श्रीपाद श्री वल्लभ पोथीची वैशिष्ठ्ये. व लेखनाची प्रेरणा कशी मिळाली?
१४ व्या शतकात श्री दत्तात्रेयांचे प्रथमावतार श्रीपाद श्रीवल्लभ होऊन गेले. श्री. शंकर भट्ट या उडुपी स्थित ब्राह्मणाने त्या काळात श्रीपाद श्रीवल्लभ यांचे चरित्र कशाप्रकारे लिहिले, त्यांना मिळालेली दैवी आज्ञा, ईश्वरनियोजित प्रवासात त्यांना मिळालेल्या विविध साक्षी, श्रीपाद श्रीवल्लभ यांच्याशी आलेला संबंध या सूत्रांवर ‘श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र : एक अभ्यास ’ हा ग्रंथ आधारित आहे. या ग्रंथामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या समकालीन सामाजिक, ऐतिहासिक आणि भौगोलिक परिस्थितीचा ऊहापोहही करण्यात आला आहे. हवाईदलातील निवृत्त अधिकारी आणि लेखक श्री. शशिकांत ओक यांनी या ग्रंथाचे संकलन केले आहे. हा ग्रंथ वाचकांसाठी येथे लेख रूपाने साभार प्रकाशित करत आहोत.
॥ श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये ॥
अध्याय 1, पान 1. कथाभाग
आत्मनिवेदन - सिद्धमुनी व शंकरभट्ट कथनातून – कथानक - सिद्धमुनी व शंकरभट्ट संवाद होतानाचा अपेक्षित सन १३४०.
उडुपिच्या कृष्ण मंदिरातील आदेशानुसार कन्याकुमारी (कन्यका परमेश्वरीचे) दर्शनाचा लाभ.
(शंकरभट्टांनी त्या काळात जर गूगलमॅपच्या मदतीने प्रवास करायचे ठरवले असते तर तो पदयात्रेचा प्रवास साधारण ७०० किमी असा झाला असता...यापुढील पायी मार्ग गूगल मॅपवरून दाखवले आहेत. इथे फोटो सादर करायची सोय नसल्याने दिसणार नाही.)
कल्पना करा – तुम्हाला एखाद्या मंदिरातील देवतेच्या समोर उभे राहिले असताना आदेश मिळाला की अमुक अमुक नावाच्या व्यक्तीला तू या या गावी जाऊन भेट. तर प्रथम जावे किंवा नाही असा संभ्रम निर्माण होईल. कारण मंदिरात जाताना त्यानंतर काय करायचे हे साधारण ठरवून ठेवलेले असते. तरीही असे समजा की तो आदेश शब्दशः मानून तुम्ही त्या एका अज्ञाताच्या शोधात निघालात कि ज्याचे आपणास फक्त नाव व गावाचे नाव कळले आहे, तर मंदिराच्या बाहेर आल्यावरच्या पहिल्या चौकातून कुठे वळणार? डावीकडे ? उजवीकडे कि समोर ? वाट कोणाला विचारणार? कोणत्या भाषेत? अशा समस्या वाटूनही ‘सरळ वाट फुटेल तिकडे’ म्हणून आपण अशी यात्रा पायी करायचा निष्चय करून निघालात... सध्या प्रमाणे बांधलेले रस्ते नाहीत, ढाबे, उपहारगृहे, राहायच्या सोई नाहीत, मार्गदर्शक पाट्या नाहीत.... तरी पण आपण ‘काही झाले तरी मी याचा शोध घेणारच’ या आपल्या निष्चयाच्या बळावर हा प्रवास चालू ठेवलात....
कन्याकुमारी ते मरुत्वमलाई 10 किमी - मरुत्वमलाई रमणीय पर्वत - गूहा असलेला भाग
त्या देवींच्या आज्ञेनुसार श्रीपाद श्रीवल्लभ नामक अनोळखी व्यक्तीला कुरुगड्डीला, जे नाव आणि गाव त्यांनी आयुष्य प्रथम ऐकले असावे अशा व्यक्तिमत्वाच्या दर्शनाला शंकर भट्ट तरूण अनोळखी प्रदेशातून साहसकरून पायी निघाले. वाटेत वाघ दिसतो. भितीने एका गूहेत जाताना व्याघ्रेश्वर मनुष्यरुपाचे रहस्य.... श्री सिद्ध वरेण्य-शंकर भट्टांनी दिलेले नाव- नामक वृद्ध तपस्वी - व्याघ्रेश्राचे पुर्वचरित्र कथन सांगतात - एक मठ्ठ ब्राह्मण मुलगा म्हणून निंदा. बालकरुपात बद्रिकारण्यात जायचा आदेश. एका तपस्व्यांचे त्याने शिष्यत्व, श्रींच्या अवताराची नांदी... त्याला कळली. मी कोण? पुर्वीचा वाघ-सिंहांशी लढून लोकांचे मनोरंजन करणारा बलिष्ठ पहिलवान. सध्या या गुहेतील तपस्व्यांची रक्षा करतो?
पुढे काही वर्षांनी त्याचे वाघात रुपांतर झाले व तो कुरवपुरात कृष्णा नदीच्या तीरावर पोहोचला. तिथे श्री त्याच्यावर आरूढ होत नदीपार करून त्यांच्या स्थानी पोहोचले.
श्री कन्यका पुराण – श्रीकृष्ण कालीन अग्रसेन (आग्रावासी?) काही वाणिज्यक आन्ध्रात बृहतशीलानगरीत स्थलांतरित होऊन व्यापार करीत असत. होते. त्यात कुसुमश्रेष्ठी नामक धर्मशील दंपती व हितचिंतक मित्र भास्कर राहात. त्यांचे आडनाव पैंडा असे आहे. तुझी भेट त्यांच्या वंशातील लोकांशी होईल. कुरवपुरात जा. म्हणून अंतर्धान झाले. शंकर भट्ट पुढील प्रवासाला लागले.
या कथनावरून असे दिसते की श्रीपाद श्रीवल्लभ हे पीठापूरच्या घरातून गुप्त झाल्यावर गंगा किनाऱ्यावरील क्षेत्रसाधनाकरून बद्रीकावन, अन्य हिमालयातील तीर्थेक्षेत्रांतील साधकांना दर्शन आणि उपदेश देऊन अरबी समुद्र किनाऱ्यावरील गोकर्ण महाबळेश्वरात ३ वर्षे राहून श्री शैल्यास चातुर्मास करून निवृत्ती संगम म्हणजे भीमा व कृष्णा नदीच्या तीर्थक्षेत्रात कार्तिक पौर्णिमाझाल्यावर गुप्त झाले. कुरवपुर किंवा कानडीत गुरु (तेलगूत कुरू) गड्डी या कृष्णा नदीच्या पात्रातील बेटावर येऊन वास्तव्य करू लागले होते. तो दिनांक कार्तिक कृष्ण प्रतिपदा अर्थात १३ नोव्हेंबर १३४० , रविवार होता. अधिक महितीसाठी लेख पहा.
॥ श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये ॥
https://web.dotpe.in/catalog/20305229