✨ मी जय शिवराय मित्र मंडळ ✨
छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पवित्र पावन भूमीत तुम्ही नेहमीच मला त्यांची आठवण होत राहील व त्यांच्याच प्रमाणे माझ्यातही जिद्द आणि विशेष गुण येतील असे मला नाव दिलात (जय शिवराय मित्र मंडळ) म्हणून मी प्रथम तुमचा सर्व ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा आभारी आहे...🙏
मी जय शिवराय मित्र मंडळ बोलतोय...
माझा शुभारंभ 1989 साली झाला. सुरुवातीचे माझे दिवस खूप साधे-सुधे आणि हालअपेष्टेमध्ये गेले. हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच कार्यकर्ते माझ्यासोबत होते. त्यांच्या सोबतीला होती ती फक्त त्यांची महत्त्वाकांक्षा. माझा जन्म झाला त्या काळात माझ्याकडे माझे कार्यकर्ते सोडले तरी फारसे कोणाचे लक्ष नव्हते. ही चार टाळकी काय उजेड पाडणार एक दोन वर्ष मंडळ घालतील पुन्हा बंद करतील असाच कदाचित सर्वांचा विचार असावा. पण माझ्या कार्यकर्त्यांनी मात्र अपार कष्ट सहन करून, स्वतःला झिजवून मला लहानाचं मोठं केलं आणि आज या वर्षी 2025 पर्यंत आणून ठेवलं.
माझ्या जुन्या कार्यकर्त्यांची थोरली पिढी, त्यांची पुढची पिढी आजही माझ्यासोबत आहे याचा मला अभिमान आहे. वर्ष 1989 ते वर्ष 2025 अशी ही 36 वर्षे कशी गेली मला कळलंच नाही. कार्यकर्त्यांनी माझ्यावर जेवढं प्रेम केलं, त्यामध्येच वेळ कसा उडून गेला हे मला जाणवलंही नाही. खरंच, मी खूप भाग्यवान आहे की माझ्यासोबत माझ्यावर जीव लावणारे इतके कार्यकर्ते आहेत.
मी जय शिवराय मित्र मंडळ... कधीकाळी फक्त चार पायांवर उभा होतो. आज माझे ते चार पाय कसे चौपट झालेत हे मलाही कळलं नाही. माझ्या लहानपणी माझे कार्यकर्ते प्रसंगी पोटाला चिमटा काढून माझ्यासोबत उभे राहिले. पडणाऱ्या पावसात माझा गणेश बाप्पा भिजू नये म्हणून डोक्यावर बुट्टी घेऊनही उभे राहिलेत हे मी कधीच विसरणार नाही. त्याकाळी प्रत्येकजण आपआपल्या परीने यथा शक्ती मला आर्थिक आणि वस्तू रुपात देणगी देत असत .. स्वतः चार चार भोक पडलेली चड्डी सदरा घालत पण माझ्या व बाप्पाच्या सेवेत कसलाही कसर ठेवत नसत. आणि म्हणूनच जे मला व गणपती बाप्पाला मनापासून मानतात त्यांना मी मागितलेल्या इच्छेनुसार आशीर्वादरूप फळ मी देत आलो आहे.
११ इंचांच्या गणपतीपासून 21 फुटांच्या गणपतीपर्यंत पोहोचलेला माझा प्रवास हेच त्याचं जिवंत उदाहरण आहे. आणि हा प्रवास शक्य झाला तो तुमच्यासारख्या कट्टर, जिवलग कार्यकर्त्यांमुळेच बरं का...
मुलांनो, माझ्यासाठी मूर्तीची उंची नाही तर तुमच्यातली एकी जिद्द महत्वकांक्षा काम पूर्ण करण्याचा अट्टाहास हाच खरा माझा अभिमान आहे. माझ्या घरात गणपती बाप्पा काय 11 इंचाचा असो किंवा 21 फुटांचा – पण तुम्ही सगळे एकत्र राहिलात, एवढे उन्हाळे पावसाळे आले आणि गेले पण कधी डगमळला नाही.. नेहमी विजयाचा झेंडा फडकवतच ठेवलात तुम्ही यापेक्षा मला दुसरा आनंदच नाही.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या रक्षणासाठी तलवार हाती घेतली व ती लढाई शेवटपर्यंत नेऊन विजयी केले स्वराज्य स्थापन केले. आज ही लढाई आपल्या स्वराज्यपूर्ती राहिली नसून ती प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचलेली आहे. आज फक्त आपला डोळ्यांनी दिसणारा शत्रूच आपला शत्रू नसून या संगणकीय युगात अनेक अदृश्य मार्गांनी आपला आपला लॉस होत आहे.
मला आशा आहे की अशा या न दिसणाऱ्या शत्रूंबद्दल तुम्ही तुमची आवाज-प्रबोधन रुपी तलवार नेहमीच तळपती ठेवाल... आणि विजयाच्या वाटचालीवर नेहमीच पुढे असाल कारण आजची युवा पिढी हेच माझे भविष्यातील कार्यकर्ते असतील. त्यांच्यामध्ये चांगल्या विचारांचे बीज तुम्ही पेराल तर ते माझ्यासाठी खूप मोठं यश ठरेल.
