Sudharak - 1 in Marathi Philosophy by Ankush Shingade books and stories PDF | सुधारक - भाग 1

Featured Books
Categories
Share

सुधारक - भाग 1



सुधारक नावाच्या पुस्तकाविषयी

         सुधारक नावाची आणखी एक कादंबरी वाचकाच्या हातात देतांना मला अत्यंत आनंद होत आहे आणि का नाही होणार? कारण लेखकाचं पुस्तक एक लेकरु असतं व ते लेकरु जेव्हा जन्मास येतं. तेव्हा आनंद होणारच. असा आनंद की ज्याचं मोजमाप करताच येत नाही.
          सध्याचा काळ ऑनलाईन काळ आहे व मी वाचकांना जास्तीत जास्त ऑनलाईन स्वरुपात पुस्तका उपलब्ध करुन देतो. मी वाचकांसाठीच लिहितो. कारण वाचक मला फोन करतात. म्हणतात की सर, आपली नवीन पुस्तक लिहिली असेल तर पाठवा. मी त्यावर त्यांची इच्छा पुर्ण करीत त्यांना गुगलवर ऑनलाईन पुस्तक उपलब्ध करुन देतो.
          मी माझी स्तुती सांगत नाही वा जाहिरातही करीत नाही. तसं कोणीही समजू नये. परंतु माझ्या ऑनलाईन स्वरुपात प्रकाशित होत असलेल्या साहित्य कृतीला वाचकवर्गही बराच आहे. त्यात ई साहित्य प्रतिष्ठानचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी माझ्या बऱ्याच पुस्तका प्रसिद्ध केल्या आहेत. माझी ही त्र्यांशिवी कादंबरी असून एकशे तेरावी पुस्तक आहे. मात्र एक खंत आहे. ती खंत म्हणजे माझ्या साहित्यकृतीला पुरस्कार न मिळणं.
          सध्याच्या काळ हा ऑनलाईन असला तरी पुरस्कार देणाऱ्या संस्था या ऑनलाईन साहित्याची दखल घेत नाहीत, असं जाणवतं. तसं पाहिल्यास ऑनलाईन प्रसिद्ध होत असलेली पुस्तकही बरीच वाखाणण्याजोगी आहेत व त्यांनाही पुरस्कार द्यायलाच हवेत. मात्र ते साहित्य संस्थांवर अवलंबून आहे. तसं पाहिल्यास सध्या पुरस्काराचं स्वरुप हे विकाऊ झालेलं आहे व याची सर्वांना कल्पना आहे. परंतु हे जरी खरं असलं तरी पुरस्कार देणाऱ्या संस्थांनी आता ऑनलाईन पुस्तकांचीही पुरस्कार देतांना दखल घ्यावी. अशी मला सुचना या पुस्तकाच्या माध्यमातून कराविशी वाटते. 
          या पुस्तकातील कथानक असं. एक जोडपं, जे पती पत्नी बनतात. ज्यांचा विवाह दिवाळी अंकांच्या माध्यमातून जुळतो. परंतु ते एकाच बिरादरीतील असल्यानं व त्यांनी संबंधित विषयाबद्दल त्रासच भोगला असल्यानं ते त्याच बिरादरीतील असलेले प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करीत असतात. अशातच त्यांच्या प्रयत्नातून एक प्रश्न सुटतो. त्यानंतर दुसऱ्या प्रश्नांच्या गांभीर्यावर ते विचारविमर्श करतात व तीच समस्या सोडविण्याचा प्रयत्न करतात.
         विशेष सांगायचं म्हणजे त्या समस्या वा ते प्रश्न कोणते? खरंच दुसरीही समस्या त्यांना सोडवता येते का की ती समस्या तशीच राहते? यावर विचारमंथन मांडणारी ही कादंबरी आपण नक्कीच वाचा. आपल्याला नक्कीच यातून हवा तो बोध घेता येईल व आपलाही काही विचार असल्यास तो शेअर करता येईल. यासाठी कादंबरी वाचल्यानंतर एक फोन अवश्य करावा. ही विनंती.
  
          आपला नम्र 
       अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०


सुधारक (कादंबरी)
            अंकुश शिंगाडे 

     
***************१*************************

         ते एक शहर व त्या शहरात विवाह जुळत व जुळलेले विवाह तुटत असत. त्यात काहीतरी कारणं असायची. मात्र त्या शहरात राहणाऱ्या मंगेश नावाच्या गृहस्थाला चिंता पडायची की हे असं होवू नये. असं जर झालं तर उद्या सृष्टी नियमाचं उल्लंघन होईल व सृष्टीच नष्ट होईल. 
           मंगेश शहरात राहणारा गृहस्थ. त्याला त्याबद्दल चिंता वाटणं साहजीकच होतं. कारण त्याच फारकतीच्या कारणातून त्यांच्या मुलांची आबाळ होत असे. म्हणूनच मंगेशला चिंता वाटत असे व वाटत असे की अशा प्रकारचा घटस्फोट बंद करण्यासाठी आपण काहीतरी करायला हवं. त्याचं कारणही तसंच होतं.
             मंगेश लहान असतांना त्यानं पाहिलं होतं की एक महिला तिच्याच शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीसोबत पळून गेली होती व तोही ते पाहून आपल्याच साळीसोबत पळून गेला होता. ज्यांना दोन लहान लहान मुलं होती व त्या दोन्ही लहान लहान मुलांना पोलिसांनी अनाथ आश्रमात टाकलं होतं. ती लहान लहान मुलं की ज्या लहान मुलांना आईवडील होते. परंतु तरीही ते अनाथ झाले होते.
           मंगेशनं पाहिले होते असे बरेचसे कुटुंब की ज्या कुटुंबात फारकत झाल्यास त्यांची मुलं अनाथ व्हायची. कोणाला बापाचं प्रेम मिळायचं नाही तर कोणाला आईचं प्रेम मिळायचं नाही. तसं पाहिल्यास बरेचसे स्री पुरुष फारकत झाल्यावर दुसरा विवाह करुन मोकळे व्हायचे. परंतु त्यांच्या मुलांना अनाथ करुन जायचे. ज्या मुलांना प्रेम मिळायचं नाही. 
            मंगेशचाही इतिहास तसा वेगळाच होता. तो लहान असतांना त्याच्या आईनं शुल्लकशा कारणावरुन फारकत घेतली होती. मात्र त्याच्या वडीलांनी तो लहान असतांना त्याला त्याच्या आईकडे सोपवलं नव्हतं. त्यानंतर त्याची आई कुणातरीसोबत पळून गेली होती. शिवाय फारकत होताच त्याच्या वडीलानं दुसरा विवाह केला होता. त्यातच ज्या स्रिशी त्याच्या वडीलानं विवाह केला होता. त्या स्रिनं त्याला काही चांगली वागणूक दिली नव्हती. अशातच त्याचा परिणाम त्याचे मनावर झाला होता.
           मंगेशला त्याच्या सख्ख्या आईचं प्रेम मिळालं नाही. त्याचं कारण होतं त्याच्या वडीलांचं दारु पिणं. तसे ते जास्त काही पित नव्हतेच. परंतु त्याच पिण्यावरुन त्याच्या आई व वडीलांची सतत भांडणं होत असत. ते काही मंगेशच्या आईला खपलं नाही व तिनं फारकत घेतली. त्यानंतर घरात आलेली ती सावत्र आई व तिची ती पहिल्या घरची मुलं. ती आपल्या पहिल्या घरच्या मुलांना ताजं अन्न द्यायची. दिवाळीला आणि वर्षभरच चांगले कपडे घेवून द्यायची. त्यांचा फार लाड करायची. त्यातच ती मंगेशचा रागच करायची. जेवढा राग करता येईल तेवढा. ती आपल्या मुलांना मारायचीही नाही आणि मंगेशला मारमार मारायची. कधी त्याच्या वडीलासमोरही मारायची. परंतु त्याचे वडील त्याच्या सावत्र आईला काहीही म्हणायचे नाहीत. 
           मंगेशची होत असलेली आबाळ. ज्या आबाळपणानं मंगेशच्या मनात फारकतीबाबतचे विचार वादळ निर्माण करु लागले होते. त्यातच वाटायला लागलं होतं की लोकांनी असा विवाह का करावा की ज्यातून फारकतीचा सामना करावा लागतो. हं, विवाह करावा तर तो टिकणाराच असावा. असा फारकत घेणारा नसावा.
           तेच विचार त्याच्या मनात लहानपणापासूनच जोर पकडू लागले होते. त्यातच दुसराही एक विचार होता, तो म्हणजे भेदभाव. तो शहरात राहात असूनही शहरात भेदभावात्मक वातावरण होतं. 
            मंगेशचं बालपण गावात गेलं होतं. ते गाव की त्या गावात त्यांची वस्ती गावकुसाबाहेर होती. ते गाव की त्या गावात भेदभाव व विटाळ असल्यानं मंगेशच्या परीवाराला गावात जाता वा येता येत नव्हतं. तशीच परिस्थिती असल्यानं मंगेशला घेवून त्याचे वडील शहरात राहायला आले होते. परंतु आजही ती परिस्थिती मंगेशला आठवत होती व त्याही परिस्थितीबद्दल त्याला वाटत होतं की तिही परिस्थिती बदलावी. ज्या परिस्थितीनं त्याला बालपणात छळलं होतं.
           शिला...... ती गावची साधारण मुलगी. जातीनं अस्पृश्य होती व तिच्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रभाव पडला होता. तिनंही विटाळाच्या वेदना लहानपणी बऱ्याच भोगल्या होत्या व आता ती मोठी झाली होती. आज तिचं वय वाढलं होतं. त्यातच तिचा विवाह झाला नव्हता बरेच दिवस झाले असले तरी. शिलाचाही जन्म गावातच झाला होता व तिचंही बालपण गावातच गेलं होतं. परंतु तिही आज शहरात स्थायीक झाली होती. मात्र तिनंही बालपणापासूनच ज्या विटाळाच्या वेदना शोषल्या होत्या. त्या वेदनांतून तिलाही विटाळ कायमचा संपावा असंच वाटत होतं. 
          शिला सुंदर होती. तशी वयात येताच ती अधिकच सुंदर दिसत होती. तरीही विवाह जुळला नव्हता. त्याची चिंता तिलाही होती. त्याच चिंतेत असतांना तिनं एक दिवस एका वर्तमानपत्रात जाहिरात पाहिली. जाहिरात होती एडीशनची. एका दिवाळी अंकाला मुखपृष्ठ हवं होतं. 
          तो दिवाळी अंक व त्या दिवाळी अंकासाठी वर्तमानपत्रात छापून आलेली जाहिरात. त्यात लिहिलं होतं की अशी मॉडेल हवी की जी मुखपृष्ठावर छापता येईल. 
           शिलानं ती जाहिरात वाचली. वाटलं आपलं नशीब आजमवावं. तसा विचार करुन ती दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठाच्या ऑडीशनसाठी गेली. तिनं मॉडेलिंग केलं. तशी ती सुंदरच होती व त्यात तिची निवड झाली.
         शिलाच्या चेहर्‍याची निवड मुखपृष्ठावर छापण्यासाठी होताच ती आनंदीत झाली. तसे काही दिवस गेले. काही दिवसानंतर शिलाला संपादक महोदयाचा फोन आला. फोनवर संपादक महोदय बोलत होते.
          "आपण शिला बोलताय ना."
          "होय, आपण?"
          "मी दिवाळी अंकाचा संपादक. ज्यांनी आपला फोटो छापलाय."
           "बोला सर."
           "आपला विवाह झालेला आहे काय?"
           "का बरं?"
           "एक फोन होता. विचारलं की हे मुखपृष्ठ त्यांना बरंच आवडलंय. त्यांनी मागणी घातलीय विवाहाची. पाठवून देवू काय?"
          ते फोनवर बोलणं. त्यातच शिलाच्या मनात एक प्रश्न उभा राहिला, जातीचा. कदाचीत आपली जात त्याला पसंत येईल काय? तो आपल्या जातीचा असेल काय? 
           जात....... जातीची बंधनं होती त्याही काळात. आंतरजातीय विवाहाला प्राधान्य नव्हतंच. शिवाय असं प्राधान्य द्यायचं कसं? हाही एक प्रश्नच होता. ज्यातून समाज तुटण्याची संभावना होती. ज्यात असा आंतरजातीय विवाह केल्यास समाज त्यांना वाळीत टाकत असे. तसा मुलगा शहरातीलच होता.
           ती विचार करु लागली. विचार होता, तिचं मुखपृष्ठ एका गृहस्थाला आवडलं व त्यानं तिला मागणी घातलेली आहे. काय करावे?
          शिलाला आलेला तो संपादक महोदयांचा फोन. शिला मनोमन खुश झाली व तिनं लागलीच होकार दर्शवला, जात पात नंतर पाहू या उद्देशानं व आपला पत्ता संपादक महोदयांना देवून सांगीतलं की ज्यांना ती पसंत आली, त्यांना घरी पाठवून द्यावं. ती अविवाहितच असून तिनं अद्यापही आपला विवाह केलेला नाही. 
            मंगेशनं दिवाळी अंक चाळला होता. ज्यात ते मुखपृष्ठ त्याला आवडलं होतं. ते मुखपृष्ठावरील अप्रतिम सौंदर्य पाहून तो अवाक् झाला होता. वाटत होतं की हिच्याशीच विवाह करावा. परंतु हे माहीत नव्हतं की ती अविवाहित आहे की विवाहीत?
           त्याचा तो प्रश्न. तसा त्यानं तो अंक ज्या संपादकानं काढला होता. त्याला त्यानं फोन लावला. चौकशी केली व चौकशी अंती ती अविवाहितच असल्याचं कळलं. लागलीच मंगेश लवकरच तिच्याशी संपर्क साधण्यासाठी आपल्या वडीलांना घेवून तिच्याघरी आला. त्यातच तिनं चौकशी केली व चौकशीअंती समजलं की तो तिच्याच जातीचा आहे व त्याचेशी विवाह करायला काहीच हरकत नाही. त्यातच दोघांचेही विवाह थाटामाटात पार पडले. 
          तो दिवाळी अंक....... तो दिवाळी अंक हा विवाह जोडणारा घटक ठरला. मंगेश व तिचा विवाह त्या दिवाळी अंकानं जुळून थाटामाटात पार पडला होता.
          दिवाळी अंकानेही विवाह जोडण्यासंदर्भाने पावले उचलावीत. दिवाळी अंक विवाह जोडण्यासाठी मोलाचं योगदान ठरतात. हा विचार एका दृष्टीनं विचार करायला लावणारा आहे.
             तो दिवाळी अंक व त्या अंकात छापून आलेलं ते एक मुखपृष्ठ. त्या मुखपृष्ठानुसार कळलं की त्या अंकाच्या आवृत्तीत शिला नावाच्या मुलीचा फोटो मुखपृष्ठावर छापला होता. तो फोटो पाहून चाहत्यापैकी मंगेशनं तिची फोटोवरुनच निवड केली व तिचा विवाह झाला. ते वाचून आनंद वाटला. 
          दिवाळी अंक. तसं म्हटलं तर आनंदाची परवणीच. कारण दिवाळी अंकात साहित्यिकांची लेखणी प्रसिद्ध होत असते. जे साहित्यीक कविता, गझल, लेख, कथा लिहितात. काही व्यंगात्मक लेखन करतात. त्यातच काही जाहिरातीही असतात की ज्या जाहिराती वाचून आपण अज्ञात असलेल्या दुकानात दिवाळी अंकातील जाहिरात पाहून जात असतो व वस्तू खरेदी करीत असतो. परंतु त्या दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठावरुन आता नवीनच गोष्ट लक्षात आली होती की दिवाळी अंकाने विवाहही जोडता येतात.
          दिवाळी अंकात शिलाचं जे मुखपृष्ठ छापलं गेलं होतं. ज्यात तिनं एक रुपयाही दिला नव्हता. कारण वर्षानुवर्ष अंधारात काढलेलं तिचं व तिच्या परिवाराचं आयुष्य. सौंदर्य मात्र अप्रतिम दिलं होतं तिला विधात्यानं. त्याच भरवशावर तिचा चेहरा मुखपृष्ठावर छापून आलेला होता. मात्र आजचे दिवाळी अंक आजच्या काळानुसार पैसे कमविण्याचे साधन ठरलेले आहे. जो पैसे देईल. त्याचंच साहित्य छापलं जातं. तशीच जाहिरातही त्याचीच छापली जाते, जो पैसे देईल. ज्यातून मुल्यही जपलं जातं की आपला दिवाळी अंक सरस बनावा. दिवाळी अंकात मलपृष्ठ व मुखपृष्ठाचे दर ठरलेले असतात. कोण किती पैसे देईल. यावर दिवाळी अंकातील मलपृष्ठ व मुखपृष्ठाचा अधिकार ठरलेला असतो. त्यातच बहुतांश अंकातील मुखपृष्ठावर एखादी अभिनेत्री वा आपल्याच घरातील एखाद्या सुंदर स्रीचे छायाचित्र टाकले जाते. काही काही दिवाळी अंकात लहान मुलींचेही छायाचित्र असतात. कधी एखादा दिपकच झळकतो दिवाळी अंकात. विशेष म्हणजे गरीब घरच्या एखाद्या कोणत्याही सुंदर मुलीच्या छायाचित्राला बरेच छापत नाहीत. कारण असतं पैशाचा अभाव. गरीब घरातील मुलींचे वडील तसे मुखपृष्ठाचे दर द्यायला तयार नसतात. कारण त्यांना दिवाळी म्हटलं तर दिवाळाच काढणारी असते. दिवाळी तेही साजरी करीत नाहीत असे नाही. तेही साजरी करतात. काही आपल्या भावनांवर आवर घालून.
         दिवाळी अंक हे जाहिरातीला स्थान देत असतात. कारण आजच्या काळात दिवाळी अंक छापणे साधी गोष्ट राहिलेली नाही. त्याला बराच खर्च लागतो. एवढा पैसा ते कुठून आणतील? म्हणूनच मलपृष्ठ आणि मुखपृष्ठाचे दर ठरवून पैसा गोळा करणे हा उद्देश असतो. काहीजण त्याला व्यापार समजून नवा आयाम देतात व जाहिरातीच्या माध्यमातून बराच पैसा कमवितात. परंतु हे जरी जरी खरं असलं तरी दिवाळी अंकातून सामाजिक प्रबोधन नेहमीच होत असतं. कारण त्यात जे लेख वा कविता असतात. त्या प्रबोधनात्मकच असतात की ज्यातून बरंच काही शिकता येतं. 
          सध्याचा काळ हा जाहिरातीचा काळ आहे व तोच उद्देश गृहीत धरुन दिवाळी अंकात जाहिरातीला स्थान दिले जाते. ज्यातून सामाजिक उद्देश तर साजरा होतोच. शिवाय जाहिरातही करता येते. अन् तो उद्देश यशस्वी होतोही. परंतु सकाळच्या उपक्रमाअंतर्गत दिवाळी अंकाने तसं पाऊल जर उचललं तर सामाजिकतेचा एक उत्कृष्ट दर्जा दिवाळी अंकाला नक्कीच प्राप्त होवू शकतो.
         सध्या विवाह जोडणे ही तारेवरची कसरत झालेली आहे. बरीचशी मुलं व मुलीही शिकलेली असतात की ज्याचा शोध घेणं एक कठीण बाब ठरलेली आहे. अशावेळेस दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठावर वा आतील पानावर उपवर मुलामुलींसाठी विशेष एक दोन पानं ठेवल्यास तोही प्रश्न मिटू शकतो. मुखपृष्ठावर एखाद्या लहान मुलीचे वा एखाद्या अभिनेत्री असलेल्या स्रीचे छायाचित्र न देता त्याच ठिकाणी एखाद्या सुंदर मुलीचे छायाचित्र दिल्यास तो बेत तडीस नेला जावू शकतो. कधी मुखपृष्ठासाठी पैसे न पाहता एखाद्यावेळेस गरीब घरातील उपवर मुलींचे छायाचित्र छापल्यास दिवाळी अंकातील सरसतेत व सामाजिक मुल्यात आणखी वाढ होवू शकते. शिवाय असे केल्याने विवाहासाठी स्थिती निर्माण होत असतांना लोकं प्रत्यक्ष संपादकांशी संपर्क साधू शकतात किंवा प्रत्यक्ष मुलींच्या आईवडीलांशी संपर्क साधू शकतात. त्यातच व्यापारीक दृष्टीकोनातून विचार केल्यास विवाहयोग्य मुलींचे छायाचित्र निःशुल्क जरी छापले गेले तरीही संपादकांचा फायदाच होवू शकतो. ज्यातून फक्त मुलींचे छायाचित्र व वर्णन दिवाळी अंक छापू शकतात. त्यात फोन नंबर वगळायला हवेत. जेणेकरुन तो अंक ज्यांच्या संपर्कात येईल. तो संपादकाला फोन करेल व संपादक तो अंक विवाह करणाऱ्या यजमानांना त्याच्या दामात विकेल. असे केल्याने व्यावसायिक दर्जाही टिकून राहील. व्यतिरिक्त सामाजिक दर्जाही. 
          विवाह जोडणे ही काही वाईट गोष्ट नाही. ती एक सामाजिक गोष्ट आहे नव्हे तर एक प्रकारची सेवाच आहे. म्हणतात की विवाह गाठी या वरुनच बांधून आलेल्या असतात. परंतु त्याला माध्यम हवं असतं. जे माध्यम दिवाळी अंक ठरु शकतं. देशात दिवाळी अंक एक नाही तर हजारोंच्या संख्येनं निघत असतात. जर प्रत्येक दिवाळी अंकाने हा उपक्रम राबवला तर हजारो मुलामुलींचे विवाह जुळतील व कोणतीच मुलं मुली वय होण्यापलीकडील राहणार नाहीत. प्रत्येकांचे विवाह हे विशिष्ट वय झाल्यावर लगेच जुळवता येवू शकतील यात शंका नाही. 
           विवाह जोडणे वा विवाह होणे हे एक प्रकारचे सृष्टीचेच कार्य आहे. त्यासाठी प्रत्येक दिवाळी अंकानं साहित्यीकांचे लेख वा कविता भाराभर न छापता दोन चार छापून त्यातील उरलेली पानं जर अशा विवाहयोग्य उपवर मुलामुलींसाठी प्रदान केलीत तर सृष्टीच्या कार्यातही मोलाचा वाटाच ठरेल. हे कार्य दिवाळी अंकाने करायला हवे. प्रत्येकच दिवाळी अंकांचा पैसे कमविणे हाच उद्देश नसावा. कधीकधी एखाद्यावेळेस एखाद्या गरीबही मुलींचे छायाचित्र दिवाळी अंकाने आपल्या मुखपृष्ठावर छापल्यास त्याचा जो आनंद संपादकाला मिळू शकतो. तो असीम आनंद असतोच. महत्वपुर्ण बाब ही की प्रत्येकच दिवाळी अंकाने असे विवाह उपवर वरवधूचे छायाचित्र छापल्यास अनेक विवाह जोडता येतील व विवाह जोडण्यासंबंधात वानवा भासणार नाही. हे तेवढंच खरं.
         शिला आणि मंगेशचा विवाह. ती दिवाळी अंकाची देण ठरली. तसं पाहिल्यास तिचे आणि त्याचे सूरही जुळलेले होते. कारण ते एकाच समाजातील होते व माझा धर्म मला प्रिय आहे. असं त्यांना वाटत होतं. त्यातच आठवत होते संभाजी महाराजांचे बलिदान. ज्या संभाजी महाराजांनी धर्मासाठी प्राण दिला होता. त्यातच आठवत होता तो बुद्धभुषण ग्रंथ. जो ग्रंथ संभाजी महाराजांनी लिहिला होता. 
           मंगेशला आठवत होता तो एक व्यक्ती. ज्या व्यक्तीनं एके दिवशी शिवाजी महाराज आपल्याच जातीचे आहेत असे म्हटले होते. परंतु ते काही मंगेशच्या पचनी पडत नव्हतं. नेमके शिवाजी कोण? हा संभ्रम त्याच्या मनात निर्माण झाला होता. तसं त्यानं त्या व्यक्तीशी वादही घातला होता की शिवाजी महाराज हे मराठे आहेत. परंतु त्याच्या संपर्कात आलेला व्यक्ती ऐकायलाच तयार नव्हता. 
         ती जात व त्या जातीवरुन झालेलं संभाषण. ते वादाचंच प्रकरण होतं. तसं पाहिल्यास तो काळ व त्या काळात जात आणि धर्मावरुन भांडणं व्हायची. भांडणं विकोपालाही जात असत. त्यातच मंगेशला वाटत असे की जात आणि धर्म आज मिटायला हवा. भारत स्वतंत्र झाला आहे. संविधान बनलं आहे. जात आणि धर्मच नसेल तर कोणीही जातीवरुन व धर्मावरुन भांडणारच नाही. अर्थात वादही होणार नाही.
         मंगेश विचार करीत होता. माझा धर्म मला प्रिय आहे. यासाठीच पुर्वीपासूनच बरेच वादविवाद झालेत. कत्तलीही झाल्यात. धर्मासाठी बऱ्याच राज्यकर्त्यांनी कित्येकांचे मुडदे पाडले. तेच घडलं जातीवरुनही. जातीचाच आधार घेवून शंभूक ऋषीच नाही तर कित्येक लोकं मारल्या गेलेत. हे विसरता येत नाही. पुर्वी धर्माचे स्तोम माजले होते व आपला तथाकथीत समाज आपापला धर्म वाढविण्यासाठी राजाश्रय येताच एकमेकांच्या धर्मीय व्यक्तींच्या कत्तली करीत असत. ज्यात उद्देश असायचा की आपला धर्म टिकावा, वाढावा. जर धर्मच नसते तर........ तर अशा कत्तली झाल्या असत्या काय? सध्या धर्माचे स्तोम माजलेले नाही. तरीही काही काही ठिकाणी धर्मावरुन भांडणं होतात. यावर उपाय एकच आहे. तो म्हणजे धर्म विरहीत राष्ट्र बनणे. तसंच जातीचंही व्हावं. जात जर कोणाला पाहिजे नसेल तर जातही पुर्णतः त्यागण्याचं प्रावधान असावं. म्हणजे धर्मावरुन वा जातीवरुन भविष्यात कधीच भांडणं होणार नाहीत. छळही होणार नाहीत. ना ॲक्ट्रासिटीअंतर्गत गुन्हे घडतील. ना कोणाला परेशानी होईल. ना कोणी कोणाला परेशान करणार. एकंदरीत सांगायचं झाल्यास समाजात शांततेची व सुव्यवस्थेची घडी निश्चितच व नक्कीच बसवता येईल.
          मःगेशला धर्माबाबत आस्थाच होती. त्याला वाटत होतं, धर्म प्राचीन काळापासून धर्म अस्तित्वात आला व प्रत्येकानं आपल्या धर्माचा बाऊ करीत धर्मातीत लोकांना छळलं. ज्यातून धर्मानुसार भांडणं निर्माण झाली. तसं पाहिल्यास धर्म, तोही आपला धर्म सर्वांना प्रिय आहे आणि देशात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या धर्मानं चिकटवून ठेवलं आहे. जरी धर्मनिरपेक्षता आली असली तरी.
         आज धर्म अस्तित्वात आहेत. त्यानुसार प्रत्येक व्यक्ती हा धर्माधिष्ठित आहे. तो व्यक्ती धर्मनिरपेक्ष नाही. हं, देश प्रसंगी राहू शकतो धर्मनिरपेक्ष. अन् असायलाच हवा आणि प्रत्येकानं दुसर्‍यांच्याही धर्माचा आदर करायला हवा. परंतु तसा आदर पुर्वीही नव्हता व आजही दिसत नाही. आजही लोकं धर्माच्या नियमानं जगतात. त्यातच लोकांना धर्माचे नियम सांगतात. शिवाय धर्म वाढवितांना काही अनैतिक प्रकारही अवलंबतात. ज्यात क्रूरता असते. अशी क्रूरता की तो धर्म नाईलाजास्तव घ्यावाच लागतो. न घेतल्यास जीवाला मुकावे लागते.
           हेच घडलं प्राचीन काळापासून. आपला धर्म वाढवीत असतांना धर्माधिष्ठित लोकांनी आपल्या धर्माचं समर्थन करीत तथाकथीत लोकांना आपल्याजवळ असलेल्या बलाच्या साहाय्यानं लोकांचं धर्मपरीवर्तन केलं. अन् ज्यांनी धर्मपरीवर्तन केलं नाही. त्यांच्या हत्या केल्या. काहींचे अवयव कापून त्यांना अपंग केलं. ज्यात काही धर्माधिष्ठित राजांनी धर्म सोडला नाही. म्हणूनच त्यांचे हालहाल करुन त्यांना मारले गेले. उदाहरणार्थ संभाजी महाराज आणि ज्यांनी धर्मपरीवर्तन केलं. ते मात्र वाचले.
         धर्मपरीवर्तनाबाबत विचार करायला हवा की जर संभाजी महाराजांनी त्या काळात धर्मपरीवर्तन केलं असतं तर काय घडलं असतं. आज संपुर्ण मराठेच नाही तर महाराष्ट्र इस्लाममय झाला असता. हिंदू उरलाच नसता या महाराष्ट्रात. त्यातच देशही मुस्लीममय व्हायला वेळ लागला नसता. कारण औरंगजेबाची सत्ता केवळ महाराष्ट्रातच निर्माण झाली नसती तर संपुर्ण भारतात निर्माण झाली असती व त्याच्या धर्माधिष्ठित क्रूर स्वभावानं कोणालाही वाटणार नाही की या देशात हिंदू वा इतर धर्म उरले असते. आज जे कोणते धर्म उरले आहेत ना भारतात. ते धर्म म्हणजे संभाजी महाराजांची देणच म्हणावी लागेल. कारण त्यांनी खरं तर धर्मासाठी बलिदान दिलं. परंतु आपला धर्म बदलवला नाही. एक एक अवयव कापला गेला संभाजीमहाराजांचा. तोही केवळ धर्मासाठी. परंतु त्यांनी हार मानली नाही. 
         बुद्धभुषण ग्रंथावरुन मंगेशला वाटत होतं की महाराज संभाजी हे हिंदू धर्माचे होते व त्यांनी आपल्या बलिदानातून हिंदू धर्म टिकवून ठेवला नव्हे आत्मनिष्ठा टिकवून ठेवली. जगाला दिशा दिली की धर्मासाठी प्रसंगी मरण पत्करावं. परंतु आपला धर्म बदलवू नये. तसं पाहिल्यास त्यांच्यावर तथागत गौतम बुद्धाचा प्रभाव होता. ज्यांचे तत्व पटल्यानं त्यांनी बुद्धभुषण नावाचा ग्रंथ लिहिला. त्याच बुद्धभुषण ग्रंथावरुन आता कोणी शिवरायांनाही अस्पृश्य समजू लागले आहेत. म्हणत आहेत की शिवाजी महाराज हे अस्पृश्य होते. म्हणूनच बाणभट्टाने त्यांचा राज्याभिषेक नाकारला होता. म्हणतात की बाणभट्टाने त्यांचा राज्याभिषेक प्रत्यक्ष पायाच्या अंगठ्याने केला. मात्र शिवाजी महाराजांची वंशावळी तपासली असता ते राजस्थानातील सिसोदिया वंशाचे होते व बाप्पा रावलच्या वंशानंतर शिवाजी महाराजांच्याच सिसोदिया वंशानं राजस्थानमध्ये सत्ता स्थापन केली होती. हा इतिहास आहे व इतिहासानुसार याबाबत संभ्रम असून प्रत्येकात मतेमतांतरे आहेत. जो इतिहास बराच खोल आहे. त्याचा अभ्यास केल्यास सर्वांना कळेल की शिवाजी महाराज हे नेमके कोण? 
          शिवाजी महाराज नेमके कोण? असा विचार केल्यास ते बहुजनांचे राजे होते की ज्यांचं राजेपण त्या काळातील तथाकथीत लोकांना खपत नव्हतं. ज्यानुसार त्यांचा राज्याभिषेक नाकारल्या गेला. तरीही ज्यातून संभाजी महाराज झाले व त्यांनी तमाम हिंदू धर्म तेवत ठेवला. कारण एक राजा जर आपला धर्म बदलवीत असेल तर त्याचबरोबर त्याची प्रजा देखील धर्म बदलवीत असते. हे देशाचा एकंदर इतिहास पाहिला तर आपल्याला कळू शकेल. सम्राट अशोकांनी बौद्ध धम्म घेतल्यानंतर सर्व प्रजा ही बौद्धमय झाली. ती प्रजा तेव्हापर्यंत बौद्धमय होती. जेव्हापर्यंत सम्राट अशोकांच्या वारसांची सत्ता राज्यात होती. तद्नंतर आलेल्या पृष्यमित्र शृंगानं सत्ता हस्तगत करताच राज्यातील सर्व बौद्धांचं धर्मपरीवर्तन करुन घेतलं, सत्तेच्या भरवशावर. ज्यांनी धर्मपरीवर्तन केलं नाही. त्यांना सरसकट तलवारीनं कापून काढलं. ज्यात काही धर्मनिष्ठ बुद्ध धम्म पसंत असलेली दोनचार मंडळी राज्यातून पळून गेली व त्यांनी आपला धम्म तेवत ठेवला. धर्म बुडू दिला नाही. तोच प्रभाव पडला संभाजी महाराजांवर. ज्यातून त्यांनी बुद्धभुषण ग्रंथ लिहिला असेल. ज्यातून त्यांच्या मनात धर्माचं रणशिंग अर्थात आस्था टिकून राहिली असेल व त्यांनी प्रसंगी प्राण दिला आहे. परंतु धर्म बदलविला नाही. ज्यातून आपल्यासाठी संभाजी महाराज प्रेरणादायी ठरतात. ज्यातून तथागत गौतम बुद्धही प्रेरणादायी ठरतात.
         बुद्धभुषण याचा अर्थ बुद्धतत्व हेच भुषण आणि ते तत्व सांगणारा बुद्धही भुषणच. म्हणजेच बुद्ध हे जरी जीवंत नसले तरी त्यांचे विचार जीवंत होते व ते विचार महनतम होते. त्या विचारात महानता होती. म्हणूनच सम्राट अशोकाचा वारस असलेल्या बिंदूसारच्या हत्येनंतर जरी संपुर्ण राज्यात वैदिक धर्म पुष्यमित्र शृंगानं पसरवला असेल तरी बौद्ध धम्म जीवंत राहिला. आजही जीवंत आहे. हे विसरता येत नाही.
         धर्माबाबत दुसरा प्रयत्न झाला तो सातव्या शतकात. सातव्या शतकात राजस्थानात राजा दाहिरचं राज्य होतं. जो राजा दाहिर वैदिक धर्माचा होता. राजा दाहिर गादीवर येण्यापुर्वी तेथे बौद्ध धम्म होता. परंतु राजा दाहिर सत्तेवर येताच त्यांनी राजस्थानात वैदिक धर्माचा प्रसार केला. परंतु त्यासाठी त्यांनी आक्रमकता दाखवली नाही. त्यांच्या राज्यात इतरही धर्माची मंडळी गुण्यागोविंदानंच राहात होती व तीच खरी धर्मनिरपेक्षताही होती. परंतु मोहम्मद बिन कासीमनं त्यांची हत्या करताच राजस्थानमध्ये इस्लाम धर्म वाढायला लागला होता. ज्यात पुर्ण राज्यच इस्लाममय होईल अशी भीती वाटत असतांना लवकरच मोहम्मद बिन कासीमची हत्या अतिशय सिताफीनं राजा दाहिरच्या मुलींनी बगदादमध्ये केली व सातव्या शतकात राजस्थान इस्लाममय होण्यापासून वाचला. तद्नंतर आलेल्या बाप्पा रावल व त्याच्या वंशजांनी व पुढे शिवाजी महाराजांच्या वंशजांनी बाबर आणि सम्राट अकबर सत्तेवर येईपर्यंत राजस्थानमध्ये वैदिक धर्मच तेवत ठेवला. तद्नंतर अकबराने राजस्थानमध्ये प्रेमविवाहाचे जाळे पसरवत येथील वैदिक धर्मातील स्रियांशी विवाह केला व तमाम भागात आपल्या अतिशय अक्कल हुशारीनं धर्म पसरवला.
           येथील तमाम धर्म. आजतागायत टिकून राहिले. ते येथील कट्टरवादी असलेल्या धर्मप्रेमींमुळंच. येथील काही कट्टर वैदिक धर्मवाद्यांनी इस्लामी राजवटीच्या काळातही बाहेर मुस्लीम धर्म दाखवला. परंतु अंतर्मनात वैदिकच धर्म ठेवला. तसेच ते वाट पाहात राहिले, तमाम विपरीत असलेली परिस्थिती जाण्याची. जेव्हा अशी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली. तेव्हा आपला धर्म उघड केला. तसंच जे घडलं, येथील वैदिक धर्माबाबत. तेच इतरही धर्माबाबत घडलं. येथील पुर्वीपासून अस्तित्वात असलेला बौद्ध धम्म तर पुर्णतः नेस्तनाबूतच झाला होता भारत स्वतंत्र होईपर्यंत. तसे मुळचे भारतातील असलेले जैन व बौद्ध धर्म हे नावापुरतेच राहिले होते भारतात. परंतु जेव्हा भारत स्वतंत्र झाला आणि १९५० ला भारतात संविधान लागू झालं. त्यानुसार संविधानात धर्मनिरपेक्षता आली व ठरलं की प्रत्येक व्यक्तीनं सर्व धर्माचा आदर करावा. सहिष्णुता पाळावी. तसंच प्रत्येकाला धर्म बदलविण्याचा अधिकार आहे. आवडल्यास तो कोणताही धर्म घेवू शकेल. त्यातच डॉक्टर बाबासाहेबांनी सन १९५६ ला नागपूरातील दिक्षाभुमी इथं बौद्ध धम्म घेतला. त्यामुळंच भारतात बौद्ध धम्म अधिकच वाढला व बौद्ध धम्माच्या अस्तित्वात भारतात वाढ झाली आहे. असे असले तरी इतरही धर्माचा अनादर होत नाही भारतात. तेही धर्म तेवढ्याच ताकदीनं भारतात उभे आहेत. मात्र आज याच धर्मनिरपेक्ष धोरणाचा वापर करुन काही महाभाग धर्मांतरण करीत आहेत. ते धर्मांतरण करतांना आमीष दाखवत आहेत. काही फुस लावून विवाह करीत आहेत. आता हत्याराचा धाक दाखवून वा दंडूकेशाहीनं धर्मांतरण होत नाही.
          धर्मनिरपेक्ष हे एक तत्व असून धर्म मोठे की धर्मनिरपेक्षता असा जर कोणी प्रश्न विचारल्यास धर्मनिरपेक्षताच मोठी ठरते. ज्यानुसार प्रत्येक धर्माला आदर मिळतो. ज्याचे तत्व संविधानात नमूद आहेत. परंतु ज्याप्रमाणे मतदानात नमूद असलेले उमेदवार आवडत नसले तर नोटा बटनचा वापर होतो. तसा नोटा बटनचा अधिकार हा धर्माबाबत संविधानात नाही. काही लोकांना जातीही पसंत नाहीत. 
          डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं व संविधानात धर्मनिरपेक्षता हे तत्व पर्यायानं नमूद केलं. त्या तत्वाचा तत्वांश घटनेच्या कलम १४ ते २६ मध्ये दिलेला आहे. परंतु हे जरी खरं असलं तरी काही लोकं असेही आढळतात भारतात की ज्यांना कोणतेच धर्म मंजूर नाहीत. ना त्यांना कोणत्याच जाती मंजूर. अशा लोकांनी आपला धर्म काय लिहावा? हा प्रश्न प्रत्येकाला पडल्याशिवाय राहात नाही. सन २०११ ला झालेल्या लोकसंख्या जनगणनेनुसार बरेचजण धर्माच्या रकान्यात माझा धर्म अमूक लिहू नका तर भारतीय लिहा असे म्हणत होते. याचाच अर्थ असा की आज जसा मतदान करतांना नोटाचा अधिकार आहे. तशीच लोकांच्या मनामध्ये आता धर्माबद्दल व जातीबद्दलही तिटकारा व तेवढीच असूया निर्माण झाली आहे. होत आहे. त्याचं कारण आहे, प्रत्येक धर्माचं आचरण. जे आचरण मनाला वा तनाला कधीच पटत नाही. ज्यासाठी संविधानात नव्यानं तशा स्वरुपाची तरतूद करावी असं तमाम भारतात राहणाऱ्या लोकांना वाटते. महत्वपुर्ण बाब ही लक्षात घेण्यासारखी आहे की आज धर्म मोठा नाही. धर्मनिरपेक्षता मोठी आहे व तीच मोठी असल्यामुळे संविधानानं बहाल केलेल्या मुक्त विहारी स्वातंत्र्यानुसार जर एखाद्यावेळेस एखादा व्यक्ती धर्म मानत नसेल, मी अमूक धर्माचा असं त्याला लिहावसं वाटत नसेल तर त्याचेवर त्याच्या त्याच्या धर्मानं बंधन घालू नये. त्याचा धर्म भारतीय लिहिण्याचं वा नकारण्याचं प्रावधान असावं. तसंच प्रावधान जातीबद्दलही असावं म्हणजे झालं. जेणेकरुन कोणीच धर्माचा वा जातीचा गुलाम असणार नाही व कोणीच कोणाचा धर्मावरुन आणि जातीवरुन छळही करणार नाही. असं जर झालं तर प्रत्येकजण म्हणेल की मला माझा धर्म आणि जातही प्रिय आहे. 
           धर्माबाबत मंगेशच्या मनात संभ्रम असला तरी मंगेशला त्याचा धर्म आवडत होता व आवडत होती त्याला त्याची जातही. कारण विवाह करतांना त्यानं सर्वप्रथम शिलाला जातच विचारली होती. त्याला वाटत होतं की जातीतच खरा सन्मान आहे व जातीची मुलगी मागितल्यास तो सन्मान टिकून राहतो. 
        *********************२******************

