१३)
ती लहान लहान मुलं. तेही दिवसागणिक लहानाचे मोठे झाले होते. त्यांनीही आपलं करीअर कमावलं होतं. लहानपणचे मित्र सोडले होते. नवे मित्र, तेही महाविद्यालयातील मित्र धरले होते. आता संपर्क होता, तो म्हणजे त्या महाविद्यालयातील नवनवीन मित्रात. जे आता पाचवीतील मित्र नव्हते. त्रिशालाही ती विवाहीत होण्यापुर्वी पाचवीतील मित्रमंडळ आठवत नव्हतं. ती जशी दहावीत गेली व तिनं जसा महाविद्यालयात प्रवेश घेतला. तशी ती पाचवीतील मित्रांना विसरली. कारण तिनं ज्या महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्या महाविद्यालयात तिच्या पाचवीतील कोणीच नव्हतं. कारण त्रिशा गुणवत्तायादीत होती व तिचं मित्रमंडळ गुणवत्तायादीत नव्हतं. त्यामुळंच ज्या महाविद्यालयात त्रिशाचा नंबर लागला होता. त्या महाविद्यालयात बाकी मुलामुलींचा शिकण्यासाठी नंबर लागला नव्हता. अशातच कालांतरानं तिला महाविद्यालयातील नवीन मित्रमंडळ भेटलं व ती तद्नंतर त्यांच्यातच रममाण झाली. त्रिशाचं ते बालपण. आज ती मोठी झाली होती. त्यातच आता ते बालपणीचे संदर्भ बदलले होते. बालपण संपलं होतं व तरुणपण तयार झालं होतं. मध्यंतरीचा काळ तिचा स्वतःला विकसीत करण्यात गेला. कारण तिला डॉक्टर क्षेत्राकडे जायचं होतं. तशी ती आज बारावी पास झाली व डॉक्टर बनू पाहात असतांनाच पैशाअभावी तिची इच्छा तिच्या मनातल्या मनात गोठली व तिनं आता शिक्षक बनण्यात आपली रुची जागवली. त्रिशानं शिक्षिकेच्या क्षेत्रात प्रवेश घेतला होता व ती मन लावून अभ्यास करीत होती. अशातच तिनं अल्पावधीतच अध्यापिकेचं शिक्षण पुर्ण केलं व एका शाळेत तिनं नियुक्तीसाठी इंटरव्हू दिला. ज्यात तिची नियुक्ती झाली नाही. मात्र तिला इंटरव्ह्यूमध्ये नापास केलं. ज्याचं कारण होतं पैसा. तो पैसा तिच्याजवळ नसल्यानं तिला नोकरी लागली नाही. त्रिशा नोकरीची वाट पाहात होती. अशातच वय झालं व वाढत्या वयानुसार तिला आता लग्न करणं भाग होतं. त्रिशा विवाहयोग्य झाली होती व तिच्या वडीलांना तिच्या विवाहाची चिंता पडली. तसं तिच्या आईवडीलांनं तिच्यासाठी योग्य वर शोधणं सुरु केलं. त्यानंतर तिचा विवाह जुळला व तिचा विवाह थाटामाटात पार पडला. त्रिशाचा विवाह झाला होता व तिला तिच्या आयुष्याचा जोडीदार चांगला मिळाला होता. तो तिच्यावर प्रेम करीत असे. अशातच तिचा अध्यापिकेचा अभ्यासक्रम पुर्ण झाला असल्यानं तिच्या पतीनं तिला एका खाजगी शाळेत पैसे भरुन लावून दिलं. अशाप्रकारे त्रिशा एका खाजगी शाळेत नोकरी करु लागली होती. त्रिशा खाजगी शाळेत लागली होती. ती लहान इवल्या इवल्या मुलांना शिकवीत होती. आता तिला शिकवितांना नारायण सर आठवत होते. ते कुठे असतील, कुठे नाही असं सारखं वाटत होतं. कदाचीत ते जीवंत तरी असतील का? असेही विचार मनात येत होते. त्यातच आता तिला तो तिचा पाचवीतील वर्ग आठवत होता आणि आठवायला लागल्या होत्या त्या बालमैत्रीणी. ज्या वर्ग पाचवीत तिच्यासोबत शिकायला होत्या. आज तिला तेच किस्से आठवत होते. जे तिनं तिच्या पाचव्या वर्गात अनुभवले होते. तिला आता तो नारायण सरांचाही वाढदिवस आठवत होता. तशीच ती कॅप्टनशिपही तिला आठवत होती. त्रिशाला येणारे ते विचार. त्यातच तिला तिची शाळा आठवत होती. ज्या शाळेनं तिला बालपणापासून शिक्षणाचं बाळकडू पाजलं होतं. त्यातच तिला तिच्या मैत्रीणी आठवायला लागल्या होत्या. परंतु त्या दोनचारच मैत्रीणी आठवत होत्या की ज्या तिच्या संपर्कात होत्या. तिच्या घराजवळच होत्या. बाकी मित्रमंडळ कुठे होतं, कुठं नाही हे काही तिला माहीत नव्हतं. त्रिशा आता जास्त करुन माहेरी येत नव्हती. कारण माहेर दूर गेलं होतं. सासर जवळ झालं होतं. तसा तिला वेळही मिळत नव्हता. घरकाम, मुलंबाळं आणि नोकरी यातून ती वेळ तरी कसा काढणार. परंतु माहेर ते माहेरच. त्या आठवणींना सासर नसतंच. त्रिशा नित्यनेमानं शाळेत जात असे व नोकरी करुन परत येत असे. अशातच तिला तिच्या शाळेची आठवण आली व त्याच ओढीनं एक दिवस ती आपल्या पतीला म्हणाली, "आपण माझ्या माहेरला जावूयात. मला माझ्या शाळेची आठवण येत आहे. मला माझ्या मैत्रीणींची आठवण येत आहे. मला माझ्या शिक्षकांचीही आठवण येत आहे. ज्यांनी मला शिकविलं व ज्यांच्यामुळंच मी एवढ्या दूर पोहोचू शकले. पतीनं तिचं बोलणं शांतपणे ऐकलं. तोही शिकलेलाच होता. तसा तो तिची भावना लक्षात घेत म्हणाला, "असं होय. ठीक आहे, जावूयात दोनचार दिवसासाठी. त्यानंतर तू नक्कीच आपल्या शाळेची भेट घेशील." त्रिशाच्या पतीनं आश्वासन दिलं होतं. त्यातच त्रिशा आपल्या पतीला जास्त विनवू शकत नव्हती माहेरी चालण्याविषयी. तिनं तिला येणारी ती आठवण बरेच दिवस पोटात कोंबून ठेवली. दिवसामागून दिवस जात होते व एक दिवस तशी संधी त्रिशाला चालून आली. तसं एक दिवस तिनं वेळात वेळ काढला. नोकरीच्या शाळेत सुट्ट्या टाकल्या व ती आपल्या पतीला व लेकरांना घेवून माहेरी आली. त्रिशा माहेरी आली होती व तिला तिच्या शाळेत जाण्याची आणि आपल्या शाळेची भेट घेण्याची हुरहुर लागली होती. तोच ती आपल्या घराशेजारीच राहणाऱ्या आपल्या मैत्रीणीच्या घरी गेली. त्यातच तिची मैत्रीण कुठे आहे. कुठे नाही. याचा तिनं वेध घेतला. त्यानंतर तिनं तिचा मोबाईल क्रमांक घेतला व ती सर्वप्रथम आपल्या शाळेत जाण्याची वाट पाहू लागली. त्रिशा ज्यादिवशी माहेरी पोहोचली. त्यावेळेस सायंकाळचे पाच वाजले होते. शाळा सुटली होती. तशी सायंकाळ झाली होती व दुसर्या दिवशी ती शाळा केव्हा उघडेल केव्हा नाही. याची तिला प्रतिक्षा होती. आपण शाळेत केव्हा पोहोचतो व केव्हा नाही असं तिला होवून गेलं होतं. अशातच सकाळचे अकरा वाजले व सकाळी अकराला शाळा उघडली असेल असे वाटून ती लगबगीनं शाळेत पोहोचली. त्रिशा शाळेत पोहोचली होती. तेव्हा सकाळचा एक वाजला होता. पुर्ण तयारी करता करता दुपारचा एक केव्हा व कसा वाजला हे तिला समजलं नाही. अशातच ती जेव्हा शाळेत पोहोचली. तेव्हा त्या शाळेची पटसंख्याही कमी झालेली तिला दिसत होती. ज्यावेळेस ती शाळेत होती. त्यावेळेस त्याच शाळेत भरपूर पटसंख्या होती. त्या खिडक्या, ते दरवाजे त्या शाळेचं अस्तित्व टिकवून होते. आता ना शाळेला रंगरंगोटी होती, ना ती शाळा सजीव वाटत होती. शाळेतील जुनी शिक्षक मंडळी ती शाळा सोडून गेले होते, अर्थात निवृत्त झाले होते. आज ते कुठे असतील, त्यांचे पत्ते मिळतील की नाही, याबद्दलची शांसकता त्रिशाच्या मनात निर्माण झाली होती. त्रिशा शाळेत पोहोचली, तेव्हा तिच्यासोबत तिचा पतीही होता. मुलांना तिनं शाळेत न्यायचं टाळलं होतं. ती जशी शाळेत पोहोचली. तसा तिनं शाळेत आपला परिचय दिला. त्यानंतर चर्चात्मक