Shaku Aji in Marathi Fiction Stories by Ketan Sawant books and stories PDF | शकू आजी

Featured Books
Categories
Share

शकू आजी

"अरे थांब, सावकाश... पडशील.." मिथिला अभय च्या पाठी धावत होती. बेडरूम मधून हॉल, तिथून किचन... अभय नुसता पळत होता. नवसाने झालेला हा मिथिला आणि अमर चा एकुलता एक मुलगा. त्यात सातव्या महिन्यातच जन्माला आला म्हणून त्या काचेच्या पेटीत ठेवला होता म्हणतात.

मग काय संपूर्ण जोशी कुटुंबच शेंडेफळ म्हणून संकष्टीला जन्माला आला... तेव्हा म्हणे ह्याच्या आज्जीने अक्खा दिवस त्या गणपतीला पाण्यात ठेवून सतत अभिषेक केला होता.. अर्थात त्याने फळ दिलंच म्हणा.. अभय म्हणजे शकुंतला आज्जीचा जीव. त्यात आई बाबा दोघेही कामानिमित्त दिवसभर घराबाहेर.. सगळे तिला शकू आज्जी म्हणायचे.. होतीच तशी ती प्रेमळ... लहानपणापासूनच्या संस्कारामुळे सतत देत राहायचं हा तिचा स्वभाव..मोठी झाल्यावर आपोआप तिच्या रक्तात मिसळला.

शकू आजी थोडेसे पांढरे झालेले केस, डोळ्यांखाली नुकतीच सुरु झालेली सुरुकुत्यांची सुरुवात, गळ्यात एक तुळशीची माळ आणि गणपतीवर प्रचंड श्रद्धा.. काही झालं तरी पहिला गणपती... माधवराव गेले तेव्हा तिने फक्त त्या गजाननाकडे पाहिलं त्याची ती नजर बघून पण ती त्या क्षणी खंबीर झाली ती कायमची... तसा तिला काही गणपतीचा साक्षात्कार वगैरे झाला नव्हता पण तिचा भाव कायम होता.. चार विंग ची अन्नपूर्णा सोसायटी, मधल्या आळीच्या चौकाच्या कोपर्यावरची.. आत एक छोटुसा टुमदार गणपतीचं देऊळ... आणि शकू आजी म्हणजे ह्या अख्ख्या सोसायटीची लाडकी..

तर अशी हि शकू आजी आणि तिचा लाडका अभय दिवसभर नुसते धिंगाणा घालत होते...पण शेंडेफळ असला तरी तो शेफारला नव्हता.. छे ! शकू आजीने त्याला शेफारू दिल नव्हतं. तर अशी हि शकू आजी एकदा अभय बरोबर खेळता खेळता उंबरठ्यात पाय अडकायचं निमित्त झालं आणि पडली... "गजानना... गजानना..." आधीच ६० पार केलेली, पायाला प्लास्टर झाल, अमर मारेल म्हणून अभय भेदरला होता तरी शकू आजी म्हणत होती
"अरे त्याची काहीच चूक नाही रे, मीच मेली न बघता जात होते त्याच्या पाठी पाठी"
"आई तू थांब ! ", मी बघतोच ह्याला" - अमर म्हणाला
"अरे नकोरे" - शकू आजी खाटेवरूनच ओरडत होती.
"नाही ग आई, आजकात खूप मस्ती वाढलीय ह्याची" - अमर रागात म्हणाला.

शकू आजी पडली तशी अख्खी सोसायटी सकाळ संध्याकाळ घरी हजेरी लावायची. साठे काकू, शेजारची मनीषा, अग्निहोत्रींची रोहिणी, दामलेंची उमा अशा सगळ्या तिच्या संख्या तिला सोबत म्हणून तिला भेटायला जायच्या. बरं, नुसता स्त्री वर्गच नाहीतर पाठकांचा समीर, बी विंग मधला रोहित,अमरापूरकरांचा योगेश, सहव्य मजल्यावरच्या परब काकू आणि सगळी तरुण पोर कामावरून आली कि आधी शकू आजीकडे हजेरी लावून तिची विचारपूस करून मगच आपापल्या घरी जायची. आजीच्या निमित्ताने अभय चे पण लाड होत होते.. आजीसाठी खाऊ आणणारे अभायसाठी पण खाऊ आणायचे. अश्या ह्या शकू आजीचं हे प्लास्टर निघतच नव्हतं, दुखण कमी होतंय अस वाटलं कि ती कामाला लागायची कितीही झाल तरी काम केल्याशिवाय ती स्वस्थ बसत नव्हती पण तिच्या आत त्या झालेल्या जखमेच योग्य निदान न झाल्यामुळे तिच्या पायाला गँगरीन झालं आणि तिचा पाय कापावा लागला.

एका भीषण सत्याला ती सामोरी गेली.. आयुष्यभराचं अपंगत्व माथी आलं.. पण इथेही ती खचली नाही.. खचेल तरी कशी.. तिचा गजानन होता ना तिला सांभाळायला.. हॉस्पिटल मधून घरी आली तेव्हा संपूर्ण सोसायटी घरी जमली होती.. सगळ्यांच्या चेहऱ्यावर चिंतेच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या.. शकू आजीची गाडी जशी गेटवर आली तशा सगळ्या बायका धावल्या; पण आजी मात्र हसत होती.. घरी पाय ठेवल्या बरोबर तिने आधी गजाननाला नमस्कार केला आणि तिने तिचा निर्णय जाहीर केला:-
"मी आज पासून माझ्यासारखे जे इतर अपंग आहेत त्यांच्या सेवेसाठी कार्य करणार!"
दोन मिनिट कोणालाच कळलं नाही आजी काय म्हणाली.. मग अभय ने टाळ्या वाजवायला सुरुवात केली तस हळूहळू टाळ्यांचा आवाज वाढत गेला... सगळे शांत झाल्यावर तिने तिची योजना सांगितली तसे सगळेच म्हणाले कि आम्ही पण ह्यात सहभागी होणार, जितकी आणि जशी जमेल तशी मदत करणार. सगळ्यांचा पाठींबा बघून शकू आजीला भरून आलं. तिने पदराने डोळे पुसले तेव्ह्ढ्यात अभय येऊन तिच्या कुशीत बसला आणि आजीने त्याला विचारल
"अभय, बाळा तू काय मदत करणार सांग आजीला?"
"मी......." - अभय थोडावेळ विचार करून म्हणाला
"मी कधी कधी मस्ती नाही करणार, सगळं डबा संपवणार, होमवर्क करणार.."त्याच बोलण पूर्ण व्हायच्या आत
त्याच्या ह्या उत्तराने एकाच हशा पिकला..
मग आजीने त्याला जवळ घेऊन त्याचा एक मुका घेतला.. शेवटी तिलाच कळला त्याचा भाव..
मग त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याच्या कडूनच उदघाटन केलं त्याच्या नावाने उघडलेल्या तिच्या संस्थेचं नाव ठेवल होत - "अभय"

-केतन सावंत