          मंगेश महार जातीचा होता. तसे त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आवडत होते. त्यांचे विचारही आवडत होते आणि वाटत होतं की बाबासाहेब केवळ मनातच नाही तर मैदानातही दिसायला हवेत. जेणेकरुन येणारी पिढी बाबासाहेबांच्या मैदानावर असलेल्या मुर्तीवरुन बोध घेतील. विचार करतील की अशाच स्वरुपाचं कार्य करावं. विचार करतील की अशाच स्वरुपाचं शिकावं, ज्यातून आपलाच उद्धार होवू शकेल. असाच विचार करीत असतांना त्यानं काही लोकं जमवले. त्यातच एका सार्वजनिक जागेवर बाबासाहेबांची मुर्ती स्थापन करण्यासाठी गेला. परंतु झालं उलट. तमाम ओबीसी लोकांनी त्यांना विरोध दर्शवीत त्यांना बाबासाहेबांची मुर्ती स्थापन करु दिली नाही. ज्यातून त्याला विचार आला व तो विचार करु लागला. 
          बाबा, तुमच्यासाठीच जागा नाही? त्याचा तो प्रश्न. त्याचं कारणही तसंच होतं. ते कारण होतं, बाबासाहेबांना जागा न मिळणं. 
          ती सार्वजनिक जागा होती व त्या जागेवर बाबासाहेबांची मुर्ती बसवायला लोकं गेले होते. जी बाबासाहेबांची लेकरं होती. परंतु लोकांनी विरोध केला होता. म्हटलं होतं की बाबासाहेबांची मुर्ती इथं बसवू नये. 
          लोकं...... नव्हे तर ती बाबासाहेबांची लेकरं. त्यांच्या मनात बाबासाहेब आराध्य म्हणून उभा होता. वाटत होतं की कितीतरी वर्षापासून त्यांना हलाखीचं जीवन जगावं लागलं. त्यावेळेस कोणताच देव धावून आला नाही. फक्त बाबासाहेबच धावून आले. त्यामुळंच त्यांना आता बोलता येतं. त्या लोकांमध्ये मंगेशही होता की जो बाबासाहेबांच्या समाजातून होता.
       मंगेशच्या मनात प्रश्न उभा झाला होता. प्रश्न होता त्या ठिकाणाचा. ते ठिकाण व त्या ठिकाणी संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यात येणार होता. ते सार्वजनिक ठिकाण होतं. ज्याला तेथीलच तमाम ओबीसी समाजानं विरोध केला. ज्यांच्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जातीच्या कलमेपुर्वी कलम ३४० लिहिलेली होती.
              संविधान निर्माते म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ओळखले जाते. त्याचं कारण आहे त्यांचं संविधान निर्माण करणं. त्यांनी जे संविधान निर्माण केलं. ते संविधान देशात लागू झालं. एवढंच नाही तर त्याचा अभ्यास जगात केला जातो. कारण ते सशक्त असं संविधान आहे.
         संविधान हे केवळ विशिष्ट धर्मासाठी वा जातीसाठी लिहिण्यात आलेलं नव्हतं. त्यात वेगवेगळ्या कलमा असून त्या कलमानुसार त्यातून लोकांना अधिकार आणि हक्कं मिळालेले होते. शिवाय त्यात अशा अशा कलमा होत्या वा तरतूद होती की व्यक्तींचे जे अधिकार व हक्कं होते. त्या अधिकार व हक्काचं हनन झाल्यास त्यावर न्यायालयात दादही मागता येत होती. या संविधानातून माणसंच नाही तर महिलांनाही विशेष असे हक्कं व अधिकार मिळालेले होते. एवढंच नाही तर संविधानातून किडे वा मुंगीवरही कोणी अत्याचार करु शकत नव्हते. त्यातच हिंस्र श्वापदांचाही कोणी बळी घेवू शकत नव्हते. शिवाय झाडांचीही कत्तल करु शकत नव्हते.
         मंगेशला मनात विचारकरीत होता, डॉ. बाबासाहेबांनी सशक्त असं संविधान बनवलं. कोणासाठी? तर तमाम लोकांसाठी. देशातील लोकशाहीला बळकट करण्यासाठी. आज देशातील राज्यकारभार त्यांचं संविधान आहे म्हणून सुरळीत चालतं. नाही तर देशात अंधाधुंदीच माजली असती. त्यांनी संविधान लिहितांना केवळ आपली जात वा आपला धर्म पाहिला नाही. सर्वप्रथम त्यांनी ओबीसी समाजाला प्राधान्य दिलं व त्यांच्यासाठी कलम लिहिली. ती म्हणजे ३४० वी कलम. त्यानंतर त्यांनी आपल्या जातीसाठी कलम लिहिली. ती कलम आहे, ३४१. म्हणजेच त्यांनी आपल्या समाजाचा कलमा लिहितांना आधी विचार केला नाही. आधी विचार केला ओबीसी समाजाचा. शिवाय आरक्षणाबाबतही त्यांनी ओबीसीच्या आरक्षणाचा विचार संविधानात केला होता. परंतु ओबीसी नेते आम्हाला भीक नको असे म्हणाल्याने जे हिंदू कोड बिल होतं बाबासाहेबांच्याच कारकिर्दीतील. ते तुर्तास थांबलं. परंतु पुढे ज्यावेळेस ओबीसी वर्गाला आरक्षण देण्याची वेळ आली. तेव्हा तीच बाब समोर ठेवून ओबीसी वर्गाला आरक्षण दिलं गेलं व त्यानुसार १६ नोव्हेंबर १९९२ ला त्या संदर्भानं शिफारस करण्यात आल्या व ओबीसी प्रवर्गाला आरक्षण मिळालं. ती डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचीच कृपा. त्यानंतर संविधानाच्याच तरतुदीनुसार अंतर्गत मराठा समाजाचाही लढा सुरु झाला व त्याचवर्षी एका नेत्याच्या आंदोलनानंतर स्वतः मुख्यमंत्र्यांनी ओबीसी जातीतील आरक्षणात मराठा समाजाचा समावेश करु असं जाहीर आश्वासन दिलं. महत्वपुर्ण बाब ही आहे की आज ओबीसी वर्गाला आरक्षण मिळालं नव्हे तर ज्यांना आरक्षण नाही. तोही समाज आज सक्षम बनलेला आहे. लोकांना संविधानानुसार बोलता येते. आपले मत व्यक्त करता येते. कोणत्याही रेस्टॉरेंटमध्ये जेवन करता येते. स्वैरपणे कोणत्याही गावाला जाता येते. उच्च शिक्षण शिकता येते. पाहिजे त्या प्रमाणात भेदभाव नाही. लिहिता येते. वाचता येते. मोठं घर बांधता येते. आपली संपत्ती वाढवता येते. स्पर्धा परीक्षेला बसता येते. नोकरी मिळवता येते व आपली उपजीविकाही चालवता येते. पोटासाठी कोणताही व कुठेही व्यवसाय लावता येतो. जातीचाच व्यवसाय लावायला हवा, असं बंधन नाही. एकंदरीत विचार केल्यास सर्वच गोष्टी करता येतात. हे शक्य झालंय केवळ आणि केवळ डॉ. बाबासाहेबांमुळं व त्यांनी अथक परीश्रमातून निर्माण केलेल्या संविधानामुळं. संविधान हे २६ नोव्हेंबर १९४९ ला लिहून पुर्ण झालं व सन २६ जानेवारी १९५० ला लागू झालं. अर्थात त्याची अंमलबजावणी त्या त्या तारखांना होवू लागली. 
          डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान हे केवळ आपल्याच जातीसाठी लिहिलेलं नसून ते देशासाठी लिहिलेलं आहे व देशातील आरक्षण मिळालेल्या व न मिळालेल्या सर्वच जातीसाठी लिहिलेलं आहे. ते देशातील सर्वच धर्मासाठी लिहिलेलं आहे. आज त्याच संविधानातील तरतूदीनुसार सर्वांना स्वातंत्र्याचा पूरेपूर लाभ घेता येतो. परिणामी त्यांनी आपली जात वा प्रवर्ग मागे टाकून ३४१ वी कलम ओबीसी प्रवर्गासाठी सर्वप्रथम लिहिलेली आहे. असे असतांना ओबीसी प्रवर्ग आज डॉ. बाबासाहेबांनी देणगी म्हणून दिलेल्या संविधानातील तरतुदींचा फायदा उचलतात. परंतु डॉ. बाबासाहेबांना सन्मान देत नाहीत. त्यांची हेळसांड करतात. एवढंच नाही तर त्यांना जागा सुद्धा देत नाही बसायला. जरी त्यांना कोणी सार्वजनिक जागेवर बसवत असले तरी.
          आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे कार्य केलं. ते केवळ एकाच आपल्या जाती वा एकाच आपल्या धर्मासाठी केलेलं नाही तर ते सर्वच जाती व धर्मासाठी केलेलं असतांना सर्वच जातीच्या वा धर्माच्या लोकांनी त्यांना मानायला हवं. त्यांचा सन्मान करायला हवा. त्यांची हेळसांड करु नये. कारण त्यांनी इतर सर्व जाती धर्माच्या तरतुदी संविधानात लिहितांना कोणत्याच जातीधर्माची हेळसांड केलेली नाही वा तशा स्वरुपाचा भेदभावही केलेला नाही. मग इतर समाज, जो वेगवेगळ्या जातीधर्माचा आहे, तो त्यांचा पदोपदी अपमान का करतो? ते कळायला मार्ग नाही. 
          आज तमाम इतर धर्मीय समाज आपआपल्या धर्माचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी सार्वजनिक जागेवर आपल्या धर्माची प्रार्थना मंदीरे उभी करतात. अन् एखादा साधा पुतळा डॉक्टर बाबासाहेबांचा उभारतो म्हटलं तर त्याचा विरोध करतात. त्यांच्या जातीच्या लेकरांना शिव्या हासडतात नव्हे तर तसं कार्य करणाऱ्या लेकरांचाही अपमान करतात. एवढंच नाही तर तमाम ओबीसी व इतर समाज वा धर्म त्यांचे पुतळे उभारु तर देत नाहीतच. उलट अस्तित्वात असलेले त्यांच्या पुतळ्याची विटंबना करतात. ते पाडतात वा त्यांचे हातपाय, बोटं तोडून ते पुतळे नेस्तनाबूत करायला मागंपुढं पाहात नाही. तशीच त्यांची कृती अशी असते की ते त्यांच्या समाजाचा रागच करीत नाही तर त्यांच्या मनात डॉक्टर बाबासाहेबांबद्दल कितीतरी तीव्र राग आहे असं दिसतं. जरी बाबासाहेबांनी त्यांच्यासाठी मनात किंतू परंतु न बाळगता कार्य केले असले तरी. महत्वाचं सांगायचं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं व सर्वांना स्वातंत्र्य मिळवून दिलं, सर्वांना संविधानाअंतर्गत अधिकार आणि हक्कं प्रदान करुन. ज्यातून न्याय मिळवता येतो. रोजगार मिळवता येतो. पोट भरता येतं. असं असतांना निदान त्याची तरी आपण जाणीव ठेवायला हवी नव्हे तर आपण त्यांचे उपकारच मानायला हवेत. त्यातच आपण स्वतः पुढाकार घेऊन त्यांची आठवण म्हणून त्यांचे सार्वजनिक जागेवर पुतळे उभारायला हवेत. उभारलेल्या पुतळ्यांचं रक्षण करायला हवं. जेणेकरुन त्या पुतळ्यातून तमाम शोषीत व पिडीत नव्हे तर येणाऱ्या भावी पिढीत आदर्श निर्माण होईल व ती पिढी तसे बनण्याचा प्रयत्न करेल. यात शंका नाही.
          मंगेशचं तसा विचार. त्यानं चवदार तळ्याचा इतिहास वाचला होता. त्यातून त्यानं प्रेरणाही घेतली होती. परंतु तरीही स्वतःची हिंमत होत नव्हती त्याची. बाबासाहेबांच्या संविधानाचा उपभोग लोकं घेत होते. परंतु बाबांसाहेबांना जागा नाकारत होते. तसा मंगेश विचार करीत होता. विचार करीत होता की लोकं मंदीर, मशिदीला जागा देतात. त्यांना उभारण्यासाठी त्यांना कुणाचीही परवानगी लागत नाही. शिवाय लोकं मंदीर, मशीद कुठेही उभारतात. ज्या देवादिकांना कोणीही पाहिलं नाही. ज्यांनी तमाम लोकांना फिरण्यासाठी वाव मिळवून दिला नाही. ज्या देवांनी भ्रामक कल्पना मांडल्या. ज्या देवांनी स्वर्ग नरक सांगीतला. तसे आम्हीही पुजा करीतच होतो देवांची. कितीतरी पटीनं जास्त. परंतु देव आम्हाला कधीच आतापर्यंत पावलेला नाही. देव पावला त्यांनाच. ज्यांनी आम्हाला जनावरांसारखं वागवलं. ज्यांनी आम्हाला पशुगत वागणूक दिली. ज्यांनी आम्हाला छळलं. अनंत यातना दिल्या ज्यांनी. अमानुष अशी वागणूक दिली. आमच्यासाठी आमचे हाल होतांना देव कधीच धावून आला नाही.
          मंगेशला वाटत होतं की देव या जगात नाहीच. अन् असता तर त्यानं त्याच काळात आमच्यावर होत असलेला अन्याय अत्याचार दूर केला असता. क्षणाचाही विचार केला नसता की हे अस्पृश्य आहेत. मग क्षणाचाही विलंब न करता त्यानं दूर केला असता भेदभाव. ज्यातून आमचे हाल झाले.     
          मंगेशचा तो विचार. त्याला वाटत होतं की स्वतःचा उद्धार करायचा असेल तर...... तर बाबासाहेबांना मानायलाच हवं लोकांनी. केवळ आमच्याच समाजानं नाही तर इतरही तमाम ओबीसी, ओपन, तसेच विविध धर्मातील लोकांनीही बाबासाहेबांनाच पुजायला हवं. त्यातच त्यांना केवळ मनातच ठेवायला नको तर त्यांच्या अस्तित्वासाठी पुरेशी जागाही द्यायलाच हवी. जेणेकरुन त्यांचं अस्तित्व टिकून राहील. जे अस्तित्व लोकांना सतत प्रेरणा देत राहील.
           बाबासाहेबांनी धर्मांतरण केलं होतं. त्यांनी बौद्ध धम्म स्विकारला होता. कारण होतं, तमाम अस्पृश्य असलेल्या आपल्या बांधवांना हक्कं मिळवून देणं. मंगेश त्यावरही विचार करीत होता.
           दि. १४ ऑक्टोबर १९५६. खरं तर हा दिवस धर्मांतराचा दिवस. मी हिंदू म्हणून जन्म घेतला. कारण जन्म घेणं माझ्या हातात नव्हते. परंतु मी हिंदू म्हणून मरणार नाही. कारण ते माझ्या हातात आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतरण का केलं? त्याचं कारण आहे, येथील तमाम हिंदू लोकांनी बाबासाहेबच नाही तर त्यांच्या समाजातील लोकांना भारत स्वतंत्र्य झाल्यानंतरही चांगली वागणूक दिली नाही. म्हणूनच धर्मांतरण. कदाचित आम्ही धर्म जर सोडला तर आम्हाला हिंदूंचा संपर्कच येणार नाही. त्यांचे देव, त्यांच्या परंपरा आमच्यापासून कोसो दूर राहतील. मग काय, आम्हाला आमच्या मनानं जगता येईल. समाजात भेदभाव नसेल. तसंच सगळ्यांना सन्मानानं जगता येईल. म्हणूनच धर्मांतरण केलं बाबासाहेबांनी.
        *********************३*******************

