सावधान
वाचकांसाठी विशेष वैधानिक इशारा:
ही कथा केवळ भीती निर्माण करण्यासाठी नसून, यात Extreme Body Horror आणि Gore (अत्यंत हिंसक दृश्ये) यांचा वापर केला आहे. कथेतील शरीर विच्छेदनाचे आणि छळाचे वर्णन काही वाचकांसाठी मानसिकदृष्ट्या अस्वस्थ करणारे असू शकते. ज्यांना हिंसक दृश्यांची भीती वाटते, त्यांनी ही कथा वाचू नये. ही कथा केवळ प्रौढ (18+) वाचकांसाठी आहे.
तुम्ही आता काळदरीच्या अशा जगात प्रवेश करत आहात जिथे माणुसकी संपते आणि आदिम क्रूरता सुरू होते. ही कथा वाचताना तुम्हाला मळमळणे, भीती वाटणे किंवा अस्वस्थ होणे असे अनुभव येऊ शकतात.
ही कथा मानवी क्रूरतेच्या पराकोटीवर आधारित आहे. यात नरभक्षण, शारीरिक छळ आणि वेदनांचे सविस्तर वर्णन आहे. जर तुम्ही कमजोर मनाचे असाल, तर ही कथा तुमच्यासाठी नाही."
ही कथा slasher horror, body horror, survival thriller या शैलींमध्ये येत आहे. या कथेत शरीर विच्छेदन एकदम विचित्र पद्धतीने दाखवले आहे. कृपया आपल्या जबाबदारीने वाचावी.
कथेला सुरुवात....
अध्याय १
मृत्यूच्या सावल्यांचे आमंत्रण
सह्याद्रीच्या रांगा तशा कोणालाही भुरळ घालतील अशा, काही कोपरे असे आहेत जिथे सूर्यप्रकाश शिरतानाही घाबरतो. पण रत्नागिरीच्या पलिकडे, जिथे सरकारी नकाशे संपतात आणि लोककथा सुरू होतात, तिथे एक असे खोरे आहे ज्याला स्थानिक लोक 'काळदरी' म्हणतात. 'काळदरी' नावाच्या खोऱ्यात शिरताना निसर्गाचा हिरवा रंग अधिक गडद आणि भीतिदायक वाटू लागतो. या खोऱ्याबद्दल एक जुनी म्हण आहे— "काळदरीची हवा लागली की, रक्ताची तहान जागी होते." ही जागा निसर्गाचा चमत्कार नसून एक जिवंत नरक होती. तिथे सूर्याची किरणे जमिनीला स्पर्श करायला घाबरत आणि झाडांच्या पानांतून सतत एक अनामिक रडण्याचा आवाज येत असे. तिथे झाडे एकमेकांत इतकी गुंफलेली आहेत की जणू काही ती येणाऱ्या पाहुण्यांना बाहेर पडू न देण्यासाठी जाळे विणत आहेत.
दुपारचे दोन वाजले होते, दाट झाडीमुळे खाली सायंकाळसारखा अंधार पसरला होता. खोऱ्यात शिरताच वातावरणात एक जडपणा आला होता. हवेत आर्द्रता इतकी होती की श्वास घेताना फुफ्फुसात ओलावा भरल्यासारखे वाटत होते. जमिनीवरचा चिखल हा सामान्य नव्हता; तो ओला आणि चिकट होता, काळपट लाल रंगाचा होता आणि त्यातून सडलेल्या पानांचा आणि मृत प्राण्यांच्या मांसाचा संमिश्र, उग्र, कुबट वास येत होता.
"अरे सोहम, कॅमेरा नीट धर. हा शॉट 'मिलियन व्ह्यूज' देणार आहे आपल्याला. झूम कर...! हा जो धुक्याचा पडदा दिसतोय ना, यालाच 'डेथ मिस्ट' म्हणता येईल," आर्यनने आपला गळा साफ करत कॅमेऱ्यासमोर पोज दिली.
आर्यन— या ग्रुपचा कणा, ग्रुपचा लीडर आणि एक महत्त्वाकांक्षी व्लॉगर. त्याचे वडील वनविभागात मोठे अधिकारी होते, त्यामुळे जंगलात वावरण्याचा त्याला एक वेगळाच गर्व होता.
