Prem katha ek Rahashy - 7 in Marathi Love Stories by Prajakta Kotame books and stories PDF | प्रेम कथा एक रहस्य - 7

Featured Books
Categories
Share

प्रेम कथा एक रहस्य - 7

सकाळी उठून तो त्याचे काम आवरतो त्याला रात्री पडलेल्या प्रश्नांची उत्तरे पाहिजे होती त्याचे डोके त्यामुळे दुखत होते त्याला सुट्टी घ्यावी वाटली पण त्याला वाटले की एवढ्यात खूपच सुट्ट्या झाल्या आहेत वाटले तर जरा लवकर येईल व आई-बाबांना प्रश्नांचे उत्तर विचारेल तो जॉबला जातो निशा तिच्या रोजच्याच कामात व्यस्त असते निशाला वाटते की निलेश ला फोन करून बघावा पण तो तर जॉबला गेला असेल फोन करून त्याच्याशी काय बोलू हे ही तिला वाटते फोन करायचे कॅन्सल करते निलेश त्याच्या ऑफिसमध्ये पोहोचतो निलेश ला वाटते की निशाला फोन करून मला रात्री पडलेल्या प्रश्नाविषयी तिला सांगावा मग तो थोड्या वेळाने तिला फोन करायचे ठरवतो कारण त्याच्या मनात ती गोष्ट राहण्याजोगी नव्हती तो निशाला फोन करतो . 

निलेश- hello 

निशा - hello 

निलेश- ऐक ना मला ना तुला काही सांगायचे आहे मला काल रात्री ना खूप अस्वस्थ वाटत होतं . 

निशा - काय रे? काय झालं? सांग ना 

निलेश- निशाला सर्व काही सांगू लागतो व त्याचे मन हलके करतो व टेन्शन फ्री होतो.

निशा - अरे बापरे ! म्हणजे तुला असे वाटते की तुझ्या आई बाबांना माहिती असेल ते? 

निलेश- हो मग मला सांग ना की मी आई-बाबांना विचारू का? 

निशा - हो विचारून बघ . 

निलेश- ok 

निशा - hmm 

निलेश- ठेवू का फोन ? 

निशा - Ho bye 

निलेश- bye take care 

निशा ला निलेशची बोलल्यावर जरा बरे वाटते कारण तिला असंही त्याच्याशी बोलण्याची इच्छा होत होती व मी नाहीतर निलेशनेच फोन केला मला त्या व्यक्ती जरा फ्रेश असते निलेश कामावरून लवकर येण्याचा प्रयत्न करतो पण त्याला जास्त कामामुळे येता येत नाही तो रोजच्याच वेळेवर घरी येतो त्याचे आवरतो सर्वजण सोबत जेवण करतात जेवण झाल्यामुळे निलेश आई-बाबांना थांबा मला तुमच्याशी बोलायचे आहे असे सांगतो लीला व योगेश तिथेच बसतात दोघांनाही समजत नाही की निलेश ला काय बोलायचे आहे ते निलेश येतो . 

निलेश- मला तुम्हाला दोघांनाही काही प्रश्न विचारायचे आहेत माहिती असेल तर प्लीज मला त्याचे उत्तर द्या . 

लीला व योगेश - हो विचार ना

निलेश- कालिका वनाचा व माझा काय संबंध आहे ?, तू मला त्या मनात का जाऊ देत नव्हती आई ? 

लीला - ज्यावेळेस तू लहान होताना निलेश तेव्हा मला तुझी जन्म कुंडली काढायची होती तेव्हा या गावा मध्ये दोन ते तीन ब्राह्मण राहत होते ज्यावेळेस मी ब्राह्मण शोधण्यासाठी जायचे या गावात तेव्हा तिने पण ब्राह्मण हे या गावातून दुसऱ्या गावात काही कामासाठी निघून जायचे जेव्हा पण मी ब्राह्मणांकडे जायचे तेव्हा एक ब्राह्मण घरी राहत नव्हता . 

