Maajhiya Priyala Preet Kalena - 7 in Marathi Love Stories by Pradnya Chavan books and stories PDF | माझिया प्रियाला प्रीत कळेना - भाग 7

Featured Books
Categories
Share

माझिया प्रियाला प्रीत कळेना - भाग 7

So , I have a crush on him or not ❣️❣️



           
                   ★*  स्थळ : कृष्णकुंज ★*

वेळ : रात्री ८:३० वाजता 

मीरा अजून ही तिच्याच विश्वात होती.... तिच्या मनात खूप प्रश्न निर्माण झाले होते... तो प्रियाचा भाऊ आहे, म्हणजे तिचा ही भाऊच अशा नजरेने तिने त्याला पाहायला हवे.... पण मन मात्र त्याला भाऊ मानायला तयार नव्हते.... 
तिने आपली डायरी काढली ज्यात ती आपला दिनक्रम लिहायची ... पण आज पहिल्यांदा तिने त्यात मनात येणाऱ्या या चार ओळी लिहिल्या....

पाहिले तुला अन् मी माझी न राहिले ,
कुठल्या जन्मीचे ऋनानुबंध आपुले ....
मन माझे का तुझ्यात गुंतले,
जणू आपुल्या शतजन्माच्या गाठी भेटी....
इथे मी का अशी व्याकूळ झाले तुझ्या एका नजरे साठी.... 🩷🩷🩷


कोणाला तरी फोन करून आपल्या शंकाच निरसन करावं असं तिला वाटतं होत... मनात एकच नाव आल तिचा दादा आदित्य.... त्यालाच कॉल करायला हवा पण बोलणार कसं सांगायचं कसं हा विचार ती करू लागली .... मनात काहीतरी विचार करून मग तिने 
फोन लावला....

मीरा : हॅलो दादा !!! 

आदित्य: हाय , मीरा.... कशी आठवण झाली माझी ???

मीरा : मला तुझी रोजचं आठवण येते... तूला काय माझी आठवण येत नाही,  म्हटल आपणच फोन करावा ...

आदित्य : बोल ना.... काय झालं 

मीरा : नाही ते असच कॉल केला होता.... तुला एक विचारायचं होतं.... 

आदित्य : विचारणा काय आडेवेडे घेत आहेस....

मीरा : ह्ममम.... दादा मला एक सांग , तुला  कधी कोणाला पाहून हार्ट बीट एकदम फास्ट झाल्यात.... का अस होत एकदम सांग ना.... (तिने जरा कचरत च त्याला प्रश्न विचारला...)

आदित्यला हे ऐकून थोडा शॉक लागला ,  त्याला खूप हसायला आल...  ती ज्या वयात होती , त्या वयात कोणा विषयी तरी आकर्षण वाटणं स्वाभाविक होतं.... शरीरात हार्मोन्स मुळे होणारे बदल त्याचाच हा परिणाम होता....
सोळावं वरीस धोक्याच.... असं म्हणतात ते उगीच नाही... आदित्यला ही हे कळत होत... तीच्या मनात प्रश्न निर्माण झाला... त्या प्रश्नच उत्तर मिळवण्यासाठी तिने त्याला कॉल केला... याचा त्याला आनंद झाला होता .... 


आदित्य : का तू अस काही फिल केलेस का  कुणासाठी.... (त्याचा प्रश्न तिला काय उत्तर द्यावं कळणा )

मीरा : मी नाही तर .... ते माझी एक मैत्रीण आहे तिला अस काही तरी फिल झालय... तिने मला विचारलं पण मला कधी असं काही फिल झाल नाही ....

आदित्य : हा हा .... तिला सांग मग या वयात आपल्या शरीरात काही बदल होत असतात त्यामुळे आपल्याला आपल्या opposite gender असणाऱ्या व्यक्ती विषयी मनात attraction फिल होत .... बाकी काही नाही.... हे attraction काही काळात जसं होत तस लवकर जात ही .... त्यामुळे त्या गोष्टीला जास्त व्हॅल्यू द्यायची नाही .... नाहीतर नंतर त्याचा तिलाच त्रास होऊ शकतो... अस सांग .... ते प्रेम तर मुळीच नसत... हे ही सांग तुझ्या मैत्रिणीला...

मीरा : ओके दादा... मी सांगेन तिला don't worry !!! 

आदित्य : ठीक आहे... बाकी स्टडी सुरू केलास की नाही... यावर्षी दहावी आहे लक्षात असुदे... अभ्यासावर लक्ष केंद्रित कर .... या वर्षी तू मेरिट लिस्टमध्ये यायला हवी आहेस मला ....

मीरा : हो रे दादा .... या वर्षी मी खूप अभ्यास करणार आहे...  शाळेत पहिली नाही आले ना तर मीरा वेदांत कुलकर्णी नाव नाही लावणार ... ती एका ठसकेबाज आवाजात म्हणाली....


आदित्य : hmm ... ते तुझा रिझल्ट लागला की कळेल ह...  बर ते जाऊ दे तू जेवलीस का ????

मीरा : नाही अजून .... तू जेवलास का???

आदित्य : आता माझ्या मेस ची वेळ झाली ...आता जेवणार....

मीरा : बर... Bye bye.... Take care ☺️☺️☺️


आदित्य: bye bye... Take care... See you soon ❤️ ❤️ ❤️ 


त्याच्याशी बोलल्यावर तिला जरा बरं वाटलं.... त्याने तिला नीट समजावलं होत....  ती फोन ठेऊन जेवायला गेली....  तिच्या मनात उद्भवणाऱ्या प्रश्नांना तिने तिथेच फुल्ल स्टॉप दिला .... 


दुसरा दिवस :- स्थळ : मृगजळ 

सकाळी घरातले सर्व जण हॉल मध्ये बसले होते.... विषय काय तर अनुरागच लग्न....


