"हॅलो!" ओह, व्हॉट ए surprise.. " - चैतन्य ला दारात बघून शाल्मली म्हणाली.
तो आत येताच तिने त्याला मिठी मारली..
"अग, हो हो बसू दे त्याला जरा.."
शाल्मलीची आई म्हणाली. तेवढ्यात शाल्मली चैतन्य साठी पाणी आणायला किचनमध्ये गेली. सोफ्यावर आई आणि चैतन्य बसून होते. कॉलेजपासून ची जिवलग मैत्रीण शाल्मली चैतन्यची. अख्ख्या कॉलेजमध्ये त्याची बाजू घेणारी.. आणि वाटलंच तर ह्याच्या वाटेल जाऊन धडा शिकवणारी. चैतन्य पण काही घाबरट नव्हता पण मुळात त्याला भांडण हा विषयच आवडायचा नाही. कॉलेजची ५ वर्ष दोघे एकत्र एकाच वर्गात. पुढे तिने चार्टर्ड अकाउंटंट व्हायचं ठरवलं आणि ह्याने पत्रकार. कॉलेज संपल्यावर दोघांचे मार्ग वेगळे झाले पण दोघांनी भेटणं सोडलं नाही.
तो मग एका माहितीच्या शोधार्थ पुण्याला गेला आणि हिला इंटर्नशिपसाठी तिच्या बाबांच्या ओळखीत पण इंदौर ला जावं लागलं. तरी दोघे ई-मेल, व्हाट्स ऍप , फेसबुक वरून भेटत होते. आता ह्या दोघांची एकमेकांना इतकि सवय झाली होती कि दोघे रोज रात्री गप्पा मारायचे.. दिवसभरात जे जे काय घडल ते सांगायचे.. दोघांकडे बघून त्यांच्या मित्र मैत्रिणींनाच नाही तर त्यांच्या घरच्यांना सुद्धा वाटत होत कि दोघे एकमेकांवर प्रेम करतात.. आणि शाल्मालीलाही चैतन्य मनापासून आवडू लागला होता.. फक्त त्याला सांगायला ती तयार नव्हती.. तिचा हट्ट एकच "त्याने प्रपोज करावं". पण त्याबिचार्याला ह्या बद्दल काहीच कल्पना नव्हती.. तो तिला फक्त एक चांगली मैत्रीण म्हणूनच मानत होता, तिचा आदर करत होता.. तिच्या बर्थडे च्या दिवशी हा रात्री अचानक बुके घेऊन रात्री १२ च्या ठोक्याला हजर झाला.. तिला तर काय करू नि काय नको असं झालं.
"सांगू का ह्याला? काय म्हणेल?"
"नको राहू दे, उगाच मूड खराब होईल"-शाल्मली स्वतः:शीच बोलत होती.
चैतन्य तिला शुभेच्छा देऊन केक कापून मग घरी गेला.. हि मात्र रात्रभर त्याचाच विचार करत होती.. सकाळी हिने ठरवलंच त्याला सांगायचंच. बघू तरी काय म्हणतो? फार तर काय म्हणेल? "नकार देईल !.. पण ... पण त्याचा नकार पचवण्याची ताकद आहे का माझ्यामध्ये?" - शाल्मली अजून सुद्धा त्याचाच विचार करत होती. आज पहिल्यांदा ती रात्रभर जागी होती आणि तेही चैतन्यमुळे. आयुष्यपण कस खेळ खेळत ना.. आपण ज्याच्यावर प्रेम करतो.. त्याला ते सांगायचं धीर होत नाही..आणि त्याने समोरून आपल्याला विचारावं हि अपेक्षाही सुटत नाही. आणि मग ह्या द्वैताच्या खेळात मग आपणच हरतो..
पण शाल्मली हरणाऱ्यातली नव्हती. लहानपणापासून जिंकायची सवय लागली होती... तर इथे सुद्धा ती कशी हरेल.. हर तऱ्हेने त्याला सिग्नल देत होती पण तो भोळा बिचारा त्या गोष्टीकडे साफ दुर्लक्ष करत होता.. हिच्या बर्थडे साठी घेतलेली सुट्टी संपवून परत जायला निघाला तसा हीचा जीव खाली वर झाला.. त्याच तसा दुसऱ्या कुठल्या मुलीवर प्रेम वगैरे नव्हतं.. आणि असल तरी ते शाल्मलीला सांगितल्याशिवाय तो राहिलाच नसता.. आज पहिल्यांदा तिला चैतन्य जाताना काही तरी हातून निसटतंय ह्याची जाणीव होत होती.. तिला त्याला सोडायचं नव्हतं पण त्याला थांबवायचं एक कारण होत पण जे बोलायचं धीर हिला होत नव्हता.. कात्रीत अडकल्यासारखी अवस्था झाली होती बिचारीची. डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्याची जाणीव झाली तसा हिने विषय बदलला. तेवढ्यात मोटरमनने हॉर्न वाजवला.... आणि शाल्मलीला तो जातोय हे सहन होत नव्हती ती सरळ स्टेशनच्या बाहेर पडली आणि चैतन्य तिला काहीतरी सांगायचे प्रयत्न करत होता पण ही गेलेली पाहुन तो जाऊन ट्रेन मध्ये बसला.
शाल्मली तशीच घरी येऊन रूम मध्ये जाऊन बसली.. चैतन्य फोन करत होता पण शाल्मलीला तिच्या स्वतः:ला होणाऱ्या त्रासापुढे त्याचा फोन येतोय हे कळलं नाही.. रडत रडत ती तशीच झोपून गेली..सकाळी उठली तेव्हा सहज टीव्ही लावला... पहिलीच ब्रेकिंग न्यूज "काल रात्री लोणावळ्याच्या पुढे डेक्कन रुळावरून घसरली, ३ मृत आणि ७ जखमी. मृतांमध्ये चैतन्य परांजपे नाव दिसलं तशी शाल्मली कोसळली.. शाल्मली कोसळली बघून तिची आई आणि बाबा दोघेही धावले.. शुद्धीत आली तेव्हा तिचे डोळे रुक्ष झाले होते.. तिच्या सगळ्या भावना, अपेक्षा ज्या नावाभोवती फिरत होत्या ते नावच आता संपलं होत.. आणि आता तिला स्वतः:चाच राग येत होता.. आणि त्याच ऐकून घेतल नाही म्हणून चिडचिड सुद्धा करत होती.. आवेश, चीड, राग,प्रेम सगळ्या भावना मारून गेल्या होत्या... एकच गोष्ट एकच विचार तिच्या मनात येत होता ... आता ह्या अधुऱ्या राहिलेल्या प्रश्नाचं उत्तर... ?
आज शाल्मली हरली होती ... एका सत्याला ती सामोरी जात होती.. आणि ह्यावेळी तिला गरज होती तिच्या लाडक्या चैतन्यची..
- केतन सावंत