         बाबासाहेब....... बाबासाहेब ज्या काळात झाले. तो काळ म्हणजे हालअपेष्टेचा काळ. त्या काळात बाबासाहेबांना बऱ्याच हालअपेष्टा भोगाव्या लागल्या होत्या. परंतु ते डगमगले नाहीत. 
          बाबासाहेब ज्या काळात झाले व त्यांनी समाजसेवेचं व्रत हाती घेतलं. त्यावेळेस बाबासाहेबांसमोर दोन प्रकारच्या समस्या होत्या. पहिली समस्या होती, ती म्हणजे समाजाचा विरोध. समाज त्यांना अछूत मानून त्यांच्या प्रत्येक गोष्टीला व योजनेला विरोध करीत होता. त्यातच भेदभाव असल्यानं त्यांचं कोण ऐकणार. हाही एक प्रश्नच होता. दुसरी समस्या होती, ती म्हणजे आपला परीवार. बाबासाहेबांनी विवाह केला होता व त्यांना आता पत्नी आणि मुलंही होती.
           या तीव्र असलेल्या दोन समस्या बाबासाहेबांसमोर होत्या. शिवाय त्यांचा परीवार पोषणारेही असे दुसरे कोणीच नव्हते. त्यातच ते काही सधन अशा कुटूंबातील नव्हते. त्यातल्यात्यात त्यांची परिस्थिती सधन अशी नव्हतीच.
          ते दोन प्रश्न. बाबासाहेबांनी मनात ठरवलं. तसं ते बालपणापासूनच त्यांच्या मनात होतं. काहीही झालं तरी समाजासाठी लढावं. समाजातील लोकांना न्याय मिळवून द्यावा. समाजातील भेदभाव दूर करावा. म्हणूनच ते शिकले व त्यांना हिरीरीनं शिकवलं त्यांची अक्का आणि त्यांचे वडील रामजी यांनी. ज्यातून बाबासाहेबांना परीवारानं विरोध केलेला दिसत नाही. तर सहमतीच दर्शविलेली दिसते. कारण बाबासाहेबांच्या आईचं बालपणातच निधन झालं होतं. अक्कानंच त्यांना सांभाळलं होतं व शिकवलंही होतं. समजा त्यांचे जागेवर दुसरा मुलगा असता तर आई नसल्यानं तो शिकलाही नसता. समाज दूरच राहिला असता.
         दुसरी बाबासाहेबांना मदत करणारी होती त्यांची पत्नी. तिनंही काबाडकष्ट केले. त्यातून जो पैसा यायचा. तो पैसा बाबासाहेबांच्या शिक्षणासाठी लावला. प्रसंगी त्यांनी आपल्या प्रकृतीची व आपल्या मुलांच्या प्रकृतीची चिंता केली नाही. ती व तिची मुलं एकापाठोपाठ एक मरण पावली. ज्यातून बाबासाहेब घडले व ते डॉक्टर बाबासाहेब झाले. समाजाला झालेल्या रोगावर उपचार सुरु केला त्यांनी. समाजाला त्या काळात भेदभाव, अंधश्रद्धा, विषमता या सर्व रोगांनी ग्रासलं होतं. ज्या रोगांना जडासकट उपटून फेकणं अगत्याचं होतं. तसं पाहिल्यास ते संसर्गजन्य रोग होते. त्याची लागण समाजातील आपल्याही लोकांना झाली होती. 
          बाबासाहेब ज्या काळात झाले. त्या काळात ते लहान असतांना त्यांना एकाएकी सामाजिक विषमता कळली नाही. परंतु ती रामजींना चांगल्या प्रकारे कळली होती. ज्यातून त्यांनीच बाबासाहेबात सामाजिक विषमता दूर करण्याचं रणशिंग फुंकलं. त्यांच्या मनात बालपणापासूनच भरवलं की ही सामाजिक विषमता त्यालाच दूर करायची आहे. तसं पाहिल्यास बाबासाहेब हे चौदावे रत्न. रामजीच्या पोटी झालेले. रामजींनी इतर मुलांना बाबासाहेब म्हणून घडवलं नाही. त्यांनाच घडवलं. ते त्यांच्यातील गुणांमुळे. सामाजिक विषमता दूर करण्याची कुवत त्यांच्यात होती. म्हणूनच बाबासाहेब घडले. 
        रामजींनी बाबासाहेबांना प्रेरणा दिली नव्हे तर त्यांच्यात महत्वाकांक्षा निर्माण केली. ज्या जोरावर बाबासाहेब पुढे शिकले. तसंच त्यांच्या पुस्तकांचं लाडही पुरवलं त्यांच्या वडिलांनी. कारण त्यांनीही सामाजिक विषमतेच्या झळा आपल्या जीवनात शोषल्या होत्या. त्यामुळंच त्यांनाही वाटत होतं, कुणीतरी असं घडावं की जो या सामाजिक विषमता दूर करु शकेल. मग तो घटक आपल्याच घरातील का घडू नये. 
         रामजींनी घडवलं बाबासाहेबांना व बाबासाहेबात सामाजिक विषमता दूर करण्याचे विचार पेरलेत. ज्यातून बाबासाहेबांनी आपल्या परीवारावर विजय मिळवला. परंतु असा विजय मिळवीत असतांना त्यांना घरच्या बिकट परिस्थितीचा सामना करावा लागला. बाबासाहेबांनी निश्चय केला होता की ते समाजातील उच्च नीच भेदभाव दूर करणार. तोच वसा घेवून बाबासाहेब जगत होते. अशातच भारतातील समस्येवर आधारीत गोलमेज परीषद लंडन मध्ये आयोजित केली होती व बाबासाहेबांना जायचे होते परीषदेला. त्याचवेळेस त्यांचा राजरत्न नावाचा मुलगा दि. १९ जुलै १९२६ ला मरण पावला.
         बाबासाहेबांना पाच मुलं. त्यातील चार मुलं मरण पावलीत. एक मुलगा यशवंत जीवंत राहिला कसाबसा. त्यातच त्यांची पत्नीही मरण पावली सामाजिक कार्य करीत असतांना. कारण सामाजिक कार्य करीत असतांना पैसाही लागायचा त्यांना. सामाजिक कार्यात पैसा खर्च होत असल्यानं जवळ पैसा नसायचा की जो पैसा ते आपल्या लेकरांना उपचारासाठी लावू शकतील व त्यांचा उपचार करुन त्यांचं जीवन वाचवू शकतील. त्यातच ते सन १९२६ उजाडलं. ज्यावेळेस बाबासाहेबांजवळ राजरत्नलाही आजारासाठी लावायला पैसा नव्हताच. त्यामुळं राजरत्नही मरण पावलाच. पुढं बाबासाहेबांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह केला. त्यावेळेसही पैसा खर्च झाला. शिवाय आज चवदार तळ्याचा खटला निर्माण झाल्यानं त्यातही पैसा लागतच होता. पुढं हा चवदार तळ्याचा खटला १९३६ पर्यंत चालला. ज्या खटल्यात खटला लढण्यासाठी नाशिकवरुन मुंबईला जातांना पैसा खर्च व्हायचा. ज्यातून रमाबाई आजारी असतांनाही तिच्याही उपचारासाठी पैसा उपलब्ध नव्हता व असेलही थोडासा. जो रमाबाईच्या उपचाराला लावला असता व त्यातून रमाबाईला पुढं जगायला आयुष्य मिळालं असतं. परंतु बाबासाहेब तो पैसा रमाबाईला आजारात लावूच शकले नाहीत. कारण तसा पैसा लावण्यात रमाबाईनंही नाकारलं. म्हटलं की माझ्या जीवापेक्षा समाजासाठी निर्माण झालेला चवदार तळ्याचा खटला जिंकणं महत्वाचं आहे. तो आधी लढा. मला पैसा लावून मी काही वाचणार नाही. पैसा व्यर्थ वाया जाईल. शिवाय कदाचित हा खटला जिंकला तर समाजातील भेदभाव दूर होईल. पिण्याचे पाणी व पाण्याचे स्रोत मोकळे करता येतील. 
         रमाबाईनं तिच्या आजारावरील औषधोपचार नाकारला. ज्यातून ती सन १९३५ ला मरण पावली व चवदार तळ्याचा खटला सन १९३७ ला जिंकल्या गेला. ज्यातून रमाबाई गेली. पण भेदभाव मिटवता आला. ही घटना शिवाजी महाराजांच्या गड आला, पण सिंह गेल्यासारखीच होती.
         भारत स्वतंत्र व्हायचाच होता. चवदार तळ्याचा खटला बाबासाहेब जिंकले होते. पाणी विटाळातून मुक्त झालं होतं. लोकं इकडून तिकडे जायलाही लागले होते. परंतु भेदभाव मिटला नव्हता. तो भारत स्वतंत्र झाल्यावर नक्कीच मिटेल असं वाटत होतं. परंतु भारत स्वतंत्र झाल्यावरही येथील भेदभाव मिटला का? याचं उत्तर नाही असंच आहे. लोकं आज भारत स्वतंत्र झाल्यानंतरही भेदभाव मिटवायला तयार नव्हते. ज्यातून बाबासाहेबांना वाटलं की हा समाज सुधारायला तयार नाही. हा समाज कधीच सुधारणार नाही व अस्पृश्य जातींना तो कधीच सन्मान देणार नाही. जेव्हापर्यंत अस्पृश्य जात हिंदू धर्मात आहे. जर ही जात हिंदू धर्मातून दूर गेली तर नक्कीच भेदभाव मिटेल. हेच ओळखून बाबासाहेबांनी जाहीर केलं की मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही. कारण जन्मास येणं माझ्या हातात नव्हतं. मरणं मात्र माझ्या हातात आहे. 
        डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतरण केलं. कशासाठी तर आपल्या जातीतील लोकांना सन्मान मिळावा यासाठी. तसं पाहिल्यास बाबासाहेबांनी केवळ आपल्या एकट्याच जातीसाठी व धर्मासाठी कार्य केलं नाही तर सर्व समाजासाठी, दिन, दुबळ्या लोकांसाठीही कार्य केले. त्यांच्यासाठीही संविधान निर्मीती केली. त्यांच्या संविधान निर्मितीतून, पशूपक्षी, प्राणीमात्रा, अपंग, म्हातारे, अनाथ, स्रिया, पुरुष या सर्वांना आधार मिळाला. 
          ती तारीख होती, १४ ऑक्टोबर १९५६. तो दिवस दसऱ्याचा होता. वाटलं होतं की भेदभाव मिटेल. लोकांना राजरोषपणे जगता येईल. माणसांना माणूसकी कळेल. परंतु बाबासाहेबांनी धर्मांतर केल्यानंतरही समाजातील विटाळ, भेदभाव मिटला नाही. त्यावर मात्र प्रश्नचिन्हं उभं राहातं. कारण आजही भारत स्वतंत्र झाला असला, धर्मांतर झालं असलं तरी पाहिजे त्या प्रमाणात भेदभाव आणि विटाळ दूर गेलेले दिसत नाहीत. तो लोकांच्या अंतर्मनात आहे. एवढंच नाही तर आजही लोकांच्या वागण्यावरुन कळतं की लोकांना आजही बाबासाहेब समजलेच नाही. कारण ते आजही त्यांच्याशी व त्यांच्या लेकरांशी पशुगतच वागतात. आज भेदभाव व विटाळ मिटला आहे. परंतु तो वरवरच मिटलेला दिसत आहे. अंतर्मनातून मिटलेला दिसत नाही. जेव्हा हा अंतर्मनातून विटाळ मिटलेला असेल, तेव्हाच खऱ्या अर्थानं बाबासाहेब लोकांना समजलेला आहे असे वाटेल. 
         बाबासाहेब लोकांना समजावा नव्हे तर लोकांनी समजावून घ्यावा. कारण त्यांनी बराच त्रास भोगला आपल्याच लेकरांना व जातीला सुखी करण्यासाठी नाही तर इतर सर्व जातींच्या लोकांनाही सुखी करण्यासाठी. त्यांनी आपलं शिक्षण केलं. ते उच्चशिक्षीत झाले. कारण त्यांना माहीत होतं की माझ्या समाजाला माझी गरज आहे व मी शिकल्याशिवाय समाज सुधरवू शकणार नाही. ते शिकले म्हणूनच त्यांची निवड संविधान निर्माण करण्यासाठी झाली नव्हे तर त्यांनी संविधान निर्माण करतांना भेदभाव केलाच नाही. ते सर्वांसाठी बनवलं. हवं तर आजच्या काळानुसार ते शिकल्यानंतर लंडनमध्येच स्थायीक झाले असते. परंतु त्यांनी तसं केलं नाही. ते भारतात परत आले. तद्नंतर त्यांनी संविधान बनवून भारताला एकप्रकारे दिशा दिली नव्हे तर भारतीय लोकांना घडवले. आज त्यांचे आपल्यावर कितीतरी उपकार आहेत. जे कधीच विसरता येत नाहीत. परंतु आपण ते सर्व विसरुन बाबासाहेबांना समजून घेत नाहीत. समजून घेण्याचा प्रयत्न करीत नाही. आपण बाबासाहेबांची हेळसांड करतो. त्यांच्या लेकरांना आजही तुच्छ समजतो. त्यांचे हक्कं नाकारतो. एवढंच नाही तर त्यांचा पदोपदी अपमान करतो. कधी त्यांना मारहाण करतो तर कधी त्यांना जातीवाचक शिव्याही हासडतो. यावरुन आपल्याला निश्चीतच बाबासाहेब समजलेले दिसत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे थोर होते. त्यांचे विचार थोर होते. त्यांनी केलेले कार्य थोर आहे. म्हणूनच तेही तेवढेच थोर आहेत हे विसरता येत नाही. म्हणूनच ते बाबासाहेब झाले. आपले सर्वांचेच. त्यामुळंच त्यांना सर्वांनी समजून घेण्याची गरज आहे. स्वतःचा उद्धार करायचा असेल तर......
          संविधान बनलं होतं व संविधानानुसार जग चालत होतं. तसा देशही चालत होता. देशातील काही तमाम लोकं बाबासाहेबांना मानत होते तर काही लोकं बाबासाहेबांना मानत नव्हते. ते वरवर मानतांना दिसत होते. मात्र त्यांच्या अंतर्मनात बाबासाहेब नव्हते. त्यातच कधीकधी बाबासाहेब अंतर्मनात नसल्यानं त्यांची परियंती अस्पृश्यांना छळण्यात व्हायची. मग ते देशाचे राष्ट्रपती वा न्यायाधीश का असेना. अस्पृश्य असले तर त्यांचा पदोपदी अपमानच होत होता. अशा कितीतरी भूतकाळात घटना घडल्या होत्या आणि घडत होत्या की ज्या अस्पृश्यांना डोकंही वर काढू देत नव्हत्या. अशीच एक घटना घडली होती. जी देशाच्या सर्वोच्च न्यायालयातील घटना होती. ज्यात एका न्यायाधीशाचा अपमान केला गेला होता आणि तोही न्यायालयात. ज्या न्यायालयात एका अस्पृश्य समाजाच्या न्यायाधीशावर जुता उगारला होता एका माथेफिरुनं. त्यामुळंच मंगेशला वाटत होतं की हा विटाळ केव्हा जाणार की ज्यातून अशा प्रकारच्या घटना घडतात. 
         ते एक न्यायाधीश नव्हे तर एक न्यायमुर्तीच. त्यांच्यावर जुता उगारणं या घटनेनं त्यांची महत्ता दिसून येत होती. जे इतर तथाकथित समाजाला खपलं नाही व एका अस्पृश्य जातीतील व्यक्तीनं सुप्रीम कोर्टातील न्यायाधीश बनणं खपलंही नाही. हा प्रकार आजही जातीजातीत असलेला विटाळ दर्शवीत होता. त्यामुळंच मंगेशला आता हेच म्हणावे लागत होते की विटाळबाबा, तू केव्हा जाणार.
           ते एक न्यायमुर्ती. एक अस्पृश्य समाजातील थोर व्यक्तिमत्त्व. त्यांच्यावर एका माथेफिरु व्यक्तीनं जुता उगारल्याची घटना केली व त्याचा बाऊ करीत तमाम लोकं न्यायमुर्तींना अपमानीत करीत होते व वातावरण बिघडवीत होते.
          तो जुता उगारणारा व्यक्ती. तो बहात्तर वर्षाचा वकील. नुकताच वकीलकीच्या क्षेत्रात पदार्पण केलेला व्यक्ती नव्हता. तर त्यानं वयाच्या पंचावनव्या वर्षी न्यायक्षेत्रात प्रवेश केला होता. आज त्याला वकील म्हणून काम करण्याचा पंधरा वर्षाचा अनुभव होता. त्यानं जुता भिरकावला वा वर उचलला की शब्द उच्चारला. हा संभ्रम करणारा प्रश्न होता. कारण तो बंद कमरा व त्या कमऱ्यात काय घडलं. हे कोणीच पाहिलेलं नव्हतं. कोणाला माहितही नव्हतं. होवू शकते की रागाच्या भरात संबंधित आरोपीनं काही गैर वर्तन केलं असेल. याचा अर्थ असा नव्हता की न्यायाधीश साहेबांचा अपमान झाला? उलट ते थोर झाले व त्यांची महत्ता वाढली. 
          मंगेशलाही तो विषय माहीत झाला होता व तो त्याबद्दल विचार करीत होता. विचार होता न्यायाधीश महोदयांचाच. त्याला वाटत होयं. 
          'त्यांचा अपमान होणं शक्य नाही व तसं कोणीही समजू नये. परंतु या घटनेचे पडसाद सर्वत्र उमटले व न्यायमुर्ती साहेबांना बदनाम करण्याचे प्रयत्न सुरु झाले. यावर विचार असा होता की संबंधित व्यक्ती. त्या व्यक्तीनं वकीलकीची पदवी जरी घेतली असली तरी तो पेशावर वकील नसेलच. कारण पेशावर वकील हे अशा प्रकारच्या कृती करुच शकले नसते. हं, ही साजीश नक्की असू शकते व ती शंकाही आहे. न्यायमुर्ती महोदयांना बदनाम करण्यासाठी. एका मंदिरातील प्रकरणाचा बदला काढण्यासाठी.' 
          मंगेशला वाटत होतं, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश. एक अस्पृश्य व्यक्ती. जे आपल्या मनाचं करतात. आपलं मत ऐकत नाही. ते निर्भीडपणे वागतात. अस्पृश्यांचं ऐकतात. परंतु आपलं ऐकत नाही. हीच लोकांची मानसिकता. कारण विटाळ हा कालही होता. आजही आहे आणि राहावा असं तथाकथित सर्वच लोकांना वाटते की जे अस्पृश्य गटात मोडत नाहीत. शिवाय तो राग. संविधान बनून विटाळ गायब झाला. आम्हाला विटाळ हवा होता नव्हे तर पाहिजे होता. ही मानसिकता. जो कालचा राग आजही धुमसत आहे व त्याच रागातून आज न्यायमुर्ती साहेबांच्या अंगावर जुता उगारण्यासारखी घटना घडली. म्हटलं की एका अस्पृश्य माणसानं आमच्या धर्माचा अपमान केला.
         कोणता राग आहे त्यांच्या मनात? का बरं जुता उगारल्याची घटना घडली? याचं उत्तर आहे, जुन्या पिढीत असलेला विटाळ. तो विटाळ जरी बाबासाहेबांनी संविधान बनवून दूर केला असला तरी आजही तो विटाळ मनामनातून गेलेला नाही. आजही तोच विटाळ मनामनात बसलेला आहे व त्याच विटाळातून अशा प्रकारची घटना घडली आहे व अशा बर्‍याच घटना घडल्या आहेत. विचार असा येतोय की आज सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश महोदयांनाच विटाळानं सोडलेलं नाही. तर आम जनतेला तो विटाळ कसा काय सोडेल?
           आजही अशा बर्‍याच विटाळाच्या घटना परीसरात घडतांना दिसतात, अस्पृश्यांसोबत. ज्याला न्याय मिळत नाही. विटाळ हा पावलोपावली आहे की ज्यात अस्पृश्य लोकांची कोंडी केली जाते. त्यांचे हक्कं मारले जातात. आज म्हटलं जातं की संविधान आहे व लोकांच्या हक्कावर गदा आल्यास वा निर्माण झाल्यास न्याय मिळवता येतो, आपला खटला लढून. आज कोणी साधी अस्पृश्य जातीला जातीआधारावर शिवी जरी दिली तरी न्याय मिळवता येतो. परंतु ते चुकीचं आहे. यावर न्याय मिळविण्यासाठी कायद्याची लढाई लढणं सोपं नाही. ॲक्ट्रासिटीचे खटले हे न्यायालयात तारीख पे तारीख चालत असतात की ज्यातून उमेदवार थकतो. काही ठिकाणी ज्यांच्यावर अन्याय होतो, ते उमेदवार आपली लढाई हारतात. शिवाय उलटपक्षी त्याचेवरच खटले दाखल होतात. ना पोलीस अस्पृश्य व्यक्तीला मदत करीत ना कोणी साक्षीदार. नोकरीबाबत सांगायचं झाल्यास नोकरीतही अस्पृश्य जातीवर अत्याचारच होत असतात. पदोन्नतीच्या हक्काचे अस्पृश्य जातीतील उमेदवार हे दावेदार असतांनाही त्यांना त्यांचे हक्कं प्रदान केले जात नाहीत. अन्यायच होतो एकतर्फी. त्यातच नोकरीत पदोन्नती मिळवितांना आपल्यावर अन्याय झाल्याची याचिका जरी न्यायालयात दाखल केली. तरी ती निघत नाही. कारण न्यायालयात न्यायाधीश हेही अस्पृश्य जातीचे नसतातच की ते निकाल देतील. अशावेळेस पदोन्नतीचे हक्कं असतांनाही खटल्यात पराभव पत्करावा लागतो. 
         शिक्षणातही आज विटाळ दिसतोच. उच्च शिक्षण घेत असतांना जी मुलं आरक्षणानं उच्च अर्हतेच्या शिक्षणासाठी प्रवेशीत होतात. त्या ठिकाणीही उच्च जातीतील मूलं ही अस्पृश्य जातीतील मुलांना चांगली वागणूक देत नाहीत. म्हणतात की यांना आरक्षण आहे म्हणून हे इथपर्यंत पोहोचले. त्यातच कधीकधी मारहाण देखील होते व दम दिला जातो की जर ती अस्पृश्य जातीतील मुलं पोलीस ठाण्यात गेली वा त्यांनी कुठे तक्रार केली तर त्यांचा जीवच घेतील. शेवटी चूप बसावं लागतं नाईलाजास्तव. तेच ते अत्याचार सहन करीत.
          आज वस्तीवस्तीतही विटाळ आहेच. वस्तीतही राहतांना लोकांना भीतभीतच राहावं लागतं. काही ठिकाणी आपली जात लपवूनच राहावं लागतं. ती आपली मजबुरीच असते. जात लपवून जो कोणी वागत नसेल वा आपली जात उघड करीत असेल, एकतर त्या घरांना वाळीत टाकलं जातं वा त्या घरातील सदस्यांवर अत्याचार केले जातात. 
         आज भारत स्वतंत्र झाला व इंग्रज भारतातून गेले असले तरी आम्ही भारतवाशी खऱ्या स्वरुपात स्वतंत्र झालोच नाही. हे मा. न्यायमुर्ती जुता मारल्याच्या घटनेवरुन दिसून येते. वाटते की आजच्याही समाजाला तोच विटाळ पाहिजे होता. जो पुर्वीच्या काळात होता. आज भारत स्वतंत्र झाल्यावर व संविधान बनल्यानंतर तो विटाळ थोडाफार बंद झाला. तोच विटाळ खलत आहे आज. म्हणूनच अशा स्वरुपाची घटना होते, जी आतापर्यंत परीसरात होत होती. आज न्यायालयात झाली. महत्वपुर्ण बाब ही की अस्पृश्य जातींचा गुन्हा काय की त्यांना सन्मान मिळू नये? अस्पृश्य जातींनी भेदभाव व विटाळाच्याच गर्तेतच जगावं काय? अस्पृश्यांनी उच्च शिक्षण घेवू नये काय? अस्पृश्यांनी पदोन्नत्या मिळवू नये काय? अन् महत्वाचं म्हणजे वस्तीत राहतांना भीतभीतच राहावं काय? हे सर्व प्रश्न अनोत्तरीतच आहेत. म्हणूनच आजही मनामनातून विटाळ जात नाही. अन् तो कधीच जाणार नाही. हेही न्यायमुर्ती घटनेवरुन दिसून येते. खरं तर या घटनेत खुद्द न्यायाधीशपदी असलेल्या न्यायाधीश महोदयांना तरी न्याय मिळेल काय? हाही एक प्रश्नच आहे. तो मिळेल तेव्हा मिळेल, तुर्तास आपण चूप असलेलं बरं. अन् प्रतिक्षा करावी विटाळबाबाच्या जाण्याची. तो जेव्हा जाईल. तेव्हाच खऱ्या अर्थानं अस्पृश्यांना न्याय मिळेल. मग ते कोणत्याच पदावर नसले तरीही.
        विटाळाचं पिल्लू नष्ट होईल काय? मंगेशच्या मनात अनेक प्रश्न होते. कारण त्याच्या मनात बाबासाहेबांचे विचार होते व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे विश्वख्यातीचे तज्ञ म्हणून त्यांची जगताला ओळख होती. त्यातच त्यांचा संघर्षही वाखाणण्याजोगा असाच होता. त्यांनी केलेल्या सत्याग्रहाला धार होती. जसा चवदार तळ्याचा सत्याग्रह. या सत्याग्रहातील काही विशिष्ट मुद्दे फारच गाजले होते. पहिला मुद्दा गाजला होता. तो म्हणजे पाणी पिवून सत्याग्रहाला बसणे. 