गोष्टीही झाल्या व चर्चेदरम्यान कोणकोणते शिक्षक जीवंत आहेत याचा आढावा त्रिशानं घेतला. त्यानंतर हळूच त्यांचे पत्तेही त्रिशानं विचारले. त्यातील काही पत्ते तिनं लिहून घेतले. त्यानंतर हळूच तिनं नारायण सरांचाही पत्ता विचारला. परंतु नारायण सरांचा पत्ता काही तिला मिळाला नाही. त्यानंतर तिचा भ्रमनिरास झाला. ज्या सरांना भेटण्याची अगाढ इच्छा होती. ती तिची इच्छा तिच्या मनातल्या मनात मावळली आणि ती शाळेतून परत आली. त्रिशा शाळेतून परत आली होती. परंतु नारायण सरांना भेटण्याची आस अजुनपर्यंत तिची मावळली नव्हती. काय करावं सुचत नव्हतं. ती विचार करीत होती. अशातच तिला आठवले ते इतर शिक्षकांचे तिला भेटलेले पत्ते. तिनं विचार केला, कदाचीत इतर शिक्षकांकडून नारायण सरांचा पत्ता मिळाला तर...... त्रिशानं तसा विचार केला. आज रात्रभर तिला झोपही आली नव्हती. मनोमन वाटत होतं की ज्या व्यक्तीनं आपल्याला शिकतं केलं. त्या सरांची मुलाखत घ्यायची. सकाळ झाली होती. त्रिशा झोपेतून उठली होती. ती तीव्र आस. तिला काही ती तीव्र आस स्वस्थ बसू देत नव्हती. ती इंजीनियर बनली नव्हती. ना डॉक्टर बनली होती. तरीही तिला ती तीव्र आस सताऊ लागली होती. तिला सरांना केव्हा केव्हा भेटतो असं होवून गेलं होतं. ती त्रिशा. त्रिशाच्या मनात सरांना भेटण्याची तीव्र आस होती. तशीच तीव्र आस रुषालीच्याही मनात होती. रुषाली ही आज पोलीस अधिकारी बनली होती. तसं पाहिल्यास रुषालीला पोलीस बनण्यात उत्साह नव्हता. तिला काही पोलीस बनायचे नव्हते. तसं पाहिल्यास तिला ती शिकेल की नाही अशी शंका होती. कारण तिचे वडील कामाला तर जायचे. परंतु थोडे नशा करीत होते. त्यातच घरात दोन बहिणी व एक भाऊ. भाऊ जास्त हुशार नव्हता. मात्र दोन्ही बहिणी अतिशय हुशार होत्या. रुषालीचे वडील थोडेसे गरीब होते. त्यांची मिळकत जास्त नव्हती. त्यातच दारुचं व्यसन. त्यामुळं घरात हलाखीचं जीवन होतं व पैसा पुरत नव्हता. मग शिक्षण कुठून मिळेल! परंतु नारायण सरांनी तिच्यातही महत्वाकांक्षा भरली होती. ज्यातून रुषालीतही शिकण्याची आस निर्माण झाली. तशी हलाखीची परिस्थिती. त्या परिस्थितीचा सामना करीत करीत ती शिकली. ज्यात तिच्या मोठ्या बहिणीचा सिंहाचा वाटा होता. रुषालीला एक मोठी बहिण होती. ती जास्त शिकू शकली नाही. कारण तिच्याही समोर घरची परिस्थितीच होती. मात्र तिनं निर्धार केला होता की ती जास्त जरी शिकली नसली तरी ती आपल्या बहिणीला व भावाला शिकवेलच. तसा तिनं केलेला निर्धार. रुषाली जेव्हा दहावी पास झाली. तेव्हा तिच्या बहिणीचा विवाह झाला. मात्र तिच्या बहिणीनं केलेल्या निर्धारानुसार ती जागली व तिनंच रुषालीला आज पोलीस बनवलं होतं. आज रुषालीला वाटत होतं की जर नारायण सर तिला पाचवीत मिळाले नसते तर चित्र काहीसं वेगळंच असतं. तिच्या मनात ना शिक्षणाची आस निर्माण झाली असती. ना ती एवढी शिकू शकली असती, घरच्या परिस्थितीवर मात करुन. (१४) सामाजिक वणवे विनाकारण निर्माण करु नये की ज्यातून आपलेच नाही तर इतर समाजाचे नुकसान होईल. ज्यातून देशाचेही नुकसान होईल. फायदा हा कोणालाच होणार नाही. जात....... जातीप्रथा अजुनही गेलेली नाहीच आणि जाणारही नाहीच. त्यातच जातीवरुन पुर्वी जसा अपमान व्हायचा. तोच अपमान आजही होतो. परंतु सद्यस्थितीत महार जातीला अति भव्यदिव्य स्वरुपात महत्व आलेलं आहे. आज लोकं सहजासहजी महार जात सांगणाऱ्या लोकांच्या नादाला लागत नाहीत. त्याचं कारण आहे, त्यांच्यातील एकता आणि त्यांच्यातील कायद्याची जाण. व्यतिरीक्त त्यांची लढण्याची प्रवृत्ती. ती प्रवृत्ती, ती एकता आणि ती कायद्याची जाण इतर समाजात दिसत नाही. जरी त्यांच्या जातीचा समावेश शुद्र जातीत होत असला तरी. एवढंच नाही तर लोकं आरक्षणाअंतर्गत असलेल्या सोयीसवलतीचा लाभ घेवू इच्छितात नव्हे तर घेतात. परंतु आपली जात लपवतात. परंतु काही महाभाग असेही आहेत की जे स्वाभिमानानं जात सांगतात. ते लपवीत नाहीत. असाच एक प्रसंग. 'मी चांभार आहे.' त्याचं स्वाभिमानी बोलणं. तसा पुढील व्यक्ती म्हणाला, "आपण कुठले आहात?" "महाराष्ट्रातील आहो." "महाराष्ट्रातील म्हणजे?" "महाराष्ट्रातील म्हणजे, मी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी आहे." "असं कसं होवू शकेल! अहो, महाराष्ट्रात फक्त एकच जात होती, ती म्हणजे महार. इतर जाती नव्हत्याच. मला कायद्याचा अभ्यास आहे." तो व्यक्ती बोलत होता व कायद्याचा अभ्यास आहे असं सांगून अज्ञानता प्रगट करीत होता. त्याला कदाचीत माहीत नव्हते की चवदार तळ्याच्या आंदोलनाच्या वेळेस याच महाराष्ट्रातील महाडला राहणाऱ्या भैय्यासाहेब व नाशिकला राहणाऱ्या शिवतरकर गुरुजींनी मदत केली होती आंदोलनात. जे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी होते. तेही चांभारच होते. त्याचं म्हणणं होतं की एक महार जात सोडली तर चांभार, मेहतर व इतर जाती या महाराष्ट्राबाहेरील आहे. असा त्याचा जावईशोध संबंधीत व्यक्तीला विचार करण्यास भाग पाडणारा होता. त्यानंतर तो पुढं म्हणाला, "मला सांगा, तुम्ही बौद्ध आहात की हिंदू?" "मी बौद्ध." "असं कसं होवू शकेल?" "का होणार नाही?" "अहो बरेचसे चांभार हे हिंदूच आहेत. मग तुम्ही कसे काय बौद्ध? अन् तुम्ही चर्मकार म्हणत जा. चांभार नको." त्या व्यक्तीचे निरर्थक प्रश्न. त्यावर उत्तर देत त्या व्यक्तीचा स्वाभिमान कुठंतरी ठेचला जात होता. परंतु वाद जर वाढवला तर वाद विकोपाला जाईल. याचा विचार करुन उत्तर देणारा व्यक्ती गप्प होता. समाजात अशीच उपद्व्यापी माणसं असतात. ज्यांना काहीच करायचं नसतं जात आणि धर्माचं. तरीही जातीवरुन व धर्मावरुन ते वेगवेगळे प्रश्न विचारत असतात. त्यानंतर ते गोत्यात येतात. वरील व्यक्तीस अमूक व्यक्ती हा चांभार आहे की तो चांभार नाही हे विचारुन जातवाद तयार करायची काय आवश्यकता होती? वरील व्यक्तीला ती जात बौद्धात येत नाही, हिंदूत येते हे म्हणून धर्मवाद निर्माण करायची काय आवश्यकता होती? तसेच वरील व्यक्तीला चांभार हे महाराष्ट्रातील नाही, ते बाहेरुन आले असेही विचारायची काय आवश्यकता होती? तरीही काही लोकं निरर्थकपणे असे प्रश्न विचारून जातवाद, धर्मवाद व प्रदेशवाद तयार करीत असतात. काही लोकं तर असेही दिसतात की त्यांना त्या विषयाचं काही घेणंदेणं नसतं. ना नफातोटा असतो. तरीही ते विनाकारण असे उपद्रवी प्रश्न विचारत असतात. जसे आर्य विदेशी आहेत, ते विदेशातून आले म्हणणे, इंग्रजांनी कोहिनूर नेला म्हणणे, शिवाजी महाराज हे हिंदूचेच होते असे म्हणणे, इत्यादी गोष्टी या समाजात तेढ निर्माण करणाऱ्या गोष्टी आहेत. तशा