"आर्यनच्या वडिलांनी त्याला आधीच ताकीद दिली होती की 'रत्नागिरीच्या त्या पलिकडच्या पट्ट्यात सरकारी हद्द चालत नाही. तिकडे जाऊ नकोस'."
आर्यनचे शरीर पिळदार होते आणि त्याच्या चेहऱ्यावर एक प्रकारची उद्दाम जिद्द होती. त्याला वाटत होतं की हा व्हिडिओ त्याला प्रसिद्धीच्या शिखरावर नेईल, पण त्याला हे माहित नव्हतं की तो स्वतःच्या मृत्यूचे डॉक्युमेंटेशन करत आहे.
त्याच्या बाजूला 'सोहम' उभा होता, ज्याच्या हातात पाच लाखांचा 'रेड' सिनेमॅटिक कॅमेरा होता. सोहम हा मुंबईच्या एका श्रीमंत घरचा मुलगा. दिसायला नाजूक, डोळ्यांवर चष्मा आणि स्वभावाने अत्यंत भित्रा. हातात महागडा कॅमेरा आणि गळ्यात गिंबल लटकवून तो प्रत्येक दृश्य टिपत होता.
"भाई, व्ह्यूजचं नंतर बघू, आधी इथला हा वास बघ. असं वाटतंय जणू आपण एखाद्या स्मशानात आलोय. आपण खूप आत आलोय असं नाही वाटत? आपण परत निघाव अस मला वाटतं. मघाशी त्या गावातल्या म्हाताऱ्याने आपल्याला जे सांगितलं, ते आठवतंय ना?
गावातून जंगलात शिरताना तो म्हातारा आपल्याला काय म्हटला होता, "लेकरांनो, काळदरीच्या जठरात शिरू नका. तिथे हवा माणसाची नाही, रक्ताची तहानलेली आहे. जर तिथली माती लाल दिसली, तर समजा तुमची वेळ आली आहे."
"तो म्हातारा जरा विचित्रच होता. तो अक्षरशः आपल्या पाया पडत होता मागे फिरायला," सोहमचा आवाज थरथरत होता.
"तो म्हातारा वेडा होता सोहम. त्याला वाटतं अजूनही इथे भुतं राहतात. आपण २१ व्या शतकात आहोत, विसरू नकोस," आर्यन उपहासाने हसला. आर्यन ला फक्त त्याच्या व्लॉग ची फिकर होती.
ग्रुपमध्ये दोन मुली होत्या— 'सानिया' आणि 'ईशा'.
सानिया ही मेडिकलच्या शेवटच्या वर्षाची विद्यार्थिनी. शांत, विचारी आणि कशाचाही शास्त्रीय विचार करणारी. तिने बॅगमध्ये औषधं आणि सर्जिकल किट ठेवलं होतं, कारण तिला ट्रेकिंगमध्ये होणाऱ्या जखमांची कल्पना होती. पण जिवंत माणसाची कातडी सोलल्यावर काय उपचार करायचे, हे कोणत्याही वैद्यकीय पुस्तकाने तिला शिकवलं नव्हतं.
ईशा मात्र पूर्णपणे वेगळी होती. फॅशन आणि सोशल मीडियात रमणारी ईशा फक्त आर्यनच्या प्रेमाखातर इथे आली होती. तिच्या महागड्या परफ्यूमचा सुगंध या जंगलाच्या कुबट वासात हरवून गेला होता.
सर्वात मागे 'नील' चालत होता. नील हा एक प्रोफेशनल बॉक्सर आणि या ग्रुपचा अनौपचारिक रक्षक. त्याच्या खांद्यावर एक मोठी बॅग आणि हातात एक तीक्ष्ण कुऱ्हाड होती— जंगलातील फांद्या तोडण्यासाठी. नीलच्या मनात एक शंका होती, कारण गेल्या दहा मिनिटांपासून त्याला जंगलातले पक्षी शांत झालेले जाणवत होते. जेव्हा निसर्ग गप्प बसतो, तेव्हा समजावे की एखादा मोठा शिकारी आजूबाजूलाच आहे.