ज्याप्रमाणे महाराजांनी बारा भागच्या मावळ्यांना एकत्र करून स्वराज्य उभं केलं, त्याचप्रमाणे तुम्ही आपल्या मंडळाचा विचारांचा प्रसार करून सभोवतालच्या सर्वच कार्यकर्त्यांमध्ये सामाजिक बांधिलकी निभवाल तसेच गरजेनुसार सामाजिक कार्य पार पाडाल, अशी मला अपेक्षा आहे. माझ्या स्वराज्याच्या विजयाचे प्रतीक असलेला भगवा झेंडा नेहमीच तुमच्या मनात आणि अंगणात फडकत राहो. जेणे करून तुम्ही आम्ही कधीच आपला मार्ग चुकणार नाही. आपले ध्येय विसरणार नाही.
---
🌺 21 फुटांचा बाप्पा 🌺
गेल्या दोन-तीन वर्षांपासून तुम्ही मनोमन 21 फुटांच्या गणपतीची योजना आखत होतात. "यावर्षी होईल... पुढच्या वर्षी होईल..." असं म्हणता म्हणता अखेर 2025 हे वर्ष ठरलं, आणि माझ्या घरी 21 फुटांचा बाप्पा येऊन विराजमान झाला.
हा बाप्पा सहजासहजी आला नाही बरं का! मला असं दिसलं की मूर्तिकाराने काही प्रमाणात आळशीपणा, कामचुकारपणा दाखवला. पण तुमचा निर्णय पक्का होता. आतुरतेने, निर्धाराने तुम्ही वेळोवेळी पाठपुरावा केला आणि शेवटी हा बाप्पा माझ्या घरी आला. तुमच्या या चिकाटीला माझा मनःपूर्वक सलाम आहे...🫡
तुम्ही रात्रभर जागलात, जेवणाऐवजी चहा-पाव, वडा-भजीवर भागवलं, पण माझ्या बाप्पाला मात्र एकटं सोडलं नाही. हे पाहून मला खूप आनंद झाला. पडद्यामागे चालणारी तुमची धडपड मीही कान देऊन ऐकत होतो. तुमचं नियोजन यावेळी परफेक्ट कामाला आलं बरं का...
बाप्पाला तुम्ही पन्नास किलोमीटरवरून खास आणलात. खरंच मी "जय शिवराय मित्र मंडळ" खूप भाग्यवान आहे. मी जरी प्रत्यक्ष तुमच्या गल्लीमध्ये होतो, तरी तुमचं काम, तुमची धडपड मी दूरूनही पाहत आणि अनुभवत होतो. पटापट संपणारी वेळ आणि दिवस व गणेशाचं राहिलेलं अर्धवट काम पाहून नवीन अध्यक्ष श्री अमेय यांची चांगलीच घुसमट होत होती. पण जसे त्या छत्रपतींचे मावळे होते तसेच माझे कार्यकर्तेही यावेळी जीवाची बाजी लाऊन .. लंगोट घालून तालमीत मूर्तिकार विरोधात उतरले होते. गणेश, प्रमोद, रवी, राज, उदय, अमर, अमेय, किरण, रणजीत , प्रीतम अजून बरेचसे माझे कार्यकर्ते .. माझ्या शिवरायांच्या जिवलग विश्वासू मावळ्यांप्रमाणे येथे झुंज देत होते. माझी बाप्पाची मूर्ती साकार करत होते. प्रसंगी स्वतः त्यांनी हातात टॉर्च, कलर ब्रश घेऊन माझ्या बाप्पाला रूपवान करत होते. असे धडाडीचे माझे कार्यकर्ते पासून मी मंडळ धन्य धन्य झालो... 😊
---
🙏 स्वागत सोहळा 🙏
एम.एस.ई.बी. कोडोली फाट्यावर माझा बाप्पा पोहोचला, आणि प्रत्येक जण उत्सुकतेने "कधी पूजन होईल, कधी बाप्पा आपल्या घरी येईल" अशी वाट पाहत होता. स्वागतासाठी उपस्थित असलेले अनेक थोर व्यक्ती यांच्या वतीने तुम्ही केलेल्या माझ्या बाप्पाच्या पूजनाबद्दल व स्वागताबद्दल मी मंडळ खूप आभारी आहे...🙏
शिवाय माझ्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनाही स्वागताचा मान दिलात, याबद्दल मनःपूर्वक माझ्याकडून धन्यवाद...🙏
मी "जय शिवराय मित्र मंडळ" बघतच होतो बाप्पा रस्त्यावरून पुढे पुढे सरकत असताना प्रत्येक नागरिकाची नजर फक्त त्याच्याकडेच लागली होती. "एवढं मोठं धाडस कोणी केलं असेल?" ...🤔 अशी चौकशी होत होती. आणि तेव्हा माझं नाव निघालं की, खरंच माझं मन भरून येत होतं बरं का..