**********************४*********************

          मंगेश विचार करीत असतांना एका पुस्तकात वाचलेल्या घटनेनुसार चवदार तळ्याचा प्रसंग त्याच्या डोळ्यासमोर आ वासून उभा राहिला. चवदार तळ्याचा सत्याग्रह बाबासाहेबांनी का केला? का गरज पडली त्यांना चवदार तळ्याचा सत्याग्रह करण्याची? तर त्याचं कारण आहे, त्यांना मिळणारं पाणी अडवणं. अस्पृश्यता पाळणे हा जरी आज गुन्हा असला तरी त्या काळात अस्पृश्यता पाळली जात होती राजरोषपणानं व त्याच आधारावर अस्पृश्यांची पिळवणूक केली जात होती. अशातच त्यांचं पिण्याचं पाणी अडवलं गेलं. 
         पिण्याच्या पाण्यासाठी महाडातील चवदार तळ्यावर २० मार्च १९२७ रोजी जरी सत्याग्रह केल्या गेला. तरी त्या पाठीमागं एक पाश्वभुमी आहे. १९२३ साली विधानसभेतील एका बोळे नावाच्या सदस्यानं मुंबई विधानसभेत अस्पृश्यांवरील वाढत्या अत्याचाराला आळा घालण्यासाठी एक ठराव मांडला. तो संमत झाला व स्विकारण्यात आला. त्या ठरावातून लोकांच्या पैशातून बांधण्यात आलेल्या सार्वजनिक बांधकामाचा उपयोग करण्यासाठी अस्पृश्यांना वापरण्यास परवानगी देण्यात आली. जसे, विहीर तलाव, शाळा, दवाखाने, न्यायालये, कार्यालये इत्यादी. 
           महाड नगरपालिका ही मुंबई परगण्याचा भाग होती व महाड नगरपालिकेतून सुद्धा १९२४ मध्ये तोच ठराव स्विकारला गेला. हे सर्व कागदावरच होतं. परंतु वास्तविक स्वरुपात सार्वजनिक बांधकामं अस्पृश्यांना वापरायला मिळालं नव्हतं. म्हणूनच महाड येथे २० मार्च १९२७ ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली अस्पृश्यांना हक्कं मिळावे यासाठी एका परीषदेचं आयोजन करण्यात आलं. कारण ते एक महाड गावच होतं की ज्या गावात बाजार करण्यासाठी अस्पृश्यांना यावं लागायचं. त्यात काही अस्पृश्य लोकंही असायचे व त्यांना तहानही लागायची. परंतु त्यांना महाडात शुद्ध पाणी मिळत नव्हतं प्यायला. तेच अशुद्ध पाणी मिळायचं. नगरपालिकेनं वर्षानुवर्ष स्वच्छ न केलेल्या विहिरीचं. अस्पृश्य लोकं जेव्हा महाडात बाजारासाठी यायचे. तेव्हा त्यांना तहान लागल्यावर ती मंडळी महाडच्या तहसील कार्यालयाजवळ असलेल्या एका पडक्या विहिरीवर पाणी प्यायचे. परंतु त्या विहिरीवर महाड नगरपालिकेचं दुर्लक्ष असल्यानं त्या विहिरीतील पाणी हे घाणेरडं होतं व ते पाणी पिण्यायोग्य नव्हतं. 
         महाडात आणखी एक पिण्याच्या पाण्याचा स्रोत होता. जो स्रोत उच्चवर्णीय लोकांच्या ताब्यात होता. ज्यातून अस्पृश्यांना पाणी घेवू दिलं जात नसे. सन २० मार्च १९२७ ला जी परीषद भरली होती महाडात. त्या परीषदेत सन १९२३, २४ च्या विधानसभेतील ठरावाचा उल्लेख करण्यात आला. त्यानंतर ठरवलं गेलं की चवदार तळ्याचं पाणी वापरण्याचा अस्पृश्यांनाही नैतिक व कायदेशीर अधिकार आहे. त्यामुळंच सर्वांनी जावून तेथील पाणी प्यावं. तसं सर्वानुमते ठरताच बाबासाहेबांच्या नेतृत्वात कमीतकमी अडीच हजार लोकांनी समुहानं जावून चवदार तळ्यातील पाणी प्राशन केलं. 
          महाडात बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली भरलेली अस्पृश्यांच्या हक्काची परीषद. ज्या परिषदेत महाडाच्याच आजुबाजूची अस्पृश्य मंडळी जातीनं हजर झाली होती. त्याचं कारण होतं. त्यांनी बाजाराच्या किंवा व्यवहाराच्या निमित्यानं महाडात गेल्यावर भोगलेल्या यातना. मनात इच्छा नसतांनाही तहसील कार्यालयाजवळ असलेल्या जुन्या व घाणेरड्या अवस्थेत असलेल्या विहिरीचं पाणी त्यांना प्यावं लागायचं. ती मजबुरी होती. म्हणूनच लोकं चवदार तळ्याच्या पाणी आंदोलनात सक्रीय सहभागी झाले होते.
          चवदार तळ्याच्या पाण्याला अस्पृश्यांनी हात लावताच सगळीकडे ती बातमी पसरली व त्या प्रसंगानंतर सर्व सवर्ण लोकं हातात लाठ्या घेवून अस्पृश्य लोकांच्या दिशेनं आले. त्यातच ज्या तळ्यातील पाणी पिण्यासाठी अस्पृश्य लोकं आले होते. त्या अस्पृश्य मंडळींना लोकांनी मारहाण करण्यास प्रारंभ केला. त्यातच त्यांचे अन्न आणि अन्न बनवायला आणलेली भांडीही फेकण्यात आली. शिवाय ते आपल्या गावी परतताच त्यांना गावातील सर्व अश्पृश्येतर लोकांनी शिक्षा करावी असे फतवेही काढण्यात आले व तशा स्वरुपाचे निरोप गावोगावी पाठवण्यात आले. 
       सवर्णाच्या म्हणण्यानुसार चवदार तळे बाटले होते. ते शुद्ध करणे आवश्यक होते. त्यानंतर चवदार तळ्याचे शुद्धीकरण करण्यात आले. ज्यात कितीतरी प्रमाणात गाईचं शेण आणि मलमुत्र चवदार तळ्यात टाकण्यात आलं आणि पुढं पुन्हा एकदा अस्पृश्यांना पाणी वापरण्यास बंदी घालण्यात आली. 
         चवदार तळ्याचं आंदोलन झाल्यानंतर सवर्ण मंडळी एवढ्यावरच थांबली नाहीत तर अस्पृश्यांनी आपलं तळं बाटवलेलं आहे म्हणून एका महाडातील नरहरी दामोदर वैद्य नावाच्या व्यक्तीनं चवदार तळ्याच्या पाण्याचा खटला न्यायालयात दाखल केला. म्हटलं की डॉक्टर बाबासाहेबांनी लोकांना भडकावून आमचं तळं बाटवलं. आणखी म्हटलं की या तलावावर कितीतरी वर्षापासून आमचीच सत्ता होती व चवदार तळे हे सार्वजनिक नव्हते. त्यामुळंच अस्पृश्यांना १९२३ च्या मुंबई विधानसभेतील ठरावानुसार चवदार तळ्यातील पाणी वापरण्याचा अधिकार नाही. शिवाय त्यांना त्यातील पाणी वापरण्यास मनाई करण्यात यावी.
         शेवटी निर्माण झाला खटला. ज्या खटल्यात बाबासाहेबांचा कस लागला. सवर्णांच्या बाजूने अनेक साक्षीपुरावे तपासण्यात आले. अस्पृश्यांनी १९२७ पुर्वी कधीच चवदार तळ्याचं पाणी वापरलेलं नाही. ही बाजूदेखील मांडण्यात आली. मात्र बाबासाहेबांनी पुरावे सादर करुन सांगीतलं की सदर तलाव हा बॉंबे लँड रेव्हेन्यू कोडनुसार शासनाच्या मालकीचा असून सध्या त्यावर महाड नगरपालिकेचा ताबा आहे. तो तलाव सार्वजनिक बांधकामाच्या प्रकारात येतो. शेवटी त्या खटल्यात निकाल जाहीर झाला की सदर तलाव हा शासनाच्या मालकीचा आहे. त्यातील पाणी अस्पृश्यांनी आतापर्यंत वापरलेलं नाही. कारण त्याचं पाणी सवर्ण समाज वापरत होता. त्यातील पाणी अस्पृश्यांनी न वापरण्याचं कारण आहे, सवर्ण समाजाची दबंगगिरी. यावरुन सवर्णाचा मालकी अधिकार तळ्यावर असणे सिद्ध होत नाही. त्यावरुन अस्पृश्यांना पाणी वापरु न देण्याचा कोणत्याही स्वरुपाचा अधिकार टाळता येणं शक्य नाही. त्यामुळंच अस्पृश्यांना चवदार तळ्यातील पाणी वापरु देण्यात यावे.
         तो निकाल. तो खालच्या न्यायालयातील निकाल होता. तो निकाल सवर्णांना मान्य नव्हता. मग काय? त्याच निर्णयाविरुद्ध पुन्हा जिल्हा न्यायालयात अपील करण्यात आली. त्याही न्यायालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची बाजू उचलून धरण्यात आली व निकाल दिल्या गेला. सांगीतलं गेलं की सदर तळं हे सार्वजनिक बांधकाम प्रकारात मोडत असून त्या तळ्यातील पाणी वापरण्यास अस्पृश्य लोकांना मनाई करण्यात येवू नये. त्यातच सवर्णांनी आपली प्रथा विटाळाची आहे व विटाळानुसार चवदार तळ्याचं पाणी अस्पृश्यांना मिळू नये हे सिद्धच केलं नाही. शेवटी जिल्हा न्यायालयातील निर्णयही सवर्णांना मान्य झाला नाही व त्यांनी पुन्हा उच्च न्यायालयात धाव घेतली. ज्यातून उच्च न्यायालयानं निकाल दिला. म्हटलं की अस्पृश्यावरील विटाळ हा सार्वत्रिक नाही व तसा विटाळ यापुढे मानता येणार नाही. विटाळ मानणे ही अन्यायकारक प्रथा आहे व वर्षानुवर्ष ही अन्यायकारक प्रथा सुरु होती. ती ताबडतोब बंद करण्यात येत आहे. शिवाय इंग्रज येण्यापुर्वीही मराठा व मुस्लिमांची राजवट होती. त्याही काळात अस्पृश्यांना या तळ्याचं पाणी वापरण्यास मनाई केल्या गेली नाही. मनाई करण्याबाबतचा कुठलाही पुरावा उपलब्ध नाही. त्यातच अनादीकाळापासून तळ्याचं पाणी अस्पृश्यांनी वापरु नये. असा निर्वाळा व पुरावे अनादीकाळापासूनचे नसल्याने अस्पृश्यांनी चवदार तळ्याचं पाणी अनादीकाळापासून न वापरण्याच्या हक्काची प्रतिपुर्ती होत नाही. त्यामुळंच ही कृती अतार्किक आहे. तशीच ही कृती सार्वजनिक हिताला बाधा आणणारी आहे. शिवाय हे तळं सार्वजनिक असून त्यावर मालकी महाड नगरपालिकेची आहे व सदर प्रकरणात महाड नगरपालिका पक्षकार म्हणून अंतर्भूत नाही. या सर्व गोष्टी लक्षात घेवून मुंबई उच्च न्यायालयानं चवदार तळ्यातील सवर्णांनी टाकलेली याचिका फेटाळून लावली. त्यात काही प्रमाणात दंडही लावल्या गेला. 
         चवदार तळ्याच्या आंदोलनातून केवळ अस्पृश्यांना न मिळणाऱ्या पाण्याचाच प्रश्न मिटला नाही तर त्यातून अस्पृश्यांच्या सवर्णांना होत असलेल्या विटाळाचाही प्रश्न मिटला होता. थोडासा उरला होता. तोही पुढं बाबासाहेबांनी संविधान लिहिलं. त्यावेळेस मिटला. 
         आज विटाळ नाही. लोकं सवर्णांच्या घरी जातात. सवर्णही अस्पृश्यांच्या घरी येतात. काही ठिकाणी एकमेकांच्या घरी खाणपानही होतं. रोटीचा व्यवहार होत असतो तर आजच्या बदलत्या काळानुसार बेटीचाही व्यवहार होवू लागला आहे. एकंदरीत सांगायचं झाल्यास विटाळ मिटला आहे. परंतु त्याचं पिल्लू काही ठिकाणी दिसतंच व ते तोंड फाडून उभं राहातं. कधी बाबासाहेबांच्या पुतळ्याचं बोट मोडतं तर कधी पुतळ्याची विटंबना करतं. कधी बाबासाहेबांच्या लेकरांना जातीवाचक शिवीगाळ करतं तर कधी बाबासाहेबांच्या लेकरांचा अपमान करतं. काल जसा विटाळ मिटविण्यासाठी बाबासाहेबांना संघर्ष करावा लागला. विटाळ नावाचा बाप नष्ट करण्यासाठी. अन् तो बाप नष्ट झालाही. परंतु त्याचं पिल्लू नष्ट झालं नाही. ते शिल्लक आहे व ते आता मोठं झालंय. गुरगुरायला लागलंय. तेव्हा कदाचित तीच भुमिका धरुन आज त्याच विटाळाच्या पिल्लूला नेस्तनाबूत करण्यासाठी संघर्ष करावा लागेल काय? पुन्हा एकदा एखाद्या चवदार तळ्याचा खटला लढावा लागेल काय? इत्यादी सारे प्रश्न अनुत्तरीतच आहेत. कदाचीत पुन्हा एकदा चवदार तळं आंदोलन करुन बाबासाहेबांच्या लेकरांना विटाळाच्या पिल्लाला ठेचून काढावं लागेल. त्याशिवाय विटाळ समूळ प्रमाणात नष्ट होणार नाही. असं वाटणं साहजीकच आहे व हेच वाटायला लागलंय आजही घडत असलेल्या प्रकरणावरुन. 
         मंगेशची ती खंत. त्या प्रकारावरुन दिसून येत होती. ज्यातून आजही विटाळ उघडपणे दिसत नसला तरी आतमधून होताच.
            चांगले संस्कारच माणसाला उच्च पातळीवर नेतात. मंगेशचा तो विचार. तसा विचार त्याच्या मनात येणं साहजीकच होतं. त्याचं कारण होतं, त्या न्यायाधीश महोदयांचं प्रकरण. ते आपल्या चांगल्या कर्मानं कितीतरी उच्च पदावर गेले होते व आज आपल्या कर्मानं न्यायनिवाडेही करीत होते. परंतु त्यांचं उच्च पदावर जाणं. हीच वात्रट मानसिकता असलेल्या एका भेदभावग्रस्त व्यक्तीला पटली नाही. ज्यानं जुत्याचं प्रकरण केलं. ज्यातून त्या व्यक्तीची कमावलेली एवढ्या वर्षापासूनची प्रतिष्ठा धुळीस मिळाली होती.
            संस्कार....... म्हणतात की जिथे चांगले संस्कार असतात. तिथे विद्या व पैसा निवास करीत असते आणि जिथं कुसंस्कार असतात. तिथं तसं घडत नाही. जे सकाळी नित्यानं मदिराप्राशन करतात. तिथं पैसा जास्त काळ राहात नाही व मदिरा प्राशन करणाऱ्यांची समाजात इज्जतही नसते. लोकं त्याला वाईट म्हणतात. कारण सुरा ही समुद्रमंथनानातून कुसंस्कारी मानवांना मिळाली. सुसंस्कारी मानवांना नाही. हे म्हणणं खरं आहे. त्यामुळे, ज्या घरी सुरा व मांसाचं सेवन केलं जातं. तिथं पैसा टिकतच नाही. विद्याही कामात येत नाही. सतत वादविवाद होत असतात. तशीच संगतही महत्वाची असते. आपली संगत चांगल्याशी असेल, तर आपली लोकं इज्जत करतात आणि वात्रटाशी असेल तर....... अशा कुटूंबाची हळूहळू अधोगती होते. सामान्य जगतातही असंच घडलं. उदाहरणार्थ महात्मा गांधी.
         महात्मा गांधींनी विदेश सोडल्यानंतर सत्याचा मार्ग अनुसरला. मांस, मदिरेला शिवलं नाही. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर की ज्यांच्या जीवनात ते जेव्हा वयात आले. तेव्हा मांस, मदिरा नसेलच. विशेष सांगायचं म्हणजे जर माणसाच्या आयुष्यात सात्विकता नसेल तर संस्कारही नसतील आणि संस्कार नसतील तर लोकं आपोआपच त्याच्या दूर जातील आणि लोकं दूर गेले की आपोआपच त्याचेपासून त्याची विद्वत्ता दूर जाईल आणि विद्वत्ता दूर गेली की धनाचा ऱ्हासही आपोआपच होईल. 
          आज आपण पाहतो की जी मंडळी दारु पितात. निरनिराळी व्यसनं करतात. विचार बरोबर ठेवत नाहीत. ते मांस खातात. त्यांच्याकडे कितीही उच्चश्रेणीची विद्वत्ता असेल तरी आपण विचारत नाही त्यांना. दारु पिणाऱ्यांची कुणी इज्जत करतांना दिसतात का? तर त्याचं उत्तरं नाही असंच आहेत. 
           उच्चतम शिखर गाठायचं असेल तर आधी सात्विक बनावं लागतं. तरच उच्चतम शिखर गाठता येतं. त्यासाठी आपली संगतही चांगल्याच लोकांशी असायला हवी. संगत चांगल्या लोकांशी असली तर आपलं चांगलंच होणार. वाईटांशी असली तर आपलं चांगलं होत नाही. कधी हंसानं कावळ्याशी संगत केली तर हंस चांगला असूनही त्याची हत्या होते. कावळ्याची होत नाही. अन् संगत जरी आपली कावळ्याशी असेल तरी आपली सात्विकता सोडायला नको. जरी हंसासारखा मृत्यू आला तरी. कारण वरील कथेत हंस मरणागती जरी गेला असेल तरी तो अमर झाला. कावळा अमर झालेला नाही. महत्वपुर्ण बाब ही लक्षात घेण्यासारखी आहे की संस्कारात सात्विकता महत्वाची असते. ती जर नसेल तर आपल्याजवळ पैसा व विद्या येत नाहीत. हा निसर्गनियम आहे. शिवाय जरी तसा पैसा आलाच तर तो पैसा व ती विद्या नष्ट व्हायलाही वेळ लागत नाही. म्हणूनच कोणत्याही व्यक्तीच्या उज्ज्वल भविष्यासाठी संस्कार व सात्विकता महत्वाची असते. तरच पैसा टिकतो. अन्यथा नाही. शिवाय चांगले संस्कारच माणसाला उच्च पातळीवर नेत असतात. कुसंस्कार संस्कार नाही. हे तेवढंच खरं. तेव्हा आपण आपल्यात चांगलेच संस्कार रुजवावेत. कुंसंस्कार नाही. 
           मंगेशला ज्याप्रमाणे चांगले संस्कार आवडत होते. त्याचप्रमाणे आवडत होता, चांगला स्वभावही. चांगले संस्कार रुजविण्यासाठी चांगला स्वभाव व चांगले विचार तेवढेच महत्वाचे असत.
           चांगल्या संस्कारासाठी चांगले विचार व चांगला स्वभाव का आवश्यक आहे. याबाबत बोलतांना मंगेश म्हणत असे की स्वभाव जर चांगला असेल तर दूरची मंडळीही जवळ येतात. अन् स्वभाव जर वाईट असेल तर जवळची मंडळीही दूर जातात. उदाहरण द्यायचं झाल्यास रावणाचं देता येईल. रावणाचा स्वभाव हा वाईट असल्याचं जाहीर असल्यानं त्याचा सख्खा भाऊ त्याचेपासून दूर गेला तर रामाचा स्वभाव चांगला असल्यानं त्याचा सख्खा भाऊ लक्ष्मणही त्याच्या जवळ राहिला. म्हणूनच स्वभाव हा अतिशय महत्वपुर्ण आहे.
        माणसाचा स्वभाव हा महत्वाचा आहे. तसंच महत्वाचं आहे त्याचं कार्य. आपलं कार्य जर चांगले असतील तर चार माणसं जुळत जातात. जसं रामासोबत घडलं. रामाचे कार्य चांगलं असल्यानं रामासोबत अनेक माणसं जुळत गेली. 
         माणसाचा स्वभाव हा विचार व कार्यावरुन घडत असतो. चांगले कार्य घडण्यासाठी चांगले विचारही मनुष्यात असणे तेवढेच गरजेचे आहे. वाईट विचार जर असतील तर उत्कृष्ट कार्य घडणारच नाही. म्हणजेच ज्याप्रमाणे चांगले कार्य महत्वाचे आहे. तसेच महत्वाचे आहे चांगले विचारही. परंतु अलिकडील काळात असे चांगले विचार व चांगले कार्य आपल्याला पाहायला मिळत नाही.
          अलिकडील काळात गुंडगीरी व गुंडेगीरीनामक विचार सगळीकडे पाहायला मिळतात. संस्काराला जणू तिलांजलीच मिळालेली दिसते. लहान लहान शाळेत शिकणारी मुलं ही मार दूँगा, कॉंट दूँगा ची भाषा बोलत असतात. त्यातच हातात काठ्या घेवून तशी कृतीही करुन दाखवत असतात. शिवाय अभ्यास करा म्हटलं तर बारा गाडे बोंब असते. त्यावर हे कुठून शिकलाय असे विचारले असता ते मौन बाळगून असतात. हीच मुलं पुढं वात्रट स्वभावाची निघतात. 
          अलिकडील काळात मोठ्या माणसांच्या स्वभावाबाबत विचार केल्यास सगळीकडे भ्रष्टाचार दिसतो. कोणी सरकारी कार्यालयात नोकरी करुन भ्रष्टाचार करतो. कोणी नोकरी लावून देतो असे आमीष दाखवून भ्रष्टाचार करतो. कोणी आपली कामं लवकर करुन घेण्यासाठी भ्रष्टाचार करतो. हा झाला भ्रष्टाचाराचा भाग. कोणी बलात्कार करुन आपली हौस भागवत असतात. ज्यातून महिला सुखी दिसत नाही व तिला रात्री, अपरात्री कामानिमित्त बाहेरही पडता येत नाही. कोणी दिन दहाडे खुन करायलाही मागे पाहात नाहीत. तेही किरकोळ गोष्टीवरुन. इथं आपल्या जन्मदात्या बापाचे मुडदे पाडले जातात. वासनेसाठी स्वतःची बहिण वा लेक ओळखता येत नाही अन् मुलगा वात्रट निघाला म्हणून खुद्द आईवडील आपल्या मुलांची हत्या करतो. एवढंच नाही तर आपली कामवासना भागावी म्हणून काही महिलाही आपल्या पती आणि मुलांची हत्या करीत असते. 
         काही तर स्रिया अशा आहेत की ज्या विवाह अगदी थाटामाटात करतात. त्यातच त्या स्रियांना कोणीही बंधनात ठेवलेलं आवडत नाही. अशा स्रिया विवाह झाल्यानंतर ताबडतोब दोन तीन महिन्यात फारकत घेतात. त्यातच खटले दाखल करतात. मग खावटी मागतात वा खावटी म्हणून समूळ रक्कम मागतात व एकट्याच मायबापाच्या घरी आनंदाने खात बसतात. 
          एकंदरीत समाजातील वास्तविकतेचा विचार केल्यास आज देशातील लोकांची परिस्थिती व विचारही चिघळलेले आहेत की ज्यातून कोणाला कोणावर विश्वास ठेवता येत नाही. आज यावर खऱ्या अर्थानं विचारमंथनाची गरज आहे. संस्काराची उणीव जाणवत असून आजच्या काळात संस्कार हे तुटत चालले आहेत. असे जाणवायला लागलेले आहे.
          असे का झाले? असे का होत आहे? याबाबत विचार केल्यास व अभ्यास केल्यास विद्यार्थ्यांच्या बालस्तरावर जावे लागेल. विद्यार्थ्यांच्या बालस्तरावरचा विचार केल्यास विद्यार्थ्यांच्या बालवयात विद्यार्थ्यांवर संस्कार होतांना चांगले संस्कार होत नाहीत. ज्यातून वाईट संस्कार विद्यार्थ्यात वाढीस लागतात. जे संस्कार घरातूनच होत असतात. जे संस्कार परीसरातून होत असतात. जे संस्कार शाळेमधूनही होत असतात. हे तिन्ही स्थळ विद्यार्थ्यांना चांगले संस्कार देतील तरच चांगले संस्कार मुलांवर होतील. जे चांगले संस्कार मुलांमध्ये टिकून राहून त्याला भविष्यात आदर्श बनविण्यात कारणीभूत ठरु शकतील. 
        मुलांमध्ये सर्वप्रथम संस्कार पेरणारे घटक असते त्याचं घर. घरात त्याच्या आईवडिलांचं बोलणं, वागणं चांगलं असायला हवं. ते कुटुंब त्यांच्या आजी आजोबांची वा म्हातारे, अपंग, अनाथांची सेवा करणारे हवे. त्यातच त्या कुटुंबातील सदस्यांना कोणत्याच प्रकारची व्यसनं नसायला हवीत. परंतु आजची परिस्थिती अशी आहे की प्रत्येक घरातच मी माझी मुलं व माझी पत्नी. एवढंच विश्व आहे व म्हातारी मंडळी ही वृद्धाश्रमात असतात. तिथं निरनिराळी व्यसनं असून खुद्द वडील आपल्या मुलांना खर्रे आणायला पाठवतात नव्हे तर दारुची बाटलही घरातून आणायला पाठवतात. एवढंच नाही तर मुलांसमोरच दारु पितात. यात आईही मागे नाही. तिही आपली फॅशन करुन तोकड्या कपड्यात मिरवीत असते. पती कामावर गेल्यावर व्याभिचार करीत असते. शिवाय घरात मुलांच्या समोरच आईवडीलांच्या बोलण्याची भाषा वात्रट निघते. वागणं वात्रटच स्वरुपाचं असते. त्यातच सतत काही ना काही कारणानं भांडणं होतच असतात. या सर्व गोष्टीत गुंफलेले आईवडील. त्यांचं बाळाकडं लक्षच नसतं. त्यातच आजच्या महागाईच्या काळात पती पत्नी दोघंही कामाला जातात, मुलांना बेवारस ठेवून. ज्यातून मुलांवर संस्कार होतांना अडचणी निर्माण होतात. हेच पाहतात मुलं व त्याचेवर याच गोष्टीतून बरेवाईट संस्कार होत असतात. दुसरा संस्कार हा परिसरातून होतो. परिसरातून संस्कार होतांना मुलं आपल्या मित्रांसोबत रमतात. ती जशी वागत असतील, बोलत असतील, तशीच वागतात, बोलतात. ज्यातून मुलं ही वाईट स्वरुपाची घडू शकतात. त्यातच तिसरा मुलांच्या संस्कारावर परिणाम करणारा घटक आहे शिक्षक. मुलं जेव्हा शाळेत येतात. अशावेळेस त्यांचं चांगलं वाईट वर्तन घडतं. अशावेळेस चांगल्या वर्तनाला चांगलं व वाईट वर्तनाला वाईट म्हणण्याची पात्रता ही शिक्षकात असावी. शिक्षकात संस्कार फुलविणारा गुण असावा व त्यांना चांगले, वाईट हे अतिशय उत्कृष्टपणे मुलांना समजवता यावे. ज्यातून चांगले संस्कार होतील. तसाच स्वतः शिक्षक हा संस्कारी असायला हवा. परंतु अलिकडील काळात शिक्षकही विद्यार्थ्यांप्रती स्वार्थी दृष्टिकोन ठेवतात. तसं पाहिल्यास त्यांच्यातच संस्कार नसतो. मग ते मुलांवर संस्कार कुठून करतील? अशावेळेस शिक्षकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवर संस्कार होत नाहीत. 
           आज संस्काराची वानवा आहे. विभक्त कुटुंबपद्धती असल्यानं लहान मुलांवर त्यांच्या आजी आजोबांमार्फत होणारे संस्कार, केले जात नाहीत. व्यसनानं परिस्थिती हलाखीची होत असल्यानं संस्कार करायला चांगल्या संस्कारी जागेवर वास्तव्य करता येत नाही. तसंच इच्छा असूनही मुलांना चांगले संस्कार करण्यासाठी चांगल्या शाळेत दाखल करता येत नाही. इथूनच संस्कार तुटत जातात. ज्यातून भविष्यात चांगल्या संस्काराला तिलांजली मिळते व हीच मुलं मोठी झाली की त्यांच्यात गुंडगीरी वाढीला लागते. ज्यात दोष त्या मुलांचा नसतो. दोष असतो, शिक्षक, पालक आणि सवंगडी यांचा.
         खरं तर मुलांची ही भविष्यात निपजणारी पिढी संस्कारक्षम व्हावी. त्यासाठी मायबापानं प्रयत्न करायला हवेत. कोणत्याही आईवडीलांना आपली मुलं ही वाईट विचारांची निघायला हवी असे वाटत नाही. आजची मुलं ही आईवडीलांचं अजिबात ऐकत नाही. त्याचंही कारण आहे, आईवडीलांचं वागणं. घरात म्हातारे आजीआजोबा नसणं आणि असतीलही तर त्यांच्यावर आपल्याच आईवडीलांचं रागावणं. ज्यातून ही मुलं आजीआजोबांचं ऐकण्याऐवजी त्यांची हेळसांड करतात. ज्यातून मुलांवरील चांगल्या संस्कारावर डाग लागतो. आजची मुलं शिक्षकांचंही अजिबात ऐकत नाहीत. त्याचंही कारण आहे शिक्षकांचं वागणं व त्यांचा विद्यार्थ्यावर मुळातच धाक नसणं. छडीचा मार कायमचा दूर झाल्यानं मुलं शिक्षकांना दबत नाहीत. उलट ते शिक्षकांनाच दाबतात. तसाच परीसरही महत्वाचा आहे. मुलं परीसरातून बरंच काही शिकतात. हे जरी खरं असलं तरी महत्वाचा भाग आहे आनुवंशिकता. चांगल्या गुणांसाठी रक्तही तेवढंच चांगलं असावं लागतं. चांगल्या संस्कारी लोकांच्या पोटी चांगलीच संस्कारी मुलं जन्मास येतात की ज्यांच्यावर कितीही वाईट परिणाम होत असला, परिसर, आईवडील वा शिक्षकांचा. तरीही काहीच फरक पडत नाही. गाईच्या गर्भातून कधीच वाघ जन्माला येत नाही. भक्त प्रल्हादावर कधीच त्याच्या आईवडीलांचा, गुरुंचा व मित्रपरीवारांचा परिणाम झाला नाही. महत्वपुर्ण बाब ही की कुत्र्याचं शेपूट कधीच सरळ होत नाही. मग ते कुठंही टाकलं तरी. तसं संस्कारांचं आहे. संस्कारही कुत्र्याच्या शेपटीगत सरळ होत नाही. थोडासा प्रयत्न तेवढा करु शकतो आपण. ज्यातून रक्तातील संस्काराला आपल्या प्रयत्नानं थोडीशी दिशा तरी देता येते. चांगली पिढी निपजण्यासाठी रक्तातच चांगल्या संस्काराचा गुण असावा लागतो. तो जर असेल तर परिसर कितीही वाईट असू द्या. आईवडील कितीही वात्रट वागू द्या. शिक्षक कितीही वाईट मिळू द्या. मुलं घडणारच. हे जरी खरं असलं तरी प्रयत्न करायला काय हरकत आहे. प्रयत्न केल्यावर शेतातीलही उत्पन्न वाढवता येतं. ही तर संस्काराची गोष्ट आहे. ती सहज शक्य करता येवू शकते. चांगल्या स्वभावानं व चांगल्या विचारानं चांगल्या संस्काराची रुजवणूक करता येते.
         विशेष म्हणजे आपला स्वभाव व विचार चांगले असावे की ज्या स्वभावानं व विचारानं आपल्याला वाईट संस्कारावर मात करता येईल. वाल्याचा वाल्मिक बनवता येईल. अंगुलीमालचा अहिंसक बनवता येईल. तसंच आम्रपालीलाही विशेष असा सन्मान प्राप्त करुन देता येईल. अलिकडील काळात त्यावर कोणीच विचार करीत नाहीत. कारण कुणाकडे त्यावर पुरेसा विचार करायला सवडच मिळत नाही. खरं तर याच गोष्टीवर विचारमंथन व्हावं. शिबीरं आयोजित केली जावीत. शाळेशाळेतून चांगल्या संस्काराचे उपक्रम राबविण्यात यावेत. तसेच इमानदारीवर बक्षीस दिले जावेत आणि भ्रष्टाचार करणाऱ्याला थेट फाशीच. असं जर घडलं तर कदाचीत त्यातून परिणाम घडून चांगले संस्कार फुलवता येतील. तसेच आपले संस्कार असे असावेत की भविष्यात आपण मरण जर पावलो तर चार लोकं एकत्र येतील. प्राणी, पक्षीही आपल्या मयतीला असतील. त्यातच पाऊस, वाराही आपली उपस्थिती दाखवेल. यात तीळमात्र खोटपण नाही. तसेच आपले संस्कार जर चांगले नसतील तर कावळेही आपल्या पिंडाला शिवणार नाहीत. म्हणून कोणी कितीही वाईट असेना, आपलाही स्वभावगुण भूतकाळात वाईट का असेना, समजदारी आल्यावर आपल्यात परीवर्तन करावं. जेणेकरुन कावळाही आपल्या मयतीला येईल व आपल्या पिंडीला शिवेल. असेच आपले संस्कार असावेत. चांगले संस्कारच भविष्यात येणाऱ्या संकटांना टाळून नेतात. वाईट संस्कार भविष्यात अनेक अडचणी निर्माण करीत असतात.
         मंगेशचे ते विचार. आज तो मोठा झाला होता. परंतु जेव्हा तो लहान होता. त्यावेळेस त्यानं बरंच भोगलं होतं. अस्पृश्यतेच्या वेदनेनं त्यालाही छळलं होतं. तसं पाहिल्यास मंगेशचा जन्म हा स्वातंत्र्य मिळण्यापुर्वीच झाला होता व त्याच्या बिरादरीतील लोक भारत स्वतंत्र होईल व भेदभाव व विटाळ मिटेल. असे बोलत होते. तसा भारत स्वतंत्र झाला होता व भारत स्वतंत्र झाल्यावर संविधानही बनलं होतं. ज्या संविधानातून देश सुधारेल असं वाटत होतं. तसाच विटाळही कायमचा निघून जाईल असंही वाटलं होतं. परंतु आज भारत स्वतंत्र झाल्यावरही देश पाहिजे त्याप्रमाणात सुधरला नव्हता. देशातील सर्वच लोकांची मानसिकता ही भेदभाव आणि विटाळाचीच होती. वरवर स्वातंत्र्य दिसत होतं आणि वरवर विटाळही दिसत नव्हता. कारण कोणी विटाळ बाळगल्यास त्याला कायद्याचं भय होतं. विटाळ बाळगल्यास त्यावर दाद मिळवता येत असे न्यायालयातून. ज्याचं बीजारोपण खुद्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायद्यात केले होते. मात्र मंगेश नाखुश होता, त्या प्रावधानावर. कारण संविधान रुपी प्रावधानाची पाहिजे त्याप्रमाणात अंमलबजावणी होत नव्हती. 
         