"थांबा!ते तिकडे त्या झाडाला काहीतरी आहे, बघा." नीलचा आवाज एखाद्या विजेसारखा कडाडला.
सगळे जागेवरच थबकले. समोर एका जुन्या, वडाच्या झाडाला काहीतरी विचित्र टांगलेलं होतं.
सोहमने कॅमेरा तिकडे वळवला आणि लेन्स झूम केली. जे दिसलं ते पाहून ईशाच्या तोंडातून एक किंचाळी बाहेर पडली आणि तिने डोळे गच्च मिटून घेतले.
एका माकडाचे शरीर मध्यभागातून चिरले होते. त्याचे पाय एका बाजूला आणि धड दुसऱ्या बाजूला दोरीने बांधले होते. सर्वात भयानक म्हणजे, त्या माकडाचे मुंडके कापून ते त्याच्याच पोटाच्या आत शिवले होते. त्या कापलेल्या भागातून अजूनही रक्ताचे थेंब टप-टप खाली पडत होते. माकडाच्या डोळ्यांच्या जागी अणकुचीदार दगड खुपसले होते, जणू काही ते दगड येणाऱ्यांना पाहत होते.
"हे... हे काय आहे?" सानिया जवळ गेली. तिची मेडिकल दृष्टी कामाला लागली.
"हे कोणत्या प्राण्याने केलेलं नाहीये. हे मानवी हातांनी केलंय. बघा, हे कापलेले स्नायू (Muscles) किती अचूक कापलेत. जणू काही एखाद्या कसलेल्या खाटकाने हे काम केलंय."
"आर्यन, आपण आताच्या आता मागे फिरूया. हे काहीतरी अघोरी कृत्यासारखं वाटत आहे," ईशा रडत म्हणाली.
"नाही ईशा, हाच तर खरा 'कंटेंट' आहे! विचार कर, जेव्हा लोक हे पाहतील, तेव्हा इंटरनेटवर काय खळबळ उडेल," आर्यन वेड्यासारखा हसत त्या माकडाच्या जवळ गेला. त्याने आपला हात त्या रक्ताने माखलेल्या मुंडक्यावर ठेवला.
"हे रक्त अजून कोमट आहे. याचा अर्थ, ज्याने हे केलंय, तो आसपासच आहे. कदाचित आपल्याला घाबरवण्यासाठी हे केलं असेल."
ते पुढे चालू लागले. जसजसे ते खोऱ्याच्या केंद्रस्थानी पोहोचले, तसतसे वातावरण बदलत गेले. पक्ष्यांचे आवाज बंद झाले होते. फक्त पानांची सळसळ आणि त्यांच्या श्वासांचा आवाज येत होता.
अचानक, जंगलाच्या शांततेचा भंग झाला. एक विचित्र, अमानवीय कर्कश शिटीचा आवाज चहूबाजूंनी येऊ लागला. तो आवाज मानवी नव्हता आणि प्राण्याचाही नव्हता. तो अणकुचीदार आणि कानाचे पडदे फाडणारा होता. सगळ्यांनी घाबरून इकडेतिकडे बघायला सुरुवात केली की हा आवाज कुठून येत आहे. पण तो आवाज झाडांच्या शेंड्यावरून येत होता की जमिनीखालून, हे कळायला मार्ग नव्हता. पाठोपाठ, ड्रम्सचा एक मंद पण वेगवान ठेका ऐकू येऊ लागला— *धब-धब-धब-धब!*
"कोण आहे तिथे?" नीलने आपली कुऱ्हाड उपसली आणि तो बचावात्मक पवित्रा घेऊन उभा राहिला.
तेवढ्यात सानियाचा पाय कशात तरी अडकला. तिने खाली पाहिलं आणि तिचं हृदय धडधडू लागलं. तो जमिनीवरचा चिखल नव्हता. ती मानवी आतडी होती, जी चिखलात अर्धवट गाडली गेली होती. ती अजूनही ताजी होती, जणूकाही, काही वेळापूर्वीच कोणाचं तरी पोट फाडून ती बाहेर काढली गेली होती. त्यावर माश्या घोंघावत होत्या.
"आर्यन... लवकर पळा! इथून पळा!" सानिया ओरडली.