लोक बाप्पासोबत सेल्फी घेत होते, फोटो काढत होते. रीळ बनवणारे अनेक स्टार कॅमेरा मन यांची तर व्हिडिओ साठी चांगलीच सोय झालती.. कारण तुमचा विषयच हार्ड होता .. कोडोलीचा 21 फुटी महागणपती.... बाप्पाची उंची एवढी होती की त्याला कशाचाही अडथळा येऊ नये म्हणून कार्यकर्ते घेत असलेले कष्ट पाहून मी थक्क झालो. लोकांच्या गर्दीमुळे बाप्पा माझ्याकडे येण्याची गती जरी मंदावली, तरी तीच गती मला आता खूप सुंदर वाटत होती..
---
🎶 मिरवणुकीचा जल्लोष 🎶
स्वागतासाठी आलेल्या लहान मुलांच्या, मुलींच्या ढोल-बाजांनी वातावरण भारावून टाकलं. पारंपारिक वाद्यांची लय कानांना अगदी तृप्त करून गेली.
सोबतच डीजेच्या ठेक्यावर थिरकणारी तरुणाई, लावणीवर थिरकणारे ठुमके, आकाश रंगवणारी फटाकेबाजी – हे सर्वच क्षण डोळ्यांना आणि मनाला अविस्मरणीय ठरले... सर्वात आकर्षण दिसले ते म्हणजे ढोल बाजाचे .. आणि त्या कलेचे.
मिरवणुकीच्या तयारीत दमलेल्या कार्यकर्त्यांना काहीजण पाणी पाजत होते, तर काही खाणं-पिण्याची चौकशी करत होते. ही काळजी पाहून मी "जय शिवराय मित्र मंडळ" भारावून गेलो. माझ्यासाठी कोणताही कार्यकर्ता लहान नाही किंवा मोठा नाही – प्रत्येकाचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग महत्त्वाचा आहे.
चार-पाच तासांची मिरवणूक क्षणात संपल्यासारखी वाटली. आणि शेवटी बाप्पा माझ्या घरी आला.
---
❤️ कार्यकर्त्यांचा त्याग ❤️
बाप्पाला घरी आणल्यानंतर जेव्हा वाजंत्री कार्यकर्ते थकलेले जेवायला बसले, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहून माझंही पोट भरलं. पण जेवढा बाप्पाचा प्रवास गोड झालता तेवढेच गोड जेवणही झालते कितीही खाल्ले तरी मुलांची पोट भरतच नव्हते. तुम्ही आधी सगळ्यांना जेवू घातलं आणि शेवटी स्वतः जेवलात – खरंच तुम्ही ग्रेट आहात!..
घेतलेला संकल्प पार पाडण्याचा तुमचा निर्धार, एकत्रितपणा आणि शिस्त ही पुढील पिढीला शिकण्यासारखी आहे.
माझ्या या यशामागे प्रत्येक कार्यकर्त्याचा आणि त्यांच्या घरच्या लोकांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष हातभार आहे. त्याबद्दल मी "जय शिवराय मित्र मंडळ" त्यांचा सर्वांचा मनापासून आभारी आहे.
---
🌿 पुढील वाटचाल 🌿
आता मला "जय शिवराय मित्र मंडळ" उत्कंठा आहे पुढील 11 दिवस तुम्ही बाप्पासाठी, माझ्या छोट्या कार्यकर्त्यांसाठी, तसेच ज्येष्ठ कार्यकर्त्यांसाठी काय नियोजन करता हे पाहण्याची. खरंच, यंदाचा गणपती बाप्पा पाहून मी, जय शिवराय मित्र मंडळ या क्षणी खूप धन्य आहोत.
आज माझा गणपती बाप्पा 11 इंचाचा रोपट्या पासून 21 फुटी वृक्ष झाला आहे. आता या वृक्षाची गोड फळे तुम्ही समाजात वाटा. चांगल्या कार्याचा आणि चांगल्या विचारांचा प्रसार करा. जेणेकरून या रोपट्याचं जसं वृक्ष झालं तसंच पुढे या वृक्षाचा वटवृक्षात रूपांतर होईल.
पुढील दिवसांमध्ये तुमची तयारी आणि तुमच्यातली एकी मला पहायची आहे.... माझ्या नावाप्रमाणे तुमची ही शिवगर्जना अशीच नेहमी चालू असू दे... याची कॉफी नको म्हणण्यापेक्षा या चांगल्या विचारांची, नियोजनाची, जिद्दीची, महत्त्वकांक्षीची, इच्छेची, कष्टाची कॉपी करा असं म्हणा हेच मला उत्तम वाटते...
---
या वर्षी सन 2025 - 26 रोजी माझ्या (जय शिवराय मित्र मंडळ) या सोनेरी रथाची दोरी लगाम यावेळी अध्यक्ष महोदय श्री अमेय पाटील यांच्या हाती आहे .. मला स्वतःला (जय शिवराय मित्र मंडळ) आशा नाही तर ठाम विश्वास आहे की श्री अमेय मला माझ्या या शिवरायांच्या विचारांचा वारसा लाभलेल्या सोनेरी रथाला (मंडळाला) त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिद्दी कार्यकर्त्यांच्या सोबतीने अजून एक टप्पा वरती नेऊन ठेवतील....
क्रमशः....