भाग - २७
काही वेळाने शशांक बोलला, " बघीतल्यासारख वाटत यांना कुठेतरी." तेव्हा आईने म्हटले, "जाऊ दे तीचे काय आहे, आपल्याला तर कोमल विषयी बोलायचे आहे. तर तू आणि कोमलने एक होण्याचा निर्णय घेतला आहे. तर मला सांग कोमल हि आजन्म अशीच अपंग राहणार आहे. तर मग तीचा संभाळ तू जन्मभर करशील. जर असा करशील तर माझा कसलाही विरोध नाही आहे. उलट मी स्वतः तुमचा दोघांचे लग्न लावून देईल." तेव्हा शशांक म्हणाला, "काय काय म्हणालात तुम्ही, कोमल आता आजन्म अपंग राहणार आहे. परंतु तीने तर मला सांगीतले आहे कि तीचे ऑपरेशन झाले आहे आणि ती लवकरच चालायला लागणार आहे." तेव्हा आई म्हणाली, "ते आम्ही तीला खोटे सांगीतले आहे, कारण कि तीला जीवंत ठेवण्यासाठी आम्हाला ते खोट बोलने भाग पडले."आता मात्र शशांकचा चेहरा बघण्यासारखा झाला होता. तो काहीच बोलत नव्हता फक्त मीत्राचा चेहऱ्याकडे बघत होता. तेवढ्यात आई म्हणाली, "तीचे ऑपरेशन झाले आहे परंतु ती चालू शकेल अथवा नाही हे निश्चित सांगू शकत नाही असे डॉक्टर म्हणाले. अच्छा मला सांग तू राहतो कुठे म्हणजे तुझा घरचा पत्ता काय आहे.' शशांकला काही वेगळे वाटू लागले होते, त्याला काय बोलायचे आणि काय नाही असे होऊन गेलें होते. तेव्हा कोमल मध्येच बोलली, "आई माझ्याकडे आहे शशांकचा घराचा पत्ता. मग आई बोलली, "हे बघ बेटा शशांक याचे काही वाईट वाटून घेऊ नकोस आपण ज्या विषयावर बोलत आहोत, हा एक फारच गंभीर विषय आहे. एक प्रकारे आपण लग्नाचे बोलने करत आहोत. तर लग्नाचा बोलण्यात एकमेकांचे पत्ते आणि मोबाईल नंबरची देवाण घेवाण तर होते ना त्यासाठी मी तुला ते मागते आहे. याचा सोबत तुझ्याकडे तुझा एखादा सुंदर फोटो असेल तो सुद्धा मला दे, म्हणजे आमचा नातेवाईकांना तुझा फोटो दाखवून सांगणार कि कोमलने इतका सुंदर मुलगा शोधला आहे." आता अशाप्रकारे आईने हुशारीने शशांककडून तीला हवी असलेली माहिती त्याचाकडून काढून घेतली होती.
इकडे आज सावलीचा दिवस मात्र फारच लगबगीचा आणि घाईचा ठरला होता. त्यांची मिटिंग हि सायंकाळचे ७ वाजत पर्यंत चालली होती. समधानाची गोष्ट हि होती कि सावलीने गोळा केलेले साहित्य त्या महत्वाचा मिटींगसाठी फारच उपयोगी ठरले आणि त्यामुळे तीचा ऑफिसला खूप मोठे काम भेटले होते. त्यामुळे सावलीचे बॉस आणि संपूर्ण ऑफिसचे कर्मचारी आनंदी होते. अखेर सावलीचा तो थकवणारा आणि कंटाळवाणा दिवस एकदाचा संपला आणि बॉस ने सावलीला घरी आणून सोडले आणि ते निघून गेले. सावली आता मात्र अक्षरश: थकून गेलेली होती आणि ती तशीच घरात शिरली. तोच आईने तीला बघून म्हटले, आलीस बेटा, आज तर फारच आनंदाची गोष्ट झाली. तू सांगीतल्याप्रमाणे जसेचे तसे घडले आज मी शाशांककडून.... बोलता बोलता आईने सावलीकडे बघीतले तर ती फारच थकलेली तीला वाटली. तेव्हा आई स्वतःच गप्प झाली आणि तीने सावलीला तीचा रूमपर्यंत नेऊन सोडले. मग सावली आत गेली आणि तीला चक्क झोप लागली आणि ती झोपली." सकाळ झाली आणि सूर्याची किरण सावलीचा डोळ्यांवर पडल्यावर सावली जागे झाली. ती उठल्यावर स्वतःशीच विचारू लागली, "सकाळ कशी काय झाली इतक्या लवकर मी तर असेच लेटले होते. आई इकडे ये ग.' मग सावलीची आई तेथे आली आणि म्हणाली, “झोप झाली काय बेटा, बरे वाटते न आता तुला." मग सावली
म्हणाली, “आई मी खरच झोपले होते अग मला काहीच कळत नाही आहे. हे कसे आणि काय झाले म्हणून.' तेव्हा आईने सावलीला सांगीतले, " बेटा काल संध्याकाळी तू फारच थकून ऑफिस मधून घरी आली होतीस. मी तुला काहीतरी सांगत होते तेव्हा तू नुसती पापण्या लावत होतीस. तेव्हा मला जाणवले कि तुला झोपेची अत्यंत आवश्यकता आहे म्हणून मी तुला तुझा बेडरूम पर्यंत आणून सोडले. तू एवढी जास्त थकलेली होती कि तू नकळत झोपी गेलीस आणि आता उठलीस. तर आता उठली आहेस तर लवकर उठ आणि ब्रश वगैरे करून बाहेर ये मी छान चहा ठेवते तुझ्यासाठी,” असे बोलून आई बाहेर नीघून गेली.
मग सावली उठली आणि तीने चेहरा धुतला आणि ब्रश केले, त्यानंतर तीला फारच हलक हलक वाटू लागले होते. तेव्हा तीला आठवले कि काळ तीचा मिटिंग
मध्ये ती सतत दिवसभर त्या कॉम्पुटर समोर बसलेली होती, त्यामुळे तीचे डोक आणि डोळे हे फारच थकून गेले होते. मग आईने सावलीला चहा आणून दिला तो तीने संपवला आणि मग थोडे डोळे बंद करून ती काही तरी आठवू लागली होती. तीतक्यात ती फाडकन उठली आणि आईला म्हणाली, "आई तो मुलगा येणार होता ना आपल्या घरी त्याचं काय झालं. मी तुला सांगीतल्याप्रमाणे तू केलस कि नाही." मग आई बोलली, "अरे बेटा शांत हो आणि नीवांत बैस मी तुला सविस्तर सांगते. मग आईने शशांक बरोबर काय आणि कशे बोलने झाले ते सावलीला
सविस्तर सांगितले. आई पुढे म्हणाली, “बेटा तू जो संशय वर्तवला होता त्याचावर तो मला सुद्धा उचीत वाटला. हे बघ मी त्याचा फोटो सुद्धा त्याचाकडून घेतला आहे." सावलीने तो फोटो घेतला आणि ती एकदम अवाक राहिली.
शेष पुढील भागात..