पण उशीर झाला होता.
झाडांच्या दाट झाडीतून काही हालचाल झाली. आर्यनने आपला कॅमेरा तिकडे वळवायला सांगितला, पण सोहमचे हात इतके थरथरत होते की कॅमेरा जमिनीवर पडला. आर्यन ला फक्त त्याच्या व्लॉग साठी कंटेंट हवा होता.
आणि मग सुरू झाला तो तांडव.
सुरुवात नीलपासून झाली. तो सर्वात बलवान होता, म्हणून त्याला आधी संपवणे गरजेचे होते. कोणत्यातरी झाडाच्या वरून एक जड, अणकुचीदार भाला वेगाने खाली आला आणि थेट नीलच्या डाव्या खांद्यात घुसला. हाडाचा कडकडाट होण्याचा आवाज स्पष्ट ऐकू आला. भाला इतक्या जोरात मारला होता की तो नीलच्या शरीराला आरपार भेदून गेला. नील खाली कोसळला.
"नीऽऽऽऽल!" आर्यन ओरडला.
नीलच्या तोंडातून रक्ताची गुळणी आली. त्याचा खांदा पूर्णपणे विस्कटला होता. गरम रक्त त्याच्या जॅकेटवरून ओघळून जमिनीवरच्या चिखलात मिसळू लागले. तो भाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करू लागला, पण भालाच्या टोकाला उलट्या दिशेने वळलेले काटे होते (Barbs). त्याने तो ओढताच नीलच्या शरीरातील मांस आणि शिरा बाहेर खेचल्या गेल्या. नीलच्या वेदनेने भरलेल्या किंचाळीने संपूर्ण खोरे हादरले.
तेवढ्यात, अचानक झाडांच्या आडून दहा-बारा आकृत्या बाहेर आल्या. ते माणसे होते, पण त्यांचे रूप पाहून माणसाची व्याख्या बदलावी लागेल. त्यांचे शरीर अंगावर काटा आणणारे होते. त्यांचे शरीर पूर्णपणे नग्न होते, फक्त कमरेला मानवी कातड्याचे पट्टे बांधलेले होते. त्यांच्या शरीरावर पांढऱ्या राखेने आणि लाल रक्ताने विचित्र नक्षीकाम केले होते. त्यांचे दात दगडाने घासून एखाद्या लांडग्यासारखे अणकुचीदार केले होते. त्यांच्या डोळ्यात कोणतीही दया नव्हती, फक्त एक आदिम भूक होती. त्यांच्या हातात लाकडी भाले होते, ज्यांच्या टोकावर गंजलेले लोखंडी सुळे लावले होते.
एक बुटका पण अत्यंत चपळ नरभक्षक आर्यनच्या दिशेने धावला. आर्यनने त्याला धक्का द्यायचा प्रयत्न केला, पण त्या नरभक्षकाने आपल्या हातातील दगडी खंजीर आर्यनच्या उजव्या हाताच्या तळव्यात खुपसला.
"आऽऽऽऽ!" आर्यन ओरडला. खंजीर आरपार गेल्यामुळे त्याच्या हाताची हाडे मोकळी झाली.
दुसरीकडे, दोन नरभक्षकांनी सोहमला पकडले. त्यांनी सोहमचा महागडा कॅमेरा हिसकावला नाही, उलट सोहमच्या डोक्याचे केस पकडून ओढले .
केस ओढल्यामुळे सोहमचे तोंड उघडले. एकाने आपल्या कंबरेचा सुरा काढला आणि काहीही विचार न करता सोहमची जीभ ओढून बाहेर काढली आणि त्याची जीभ एका झटक्यात कापून काढली. सोहमच्या तोंडातून रक्ताचा कारंजा उडाला. त्याचे ओरडणे आता फक्त एका प्राण्यासारखे 'घोर-घोर' आवाजात रूपांतरित झाले होते. त्याचे पांढरे टी-शर्ट सेकंदात लाल रंगाने न्हाऊन निघाले.
ज्याने सोहमची जीभ कापली होती, त्याने ती जीभ खायला सुरुवात केली. एखाद्या भुकेल्या लांडग्यासारखा तो जीभ खाऊ लागला. आणि दोन घासात त्याने सोहमची जीभ खाऊन टाकली.