प्रकारच्या गोष्टी केल्यानं समाजात तेढ निर्माण होते. जी तेढ सामाजिक एकतेला त्रासदायक ठरते. ज्या गोष्टी करुन काहीच समाज तुटत असतो. समाजात पुर्वीपासून असेच वातावरण होते. एससी एसटीला असेच बोलणे बोलून समाजातील काही लोकांनी उच्च जातीपासून तोडले. त्यांचेवर अनन्वीत अत्याचार झालेत. त्यांना समाजापासून दूर ठेवले. उच्च जात व कनिष्ठ जात यात भेदभाव निर्माण केला. केवळ समाजात भेदभावच निर्माण केला नाही तर त्याच भेदभावावरुन त्यांचे त्या काळात अनन्वीत हालहाल केले. आजही ती परिस्थिती सुधारली नाही. आज कायद्याचं राज्य असल्यानं थोडीशी परिस्थिती व वास्तविकता दबून आहे. परंतु पुर्ण परिस्थिती व वास्तविकता दबून नाही. ही परिस्थिती व वास्तविकता कधीकधी डोकं वर काढते व त्यानंतर वरीलप्रमाणे लोकं बोलत असतात व समाजात तेढ निर्माण करीत असतात. विशेष सांगायचं झाल्यास माणसानं समाजात अशा प्रकारच्या गोष्टी करुन समाजात तेढ निर्माण करावी काय? माणसानं माणसाप्रमाणे राहतांना इतर लोकांशी पशुगत व्यवहार का करावा? पशूही कधी तसा व्यवहार करीत नाहीत. ते आपल्या कळपातील इतर प्राण्यांना वेळप्रसंगी मदतच करतात. जेव्हा एखाद्या प्राण्यांवर एखादा सिंह हल्ला करतो. तेव्हा रानातील रानरेडे त्या सिंहाचीही वाट लावून टाकतात. इथं तर आपण माणसं आहोत. मग माणसानं समाजात तेढ निर्माण करण्याऐवजी एकतेनं का राहू नये? का माणूसकीसारखे वर्तन करु नये? असे अनेक प्रश्न आहेत की ज्याची उत्तरं कालही नव्हती आणि आजही नाहीत. आजही समाजात अशाच वर्गामुळे समाज नासतो. समाजाला त्यातून वेगवेगळ्या अत्याचाराचा सामना करावा लागतो आणि अशाच कुमानसिकतेनं समाजातील लायक व्यक्तीचे हक्कं डावलले जातात. मग निर्माण होतो संघर्ष. त्या संघर्षातून वणवे तयार होतात. जे वणवे संपुर्णतः असे बोलाची कढी असणाऱ्या व्यवस्थेला नष्ट करीत असतात. जे डॉ. बाबासाहेब, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगेमहाराज, समर्थ रामदास स्वामी यांच्या रुपानं झालं हे तेवढंच खरं. शाळेच्या नोकऱ्या, शाळेचे पद व शाळेच्या पदोन्नत्या. या सहजासहजी मिळत नाहीत. त्यासाठी लोकांना बराच संघर्ष करावा लागतो. शिवाय एससी, एसटी जातींना तर जास्तच समस्या येते नोकरी मिळवितांना. काही काही खाजगी संस्थांमध्ये नोकरी मिळवितांना सहजासहजी त्या नोकऱ्या मिळत नाही. समजा एखाद्या शाळेत एससी, एसटीचे पद असल्यास शाळेचे मालक असलेले संस्थाचालक हे आपल्या शाळेची जाहीरात वर्तमानपत्रात छापून आणतात. परंतु आपल्याला एससी, एसटीचा उमेदवार मिळाला नाही अशी बनवाबनवी करुन ते एससी, एसटीचा उमेदवार भरतच नाहीत. आपल्याच जातीतील लोकांची पदभरती जास्त करतात. जे संस्थाचालक त्या जातीचे असतात वा एकमेकांचे पक्के नातेवाईक असतात. एक शाळा अशीच की त्या शाळेत संबंधीत व्यक्तीचा अधिकार पदावर म्हणजेच मुख्याध्यापक पदावर दावा होता. परंतु संबंधीत संस्थेला तो दावा नाकारायचा असल्यानं त्यांनी त्या शाळेतील संबंधीत शिक्षकाला भल्लं मोठं आरोपाचं पत्र दिलं व त्याची पदोन्नती नाकारली. शिवाय धमकी दिली होती की जर त्यानं अधिकार पदावर दावा केलाच तर त्याचेवर चौकशी बसवून त्याला नोकरीवरुन काढून टाकण्यात येईल. नोकरी..... आयुष्याला सुखकारक करणारी वस्तू. तीच जर नसेल तर व्यक्तीला आपले हातपाय गळल्यासारखे वाटतात. जे नोकरीवर असतात, त्यांच्यासाठी हा अनुभव असतो. त्यातच खाजगीकरण..... खाजगीकरण लोकांच्या आयुष्याचं वाटोळं करणारी वस्तू. खाजगीकरणात व्यक्तीला आपल्याच नातेवाईकांची किंमत असते. जात महत्वाची असते. जातीच्या लोकांना मुख्य पदे दिली जातात. जरी ते उच्चशिक्षित नसले तरीही अन् लायक नसले तरीही आणि इतर जातीतील लोकांना दुय्यम कामे दिली जातात. जरी ती मंडळी उच्चशिक्षित असली तरीही. बरं झालं की डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान बनवलं व त्या संविधानानुसार एस सी, एस टीच्या संधीच्या जागा या टक्केवारीनुसार सोडल्या. त्यामुळं आज एस सी, एस टीचा उमेदवार घेणं बंधनकारक आहे. म्हणूनच आजच्या काळात खाजगी संस्थाही एस सी, एसटीचे उमेदवार नोकरीवर घेतात. कारण ते जर नसतील तर अशा खाजगी शाळा या मान्यता पावत नाही अर्थात त्यांना मान्यता मिळत नाही. एससी, एसटी अंतर्गत येणाऱ्या जातींना विशेष आरक्षण आहे. कारण या जातींना आरक्षण जर नसतं तर आजही याच जाती, काल जशा भीक मागून जगत होत्या. लोकांच्या उष्ट्या पत्रावळी चाटत होत्या. तेच कृत्य आजही करावं लागलं असतं. आरक्षण जर नसतं तर आजही या जातीतील एकही व्यक्ती नोकरीवर नसता आणि त्यांना मुख्य पदाच्या जागाही मिळाल्या नसत्या हे तेवढंच खरं आहे. आरक्षण आहे म्हणूनच आजचा एससी, एसटी समाज नोकरीच्या क्षेत्रात मोठमोठ्या हुद्यावर आहे. आरक्षणाच्या बाबतीत लोकं म्हणतात की आरक्षण नकोच द्यायला. पुरे झालं आरक्षण. देशाला अमूक अमूक वर्ष झाली. बाबासाहेबांनी फक्त दहाच वर्ष म्हटली होती आणि तशी दहाच वर्षासाठी आरक्षणाची तरतूदही केली होती घटनेत. परंतु आजही आरक्षण आहे की जे आज समाप्त व्हायला हवं. यात महत्वपुर्ण बाब ही की लोकांचं सगळं म्हणणं बरोबर आहे. परंतु खरं सांगायचं झाल्यास आज आरक्षण आहे तरी एस सी, एसटीची गत ही एखाद्या लाचार असलेल्या उंदरासारखीच आहे. आजही उच्च जातीतील लोकं या समाजाला वा या जातीजमातीला आपल्या बरोबरीचे स्थान देत नाहीत. त्यांना नोकऱ्या न देता, त्यांच्या जागेवर उमेदवार मिळालाच नाही असे वक्तृत्व करुन त्यांच्या जागा भरतात आणि भरल्या आहेत. हे चौकशी केले असता बऱ्याच संस्थेत आढळून येते. तसेच अनुसूचित जातीच्या व्यक्तीचा किंवा अनुसूचित जमातीच्या व्यक्तीचा खाजगी संस्थेत उच्च पदावर अधिकार असेल तर त्याला फार मोठ्या स्वरुपात कारणे दाखवा नोटीस दिला जातो व त्याची पदोन्नती नाकारली जाते. तरीही त्यानं पदोन्नतीसाठी अर्ज दिलाच तर त्याची कत्तल म्हणून त्याचेवर जाचक अटी लावून त्याच्यावर वेगवेगळे आरोप केले जाते. त्याला अशा प्रकारे घाबरवले जाते की त्या जातीचा व्यक्ती घाबरेल व तो सहजच आपला अधिकार सोडून तो आपली अधिकाराची पावले मागे घेतो. असे बरेच संस्थेत झाले आहे. शिवाय एखादा व्यक्ती या प्रक्रियेत घाबरणारा नसेल तर त्याचेवर उठसूठ कोणतेही आरोप केले जातात व त्याचेवर चौकशी आरोप लावले जातात. त्यानंतर त्याचेवर चौकशी बसवली जाते. ज्या चौकशीत चार पाच वर्ष सहजच निघून जातात. मग त्याला त्याचा गुन्हा नसतांना निलंबित केले जाते. ज्यातून त्याला न्यायालयीन खटला लढावा लागतो. ज्यातून पैसा नसल्यानं त्याचा न्यायालयीन खटल्यातही पराभव होतो व त्याची नोकरी