एक दिवस मी माझे काम आवरून तुला घेऊन ब्राह्मणांकडे जाणार होती तेवढ्यात आपल्या घरात एक साधू महाराज आले . 

निलेश-  साधू महाराज ! .

लीला - हो साधू महाराज ते घरात आले योगेश ने त्या महाराजांना सोप्यावर बसवण्यासाठी सांगितले ते बसले मला आनंद झाला की साधू महाराज आपल्या घरात न बोलवता आले मी माझे मनातल्या मनात म्हणत होते की महाराज आले त्यांना जेवणासाठी काहीतरी बनवू मी फक्त  एवढे माझ्या मनात बोलले तर महाराज म्हणतात की ताई स्वयंपाक नका करू माझे जेवण झाले आहे फक्त थोडे पाणी आणा मग मी पाणी आणले त्यांनी प्यायले ते म्हणाले की ताई तुम्ही या मुलाची कुंडली बनवण्यासाठी ज्योतिषाकडे चालल्या होत्या ना मी म्हणाले हो तर ते म्हणाले या गाव ज्योतिषी नाहीये मला भविष्य ही सांगते  तर मी सुद्धा कुंडली बनवू शकतो तुमची इच्छा असेल तर मी ह्या मुलाचा हात बघून कुंडली बनवू शकतो मी म्हणाले हो चालेल मग साधू महाराजांनी तुझा हात बघितला व ते मला सांगू लागले की ह्या मुलावर कालिका देवीचा आशीर्वाद आहे हा मुलगा खूप हुशार असेल व सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा ज्यावेळेस 25 वर्षाचा होईल तेव्हा याला देवी आईने दिलेल्या शक्ती समजतील व तो वाईटाचा नाश करेल व याचा मागच्या जन्माची ऋणानुबंध आहे याला त्या कालिका मनात जाऊ देऊ नका जर समजा तुम्हाला न सांगतांना विचारता केला व तुम्हाला ते नंतर समजले तर समजा की त्याला त्या जंगलात देवी आईने बोलावले आहे. ही माहिती जी मी तुम्हाला सांगितली आहे ती त्याला सांगू नका वेळ येईल तेव्हा सांगा शक्यतो ह्या माहिती विषयी तोच तुम्हाला विचारेल तेव्हा तुम्ही त्याला न संकोच करता सांगून टाका व हेही सांगितले की ज्यावेळेस 25 वर्षाचा होईल व एखाद्या मुली विषयी सांगू लागेल समजून घे की ती तुमची सून आहे कारण त्या मुलीचा व याचा मागच्या जन्माचा संबंध आहे एवढेच मला ते साधू महाराजांनी सांगितले आहे लिहिला हे सांगत असताना तिच्या डोळ्यात पाणी येते व निलेश पूर्णपणे शॉक होतो त्याला काही समजत नाही काय करावे तो लगेच निशाला कॉल करून सर्व सांगून टाकतो निशा सांगते की आपण सुरेशला भेटायला जाणार आहोत ना तर हे सर्व सुरेशला सांगून टाकून निलेश हो म्हणतो व फोन ठेवतो व झोपतो त्याच्या डोक्यात वेगवेगळे प्रश्न येत होते त्याला काय करावा समजत नव्हते त्याच्या मनात हे आले की जे साधू महाराज आपल्या घरात आले व त्यांनी माझी भविष्यवाणी सांगितले ते मला भेटतील का हे झाल्यावर निशा व निलेश सुरेशला भेटायला जाण्याची तयारी करतात कारण त्यांच्या सोबत खूपच वेगळे काहीतरी घडत होते ते दोघेही ठरवतात की आता आपण दोन ते तीन दिवसातच सुरेशला भेटायला जाऊ परत त्या दिवसा सारखेच दोघांनी त्यांच्या बॉसला विचारून सुट्टी घेऊन टाकली परवासाठी ते दोघेही  ठरवतात की दुपारच्या वेळेस सुरेश कडे जाऊ ते त्याची तयारी करतात .