सानिया आणि ईशा घाबरून एका कोपऱ्यात दबून बसल्या होत्या. सानियाला माहित होतं की हे लोक त्यांना मारणार नाहीत, तर त्यांना 'वापरणार' आहेत.
नरभक्षकांचा प्रमुख पुढे आला. जरासा उंच, शरीरयष्टी एकदम दणकट असलेला. त्याच्या गळ्यात मानवी कान वाळवून त्याची माळ बनवली होती. त्याने जमिनीवर पडलेल्या नीलकडे पाहिले. नील जिवंत होता, त्याच्या खांद्यात भाला अजूनही तसाच होता. नील तडफडत होता.
प्रमुख जवळ गेला आणि त्याने आपला पाय नीलच्या जखमेवर, जिथे भाला रुतला होता, तिथे जोरात दाबला. नीलच्या डोळ्यांच्या बाहुल्या पांढऱ्या झाल्या. वेदना इतक्या असह्य होत्या की नील जोरात ओरडला आणि त्याची शुद्ध हरपली. पण प्रमुखाने एक तीक्ष्ण काटा काढला, जो त्याच्या कमरेला असलेल्या मानवी कातडीला लावलेला होता. प्रमुखाने तो काटा नीलच्या डोळ्यात खुपसला, जेणेकरून तो शुद्धीवर येईल. त्यांना 'जिवंत' वेदना हव्या होत्या. त्या हल्ल्याने नील जोरात ओरडत शुद्धीवर आला. नीलच्या डोळ्यातून रक्ताची धार सुरू झाली. प्रमुखाने तो काटा नीलाच्या डोळ्यात गोलगोल फिरवायला सुरुवात केली आणि तो काटा बाहेर ओढून काढला. जसा प्रमुखाने तो काटा ओढून काढला तसा त्या काट्यासोबत नीलचा डोळा सुद्धा बाहेर आला. नील असह्य वेदनेने ओरडत कण्हत होता. प्रमुखाने डोळा पाहिला आणि पटकन खाऊन टाकला. एखादा गुलाबजामून झाल्यासारखा तो डोळा खात होता. उरलेल्या त्या डोळ्याच्या खोबणीतून रक्त यायला लागले. प्रमुख पटकन खाली वाकला आणि त्याने पटकन ते रक्त प्यायला सुरुवात केली. एखाद्या मद्यासारखे त्याने ते रक्त पिऊन टाकले. रक्त पिऊन झाल्यावर प्रमुख उठून उभा राहिला. त्याच्या चेहऱ्यावर एक अमानवीय समाधान पसरले.
हे सर्व बाकीजण बघत होते आणि हे बघून खूपच घाबरले.
सोहम तर त्याची जीभ कापल्यामुळे त्याच वेदनेत होता. आर्यनच्या हातात खंजीर खुपसलेला होता. सानिया आणि ईशा घाबरून भीतीने मदतीसाठी ओरडत होत्या.
दुसरा नरभक्षक, ज्याच्या गळ्यात मानवी बोटांची माळ त्याने घातलेली होती, तो पुढे आला. त्याने सानियाच्या केसाला पकडून तिचे तोंड वर केले. त्याच्या हाताची नखे घाणेरडी आणि धारदार होती. त्याने तिची गालाची त्वचा आपल्या नख्यांनी ओरबाडून काढली, आणि हातात घेतली, ज्यामुळे सानियाच्या चेहऱ्यावरून रक्ताची ओघळ वाहू लागली. तो त्या रक्ताचा वास घेऊ लागला, जणू काही तो एखाद्या उत्कृष्ट मांसाहारी जेवणाची पारख करत होता.
"अऽऽऽऽऽऽ... वाचवा! कोणीतरी वाचवा!" ईशाचा आवाज कोणापर्यंतच पोहोचणार नव्हता.
"शाकsss रासलsss-फारुकाsss " प्रमुखाने आपल्या जंगली भाषेत काहीतरी आज्ञा दिली.