जाते. असं होवू नये म्हणून कोणताच एससी, एसटीतील व्यक्ती खाजगी संस्थेत अधिकार मागत नाही. आपली नोकरी बरी व आपण बरं अशी भुमिका ठेवतो. महत्वपुर्ण सांगायचं म्हणजे काल शुर जात वा जमात असलेला हा एससी, एसटी प्रवर्ग. ज्या वर्गानं काल राजे बनून शत्रूला जेरीस आणलं होतं नव्हे तर अधिकारपदाच्या जागा प्राप्त करुन काल राज्याचं रक्षण केलं होतं. शिवाय सर्वांना माहितच असेल गणपत गायकवाडांचा पराक्रम. त्यांनी छातीला माती लावत परिणाम माहित असतांनाही संभाजीला आपलाच धनी समजून त्याच्या देहाचे औरंगजेबानं पाडलेले तुकडे गोळा केले होते व त्यांच्या देहाचे ते तुकडे शिवून त्यांचा आपल्याच अंगणात दाहसंस्कार घडवून आणला होता. त्यानंतर त्यांना पकडून औरंगजेबानं संभाजीहुनही बढतर असे गणपतचे हालहाल केले. आज देशाला संभाजीचे बलिदान माहित आहे. परंतु गणपत गायकवाडांना देश विसरला आहे. एवढंच नाही तर आज त्याच गणपत गायकवाडाचे वंशज असलेल्या तमाम एससी जातीच्या लोकांचे आरक्षण संपविण्याचा प्रयत्न तमाम उच्चवर्णीय करीत असल्याचे दिसून येते. एवढंच नाही तर ज्या बख्त बुलेंदशहाचं राज्य संपूर्ण विदर्भात होतं. ज्यानं गोंडांना विशेष असा दर्जा मिळवून दिला होता. त्या गोंडांची आजची अवस्था पाहिली तर आरक्षण अति आवश्यक असल्याचं दिसतं. आजही बरेचसे आदिवासी शिक्षणाच्या कप्प्यात नाहीत. मग ते अधिकार पद सोडाच. विशेष म्हणजे ज्या बाबासाहेबांनी संविधान बनवलं व सर्वात प्रथम कलम ३४० ही ओबीसी वर्गासाठी लिहिली व त्या कलमेचा घटनेत समावेश केला. त्यानंतर आपल्या लेकरांसाठी ३४१ वी कलम लिहिली. तोच ओबीसी वर्ग आज बाबासाहेबांच्या याच लेकरांचे आपल्या संस्था उघडून त्यात नोकऱ्या देतांना हालहाल करीत आहेत. ग्रामीण भागात बऱ्याचशा शाळेत एससी व्यक्ती जर शिक्षक असेल, तरीही त्यांच्या अधिकाराची जोपासना न होता, त्याला शाळेतील कुडा कचरा स्वच्छ करण्याच्या कामी लावले जाते आणि बिचारा एससी, एसटी वर्ग ते नाईलाजानं करतोच. कारण पर्याय नसतो. पदोन्नती तर सोडाच, त्याला त्याची नोकरी गमाविण्याची स्थिती असते. बऱ्याचशा ठिकाणी अधिकार प्राप्ती ही सहज होत नाही. त्यासाठी बरीच पापडं बेलावी लागतात. हे तेवढंच खरं आहे. मग ते मुख्याध्यापक पद का असेना. साधं मुख्याध्यापक पद जर मिळवायचं असेल तर संस्था सहजासहजी ते बहाल करीत नाही. चांगले भल्ले मोठे आरोपाचे पत्र उमेदवाराला दिलं जाते. ज्यातून घाबरुन जावून संबंधीत उमेदवार आपला त्या पदावरील हक्कं सोडेल. एवढंच नाही तर त्यातूनही तो उमेदवार तरलाच तर त्याचेवर चौकशी बसवून त्याला निलंबित केले जाते. अन् त्यातूनही तो उमेदवार तरलाच तर त्याला न्यायालयामार्फत अधिकार पद मिळतं. परंतु हे खाजगी संस्थानीक त्यालाही घाबरत नाहीत व पुढे त्याच उमेदवाराच्या पेन्शनच्या वेळेस त्याच्यात व्यत्यय आणत असतात. असे घडू नये म्हणून आजही बरीचशी एससी, एसटीतील माणसं अधिकार पद प्राप्त करण्याच्या मागे लागत नाहीत व सहजासहजी आपला अधिकार सोडून देतात. कारण आजही देशातून भेदभाव गेलेला नाही. मग तो खाजगी संस्थेतून कसा जाणार! त्यामुळंच नेमकं एक उद् गार पुढे येतं, ते म्हणजे अजून अत्याचाराचे शिकार किती? नारायण सरांना आठवत होता तो काळ. जो काळ त्यांच्या आयुष्यात भयावह गेला होता. ते जेष्ठ होते व त्यांचा मुख्याध्यापक पदावर दावा होता. त्यासाठी त्यांनी मुख्याध्यापक पदावर आपला अधिकार दाखवला होता. परंतु संस्थाचालकांना ते मान्य नव्हतं. त्यांना नारायण सरांना मुख्याध्यापक पदावर बसवायचं नव्हतं. त्यांना आपल्या नातेवाईकांना पदावर बसवायचं होतं. शिवाय त्यांची जातही त्यांना खलत होती. त्यामुळंच त्यांचा दावा त्यांनी फेटाळून लावला व तो दावा फोल ठरावा म्हणून त्यांनी त्यांना कारणे दाखवा नोटीस दिले होते. ज्यात लिहिलं होतं की आपल्याला मुख्याध्यापक पद का द्यावं? आपण यापुर्वी संस्थेचं न ऐकता आपल्याच मतानं कारभार केलेला आहे. तो कारणे दाखवा नोटीस व त्यात केलेले ए टू झेड आरोप. अंदाजे सोळा ते सतरा वेगवेगळ्या स्वरुपाचे आरोप की ज्यातून नारायण सरांची सुटकाच नाही. आज शाळेत मुलांना आनंदी ठेवावं. ते जर दुःखी असतील तर तो त्यांचा अपमान असतो. असं शासनाचं म्हणणं आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांची भीती ही नष्ट झालेली आहे. असं असतांना आजचे विद्यार्थी हे शाळेत सोडा आपल्या घरीही आपल्या पालकांनाही घाबरत नाहीत. अशी आजची अवस्था झालेली असून आजच्या विद्यार्थ्यांचा जसा अपमान होवू नये हे शासनाला अभिप्रेत आहे व त्यादृष्टीनं शासनानं पावले उचललेली आहेत. अध्यादेश बनवले आहेत. शिक्षकानं त्यानुसार विद्यार्थ्यांचा अपमान होवू नये म्हणून विद्यार्थ्यांना काही अपमानदर्शक शब्दप्रयोग करु नये. त्यांना मारु नये. यासाठी सरकारनं अध्यादेश काढून शिक्षकांना धारेवर धरले आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांचा शाळेत नेहमीच सन्मान होत असतो. त्याला मारले जात नाहीत. त्याला धाक दाखवला जात नाही व त्याला अपमानदर्शक शब्दही बोलले जात नाहीत. मात्र ज्या विद्यार्थ्यांचा तो सन्मान करतो, त्या शिक्षकांच्या होणाऱ्या अपमानावर कोणीच अभय देत नाही. कोणी बोलत नाहीत वा तशा स्वरुपाचे अध्यादेश काढत नाहीत. ही शोकांतिकाच आहे. आता शिक्षकांचा अपमान कोण करतो? असं कोणीही म्हणेलच अन् म्हणतातही. म्हणतात की काय शिकवतात शिक्षक. काहीच शिकवीत नाहीत. कोणी म्हणतात की शिक्षक वर्ग फुकटचे वेतन घेत असतो. कोणी म्हणतात की शिक्षकांना किती सुट्ट्या असतात. हे बोलणं म्हणजे शिक्षकांचा अपमान करणारेच असते. परंतु शिक्षक हा सहनशील असल्यामुळे तो सहसा या बाबींवर दुर्लक्ष करतो. उत्तर देण्याचं टाळतो. मात्र जावं त्याच्या वंशा, तेव्हा कळे याप्रमाणे शिक्षकांनाही भयंकर त्रास असतोच. तो कोणीही जाणत नाही वा समजू शकत नाही. शिक्षकांचा अपमान करणारे बरेच घटक आहेत. त्यात मुख्य घटक आहे शाळेचा मुख्याध्यापक, जो एकेरी शब्दात बोलतो. जो पैसे उकळण्यासाठी अपमान करणारे शब्द बोलतो. शिक्षकांचे काम चांगले असतांनाही जो घटक चांगले नाही असेच दाखवून वातावरण गढूळ करतो. शिक्षकांचा अपमान करणारा दुसरा घटक आहे, संस्थाचालक. हाही घटक शिक्षकांना एकेरी शब्दात बोलतो. हाही घटक पैसे उकळण्यासाठी मुख्याध्यापकामार्फत शिक्षकांना धारेवर धरतो. अपशब्दात बोलतो. कधीकधी शिक्षकांना मारतो देखील. यात शिक्षकांचा अपमान नसतो काय? परंतु त्यावर कोणीच बोलत नाहीत. त्यानंतरचा शिक्षकांचा अपमान करणारा घटक असतो पालक. पालक केव्हाही शिक्षकांची अक्कल काढत असतात. केव्हाही अपमान