आई : अनु आता तुला तुझ सर्व मार्गी लावले आहे तर या वर्षी तुझ लग्न लावून माझी सून घरात आन .... 

प्रिया : ए दादा लग्न .... मी तर खूप नटनार बाबा ....

काकी : मी तर महागातली महाग साडी नेसून मिरवणार आहे....

लग्नाचा पत्ता नाही आणि घरातलं महिला मंडळ अनुच्या लग्नाच्या मांडवात पोहचलं होत....😁😁😁


अनुराग : प्लिज तुम्ही आत्तापासूनच माझ्या लग्नाचं माझ्या मागे लागू नका... मला नाही करायच ज्यावेळी मला करायचं असेल मी तेव्हा स्वतः सांगेल .... 

प्रीतम : हो... आणि हे काय दादा च वय आहे का लग्नाचं आता कुठे त्याचं शिक्षण संपून जॉब लागला आहे त्यामुळं त्याला जरा २-३ वर्षे बॅचलर सारखं आयुष्य एन्जॉय करू दे ..
( तो म्हणाला , आणि तिकडे फोन मध्ये डोकं घालून बसलेली ऐश्वर्या हे ऐकून सुखावली....)

अनुचे बाबा : अगदी बरोबर.... नीलम तुला त्याच्या लग्नाची घाई आहे का ??? इतकी घाई बरे नव्हे....
त्याला जरा त्याच्या आयुष्यात स्पेस द्यायला हवी... आयुष्य एन्जॉय करायला हवं...

आई : मी कुठे त्याला म्हणतेय उद्याच्या उद्या लग्न कर.... तुम्हाला सांगून ठेवते मी अनूच्या लग्नाचा विषय काढणार मला कोणी काही बोलायचं नाही.....

बाबा : बरं बरं .... ठीक आहे बाई...


अनुराग : मी आज ऑफिस वेअर घेण्यासाठी बाहेर जाणार आहे.... 

प्रीतम : दादा मी पण येणार तुझ्या सोबत ....


आई : जा तुम्ही चौघे शॉपिंगला काय हवं ते खरेदी करा.. ऐशु तू ही जा आणि तुला हवे ते कपडे खरेदी कर....

ऐश्वर्या : ठीक आहे.... थॅन्क्स आत्या...

नीलम: त्यात थॅन्क्स म्हणायचं काय .... तू ही जा मस्त एन्जॉय करा सर्वजण....

अनुराग : hmm... आवरा रे ५ मिनिटात आपण जाउया...

प्रिया : त्यात काय आवरायचं चल आता जाऊया ....


प्रीतम : ये जरा धीर धर.... मला आवरायचं आहे मी शॉर्टस् आणि टी-शर्ट वरती आहे ....


प्रीतम ,अनुराग , ऐश्वर्या आणि प्रिया त्यांच्या रूम मध्ये जाऊन कपडे खाली येतात ...... प्रीतम त्याची कार बाहेर काढतो .... त्यात हे चौघे बसून कपडे खरेदी साठी बाहेर निघतात...


                        ♦कृष्णकुंज ♦


मिराने अनुराग चे करिअर विषयी त्याने जे तिला सांगितलं ते तिला ही पटलं होत... शिवाय घरच्यांना सुद्धा तिचा अभिमान वाटावा अस काहीतरी करायची ती एक संधी च होती ... तिला तिचं १००% देवून पहाचे होते.... म्हणून ती सकाळी उठून नाष्टा करून अभ्यासाला बसली होती...


"मीरा तू खरच अभ्यास करत आहेस... का??? की मला स्वप्न पडलंय... तिच्या आईला विश्र्वासच बसत नव्हता की ती स्वतःहून अभ्यास करत आहे...

मीरा : आई काय ग... मी आज स्वतः हुन अगदी मनापासून अभ्यास करत आहे आणि तुला विश्वास बसत नाहीये.... 

आई : कसा बसेल विश्वास .... तू कधी आज वर मी सांगितल्या शिवाय अभ्यास केला नाहीस....  कुठून तुझ्या डोक्यात अचानक प्रकाश पडला ग ....

(तस मीराला अनुराग च बोलण आठवत....)

मीरा : पण आता मी ठरवल आहे... मी चांगला अभ्यास करणार आणि चांगले मार्क्स पडणार....


तितक्यात मीराचे बाबा ही तिच्या रूम मध्ये येतात....
तिला अस अभ्यास करताना पाहून ते तिच्या आईला बोलतात -

बाबा : तू मला म्हणायची ना की मीरा जरा स्वतःहून अभ्यास करत जा... आता माझी लेक करतिये अभ्यास तरीही तुला विश्वास बसत नाही....

आई : अहो... तस नाही मला आनंद च आहे... आज माझं बाळ स्वतः हुन अभ्यास करत आहे....

मीरा : मी तुम्हाला प्रॉमिस करते की मी 10th मध्ये चांगला अभ्यास करेन... आणि तुम्हाला proud feel करेन.. 

बाबा : तू नक्कीचं करशील मला विश्वास आहे तुझ्यावर.. 

आई : बर आता तू अभ्यास कर आम्ही तुला डिस्टर्ब करणार नाही.... चला हो आपल्याला पण जायचं आहे hospital ला ..... Bye bye mira .... Take care ☺️ 

असं म्हणत ते रूमच्या बाहेर येतात.....


पुढं काय होणार हे पाहण्यासाठी वाचत रहा माझिया प्रियाला प्रीत कळेना.....💞💞💞

कथेचा भाग आवडल्यास कमेंट्स आणि रेटिंग द्यायला विसरू नका.... 






.


.

Bye bye stay tuned ❤️ ❤️ ❤️