत्या. त्या अनाथ झाल्या होत्या. त्यातच लखनच्या विवाहाला चार वर्ष झाली होती. त्याला मुलबाळं नव्हती. लखनला मुलंबाळं नव्हती. भावाची मुलं अनाथ झाली होती. लखननं ते पाहिलं. त्यातच मैयत आटोपली व बाळाचा विचार सर्वांनी केला. विचारांती त्यांचा कोणी सांभाळ करायला तयार नव्हतं. शिवाय लखन ती प्रक्रिया होईपर्यंत चूप होता. समाज काय बोलतोय? कोणता निर्णय घेतोय? याकडे त्याचं लक्ष लागून होतं. शेवटी कोणाकडून होकार न आल्यानं समाजानं निर्णय घेतला. त्या मुलांना अनाथाश्रमात टाकावं. मग ठरलं मुलांना अनाथालयात टाकावं. परंतु शेवटी लखन म्हणाला, "नकोय, मी सांभाळून घेईल या मुलांना. ही माझ्या भावाचीच मुलं नाही तर ही माझीही मुलं आहेत. मीही यांचे काही देणे लागतोय." म्हटल्याप्रमाणेच लखननं त्या चारही मुलींना दत्तक घेतलं. त्यानं त्यांचा सांभाळ केला. त्यानं त्यांचं नाव शाळेत टाकलं. त्यांना शिकवायला सुरुवात केली. ती सैनिकांची ड्युटी व कामाचा ताण. त्यातच लखन सतत आपल्या ड्युटीवर राहायचा. त्याला बार्डरवरुन घरी यायला पुरेशी उसंत मिळत नव्हती. तशी त्याची पत्नी त्याच्या आईवडिलांच्या घरी राहायची. तसे ते शरीरसुखापासून वंचीतही असायचे बरेच दिवस. मग ठरलं, तिला आपल्याजवळ न्यायचं. परंतु मुलांचं काय? आपण ती जबाबदारी घेतलीय. त्यांना न्यायचं कसं? त्यांचं शिक्षण करायचं कसं? त्यांचा सांभाळ करायचा कसा? सारेच प्रश्न लखनसमोर होते. शेवटी त्यानं आपल्या पत्नीला आपल्याजवळ न्यायचं ठरवलं. त्यातच त्यानं ती लेकरंही आपल्याजवळ नेली होती. ती चार मुलं आणि ते दोन. अशी ती सहा मंडळी. सहा मंडळींचं ते कुटुंब. त्यातच लखन सकाळी तर कधी रात्रपाळीत नोकरीवर जायचा. शिवंण्या मात्र घरीच राहायची त्या लेकरासह. कधी आठ पंधरा दिवस तो यायचाच नाही नोकरीवरुन. जेव्हा युद्ध छेडत असे. अशातच ती मुलं सांभाळून घेणं. शिवंण्याला कसरतच वाटायची. तरीही ती मुलं ती सांभाळत होती. तिला आता ती मुलं सांभाळून घेतांना त्यांच्यात प्रेम निर्माण झालं होतं. आत्मीयताही वाढली होती. वाटत होतं की आता आपल्या गर्भातून आपली स्वतःची मुलं जन्मासच घालू नये. जर ती जन्मास आली तर या मुलींवरील प्रेम संपुष्टात येईल. कारण आपली मुलं ही आपली मुलं असतात. आपली मुलं असल्यावर इतरांची मुलं ही इतरांचीच वाटतात. त्यांच्याबद्दल प्रेम उरत नाही. ती चार मुलं. त्यातच निर्माण झालेली त्यांच्याबाबतीतील आत्मीयता. ज्यातून तिनं निर्णय घेतला की आपण आपल्या गर्भातील मुलं होवू द्यायची नाही. परंतु शरीरसंबंध होणारच. त्याला कोण रोखणार? अन् गर्भपात तरी कितीदा करणार? शेवटी तिनं ठरवलं. ठरवलं की आपण नसबंदी प्रक्रिया करायची. जेणेकरुन मुलं जन्मासच येणार नाही आपल्या गर्भातून. शेवटी तो विचार तिनं लखनच्या कानावर टाकायचं ठरवलं व ती त्याची वाट पाहात बसली. आज तिला अस्वस्थ वाटत होतं. वाटत होतं की तिच्या मनातील तो विचार लखनला सांगावा. तो विचार सांगण्यासाठी ती आतूर झाली होती. तशी सायंकाळ झाली व लखन घरी आला. परंतु तिनं विचार केला. विचार केला की ती गोष्ट आपल्याला लखनला गुपचूप सांगावी लागेल. मुलांना माहीत व्हायला नको. तशी ती मुलं त्यांच्या जवळपासच राहायची. तसं त्या मुलांपैकी दोन मुलं आज थोडी वयानं मोठीच होती व त्यांना काही गोष्टी कळतही होत्या. लखन सायंकाळी नोकरीवरुन घरी आला होता. त्यानं हातपाय धुतले. त्यानंतर त्यानं जेवन केलं. त्यातच तिनं मुलांना त्या दिवशी झोपू दिलं व सर्व मुलं झोपी गेल्याची सहानुभूती करुन तिनं लखनला म्हटलं, "आपल्याला चार मुलं. आपल्या भावाची चार मुलं. आता ती आपलीच झालीत, रुळलीत. आता त्यांच्यात व आपल्यात आत्मीयता निर्माण झालेली आहे. ही माया संपणारी नाही. परंतु एक भीती आहे." ते तिचं बोलणं. त्यावर आश्चर्य वाटून तो म्हणाला, "कोणती भीती आहे?" "भीती आहे की जर आपल्याला आपली स्वतःची मुलं झाली तर......" "म्हणजे?" "अहो, आपल्याला आपली स्वतःची मुलं झाली तर आपलं प्रेम वाटलं जाईल. त्या प्रेमात भेदभाव निर्माण होईल." "म्हणजे मला समजलं नाही." "त्यात काय असं विशेष समजायचं आहे." "अर्थात?" "अहो, आपली मुलं, आपल्या गर्भातून जन्मास आलेली. त्यातच दुसऱ्याची मुलं. यात बराच फरक आहे. जमीन आसमानचा फरक आहे. आपली मुलं झाली ना की भेदभाव तयार होतो." "कसा?" "आपली मुलं, आपली मुलं वाटतात आणि दुसऱ्याची मुलं दुसऱ्याचीच मुलं वाटतात. एका स्रीचा जर एक पती मरण पावला व तिनं दुसऱ्याच पुरुषाशी विवाह केला आणि त्याच्यापासून निर्माण केलेलं बाळ हे तिला आपलं जरी वाटत असलं तरी तिच्या पहिल्या पतीपासून निर्माण झालेलं बाळ, तेवढ्या प्रमाणात तिला आपलं वाटत नाही. ही तर तुमच्या भावाची मुलं आहेत. जेव्हा मला माझं बाळ होईल अर्थात मी जेव्हा एखाद्या बाळाला जन्मास टाकेल. तेव्हा ही बाळं मलाही अप्रिय वाटायला लागतील." "मग त्यात तुला कसली आली आहे भीती?" "भीती...... भीती आहे, माझ्या गर्भातून एखादं बाळ जन्मास यायची." "मग यात मी काय करु शकतो?" "नसबंदी. तुम्ही आपली नसबंदी करुन घ्या. नसबंदी करुन घ्या. म्हणजे बाळच जन्मास येणार नाही आपल्याला." "हो का. परंतु?" "परंतु काय?" "मी नसबंदी करुच शकत नाही." "का?" "अगं, माझं काम आहे शत्रूंची लढणं. नसबंदी केल्यानं ताकद कमी होते. ती ताकद कमी झाली तर मी शत्रूंशी लढू शकणार नाही. मी जर नसबंदी केली तर अगदी तसंच होईल. म्हणून तू स्वतःच स्वतःचं ऑपरेशन करुन घे गर्भाशयाचं." त्याचा तो सल्ला. तो सल्ला ऐकायला मिळताच शिवंण्याही त्यावर विचार करु लागली. विचारांती तिला वाटलं, कदाचित नसबंदी केल्यानं लखनची ताकद कमी होवू शकते. त्यांना शत्रूंशी लढावं लागतं. तर मग आपणच करावं ऑपरेशन. तिचा तो विचार. त्यातच तिनं ठरविलेली गोष्ट. ती गोष्ट पार पाडतांना त्या गोष्टीला ती आपलं कर्तव्य समजत होती. शेवटी तिनं कुटुंबनियोजन शस्रक्रिया करुन घेतली. ती वेळ. त्यावेळेपासून शिवंण्यानं त्या चारही मुलींना सांभाळलं. अगदी आपल्या मुलागत सांभाळलं. लहानाचं मोठं केलं. शिक्षण शिकवलं. त्यातच त्यांना आत्मनिर्भर केलं होतं. आज त्या चारही मुली आपल्या आपल्या पायावर उभ्या झाल्या होत्या. **********************९********************* अलिकडील काळात जो व्यक्ती सैनिक बनून आपलं रक्षण करतो. तो निवृत्त झाल्यावर आपल्या घरी जेव्हा परत येतो. तेव्हा खरं तर त्याची समाजात इज्जत करायला हवी असते. परंतु तसं घडत नाही. त्याच्याच आजुबाजूचा समाज हा त्यांची हेळसांड करते. त्याला इज्जत प्रदान करत नाही. त्यातच त्याचा सन्मान होत नाही. हे वास्तविक सत्य चित्र आहे. विशेष म्हणजे तो आपल्यासाठी प्राणाची बाजी लावतो ना. मग त्याचाही सन्मान करायला हवंच. कारण तो आहे, म्हणून आपण आहोत. तो जर नसता तर आपण गुलाम असतो आणि गुलामाला कवडीभरही इज्जत नसते. हे आपण मानायला हवे आणि हेच सत्य आहे. सैनिक...... देशाच्या सुरक्षेचे आधारस्तंभ. काय मिळतं त्यांना. वेतन ! किती? तेही भरपूर. म्हणतात की सैनिकांना वेतन भरपूर असतं. परंतु जे वेतन मिळतं ना. ते वेतन त्यांच्या जीवाच्या किंमतीपेक्षा अतिशय अल्प असतं. कारण त्यांना जी ड्युटी करावी लागते. त्या ड्युटीची शाश्वतीच नसते. एकदा का सैनिक घरातून बाहेर पडलाच तर तो परत घरी येईलच. असं वाटत नाही. सैनिकांची ड्युटी तसं पाहिल्यास कोणीच स्वखुशीनं करायला पुढं येत नाहीत. ती नोकरी लोकं मजबुरीनं करतात. कोणी वेतन जास्त आहे, असं समजून नोकरी करतात. कोणी घरची परिस्थिती दयनीय आहे म्हणून नोकरी करतात तर कोणी नोकरीच लागत नाही म्हणून नोकरी करतात. परंतु ही नोकरी करतांना ज्या हालअपेष्टा होतात. त्या असह्य असतात. तो वाळवंटी भाग. ती रेताड भुमी. वरुन सुर्याचं प्रखर ऊन. त्यातच कधी पाण्याचा अभाव. कधी तिथं वादळाची भीती आणि त्या वाहणाऱ्या वावटळानं उडणाऱ्या रेतीनं दबून जाणारं आपलं शरीर. त्यातच कधीही शोध न लागणारं पार्थीव. या सर्व गोष्टी वाळवंटात घडत असतात. तरीही देशाचा सैनिक अशा वाळवंटी प्रदेशात उन्हातान्हाचा त्रास न बाळगता आपली नोकरी इमानीइतबारे करीत असतो. ही झाली वाळवंटी भागातील नोकरी. बर्फाच्छादित भागातही अशीच नोकरी करावी लागते, जीव मुठीत घेवून. तो वरुन पडणारा बर्फ. ती अंगातील रक्त गोठविणारी थंडी. कधी त्या बर्फात कोण दबून पडेल. हे सांगायला पर्याय नसतो. तहान जर लागलीच तर बर्फाशिवाय प्यायला पाणी नसतं. तापमान एवढं शुन्य अंश सेल्सिअस पेक्षा कमी असतं की तिथं बर्फ वितळवून त्याचं पाणी बनवायलाही वेळ लागतो. त्यातच बर्फ वितळल्यानंतर ते पाणी शुद्ध स्वरुपात प्यायला मिळेलच याची शाश्वती नसते. अशा ठिकाणी सैनिक काम करीत असतात. तसं काम करणं कठीण असतं. परंतु उपाय नसतो. तसं पाहिल्यास साऱ्याच ड्युट्या कठीण असतात. सर्वांनाच वाटते की माझी ड्युटी कठीण. परंतु सर्वात कठीण जर ड्युटी असेल तर ती आहे सैनिकांची ड्युटी. समजा बर्फाच्छादित वा रेताड वाळवंटातील भाग सोडला तर बाकी ठिकाणच्याही ड्युट्या करणं सैनिकांसाठी सोपं नसतं. समजा ज्या ठिकाणी बर्फ पडत नसेल, ज्या ठिकाणी रेतीचा भाग नसेल, परंतु जंगलाचा मैदानी जर भाग असेल तर तिथंही धोका संभवतो. तिथं हिंस्र श्वापदांचा धोका असतो. ते हिंस्र प्राणी पाठीमागून हल्ले करतात व सैनिकांना मारुन मोकळे होतात. एक प्रकारचे शत्रू परवडतात की ज्यांचा हमला दिसू तरी शकतो. परंतु हिंस्र श्वापदांचा हमला दिसून पडत नाही. प्रतिकार जरी करतो म्हटलं तरी प्रतिकार करायला पुरेसा वेळच मिळत नाही. हा झाला मैदानी प्रदेशातील जंगलाचा भाग. कधीकधी त्यांची ड्युटी पर्वतीय प्रदेशात लागते. ज्या प्रदेशात हिंस्र