   ***************************५**************

           शिला मंगेशची पत्नी होती. तिही त्याच्याच समाजाची होती. आज तिचा विवाह त्याचेशीच झाला होता. तिचे व त्याचे सूर जुळले होते. तिलाही समाजातील भेदभावाची जाणीव होती. तिनंही बरंच भोगलं होतं विटाळाबद्दल. विटाळ व विटाळाची मानसिकता. त्या मानसिकतेनं तिच्या परिवारालाच नाही तर तिलाही छळलं होतं. आजही आठवत होता तिला, तिला छळलं जाणारं प्रावधान. ती उच्चवर्णियांची मक्तेदारी असलेली भुमी. त्या भुमीत ती लहान असतांना तिचा श्वास गुदमरला जात होता. कोणीही येवून वाकड्या नजरेनं तिच्या बिरादरीकडे पाहात असे. त्यातच ती लहान असतांनाच तिच्यावर उच्चवर्णीयांची लेकरं वाकडी नजर ठेवत असत. तिला छळत असत. टॉंगटिंग तर वेगळीच. त्यावर ना तिचा परीवार बोलू शकत असे, ना ती. कारण पोलीस स्टेशनला जरी त्याची तक्रार केलीच तर तिचा परीवार अस्पृश्य असल्यानं त्यांची तक्रारच घेतली जात नसे. आजही ती मोठी झाली असली तरी तिच्या बिरादरीतील लोकांची तीच गत होती. आज संविधान असल्यानं जर त्या बिरादरीवर स्पृश्य लोकांचा अत्याचार झालाच तर त्यांची तक्रार पोलीस स्टेशनला घेतली जाई. परंतु त्या तक्रारीवर न्याय मिळत नसे. तेच पाहात होती शिला. त्यामुळंच तिला वाटत होतं की जेव्हा आपण संघटीत होवू. तेव्हाच आपल्या बिरादरीतील लोकांना न्याय मिळेल. तेव्हापर्यंत नाही. परंतु बिरादरीतील लोकं संघटीत होतील तेव्हा ना. भारत स्वतंत्र झाल्यानंतरही व संविधान देशात लागू झाल्यानंतरही तिची बिरादरी ही संघटीत झाली नव्हती. ती अधिकच स्वार्थी बनली होती व त्याच बिरादरीनं आपल्या स्वार्थासाठी अनेक पक्ष काढले होते. 
         शिलाच्या मनात ती लहान असल्यापासूनच बरीच खंत होती. तीच खंत आजही तिला जाणवत होती. त्यातच तिच्याही मनात बरेच विचार चालत असत. तिला आठवत होता तो काळ. जो काळ तिनं प्रत्यक्ष अनुभवला होता. त्याच काळावर ती विचार करीत होती. 
          ती बाबासाहेबांची पिढी. त्या पिढीनं बरंच भोगलंय जुन्या काळात. बिचारी पिढी आपलं मन मारुन राहात होती. त्यांना अन्न मिळत नव्हतं. त्यामुळंच ती विवाहाप्रसंगी लोकांच्या उष्ट्या असलेल्या पत्रावळीही चाटायला जात होती. एवढंच नाही तर रस्त्यावरुन चालतांना त्यांना घोड्यासारखं किंचाळत चालावं लागायचं. विचार असायचा कोणाला त्यांचा स्पर्श होवू नये व लोकं समोरुन अस्पृश्य येत आहे, हे समजून सावधान व्हावेत. अन् स्पर्श जर झालाच तर विटाळ व्हायचा. शिवाय उच्चवर्णीय मंडळींना अंघोळ करावी लागायची. 
        ती बाबासाहेबांची पिढी रस्त्यावरुन चालतांना किंचाळायची. ती जर किंचाळत चालली नसती तर त्यांचं काही बिघडत नव्हतं. तरीही ती किंचाळत चालायची. कारण त्या चालण्याच्या पद्धतीवर नियम बनवले होते, उच्चवर्णीय समाजाने. ते नियम जर कोणी मोडले तर भयंकर शिक्षा व्हायच्या लोकांना. ज्या शिक्षेचं वर्णन करणे शक्य नाही.
        ती शिक्षा राजांसमोर होत असे व राजाही प्रजेचं ऐकत असे. राजा हा लोकांना विरोध करीत नसे. त्यातच कधीकधी अस्पृश्यांच्या एकंदर वागण्यावरुन त्याला खुद्द मृत्यूदंडही होत असे.
          तो काळ व त्या काळात प्रसंगी प्राण्यांचीही घरात अवहेलना होत नव्हती. प्राण्यांनाही सन्मानानं वागवलं जात असे आणि अस्पृश्यांची गत ही प्राण्यांहूनही खडतर होती. ते थोडेसे गुन्हे. जे अस्पृश्यांकडून घडायचे नव्हे तर ते गुन्हे जाणूनबुजून अस्पृश्यांकडून घडवले जायचे. त्या किरकोळ गुन्ह्यात अस्पृश्यांना जीवघेण्या स्वरुपाच्या शिक्षा होत असत. ज्यातून अस्पृश्य समाज बराचसा हादरून गेला होता.
          युद्ध तर अस्पृश्यांच्या पाचवीलाच पुजलं होतं. तसं पाहिल्यास मोठमोठे पराक्रम करण्यात अस्पृश्य जात माहीर होती. त्यांना युद्धात पराक्रम केल्यावर धन्य वाटत असे. राजाला त्यांनीच केलेल्या पराक्रमानं विजय प्राप्त होत असे. परंतु राजाला विजयश्री प्राप्त झाल्यानंतरही अस्पृश्यांचा सन्मान केल्या गेला नाही. ही युद्धातील मदत अस्पृश्य केवळ सुग्रास जेवनाच्याच बदल्यात करीत असत. अन् विजयश्री ते जरी खेचून आणत असले तरी त्याचे श्रेय त्यांना मिळत नसे. ते मिळत असे त्यांना. ज्यांना राजा त्या दलाचा प्रमुख बनवत असे. केवळ भुकेसाठी व सुग्रास अन्नासाठी त्यांना युद्ध लढावं लागत असे.
          आज मात्र परिस्थिती वेगळीच आहे. आज सर्वच जातींना बाबासाहेबांनी संधी उपलब्ध करुन दिलेली आहे की ज्यांना आपल्या कार्यकर्तृत्वानं वर जाता येतं. त्यातच त्यांचा सन्मान होवू शकतो. तशाच अस्पृश्य जाती. अस्पृश्यांना समाजात आपल्यातील गुण दाखविण्याची संधी निर्माण झाली आहे. मग त्यातील काही अस्पृश्य असलेल्या जाती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानतात. त्यांना त्या संधीचा लाभ घेता येतो आणि ज्या जाती बाबासाहेब आंबेडकरांना मानत नाहीत. त्यांनाही लाभ घेता येतो. फक्त फायदा तेवढा मिळविण्यासाठी काही अस्पृश्य जाती बाबासाहेबांना मानतात. त्यांचा उदोउदो करतात आणि फायदा घेवून झाला की बोलती बंद होते. कोण बाबासाहेब, हेही त्यांना माहीत नसतं. 
          महत्वपुर्ण बाब ही की ज्या दिवंगत प्रथा, रुढी, परंपरा, या जोखडात फसलेला समाज होता की ज्यातून अस्पृश्यता हा कलंक लावल्या गेला होता अस्पृश्य जातीवर. त्या अस्पृश्य जातीवर कालच्या तथाकथित समाजानं अत्याचार केले. आपले उष्टे जेवन चारले त्यांना. आपल्या घरचा कोलूही फिरवायला लावला त्यांना. एवढंच नाही तर अस्पृश्यांचा स्पर्श त्यांना होवू नये म्हणून घोड्यासारखं किंचाळायला लावलं त्यांना. तसंच गावात, मंदिरात, पानवठ्यात प्रवेश नाकारला त्यांना. त्याच तमाम अस्पृश्य समाजाला डॉक्टर बाबासाहेबांनी वर काढलं, संविधान बनवून. आज त्याच संविधानाची ताकद त्यांच्याजवळ आहे, विटाळ मानणाऱ्या तमाम लोकांचा विरोध करण्यासाठी. आपल्याला मिळालेल्या शक्तीचा वापर पुरेपूर करण्यासाठी. आज तीच ताकद ते दाखवतात. अन् दाखवायलाच हवी. परंतु ती ताकद काही ठिकाणी कमी पडते. कारण काही ठिकाणी तमाम ओबीसी समाज हा विसरतोय की बाबासाहेबांनी आमच्याही प्रवर्गासाठी काहीतरी केलंय. अन् तसं विसरुन तोच समाज बाबासाहेबांच्या लेकरांच्या प्रगतीच्या आड येतोय. म्हणूनच प्रगती खुंटते. समाजाची अधोगती होण्यास प्रारंभ होतो. मात्र ही ताकद दिसायला हवी. अन् ही ताकद तेव्हाच दिसणार. जेव्हा हीच बाबासाहेबांची भावी पिढी संघटीत होईल. त्यांचे वेगवेगळे पक्ष निघणार नाहीत. पक्षसंघटना राहणार नाहीत. अन् ते जेव्हापर्यंत संघटीत होणार नाही. तेव्हापर्यंत त्यांना खऱ्या अर्थानं न्याय मिळणार नाही. लोकं त्यांना धारेवर धरतील व त्यांच्यावर तेवढेच अत्याचारही. वाटल्यास त्या अत्याचारात वाढदेखील नक्कीच होईल. यात दुमत नाही.
           शिलाच्या मनात आलेले विचार. संघटीत झाल्याशिवाय आपल्याबाबत समाजात असलेला विटाळ जावूच शकणार नाही. असे तिला वाटत होते. त्यातच तिला चवदार तळ्याचाही सत्याग्रह आठवत होता. ज्या सत्याग्रहात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकांना संघटीत केलं होतं. म्हणूनच तो सत्याग्रह करता आला होता. ज्यातून पाण्याबद्दल असलेला विटाळ कायमचा मिटलेला होता. 
         शिलाच्या मनात ज्याप्रमाणे संघटीतपणाचा विचार आला होता. वाटत होतं की संघटीत झाल्याशिवाय विटाळ संपणार नाही. तसाच दुसरा विचार आला होता शिक्षणाचा. समाज जेव्हा शिक्षीत बनेल, तेव्हाच खऱ्या अर्थानं समाजातील विटाळ दूर होईल असं वाटत होतं. कारण तिला आजही वाटत होतं की शिक्षण क्षेत्र पवित्र आहे व त्यात प्रत्यक्ष देवच वावरतात.
          अलिकडील काळात शिक्षण पवित्र बनण्याच्या मार्गावर आहे व त्याची सुरुवात झाली, शालार्थ आयडी घोटाळा अंतर्गत भ्रष्टाचार बाहेर काढून. खरं तर शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात भ्रष्टाचारानं पाऊल टाकलेलं असतांना त्या क्षेत्रातील भ्रष्टाचार कधीच बाहेर येणार नाही असं वाटत होतं. परंतु देवाच्या दरबारात देर है अंधेर नही है, या वृत्तीला अनुसरुन भ्रष्टाचार बाहेर आला. ज्यांनी योग्यता नसतांनाही शालार्थ आयडी डुप्लिकेट तयार करुन त्याद्वारे नियुक्त्या दिल्या. त्यांचा भ्रष्टाचार उघड झाला व त्यातून ज्या लोकांच्या योग्यता असतांना त्यांना डावललं गेलं. त्यांना न्याय मिळेल असे वाटते.
          शिक्षण क्षेत्र. पवित्र असं क्षेत्र. खरं तर भ्रष्टाचार या क्षेत्रात व्हायलाच नको होता. त्याचं कारण आहे, शिक्षण क्षेत्र करीत असलेलं कार्य. ते कार्य पवित्र असं कार्य आहे. ते क्षेत्र खरं तर देशासाठी सृजाण नागरीक घडवत असतं. ज्या नागरीकात वाईट गुणच नसावेत. अशी अपेक्षा असते. अन् त्यांच्यात वाईट गुण असतील तर देशाचा बट्ट्याबोळ नक्कीच होईल ही भावना.
         देश....... देशाला सृजाण नागरिकांची गरज आहे. चांगले नागरिक देशाला चांगल्या पदावर नेवू शकतात. ज्यातून देशाचा विकास होतो. परंतु देशाला जर भ्रष्टाचार लिप्त, गुन्हेगारी जगतातील नेतृत्व मिळालं तर देशाचं वाटोळं झाल्याशिवाय राहात नाही. शिवाय देशाला जर इमानदार नेतृत्व मिळालं नाही तर एखादा व्यक्ती देशच विकून जाईल. हे तेवढंच खरं.
           शिक्षणासारखं पवित्र क्षेत्र. त्या क्षेत्रात वर्गखोल्यातून शिकणारी सर्वच मुलं ही इमानदार बनायला हवीत. ती कार्यकुशल बनायला हवीत. तेव्हाच उद्या त्यांना देशाचं नेतृत्व मिळाल्यावर देशही उज्वल व इमानदार असाच बनेल. अन् तसं इमानदार, कार्यकुशल नेतृत्व तयार होण्यासाठी त्यांना शिकविणारे शिक्षकही इमानदार व कार्यकुशल असायलाच हवेत. ते शिक्षकही नियमानंच चालणारे हवेत. त्यांची नियुक्ती ही भ्रष्टाचारानं होवूच नये. नियमानं व्हावी. तेव्हाच ते विद्यार्थ्यांनाही इमानदारीचं ज्ञान देतील. परंतु आता शाळेत नियुक्त होणारे शिक्षकच भ्रष्टाचार करुन नियुक्त होतात. कारण बऱ्याचशा शाळा अशा आहेत की ज्या खाजगी स्वरुपाच्याच आहेत. अशा शाळेत शिक्षकांची नियुक्ती करतांना नियुक्तीसाठी त्या शाळेतील संस्थाचालक अर्धा कोटी रुपये घेतो आजच्या घडीला. ज्यातून भ्रष्टाचार होतो व अशी भ्रष्टाचार करुन नियुक्त झालेली मंडळी वर्गात विद्यार्थ्यांना शिकवितांना इमानदारीचे धडे शिकवूच शकत नाही. शिवाय जे शिक्षक अशा भ्रष्टाचारी प्रकारानं लागतात. ते शिक्षक खरंच वर्गातही इमानदारी पद्धतीनं शिकवू शकतील काय? यावर प्रश्नचिन्हं उभं राहातं. अर्थातच देशासाठी वर्गखोल्यातून सृजाण नागरीक घडवत असतांना चांगल्या गोष्टीलाही ब्रेक लागतो. ज्यातून देशाचं भवितव्य धोक्यात येत असतं. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे शाळेचं नेतृत्व. शाळेचं नेतृत्व अर्थात शाळेला सांभाळणारा व वर नेणारा घटक अर्थातच त्या शाळेचा मुख्याध्यापक. त्यातील काहींची नियुक्ती ही अशाच भ्रष्टाचारी मार्गानं होते. 
           शाळेचं नेतृत्व हे खलाशाच्या नेतृत्वाएवढंच महत्वाचं असतं. ज्याप्रमाणे खलाशी हा चांगला जर असेल तर जहाज कधीच बुडत नाही. अर्थात जहाजामध्ये असलेल्या सर्व लोकांचा जीव हा नावाड्याच्या मुठीत असतो. तसंच शाळेचं आहे. शाळेचं नेतृत्व करणारा मुख्याध्यापक हा सक्षम आणि दबाबरहित असायला हवा. परंतु अलिकडील काळात ज्या खाजगी संस्था बनल्या. त्या संस्थांनी शाळा उघडल्या व जाणीवपूर्वक भ्रष्टाचार करण्याची शपथच घेतल्यागत त्यांनी भ्रष्टाचार केला व त्यातूनच शालार्थ आयडीसारखा शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्राला काळीमा फासणारा भ्रष्टाचार घडला. हे सगळं घडलं, खाजगी शाळेत नियुक्त झालेल्या मुख्याध्यापकामार्फत. जो संस्थेनंच नियुक्त केला होता.
          शाळा ती कोणतीही असो, त्या शाळेत प्रशासन चालविण्यासाठी मुख्याध्यापक लागतो. तो जर इमानदार असेल, तर कार्यकुशलता वाढते. अन् तोच जर भ्रष्टाचारानं नियुक्त झालेला असेल तर त्या शाळेतील एकंदर कार्यकुशलतेवर डागच लागतो. खाजगी शाळेत मुख्याध्यापकाची नियुक्ती ही संस्थाचालक करतो. कारण तो मोठा भाऊच असतो एकंदर सर्व कर्मचाऱ्यांचा. ज्याला दादा म्हणतात. तो आपली दादागिरी दाखवत सर्व शाळेतील जेष्ठ शिक्षकांवर दबाव आणतो. त्यानंतर तो नियमबाह्य कामे करतो. ज्यात भ्रष्टाचार असतो. असा संस्थाचालक नियमबाह्य कामे करुन शिक्षकांना वेठीस धरून स्वतः मुख्याध्यापक बसवतो व असा मुख्याध्यापक बसवतो की जो एकतर संस्थाचालकाचा नातेवाईक असतो किंवा तो एकतर अनैतिक मार्गानं संस्थाचालकाला पैसे देणारा वा पैसे मिळवून देणारा असतो. शिवाय ज्याप्रमाणे आपल्या मोठ्या भावानं आपल्याला काही म्हटलं तर त्याची तक्रार आपण आपल्या वडिलांना करतो व आपले वडील ताबडतोब ती तक्रार ऐकून आपल्या मोठ्या भावाला दाटतात. प्रसंगी त्याला घराच्या बाहेर काढण्याची धमकी देतात. शिवाय कोणतेच आईवडील आपल्या मुलांच्या बाबतीत पक्षपातीपणा करीत नाहीत. मात्र अशा संस्थांच्या वर जे अधिकारी बसले असतात. ते अधिकारी खरं तर शिक्षकांच्या वडिलांच्या भुमीकेत असतात. ते अधिकारी संस्थेतील शाळेत जरी शिक्षकांवर अन्याय झाला किंवा होत असेल तरी त्या प्रकरणात वडिलांची भुमिका साकारत नाहीत. ते पक्षपात करतात व संस्थाचालक रुपी मोठ्या भावालाच मदत करतात. ज्यातून पक्षपात होतो व भ्रष्टाचारही. अशातूनच शालार्थ आयडी घोटाळे होतात व शिक्षण क्षेत्राचं वाटोळं होतं. त्याचबरोबर वाटोळं होतं देशाचंही. 
          अलिकडेच अस्तित्वात आलेला शालार्थ आयडी घोटाळा. ज्यातून वडिलांची भुमिका अदा करणारे अधिकारी सापडले. परंतु मोठे भाऊ असलेले संस्थाचालक मात्र तेवढ्या प्रमाणात सापडले नाहीत. कारण मुलं वात्रट जरी निघाली असतील तरी दोष मुलांचा नसतोच. दोष असतो बापाचा की ज्यांनी त्या मुलांना घडवलंय. खरं तर त्या बापानं चांगले संस्कार मुलं घडवितांना त्यांच्यावर करायला हवे होते. ते केले नाही म्हणूनच मुलं बिघडली. तेच अधिकारी वर्गाच्या बाबतीतही घडलं. त्यांनी आपली वडिलांची भुमिका अदा करुन शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात काम करीत असतांना इमानदारीनं काम करायला हवं होतं. भ्रष्टाचार करुन संस्थाचालकासारख्या मोठ्या भावाच्या बोलण्यात वा कर्तृत्वात पक्षपाती भुमिका घेवून भ्रष्टाचार करायला नको होता. ज्यातून शालार्थ आयडी घोटाळा झाला व अधिकारी सापडले. महत्वपुर्ण बाब ही की शिक्षण क्षेत्रातील हा शालार्थ आयडी घोटाळाच नाही तर त्या क्षेत्रात होत असलेला घोटाळा कधी ना कधी उघड होणारच होता. कारण हे पवित्र क्षेत्र आहे व हे क्षेत्र भ्रष्टाचार खपवून घेणार नाही. कधी ना कधी तो बाहेर येणारच. कारण यात त्या अबोध मुलांचं भवितव्य आधारलेलं आहे. ज्यांना आपण प्रत्यक्ष देव मानतो वा देवाचे रुपक देतो. हा भ्रष्टाचार देवच त्या मुलांच्या रुपानं का असेना. प्रत्यक्ष उघड्या डोळ्यानंच पाहतो. मग तोच देव कधीकधी असला गैरव्यवहार बाहेर आणतच असतो. देशाला वाचविण्यासाठी. कारण आपल्यालाही माहीत आहे व इतिहास साक्षीला आहे की पृथ्वीवर जेव्हा जेव्हा अन्याय, अत्याचार झाला. तेव्हा तेव्हा प्रत्यक्ष देवानंच पृथ्वीवर अवतार घेतले आहेत. पृथ्वीवर होत असलेल्या दानवांच्या अत्याचारापासून वाचविण्यासाठी.
          आज शालार्थ आयडी घोटाळा जरी बाहेर आला असला, मोठमोठे मासे जरी गळाला लागले असले तरी शिक्षणक्षेत्रातील भ्रष्टाचार संपण्याची चिन्हं दिसत नाहीत. आजही शिक्षण क्षेत्रात भ्रष्टाचार होतोच व आजही शिक्षण क्षेत्र नियम डावलूनच पदोन्नत्या देत असल्याचे आणि पैसे कमवीत असल्याचे दिसत आहे. परंतु त्याला प्रत्यक्ष पुरावे नसल्यानं असे होत असलेले भ्रष्टाचार आजही उघड करता येत नाही. परंतु काळाच्या ओघात तेच भ्रष्टाचार कधीकधी बाहेर निघतीलच, शालार्थ आयडी घोटाळ्यासारखेच. कारण शिक्षण क्षेत्र पवित्र क्षेत्र आहे व त्या क्षेत्रात प्रत्यक्ष देवच लहान मुलांच्या स्वरुपात वावरत असतो. यात शंका नाही. म्हणूनच निदान शिक्षण क्षेत्रात तरी भ्रष्टाचार करु नये म्हणजे झालं.