करीत असतात. शिक्षकांचा अपमान करणाऱ्या घटकात आणखी एक महत्वपूर्ण घटक असतो, तो म्हणजे विद्यार्थी. विद्यार्थीही शिक्षकांचा अपमान करण्यासाठी मागेपुढे पाहात नाहीत. अलिकडील विद्यार्थी सरळ आपल्या शिक्षकास धमकीच देतात. जर आपण मला रागवाल वा माराल तर मी आपल्या आईवडीलांना शाळेत घेवून येईल. ही धमकीच असते शिक्षकांना विद्यार्थ्यांकडून मिळालेली नव्हे तर हा अपमानच असतो विद्यार्थ्यांकडून शिक्षकांचा झालेला. यावर कोणीच बोलत नाहीत. शिक्षकांचा अपमान करणारे काही आणखी असामाजिक तत्वही असतात की जे सतत शिक्षकांचा पाहून घेवू असे म्हणत अपमानच करीत असतात. यावर कोणीच बोलत नाही. विशेष सांगायचं झाल्यास शिक्षकांचा पदोपदी अपमान होतो, तरीही शिक्षक नावाचा हा घटक त्यांच्याकडून होत असलेला अपमान हा नेहमीच सहन करीत असतो. त्यावर काहीच बोलत नाही. त्यांना फक्त विद्यार्थी शिकले पाहिजेत असंच सारखं वाटत असतं. जरी त्याच विद्यार्थ्यांकडून वा त्याच्या पालकांकडून त्यांचा अपमान होत असला तरी. तसेच मुख्याध्यापक वा संस्थाचालक यांच्याकडून जरी अपमान होत असला तरी. कारण ते विद्यार्थ्यांना आपलंच लेकरु, अशी भुमिका ठेवून शिकवीत असतात. बरेचदा त्यांच्या स्वतःच्या मुलांचा त्याच्या हातून विकास होत नाही. परंतु त्याच्या हातून शिकलेल्या विद्यार्थ्यांचा विकास होतो. हे त्याचं कार्य वाखाणण्याजोगेच असते. परंतु हे कार्य कोणीच विचारात घेत नाहीत. अलिकडील काळात तर शिक्षकांचा शासनही अपमान करु लागले आहे. शासन जबरदस्तीनं शाळा अध्ययन निष्पत्तीची बाब समोर करुन पहिलीच्या विद्यार्थ्यांना अमूक अमूक बाब यायलाच हवी. तिसरीच्या सर्व विद्यार्थ्यांना अर्थपुर्ण वाचन यायलाच हवं असं बंधन घालत आहे. हा अपमानच आहे शिक्षकांचा. कारण सर्वच मुलांची बुद्धीमत्ता ही सारखी नसते व सर्वच मुलांना वाचन येईलच हे काही सांगता येत नाही. काही दोन चार मुलं तांदळात खडे असल्यासारखी विना वाचन करणारी व संख्याज्ञान नसणारीच असतात. हे सांगायला नको. विद्यार्थ्यांना आनंदी ठेवता येतं. तसेच शिक्षक हे त्यांना आनंदीच ठेवतात. त्यासाठी प्रयत्न करतात. ते त्यासाठी तन मन धन अर्पण करतात. कधीकधी त्यात काही बंधनं येतात. ती एक शाळा व त्या शाळेत शासनाच्या अध्यादेशानुसार विद्यार्थ्यांना आनंदीत करण्यासाठी वाढदिवस साजरा करण्याचे उपक्रम दैनंदिन चालायचे. त्यातच विद्यार्थ्यांनी त्रिशाच्या नेतृत्वात ठरवलं. आपण आपल्याही शिक्षकांचा वाढदिवस साजरा करावा. मग काय विद्यार्थ्यांनीच पैसे गोळा करुन एक छोटेखानी केक आणला. नारायण सरांची इच्छा नसूनही त्यांना जबरदस्तीनं बसवलं व केक कापून ते आपला आनंद साजरा करु लागले. अशातच त्या शाळेतील संस्थाचालकानं फोटो काढले. तो वाढदिवस, त्यातच शाळेत विद्यार्थ्यांनी साजरा केलेला वाढदिवस. त्या वाढदिवसाचे फोटो त्या शाळेतील संस्थाचालकांनं काढले होते व त्याची तक्रार वरच्या अधिकाऱ्यांकडे केली होती. तेव्हा वरच्या अधिकाऱ्यांनी त्या प्रकरणाची शहानिशा केली. तसं पाहिल्यास वाढदिवस साजरा करण्याला शासनानं मंजूरी प्रदान केली आहे. कोणत्याही विद्यार्थ्यांचा वाढदिवस असेल तर तो साजरा करावा असा अध्यादेश आहे. परंतु शिक्षकांचेही वाढदिवस साजरे करावे असा अध्यादेश नाही. त्यातच सरांचा विद्यार्थ्यांनी केलेला वाढदिवस शाळा संस्थाचालकाच्या मनात खुपला व तो तक्रारकर्ता झाला. ती तक्रार. त्यावर शिक्षणाधिकारी साहेब बोलले, "बाबा, आपली मुलं काय करतात?" "इंजीनियर व डॉक्टर आहेत. " "कुठे राहतात?" "अमेरिकेत." "आपल्या स्नुषा कुठे राहतात?" "अमेरिकेत." "नातवंड असतील ना घरी तुमच्याजवळ?" "नाही." "आपली मुलगी राहात असेल ना आपल्याजवळ?" "नाही." "ती कुठं राहते?" "पतीकडे." "मग आपण घरी एकटेच राहता का?" "पत्नी आहे ना सोबत." "बाबा, बरोबर आहे. आपण एकटेच राहता ना घरी. मग आपल्याला आनंद कसा कळेल? हे बघा, या फोटोत सरांचा वाढदिवस साजरा होत आहे आणि त्याचा आनंद मुलं घेत आहेत. सर्वात महत्वपुर्ण आहे आनंद. तो कधीच कुणाला सहजासहजी मिळत नाही. आपण आनंद घ्या. इतरांनाही मिळू द्या. त्यातच सुख असतं. आपण काय घेवून जाणार आहोत. ही संपत्ती, ह्या गाड्या घोड्या. यापैकी काहीच घेवून जाणार नाही. घेवून जाणार आहोत आनंद. जो आपण इतरांना देवू शकू. इतर लोकं आपलं नाव घेतील की अमूक व्यक्ती हा चांगला होता. जर चांगलं कर्म कराल तर..... नाहीतर आपल्यानंतरही लोकं म्हणतील की अमूक अमूक व्यक्ती हा खराबच होता. बाबा, चांगले कर्म करा. कर्मच परत येत असतात." वरच्या अधिकाऱ्यानं नारायण सरांची बाजू उचलून धरली. परंतु संस्थाचालक चूप बसेल तेव्हा ना. त्यानं पत्र दिलं त्यांना. त्यावर मात करण्यासाठी सरांना एक जळजळीत उत्तर लिहावं लागलं. ते उत्तर नारायण सरांनी लिहिलं होतं. आनंद..... आनंद हा शोधूनही मिळत नाही. तो सापडतच नाही. काही लोकांना दुसऱ्यांना त्रास देण्यातच आनंद मिळतो. त्याला असुरी आनंद म्हणतात. संस्थाचालकांना शिक्षकांकडून देण म्हणून पैसे हवे असतात. त्यासाठी ते विद्यार्थी व शिक्षकांचा आनंद पाहात नाहीत. ते लहानश्या मुलागत वागतात. जशी लहान मुलं. काही मुलं नक्कीच चांगली असतात. ती मुक्या प्राण्यांच्या वाट्याला जात नाहीत. मात्र काही वात्रटही असतात. ती खेळ म्हणून फुलपाखरांना पकडतात. त्याच्या शेपटांना धागे बांधतात. काही चिमण्यांना पकडतात. त्यांच्या पायाला धागा बांधून त्यांना उडवतात. काही सरड्यांना पकडून त्याला तंबाखू चारुन त्याची गंमत पाहतात. काही पाण्यातील बेडकांना विनाकारण दगडं मारतात तर काही शांतपणे बसलेल्या वा झोपलेल्या कुत्र्याला दगडं मारुन त्रास देतात. काही मुलं लहान लहान झाडं तोडतात तर काही काजव्यांना एका पांढऱ्या काचेच्या बाटलीत बंद करतात. मुलं अशी कृत्य करतात. त्यात त्यांना आनंद वाटतो. परंतु त्यात मुक्या प्राण्यांना त्रास होतो, त्यांचा जीव जातो. याचं त्यांना साधं देणंघेणं नसतं. विशेष सांगायचं झाल्यास ज्या शाळेतील विद्यार्थ्यांचा अपमान होवू नये म्हणून शिक्षकांवर बंधनं आहेत. त्याच शाळेत शिक्षकांचा अपमान होवू नये यावर बंधनं नसावीत काय? जो राष्ट्र घडवतो. त्या शिक्षकांचा अपमान होवू द्यावा काय? शिक्षकांचा मुख्याध्यापक, संस्थाचालक, पालक, विद्यार्थी, समाजमाध्यमं याद्वारे नित्य होणारा अपमान टाळता येवू शकत नाही काय? यावर खरंच विचार करण्याची गरज आहे. विशेष म्हणजे खऱ्या अर्थानं शिक्षकांचा अपमान होणार नाही. तो खऱ्या अर्थानं सुखी होईल, तेव्हाच शिक्षक सुखी होईल. अन् जेव्हा शिक्षकांचा अशा विविध माध्यमाद्वारे अपमान होणार नाही. तेव्हाच