प्राण्यांची तर भीती असतेच. व्यतिरिक्त चढण्या उतरण्याचीही कसरत असते. पर्वत चढायला व उतरायला नाकीनव येतं. तरीही ती ड्युटी करावीच लागते. पर्याय नसतो. त्यातच याही ठिकाणी हिंस्र श्वापद जेरीस आणत असतात सैनिकांना. सैनिकांची ड्युटी भयावह स्वरुपाची असते. त्यांना चारही बाजूनं दक्ष राहावं लागतं. ते जर सावध नसतील तर अनर्थ होतो. कधी बंदूकीची गोळी त्यांचा समाचार घेते तर कधी हिंस्र श्वापदं. आपली ड्युटी तेवढी भयावह नाही. तरीही आपण आपल्या ड्युटीला भयावह समजतो. त्यातच कोणी चांगली जर ड्युटी करीत असेल तर त्याच्या ड्युटीमध्ये अडथडा आणत असतो. त्यातच असं दाखवतो की आमचीच नोकरी कठीण आहे. इतरांची नाही. परंतु कधीतरी सैनिकांच्या जीवनात जावून पाहा. कळेल नोकरी म्हणजे काय? नोकरी करणं किती कठीण असतं. विशेष सांगायचं झाल्यास सैनिक हे तलवारीच्या धारेवर चालत असतात नोकरी करतांना. त्यांना दिवस आणि रात्र कोणती ते कळत नाही. याचाच अर्थ असा की त्यांना झोप घ्यायला पुरेशी उसंत मिळत नाही. चोवीस तास सतत पहारा देत राहावं लागतं. त्यातच जेवनही बरोबर पोटात जात नाही. कधी किड्या मुंग्यावरचं जीवन तर कधी झाडाचा पालापाचोळा, कधी जनावरांचं सडलेलं मांस यावर गुजराण करावी लागते. म्हणूनच सैनिक जीवन हे आपण समजून घ्यायला हवे. त्यातच त्यांचा सन्मान जर आपल्याला करणं जमत नाही तर निदान त्यांची आपण हेळसांड तरी करु नये. त्यांनाही सन्मान द्यावा. हे तेवढंच खरं. जेणेकरुन त्यांचं जे आपल्यावर कर्ज झालेलं असेल, ते तरी चुकवता येईल. ती कठीण परिस्थिती. अशाही कठीण परिस्थितीत लखन इमानीइतबारे नोकरी करीत होता. कधी युद्धही होत असत. परंतु घाबरुन न जाता तो युद्धात सहभागी होत असे. त्यातच शौर्यानं लढून तो एकेक पदक जिंकून घेत होता. शिवाय असे पदक जिंकतांना त्याची रँकही वाढत चालली होती व आज त्याला मेजर नावाची पदवीही मिळाली होती. लखनची आता मेजर म्हणून ओळख निर्माण झाली होती. त्यानं बरेच दिवसपर्यंत सैन्यात काम केलं व आज तो सन्मानानं सैन्यातून निवृत्त झाला होता. लखन सैन्यातून निवृत्त झाला होता. तो जेव्हा सन्मानानं सैन्यातून निवृत्त झाला. तेव्हा त्याला त्याच्या उदरनिर्वाहासाठी एक शेतजमीन मिळाली होती. सरकारला वाटत होतं की लखन आज सैन्यातून निवृत्त झाला. आता त्याला काम नाही. उदरनिर्वाहाचं साधन नाही. तेव्हा त्याला उदरनिर्वाहाचं साधन मिळावं. ते सरकारचे विचार. म्हणूनच सरकारनं त्याला मदत म्हणून सरकारी जागा दिली. परंतु लखन सुरुवातीपासूनच परोपकारी होता. परोपकार त्याच्या अंगी कुटकूट भरला होता. लखन जसा परोपकारी होता. तसाच तो सेवाभावीही होता. तो निवृत्त झाला होता सैन्यातून. ज्यात उदरनिर्वाहासाठी त्याला साधन म्हणून शेतजमीन मिळाली होती. परंतु अशी शेतजमीन मिळाल्यानंतर लखन त्या शेतजमीनीसाठी आसुसला नाही. त्याला वाटलं की ही शेतजमीन आपण एखाद्या वृद्धाश्रमाला दान द्यावी. तसा विचार करताच दान कोणाला द्यावी म्हणून तो विचार करु लागला. अशातच त्याला आठवला त्याचा मित्र. जो मित्र सैन्यातच होता. त्यालाही शेतजमीन मिळालीच होती. ती शेतजमीन लखनच्याच शेतजमीनीला लागून होती. लखनच्या जसं लक्षात आलं. तसं त्यानं दान दिली जमीन व सांगीतलं की या जागेत सदर व्यक्तीनं वृद्धाश्रम बनवावं. म्हणजे वृद्धांना आधार देता येईल. तो त्याचा विचार व त्या विचारानुसार लखननं आपल्या मित्रांना दान दिलेली जागा. ती जागा वृद्धाश्रमाला दिलेली. त्यातच त्या जागेवर त्यांनी वृद्धाश्रम साकार केलं. आज ते वृद्धाश्रम सुरु होतं. ते वृद्धाश्रम थाटात मिरवीत होतं आणि त्याच वृद्धाश्रमाअंतर्गत लखन वृद्धांची सेवा करीत होता. त्यातच त्याच काळात मेजरला निवृत्तीवेतन असल्यानं तो आपल्या भावाची त्यानं दत्तक घेतलेली मुलं पोषत होता. त्यांना शिकवीत होता व लहानाचं मोठं करीत होता.**********************१०******************* शिवंण्या आजपर्यंत घरातच राहणारी एक महिला होती. लखन आज निवृत्त झाला होता. त्यातच तो वृद्धाश्रमात वृद्धांची सेवाही करीत होता. त्यालाही पैसे लागत असत. त्याला निवृत्तीवेतन होतं. परंतु तेवढ्या वेतनानं त्याचा घरखर्च पुर्ण होत नव्हता. घरपरीवार चालत नव्हता. अशातच तिला वाटत असे की आपल्या पतीनं एखादी नोकरी करावी. परंतु कोणतीच नोकरी तिचा पती करीत नव्हता. त्यातच तिला वाटत असायचं की आपणच एखादी नोकरी करावी. मेजरसाहेबांना नोकरी करु करु कंटाळा आला असेल. आपलाही खर्च चालावा. त्यासाठी आपणही एखादी नोकरी करावी. हा तिचा हेतू. तिचा पती नोकरी करु शकत नसल्यानं तिच्यासमोर प्रश्न उभा राहिला होता. तशी ती खुप शिकली होती. तिला प्राध्यापिकेची नोकरी लागू शकत होतीच. पर्यायी तिनं लखननं नोकरी करावी म्हणून त्याला बऱ्याच विनंत्या केल्या. शेवटी तिनं आपल्या साडीचा पदर खोचला व ती नोकरी करायला बाहेर पडली. शेवटी तिला एक नोकरी चालूनच आली. ती प्राध्यापिकेची नोकरी होती. शिवंण्यानं प्राध्यापिकेची नोकरी पकडली व ती पैसा कमवू लागली. त्यातच त्या पैशातून त्यांच्या लेकरांचे पोट भागू लागले होते. तसं पाहिल्यास शिवंण्या ही काही त्याच्या दत्तक मुलाची स्वतःची आई नव्हती. परंतु तिनं त्या मुलांची जी सेवा केली. ती स्वतःच्या लेकरागतच सेवा केली होती. आज ती मुलं मोठी झाली होती. आत्मनिर्भर झाली होती. त्यातच त्या मुलींचे विवाहही झाले होते. लखन व शिवंण्यानं आपण वाढविलेल्या मुलीचे विवाह थाटामाटात करुन दिले. त्यानंतर त्या मुली आपल्या संसारात रमल्या होत्या. त्यातच त्यांचे पाल्य असलेली आई शिवंण्या ही वयोवृद्ध होवून आज ती निवृत्त झाली होती. तसे वडील असलेले लखनही वयोवृद्ध झाले होते. दत्तक पाल्यांचे ते आईवडील. लखन व शिवंण्या. आज ते म्हातारे झाले होते. ज्यांनी निरपेक्षपणानं त्यांना लहानाचं मोठं केलं होतं. त्यांची इच्छा होती की त्यांनी आपला म्हातारपणाचा काळ त्यांच्या घरी काढावा. त्यांनी तिथंच राहायला यावं. तसा विचारही त्यांनी त्यांच्या समोर मांडला होता. परंतु त्यावर त्यांनी तिथं जाण्याचं टाळलं. एवढंच नाही तर त्यांनी आपलं स्वतःचं राहातं हक्काचं असलेलं घर देखील एका संस्थेला दान करुन टाकलं होतं. एवढंच नाही तर त्यांनी कितीतरी आपल्या रकमेतील पैसे लोकांना दान केले होते आणि आपलं स्वतःचं शरीरही रुग्णालयात दान केलं होतं. त्यांना वाटत होतं की आपण लोकांच्या कामात यावं. आपला पैसा लोकांच्या कामात यावा. शिवाय आपलं घरही लोकांच्या कामात यावं. त्यांनी आपल्याजवळचं सर्वकाही दान केलं होतं आणि आता ते स्वतः एका वृद्धाश्रमात राहू लागले होते. आज लखनला मेजर या नावानं समाजात ओळखलं जाऊ लागलं होतं. त्यातच त्याला लोकं वृद्धाश्रमात राहू नको असंच म्हणत होते. तसं पाहिल्यास त्याला पोषणारेही घटक अर्थात त्यानं पालनपोषण केलेल्या मुली त्यानं आपल्याजवळ यावं असंच म्हणत होत्या. तरीही तो जात नव्हता. त्याचं कारण होतं त्यानं अनुभवलेलं ते एक प्रकरण. ज्या प्रकरणानं त्याला वृद्धाश्रमात राहायला मजबूर केलं होतं. ते प्रकरण...... ते प्रकरण त्याच्या चांगलंच जिव्हारी लागलं होतं. ते प्रकरण होतं, त्याच्या एका मित्राचं. तो मित्र रेल्वेत होता व त्या मित्राला मुलं नव्हती. म्हणूनच त्यानं आपल्याच भावाच्या एका मुलाला दत्तक घेतलं होतं. त्या मित्रानं आपल्या भावाच्या मुलाला आपल्याजवळच ठेवून शिकवलं. लहानाचं मोठं केलं. घर बांधलं व तेही त्याच्या नावानं करुन दिलं. नोकरीही लावून दिली. परंतु जेव्हा त्याचा वृद्धापकाळ आला. तेव्हा मात्र तो दत्तक मुलगा त्याची सेवा करीत नव्हता. उलट त्यानं त्याला मारहाण केली होती. एवढंच नाही तर त्यांना किरायानं राहायला मजबूर केलं होतं. लखनला वाटत होतं की ज्या माणसानं आपल्या भावाचा मुलगा दत्तक घेतला. त्याला लहानाचं मोठं केलं. शिकवलं व घरंही बांधून दिलं. त्यातच नोकरीही लावून दिली. त्याच मुलानं त्यांना काय दिलं. मारहाण आणि वेदनामयी चटके. शिवाय घरातून हाकलून देवून किरायानं राहायला मजबूर केलं. आपणही त्याच मित्रासारखेच आहोत. आपल्यालाही स्वतःची मुलंबाळं नाहीत. आपल्याला चार मुली आहेत. परंतु त्याही दत्तकच. शिवाय त्या मुली आहेत. मुलं नाहीत. त्याही मजबूर व अवलंबून आहेत आपल्या पतीवर. पतीनं जर म्हटलं की या म्हाताऱ्यांना हाकलून दे. तर आपल्या मुलींना विनाकारण तसं पाऊल उचलावं लागेल. विनाकारण मुलींना त्रास होईल. त्यापेक्षा आपणच स्वतः आपलं शहाणपण आपल्याच जवळ ठेवून त्यांच्याजवळ जावू नये. वृद्धाश्रमात राहावं. त्यांच्या दूर. तो लखनचा विचार. त्या दिवसापासून तो वृद्धाश्रमात राहू लागला होता. त्याची पत्नी शिवंण्याही त्याचेचजवळ राहू लागले होते. त्यांनी वृद्धाश्रमाला वृद्धाश्रम नाही तर आपलं घर मानलं होतं. लखन वृद्धाश्रमात राहात होता. तो नित्यनेमानं सकाळी उठायचा. अंघोळ करायचा व वृद्धाश्रमातच असलेल्या मंदिरात पुजेसाठी निघून जायचा. पुजा झाली की थोडासा व्यायाम करायचा. त्यानंतर नाश्त्याची वेळ व्हायची. तेव्हा तो नाश्ता करायचा आणि नाश्ता करता करता तो वृद्धाश्रमातील लोकांशीही संवाद साधायचा. त्याला त्यांच्याशी संवाद करणं आवडायचं. त्याचं कारण होतं, त्याचं लेखकी जीवन. तो लेख लिहायचा. टिपण काढायचा आणि लिहित बसायचा. ते संवाद त्याच्या लेखनाच्या कामात येत होते. तो आपल्या सैनिकी जीवनावरही लिहायचा. मात्र शिवण्याचं तसं नव्हतं. शिवंण्या एक प्राध्यापिका होती. ती निवृत्त जेव्हा झाली. तेव्हा ती थोडी वयोवृद्धच झाली होती. तिही लखनसोबत वृद्धाश्रमात आली होती. तिही दररोज लवकर उठत असे. कधीकधी लखनच्या आधी उठत होती ती. उठल्यानंतर ताबडतोब अंघोळ करुन ती फुलं तोडायला जात असे. ती फुलं...... ती फुलं गुलाबाचीच असायची. तिला तो व्हॅलेंटाइन दिवस आठवायचा. आठवायचा तो प्रसंग. ज्या दिवशी तिनं एकट्या बसलेल्या लखनला गुलाबाचं फुलंच दिलं होतं. तीच फुलं ती तोडत असे नित्यनेमानं वृद्धाश्रमात आणि त्या फुलांपैकी एक फुल आधी देवघरात चढवून सर्वात आधी दुसरं फुल ती नित्यनेमानं कालचा प्रेमी असलेल्या व पती बनलेल्या लखनलाच देत असे. त्यानंतर ती, ती फुलं एका लहानशा फुलदाणीत ठेवून ती त्या वृद्धाश्रमातील सर्व स्रियांना वाटत फिरत असे. ते फुल....... ते इवलंसं लहानसं फुल असायचं. परंतु ते फुल मिळताच तेथील सर्व वृद्धांच्या चेहर्यावर माया झलकायची. वाटायचं की ही शिवंण्या म्हणजेच आपली एक मुलगी वा आपला एक मुलगा आहे. एवढं प्रेम करायची शिवंण्या. शिवण्याला वृद्धाश्रमात राहतांना दुःख वाटत नव्हतं. त्यातच तिला कधीच आपण आपली मुलं जन्मास घातली नाही. याचं दुःखही वाटत नव्हतं. तिनं ज्या मुलांना लहानाचं मोठं केलं होतं. त्यांच्यावर जी माया केली होती. ती माया एवढी विशाल होती की तिही मुलं तिला भेटायला येत असत नित्यनेमानं. त्याही मोठेपणाच्या वयात त्यांना गोंजारत असत लहान असल्यासारखे. शिवाय त्यांना मिळालेले पतीदेव सुद्धा चांगलेच होते.