       *******************६********************
      
          शिला व मंगेशची जोडी. ती जोडी समविचारी होती. त्या जोडीला समाज व समाजातील असलेला भेदभाव चांगला समजत होता. त्या दोघांचेही जन्म हे देश स्वतंत्र होण्यापूर्वीच झाले होते. ते दोघंही लहान असतांनाच त्यांनी बऱ्याच यातना व वेदना शोषल्या होत्या. ज्यातून त्यांना देश स्वतंत्र झाल्यावर चांगले दिवस येतील असं वाटत होतं. परंतु घडलं उलटच होतं. देश स्वतंत्र झाला असला तरी चांगले दिवस न आल्यानं शिलाला आठवला तो काळ. ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेबांना आपला धर्मच बदलवावा लागला होता. शिवाय आता लोकं म्हणत होते की बाबासाहेबांनी आपलं धर्मपरीवर्तन का केलं. बाबासाहेबांनी धर्मपरीवर्तन केलं. कारण समाजात देश स्वतंत्र झाल्यावरही असलेला विटाळ. देश स्वतंत्र होवून आठ वर्ष झाले होते व संविधान निर्माण होवून पाच वर्ष झाले होते तरी आजही विटाळ होताच. तोच विटाळ कायमचा दूर जावा म्हणून डॉक्टर 
बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मपरीवर्तन केलं होतं.
           देव, देव, देव....... देव अमूक करतो. देव तमूक करतो. बाबासाहेबांना सतत भेडसावणारा शब्द. कारण बाबासाहेबांनाही विचार येत होता की देव ही संकल्पना खरी जर आहे तर त्याच देवाची आम्ही अस्पृश्य लोकं एवढी पुजापाठ करतो. तरीही तोच देव आम्हाला मदत का करीत नाही? आम्हाला उच्च वर्णीय जातीसोबत व्यवहार का करु देत नाही? आमचा भेदभाव का करावा उच्चवर्णीय लोकांनी?
          बाबासाहेबांचंही बरोबरच होतं. कारण त्यावेळेस अस्पृश्यता होती व अस्पृश्यता चरण सीमेवर पोहोचलेली होती. त्यांची इच्छा असूनही लोकं त्यांना ना मंदिरात येवू देत होते. ना त्यांना गावात प्रवेश देत होते. विटाळ मानत होते त्यांचा आणि विटाळातच जगवत होते.
          ज्या डॉक्टर बाबासाहेबांनी सर्व समाजाला दिशा दाखवली. ज्यांनी ओबीसीसाठी कलम ३४० लिहिली. नंतर आपल्या जातीसाठी कलम ३४१ लिहिली. त्यांनी जागवलं सर्वांना. मग तो कोणत्याही जातीतील, धर्मातील असो, मग ती स्री असो की पुरुष, अपंग असो की अनाथ, म्हातारे असो की लहान, एवढंच नाही तर पशूपक्षी असो की एखादं झाड. या सर्वांनाच स्वतंत्र्य केलं. त्यांनी मानवता शिकवली सर्वांनाच. त्यासाठीच धर्मपरीवर्तन केलं. त्यामुळेच आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जावून आदानप्रदान करु शकतो. मात्र हे करीत असतांना त्यांना त्या काळातील लोकांनी भयंकर त्रास दिला. परंतु इंग्रज त्यांचे पाठीराखे असल्यानं त्यांना समाजात देवविरहीत संकल्पना रुजवता आली.
          डॉक्टर बाबासाहेबांच्या धम्मपरीवर्तनापुर्वी संपुर्ण समाज पुरातन देवांचीच पुजाअर्चना करायचा. लोकं मंदिरात येवू देत नाहीत. म्हणून ते आपल्या घरात त्याच देवांची लपूनछपून पुजा करायचे. कारण देवांची पुजा करणं समस्त उच्चवर्णीय लोकांच्या लक्षात जर आलं तर उच्चवर्णीय लोकं त्यांचं घरच जाळून टाकायचे. त्यांना बेघर करायचे. तसं पाहिल्यास उच्चवर्णीय लोकांची घरं मोठमोठी होती व अस्पृश्य लोकांची घरं ही ताट्यातुट्यांचीच. वर छतावर गवताचं आच्छादन असायचं. पाऊस घरात येवू नये म्हणून. त्यांना दुमजली, टुमदार घर बांधायचीही परवानगी नसायचीच. तसंच ही अस्पृश्य माणसं, माणसंच असूनही त्यांना उच्चवर्णीय समाज माणूसकीनं जगू देत नव्हता.
             बाबासाहेबांना वाटलं की तोच देव. त्याच देवांची पुजा आम्ही करतो. ज्या देवांची पुजा तेही करतात. मग देव असा पक्षपात का करतो की तो आम्हाला वाळीत टाकतो आणि यांना उच्चश्रेणीत. मग देवच असा भेदभाव करीत असेल तर तो देव कसला? असा देव मानायला नको. त्यातच दुसरा महत्वाचा प्रश्न त्यांच्या मनात होता, तो म्हणजे देवाचे नवश म्हणून बळी जाणे. डॉक्टर बाबासाहेबांनाही वाटत होतं की असा देव राहूच शकत नाही की जो देव त्यानंच जन्माला घातलेल्या जीवाची हत्या करेल. शिवाय तिसरा प्रश्न त्यांच्या मनात होता, तो म्हणजे राष्ट्रसंतांचे विचार. राष्ट्रसंत व जेही कोणी थोर महात्मे होवून गेले होते, त्यांच्या जन्मापुर्वी. त्यांचे विचार ऐकले होते बाबासाहेबांनी. एवढंच नाही तर त्यांची पुस्तकही वाचली होती बाबासाहेबांनी. त्याच गोष्टीचा परिणाम झाला बाबासाहेबांवर. त्यानंतर विचार केला. विचार केला की आपण देव सोडावे आणि केवळ आपणच देव सोडू नये तर आपल्या समाजातील लोकांनाही देव सोडावयास सांगावे. शिवाय जे जे आपल्या समाजाच्या व्यतिरिक्त लोकं आहेत, त्यांनाही देव सोडावयास सांगावे. 
           डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तसा विचार करुन देव, धर्म सोडले व त्याच स्वरुपानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकांना तशा स्वरुपाचं सांगीतलंही. म्हटलं की आपण जर यात गुरफटून राहिले तर उद्याही आपली अधोगतीच होईल. हा समाज जुन्याच रुढीपरंपरेनुसार आपल्याला वागवेल. विटाळ हा राहिलच. तो जाणारच नाही अजिबात. मग ठरलं, धर्मपरीवर्तन करायचं. अन् त्याच अनुषंगानं डॉक्टर बाबासाहेब विचार करीत होते, कोणता धर्म घ्यायचा? मुस्लिम घेतला तर त्यातही अंधश्रद्धा. स्रीजातीचं बुरख्याआड राहाणं. आपली पुरुषजात सुरक्षीत होईल. परंतु स्री. ती तशीच राहिल बुरख्याआड. 
        बाबासाहेबांनी जेव्हा धर्मपरीवर्तन केलं. तेव्हा बरेचसे धर्म तपासले. परंतु सर्वच धर्मात काही ना काही चमत्कार व अंधश्रद्धा होत्या. काही तत्वात बदल होते. त्यातच त्यांनी बौद्ध धम्म तपासला की ज्या धम्मात एक विचार होता. वास्तविकता होती. अंधश्रद्धा नव्हत्या. त्यातच सामाजिक उत्थानाचा धर्म होता तो. 
          मुळात बौद्ध धम्मात क्रांती नव्हतीच अन् क्रांती नसली तरी भीतीही तेवढी नव्हतीच. अहिंसात्मक मार्गानं पुढं जायची ताकद त्या धम्मात होती. तसं पाहिल्यास बौद्ध हा काही धर्म नव्हताच तर तो धम्म होता. धम्म म्हणजेच विचार होते जीवन कसं जगावं याचे. शेवटी ठरलं की आपण हाच धम्म घ्यावा आणि आपल्या संपुर्ण बिरादरीचा विटाळ मिटवावा. त्यानंतर हिंदू धर्मानं जरी आपल्याबाबत विटाळ बाळगला. तरी त्यांना सांगावं की बाबारे, आम्ही आपल्या धम्मात नाही. त्यामुळंच आपल्या धम्मातील विटाळ आम्हाला लागू होत नाही. 
          डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा धर्मपरीवर्तन केलं आणि जगाला सांगीतलं की बाबा रे आम्ही तुमच्या धर्मातील नसून आम्हाला तुमच्या धर्मातील विटाळाचं तत्व लागू होत नाही. तेव्हा काळ व काळाचा दृष्टिकोन बदलला. त्याला कायद्याचं वलयही दिलं. संविधान होतंच की त्यांच्याबाबत कोणी भेदभाव केल्यास न्यायालयात दाद मागता येईल. तसं समाजाला शिका, संघटित व्हा व संघर्ष करा असा मोलाचा संदेशही बाबासाहेबांनी दिला होता. शिवाय अस्पृश्यांचा भेदभाव न मानणारं सरकार बसलं होतं. ज्यात अस्पृश्यांचा भेदभाव न मानणारे मुस्लिमसह इतर समाजाचे बरेच नेते होते. जे कॉंग्रेसी होते. शेवटी त्यांच्याच कृपेनं जनतेतील भेदभाव मिटला. जो बाबासाहेबांच्या धर्मपरीवर्तनानं मिटवता आला. परंतु हे जरी खरं असलं तरी भेदभाव हा संपुर्णतः मनामनातून गेला नाही. तो आजही मनामनात आणि तीव्र स्वरुपात जरी वाटत नसला तरी तीव्र स्वरुपात आहे. परंतु कायद्याचा धाक असल्यानं तो दिसत नाही व लोकं दाखवतही नाही.
         आजच्या काळानुसार डॉक्टर बाबासाहेबांबद्दल विचार केल्यास ते वाघच वाटतात. कारण ते त्या काळात घाबरले नाहीत. लोकं काय म्हणतील? विरोध तर करणार नाहीत? असा विचार केला नाही? ते स्वतः एकटेच पुढे गेले, प्रचलीत असलेल्या विचारांना छेद देण्यासाठी. बाबासाहेबांनी अनेक आंदोलनं केली. त्यातील चवदार तळ्याचं आंदोलन एक. शिवाय ज्यावेळेस त्यांनी धर्मपरीवर्तन केलं. तेव्हा बावीस प्रतिज्ञा लिहून त्यातील बावीस प्रतिज्ञा जगाला दिल्या. त्यावेळेस काही लोकांनी विरोधही केला असेलच. ज्यातून धर्मपरीवर्तन केल्यानंतर अल्पावधीतच त्याच धक्क्यानं मृत्यू आला बाबासाहेबांना. परंतु त्या बावीस प्रतिज्ञा पाळत असतांना कायदा पाठीमागं असल्यानं तद्नंतर कोणताच व्यक्ती पुढं येवू शकला नाही. तसंच बाबासाहेब शिकवून गेल्यानुसार आता जिथं कुठं बाबासाहेबांच्या लेकरांची अडवणूक करण्याचा प्रयत्न झाला. तेव्हा तेव्हा बाबासाहेबांच्या लेकरांचे पुर्वज समोर आले. त्यांनी ते प्रयत्न हाणून पाडले. आज मात्र तसं नाही. आजही तीच बाबासाहेबांच्या रक्तातून तयार झालेली लेकरं जरी असली तरी आणि बाबासाहेबांचं रक्त जरी सळसळणारं असलं तरी त्यांची पिढी ही भेकड आहे. त्याचं कारण आहे, त्यांच्यात असलेली एकजुटता. ती मिटली आहे. आज त्या समाजात अनेक पक्ष आहेत. अनेक नेते आहेत की जे स्वतःला थोर समजतात. जे स्वतःच्या पक्षांनाच थोर समजतात. मग कुठून दिसणार त्यांची ताकद? ती दिसत नाही. म्हणूनच काही समाजकंटक बाबासाहेबांचा अपमान करतात. त्यांच्या लेकरांचा अपमान करतात. त्यांचे उभारलेले पुतळे तोडतात. त्या पुतळ्यांचे हातपाय, बोटं वा अवयव तोडतात. विटाळ व भेदभाव प्रस्थापित करण्याचा प्रयत्न होतो. शिवाय ज्यांनी संविधान देवून सर्वच समाजातील लोकांना जगणं शिकवलं. वागणं वा हालचाल शिकवली. अर्थातच स्वतःच्या पायावर उभं राहाणं शिकवलं. ते बाबासाहेबासाठी जागा देत नाहीत स्वखुशीनं. कारण आहे, बाबासाहेबांच्या लेकरांची एकजूट. ती विखुरलेली आहे. साधी मुंगीलाही एकजूट समजते. ती लहानशी असूनही. जेव्हा ती चावते, तेव्हा विचार येतो की मुंग्यांच्या वारुळात हात टाकावा की नाही म्हणून. महत्वपुर्ण बाब ही की बाबासाहेब एक सिंहच होते की ज्यांनी समाजाचं एकत्रीकरण केलं. हे आपण पाहिलेलं आहे. परंतु आज बाबासाहेब नाहीत व आपण आपल्या स्वार्थापोटी ते एकत्रीकरण तोडलेलं आहे. मीच मोठा करीत वरवर ओठात बाबासाहेब ठेवलेला आहे. अन् ज्यांच्यासाठी आपल्या जातीपुर्वी संविधानात कलम ३४० लिहिली. तोही समाज बाबासाहेबांना मानायला तयार नाही. 
          खरं तर डॉक्टर बाबासाहेबांनी केवळ ओबीसी वा एससी एसटी प्रवर्गासाठीच कार्य केले नाही तर त्यांनी सर्वच जाती, धर्म, पंथ या सर्वांसाठी कार्य केलं. मग ती जात सनातनी का असेना, मग तो धर्म ख्रिश्चन, मुस्लिम का असेना. अन् बाबासाहेब काही एका विशिष्ट जात वा धर्माचे नव्हते. ते माणूस होते. माणूसकीनं त्यांनी सर्व गोष्टी केल्या. म्हणूनच ते सर्वांचे आहेत. त्यामुळंच त्यांना सर्वांनी मानावं. त्यांना आपल्या विचारात बंदिस्त करु नये म्हणजे झालं. तसाच त्यांचा अपमानही करु नये हे तेवढंच खरं. त्यातच त्यांच्या लेकरांचाही अपमान करु नये म्हणजे झालं. 
           विशेष बाब ही की बाबासाहेबांनी धर्मपरीवर्तन केलं. त्यांनी देव मानणार नाही अशा स्वरुपाच्या बावीस प्रतिज्ञा घेवून धर्मपरीवर्तन केलं आणि त्यानंतर सारे पिढीतील देव धर्म सोडले. कारण होतं, येणारी पिढी विटाळात जगू नये. त्यांना कोणीही विटाळानं जगवू नये. शिवाय ते धर्मपरीवर्तन यशस्वीही ठरलं. कारण तद्नंतर सामाजिक एकता लोकांमध्ये निर्माण झाली होती. परंतु हे जरी खरं असलं तरी आज ती सामाजिक एकता समाजात दिसत नाही. त्याचं कारण आहे, त्यांच्याच पिढीत निर्माण झालेला स्वार्थ. मी पणाची भावना. ज्या मी पणासाठी कित्येकदा व्यक्तीपरत्वे संघटना निर्माण झाल्या. मग कुठून दिसेल संघटन? जे बाबासाहेबांना अभिप्रेत नव्हतं. तेच करतेय त्यांची पिढी. ज्यातून कालांतरानं विटाळही भविष्यात पुन्हा परत येण्यास मागं पुढं पाहणार नाही. अशीच चिन्हे दिसताहेत. विशेष म्हणजे आज आपल्याजवळ वेळ आहे. वेळ आहे विचार करण्यासाठी. आजच आपण विचार करावा व आपलंच नाही तर आपल्या समाजाचं एकत्रीकरण करावं. अनेक निर्माण झालेले पक्ष संपवावेत. जे बाबासाहेबांना अभिप्रेत आहे. तरच विटाळ येणार नाही, भविष्यात पुन्हा परत व सामाजिक एकताही टिकून राहील यात शंका नाही. 
        शिलाच्या मनातील ते विचार. ते क्रांतीकारी विचार होते. त्या दोघांनाही समाजातील विटाळ, अर्थात लोकांच्या मनातील विचार दूर करायचा होता. त्यासाठी त्यांची मानसिकता बदलवायची होती. ज्यादृष्टीनं ते प्रयत्न करणार होते. तसा निर्धार ते करीत होते.