विद्यार्थीही सुखी होईल. त्याचबरोबर राज्य आणि देशही सुखी होईल यात शंका नाही. म्हणूनच ज्याप्रमाणे विद्यार्थ्यांचा अपमान होणार नाही. साध्या बोलण्यानंही नाही. याकडे जसं शासनानं लक्ष घातलं. तसंच लक्ष शिक्षकांचाही अपमान होणार नाही याकडे घालण्याची गरज आहे. त्यासाठी वेगळ्या स्वरुपाचा मजबूत असा अध्यादेश तयार करण्याची गरज आहे. तो अध्यादेश शासनानं तयार करावा व शिक्षकांचाही अशा विविध माध्यमाद्वारे अपमान होणार नाही याची विशेष काळजी घ्यावी. कारण शिक्षक हा एकमेव घटक असा आहे की जो विद्यार्थीच नाही तर देशाला सुसंस्कारीत करु शकतो आणि राष्ट्रही घडवू शकतो. हे तेवढंच खरं आहे. ते तात्कालिक कारण. तेवढ्या मोठ्या अधिकारी वर्गानं संस्थाचालकाला समजावलं तरी ते ऐकले नाहीत व तेच कारण पुढं करुन त्यांनी जाणीवपूर्वक त्यांना पदावरुन हटविण्यासाठी पावले उचललीत व नारायण सरांना हटवलं. त्यानंतर त्यांनी आपल्या नात्यातील दूरच्या व्यक्तीला पदावर बसवलं. ज्यानं काही दिवसानंतर ती शाळाच आपल्या नावावर केली होती. त्यानंतर त्याला घरातच नजरकैदेत टाकल्यासारखी त्याची अवस्था केली होती. बाहेरुन कुलूपबंद असायचं. त्याला फिरायला बंदी असायची. त्याचं कारण होतं, ती शाळा आपल्या नावावर केल्याची गोष्ट त्यानं कोणाला सांगू नये. संस्थाचालकाला दोन मुलं होती. दोघांनीही आपलं सुखच पाहिलं होतं. संस्थाचालकाने शिक्षकांना त्रास देवून बरीच संपत्ती गोळा केली होती. ज्यात त्यांनी शाळेच्या खाजगीकरणाचा लाभ घेतला होता. ती सर्व संपत्ती मुलांना नको होती. ती आपल्या आयुष्यात अमेरिकेत स्थावर झाली होती. देशांतर्गत असलेली अचल संपत्ती ही त्याच्या दुरच्याच नातेवाईकांनी हडपली होती आणि शेवटचे दिवसही त्याचे कठीणच गेले होते. ते शेवटचे दिवस. संस्थाचालक जेव्हा नजरकैदेत होता. तेव्हा त्याला ते शेवटचे दिवस आठवत होते. तो शाळेतील शिक्षकांना दिलेला त्रास त्याला स्वस्थ बसू देत नव्हता. त्यातच त्याला आठवत होते ते नारायण सर. ज्यांना कारणे दाखवा नोटीस देवून त्यांनी पदावरुन हटवलं होतं. व्यतिरीक्त त्यांना नोकरीवरुनही हटवलं होतं. परंतु आयुष्यातून त्यानं नारायण सरांना नोकरीवरुन हटवून काय मिळवलं होतं. तोच तो असूरी आनंद आणि त्या वेदना. आपल्याच घरात राहून आपल्यासाठीच निर्माण झालेली नजरकैद. एखाद्या श्वानालाही चांगलं सुग्रास अन्न मिळत होतं. परंतु त्याला ते अन्न नशिबात नव्हतं. स्वतःची मुलंही त्याच्याकडे ढुंकून पाहात नव्हती. त्यातच तो तीळ तीळ मरत होता. संस्थाचालक म्हातारा होता. कधीकधी वाटत होतं की मृत्यू यावा. परंतु त्याला मृत्यूही येत नव्हता. अशातच आयुष्याची जोडीदार असलेली पत्नीही मरण पावली होती. आता तो एकटाच अभागी अनाकलनीय अवस्थेत मृत्यूची वाट पाहात होता. (१५) खाजगीकरण...... खाजगीकरणाचा त्रास हा नारायण सरांना झाला. नारायण सर हे अनुसूचित जातीचे होते व त्यातच ते ज्या शाळेत नियुक्त झाले होते. तो संस्थाचालक उच्चवर्णीय होता. त्यातच भारत स्वतंत्र झाला असला तरी देशातील भेदभाव दूर झाला नव्हता. तसाच भेदभाव नारायण सरांच्याही शाळेत होता. शिवाय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पदोन्नती व शिक्षणासाठी आरक्षणाची तरतूद केली होती. ज्या आरक्षणाचा फायदा नारायण सरांनाही होणार होता व त्याच भेदभाव मानणाऱ्या संस्थाचालकाच्या शाळेत नारायण सर आरक्षणानुसार मुख्याध्यापक बनणार होते. ही बाब संस्थाचालकाला माहीत होती. त्यातच नारायण सर पदावर बसू नयेत. असे त्या शाळेतील भेदभाव करणाऱ्या संस्थाचालकाला वाटत होतं. शेवटी संस्थाचालकानं नारायण सर पदावर बसू नयेत म्हणून डाव रचणं सुरु केलं. त्यातच त्यांच्यावर मुख्याध्यापकाकरवी आरोप लावणे व ताशेरे ओढणे सुरु केले. नारायण सरांना त्या शाळेत नियुक्त करणं भाग होतं. कारण प्रत्येक शाळेला एस सी एस टीचा कोटा भरणं आवश्यक होतं. एकातरी एससी उमेदवाराची शाळेत भरती करावीच लागत होती. त्यामुळंच नाईलाजास्तव नारायण सरांची नियुक्ती आपल्या शाळेत संस्थाचालकाला करावीच लागली. परंतु आरक्षणानुसार त्याला पुढे पदभार मिळू नये. तो टाळता यावा म्हणून संस्थाचालकानं आधीपासूनच त्यांच्यावर आरोप करणे सुरु केले. ज्यातून त्यांच्याशी जाणूनबुजून वाद करण्यात आला. त्यांना त्रास व्हावा व त्यांनी आडवेतिडवे पाऊस उचलावे म्हणून त्यांचे जाणूनबुजून वेतन बंद करण्यात आले. हे सर्व कार्य विद्यमान मुख्याध्यापकामार्फत केले गेले. नारायण सरांना मुख्याध्यापक फार त्रास द्यायचे. कारण ते संस्थाचालकाचे नातेवाईक होते. ते संस्थाचालकाचं ऐकायचे. कारण त्यांना शिक्षकांकडून देणगी स्वरुपात पैसा कमवता येत होता. तसं पाहिल्यास संस्थाचालकालाही मुख्याध्यापकामार्फत पैसा मिळत होता. म्हणूनच संस्थाचालकाच्या क्लुप्त्या सुरु होत्या. शिवाय संस्थाचालक जेही आदेश मुख्याध्यापकांना द्यायचे. तेच आदेश मुख्याध्यापक पाळायचे. ज्यातून नारायण सरांना व शिक्षकांनाही त्रास व्हायचा. नारायण सराचं प्रारब्ध चांगलं होतं की जो मुख्याध्यापक त्याला त्रास द्यायचा. त्याला एके दिवशी अपघात झाला होता. ज्यात मुख्याध्यापक मरण पावले होते. ज्यातून शाळेवर महाभयंकर संकट निर्माण झालं होतं. नारायण सरांना त्रास देणारे मुख्याध्यापक मरण पावले होते. मुख्याध्यापक मरण पावताच शाळेवर महाभयंकर संकट कोसळले. त्या संकटातून बाहेर काढणं कोणाला जमणार नव्हतंच. शिवाय जुन्या मुख्याध्यापकानं शाळेचा रेकॉर्ड पुर्ण न करता फक्त पैसा कमविण्यासाठीच शिक्षकांना त्रास दिला होता. त्यातच सर्वजण मुख्याध्यापकाच्या निधनानंतर मुख्याध्यापक पदाचा पदभार घ्यायला धजत नव्हते. अशातच नारायण सरांनी त्या पदाचा पदभार स्विकारला. परंतु एक विपरीत घडलं. ते विपरीत होतं, नारायण सरांना मुख्याध्यापक पदाचा पदभार मिळणं. संस्थाचालकाला नारायण सर आवडत नव्हते. कारण ते अनुसूचित जातीचे होते व त्या शाळेतील संस्थाचालक हा भेदभावच करणारा होता. मात्र नारायण सरांना शिक्षणाधिकारी साहेबांनी मुख्याध्यापक पदाचे अधिकार दिले होते. नारायण सरांना मिळालेले मुख्याध्यापक पदाचे अधिकार. तसे ते अधिकार तात्पुरतेच होते. परंतु त्या अधिकारांतर्गत नारायण सरांनी शाळेला संकटातून बाहेर काढलं व शिक्षकांवर जो संस्थाचालकाचा दबाव होता. त्या दबावातूनही बाहेर काढलं. त्यातूनच शिक्षकांकडून संस्थाचालकाला मिळत असलेली देणगीची रक्कम बंद झाली. त्यामुळंच ती रक्कम बंद होताच संस्थाचालक चिडला. ते मुख्याध्यापक पद. त्या पदाचे नारायण सरांना अधिकार मिळताच संस्थाचालक चिडला. ज्यातून त्यानं शाळेतील संपूर्ण रेकॉर्ड