*********************११******************** ते वृद्धाश्रम. त्या वृद्धाश्रमात बरेच स्री पुरुष होते. ज्यांचे वय अगदी मरायला टेकले होते. ते सुखसमाधानानं त्या वृद्धाश्रमात आले नव्हते वा त्यांच्या वृद्धाश्रमात येण्यात कोणताच आनंद वाटत नव्हता. तसंच कोणीही त्या वृद्धाश्रमात चांगल्या पद्धतीनं येत नव्हते. कोणी आपल्याच स्वमुलाची मारहाण सहन न झाल्यानं ते वृद्धाश्रमात आले होते. तर कोणी आपल्या सुनेशी वारंवार होणाऱ्या वादातून तंग येवून त्या वृद्धाश्रमात आले होते. कोणी मुलं विदेशातच स्थावर झाल्यानं कोणी सेवा करायला नाही म्हणून वृद्धाश्रमात आले होते तर कोणाला त्यांच्या मुलानं स्वतःचं सुख भोगण्यात आईवडिलांचा त्रास झाल्यानं त्यांना वृद्धाश्रमात आणलं होतं. ते वृद्धाश्रम पवित्र असं वृद्धाश्रम होतं. त्या वृद्धाश्रमात दररोज सकाळ, सायंकाळ देवाची आरती, भजन होत असे. त्यातच वृद्धांना विरंगुळा म्हणून त्या वृद्धाश्रमात कवीसंमेलन, व्याख्यान, बोधपर कथाकथन, परिसंवाद याचंही आयोजन व्हायचं. अशाच कार्यक्रमात रमत असतांना त्या वृद्धांना विरंगुळाच वाटायचा व ते आनंदी राहात असत. परंतु कधी सायंकाळी जेवन झालंच तर ते वृद्ध आपल्या गतकाळातील दुःखी जीवनाबद्दल गतकाळातील गोष्टी सांगत असत. तेव्हा त्यांना शिवंण्या समजावीत असे व सांगत असे की त्यांनी गुलाबाप्रमाणे राहावं. गुलाब जसा काट्यावर फुलत असतांना काट्याचा विचार करीत नाही. ते टवटवीतच दिसतं. जणू हसत आहे आपल्याच तालात असं. ते वर म्हणजे उच्चतम स्थानावर गेलेलं असतं आणि तिथंच फुललेलं असतं. ते फुल खाली कधीच बघत नाही. ते खाली पाहात नसल्यानं खालच्या त्याच्या दांडीवर काटे असतात की नसतात, हेही त्याला कळत नाही. ते आपल्या स्थानावरुन खाली येत नाही. तसंच आपण आपलं जीवनही ठेवावं. तुम्ही आपल्या घरच्या परिवारांनी दिलेल्या दुःखानं त्रस्त आहात. तेव्हा तो गतकाळ तुम्ही विसरावा. कारण तुम्ही गुलाबासारखं काट्याचं आयुष्य शोषलं आहे मुलांना लहानाचं मोठं करतांना. आता तुम्ही तुमच्या मार्गात काटे होते की नाही. हे सारं विसरा. आनंदी जीवन जगा. विचार करा की मी माझं जन्माला घातलेलं मूल सुखी आहे ना. त्याच्या जीवनात आपल्यामुळं कलह निर्माण झाला होता ना. मग ते जर सुखी आहे आणि आपल्यामुळंच ते दुःखी होतं तर त्याला सुखी राहू द्या. पाहा प्राणी पक्ष्यांच्या जीवनात डोकावून. त्यांची मुलं थोडी मोठी झाली. स्वतःचं पोट भरणारी झाली की ती मुलं सोडतात. आयुष्यभर त्यांनी त्यांना पोषावं याचाही विचार करीत नाहीत ते. आपलंही जीवन तसंच. पशुपक्ष्यांसारखंच समजा. ती मोठी झाल्यावर त्यांचं सुख बघणारी. आपण खरंच महान आहात. एक पुण्याचं कार्य तुम्ही केलेलं आहे. सृष्टी निर्माण करणारा घटक निर्माण केलाय. परमेश्वराचं काम केलंय तुम्ही. तेव्हा सृष्टी निर्माण करणारा घटकांकडून अपेक्षा करु नका. त्याला सृष्टी निर्माण करु द्या. शिक्षण निःशुल्क व्हायला हवं. मेजरसाहेबाची इच्छा. गोरगरीबांची मुलंही शिकायला हवी. लखनला अनाथ मुलांबद्दल कळवळा वाटत होता. त्यासाठी त्यानं आपल्याच भावाची मुलं दत्तक घेतली होती. त्यांना शिकवलं होतं. लहानाचं मोठं केलं होतं. सांभाळलंही होतं. एवढंच नाही तर आपल्या पायावर उभंही केलं होतं त्यांना. मात्र अपेक्षा ठेवली नव्हती वा कोणतीच त्यांच्याकडून अपेक्षाही केली नाही. तसाच त्यांना कळवळा वाटायचा वृद्ध माणसांबद्दल. त्यासाठी ते स्वतः वृद्धाश्रमात वास्तव्याला आले होते. मनापासून वाटत होतं की वृद्ध माणसांना त्यांच्या मुलांचा आधार असतो. परंतु त्या वृद्ध माणसांना त्यांच्या मुलांनी हाकलून लावलं तर ती माणसं कुठं जाणार? ती वृद्धाश्रमातच येतील. परंतु वृद्धाश्रमात आल्यावर जर इथंही अवहेलना होत असेल तर त्यांना कितीतरी पटीनं दुःख होईल. त्यावर त्यांना मात करता यावी म्हणून लखन जेव्हा वृद्धाश्रमात आला. तेव्हा त्यांची पत्नी दररोज सर्वांना गुलाबाचं फूल देवू लागली. त्यातच विरंगुळाच म्हणून त्यांना स्वरचीत गाणेही ऐकवू लागली. तसाच लखनही स्वतः कवने बनवून त्यांच्या मनोरंजनासाठी वृद्धाश्रमातच कार्यक्रम करु लागला होता. अनाथ व वृद्धांना जशी मदत केली होती लखननं. तशीच मदत गोरगरिबांची मुलं शिकावी म्हणून त्यांनाही तो मदत करु लागला होता. तो शाळेशाळेत जात असे व तेथील गरीबांच्या लेकरांना वह्या, पुस्तके भेट देत असे. कधी गरिबांच्या मुलांना वापरण्यासाठी पोशाखही घेवून देत असे. हेच त्यांचं कार्य पाहून एका शिक्षण संस्थेतील संस्थाचालक एक दिवस त्याच्याकडे आला. लखनचं प्रत्येक शाळेत जावून वह्या पुस्तके व पोशाख वाटणं. शिक्षणाला पैसे लागत असल्यानं स्वतःच गरिबांची मुलं दत्तक घेणं. त्यांच्या शिक्षणासाठी पैसे देणं. ज्यांची परिस्थिती विपरीत आहे. त्यांना सांत्वना देणं. सांत्वना केवळ शब्दानं न देता धनानंही देणं. साऱ्याच गोष्टी लखन करीत होता. हे सर्व त्याला मिळणारी पेन्शन व त्याच्या पत्नीला मिळणाऱ्या पेन्शनमधून साकार करता येत होतं. वाटत होतं की आपल्याजवळ येणारा पैसा, आपण वाचवायचा कुणासाठी? आपल्याला स्वतःचं लेकरु नाही आणि आपण वाढविलेल्या भावाच्या मुली आज आत्मनिर्भर आहेत. त्या आपल्यावर अवलंबून नाहीत. अन् त्यांना का बरं मिळकत द्यावी? त्यापेक्षा ही गरिबांची मुलं शिकली तर त्यांनाही आपल्या पायावर उभं राहता येईल. त्यासाठीच त्यांचा प्रयत्न. त्यांचं हे रोजचं कार्य. ते कार्य पाहून तो एका शाळेचा संस्थाचालक त्यांच्याकडे जेव्हा आला. त्यानं प्रस्ताव ठेवला. त्या प्रस्तावावेळेस तो म्हणाला, "साहेब, मला माझ्या शाळेला आपलं नाव द्यायचंय. मी विचारायला आलोय की मी आमच्या शाळेला आपलं नाव देवू काय?" लखन तसं पाहिल्यास स्पष्टवादी होता. त्यांना मदत कळत होती. त्यांनी संस्थाचालकाचं बोलणं ऐकलं. त्यात त्यांना त्यांचा दृष्ट हेतू दिसला. तोच उद्देश हेरुन त्यावर तो म्हणाला, "हे बघा, माझं नाव आपण आपल्या शाळेला देवू म्हणता. ही एक चांगली गोष्ट आहे. परंतु मी स्पष्टपणे सांगतोय की मी आपल्या शाळेला कोणतीच मदत करु शकणार नाही. अन् मी आपल्या शाळेत येणारही नाही आणि आपल्या कोणत्याच व्यवहारात हस्तक्षेप करणार नाही. आपण माझं नाव शाळेला द्या. परंतु शाळेचा दर्जा टिकवून ठेवाल. तो जाऊ देवू नका. त्यातच माझं नाव दिल्यानंतर शाळा नावारुपाला आली. तर त्याचं श्रेय मला मुळीच देवू नका. हं, एक गोष्ट. शाळेचा दर्जा जर वाढवायचा असेल तर माझं नाव द्या. नाहीतर माझं नाव द्यायची गरज नाही." त्या संस्थाचालकानं होकार दिला. त्यानं ते मदत करणार की नाही करणार. या गोष्टीकडे पाहिलं नाही व म्हटल्याप्रमाणे आपल्या शाळेला त्यांचं नाव दिलं. तसं त्यांचं नाव देताच ती शाळाही नावारुपाला आली होती. आज शाळेची इज्जत, इभ्रत वाढली होती. त्यांच्या नावाला वलय असल्यानं शाळेची मुलंही गुणवत्ता यादीत येवू लागली होती. ती शाळा. त्या शाळेला आज लोकं त्यांच्या नावानं ओळखू लागले होते. आज ती शाळा त्यांच्याच नावानं नावारुपाला आली होती. कारण त्यांच्या नावाला वलय होतं. शिक्षण निःशुल्क व्हावं नव्हे तर करायलाच हवं. ही लखनची मनापासून असलेली मनातील इच्छा. परंतु शिक्षण निःशुल्क होऊ शकत नव्हतं. होणारही नव्हतं. त्याचं कारण होतं, संस्थाचालकाचं मालकपण. संस्थाचालक स्वतःला मालक समजत होते. ते अशा शाळेतून अनैतिक मार्गानं पैसे कमवीत होते. त्यातच संस्थाचालक जे होते, ते मंत्रीमंडळातील नेतेच होते. लखनला वाटत होतं की शिक्षण निःशुल्क करायलाच हवं. जेणेकरुन गरिबांच्या मुलांनाही शिक्षण शिकता येईल. तीही मुलं उच्च शिक्षण शिकू शकतील. त्यांनाही उच्च शिक्षण शिकता येईल. परंतु नेत्यांची इच्छा काही औरच होती. त्यांना केवळ शिक्षण व्यवस्थेतून पैसाच कमवायचा होता. त्यासाठी ते प्रयत्न करीत होते. त्यातच त्यांनी पैसा कमविण्यासाठी सरकारचं नियंत्रण नसलेल्या कॉन्व्हेंटच्या इंग्रजी शाळा आणल्या होत्या. त्यांची जाहीरात करीत होते ते. त्या टिकाव्यात म्हणून ते प्रयत्नही करीत होते. ज्यातून मराठी शाळा बंद होण्याच्या मार्गावर उभ्या होत्या. लखनला वाटत होतं की समजा मराठी शाळा बंद झाल्या तर गरिबांच्या मुलांनी शिक्षण घ्यायला जावं कुठं? कारण कॉन्व्हेंटच्या शाळेत शिक्षण हे निःशुल्क नव्हतंच वा कितीतरी प्रमाणात शुल्क लागत होतं. लखनला वाटत होतं की सरकार जर कॉन्व्हेंटच्या शाळेला प्रोत्साहन देत आहे तर त्यांनी गरिबांचीही मुलं त्या शाळेत घ्यावी. ज्या शाळेत लागणारं शुल्क सरकारनंच भरावं. जेणेकरुन गरिबांचीही मुलं शिकू शकतील. ज्यात त्यांना निःशुल्क शिकता येईल. आपली गुणवत्ता वाढवता येईल. लखनला नेत्यांचा राग यायचा. राग यासाठी यायचा की ते स्वतः आपले सर्व प्रकारचे भत्ते वाढवून घेत. परंतु गरिबांच्या शिक्षणासाठी काहीही करीत नसत. शिक्षण निःशुल्क करायला हवं. लखनचा तो विचार. तो विचार करीत होता. 