नरभक्षकांनी लचकदार वेलींचा वापर करून आर्यन, सानिया आणि ईशाला बांधले. सोहम जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडला होता, त्याचे तोंड रक्ताने भरले होते. एका नरभक्षकाने सोहमचा पाय धरला आणि त्याला फरफटत नेण्यास सुरुवात केली. सोहमचे डोके दगडांवर आपटत होते, ज्यामुळे त्याच्या कपाळाची कातडी सोलली गेली आणि तिथेही लाल चिखल तयार झाला. नरभक्षकांनी त्यांना आता ओढत न्यायला सुरुवात केली.
नीलला चार जणांनी उचलले. त्याच्या शरीरात घुसलेला भाला त्यांनी तसाच ठेवला होता, जेणेकरून तो हालचाल करेल तेव्हा त्याला अधिक वेदना होतील. जमिनीवरच्या लाल मातीत नीलच्या रक्ताची एक लांब रेघ ओढली जात होती.
त्यांना जंगलाच्या अजून खोल भागात, एका प्रचंड मोठ्या गुहेच्या दिशेने नेले जात होते. गुहेच्या तोंडाशी गेल्यावर जे दृश्य दिसले, त्याने सानियाच्या उरल्यासुरल्या हिमतीचाही अंत झाला.
गुहेच्या तोंडावर शेकडो मानवी कवट्या रचून ठेवल्या होत्या. गुहेच्या बाहेर शेकडो मानवी सांगाडे टांगलेले होते. काही सांगाड्यांवर अजूनही थोडेफार मांस लटकत होते, ज्याला पक्षी टोचून खात होते. तिथे एक मोठी लाकडी चौकट होती, ज्याला 'कसाईखाना' म्हणता येईल. तिथे एका माणसाला पालथे बांधले होते आणि त्याची पाठ सोलून काढली होती. तो सुद्धा कदाचित ट्रेकर असावा. रक्ताचा आणि चरबीचा वास इतका तीव्र होता की ईशाने तिथेच उलट्या केल्या. तिथला वास इतका भयानक होता की श्वास घेणेही कठीण झाले होते. आतून लाकूड जळण्याचा आणि कशाचा तरी मांस शिजवल्याचा वास येत होता. पण ते प्राण्याचे मांस नव्हते हे नक्की.
"स्वागत आहे तुमचं... आमच्या स्वयंपाकघरात," जणू काही त्या नरभक्षकांच्या नजरा हेच सांगत होत्या.
गुहेच्या तोंडाशी पोहोचताच जो वास नाकाला धडकला, तो केवळ सडलेल्या मांसाचा नव्हता; तो मृत्यूचा जिवंत दस्तऐवज होता. गुहेच्या भिंतींवर मानवी चरबीचे दिवे जळत होते, ज्यातून निघणारा काळा धूर आणि त्या धुराचा उग्र, वास छातीत धडकी भरवत होता.
आर्यनने रडत रडत आपल्या जखमी हाताकडे पाहिले. त्याचे बोटं आता हलत नव्हती. त्याला जाणीव झाली की, ज्या व्लॉगसाठी त्याने इतका अट्टाहास केला होता, तो व्लॉग आता त्यांच्या आयुष्याचा शेवटचा सीन ठरणार होता.
गुहेच्या आत, साखळदंडांना काही मानवी सांगाडे टांगलेले होते, ज्यांच्या शरीरावरचे मांस अजून पूर्णपणे काढले गेले नव्हते. तिथे एक मोठा विशाल पाषाण होता, ज्यावर कितीतरी वर्षांच्या रक्ताचे थर साचून तो काळा पडला होता. त्या पाषाणावर एक माणूस—कदाचित एखादा दुर्दैवी ट्रेकर—अर्धवट जिवंत अवस्थेत होता.
त्याची अवस्था पाहून ईशाने किंचाळण्याचा प्रयत्न केला, पण तिच्या घशातून आवाजच उमटेना. त्या माणसाच्या शरीराची कातडी छातीपासून पोटापर्यंत एखाद्या वस्त्रासारखी सोलून बाजूला लटकवली होती. त्याचे हृदय अजूनही धडधडत होते, जे उघड्या छातीच्या फासळ्यांच्या आतून स्पष्ट दिसत होते. एक नरभक्षक वृद्ध स्त्री, जिचे दात सडलेले होते, तिने आपल्या लांब नख्यांनी त्या माणसाच्या धडधडणाऱ्या हृदयाचा एक तुकडा जिवंतपणीच खुडून काढला आणि तो चघळू लागली. तो माणूस वेदनेने फक्त डोळे पांढरे करत होता, कारण त्याचे ओरडण्याचे स्नायू आधीच कापून टाकले होते.