आपल्या ताब्यात घेतला नव्हे तर आपल्या पुतन्याला सोबत घेवून लांबवला. ज्यात उद्देश होता की रेकॉर्ड नसेल तर नारायण सरांना शिक्षकांचे वेतन काढता येणार नाही. ज्यातून शिक्षक स्वतः नारायण सरांना पदावरुन हटवतील व त्यानंतर आपल्याला आपल्या शाळेत आपल्या मनानुसार मुख्याध्यापक बसवता येईल. ज्यातून आपल्याला पुन्हा शिक्षकांकडून देणगीची रक्कम सुरु होईल. नारायण सर हे इमानदार होते. ते आपल्या कर्तव्याबाबतही प्रामाणिकच होते. ज्यातून त्यांनी शिक्षकांकडून देणगी गोळा केली नाही. ज्यांनी शिक्षकांना पैशासाठी त्रास दिला नाही. ज्यांनी संस्थाचालकाच्या नावानेही शिक्षकांकडून पैसा मागीतला नाही. ज्यामुळं शिक्षक खुश होते. शिक्षक खुप होते. कारण त्यांना जुन्या मुख्याध्यापकाला आपल्या वेतनातून पैसा द्यावा लागत होता. तो आता नारायण सर मुख्याध्यापक बनताच त्यांना द्यावा लागत नव्हता. ज्यातून पैसा वाचत होता. तो पैसा त्यांच्या घरखर्चाच्या कामात येत होता. नारायण सर तात्पुरते का असेना, मुख्याध्यापक बनताच शाळा संस्थाचालकाच्या मनात खुपत होते. त्यामुळं नारायण सरांना ते सतत त्रास देत असत. त्यांनी जो शाळेचा रेकॉर्ड लांबवला होता. तो रेकॉर्ड नारायण सर सतत मागत असत. तरीही संस्थाचालक त्यांना रेकॉर्ड देत नसे. शिवाय धमक्याही देत असे की मी आपणास पदावरुन हटवूनच राहील. त्याच धमक्या व तो संस्थाचालकाचं रेकॉर्ड न देणं. त्यातूनच नारायण सरांनी न्यायालयात खटला दाखल केला होता. तोच भाग तपासून घेवून त्या त्रासातून पुढं जावून मा. शिक्षणाधिकारी महोदयांनी नव्या दमाच्या शिक्षिकेला मुख्याध्यापिका बनवलं. जी जेष्ठ होती. ती नव्या दमाची शिक्षीका. ती देखील संस्थाचालकाच्याच जातीची होती. परंतु तिच्याशीही संस्थाचालकाचं पटलं नाही. त्याचं कारण होतं पैसा. ती एक छदामही शिक्षकांकडून वा स्वतःकडून संस्थाचालकाला देत नसे. ज्यातून तिलाही संस्थाचालक त्रास देत होता. आज तिच्या मुख्याध्यापक पदाचा कार्यकाल संपायला दोन महिने बाकी होते. तोच नारायण सर सेवाजेष्ठ असल्यानं त्यांनी पुन्हा मुख्याध्यापक पदाचा अर्ज केला. परंतु त्यावर विचारविमर्श न करता परत भेदभाव करणाऱ्या संस्थाचालकानं नारायण सरांनी पदाची मागणी करु नये. त्यांनी पद नाकारावे म्हणून त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवला होता. ज्यात वेगवेगळे आरोप केले होते. ते आरोप होते. संस्था सचिवाशी हेतुपुरस्सर गैरवागणूक करणे, कर्तव्य बजावत असताना अनवधानाने अक्षम्य व गंभीर चुका करणे, कर्तव्यात बुद्धीपरस्पर व सतत हयगय करणे, बिनापरवानगी शाळेत अनुपस्थित राहणे, विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम अपुर्ण ठेवणे, विद्यार्थी व पालकांकडून अध्यापनाबाबत तक्रारी होणे, शाळेतील कर्मचाऱ्यांवर धाक निर्माण करणे, संस्था सचीवाशी अपमानास्पद भाषेत पत्रव्यवहार करणे, अनुसूचित जातीचे असल्याने कर्मचाऱ्यांचे विरोधात ॲक्ट्रासिटीच्या तक्रारी दाखल करणे, शाळेतील पोषण आहार सडणे. म्हटलं होतं की आपले आचरण व शालेय शिस्त ही विघातक असून आचारसंहितेचे उल्लंघन करणारे आहे. आपल्यावर निकाल न देणे, प्रथम सत्राचा निकाल न लावणे, इत्यादी आरोप आहेत. शिवाय म्हटलं होतं की आपली शाळेतील एकुणच वागणूक व वारंवार केलेल्या कर्तव्य भंगाच्या घटना इत्यादी बाबी विचारात घेता आपल्या आक्षेपरीय वर्तणुकीमुळे शाळेच्या प्रशासनावर व कर्मचारी वर्गावर प्रतिकूल विपरीत परिणाम होण्याची शक्यता असून शाळेतील एकूणच वातावरण गढूळ झाले आहे. शाळेत काम करताना शिक्षकाला शालेय शिस्तीचे पालन करणे, आचारसंहितेचे उल्लंघन न करणे, सहकारी कर्मचाऱ्यांशी विनयशीलतेने वागणे, मुख्याध्यापकाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करणे, विद्यार्थ्यांचे अभ्यासक्रम विहित कालावधीत पूर्ण करणे, शिक्षकांचे कर्तव्य व जबाबदाऱ्याचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक असते. यात आपणास शाळा व्यवस्थापनाची कोणती भीती वाटत नसून आपण शाळेत समर्जीने वागत असतांना दिसणे, व्यवस्थापनाच्या पदाधिकाऱ्यांशी आपले वर्तन अशोभणीय असणे. शाळा संस्थाचालकानं व्यवस्थीतपणे सर्व गोष्टी व्यवस्थित पत्रात नमूद केल्या होत्या. ज्या गोष्टी नारायण सरांनी केल्या नव्हत्या. त्याही गोष्टी पुढे करुन संस्थाचालकानं नारायण सरांना पदावरुन दूर करण्यासाठी कारणे दाखवा नोटीस दिला. ज्यावर नारायण सरांनी ज्या गोष्टी केल्या. त्या कितपत बरोबर आहेत. हे सांगण्यासाठी खरमरीत उत्तर लिहिलं आहेस आपण पुर्णपणे बरोबर असल्याचा त्यांनी खुलासा सादर केला होता. (१६) नारायण सर आपल्या घराच्या परसबागेत बसले होते. तसं त्यांना आठवले ते दिवस. ज्या दिवशी त्यांनी कारणे दाखवा नोटीसवर उत्तर लिहिलं होतं. जे पत्र ते प्रभारी मुख्याध्यापक असतांना त्यांनी जो कारभार केला होता. त्या कारभाराला उद्देशून होतं. तसंच त्यांचं मुख्याध्यापक पद नाकारण्यासाठी गतकाळात झालेल्या मुख्याध्यापक साहेबानं व संस्थाचालकानं काय काय कृत्य केलं होतं. त्याला उद्देशून होतं. ते उत्तर होतं, 'मा. महोदय, आपण दि. ला दिलेल्या कारणे दाखवा नोटिसमध्ये लिहिलेले पुर्णच आरोप तसेच कारणे दाखवा या नोटीसमध्ये लिहिलेल्या सर्व क्रमांकाचे सर्व मुद्दे हे पुर्णच खोटे आहेत. त्यामुळं ते मला मान्य नाहीत. मी सेवाजेष्ठ असल्याने सेवाज्येष्ठतेनुसार मलाच मुख्याध्यापक पदाचे अधिकार मिळावेत यासाठी शिक्षणविभागात अर्ज करताच व त्याची प्रतिलीपी आपणास देताच, आपण मला मुख्याध्यापक पद द्यायचे नसल्याने आपण सुडबुद्धीने, उठसूठ कोणतेही बिनबुडाचे मुद्दे पुढे करुन हे पत्र लिहिल्याचे दिसून येत आहे. त्यात संस्थेचीच बदनामी होत आहे. आपण हे गेल्या बऱ्याच वर्षांपासून माझ्याशीच नाही तर आपण नियुक्त केलेल्या इतर कर्मचाऱ्यांबाबत आपले वर्तन दृष्टपणाचेच आहे व आजही आपण दृष्ट वर्तन करीत आहात. तसेच सध्या विद्यमान पदी कार्य करणाऱ्या मुख्याध्यापिकेशी बरोबर वागत नाहीत. ही सत्य परिस्थिती आहे व वास्तविक वस्तूस्थितीही आहे. मा. महोदय, मी आपले पत्र वाचले. वाचल्यानंतर आपण त्यात केलेले आरोप हे तथ्यहीन असल्याचे जाणवले. त्यावरुन हे पत्र ज्यावेळेस मी प्रभारी मुख्याध्यापक होतो आणि मी जर चुकीचा होतो, तर त्याचवेळेस द्यायला हवे होते. परंतु आता मी नियमाने मुख्याध्यापक पदाचा दावेदार असल्याने व त्या अनुषंगाने मुख्याध्यापक पदाच्या मागणीची प्रतिलिपी नियमानुसार आपल्याला पाठविल्याने व आपणाला पुन्हा नातेवाईकच मुख्याध्यापक बनवायचा असल्याने माझा हक्कं डावलण्यासाठी आपल्याला जाग येवून