'शिक्षण निःशुल्क करायला हवं. त्याचं कारण आहे विकासाची बुद्धीमत्ता. विकासाची बुद्धीमत्ता ही श्रीमंतांच्याच घरी नसते तर ती गरिबांच्याही घरी असते. मात्र श्रीमंतांची मुलं ही शिक्षणात पुढं जातांना दिसतात तर गरिबांची मुलं ही मागे पडतात. याला कारण आहे पैसा. पैशाच्या बळावर श्रीमंत मंडळी आपल्या मुलांना कॉन्व्हेंटमध्ये टाकतात. त्याची घरीही शिकवणी घेतात. वरुन त्याला महागडे शिकवणी वर्गही लावून देतात. अशी परिस्थिती गरिबांच्या घरी नसते. म्हणूनच गरिबांच्या घरची मुलं शिक्षणात मागे पडतात. त्यासाठी शिक्षण निःशुल्क करायला हवं. जेणेकरुन गरिबांचीही मुलं शिक्षणात पुढं जावून आपल्या बुद्धीमत्तेनं देशाचा विकास साधू शकतील. शिक्षण...... म्हणतात की शिक्षण वाघिणीचं दूध आहे. जो शिकतो, तो गुरगुरतो आणि जे शिकत नाहीत ते गुरगुरत नाहीत, असं मानलं जातं व म्हटलंही जातं. परंतु वास्तविक आजची परिस्थिती पाहता, जो शिकतो, तो गुरगुरतांना दिसत नाहीत तर तो घाबरणारा दिसतो आणि जो शिकत नाही. तो गुरगुरतांना दिसतो. याचं कारण काय असावं? या कारणांचा शोध घेतला असता, जो शिकतो, त्याला संविधानातील कलमा माहीत होतात. माहीत असतात की आपण अमुक अमुक गोष्ट केली की त्याची शिक्षा काय होवू शकते. ते गुन्ह्याला घाबरतात आणि तेवढंच कलमांनाही. म्हणतात की शहाण्या माणसानं कायद्याच्या वाटेला जावू नये. याचं कारण तेच. म्हणूनच ते गुरगुरत नाही. परंतु जी मंडळी शिकलेली नसतात. त्यांना कायद्याची पाहिजे त्या प्रमाणात जाण नसते. तो व्यक्ती गुरगुरतो, कारण कायद्याची जाण नसल्यानं त्याच्या मनात अभय असतं. त्याला कायदे व कलमा तेवढ्या प्रमाणात कळत नाहीत. अशा व्यक्तींकडून जेव्हा गुन्हा घडतो. तेव्हा त्याला कळतं की कायदा हा कायदा आहे. तो काही आपल्या हातचे कळसुत्री बाहुले नाही. अलिकडील काळात पालकवर्ग हा सुज्ञ झालेला आहे. तो परिस्थिती भोगतो. प्रसंगी उपाशी राहतो. परंतु आपल्या पाल्याला शिकवतो. खरं तर संपुर्ण शिक्षणाची प्रक्रिया ही निःशुल्क असायला हवी होती. परंतु ती निःशुल्क नाही. ते शिक्षण घेतांना प्रसंगी खाजगी शाळेतूनच घ्यावं लागतं. त्यातही भेदभाव आहे. खाजगी आणि सरकारी. जर एखाद्या विद्यार्थ्याला उच्च शिक्षण घ्यायचं असल्यास त्याला दोन प्रकारे प्रवेश मिळतो. पहिला प्रकार म्हणजे गुणवत्तेच्या आधारे प्रवेश व दुसरा मार्ग म्हणजे पैशाच्या आधारे प्रवेश. मग त्या विद्यार्थ्यांना कितीही कमी गुण मिळाले तरी तो विद्यार्थी तरुण जातो पैशाच्या आधारावर. त्याची अवस्था पैसा फेक व तमाशा देख अशी होते. जेवढा जास्त पैसा फेकेल, तेवढं चांगलं महाविद्यालय. परंतु ही पैशाची बाब सरकारी महाविद्यालयात चालत नाही. सरकारी महाविद्यालयात गुणवत्ताच लागू होते व ते महाविद्यालयात पाहिजे त्या प्रमाणात टिकत नाहीत. याचाच अर्थ असा की खाजगी जी महाविद्यालये आहेत. त्या महाविद्यालयाला पैसा कमविण्याचा अधिकार आहे व असा पैसा कमविण्याला काही सीमाच नाही. आज देशात अशी बरीच महाविद्यालये आहेत की जी सरकारी स्वरुपाची नाहीत तर खाजगी स्वरुपाची आहेत. अशा महाविद्यालयाचा मूळ उद्देशच पैसा कमविणे हा आहे. मग असा पैसा विद्यार्थ्यांजवळ आहे की नाही हे पाहिलं जात नाही. तशीच ही महाविद्यालये कोणाची असतात. ही महाविद्यालये कोणाची आहेत, याचा शोध घेतांना आवर्जून आढळून येतं की ही महाविद्यालये जास्त न शिकलेल्या अर्थात दोन चार वर्ग शिकलेल्या माणसांची असतात. जे उद्योगपती असतात वा एखाद्या राजकीय पार्टीचे नेते असतात. याचाच अर्थ असा की शिक्षण ही श्रीमंतांची मक्तेदारी झालेली आहे. शिक्षण ही श्रीमंतांची मक्तेदारीच. ज्यांच्याकडे पैसा, त्याचं शिक्षण. मग गुणवत्ता असूनही गरीब घरातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळत नाहीत. ते शिक्षणात मागे पडतात, पैशाच्या आधारावरुन. गुणवत्तेच्या आधारावरुन नाही. अलिकडील काळात शिक्षणाला विद्यार्थ्यांच्या बालपणापासूनच पैसा लागतो. अगदी त्या विद्यार्थ्याला आपली शौच धुवायची अक्कल नसते, त्या काळापासून तो शाळेत जातो व शिक्षण घेत असतो. त्यातच शाळा, ट्युशन यात गुरफटून त्यांची गुणवत्ता वाढत असते आणि ही गुणवत्ता वाढत असतांना पैसा लागतो. पैशाच्या भरवशावर तो मुलगा चांगलं इंग्रजीतून शिक्षण घेत असतो. त्यासाठी पालकही सढळ हातानं खर्च करीत असतात. ज्यांच्याकडे पैसा आहे ते. परंतु ज्यांच्याकडे पैसे नाहीत, ती मंडळी सरकारी शाळेत जात असतात. जिथं इंग्रजी माध्यम नसतं आणि असेलही तरी तिथं व्यवस्थित शिकवलं जात नाही. कारण पालक गरीब असतात. पालक अडाणीही असतात. कारण ते पालक त्या ठिकाणी त्यांची मुले शिकत असतांना ती मुलं खरंच शिकतात का? शिक्षक शिकवितात का? विद्यार्थी कितपत शिकला? हेही पडताळून पाहात नाहीत. शिवाय शिक्षकांना त्याचा जॉबही विचारत नाहीत की ही मुलं का शिकली नाही? सरकारी शाळेतील ही मुलं कशीबशी शिकतात, ज्यांना इंग्रजी अजिबात येत नाही. गणिती क्रिया बरोबर येत नाही. पालक कधी घरी त्याला घेवून बसत नाही. त्याच्या अभ्यासाची ट्युशनमध्ये पुनरावृत्ती होत नाही. तो उच्च शिक्षणही घेवू शकत नाही. कारण उच्च शिक्षणाचं माध्यम हे स्थानिक भाषेतून नसतं. ते विदेशी भाषेतून म्हणजेच इंग्रजी भाषेतून असतं आणि त्याचेजवळ पैसेही नसतात. मग तो उच्च शिक्षण कसा घेवू शकेल? कधी कर्ज काढून त्या विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेण्याचा प्रयत्न जरी केला तरी ते शिक्षणाच्या स्पर्धेतून बाहेर पडतात. कारण असतं, स्थानिक आतापर्यंत शिकलेली भाषा. ती भाषा मातृभाषा असते. विदेशी भाषा नसते. अलिकडील काळात शिक्षण हे गोरगरीबांसाठी राहिलेलं वा उरलेलं दिसत नाही. ते श्रीमंतांचं झालेलं दिसत आहे. अगदी दोन तीन वर्षाची असलेली मुलं जेव्हा शाळेत शिकायला जातात. तेव्हा त्याच्या पालकांना लाखोच्या घरात वर्षाकाठी पैसा द्यावा लागतो आणि स्थानिक भाषेच्या शाळेत शिकवायचे झाल्यास त्या शाळेत मुलं नसतात. शिकविणारे शिक्षक नसतात आणि शिक्षक असलेही तरी ते शिकवीत नाहीत. कारण अल्प असलेली दोनचार मुलं शिकवायला आवडत नाही. मन लागत नाही शिकवायला. अशावेळेस त्रेधातिरपीट उडते. काही शाळा पटसंख्येअभावी बंद होतांना दिसत आहेत. शिक्षण वाघिणीचं दूध आहे. जो शिकेल तो गुरगुरेल. परंतु शिक्षणाची ही अवस्था पाहिली तर जे शिकले, उच्च शिक्षण ज्यांनी घेतलं. त्यांनी आपला फायदा पाहिलेला दिसतो. ते गुरगुरत नाहीत, शिक्षणाच्या असल्या अवस्थेवर. जे शिक्षण आज गरीबांसाठी उरलेले नाही. कारण त्यांनी जे उच्च शिक्षण घेतलेलं आहे. त्यातून ते फक्त पैसा कमविण्याचा उद्देश ठेवतात. ज्यातून ते आपली मुलं पैसे लावून शिकविण्याकडे जास्त कल ठेवतात. अन् ते गुरगुरतील तरी कोणाच्या विरोधात? ज्यांनी त्यांना नोकरी दिली? त्यांच्या पोटाला अन्न दिलं? ज्यांनी त्यांना अन्न दिलेलं आहे, त्यांची शिक्षणाची योग्यता तपासली असता ते दोनचारच वर्ग शिकलेले दिसतात. त्यातच तेच गुरगुरतात अशा उच्च शिक्षण घेतलेल्या माणसांवर. त्यांना आपल्याकडे नोकरी देवून. एखादा अज्ञानी असलेला कंपनीचा मालक मॅनेजर म्हणून ज्या व्यक्तीची नियुक्ती करतो. तो उच्च शिक्षण शिकलेला असतो. परंतु तो जरी उच्च शिक्षण शिकलेला असेल तरी तो मॅनेजर दोन कवडीच्या न शिकलेल्या मालकांपुढं नतमस्तक होतो. एवढंच नाही तर आज ज्या ठिकाणी उच्च शिक्षण मिळविण्यासाठी प्रयत्नांचा आटापिटा केला जातो. त्या ठिकाणची महाविद्यालये चालविणारा मालक हाही दोनच वर्ग शिकलेला दिसतो. त्या दोनवर्ग शिकलेल्या माणसांपुढं उच्च शिक्षण शिकणारी मंडळी ही लाचार बसून रांगेत उभी राहतात. कारण आजच्या शिक्षणानं समाजाची अवस्था ही लाचार बनवली आहे. हे का घडत आहे? याला जबाबदार कोण? तर त्याचं सहज उत्तर मिळतं, सरकार. खरंच अशी समाजाची लाचार अवस्था बनवायला संपुर्णपणे जबाबदार पैसा जरी दिसत असला तरी सरकारनंही समाजाला लाचार बनवलं आहे. त्यांनी शिक्षणाच्या गर्तेत समाजाची मानसिकता ही खाजगी स्वरुपाची केलेली आहे. सरकार कोणतंही शिक्षण निःशुल्क करु शकतो. परंतु ते करत नाही. कारण सरकारमध्ये जे चालविणारे घटक आहेत. त्यांच्याच शाळा आहेत, त्याही खाजगी. त्यांचा उद्देश केवळ पैसा कमविणे आहे व असा पैसा हा त्यांना अशाच खाजगी स्वरुपाच्या गोष्टीतून मिळतो. त्यातच सरकारमध्ये अशीही मंडळी आहेत की जी मंडळी दोनच वर्ग शिकलेली आहेत. ज्यांचं कोणीच ऐकून घेत नाहीत. विशेष सांगायचं झाल्यास शिक्षण हे निःशुल्क व्हायलाच हवे आणि ते सरकारच करु शकतं आणि सरकारनं ते करायलाच हवं. तेव्हाच गरीबांची मुलंही पुढं जावू शकतील. कारण गरीबांच्याच मुलांत जास्त कौशल्य असतं. श्रीमंतांच्या घरात तेवढं कौशल्य नसतं. ते पैशाच्या भरवशावर नक्कीच शिकतात. परंतु जेव्हा शिक्षणाचा उपयोग करण्याची वेळ येते ना. तेव्हा ते गरीबांच्या उच्चशिक्षित मुलांकडेच पाहात असतात. हे तेवढंच खरं. शिवाय देशाचा विकास करायचा असेल तर गरीब मुलांचीच गुणवत्ता कामात येते. श्रीमंतांची नाही. म्हणूनच