           ******************७*******************
     
        शिला माजघरात होती. मंगेश बाहेर होता. सामाजीक परीवर्तनाचा ध्यास त्याच्या मनात होता. तो सतत विटाळाबाबत विचार करीत असायचा. त्यातच एकदा असाच त्याच्या मनात विचार आला व वाटायला लागलं की विटाळ जावा.
           देश स्वतंत्र झाला. संविधान बनलं. धर्मपरीवर्तन झालं तरी. तरी जो विटाळ गेला नाही. तो विटाळ जावा. लोकांची मानसिकता बदलावी. त्यासाठी काय करायला हवं. त्याच्या मनातील तो विचार. त्यातच त्याला वाटायला लागलं. आपली भुमिकाच हिंस्र प्राण्यांसारखी असावी. पाळीव पशुगत नाही. कोणीही आपल्याला केव्हाही कापू शकणार आणि आपण निगरगट्ट बसून स्वतःला कापू देणार. आपण जर तशा स्वरुपानं वागलो तर कोणीच आपल्यावर अन्याय अत्याचार करणार नाही. हिंस्र स्वरुपानं कोणीच आपल्यासमोर उभं राहणार नाही. परंतु आपले विचार हिंस्र प्राण्यांसारखे असू नयेत. हेच वाटलं त्याला व लागलीच तो माजघरात गेला आपल्या प्रिय पत्नीला ती गोष्ट सांगण्यासाठी. म्हणाला,
          "मला वाटते की आपण आजपासून वाघासारखं जगावं. म्हणजे कोणीही आपल्यावर अत्याचार करणार नाही. कोणीही कधीच आपल्यावर अन्याय करु शकणार नाही."
           "होय, मलाही अगदी तसंच वाटतंय. परंतु आपलं तसं वागून उपयोग काय?"
          "उपयोग म्हणजे? प्रथम आपण तसं वागावं. मग लोकांनाही तसंच सांगावं. म्हणजे विटाळ जाईल आपोआपच. कोणीही वाघ, सिंहाच्या वाट्याला जातंय का? नाही ना. मग ठरलं तर. आपण तसंच वागावं."
           "अन् समाज?"
           "समाजालाही तेच तत्व शिकवावं."
           "परंतु शिकविणार कसं? समाज शिकत नाही ना ते तत्व. समाज शिकतो आपला स्वार्थ. स्वार्थासाठी अनेक पक्ष निर्माण करणं. ज्यातून सत्ता हातात येत नाही. अन् सत्ता नसल्यानं आपलं कोणीच ऐकूही शकत नाही.
           "तेच तर समाजाला शिकवायचं आहे आपल्याला. शिकवायचं आहे की समाजानं आतातरी आपलं वर्तन बदलायला हवं. एकत्रीकरण करायला हवं. अनेकपक्षात विभागणी नको करायला. अन् शिक्षण शिकायला हवं. शिक्षण घेतल्याशिवाय भेदभाव म्हणजे काय? ते लोकांना समजणार नाही. विटाळही कोणाला समजणार नाही. सामाजिक परीवर्तन होणार नाही."
             त्याचा तो ध्यास. तो बाबासाहेबांनी जे कार्य केलं. त्या कार्यानं प्रभावीत झाला होता. आता त्याला वाटायला लागलं होतं की जातीअतंर्गत असलेला विटाळ दूर करायचा समाजातून. समाजाला शिक्षण शिकायचा संदेश द्यायचा. बाबासाहेबांसारखे जगायला लावायचे. बाबासाहेब जसे शेर होते तसे. आपण बाबासाहेब आंबेडकर बनू शकत नाही. परंतु आपण त्यांचेच विचार समाजात पेरु शकतो हे तेवढंच खरं. 
           मंगेशला वाटत होतं की चांभार, मांग, महार, मेहतर, सतनामी, खाटीक या तत्सम जाती. सर्वच जाती या अस्पृश्य. ज्यांच्यावर पुर्वीच्या काळात अत्याचार झाला व त्या सर्वच जातींना अस्पृश्य म्हणून हिनवलं गेलं. त्यांचा मंदिरप्रवेश नाकारला गेला. आज त्या जाती थोड्याशा सुधरल्या. ज्या जातींना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुधरवलं. ज्यातील एक महार नावाची जात अधिकच सुधरली. जी मुंगीसारखी प्रतिकार करते. बाकीच्या जाती या बैल, उंट व हत्तीसारख्या आहेत की ज्या बलदंड आहेत. परंतु शक्तीहिन आहेत. त्याही जातीवर अत्याचार सुरुच असतो. जसे बैल, उंट वा एखाद्या ठिकाणी हत्ती कापले जातात तसे. कारण अलिकडील काळात शिकारी त्यांच्याच होतात. जे बलदंड नाहीत, कोंबड्या बकऱ्यांसारखे व बलदंड असले तरी लाचार आहेत, बैल, उंच आणि हत्तीसारखे. म्हणूनच समाजानं वाघासारखं बनावं. कोणीही सहजासहजी शिकार करणार नाहीत असे. नाहीतर मुंगीसारखं बनावं. कोणीही सहजासहजी वाट्याला जावू नये असे.
        शिलाला वाटत होतं की चांभार, महार, मांग, मेहतर, सतनामी व खाटीक. या तमाम अस्पृश्य जाती. त्या शुरवीरच होत्या पुर्वीपासूनच. त्या जाती प्रजेचं रक्षण करण्याची कामे करायच्या. परंतु जसा काळ बदलला. तसे संकेतही बदलले व बदलत्या संकेतानुसार विचार बदलले.
          महार जात...... एक अस्पृश्य जात की ज्या जातीला विशेष अशी कामं होती व जी जात राजाची सुरक्षा करायचं काम करायची. त्या जातीची मंडळी ही प्रसंगी आपला जीव द्यायचे. परंतु ज्या धन्यानं त्यांना कामगिरी सोपवली, त्यांना दगा द्यायचे नाहीत. ती जात अतिशय इमानदार जात होती त्या काळात. तशीच चांभार जात. ज्या जातीला आज चर्मकार संबोधतात. ज्या जातीलाही त्या काळात अस्पृश्य मानलं गेलं. त्यांचाही विटाळच मानला गेला त्या काळात. तिही जात शुरवीर होती व त्या जातीनं अनेक राजे दिले. परंतु तद्नंतरच्या काळात त्यांचं शुरपण पाहून त्यांना कुठंतरी खालचा दर्जा दाखवणं आवश्यक वाटल्यानं त्यावेळेस युद्ध जिंकलेल्या लोकांनी त्यांना गुलाम केलं, ते वर येवू नयेत म्हणून. खाटीक जात, ज्या जातीचाही विटाळच होताच समाजात. तशी तिही शुरवीरच होती. सुदर्शन जात, जी देखील शुरवीरच होती. तशीच मातंग जात. हीही जात शुरवीरच होती. अन् सतनामी जात. ज्यांनी पहिली लढाई इंग्रजांशी केली व त्यांना सळो की पळो करुन सोडले होते. तिही शूरवीरच होती.
         बलदंड होण्यासाठी फारशी शरीरयष्टी लागत नाही वा शस्रसाठा आपल्याजवळ नसला तरीही चालतं. अक्कलही जास्त लागत नाही. हं, तेवढी हिंमत आणि युक्ती लागते. काहीही नसलं तरी. तसं पाहिल्यास शिवाजी महाराजांजवळ अफजलखानापेक्षा सैन्यसाठा व ताकद कमीच होती. परंतु त्यांनी त्याला ठार केलं. शिवाय औरंगजेबापेक्षाही ते बऱ्याच बाबतीत मागे होते. तरीही त्यांनी स्वराज्य स्थापन केलं. तशीच महाराणी ताराबाई. एक स्री असून तिनं केवळ हिंमतीच्या भरवशावर तिनं औरंगजेबाला सळो की पळो करुन सोडलं होतं. 
         तमाम शुरवीर असलेल्या या तत्सम जाती की ज्या जाती आज सुधारणेपासून वंचीत आहेत. एका महार जातीचा विचार जर केला तर तीच सुधारलेली दिसते व ती एवढी सुधारलेली दिसते की ती स्वतःला थोर समजत त्या जातीतील काही लोकं अनेक पक्ष, अनेक संघटना स्थापन करतात नव्हे तर लोकांना वेगवेगळ्या पक्षात वाटून घेतात. ते समाजातील लोकांची विभागणी वेगवेगळ्या पक्षात करतात व आपला पक्ष कितपत मोठा हेच बयाण करुन लोकांनाही आपल्याकडे आकर्षित करतात. हे स्वतःच्या जातीला इतर अस्पृश्य जातींपेक्षा थोर समजतात. काहीजण म्हणतात की आम्ही वेगवेगळे पक्ष काढले. कारण आम्हाला बाबासाहेबांचे विचार समजले. त्यांनी स्वातंत्र्य, समता व बंधूता दिली. मुलभूत हक्काचे अधिकार दिलेत. म्हणूनच आम्ही पक्ष काढतोय. तसं इतर जातींचं दिसत नाही. त्या जाती बुजगावण्यासारख्या तटस्थ राहतात. मग आपल्याच समाजातील कोणावर अत्याचार झाला तरी त्यांना चालतं. त्या जाती आपल्याला काय करायचं. आपला त्या अत्याचारात क्रमांक नाही ना. असा विचार करतात. त्या बाबासाहेबांना मानत नाहीत. त्यांचे विचार अंगीकारत नाहीत. मात्र बाबासाहेबांनी निर्माण करुन दिलेल्या विचारांचा, हक्क, आणि अधिकारांचा आणि त्यातल्यात्यात सवलतींचा फायदा घेतांना दिसतात.
         डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांनी समाजात सुधारणा केल्या व सर्वच समाजाला मोलाचा संदेश दिला. त्यांनी सांगीतलं की शिका, संघटित व्हा व संघर्ष करा. कशासाठी संघर्ष करा? तर त्याचं उत्तर आहे, अन्यायाविरुद्ध संघर्ष करा. आपल्यावर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध संघर्ष करा. अन् संघर्ष करतांना एकटा व्यक्ती संघर्षात टिकू शकत नाही. म्हणूनच एकजुटता निर्माण करा. त्याच बाबासाहेबांचा मोलाचा संदेश ऐकून लोकांनी स्वतःमध्ये सुधारणा केल्या व आता आपल्यावर अन्याय झाल्यावर संघर्ष करतात. अत्याचारावरही आवाज उठवतात. परंतु जेव्हा कधी एखाद्यावर अत्याचार होतो. तेव्हा आवाजही उठविणारा एकटाच असतो. बाकीची मंडळी बघ्यांची भुमिका वठवीत असतात. मग कुठून न्याय मिळवता येईल. शिवाय हा एकट्याचा आवाज दाबला जातो. इतर समाज दाबतो. कधी न्यायालयातून तर कधी पोलीस स्टेशनमधून तर कधी समाजातील इतर सर्व समाजबांधव एकत्र येवून. 
          विशेष म्हणजे बाबासाहेबांनी म्हटल्याप्रमाणे फक्त आपण शिकलोय आणि संघर्ष करतोय. परंतु कधीच संघटीत झालो नाही. ती आम्हाला गरजच वाटली नाही. बाबासाहेबांनी आणखी म्हटलं की आपलं जीवन जर बदलवायचं असेल तर सत्ता हातात घ्या. ती सत्ता कशी हातात घ्यायची तेही आम्हाला समजलेलं नाही. आम्ही सत्ता हातात घेण्यासाठी अनेक पक्ष स्थापन केले. आम्ही आमच्यात प्रसंगी सामाजिक एकता निर्माण केली. ती फक्त दिक्षाभुमीवर जाण्यासाठी आणि चैत्यभुमीवर जाण्यासाठी. कोणावर अन्याय अत्याचार होत असेल तर चैत्यभुमी व दिक्षाभुमीवर जसं जनसागराचं रुपांतर महासागरात होतं, तसा महासागर दाखवत नाही. मग मरतो तो कोण? ज्याच्यावर अन्याय होतो तो. बाकीचे दात विचकटत हसून आपल्याला काय करायचं असा विचार करुन गप्प राहतात. ज्यातून कधीकाळी आपणही त्याच अत्याचाराचे शिकार होतो कधी व मारले जातो. आपण एकजुटता कधीच ठेवत नाही. आमची एकजुटता कधीकधी सामाजिक बाबतीत दिसते. परंतु राजकीय बाबतीत कधीच दिसत नाही. मग आम्ही हरतो. राजकीय सत्ताही ताब्यात येत नाही व आमची अवस्था एक ना धड, भाराभर चिंध्या अशीच होते. पर्यायानं सांगायचं झाल्यास आमची एकजुटता होवूच शकत नाही. कारण आमच्यात आजही आहे स्वार्थ. पोळीचा तुकडा मलाच भेटला ना संविधान रुपानं. मग मीच त्याचा उपभोग घेणार. इतरांनी घेवूच नये ही आमची भावना. आमची भावना मासोळीसारखी आहे. मासोळीला पकडण्यासाठी खाद्य लावून ज्याप्रमाणे नावाडी पकडतो. अगदी तेच घडतं आमच्यासोबत. आम्हीही लहानशा आमिषाच्या तुकड्याला बळी पडतो व आपल्या समाजाचं नुकसानच करुन बसतोय. 
         महत्वपुर्ण बाब ही की आमची एकजूटता मुंगीसारखी दिसायला हवी. जर कोणी आक्रमण केलंच तर तो पळून जाईल. एवढी प्रतिकारकता मुंगीत असते. सहजासहजी मुंग्यांच्या वाट्याला कोणी जात नाही, ना गांधीलमाशी आणि ना मधमाशीच्या वाट्याला जात कोणी. कारण असते त्यांच्यातील प्रतिकारकता. आम्ही मात्र एकजूट असलो तरी एकजुटीनं मुंगीसारखी प्रतिकारक शक्ती दाखवत नाही. लाचार होवून मासोळी पकडणाऱ्या कोळ्याच्या जाळ्यात सापडतो. कोळी आश्वासनाचा एखादा तुकडा मासोळ्यांना टाकतो व त्या तुकड्यावर ताव मारण्यासाठी जेवढ्या गोळा होतात. तेवढ्या मासोळ्यांना पकडतोच तो. आम्हीही तसेच पकडले जातोय. आजही आम्हाला बाबासाहेब समजलेलेच नाहीत. आमची आजची अवस्था पाळीव प्राण्यांसारखीच आहे. ज्याप्रमाणे कसाई एका कोंबडीला कापतो. तेव्हा दुसरी कोंबडी विचार करतेय की वाचलो रे बाबा, माझी पाळी नाही आली. परंतु कधी ना कधी तिचीही पाळी येणारच असते. तशीच झाडांची पानं. एक पिकलं पान पडतं, तेव्हा बाकीची हिरवी पानं त्या पानाला हसतात. परंतु तिही पानं कधी ना कधी पिकून पडणारच असतात. महत्वाचं सांगायचं म्हणजे क्रमांक सगळ्यांचाच येतो अत्याचाराच्या शिकारी जाळ्यात अडकण्यासाठी. ज्याप्रमाणे कोंबड्या, मासोळ्या, बकऱ्या, मेंढ्या इत्यादीसारखे पाळीव प्राणी अडकतात तसे. परंतु एकजुटीनं जर मुंगी, मधमाशी, गांधीलमाशीसारखा प्रतिकार केला तर कदाचित कोणात आपल्याला ब्र म्हणायची थोडीशी तरी भीती वाटेलच. तसं जर आपण केलं नाही तर उद्या कोणीही आपली मासोळी, कोंबडी, बकरी करुन खैरलांजी, कोपर्डी, चवदार तळेही केल्याशिवाय राहणार नाही. 
          विशेष म्हणजे हे असं घडू नये म्हणून ज्या कोणत्या तमाम अस्पृश्य जाती आहेत. ज्या कोणत्या तमाम बहुजन जाती आहेत. त्यांनी एकत्र येवून मुंगी, गांधीलमाशी वा मधमाशीसारखं राहावं. त्यांच्याकडून काहीतरी शिकावं. कोंबड्या, बकऱ्यांसारखं राहू नये म्हणजे झालं. अन् एकटंच राहायचं असेल तर वाघ, सिंहासारखं बलदंड शक्तीवान असावं. उंट किंवा बैलासारखं शक्तीवान असूनही शक्तीहिन असू नये की कोणीही आणि केव्हाही आपल्याला मारुन आपल्या मांसावर ताव मारु शकेल. 
        मंगेशलाही तसंच वाटत होतं. समाजाविषयी त्याच्या मनात कळकळ होती. ती अतिशय स्पष्टपणे दिसून येत होती.
          शक्तीहिन नाही तर शक्तीवान बनविण्याचा बाबासाहेबांचा प्रयत्न. त्यांनीच समाजाला बळकट बनवलं होतं. परंतु तरीही थोडीफार कसर बाकी होती. ती कसर म्हणजे लोकांची मानसिकता. अर्ध्याअधिक लोकांनी विटाळ व मंगेशच्या समाजाबद्दलची असलेली विटाळाची भावना बदलवली होती. थोडीफार बाकी होती. तिही भावना दूर होईलच कधीकधी. असं मंगेश व शिलाला वाटत होतं. त्यासाठी शिक्षण व महत्वाचं होतं लोकांचं एकत्रीकरण. त्यासाठी त्यांचं एकत्रीकरणाचं करणं आवश्यक होतं. त्यासाठी शिक्षण महत्वाचं होतं आणि त्यासाठी शिक्षण शिकविणारे घटक अर्थातच शिक्षक महत्वाचे होते. त्यातच शिक्षकांचं चांगलं शिकवणंही तेवढीच महत्वपुर्ण बाब होती.
          मंगेशच्याही मनात एक खंतच होती. शिक्षकांनी आपल्या वर्गात चांगलंच शिकवायला हवं. त्यांनी आपली वागणूक बदलवावी. तरंच समाजातील विटाळ आणि भेदभाव दूर करता येईल. तसा तोही एक विचार महत्वाचा होता. बाबासाहेबांनी थोड्याफार प्रमाणात का असेना, बरंच समाजपरीवर्तन घडवून आणलं होतं. त्यात त्यांना शिकविणाऱ्या शिक्षकांची भुमिका महत्वपुर्ण होती. ज्यांनी बाबासाहेबांचा पुढं भेदभाव होवू नये. म्हणून आपलंच आडनाव त्यांना दिलं होतं. मंगेश त्याबाबत विचार करीत होता.
          सर्वच शिक्षक हे विद्यार्थ्यांचा राग करीत नाहीत. ते भेदभावही करीत नाहीत. ते विद्यार्थ्यांशी अतिशय सौजन्यानं वागत असतात. कधी रागवत असतीलही. परंतु ते रागावणं त्यांचं प्रेममयी असतं नव्हे तर विद्यार्थ्यात संस्कार फुलविण्यासाठी असतं. विद्यार्थी हा संस्कारी बनावा असंच शिक्षकांना वाटत असतं. मात्र काही शिक्षक त्यातही अपवाद असतातच. ज्यांच्या शिकविण्यातून दैत्यही तयार होत असतात. दुर्योधन व दुःशासनही तयार होत असतात. तसेच कोणकोणते शिक्षक एकलव्याचे अधिकारही नाकारत असतात. यात शंका नाही.
          शिक्षक असा एक निसर्ग प्रक्रियेतील घटक आहे की जो नियम शिकवतो. त्याचा जन्मच मुळात सृष्टीचं रक्षण करण्यासाठी झालेला असतो. त्याचेसमोर येणारा प्रत्येक घटक की ज्यांच्याबाबत त्याच्या मनात आकस नसतो. भेदभावही नसतोच. याबाबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं उदाहरण घेता येईल. 
         डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे हुशार होते. तसं पाहिल्यास त्या काळात बराच भेदभाव होता व त्याच भेदभावात्मक वातावरणानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिकत असतांना बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागला. जेव्हा ते लहान होते.
           बाबासाहेब जेव्हा लहान होते व शाळेत जायचे. त्यावेळेस शाळा या इंग्रजांच्या होत्या. ज्या शाळेत नियुक्त झालेले शिक्षक ब्राम्हण समाजाचे होते. ज्यांचं नाव आंबेडकर होतं. 
            बाबासाहेब ज्या काळात शाळेत जायचे. त्या काळातही भेदभाव होता समाजात. तसा भेदभाव शिक्षण शिकत असतांना मुलांमध्येही होताच. तसं पाहिल्यास त्या काळात अस्पृश्यांना ना शिक्षण शिकायचा अधिकार होता ना शाळेत जायचा. शिक्षण तसं पाहिल्यास पिढीजातच शिकावं असं बंधन होतं व तेच पिढीजात शिक्षण हे आपल्या भविष्यातील उदरनिर्वाहासाठी शिकवीत असत वडीलधारी मंडळी. बाप जी कामे करायचा. तीच कामं शिकवायचा आपल्या मुलांना. परंतु रामजींना शिक्षणाचं महत्व कळलं असल्यानं त्यांनी आपल्या मुलांना शिक्षण शिकविण्याचा बोध घेतला. ज्यातून डॉक्टर बाबासाहेब शिकते झाले. 
         डॉक्टर बाबासाहेब शिकले. परंतु ते शिकत असतांना भेदभाव असल्यानं त्यांना शाळेत उपस्थित असणारे विद्यार्थी आपल्यासोबत बसू देत नसत. तसा शिक्षकांसमोर त्या तमाम विद्यार्थ्यांच्या विचार प्रक्रियेनं पर्याय नव्हता. समजा बाबासाहेबांना इतर सर्वसामान्य विद्यार्थ्यांसोबत शिक्षण शिकण्यासाठी बसायला परवानगी दिली असती तर शिक्षकांच्या नोकरीवर आच आली असती. त्यातच भेदभाव असल्यानं त्या काळच्या इतर विद्यार्थ्यांच्या वडिलांनी आपली मुलं त्या शाळेतून काढून दुसर्‍याच शाळेत नेवून टाकली असती. ज्यातून शिक्षकांच्या वागण्यावर प्रश्नचिन्हंच उभं राहिलं असतं. 
         डॉक्टर बाबासाहेबांना प्रवेश देणारे शिक्षक आंबेडकर. त्यांच्याही मनात भेदभाव होताच. कारण तेही ब्राम्हण समाजाचेच होते. परंतु एक शिक्षक म्हणून नियुक्त होतांना शिक्षकात कोणत्याही प्रकारचा दुराग्रह नसतोच आणि नसावाच. भेदभाव नसावाच. कारण तो ज्ञानदानाचं काम करतो. जे काम त्यानं निःशंक मनाने करायला हवे. हाच विचार करत आंबेडकर नावाच्या शिक्षकांनी जे पाऊल उचललं. ते महत्वपुर्ण होतं. तशी त्या काळातील इंग्रजी मिशनऱ्यांच्या दबावानं बाबासाहेबांना शिक्षण शिकायला परवानगी मिळाली. परंतु सामाजिक परिस्थितीच्या बंधनातून त्यांना भेदभावानं वागविण्याची इच्छा नसूनही बाबासाहेबांना आंबेडकर शिक्षकानं वेगळं बसवलं नव्हे तर वेगळं बसवावं लागलं. त्यातच बाबासाहेबांची हुशारी पाहून त्यांना बाबासाहेब आवडायला लागले व वाटायला लागलं की हा विद्यार्थी भरपूर शिकावा. त्यानं भरपूर शिक्षण घ्यावं. परंतु ते शिकणार कसे? शिक्षकांच्या मनात वेगवेगळे प्रश्न उपस्थित होते. 
         आंबेडकर नावाचे ते डॉक्टर बाबासाहेबांना लाभलेले शिक्षक विचार करु लागले. विचारांती लक्षात आलं की जर बाबासाहेबांना आपलं नाव दिलं तर...... तर कदाचित त्यांना दिलेल्या आडनावावरुन ते जातीचे अस्पृश्य आहेत, हे समजणार नाही. कोणीही त्यांना ब्राम्हणच समजतील व त्यांच्याबाबत पुढं कोणी शिकवीत असतांना कोणत्याच स्वरुपाचा भेदभाव करणार नाहीत. 
         ते आंबेडकर नावाचे शिक्षक. त्यांनी तसा आपल्या मनात विचार करताच एक विचार आणखी होता की हे जर बाबासाहेबांना म्हटलं तर राग येईल. मग काय करायचं. थोडा विचार केल्यावर त्यांना आठवलं त्यांचं आडनाव. जे लांबलचक नव्हतंच. तरीही बहाणा बनवून ते एक दिवस बाबासाहेबांना जवळ बोलावून म्हणाले,
          "भीमराव, तुझं अंबावडेकर नाव जरा जास्तच लांबलचक आहे. मला सहज घेणं शक्य होत नाही. मी तुझं नाव बदलवतो. माझं आंबेडकरच नाव तुला देतो. चालेल काय?"
          ते आंबेडकर नावाच्या शिक्षकांनी बाबासाहेबांना विचारलेले शब्द. तसे बाबासाहेब लहान होते, त्यांना ते समजायला वेळ लागला नाही. त्यांनी नकार दिला. परंतु आंबेडकर नावाच्या शिक्षकांच्या मनात जो प्रश्न उपस्थित झाला होता. तो काही त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. शेवटी त्यांनी ठरवलं. आपण बाबासाहेबांच्या वडिलांना शाळेत बोलावून विनंती करायची. पाहू काय होते ते. तद्नंतर त्यांनी रामजींनाही शाळेत बोलावलं. विश्लेषण समजावून सांगीतलं. ज्याचं महत्व रामजीच्या लक्षात आलं व डॉक्टर बाबासाहेबांचं नाव सपकाळ वरुन आंबेडकर पडलं. 
          डॉक्टर बाबासाहेबांचं खरं नाव सपकाळ. त्यांच्या पुर्वोत्तर पिढीनं ज्या कोण्या राजेरजवाड्यांची चाकरी केली असेल. त्या राजेरजवाड्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुर्व पिढीतील लोकांच्या कर्तृत्वाला व शुरतेला वंदन करुन दिलेली सपकाळ नावाची पदवी. जे पुढं त्यांचं आडनाव झालं. परंतु रामजींनी जेव्हा बाबासाहेबांचं नाव शाळेत टाकलं. तेव्हा सपकाळ टाकलं नाही. अंबावडेकर लिहिलं. त्याचं कारण होतं, त्यांचं अंबावडे गावाला राहाणं. तसं पाहिल्यास सपकाळ हे आडनाव न टाकण्याचं कारणही तेच होतं, भेदभाव. सपकाळ हे नाव महार जातीतच त्यावेळेस अस्तित्वात होतं. इतर जातीत नाही. त्यामुळंच स्पष्टपणे महार जात ओळखू येईल व आपल्याही मुलासोबत शिक्षण शिकत असतांना भेदभावच होईल. हाच हेतू मनात गृहीत धरुन रामजींनी आपल्या मुलाचं नाव अंबावडेकर शाळेत टाकलं होतं. अर्थात जे आंबेडकर नावाच्या शिक्षकांना वाटलं. तेच रामजींनाही वाटलं होतं. म्हणूनच जसं रामजींना आंबेडकर नावाच्या शिक्षकानं सुचना केली. त्यावर रामजीनं लगेच होकार दिला व ठरलं. आजपासून आपण आपल्या मुलाचं नाव आंबेडकर उच्चारायचं.
         डॉक्टर बाबासाहेबांचं खरं नाव सपकाळ. शाळेत प्रवेश घेतांना त्या नावाचं रुपांतरण अंबावडेकर झालं आणि पुढं आंबेडकर. त्यातच ते शिक्षण शिकत गेले. मोठमोठ्या पदव्या मिळवत गेले. त्यांना आंबेडकर जरी नाव मिळालं असलं तरी काही ठिकाणी भेदभाव व अस्पृश्यतेचा सामना करावाच लागला. तरीही त्यावर ते मात करुन शिकले व त्यांनी संविधान लिहून आपल्या कार्यकर्तृत्वाची प्रचीती देशालाच नाही तर जगाला दिली.
         आज वर्गखोल्यात तेच घडते. काही काही वर्गखोल्यात आजही अस्पृश्यांची, मुस्लिमांची मुलं शिकतात. काही गरीबांची तर काही धनिकांचीही मुलं शिकतात. ज्यातून कधीकधी वर्गातच भेदभावात्मक वातावरण निर्मिती होते. तो गरीब, मी श्रीमंत अशी भावना कधीकधी विद्यार्थ्यात तयार होते. त्यातच मी हिंदू, तो मुस्लिम अशीही भावना कधीकधी विद्यार्थ्यात तयार होते. मग वाद निर्माण होतो कधीकधी त्याच गोष्टीवरुन वर्गात. अशावेळेस शिक्षकांची भुमिका अगदी मोलाची असते. तसं पाहिल्यास त्यावर उपाय म्हणून शासनानं शाळेला एकच ड्रेसकोड दिलेला आहे. मग तो विद्यार्थी गरीब असेल तरी त्याला तोच पोशाख आणि श्रीमंत असेल तरी तोच पोशाख. तो विद्यार्थी मुस्लिम असेल तरी तोच पोशाख आणि हिंदूही असेल तरी तोच पोशाख. परंतु कधीकधी जहराची भाषा विद्यार्थ्यात वृद्धींगत होते, हे बहुतेक त्यांच्या त्यांच्या घरच्या वातावरणानं. घरी जर पालक हिंदूंच्या जनजागृतीबाबत बोलत असतील तर विद्यार्थीही वर्गात हिंदूंच्या जनजागृतीवर बोलतात. ज्यातून इतर मुस्लिम विद्यार्थ्यात त्वेषाची भावना तयार होते. तसेच घरी जर हम पाकिस्तान का झेंडा फहराएंगे असं बोलत असतील तर साहजिकच ती मुलंही वर्गात तीच भाषा बोलतात. ज्यातून सामाजिक द्वेष वाढतो. परंतु ते बालवय असतं व त्या वयात आपण काय बोलतो आहोत. हे समजायला मार्ग नसतो. परंतु तेच बोलता बोलता जेव्हा वय वाढतं. तेव्हा मात्र भाषाच नाही तर स्वभावही बदलते. अर्थात जिथं दिवाळी असते. त्या ठिकाणी साहजीकच होळी तयार होते. म्हणूनच शिक्षकांनी संयम राखत वर्गातून दुर्योधन, दुःशासन घडवू नये तर युधीष्ठीर, अर्जून व भीम घडवावेत. तसंच द्रोणाचार्यासारखं वागून एकलव्याचा अधिकारही मोडू नये. यात शंका नाही.
          शिला व मंगेशला असणारी समाजाची जाण. ते बाबासाहेबांनी केलेलं कार्य. आज ते कार्य लोकं विसरले होते. बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या संविधानाचा वापर करीत होते. उपभोगही घेत होते संविधानाचा. परंतु ते बाबासाहेबांना मानत नव्हते. तसं पाहिल्यास आता पाश्चिमात्य लोकं देशात येवू लागले होते.
          पाश्चिमात्यांच्या संगतीत आलेला समाज. त्याचबरोबर पुर्वीचा विटाळ मानणारा समाज. आज विटाळ नव्हता, पाश्चिमात्य लोकांच्या संपर्कात आल्यानं. अंतर्मनात होता थोडासा. परंतु तोही जाणारच होता. आता लोकं ज्यांनी विटाळ निर्माण केला होता. त्याच लोकांच्या घरी जावू लागले होते व त्यांनाही आपल्या घरी येवू देत होते. त्यांच्या हातानं घरातील पुजा अर्चना करु लागले होते.
          विटाळ ज्यांनी कोणी निर्माण केला होता. ती पिढी मरण पावली होती. ज्यांनी शोषला होता विटाळ. तिही पिढी मरण पावली होती. पाश्चिमात्याच्या संपर्कात येवून सर्व समाज सुधरला होता. त्याचबरोबर सुधारली होती अस्पृश्य जातही. ज्या जातीत महार, चांभार, मांग, मेहतर, खाटीक या सर्वच जातीचा समावेश होता. एक महार जात जर सोडली तर बाकी सर्वच जाती या हिंदू होत्या व महार जातीनं बाबासाहेबांच्या १९५६ च्या धम्मचक्रपरीवर्तनानुसार बौद्ध धम्म घेतला होता. काही चांभारही बौद्ध बनले होते. परंतु एक संपुर्ण महार जात सोडली तर इतर तत्सम जातींनी बौद्ध धम्म घेतला नव्हता. आता अस्पृश्य समाजाचेही विवाहसोहळे होत. ज्यात सत्यनारायण घातल्या जात होता. तशी आज बिरादरी सुधरली होती अस्पृश्यांची. त्यातच अस्पृश्य असलेल्या पण बौद्ध धम्म न घेतलेल्या लोकांच्या घरी विवाहसोहळ्यात सत्यनारायण घालायला ब्राह्मण येत. सत्यनारायण करुन जात. अन् तसे सत्यनारायण करुन गेल्यावर त्यांना तोच समाज शिव्याही हासडत होता. तसाच बहुजन समाज. तोही समाज सत्यनारायण घालण्यासाठी ब्राम्हण समाजाला बोलवायचा आणि सत्यनारायण घालून झाल्यावर जास्त दक्षिणा घेतली म्हणून ओरडायचा. 
          मंगेशला त्याच गोष्टीचा राग यायचा. वाटायचं की आपण ज्या ब्राम्हण समाजाला शिव्या देतो. त्या ब्राम्हण समाजाच्या हातानं मग पुजा कशाला करुन घ्यायची? ना रहेगा बास आणि ना बजेगी बासरी.
            विटाळाचा तो कालचक्र. विटाळ मिटावा अंतर्मनातून अशी त्याची भावना. विचारांती तो लोकांना सांगू लागला,
            'ज्या ब्राम्हणाच्या पिढीनं आपल्यावर अत्याचार केले. त्या अत्याचारात आजच्या ब्राह्मण समाजाचा कोणता दोष? आजचे ब्राम्हण चांगलेच आहेत की जे आपल्या घरी येतात. आपल्या हातचं खातात. भेदभाव वा विटाळ मानत नाहीत. त्यातच आपणही त्यांच्या घरी जातो. त्यांच्या हातचं खातो. तेही चांगलं राजरोषपणे पलंगावर बसून. आता भेदभाव तो समाज करतांना दिसत नाही. मग आपण ब्राम्हण समाजाला शिव्या का द्याव्यात?
           विटाळ मिटायला हवा. वरवर जरी मिटला असेल तरी अंतर्मनातून मिटायला हवा. त्यांच्या अंतर्मनातून नाही तर आपल्याही अंतर्मनातून मिटायला हवा. तसा विटाळ मिटूही शकतो अंतर्मनातून. परंतु आपणच तसे वागत नाही. आपण विटाळ मिटविण्याचा प्रयत्नच करीत नाही. आपणच आपल्या मनात भेदभाव करीत असतो. मग विटाळ कसा मिटू शकेल. एकमेकांच्या निंदा नालस्तीनं विटाळही टिकून आहे आजही. आपण त्यांच्याचकडून पुजा करवून घेतो आणि त्यांच्या पाठीमागं त्यांना शिव्याही हासडतो. मग ते आपल्याला शिव्या हासडणार नाहीत तर गोष्ट कसली? आपण त्यांना उणं तुणं बोलतो. म्हणूनच तेही बोलतातच. त्यात त्यांचं काय चुकतं? होय, आपल्या पुर्वजांना त्यांनी त्रासच दिला. महाभयंकर शोषण केलं. परंतु आज ना शोषणारे राहिलेत. ना शोषण करणारे. सगळे मातीत गोळा झाले. मग आता आपण विटाळ का मानावा आणि का त्यांना अंतर्मनातून पाठीमागं शिव्या हासडाव्यात? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विटाळ मिटवला. परंतु तो विटाळ मिटवीत असतांना त्यांना ब्राम्हण समाजानंच सहकार्य केलं. तसंच त्यांना क्षत्रीय समाजानंही सहकार्य केलं. कोल्हापूरचे शाहू महाराज हे काही महार नव्हतेच, ना बापूसाहेब सहस्रबुद्धे महार होते, ना बाबासाहेबांना आंबेडकर नाव देणारे आंबेडकर गुरुजी महार होते. छत्रपती शाहू महाराजांनी शिष्यवृत्ती जाहीर केली बाबासाहेबांना. म्हणूनच ते विलायतला शिक्षणासाठी जावू शकले व उच्च शिक्षण घेवू शकले. बापूसाहेब सहस्रबुद्धे हेही दहन समीतीचे अध्यक्ष होते की ज्यांच्या नेतृत्वात मनुस्मृती, भाला, संग्रामचं दहन झालं. एवढंच नाही तर बाबासाहेबांबद्दल शाळेत विटाळ वाटू नये, त्यांना पुढेही शिकता यावं म्हणून आंबेडकर गुरुजींनी आपलं आडनाव बाबासाहेबांना दिलं. बाबासाहेबांनी जेव्हा चवदार तळ्याचा सत्याग्रह केला, तेव्हा बरेच आपल्या समाजाव्यतिरीक्त लोकं बाबासाहेबांच्या मदतीला होते. एव्हाना खटला लढत असतांनाही. म्हणूनच चवदार तळ्याचं आंदोलन यशस्वी करता आलं व पाणी मुक्त करता आलं. हे विसरुन चालत नाही. आज आपल्याला आपल्या व्यतिरिक्त इतर समाज मदत करीत नाही. कारण आपलं वागणं. आपण जसं ब्राम्हणांना शिव्या हासडतो. तशाच शिव्या ओबीसी वर्गालाही देतो. म्हणूनच आपल्याला बाबासाहेबांचे पुतळेही उभारायला मनाई करण्यात येते. बाबासाहेब आपले आदर्श आहेत. ज्या देवादिकांनी आपले शोषण थांबवलं नाही, एवढी त्यांची पुजापाठ आपला समाज करीत होता तरी. ते एका बाबासाहेब नावाच्या व्यक्तीनं थांबवलं. इतर समाजाचा विरोध असतांनाही.
          ज्या ब्राम्हण समाजाला आपण शिव्या देतो आज. त्या समाजाच्या हातात पुर्वी आपल्याच पिढीनं दिली होती सृष्टी चालविण्याची सत्ता. सृष्टी चालवितांना ज्यानं अडथळा आणला, त्याला दंडीत करण्याचं प्रावधान जेव्हा तयार झालं असेल. तेव्हा आपलीच पिढी डोळ्यात बोटं घालून असेल. अन् एवढी मंडळी आली भारतात. त्यांना कधीच सुधारणा करावाश्या वाटल्या नाहीत. परंतु त्या सुधारणा बाबासाहेबांनी केल्या. तेही इतर समाजाच्या मदतीनं. एवढंच नाही तर बाबासाहेबाशी विवाह करणारी सविता. जिनं विवाह करुन बाबासाहेबांना जगवलं. ज्या सेवेतून बाबासाहेब वाचले व संविधान लिहिते झाले. आज तेच संविधान डोळ्याला दिसत आहे. ते त्यांच्या पत्नीची म्हणजे सविताची काहीशी देणच आहे. सविताही ब्राम्हणच समाजाची होती. बऱ्याचशा उच्चवर्णीय जातींनी बाबासाहेबांच्या जीवनाला घडविण्यासाठी हातभार लावला. त्यांनाही अस्पृश्यांवर होणारा विटाळाचा अत्याचार मान्य नव्हता. मग आपण त्यांना आज चांगलंच मानावं. म्हणजे त्याही समाजातील माणसं आपल्याला चांगलं मानतील. आपल्याबद्दल आपल्या अंतर्मनात विटाळ ठेवणार नाही. हं विरोधच करायचा असेल तर समाजातील वाईट गोष्टींना करा. आज पाश्चिमात्यांच्या नादी लागून जे घटस्फोट होत आहेत. त्या गोष्टी चिंताजनक आहेत. त्याचा विरोध करा.
           मंगेशचं लोकांना सांगणं. त्या गोष्टी आता हळूहळू लोकांना पटू लागल्या होत्या. आता लोकांनी आपलं लक्ष लावलं होतं, समाजात घडत असलेल्या गोष्टीकडे. ज्या गोष्टी घडू नये असंही मंगेशला वाटत होतं.
           मंगेश आज सुधारक बनला होता. त्याला समाज सुधारायचा होता. त्याला भेदभावाची दरी मिटवायची होती. वरवर न दिसणारा विटाळही मिटवायचा होता. ज्यासाठी तो समाजाला आवाहन करीत होता. लोकांना समजावून सांगत होता.
           मंगेशचं ऐकून लोकंही सुधरत होते. काही सुधारले होते व आज नवा काळ निर्माण झाला होता. जो काळ विटाळ मानत नव्हता. ना आज विटाळ कुणाच्या अंतर्मनातही होता.
        *********************८******************