"हे... हे माणस नाही, हे नराधमी राक्षस आहेत," आर्यन स्वतःशीच पुटपुटला, त्याचा चेहरा आता रक्ताने माखलेला आणि भीतीने पांढरा पडला होता.
अचानक, एका नरभक्षकाने सोहमला त्या पाषाणाजवळ ओढले. सोहमची जीभ आधीच कापली गेली होती, त्यामुळे तो फक्त रक्ताच्या गुळण्या टाकत होता. दोन धिप्पाड नरभक्षकांनी सोहमला उताणे झोपवले. एकाने त्याचे हात धरले आणि दुसऱ्याने पाय. प्रमुखाने आपल्या कमरेचा एक विशेष सुरा बाहेर काढला. हा सुरा पोलादाचा नव्हता, तर मानवी मांडीच्या हाडाला घासून धारदार बनवलेला होता.
त्याने सोहमच्या पोटावर तो सुरा टेकवला. सुरुवातीला फक्त एक बारीक रेष उमटली, पण मग त्याने जोर लावला. सोहमचे शरीर धनुष्यासारखे ताणले गेले. सुऱ्याने कातडी फाडत असताना जो 'चर्रर्र' असा आवाज आला, तो तिथल्या शांततेत भयानक वाटत होता. पोटाचा थर कापला जाताच सोहमच्या पोटातील उष्ण आतड्यांचा ढीग बाहेर उडाला. त्या उष्ण आतड्यांमधून वाफ निघत होती. एका नरभक्षकाने ती आतडी एखाद्या दोरीसारखी आपल्या गळ्यात गुंडाळली आणि नाचू लागला. सोहम जिवंत होता, त्याने स्वतःच्या शरीराचे भाग बाहेर येताना पाहिले. शेवटी जोर देऊन त्यांनी त्याचे दोन्ही हात उखडून काढले. त्यांनी त्या हातामधून येणार रक्त प्यायला सुरुवात केली.
सोहमची जीभ कापल्यामुळे त्याच्या आवाज निघतच नव्हता पण त्याला असह्य मरणयातना होत होत्या.
हे पाहून नील, जो आधीच जखमी होता, त्याने उठण्याचा प्रयत्न केला. पण प्रमुखाने त्याच्यावर रागाने पाहिले आणि एका नरभक्षकाला खुणावले. त्या नरभक्षकाने एक मोठी जड हातोडी—जी दगडाची होती—नीलच्या उजव्या गुडघ्यावर मारली. 'कडकड' असा जोरदार आवाज झाला आणि नीलच्या गुडघ्याची वाटी चक्काचूर झाली. हाडाचे तुकडे मांस फाडून बाहेर आले. नीलच्या तोंडातून एक अमानवीय किंकाळी फुटली, जी दरीच्या खोल भागात घुमत राहिली.
"थांबा! प्लीज थांबा!" सानिया ओरडत होती, पण तिचे शब्द त्या नराधमांसाठी फक्त एक संगीत होते. त्यांनी अजून जोरजोरात नाचायला सुरुवात केली.
त्यांनी आता सानियाला एका वेगळ्या कोपऱ्यात नेले, जिथे मानवी कवट्यांचा मोठा ढीग होता. तिथल्या एका वृद्ध नरभक्षकाने सानियाचे केस पकडले आणि तिचे डोके एका दगडावर आपटले. सानियाला अंधारी आली.
नरभक्षकांनी आता एक मोठा लोखंडी कढई (जी कदाचित त्यांनी कुठूनतरी चोरली असावी) विस्तवावर ठेवली. त्या कढईत पाणी नव्हते, तर मानवी चरबी वितळवून तयार केलेले तेल होते. ते तेल उकळू लागले की त्यातून निघणारा वास इतका घाणेरडा आणि मळमळ निर्माण करणारा होता. त्यांनी सोहमचे तोडलेले हात त्या उकळत्या तेलात टाकले. सोहम अजूनही जिवंत होता, त्याने आपल्या डोळ्यांनी स्वतःच्या शरीराचे भाग तळले जाताना पाहिले. ही वेदना शारीरिक नव्हती, ती आत्म्याला चिरडून टाकणारी होती.