गरिबांच्या शिक्षणासाठी शिक्षण हे निःशुल्क व्हायलाच हवं नव्हे तर करायलाच हवं. यात शंका नाही.' मेजर साहेबांची खंत. त्यांनाही वाटत होतं की एखादी गरीब विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरु करावी. परंतु आता शाळा पुर्वीसारख्या राहिलेल्या नव्हत्या. आता जर शाळा सुरु करायच्या असतील तर भरपूर पैसे लागत होते. तेवढे पैसे लखनजवळ नव्हते. पेन्शन होती की ज्या पेन्शनमधून ते गोरगरिबांच्या मुलांना फुल नाही तर फुलांच्या पाकळीच्या स्वरुपात मदत करीत होते. ते सरकारी शाळेला प्राधान्य देत होते. **********************१२****************** सरकारी शाळा वाचवा. लखनचा तो विचार. कारण लखनचा काळ म्हणजे कॉन्व्हेंटच्या सुरुवातीचा काळ. तसा तो लहानपणी सरकारी शाळेतच शिकला होता. ज्यातून तो मेजर झाला होता. तो गरिबाचाच मुलगा होता. ज्याला सरकारी शाळेनं सक्षम केलं होतं. लखन त्याबद्दलही विचार करु लागला होता. अलिकडील काळ पाहता मराठी शाळा बंद पडत चाललेल्या दिसत आहेत. कॉन्व्हेंटच्या शाळा वाढत चाललेल्या आहेत व कॉन्व्हेंटच्या शाळेचे प्रस्थही वाढत चाललेले आहे. त्यातच त्यांना आता जाहिरात करण्याची कोणतीही गरज उरलेली नाही. तसं पाहिल्यास कॉन्व्हेंटच्या शाळा भरपूर प्रमाणात आहेत नव्हे तर आजही भरपूर प्रमाणात उघडू लागल्या आहेत व सरकारी शाळा बंद होतांना दिसत आहे. ज्या शाळेत शिक्षण हे निःशुल्क स्वरुपाचं आहे. तसं पाहिल्यास आज सरकारी शाळेत जेमतेम अशीच पटसंख्या दिसतेय. चार ते पाच मुलं आणि त्या शाळेवर शिक्षक पाहिल्यास दोन. त्यातच शिक्षकांचे वेतन भरपूर. त्यामानानं कॉन्व्हेंट शाळेत वेतन कमी आणि विद्यार्थी जास्त. तेच खुपतं सरकारला. म्हणूनच सरकार आज सरकारी शाळा बंद करुन कॉन्व्हेंट शाळेला प्राधान्य देत आहे. कारण त्यात सरकारचाच लाभ आहे. कॉन्व्हेंट शाळा आणि सरकारचा लाभ? विश्लेषणात्मक प्रश्न आहे, तसा विवंचनात्मकही प्रश्न आहे. तशा कॉन्व्हेंट शाळा काढून सरकारला लाभ आहे. तो असा की शाळेवर लक्ष केंद्रित करायला कोणत्याच अधिकाऱ्याला नेमावे लागत नाही. त्यांच्या महागाई भत्त्याचा विचार करावा लागत नाही. ना कोणतेच आंदोलन होत, ना कोणत्या आंदोलनाचा फरक पडत सरकारवर. तसंच कोणत्याच शिक्षकांना शिकवायला वेतनातून पैसे द्यावे लागत. ना शाळा चालवायला अनुदान. ना ओझंही होत सरकारवर. सगळं सुरळीत. पुर्वी खाजगी स्वरुपाच्या अनुदानीत शाळा होत्या. आताही आहेत. अशा शाळा या नेत्यांच्या होत्या. जे सरकारमध्ये होते. आताही आहेत. ज्याला अनुदान मिळत असे व अनुदानातून भरपूर पैसा नेत्यांना कमवता येत होता. आताही कमवता येतो. परंतु तरीही कॉन्व्हेंट शाळा सरकारनं आणल्या. त्याचं कारण म्हणजे जास्त प्रमाणात पैसा कमवता येणं. कारण अनुदान हे सीमीत असतं. कॉन्व्हेंट शाळा. ज्या कॉन्व्हेंटच्या शाळा आहेत. त्या शाळेतून नेत्यांना कितीतरी जास्त प्रमाणात पैसे कमविता येवू शकतात. ज्या पैशाचं मोजमाप होतच नाही. अनुदानाचं मोजमाप तरी करता येतं. कॉन्व्हेंट शाळेत कितीही विद्यार्थ्यांच्या पालकांकडून शुल्क घेतलं. तरी ते देतात. ज्यातून नेत्यांना खाजगी अनुदानीत शाळेतील अनुदान रुपानं मिळणाऱ्या पैशापेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात पैसा मिळू शकतो. अर्थात कमाई करता येवू शकते. पुर्वी खाजगी अनुदानीत शाळेत शिक्षकांना जे वेतन मिळायचं. त्या वेतनातून संस्थाचालक असलेले नेते पैसे कमवत असत. शिक्षकांकडून देण म्हणून त्याच्या वेतनातून पैसे मिळायचे. ज्या कमाईचं मोजमाप नव्हतं. शिक्षकांना धारेवर धरुन पैसे उकळता येत होते. आता शिक्षकही थोडे हुशार झालेले आहेत. ते आता अशा संस्थाचालकाची मनमानी ऐकून घेत नाहीत व कोणताच संस्थाचालक मनमानेल असे पैसे देत नाहीत. मग संस्थाचालकाला पैसे कमवता येत नसल्यानं हा त्यांनी पर्याय काढलेला आहे, कॉन्व्हेंटच्या शाळा काढून आणि पालकही आपली मुलं त्यात टाकत आहेत. त्यांना माहीत नाही की कॉन्व्हेंट शाळा हे संस्थाचालकाचं पैसे कमविण्याचं साधन आहे. तशा सरकारी शाळा नाहीत. गुणवत्ता........ गुणवत्तेच्या बाबतीत विचार केल्यास गुणवत्ता ही सरकारी शाळेतही आहे. तेथील गुणवत्ता वाढावी यासाठीच सरकारनं इंग्रजी माध्यमाचं शिक्षण आणलं. त्यातच काही मुलांना साधे पाढे जरी मराठीतून विचारले तरी सांगता येत नाही. उदा. समजा सत्तेचाळीस लिहायचे असल्यास सत्तेचाळीस लिहिता येत नाही. फोर्टी सेव्हन सांगावं लागतं. आता सरकारी शाळेतील मुलांनाही चांगलं अस्खलितपणे इंग्रजीचं वाचन करता येतं. तसंच मराठीही चांगलंच वाचता येतं. गुणवत्ता ही सरकारी शाळेतील मुलांमध्येही आहे. त्यांना पाढे तोंडपाठ असतात. महाराष्ट्रात दोन सरकारी शाळा अशाही आहेत की त्या शाळेतील विद्यार्थ्यांना शंभरच्या पटीतील पाढे येतात. म्हणजेच शंभरचाही पाढा येतो. काही असेही विद्यार्थी आहेत की ज्यांना दोन्ही हातानं लिहिता येतं तर काही शाळेतील विद्यार्थ्यांना विदेशी भाषा बोलता येतात. तसं कॉन्व्हेंट शाळेत अजुनपर्यंत दिसलं नाही. तरीही काही ठिकाणी विद्यार्थी मागे पडतात. कारण त्यांना शिकविणारे त्यांचे मायबाप मुलांकडे विशेष असं लक्ष देत नाहीत. मुलं शाळेत गेली की नाही. ते त्यांना माहीत नसतं. आपल्या मुलांना सरकारी शाळेत शिकविणाऱ्या पालकांची परिस्थिती नाजूक असल्यानं ते आपल्या पाल्यांना शिकवणी वर्गही लावून देवू शकत नाहीत. शिकलेले नसल्यानं घरीही ते शिकवू शकत नाहीत. केवळ ते शिक्षकांवरच अवलंबून असतात आणि त्यांना शिकविणारे शिक्षक हे स्थानिक ठिकाणी अधिवास करीत नाहीत. ते शहरात अधिवास करतात व लांबून शाळेत येत असतात. ज्यातून ते प्रवास करतांना थकतात. त्यामुळंच त्यांना शाळेत जे शिकवायचं असतं. ते शिकवू शकत नाहीत. ज्यातून अशा शाळेतील पालकांची काही मुलं गुणवत्तेत मागं पडतात. याउलट कॉन्व्हेंटच्या शाळेचं आहे. कॉन्व्हेंटच्या शाळेत गुणवत्ता दिसते. कारण त्या शाळेत नाव टाकणाऱ्या पालकांजवळ भरपूर पैसे असतात. ते आपल्या पाल्यांना शिकवणी वर्ग लावून देत असतात. ते सुज्ञ असल्यानं घरीही आपल्या पाल्यांना शिकवितात. मग गुणवत्ता दिसेल नाही तर काय? सरकारी शाळा या आज जास्तीत जास्त प्रमाणात ग्रामीण भागातच दिसतात व त्यांना शिकविणारे बरेचसे शिक्षक हे शहरी भागात अधिवास करतांना दिसतात. ज्यातून सरकारी शाळेत शिकविणारे शिक्षक कितीही मात्तबर असले तरी पालक, विद्यार्थी व शिक्षक यांच्या एकंदर गोळाबेरजेनं ते विद्यार्थी मागे पडतात. ज्यातून गुणवत्ता ही मागे पडते. हे सरकारी शाळेत घडत असलेलं वास्तविक चित्र आहे. आज सरकारी शाळेत गुणवत्ता दिसत नाही. याला जबाबदार कोण? सरकार, पालक, विद्यार्थी की शिक्षक? जबाबदारी कोणीच स्विकारायला तयार नाही. परंतु नुकसान होत आहे ना. कुणाचं नुकसान होत आहे? उद्याच्या भविष्यातील येणाऱ्या गोरगरिबांच्या लेकरांचं. कोण करीत आहे? आम्हीच करीत आहोत. सुज्ञ असणारे आम्ही सर्वजण. खरं तर आम्ही सरकारी शाळा वाचली पाहिजे म्हणून प्रयत्न करायला हवेत. नेत्यांच्या कॉन्व्हेंट शाळेला बॉय बॉय करायला हवं. कारण सरकारी शाळा वाचेल तर आपण वाचू. कारण येणाऱ्या भविष्याच्या पिढीतील सर्वच मंडळी ही आजच्यासारखी श्रीमंतच असेल असे नाही. त्या पिढीतील सर्वच मंडळी ही आपल्या मुलांना कॉन्व्हेंटचंच शिक्षण देवू शकतील असेही नाही. त्यासाठी सरकारी शाळा वाचवायला हव्यात की नाही? आजच्या सरकारी शाळा उद्या अस्तित्वात असतील तरच उद्याची गरीब पिढी आपल्या मुलांना भविष्यात शिकवू शकतील. अन् उच्च शिक्षण देवू शकतील. जर त्या शाळाच नसतील तर शिक्षण असेल काय? शिक्षण अजिबातच नसेल. हा संभाव्य धोका आहे. म्हणूनच सरकारी शाळा टिकविण्याची गरज आहे. वाचविण्याची गरज आहे. निदान गोरगरिबांच्या मुलांसाठी आणि तेवढंच ग्रामीण लोकांच्या मुलांसाठी. कारण सर्वात जास्त गरीब लोकं ग्रामीण भागातच असतात. शहरात नाही. विशेष म्हणजे गरिबांची मुलं शिकायला हवी. त्यांनाही शाळा शिकता यावं. आज नाही तर भविष्यातही कोणीच अडाणी राहू नये. असं सर्वांनाच वाटतं. परंतु अलिकडील काळात सरकारी शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. त्या शाळा सुरु ठेवणे परवडत नाहीत. कारण संभाव्य धोका लक्षात घेऊन लोकं सर्रासपणे आपल्या मुलांची नावे कॉन्व्हेंटला टाकतात. सध्या विद्यमान सरकारी शाळेत मुलंच मिळत नाहीत. तेथील कार्यरत असणाऱ्या शिक्षकांना जास्त वेतन जातं. ती बाब लक्षात घेवून शासन ती शाळाच बंद करते. अशा अनेक शाळा बंद होत आहेत. ही चिंतेची बाब आहे. अन् ज्या कॉन्व्हेंट शाळा आहेत. त्या शाळेला सरकार सरकारी शाळा बनवायला तयार नाहीत. त्यातच कोणी पालकानं अशा कॉन्व्हेंटला आपल्या पाल्यांचं नाव जर टाकलं. तर त्याच्या शिक्षणाचे पैसे भरायला सरकार तयार नाही. त्याचं कारण आहे, सरकारची कमाई. नेत्यांचीही कमाई. ती कमाई निश्चितच बंद होवू शकते. शिवाय सरकारी शाळा बंद झाल्याशिवाय कॉन्व्हेंटच्या शाळा चालणार नाहीत हे सरकारला माहीत आहे व सरकारच्या नेत्यांनाही माहीत आहे. म्हणूनच सरकारी शाळा बंद होतात नव्हे तर जाणूनबुजून केल्या जात आहेत. महत्वपुर्ण बाब ही लक्षात घेण्यासारखी आहे. ती म्हणजे सरकारी शाळा बंद करणे यास जबाबदार सरकार नाही. नेतेच आहेत, ज्यांच्या शाळा आहेत. दुसरा महत्वपुर्ण घटक आहे, पालक. पालकांना उद्याच्या संभाव्य प्रतिकूल, विपरीत परिणामाची चिंता नाही. चिंता आहे आपल्या पाल्यांच्या भवितव्याची. म्हणूनच त्यांचं कॉन्व्हेंटला टाकणं. परंतु भविष्य मात्र अंधकारमय आहे. कारण पिढीनंतर पिढी जात असते. कोणी कधी श्रीमंत तर कोण केव्हा गरीब होईल ते