           शिलाचा संसार व्यवस्थित चालला होता. कारण होतं, तिच्यावर झालेले संस्कार. तिच्यावर तिचे आईवडील गरीब असूनही चांगले संस्कार केले होते. ज्यातून तिचे आईवडील जरी बौद्ध बनले तरी त्यांनी तिच्यावर चांगलेच संस्कार केले होते. 
          डॉक्टर बाबासाहेबांच्या प्रतिज्ञा शिलाला तोंडपाठ होत्या. ज्यात मी देव मानणार नाही व चमत्काराला स्थान देणार नाही, अशी गृहितके लिहिली होती. ज्यातून शिलाच्या विचाराला दिशा मिळाली होती. ज्यातून इतरही लोकांनी दिशा घेतली होती. परंतु काही लोकं त्या गृहितकानुसार व संविधानानुसार चालत नव्हते.
          बाबासाहेबांनी बावीस प्रतिज्ञा नक्कीच घेतल्या होत्या. परंतु सोडचिठ्ठी वा घटस्फोटाला प्राधान्य दिलं नव्हतं. मंगलसुत्र हे कुचकामी आहे व ते वापरु नका, असंही सांगीतलं नव्हतं. संस्कार हे वाईट असतात. असंही कोणत्या पुस्तकात लिहिलं नव्हतं. तरीही आज लोकं घटस्फोटाला जास्त प्राधान्य देवू लागले होते. विटाळ संपला होता. परंतु आता घटस्फोटाचे प्रमाण वाढले होते. जो तो करारानुसार विवाह करीत होता. असं चित्र दिसत होतं. त्यातच त्या लोकांवर चित्रपटाचा आणि पाश्चिमात्य संस्कृतीचा बराच प्रभाव पडत चालला होता.
          शिला आणि मंगेशसमोर सुधारक म्हणून हीच बाब चिंतेची वाटत होती. वाटत होतं की लोकांचे घटस्फोट होवू नये. लोकांचा संसार चांगला चालावा. परंतु बाबासाहेबांनी सांगीतल्यानुसार आजच्या काळात चमत्कार नाही व आपला बौद्ध धम्म चमत्काराला स्थान देत नाही. पुर्वी बरं होतं की लोकं चमत्कार मानायचे. लोकं रुढीवादी होते व लोकं रुढी, परंपरा मानायचे. ज्यातून घटस्फोटाचे प्रमाण जास्त नव्हते. लोकांना वाटायचं की आपण फारकत घेतल्यास आपलं देव अहित करतो. पतीला देव मानायचे व त्याचा कोप होवू नये म्हणून पत्नी त्याचेजवळच आयुष्यभर राहायची. परंतु आजचा काळ पाहता त्या गोष्टी आज घडत नाही. बाबासाहेबांनी घेतलेल्या बावीस प्रतिज्ञेनुसार देव नाही व देवाचं अस्तित्व बाबासाहेबांनी बावीस प्रतिज्ञेत नाकारल्यानं काही लोक देव मानत नव्हते. त्यातच पतीला आजच्या काळात परमेश्वर मानत नव्हते. त्याचा परिणाम समाजावर झाला होता व समाजानं विवाहातही कराराचं स्वरूप आणलं होतं. ज्याची पुष्टी चित्रपट निर्माते करु लागले होते. चित्रपट निर्मात्यांचं ठीक होतं. कारण त्यांना पैसा मिळत होता. 
            ते विचार व त्याच विचारातून घडून येणारी फारकत. हा चिंतेचा विचार होता शिला आणि मंगेशच्या जोडीसमोर. बिचाऱ्यांनी मंगळसुत्राच्या एक तुटणाऱ्या धाग्याला पवित्र मानून एकमेकांशी मनं जुळवली होती. आजही ते घटस्फोटाच्या विरोधात होतेच. कधीकाळी त्यांचीही भांडणं होत. परंतु त्या भांडणात ज्याची ताकद वाढली, तो बोलत असे. दुसरा घटक चूप राहात असे. जेव्हा राग निवळत असे. तेव्हा मात्र ते बोलत असत.
           शिला व मंगेशला वाटणारी लोकांच्या घटस्फोटाची चिंता. आज तीच चिंता त्यांच्या मनाची लेखणी बनली होती. ते दोघंही जण फारकतीच्याच विषयावर लोकांना समजावीत असत. म्हणत असत की मंगळसुत्र जपा. मंगळसुत्रात ताकद आहे. परंतु ते त्यांचं ऐकणारी मंडळी बाबासाहेबांच्या बावीस प्रतिज्ञेनं उदंड झाली होती. त्यांना ना मंगलसुत्रातील ताकद समजत होती. ना मंगलसुत्राचा मान समजत होता. त्यांना वाटत होतं की मंगलसुत्रात ताकद आहे म्हणणं एक प्रकारचा चमत्कार आहे. जो चमत्कार मानू नये असं बाबासाहेबांनीच सांगीतलंय.
        घटस्फोट? मंगळसुत्र कमजोर पडत आहे की काय? शिला व मंगेशला वाटणारी चिंता. ती चिंतेचीच बाब होती. कारण विवाह तुटल्यावर जी लहान मुलांची आबाळ व्हायची. ती आबाळ पाहण्यासारखी असायची. मुलांना आईवडील दोघंही लागायचे. तसंच दोघांचही प्रेम त्यांना हवंहवसं वाटायचं. 
           ती मुलांची होत असलेली आबाळ. त्यातच त्यांना मिळत नसलेलं प्रेम. मात्र त्या मुलांना आपल्या आईवडिलांच्या फारकतीच्या सुखापुढं त्यांचं वय लहान असल्यानं भावना दडपून राहावं लागायचं. त्याच गोष्टी शिला व मंगेशला आवडत नव्हत्या. वाटायचं की बाबासाहेबांनी जरी बावीस प्रतिज्ञा सांगीतल्या असतील लोकांना. सांगीतलं असेल की चमत्कार नाही. याचा अर्थ असा नाही की कशाही करुन फारकती करायचं सांगीतलं. विवाह केल्यानंतर तो विवाह टिकायलाच हवा आणि प्रत्येक नवयुगलानं तो विवाह टिकवायलाच हवा. त्याला कराराचं रुपडं देवू नये कोणी. जर त्याला कराराचं रुपडं कोणाला आणावसं वाटत असेल तर विवाहच करु नये. फारकत करणं चांगली गोष्ट आहे, जर एकमेकांचं विवाहानंतर पटत नसेल तर. परंतु त्यात मुलांचा कोणता दोष असतो.
           मंगेश आणि शिला कधीकधी तोच विचार करत असत. त्यांनाही समजत नसे की ह्या फारकती कशा थांबवता येतील. परंतु त्यावर त्यांना कोणताच उपाय सुचत नव्हता. 
            एक दिवस मंगेश व शिला पेपर वाचन करत बसले होते. अशातच एक बातमी शिलाच्या नजरेखालून गेली. फारकत झाल्यानं पतीनं आत्महत्या केली होती. त्याला फारकतीचं दुःख सहन झालं नव्हतं. अशातच ती मंगेशला म्हणाली,
           "मंगेश, फारकतीचं दुःख सहन न झाल्यानं एका पतीनं बघ कशी आत्महत्या केलीय ते. बिचाऱ्याला पत्नी फार आवडत असेल."
            "होय न गं. परंतु ते सांगणार कसं तिला?"
            "अन् मुलंही घेवून गेली होती ती. असंही लिहून आलंय."
            "होय ना. दोष पतीचा नसेलच त्यात. शिवाय मुलं तर ती घेवून गेलीच असेल, परंतु त्या मुलांचा आणि तिच्या उदरनिर्वाहाचा खर्चही तिनं मागितला असेल. बिचारा पती."
             "होय, तेही लिहिलेलं आहेच. परंतु मला कळत नाही की हे तुला कसं माहीत?"
             "अगं मला सगळंच माहीत आहे त्यातील. समाजात असंच घडत असतं वारंवार. अशा कितीतरी आत्महत्या घडल्यात. तरीही लोकांना अक्कल आलेली नाही. आजही घडत आहेत याच गोष्टीवरुन आत्महत्या. माहीत नाही लोकांना केव्हा अक्कल येते तर. केवळ आत्महत्याच करीत सुटले."
             "आजचा काळ पाहिल्यास लवकरात लवकर फारकती होतात. आजकालचे विवाह टिकत नाहीत. म्हणतात की मंगळसुत्रात ताकद असते. परंतु मंगळसुत्र कमजोर पडत चालले आहे. जे प्राचीन काळापासून सशक्त स्वरुपाचं होतं. कालच्या प्राचीन काळातील स्रियांनी मंगळसुत्राच्या ताकदीच्या भरवशावर प्रसंगी पती चित्तेवर सतीपण भोगलं. परंतु मंगळसुत्राची अब्रू जावू दिली नाही. ती ताकद आहे मंगळसुत्रात. ती ताकद मंगळसुत्र वापरलेल्या महिलाच जाणू शकतात. आजही ती ताकद आहे. परंतु ज्याला समजतं त्याचं महत्वपण. त्यालाच मंगलसुत्राची ताकद कळत असते. इतरांना नाही. कारण विवाहाचे उलट फेरे मारायचे झाल्यास मारताच येत नाही."
            "हो ते बरोबर आहे. परंतु बाबासाहेबांनी ज्या बावीस प्रतिज्ञा घेतल्या, त्यानुसार मंगळसुत्रात ताकद दिसत नाही ना. मग कसे टिकतील विवाह?"
            "अहो, मंगेशराव, काही चित्रपटं ही विरगुळा व्हावा, म्हणून निर्माण होतात. ज्यात विनोद असतो. काही चित्रपटं ही बोधात्मकच असतात. असा काही बोध देवून जातात की तो चित्रपट पाहिल्यानंतर चिरकाल स्मरणात राहतो तो चित्रपट. एक चित्रपट असाच आला होता. घटस्फोटाबाबतच होता. ज्यात मुलानं मुलीला घटस्फोट म्हणताच तिला राग आला व ती न रागवता त्याला म्हणाली की ज्याप्रमाणे आपण विवाह केला व गाजावाजा केला की आमचा विवाह होतोय. फेरेही मारले की आम्ही विवाह करुन जन्मोजन्मीचे साथीदार बनतो. तीच विधी आता फारकत घेतांना करावी. पत्रिका छापाव्यात. सर्वांना वाटाव्यात व ज्याप्रमाणे विवाह होतो वा केल्या जातो. तसंच घडवावं. मात्र विवाहाचे फेरे उलटे मारावेत आणि घेतलेली वचनं एक एक करत तोडावीत. म्हणजे फारकतही माहीत होईल लोकांना. तिनं तसंच केलं. ज्यातून त्या पती असलेल्या पुरुषांची नाचक्की चित्रपटाच्या माध्यमातून जगाला दिसली. परंतु तो चित्रपट होता. खऱ्या जीवनात तसं घडत नाही. कारण भीती असते बदनामीची."
          "होय, तेही बरोबर आहे आणि तसंच व्हावं. परंतु तरीही आपली पिढी कधीच सुधारणार नाही. राहिली बदनामी. फारकतीनं बदनामीही होते. परंतु लोकं निर्लज्जच बनलेले. लोकं बेशरमासारखे वागतात. त्याकडे लक्ष देत नाहीतच."
           "शिला, प्राचीन काळात मंगलसुत्रात ताकद होती. तशी ताकद आजच्या काळात मंगळसुत्रात राहिलेली नाही. कारण महिला या मंगळसुत्र बांधून घेतांना त्याच्याकडे गंमतीनं पाहतात. एक चित्रपट असतो तसा. शिवाय विवाह झाल्यानंतरही पतीवर प्रेम न करता व त्याला पती न मानता केवळ व्याभिचार करीत फिरत असतात. ते विवाहाला गंमतच समजतात. ज्यातून विवाह तुटतात. आजचे विवाह हे गंमत, मनोरंजन म्हणून होत असतात, असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. केवळ विवाहानंतर मनोरंजन आणि विरंगुळा यालाच जास्त प्राधान्य दिलं जातं आज. संसाराला वा संसार करण्याला महत्व दिलं जात नाही."
          "खरंच आजचेही विवाह हे मनोरंजन व विरंगुळेच करण्यासाठी असावेत काय? खरंच आजच्या मंगळसुत्रात पुर्वीसारखी ताकद नाही काय? खरंच मंगळसुत्राचा धागा पुर्वी जसा चमत्कार करीत होता. तसा चमत्कार आज करीत नाही काय? पुर्वीची मंडळी एवढी अज्ञानी होती काय की ते मंगळसुत्राचा मान राखत होती? अनेक प्रश्न आज निर्माण झाले आहेत व न्यायालयात फारकतीच्या वाढत्या प्रमाणातील खटल्यानुसार ही बाब एक चिंतेची बाब ठरत चाललेली आहे. त्यातच खरंच विवाह तुटावे काय? विवाह करतांना बांधण्यात येणारा धागा हा कुचकामी ठरावा काय? भारतात राहणाऱ्या मुलीनं मंगलसुत्राच्या धाग्याकडे गंमत म्हणूनच पाहावे काय? ती आपली परंपरा नाही काय? याचं उत्तर आजच्या काळानुसार नाही असंच येईल. विशेष म्हणजे आपण भारत देशात राहतो व आपली संस्कृती पवित्र आहे. ही संस्कृती आपल्याला कधीच वात्रट वागणं शिकवीत नाही. जरी ती रुढीवादी असली तरी. ही संस्कृती आपल्याला व्याभिचार शिकवीत नाही. जरी आपल्या देशात पाश्चिमात्य संस्कृतीनं प्रवेश केला असला तरी. परंतु असं सारखं घडत असतांना मन तुटतं. कारण काहीच उपाय निघत नाही आहे यावर."
         "हो ना. इंग्रज भारतात आले. तशी पाश्चिमात्य संस्कृती भारतात आली. त्या पाश्चिमात्य संस्कृतीनं आपल्याला स्वतंत्रता शिकवली. माणसाला माणूसपण दाखवलं. स्री ही पुरुषांची अर्धागिनी जरी असली तरी ती गुलाम नाही असंच शिकवलं. त्यातच पुरुषांनी व स्रियांनी अनेक पती केले तरी चालेल हेही शिकवलं. परंतु ज्या भारतात आपण राहतो. त्या भारतानं आपल्याला अनेक पत्नी बनविण्याची बाब शिकवली नाही. आता प्रश्न पडतो की अनेक पत्नी करणं भारतीय संस्कृतीनं शिकवलं नाही तर पुर्वीची मंडळी अनेक पत्नी का करायच्या? त्याचं उत्तर आहे युद्ध. युद्धात अनेक स्रियांचे पती मरण पावत. काही स्रिया स्वखुशीनं सती जात तर काही सती न जाता विधवेचं जीवन पत्करत. अशातच त्याही स्रिला विधवेचं आयुष्य जगावं लागू नये म्हणून तिच्याशी विवाह करुन तिला आधार देण्याची पद्धती अवलंबली गेली. याचा अर्थ स्री ही गुलाम होती, असा होत नाही."
         "होय. ते बरोबरच. तशी भारताची संस्कृती ही महान आहे. तशी पाश्चिमात्य संस्कृती नाही. तेथील वातावरण उष्ण वा दमट असल्यानं त्यांना अंगावर कपडे सहन होत नाही. शिवाय काम उत्तेजक भावना जास्त असल्यानं तेथील स्री पुरुष अनेक पती वा पत्नी करीत असतात. कारण त्यांची संस्कृतीच तशी आहे. तशा स्वरुपाची आपल्या भारत देशाची संस्कृती नाही. राहिला प्रश्न मंगळसुत्र नावाच्या धाग्याचा. जो धागा गळ्यात सहन न होताही स्रिया त्याची मर्यादा पाळून उन्हाळा, पावसाळा, हिवाळा असे तीनही ऋतू मंगळसुत्र वापरत असतात. कारण तो धागा जरी असला तरी त्याची गरिमा खुप मोठी आहे."
         "शिला, आपण ज्या भारत देशात राहतो व या देशात पुर्वीपासूनच वचनाला अतिशय महत्व आहे. आपल्या प्राचीन काळातील महापुरुषांनी प्रसंगी जीवं दिलीत, परंतु आपली वचनं मोडली नाहीत. म्हणूनच ही संस्कृती महान झालेली आहे व ठरली आहे. आपल्या भारतात विवाह हा करार नाही. कारण विवाह करतांना आपल्या भारतात शक्यतोवर मोडले जात नाही. एक सृजाण स्री विवाह हा मोडत नाही. तिला मोडताच येत नाही. जी त्या विवाहाचं पावित्र्य जाणते. भारतातील विवाहाला एका मंगळसुत्रासारख्या काळ्या धाग्यानं बांधलेलं आहे व तसं केलं असल्यानं शरीराला व मनाला एक अलौकिक शक्ती येते. ती शक्ती कधीच उध्वस्त होत नाही. खुद्द तो धागा ज्यानं बांधला. तोही त्या धाग्याला नष्ट करु शकत नाही. तो धागा जर गळ्यात असेल तर कोणत्याही प्रकारच्या वाईट शक्तीपासून आपलं संरक्षण करता येतं. शक्यतोवर विवाहीत स्रिच्यांच्या कोणीच सहजासहजी वाट्याला जात नाहीत. बराच विचार करतात नव्हे तर करावा लागतो. कारण एक विवाहित स्री दुर्गा व कालीचं रुप असते. मग असं असतांना आजच्या काळातील विवाह का तुटतात? हा प्रश्न पडतो मला."
          "हो ना मंगेश. मलाही तसाच प्रश्न पडतो. आजच्या काळातील विवाह त्यांचेच तुटतात. ज्यांना मंगळसुत्राचं पावित्र माहीत नाही. असे विवाह त्यांचेच तुटतात. ज्या स्रिया विवाहानंतर आपलं मंगळसुत्र कुठेही काढून ठेवतात. त्यातच त्या धाग्याला गंमत समजतात. परंतु हा धागा म्हणजे गंमत नाही. आज न्यायालयात घटस्फोटाचे खटले उभे राहात आहेत. विवाह करतांना वचन घेणारे व शपथा घालणारे विवाह पटकन मोडत आहेत. मात्र पुर्वी असं नव्हतं. पुर्वी मंगळसुत्र तेव्हाच तुटत होतं, जेव्हा पती मरत असे. एवढंच नाही तर एक दंतकथाही प्रचलीत आहे. सावित्रीनं आपल्या पतीनिधनानंतर आपलं मंगळसुत्र न तोडता आपल्या पतीला स्वर्गातून परत आणलं होतं. एवढी ताकद मंगलसुत्रात आहे. तरीही आजच्या घटस्फोटाचे प्रमाण वाढत आहे? तसेच न्यायालयात घटस्फोटाचे खटले मोठ्या संख्येनं दाखल होत आहेत? ही खरं तर चिंतेची बाबच आहे."
          "खरं तर मंगळसुत्रात ताकद असावीच की त्या मंगळसुत्रानं कोणत्याही स्रिच्या मनात असुया निर्माण होवू नये. मंगळसुत्रात अशी ताकद असावी की त्या मंगळसुत्रानं कधीच पती व पत्नीच्या वादाची प्रकरणं न्यायालयात जावू देवू नयेत. शिवाय अशा प्रकारचा संशय निर्माण झाल्यास त्या वादावर विरजण घालावं. थोडं शांत राहावं. विचार करावा. मगच पावलं उचलावीत. रागारागात उचललेलं पाऊल कधीही वाकडच पडत असतं. प्रत्येकच मुलामुलीनं विवाह झाल्यानंतर कधीच न्यायालयाचा दरवाजाही ठोकू नये. अन् असं वाटलं कधी वा तशी शंका मनात उत्पन्न झालीच तर त्या प्रत्येक जोडप्यानं वह सात दिन नावाचा १९८३ ला लागलेला अनिलकपूर व पद्मिनी कोल्हापूरेचा चित्रपट नक्कीच पाहावा. केवळ पाहावा असे नाही तर त्याचा भावार्थ समजून घ्यावा. म्हणजे नक्कीच घटस्फोट होणार नाही." 
           "मंगेशराव, असे बरेच प्रश्न व वाद निर्माण झालेत की काही चित्रपटांनी आपल्याच नादाला लावून घटस्फोट वाढवले. परंतु काही चित्रपट असेही बनलेत की त्या चित्रपटांनी लोकांना जगणं शिकवलं. त्यांनी घटस्फोटाला आवर घातला. आजच्या चित्रपट निर्मात्यांना जगाचं काही घेणंदेणं नाही. त्यांना फक्त कमवायचा असतो पैसा. मग पैशासाठी काहीही. ज्यात चित्रपट चालावा म्हणून मसाला भरला जातो अधिकचा. विवाह झाल्यानंतर कधीच फारकत न होता प्रेमीसोबत विवाह होवू नये. चित्रपटात तेही दाखवलं जातं. मग काय, लोकं वास्तविक जीवनातही तसंच करुन पाहात नाहीत. कधीकधी चित्रपटात प्रेमीसोबतच विवाह झालेला दाखवला जातो. पती खुद्द असे विवाह लावून देतो. मग लोकंही तसंच करु पाहतात." 
          "पुर्वी चित्रपटात कोणीच कामं करायला तयार नसायचे. चित्रपटात काम करणाऱ्या मंडळींना नावं ठेवायचे. चित्रपटात काम करणाऱ्या अभिनेत्री, अभिनेत्यांना बाजारु महिला व बाजारु पुरुष समजायचे. ज्यातून लोकांनी चित्रपटात काम करतांना आपली खरी ओळख लपवली. आपलं नाव बदलवलं. लोकांनी नाव ठेवू नये म्हणून. आज मात्र ती फॅशन झाली व आजच्या काळात कोणीही चांगल्या सुसंस्कृत घरचा का असेना, चित्रपटात काम करायला धडपड करतो. तसं पाहिल्यास घटस्फोट न होणं ही आजची गरज आहे, ज्यांना विवाहानंतर मुलं आहेत त्यांच्यासाठी. अन् ज्यांना नाही, त्यांनी आपल्या आईवडीलांकडं पाहावं. आपण तर घटस्फोट घेवून घरी बसू. परंतु जेवढे दिवस आपण घरी राहू. तेवढे दिवस आपली चिंता आपल्या मायबापांना होईल. तसं पाहिल्यास आजच्या काळात तेवढ्या वाईट प्रकारानं कोणत्याही स्रिला घरात वागवलं जात नाही. जेवढा त्रास स्रियांना पुर्वी दिला जायचा." 
           "शिला, घटस्फोट घेवू नये असं माझं म्हणणं. त्यावर लोकं म्हणतील की साहेब, मुलगा शराबी निघाला तरी. तरी घटस्फोट घेवू नये काय? म्हणतील की मुलगा निकम्मा निघाला तरी घटस्फोट घेवू नये काय? म्हणतील की मुलगा नपुंसक आहे. म्हणतील की मुलगा मारपीट करतो. हे झालं मुलीकडील लोकांचं म्हणणं. मुलांकडील लोकांचं म्हणणं याऊलट असतं. म्हणतात की मुलगी वात्रट वागते. बोलणं बरोबर नाही. आळशी आहे. कामे करीत नाही. माझ्या आईवडीलांना सांभाळत नाही. लैंगीक