आर्यनने पाहिले की एका नरभक्षकाने त्याच्या हातातील कॅमेरा घेतला आणि तो कुतूहलाने पाहू लागला. मग त्याने तो कॅमेरा रागाच्या भरात एका दगडावर आपटून फोडला. आर्यनच्या आयुष्यातील मेहनतीचा तो शेवट होता, आणि आता त्याच्या आयुष्याचाही शेवट जवळ येत होता.
प्रमुखाने आता आर्यनकडे मोर्चा वळवला. त्याने आर्यनच्या छातीवर आपल्या नख्यांनी एक खुण केली. त्याने आपल्या भाषेत काहीतरी म्हटलं, "रूसीsss बोंबलाsss पीकाsss" ज्याचा अर्थ असा होता की— "हा आमचा मुख्य बळी असेल."
सायंकाळ व्हायला सुरुवात झाली होती. गुहेच्या बाहेर पावसाचा जोर वाढला होता. पावसाचे पाणी गुहेत शिरून जमिनीवरच्या रक्ताशी मिसळत होते. संपूर्ण गुहेची जमीन आता 'लाल चिखलाने' भरली होती. त्या चिखलात सोहमचे मांस, नीलचे रक्ताळलेले हाड आणि सानियाच्या जखमांतून वाहणारे रक्त एकत्र झाले होते.
सानियाला जाणवले की तिच्या चेहऱ्यावर काहीतरी पाण्यासारखे उडत आहे म्हणून ती शुद्धीत आली. जेव्हा तिने डोळे उघडले, तेव्हा तिने पाहिले की ते नरभक्षक एका लहान मुलाच्या शरीराचे तुकडे करत होते. ते एखाद्या झाडावरून फळ तोडल्यासारखे त्याचे हात-पाय तोडत होते आणि ते कच्चेच खात होते. रक्ताचे शिंतोडे सानियाच्या चेहऱ्यावर उडाले. या रक्ताच्या शिंतोड्यामुळे सानियाला शुद्ध आली होती. तिला जाणीव झाली की, इथे माणुसकी नावाची गोष्ट अस्तित्वातच नाही.
या अंधाऱ्या दरीत, जिथे उद्याचा सूर्य कोणाला दिसेल याची शाश्वती नव्हती, तिथे या पाच मित्रांच्या शरीराची आणि मनाची अशी विटंबना सुरू होती, जिची कल्पना कोणत्याही भयानक स्वप्नातही कोणी केली नसेल. हे केवळ मरण नव्हते, हा एक असा विधी होता जिथे मृत्यू हा एकमेव मोक्ष होता, पण तो मोक्ष सहजासहजी मिळणार नव्हता.
पुढे नक्की काय होईल या पाच जणांचे?
--------
"ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून केवळ मनोरंजनाच्या उद्देशाने (हॉरर साहित्य प्रकार म्हणून) लिहिलेली आहे. कथेतील घटना, स्थळे, नावे आणि पात्रे ही फक्त कल्पनाशक्तीचा भाग आहेत. कोणत्याही जिवंत किंवा मृत व्यक्तीशी, समुदायाशी अथवा वास्तविक ठिकाणांशी याचे साधर्म्य आढळल्यास तो केवळ एक योगायोग समजावा.
या कथेचा उद्देश कोणत्याही प्रदेशाच्या, गावाच्या किंवा समुदायाचा अपमान करणे किंवा त्यांच्याबद्दल गैरसमज पसरवणे हा नसून, केवळ 'Body Horror' आणि 'Slasher' या साहित्य शैलीचा अनुभव देणे हा आहे. लेखकाचे कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला किंवा अघोरी कृत्यांना समर्थन नाही. वाचकांनी याकडे केवळ एक काल्पनिक कथा म्हणून पाहावे."
#slasherhorror #bodyhorror #survivalthriller