सांगता येत नाही. समजा एखाद्यावेळेस एखाद्या श्रीमंत माणसाची भविष्यात येणारी पिढी गरीब झाली तर....... कारण एकेकाळी हस्तिनापूरात कौरवाचं शासन होतं. तिथं कालांतरानं पांडवांनी राज्य केलं. एके काळात नल श्रीमंत होता. तर कालांतरानं तो गरीब झाला. एकेकाळी धीरुभाई अंबानी गर्भश्रीमंत होता. परंतु त्याच्या दोन मुलांपैकी एक निव्वळ गरीब आहे. प्रश्न तेव्हाच पडेल. जेव्हा गरिबी येईल. तेव्हा विशेष म्हणजे आज सरकारी शाळा वाचविण्याची गरज आहे. ती जर वाचली नाही. वाचवली गेली नाही तर उद्याचं भविष्य अंधकारमयच असेल. शिक्षण श्रीमंताची मक्तेदारी बनेल. गरिबांची धात्री बनणार नाही. तेव्हा आजच उद्याचा संभाव्य धोका लक्षात घेवून आजच सरकारी शाळा वाचविण्याची मोहीम राबवावी. जेणेकरुन उद्याचं भविष्य अंधकारमय बनणार नाही. लखनला आठवत होता बालपणीचा काळ. त्या काळात कॉन्व्हेंट नव्हतंच. तो गावात राहात होता व त्या गावात दोन शाळा होत्या. एक खाजगी अनुदानीत होती, तर दुसरी जिल्हापरीषदेची सरकारी शाळा होती. पहिल्या शाळेला एक मालक होता. ज्याला संस्थाचालक म्हणत तर दुसऱ्या शाळेचा कारभार हा प्रशासन पाहात असायचा. दोन्ही शाळेत शिक्षण चांगलंच होतं. त्यातच जिल्हा परिषदेच्या सरकारी शाळेत विद्यार्थी संख्या जास्तच होती आणि खाजगी अनुदानीत शाळेत विद्यार्थीसंख्या कमी होती. त्याला आठवत होतं ते बालपणीचं शिक्षण. बरीचशी मुलं गरिबांचीच होती. त्या मुलांना नीट अंगावर कपडेही वापरायला मिळत नसत. कधीकधी ती मुलं चड्डीवरच शाळेत येत आणि त्यांना परत पाठवलं तर ती अजिबात शाळेचा दरवाजा खुंदत नसत. त्यातच त्यांच्या आईवडिलांना ती बाब समजावून सांगीतली तर ते म्हणत की आमच्याकडे पैसेच नाहीत. मग कापड कुठून घेणार? तसं पाहिल्यास तो काळ. त्या काळात एकाएका घरी मुलंही जास्त जन्मास येत असत आणि सगळी मुलं जिल्हापरीषदेच्या शाळेत येत असत. ती जिल्हापरीषद शाळा. त्या शाळेत मुलांना जेवन मिळते की नाही. याचा विचार केला जायचा. त्यातच मुलं उपाशी राहू नये म्हणून शासनानं उकळपेंढी योजना आणली होती. ज्यात मध्यान्हसुट्टीत उकळपेंढी बनवली जात असे व ती मिळत असे. तिला चव व्यवस्थीत नसायची. परंतु मुलं भुकेपोटी आवडीनं खात असत. त्यात भरपूर प्रमाणात गोडवा भरलेला असायचा. सायंकाळी चार वाजता दूध मिळायचं. त्यासाठी काही मुलं आपल्या घरुन साखर आणायचे. समाजात काही लोकं त्याही काळात श्रीमंत होते व त्यांना गरिबी जणू आवडतच नाही असे ते वागत असत. याच कारणानं वा गरीब श्रीमंतपणाच्या भेदभावानं त्यांनी आपली मुलं सरकारीच परंतु खाजगी अनुदानीत शाळेत टाकली होती आणि गाजावाजा करायचे की त्या मुलांना चांगलं येतं. त्यांना जेवढं येतं, तेवढं शिक्षण जिल्हापरीषदेच्या शाळेतील मुलांना येत नाही. तसं पाहिल्यास त्यांना चांगलंच यायचं. त्याचं कारण असायचं, त्यावेळच्या श्रीमंत पालकांचा पैसा. त्याही काळात शिकवणी वर्गाचं फॅड होतंच व मुलं सायंकाळी घरी आली की शिकवणी वर्गाला जायची. शिवाय काही काही सुशिक्षीत पालक घरीही शिकवायचे. ती सोय जिल्हापरीषद शाळेत नव्हती. जिल्हापरीषद शाळेत येणारी मुलं ही अशिक्षीत पालकांचीच येत असायची. जे पैशानच नाही तर शिक्षणानंही मागासलेलेच असायचे. त्यातच शाळेत मुलं काय करतात. ती शिकतात की नाही. त्यांना शिकवलं जातं की नाही. याकडे लक्ष द्यायचे नाही. लखनला पकडून लखनच्या घरी चार भावंडं. त्याचे वडील मजूरच होते. कसंतरी त्यांनी आपल्या मुलांना शिक्षण शिकवलं. त्यातच बाकीचे भाऊ जास्त शिकले नाही. गावात असलेल्या दहावीपर्यंतच्या शाळेत ते शिकले. त्यातच दोन भाऊ नापास झाले आणि एक पास झाला. परंतु जाण्यायेण्याची सोय नसल्यानं त्यानं शिक्षणच सोडून दिलं. लखन हा लहानपणापासूनच हुशार होता. तो शिकला. त्यानं शालान्त परिक्षा पास केली. तसं पाहिल्यास त्या काळात शालान्त परिक्षा पास करणं म्हणजेच तारेवरची कसरतच होती. बरेचसे विद्यार्थी शालान्त परिक्षा पास होत नसत. लखनचा भाऊ शालान्त परिक्षा पास झाला होता. परंतु घरी पैसे नसल्यानं त्यानं शिक्षण सोडलं व तो गावातच मोलमजुरी करायला लागला होता. अशातच लखनही शालान्त परिक्षा पास झाला. ती शालान्त परिक्षा. कोणी साधारणपणे पास न करीत असलेली परिक्षा. ती परिक्षा लखन पास होताच सर्वांना आनंदीआनंद झाला. आता पुढे काय? सर्वांना कुटुंबात प्रश्न पडला. बाकीचे भाऊ म्हणत होते की आता पुढचं शिक्षण लखननं घेवू नये. पुढचे शिक्षण लखनला घेताच येवू शकत नाही. कारण त्यात अनेक अडचणी आहेत. पहिली अडचण आहे पैशाची व दुसरी अडचण आहे जाणे येणे करायची. दोन्ही गोष्टी कुटुंबाला न जमणाऱ्याच आहेत. ते कुटुंबाचं बोलणं. त्यावर उत्तर देत मधातच बोलत मोठा भाऊ म्हणाला. जो शालान्त परिक्षा पुर्वकाळात पास झाला होता. "मी शालान्त परिक्षा पास झालोय. परंतु आपली परिस्थिती पाहून शिकू शकलेलो नाही. परंतु आपण लखनला शिकवायचं. उच्च शिक्षण द्यायचं. सर्वांनी पुढाकार घ्यायचा." ते लखनचं उच्च शिक्षण. त्याला आड येणारे सर्वजण. त्यातच वडील म्हणाले, "लेकरांनो, मला नाही झेपवत एवढा खर्च. आपली पाटी मोठी. त्यातच कमविणारे हात जरी असले तरी तुटपुंजेच पैसे मिळतात आपल्याला. मग घर चालवायचं की याचं शिक्षण?" वडिलांचे ते बोलणे. ते बोलणे ऐकत मोठा भाऊ म्हणाला, "मी लखनच्या शिक्षणाचा विडा उचलूच शकत नाही." मोठ्या भावाचा विवाह झाला होता. त्याला बायकोपोरं देखील होते. त्यानं स्पष्टपणे सांगून टाकलं व तो मोकळा झाला. त्यानंतरच्या भावानंही तेच सांगीतलं. आता उरला प्रश्न पाठच्या भावाचा. जो शालान्त परिक्षा पास झाला होता. परंतु शिकू शकला नव्हता. तो म्हणाला, "आपण लखनच्या शिक्षणाला पैसा नाही लावला तरी मी लावेल पैसा. मी शिकवेल त्याला." ते त्याचे बोलणं. जणू वचनच बोलून गेला होता तो. त्यातच त्यानंच त्याचं नाव शहरात वसतीगृहात टाकलं. ज्या वसतीगृहातून तो महाविद्यालयातील शिक्षण शिकत गेला. त्यातच उच्च शिक्षणही शिकत गेला होता. लखनला धरुन त्याच्या कुटुंबात चार भावंडं. तसं पाहिल्यास तो काळ म्हणजे दुष्काळाचा काळ होता. ते मेहनत करायचे. परंतु त्या मेहनतीच्या बदल्यात पाहिजे त्या प्रमाणात पुरेसे पैसे मिळत नव्हते. त्यातच कधीकधी उपासमार व्हायची. त्या सर्व गोष्टी पाहून व पोटाचा प्रश्न सोडवितांना लखनला उच्च शिक्षण कसं शिकवावं? हा ऐरणीचा प्रश्न होता व तो ऐरणीचा प्रश्न लखनच्या आईवडिलांसमोर उभा होता. दोन भावांनी आपलं अंग काढून टाकलं होतं. एकाचा विवाह झाला होता. परंतु दुसऱ्याचा विवाह करायचा बाकी होता. त्यातच त्याच्या विवाहालाही पैसा लागणार होता. लखनचे आईवडील मजूरी करायचे. कधी रोजी लागायची. कधी कामावरुन खाली हातानं परत यावं लागायचं. तेच हाल होते पाठच्या भावाचेही. लखनचं महाविद्यालयातील शिक्षण. वडिल व दोन्ही भावांनी हात काढून टाकल्यावर पाठच्या भावानं त्याला उच्च शिक्षण शिकविण्याचा विडा उचलला. मग काय, उच्च शिक्षण शिकवितांना लागणारा पैसा गोळा करण्यासाठी लखनचा पाठचा भाऊ मेहनत करु लागला. तो कंपनीत कामाला लागला. जी कंपनी तेल काढण्याची होती. तिथं धानाच्या कुकसापासून तेल निघत असे. ती कंपनी तशी चांगली नव्हतीच. त्या कंपनीत कधी कच्चा माल आलाच तर दिवसरात्र काम करावं लागायचं. झोपायचेही वांदे व्हायचे. अशातच कंपनीतच रात्रंदिवस मेहनत करावी लागायची. चोवीस तासामधून फक्त दोनच तास झोपायला मिळायचे. अन् कच्चा माल उपलब्ध नसला की मग काही फिकिर नसायची. बरेच दिवसपर्यंत कंपनी बंद राहायची व काम नसायचं. त्या सर्व गोष्टीवर मात करुन पाठचा भाऊ पैसे कमवीत होता व लखनला शिकवीत होता. त्यातच लखनला सैनिकांचा कॉल आला व तो लवकरच सैनिकाच्या नोकरीवर लागला होता. आज लखन सैन्यात सैनिक बनला होता. ते पाठच्या भावाचेच उपकार होते. कालांतरानं त्याला नोकरीवर लागल्यावर पाठच्या भावाचा विवाह झाला. त्याला चार मुलं झाली. परंतु दुर्दैवानं जेव्हा त्याचा व त्याच्या पत्नीचा मृत्यू झाला. तेव्हा तसा मृत्यू झाल्यानंतर उपकारार्थ लखननं त्याच्या मुलींना पोषलं होतं नव्हे तर तसूभरही अंतर दिलं नव्हतं. *********************१३****************** दान....... लखन सैन्यातून निवृत्त झाला होता. परंतु दानाची वृत्ती त्याच्यात कुटकूट भरली होती. दान देतांना तो कधी मागंपुढं पाहात नसे. त्यानं कमविलेला सर्व पैसा त्यानं दानात दिला होता. एवढंच नाही तर त्यानं आपली चारचाकी गाडी त्याच्या चालकाला दान देवून टाकली होती. त्यानंतर त्यानं आपलं घरही एका गरीब व्यक्तीला दान दिलं होतं व तो मोकळा झाला होता. अन् हे जेव्हा त्याच्या आप्तांना माहीत झालं. तेव्हा त्यांना त्यांचा थोडासा राग येत असे. त्यांना वाटत असे की त्यानं अशाप्रकारचं दान लोकांना देण्याऐवजी आम्हाला द्यावं. उतारवय सुरु झालं. त्यातच जेव्हा त्यानं आपली गाडी व घर लोकांना दान दिलं. तेव्हा ज्यांना दान दिलं. ती मंडळी खुश झाली होती. ती नित्य त्यांना म्हणायची की त्यांच्या उतारवयात त्यांनी आपल्याकडे राहायला यावं. परंतु आपण कोणावर उपकार केले. त्याचा मोबदला घेवू नये. या विचारांचा लखन. आपल्या मृत्यूवेळेसही कोणाकडे अजिबात राहायला गेला नाही. शिवंण्या हे जग सोडून गेल्यावर काही दिवस तो आपल्या पुतण्याकडे राहिला. परंतु मला शिवंण्या दिसतेय म्हणत परत तो वृद्धाश्रमात आला व तेथेच तो आपलं उर्वरित जीवन जगू लागला होता. एक सैनिक जसा शत्रूंशी लढतो. आपल्या प्राणाची बाजी लावतो. तो देशाला महत्वाचा असतो. तशीच वृत्ती त्यांनी जीवनभर जोपासली होती. त्यातच जसा एका देशाला महत्वाचा असतो सैनिक. तसाच संबंध सृष्टीला महत्वाचा असतो साहित्यीक. म्हणूनच त्यानं पुढचं आयुष्य साहित्यीक म्हणून जगायचं ठरवलं होतं. ते विचार करायचे सैनिकांच्या वेदनेविषयी. तेच लिहायचं होतं त्यांना आपल्या लेखनीतून. जगाला दाखवायचं होतं की सैनिक हे खुश नसतात आपल्या जीवनात. त्यांनाही त्यांच्या अंतर्मनात बऱ्याच वेदना असतातच. सैनिकांच्या वेदना....... सैनिकांच्या वेदना या केवळ शारीरिक जखमा नसून त्यात मानसिक ताण असतो. त्यांच्या वेदनेत त्याचे कुटुंबापासून दूर राहणे, भीषण हवामानाशी लढणे आणि युद्धाच्या भयंकर आठवणी. तो आक्रोश यांचा समावेश असतो. ते प्राणपणाने देशाचे रक्षण करतात, तरीही अनेकदा त्यांच्या त्यागाची उपेक्षा होते. शारीरिक वेदना सहन करण्याची त्यांची क्षमता युद्धाच्या परिस्थितीत मानसिक दबावामुळे वाढते. तरीही युद्धाचे मानसिक परिणाम त्यांच्या जीवनात दिर्घकाळ टिकतात. त्यांच्या जीवनातील काही शारीरिक वेदना जाणण्यासारख्या आहेत. सततच्या कठोर प्रशिक्षणापायी सांधेदुखी व पाठीचे विकार आणि लढताना होणाऱ्या गंभीर जखमा. हे सैनिकांच्या जीवनाचा मुख्य भाग आहेत. या झाल्या शारिरीक वेदना. तसा मानसिक ताण आणि मानसिक वेदनाही भरपूर होत असतात त्यांना. युद्धभूमीवर घेतलेले निर्णय, त्यांच्या साथीदारांचे जाणारे प्राण आणि स्वतःच्या जीवाला असलेला धोक्यामुळे सैनिक गंभीर जखमी होतात. या वेदना डोळ्याला दिसणाऱ्या असतात. मानसिक वेदनामुळे जीवनात नैराश्य येते. ते मानसिक आजारांना बळी पडू शकतात. सैनिक हे कुटुंबापासून दूर राहात असतात. त्यांना कुटुंबापासून दूर राहण्याचे दु:ख असते. सण-समारंभ, कुटुंबातील सुख-दु:खाचे क्षण आणि मुलांचे बालपण चुकवण्याची वेदना सैनिकांना कायम सतावत असते. कारण घरी कोणतेही समारंभ असोत, सैनिकांना सुट्ट्या मिळत नाहीत. त्यांना त्यांचं कर्तव्य म्हणून सतत युद्धभुमीवर हजर राहावं लागतं. सैनिकांना कठोर हवामानाशी लढावं लागतं. कधी उणे तापमानात किंवा वाळवंटातील उष्णतेत सैनिकांना अत्यंत प्रतिकूल हवामानात कर्तव्य बजावावे लागते. जे शरीरासाठी अत्यंत कष्टदायक असते. ते आमच्यासाठी कष्ट करतात. आम्ही मात्र त्यांच्याप्रती कधीच कृतज्ञता बाळगत नाहीत. कधी ते रेल्वेगाडीत बसलेले असतील तर आपल्यासाठी बसायला जागा देतात. मात्र आम्ही त्यांना कधीच बसायला जागा देत नाही. अनेकदा समाज किंवा माध्यमे त्यांच्या त्यागाची दखल घेत नाहीत किंवा त्यांच्या कामावर प्रश्नचिन्हं उभे करतात. यामुळे सैनिकांच्या भावना दुखावल्या जातात. सैनिकांचे जीवन हे सर्वोच्च धैर्य आणि त्यागाचे प्रतीक आहे. पण त्यामागे वेदनेचा एक मोठा डोंगर असतो. जो केवळ सैनिकच जाणू शकतो. लखन एक सैनिक होता. इमानदार सैनिक तर शिवंण्या एक प्राध्यापिका होती. ती त्याची अर्धांगिणीच नाही तर एक प्रकारची मार्गदातीही होती. तिनं त्यांना ज्या वेदना व्हायच्या. त्यावर फुंकर घातली होती. कधीकधी त्यांना त्यांच्या सैनिकी जीवनात जे अनुभव आले होते. त्यांची आठवण यायची. मनात इच्छा नसतांनाही केवळ कर्तव्य म्हणून मारावे लागायचे लोकांना. त्यावर पश्चाताप होत असे लखनला. परंतु ती सांगत असे की पाण्यामध्ये जीवन जगत असतांना मासोळ्यांना मोठं होण्यासाठी लहान मासोळ्यांना खावं लागतं. तेव्हाच मोठं होता येतं. तसंच आपलं आहे. आपल्याही देशाला मोठं व्हायचं असेल, अर्थात देशाचं रक्षण करायचं असेल तर शत्रू सैन्याला कापावंच लागेल आणि तसं जर आपण केलं नाही तर आपल्याला कटावं लागेल. ज्यातून आपला पराभव होईल व आपल्यालाच नाही तर आपल्या देशातील लोकांना गुलामागत जीवन कापावं लागेल. लखनचा तो काळ गेला होता. आज म्हातारपण आलं होतं व म्हातारपण छळायला लागलं होतं. अशातच त्याचा एक मित्र त्याला भेटायला आला. ज्यानं युद्धादरम्यान बराच मोठा पराक्रम केला होता. तोही अतिशय निकराने युद्धात लढला होता व विजय मिळाला होता. परंतु दुर्दैव असं की त्याचे दोन्ही पाय निकामी झाले होते. ते कापावे लागले होते. ते शत्रुसैन्य व त्या सैन्यानं त्याच्यावर वार केला होता. तो बॉंबस्फोटच होता की त्या बॉंबस्फोटात त्याचा जीव वाचला. परंतु पाय निकामी झाले होते. सरकारनं युद्ध जिंकलं व युद्ध जिंकल्यावर त्याचा सत्कारही केला. परंतु मदत? मदत मात्र कवडीचीही केली नाही. ज्या मदतीनं त्याचं आयुष्य बनू शकत होतं. ते आयुष्य उध्वस्त झालं होतं. साहेबसिंह लखनचा जुना मित्र. दोघांनीही एका लढाईत सोबत सोबत काम केलं होतं. साहेबसिंह निकराने लढला होता. ज्यातून त्याला क्षती पोहोचली होती. लखनला मात्र काहीही झालं नव्हतं. साहेबसिंहाचे पाय कापले गेले होते. परंतु त्याच्या मनात रग होती व तो त्याच रगीनं काम करीत होता. आज अपंग अवस्थेत तो दारोदारी भटकत होता. त्याला आधार द्यायला असं कोणी नव्हतं. वाटत होतं की विनाकारणच त्यानं देशनिष्ठा बाळगून देशासाठी लढला. तो जर लढला नसता तर बरं झालं असतं. तो एक दिवस. साहेबसिंह आला त्याला भेटायला. तो मित्र लखनशी बोलता झाला. जुन्या आठवणी काढू लागला. म्हणाला, "लखनराव, मेजर लखनसिंह आणि मी साहेबसिंह. काय रुतबा होता आपला त्या काळात. परंतु सगळंच गेलं. आता वाटतंय की आपले हातपाय सगळे शाबूत असतात ना. तेव्हा साऱ्यांच्याच उपयोगाचे असतो आपण. मी साहेब सिंह. मी लढलो लढाई निकराची. शत्रूच्याच गोटात जावून बॉम्बस्फोट केलाय. ज्यात माझे पाय निकामी झाले. माहीत आहे मित्रा. सरकारनं फक्त उपचार केला माझ्या पायावर. परंतु उर्वरीत खर्च मलाच करावा लागतो पेन्शनमधून. आता तर माझे हाल एवढे आहेत की मला कुत्रही मोजत नाही. मित्रा, निवृत्त होईपर्यंत सगळं बरोबर होतं. परंतु जेव्हा मला सैन्यातून निवृत्त केलं. त्या वर्षापुर्वीपासून मला शुगर झाली आणि ती झाल्यानंतर माझ्या या पायाच्या जखमा सुधरल्याच नाही. काहीतरी दारुगोळ्याचे घटक यात गेल्याचं दिसतेय. हे दुखणं निवृत्तीनंतरच उभारुन आलं. या दोन्ही पायांना बॉम्बस्फोटातून ज्या जखमा झाल्या होत्या. त्या जखमा अद्यापही बसल्या नाहीत. खुप दुखतात. जखमा बसायचं नावच घेत नाहीत. ज्या जखमा मला अतिशय त्रासदायक वाटतात. लोकं म्हणतात की याला महारोग झालाय. परंतु मी तरी लोकांना कसं सांगू की बाबांनो हा महारोग नाही. या जखमा युद्धातील आहेत. आता लोकांना कळत नाही काय की या जखमा कशाच्या असतील. परंतु त्यांना समजावणं कठीण आहे. मित्रा, लोकं याला महारोगाचाच आजार समजतात व ते दूरदूर राहतात. आता असं वाटतंय की आपण विनाकारणच सैनिक बनलोय. मित्रा, तो आपला तरुणपणाचा काळ व त्या काळात वाटायचं सैनिक बनावं व देशाची सेवा करावी. परंतु लोकं आपल्या मुलांना कधीच सैन्यात टाकायला पाहात नसत. म्हणत की सैन्यात नोकरी करतांना प्राणाचा काही भरवसा राहात नाही. मी जबरदस्तीनं भर्ती झालो होतो सैन्यात. कारण मला देशाची सेवा कराविशी वाटत होती. परंतु आज जर कोणी मला भेटला तर मी त्याला अवश्य म्हणेल की बाबारे, ही देशसेवा कदापिही करु नकोस. कारण आपण जरी देशसेवा करण्याचा रास्त विचार जरी करीत असलो तरी त्या विचाराला समाजात इज्जत नाही. लोकं आपल्याला वेड्यात काढतात. मित्रा, मला अनुभव आलाय. आपल्यामुळं मलाई खाणारी ही मंडळी, ज्यांच्यामुळं आपण सुखी आहोत. असे मानत नाहीत. कधीकधी म्हणतात की फुकट केली का नोकरी. वेतन घेत होते ना. खरंय त्यांचं. मित्रा, आपण वेतनच घेत होतो. परंतु खरंच देशासाठी जीव देतांना आपल्याला मिळणारं वेतन पुरेसं तरी होतं का रे? तर याचं उत्तर नाही असंच आहे. सरकार आणि आपल्या देशातील लोकं खुदगर्ज आहेत. त्यांना आपल्या प्राणांची किंमत माहीत नाही. अरे, आपल्यालाही वाटत होतं, संसार करावा. मुलं जन्मास घालावी. चांगलं सुखात राहावं. परंतु देश समोर होता. देशाची स्वप्न समोर होती. विचार होता की जर आपण लढलो नाही तर आपलाच देश गुलाम होईल व आपला देश गुलाम झाल्यावर आपल्या देशातील सर्व नागरीकावर गुलाम करणारा देश बऱ्याच प्रमाणात अत्याचार करेल. हेच ओळखलं आपण. अन् लढलोय." आपल्या वेदना सांगत असतांना तो थोडा चूप बसला. तोच लखनसिंह म्हणाला, "मित्रा, तुझं म्हणणं बरोबर आहे. लोकं आपल्याबद्दल काहीबाही बोलतात. हे मी बरंच ऐकलेलं आहे व बरेचवेळेस ऐकलेलं आहे. परंतु आपण सैनिक आहोत. लढणारे लढवय्ये सैनिक. आपले कोणी नाव घेवो अगर न घेवो. आपण कोणी नाव घ्यावं म्हणून लढत नाही. आपण शत्रुशी लढायला वीरता समजतो. वाटतं आजही की रणमैदानावर मृत्यू आला असता तर बरं झालं असतं. हे काय भेकड जीवन आता निवृत्तीनंतरचं. मित्रा, मला माहीत आहे की ज्या काळात तरुणपण होतं व आपण शत्रुंशी लढत होतो. त्या काळात आपल्याला ना विवाह करायची तसदी होती, ना संसार करायची. अरे भीतभीतच तर आपण विवाह केले आपले आणि संसार थाटला. म्हटलं जात होतं की कोणत्याच सैनिकांनी संसार थाटू नये. देशसेवेचे व्रत घेतलेय ना. मग देशसेवाच करावी. मलाही माहीत आहे की हे सरकारकडून आपल्याला मिळणारं वेतन आपल्या कर्तृत्वापुढं काही जास्त नाही. आपलं मोजमाप ह्या वेतनस्वरुपातील पैसा करु शकत नाही. कारण आपला प्रश्न असतो जीवांशी. दररोज दर क्षणाला आपण मृत्यूशी खेळत असतो. केव्हा कसा आणि कोणाला मृत्यू येईल हे आपल्याला ओळखताच येत नाही. तरीही त्यावर मात करुन आपण निवृत्त झालोच तर ते आपलं भाग्य. आपलं भाग्य उच्चकोटीचं की आपण एवढे दिवस जगलो. आता उरला प्रश्न लोकांचा. तर एक सांगतो. काही प्राणी, काही लोकं यांचा जन्मच मुळात सेवा करण्यासाठी झालेला असतो. जशी एक मुंगी. मुंग्यांच्या प्रजातीत फक्त मादी मुंगीलाच इज्जत आहे. बाकी सर्व मुंग्या या कामकरी व सैनिक मुंग्या असतात. त्यांना सतत कामंच करीत राहावं लागतं. त्या मेहनत तर करतातच, शिवाय समुहाचं रक्षणही करतात. तेही महत्वाचंच की नाही. तसेच काही जीव हे निव्वळ बलिदान देण्यासाठीच जन्माला येतात. जसे काही प्राणी, ज्यात कोंबडी, बकरी, मेंढी, म्हैस, डुक्कर यासारख्या प्राण्यांचा समावेश होतो. म्हणतात झाडांनाही जीव असतो. तरीही त्यांची आपण आहारासाठी कत्तलच करतो ना. काही पक्षांनाही लोकं मारुन खातात. अन् त्यांचा बळी घेतांना आपल्याला काहीच वाटत नाही. आता तू म्हणशील की वाघानं बकरी खावू नये, तर असं होणारच नाही. वाघ बकरी खाणारच. कारण ते त्याचंच अन्न आहे. ती बकरी त्यानं जर नाही खाल्ली तर त्याला उपासानंच मरावं लागेल. तसंच आपलं जीवन आहे मित्रा. आपल्याही जीवनात अंधकार आहे. आपल्याही जीवनात वेदनाच आहेत. आपल्यालाही शारिरीक वेदना होतात आणि त्या दिसतातही. जसा तुझा पाय. काहींचे निरनिराळे अवयव. त्या अवयवांचं प्रत्यारोपण होत नाही. करताच येत नाही. दुसऱ्या वेदना होतात मानसिकतेच्या. म्हणतात की एखादी हाताची जखम बसवता येवू शकते. परंतु मनाला झालेली जखम कधीच भरुन येत नाही. जसं तुला लोकांनी महारोग झाला म्हणणे. त्यांना साधी सैन्यात नोकरी करतांना झालेली जखम ओळखता येत नाही. ही वेदनाच आहे, वेदनाच आहे तुझ्या मनाला झालेली. अन् आणखी वेदना होतात. जेव्हा आपण प्रवास करतो तेव्हा. प्रवास करतांना लोकं आपल्याला बसल्या जागेवरुन उठवतात व बसतात. ह्या मनालाच झालेल्या वेदना असतात. तशीच सर्वात महत्वाची मनाला वेदना तेव्हा होते. जेव्हा देश आपल्या भरवशावर जिंकतो आणि नाव नेत्यांचं होतं. तो नेता, जो प्रत्यक्ष युद्धात वा युद्धभुमीवर काम करीत नाही. काम आपण करतो. लढतो आपण. आपण चांगले लढलो तर देश जिंकतो आणि चांगला पराक्रम केला नाही तर देश हरतो. आपल्या चांगल्या पराक्रमानं जेव्हा देश जिंकतो आणि एवढा पराक्रम करुनही नेत्यांचं नाव होतं. तेव्हा मात्र आपल्याला महाभयंकर वेदना होत असतात. आपला त्याग, आपली निस्सीम देशाप्रती असलेली भक्ती, आपली देशसेवा, या सर्व गोष्टींची युद्ध जिंकूनही जेव्हा उपेक्षा केली जाते. तेव्हा भयंकर वेदना होत असतात." "मित्रा, तुझं म्हणणं बरोबर आहे. आणखी हं, अनेक आजार आणि सततच्या युद्धामुळं आपल्याला सांधेदुखीची होणारी व्याधी आपल्या जीवनातील त्रास बनत जाते. बंदूकीतून जेव्हा आपण गोळी सोडतो ना. गोळी तर पुढं जाते. धक्का लागतो आपल्या खांद्याला. ज्यातून अहोरात्र वय होताच खांदे दुखायला लागतात. त्याही वेदना असह्यच स्वरुपाच्या असतात." "होय. शिवाय आपल्याला इच्छा असतांना कुटुंबासोबत राहता येत नाही. दोन आनंदाचे रमणीय क्षण कुटुंबासोबत उपभोगता येत नाही. हे तर वेगळंच. परंतु जेव्हा आपल्याला गतकाळातील आठवण येते. तेव्हाही जीव कासावीसच होतो. आठव तू आपल्यासोबतच सतत वावरणारे आपलेच सहकारी शत्रुच्या गोळीनं धारातीर्थी पडले. तेव्हा आपल्याला कसं वाटत होतं. आज ते प्रसंग आठवले की अंगावर काटेच उभे राहतात. ते रोमांचं छळत असतात कधीकधी, जेव्हा त्या काळातील प्रसंगांची आठवण येते." "होय मित्रा, मला आजही आठवते ते ठिकाण. ज्यावेळेस मी भर उन्हाळ्यात राजस्थानच्या वाळवंटात सीमेवर होतो. किती उकाडा होत होता तेव्हा अन् ती रेती गरम झाल्यानं किती झोंबत होती अंगाला. वाटत होतं की आपलं शरीरच भाजत आहे भट्टीत. ते सगळं सहन केलं मी, आपले कर्तव्य करीत असतांना. वाटत होतं की आपण आपल्या देशासाठीच हे सगळं करतो आहे. आपण निवृत्त झाल्यावर देशातील प्रत्येक नागरिक आपल्याला सन्मान देईल. परंतु नाही. आज समाजात वावरतांना देशातील लोकं जेव्हा सन्मान देत नाहीत ना. अपमान करतात ना जेव्हा. तेव्हा महाभयंकर वेदना होत असतात." "खरं आहे तुझं म्हणणं. मीही एक प्रसंग तुला ऐकवतो. तू वाळवंटातील गरम रेताड जागेचा अनुभव सांगीतला. मीही असाच एक प्रसंग सांगतो. मीही एकदा असाच बर्फात फसलो होतो. जीव होता. नशीब बलवत्तर म्हणून मी वाचलो. जेव्हा सकाळी एका सैनिकाचं लक्ष माझ्या शरीरावर गेलं. तेव्हा त्यानंच काढलं मला बर्फातून बाहेर. गोठवूनच टाकलं होतं तेथील बर्फभरल्या थंडीनं." "मित्रा, युद्ध करणं ही कला आहे. ती कला आपण हस्तगत करतो व लढतो शत्रूंशी प्राणपणानं. आपण असतो म्हणून हे देशवाशी झोपत असतात सुखाने आपल्या घरात. युद्धजन्य परिस्थिती असली की आपण चोवीस तासही झोपत नाहीत सुखानं. एक दोन तास डोळा लागलाच तर लागला. नाहीतर तोही लागत नाही. कधी एखाद्यावेळेस एखाद्या ठिकाणी एकटेच फसलो तर खायलाही काही मिळत नाही. नकाशा सोबत नसल्यानं वाट मिळत नाही. हिंस्र श्वापदाचीही भीती असते. कुणाच्या राज्यात आहोत. तेही कळायला मार्ग नसतोच. शिवाय जेवन खावण काहीच मिळत नाही. वर्ष वर्ष भाकर, पोळी आपल्या नशिबात नसते. कधी झाडाचा पाला खावून तर कधी मेलेल्या प्राण्यांचे कुजलेले मांस खावून दिवस काढावे लागतात. कधी किड्या, मुंग्याही खाव्या लागतात. अन् इकडं पाहा, हे सगळं सहन करुन लोकं आपलीच हेळसांड करतात. तेव्हा विचार येतो." "खरं आहे मित्रा. हे तुझं आणि माझं म्हणणं. आपण देशासाठी प्राणपणानं लढतो. तेव्हा आपला देश जिंकतो. परंतु नेत्यांचं नाव होतं. आपल्या भरवशावर जिंकूनही आपला सन्मान होत नाही. कधी एक पदक मिळतं. ज्याला देशात कुणी कुत्रही विचारत नाही. हे खरं आहे. परंतु एक लक्षात ठेव. आपण सैनिक आहोत. कोणताही सैनिक आपलं नाव व्हावं यासाठी लढत नाही. तो आपलं कर्तव्य म्हणून लढतो. जर वृक्षवल्लीनं विचार केला की लोकं माझी हत्या करतात. मी जन्मच घेत नाही. प्रत्येक तृणभक्षक प्राणीमात्रानं विचार केला की माझी सृष्टीतील इतर हिंस्र प्राणी पोट भरण्यासाठी हत्या करतात. मी जन्मच घेत नाही. तर सृष्टीचं संचलन कसं चालेल? तेव्हा नावासाठी नाही तर आपलंही एक कर्तव्य आहे म्हणून ते सर्व प्राणी जन्म घेतात. त्यांनाही माहीत असतं की आपला जन्म झाला. आपण कोणत्या ना कोणत्या प्राण्याचे भक्ष बनू. तरीही ते जन्म घेतात व एक ना एक दिवस मरतात. ते मरतात, तरीही जन्म घेतात. कारण त्यांचं ते कर्तव्य असतं. आपणही आपलं कर्तव्य पार पाडावं. एक सैनिक या नात्यानं. सैनिकांचं कर्तव्य जे असतं. ते विचारात घेवून. तरंच आपलं सैनिक म्हणून जगण्यात अर्थ आहे. आपण कोणाकडूनच कोणत्याच अपेक्षा बाळगू नयेत. नाहीतर अपेक्षाभंग नक्कीच होतो. मग पश्चातापाची पाळी येते. त्यापेक्षा आपण सैनिक या नात्यानं अपेक्षाच करु नये म्हणजे झालं." लखनसिंह म्हणाला व चूप बसला. त्यावर साहेबसिंह बोलला. "खरं आहे मित्रा. तू आज माझे डोळे उघडलेय. आता मी कोणत्याच व्यक्तीच्या बोलण्यातून दुःखी होणार नाही. मी गप्प असेन, जरी लोकं काही बाही बोलले तरी." "होय, गप्पच राहावं. त्यातच भलं आहे आपलं. मला एक तथागत गौतम बुद्धाची गोष्ट आठवते. तथागतांना एका व्यक्तीनं एकदा भरपूर शिव्या दिल्या. परंतु त्यावर तथागतानं काहीच उत्तर दिलं नाही. ते मौन राहिले. मग त्या व्यक्तीनं तशा शिव्या दिल्यानंतर शांत झाल्यावर तथागतांना विचारलं, 'मी आपणास भरपूर शिव्या दिल्या. परंतु आपण त्या फक्त ऐकल्या. काहीच प्रतिसाद दिला नाही. त्याचं कारण काय?' ते त्या व्यक्तीचं बोलणं. त्यावर उत्तर देत तथागत म्हणाले, 'मी आपण दिलेल्या शिव्या ऐकल्याच नाहीत. अन् हो, आपण ज्या काही शिव्या दिल्या ना. त्या मी घेतल्याच नाहीत. त्या तुझ्याजवळच राहिल्या.' 'म्हणजे?' आश्चर्य वाटून तो म्हणाला. त्यावर उत्तर देत तथागत म्हणाले, 'हे बघ, आपल्याला कोणी एखाद्यानं एखादी वस्तू दिली व आपण ती घेतली नाही तर कोणाजवळ असते?' 'कोणाजवळ म्हणजे. ती वस्तू त्याचेजवळच असते. जो ती देत असतो.' 'तशाच तुझ्या शिव्या. तुझ्या शिव्याही मी घेतलेल्या नाहीत. ऐकलेल्याही नाहीत. मग त्या कोणाजवळ राहिल्या? तुझ्याचजवळ ना.' 'होय.' 'म्हणजे तुलाच लागल्या ना.' तो व्यक्ती काय समजायचं ते समजला व त्यानं तथागताचे पाय धरले. पुढं तो त्यांचा शिष्यही बनला. मित्रा, यावरुन हा बोध घे की जर कोणी तुला काही म्हणत असेल तर त्याला तू काही म्हणू नये. मौनात राहावे. ज्यात आपलाच फायदा आहे. इतरांचा नाही. मित्रा, आपण एक सैनिक आहोत. हेच लक्षात ठेवायचं. त्याच पद्धतीनं चालायचं. मग कोणी आपलं नाव घेवो अगर न घेवो. प्रत्यक्षात देवानंच आपल्याला जन्माला घातलेलं आहे, सैनिकांचं कर्तव्य देवून. तेच प्रत्यक्षात परमेशानं दिलेलं कार्य आपण सैनिक म्हणून पुर्ण करावं. एवढंच माझं म्हणणं आहे." ते लखनसिंहचं बोलणं. त्या बोलण्यावर त्याचा मित्र जे समजायचं ते समजला व त्यानं त्याला बोध दिला होता. त्याला अर्थपुर्ण जीवन जगता यावं यासाठी. साहेबसिंहानं ते ऐकलं व तो आल्यामार्गी परत गेला. आता तो आपल्या जीवनात खुश होता. तसाच तो आता लोकांच्या काहीही बोलण्यावर लक्षच देत नसे. लोकं कितीही त्याला बोलत असतील तरीही.*********************१४******************** आज लखन एकटाच घरी बसला होता. शिवंण्या मरण पावली . होता. सर्वात मोठा कोण? सर्वात मोठा. जगात प्रत्येक जीवजंतू स्वतःला सर्वात मोठा समजतो. पेशेधारीही स्वतःला सर्वांत मोठे समजतात. नेत्यांची तर गोष्टच सांगायला नको. समजा एखादं युद्ध झालंच तर त्या युद्धाचे श्रेय नेत्यांनाच जातं. परंतु युद्धातील विजय हा नेत्यांमुळं होत नाही. कारण लढणारा सैनिक मोठा असतो. सर्वात मोठा कोण? याबाबतीत देशाचा विचार केल्यास प्रत्येक जीवजंतूच मोठा असतो. परंतु काही राजकीय तत्व स्वतःला मोठे समजत स्वतःच्या मोठेपणाचा उदोउदो करतात. जंगलाचा राजा सिंह, पक्ष्यांचा राजा मोर, सृष्टीचा राजा प्रत्यक्ष विधाता आणि याहीपेक्षा मोठा कोण? लखन विचार करु लागला. विचारांती त्याला कळलं की सर्वा मोठा निर्माण कर्ता देवच आणि त्याहीपेक्षा मोठसाहित्यीक