अशा आशयाचे पत्र पाठवले आहे. असे आढळून येते. आपण म्हणता आहात की माझे सहकाऱ्याशी व संस्था सचीवाशी संबंध चांगले नाहीत. परंतु माझे आपल्याशी आजही चांगलेच संबंध आहेत व आजही माझेसाठी आपण सन्माननीय आहात. तसेच माझ्या सहकाऱ्यांशीही माझे चांगलेच संबंध आहेत. हे निवृत्त झालेल्या शिक्षकांनाही विचारुन घ्यावे. त्यामुळेच दोषी ठरत नाही. मात्र आपल्यात थोडासा मुख्याध्यापक पदाचा संभ्रम असल्याने आपण त्याला वाद समजत आहात. मा. महोदय, मी कोणताही आक्षेपार्ह व्यवहार केलेला नाही. मात्र मला पुढील काळात मुख्याध्यापक पदापासून कसे डावलता येईल. ही बाब विचारात घेवून आपण कुत्सीत बुद्धीने पत्रव्यवहार केलेला आहे. तसाच आपण पत्रात मुख्याध्यापिका हा शब्द टाकला आहे आणि विषय दुसर्याच मुख्याध्यापकांच्या काळातील लिहित आहात. यावरुन आपले डोके काम करीत नसल्याचे दिसते. यात मी आठवण करुन देतो की त्यावेळेस मुख्याध्यापिका नाही तर मुख्याध्यापक होते व ते आपलेच नातेवाईक होते. तसाच त्यात आरोप केला आहे की मी प्रथम सत्राचा निकाल दिला नाही. परंतु हे म्हणणे खोटे आहे. कारण दिवंगत मुख्याध्यापक साहेबांनी आपल्याच सांगण्यावरुन मला पैसे मागीतले. मी ते पैसे देण्यास नकार देताच त्याच मागण्यासंबंधाने वाद झाला व मी त्यांची तक्रार पोलीस स्टेशनला केली. तेव्हापासून ते व आपण, आजपर्यंत माझ्याशी वाद करीत आला आहात व माझं जगणंही आपण कठीण करुन टाकलं आहे. शिवाय मी तुम्हाला निलंबित करुनच दाखवीनच. असे ते व आपण वारंवार म्हणत आले आहात. तसेच दिवंगत मुख्याध्यापक आपलेच नातेवाईक असल्याने व आपल्याच सांगण्यावरुन त्यांनी, माझ्याशी भांडण केल्याने त्यांचा बदला घेण्यासंबंधी दिवंगत मुख्याध्यापकामार्फत नंतर वारंवार पत्र पाठवून त्रास देत आहात. त्यावेळेपासूनच माझा मुख्याध्यापक पदाचा अधिकार नाकारण्याचं षडयंत्र करीत आहात. असं यातून दिसून येत आहे. मी गतकाळातील मुख्याध्यापकाची पोलीस स्टेशनला तक्रार केल्याने त्यांनी आपली दिशाभूल करण्यासाठी व माझ्याविरोधात कार्यवाही करण्यासाठी आपली मदत मिळविण्यासंदर्भात तशा आशयाचे जोडपत्र पाठविले व आपणही त्यात सहभागी असल्याचे दिसते. यात खुद्द दिवंगत मुख्याध्यापक हे संबंधीत सर्व शिक्षकांनाच त्रास देत होते. ते आपल्याच स्नुषेलाही त्रास देत होते. मी वर्ग घेवूनही आपण शिक्षणाधिकारी साहेबांची दिशाभूल करण्यासाठी हे पत्र पाठवले असल्याचे दिसते. हेही पत्र मला मान्य नाही. या पत्रातील शेवटच्याच ओळीत दिवंगत मुख्याध्यापक साहेबांचा आकस दिसून येतो. मा. महोदय, आपण एकाच मुद्द्यात अनेक प्रश्न मिळवून संभ्रम निर्माण केला आहे. म्हटले आहे की मी प्रभारी मुख्याध्यापक पदाचा कार्यभार स्विकारण्याकरिता टाळाटाळ केली. हे म्हणणे मला मान्य नाही. कारण जर मला कार्यभार घ्यायचा नसता तर मी त्यापुर्वीच मा. शिक्षणाधिकारी साहेबांकडून मिळालेली प्रभारी मुख्याध्यापक पदाची जबाबदारी स्विकारली नसती. शिवाय आपल्या जोडपत्रात मला जो रेकॉर्ड दिला नाही. जो न्यायालयामार्फत नंतरच्या मुख्याध्यापिकांना दिला. तेही दस्तावेज जोडलेले आढळून येत असून आपण लावलेले संबंधीत जोडपत्र हे संशयात्मकच आहे. त्यात असेही म्हटले आहे की मी शाळा सकाळी ठेवली. त्याचे कारण मी आधीच आपल्याला संदर्भीय पत्रात कळवले होते की कोरोना काळात मोबाईल द्वारे विद्यार्थ्यांना शिकवावे लागत होते. मोबाईल पालकांजवळ सकाळीच असायचा. ते विद्यार्थ्यांना सकाळीच अभ्यासासाठी द्यायचे. दुपारी पालक आपला मोबाईल आपल्यासोबत कामावर न्यायचे. त्यातच शाळा सुरु जरी असली तरी विद्यार्थ्यांना शाळेत येवू द्यायचे नव्हते. स्मार्टफोनद्वारे शिकवायचे होते. त्यामुळंच विद्यार्थ्यांचे हित पाहून ते कोरोना काळातही शिकायला हवे. त्यांचं नुकसान होवू नये. ही बाब विचारात घेवून मी शाळा सकाळ पाळीत ठेवली. तशी दिवंगत मुख्याध्यापकांचे कार्यकाळात सकाळ पाळीतच शाळा भरायची. यात माझे काहीच चुकले नाही. जे काही केले. ते विद्यार्थी हितासाठीच केले. असे मला वाटते. मात्र ही माझी कृती आपल्याला पटत नव्हती. कारण आपल्याला मला मी दिलेल्या तक्रारीवरून त्रास द्यायचा होता. ती कृती आपल्याला पटत जरी नसली तरी विद्यार्थी शिकण्याच्या दृष्टीकोनातून समर्थनीय होती. गतकाळात संस्थाचालक दिवंगत मुख्याध्यापकामार्फत नारायण सरांना त्रास द्यायचा. ज्यातून तो त्रास सहन न झाल्यानं नारायण सरांनी गतकाळातील मुख्याध्यापकाची तक्रार पोलीस स्टेशनला टाकली होती. जी न्यायालयात गेली होती व तो खटला लढता येवू नये म्हणून नारायण सरांचं वेतनही बंद केलं होतं. शिवाय नारायण सरांना देण्यात येणारा इतर त्रास वेगळाच. त्यावर नारायण सरानं लिहिलं होतं. मा. महोदय, संभ्रमीत करणारा आणखी एक मुद्दा की मी शाळेत शिकवले नाही. त्यानुसार आपणास नम्रपणे सांगतो की मला दिवंगत मुख्याध्यापकांनी जाणूनबुजून मी टाकलेल्या पोलीस स्टेशनच्या केसचा बदला घेण्यासाठी वर्गाचे वर्गशिक्षक बनवले नव्हते. ज्यात आपलेही मनसुबे जुळलेले आहेत. त्यात मी दोषी नाही. त्यामुळं संबंधीत वेतन वसूल करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कारण इतर शिक्षक जेव्हा येत नसत. तेव्हा आपले नातेवाईक असलेले मुख्याध्यापक मला वर्गावर पाठवत असत. इतर प्रकारची कामं माझ्याकडून करवून घेत. मा. उच्च न्यायालयाने सर्व बाबी तपासून माझे थांबविलेले त्या दिवसाचे वेतन दिले आहे. त्यामुळं हाही आरोप मला मान्य नाही. शाळेतील ती एक शिक्षिका. तिही आपलीच नातेवाईक आहे. पत्र पाठविण्याचीही सुरुवात त्यांनीच केली. सुरुवातीला त्यांनीच लगातार दोन पत्र आपल्याच सांगण्यावरुन पाठविल्याची शंका येते. मग मला त्यांनी केलेल्या चुका लक्षात घेवून उत्तर पाठवावेच लागले. कारण त्यांनी मला पत्र दिल्यानंतर मी त्यांची उत्तरं न देणं हे संशयास्पद ठरलं असतं. त्यात माझे काहीच चुकले नाही. त्यामुळं मी दोषी नाही. मा. महोदय, मी त्यांचेशी चांगलेच बोललो व चांगलेच वर्तन करतो. शिवाय याकडेही लक्ष वेधू इच्छितो की गतकाळात आपलेच भाऊ यांनी आपलं मुत्र शाळेतील एका पहिल्या वर्गातील विद्यार्थीनीला पाजलं होतं. तसेच त्यांनी एका सातव्या वर्गातील मुलीला चप्पल मारली होती. कोणताही शिक्षक जर कर्तव्यात कसूर करीत असेल तर त्यांना समजावून सांगणे हे मुख्याध्यापकाचे कर्तव्य आहे. तेच मी केले. मा. महोदय, मी संबंधीत पत्रात विनंती केली आहे. ते आपल्या लक्षात आले नाही. त्यात मी मुख्याध्यापक बनल्यानंतर आपण माझ्याशी काय काय केले? कसे वागले? याचा उल्लेख आहे व ती सत्य बाब आहे. कारण आपल्यालाही माहीत आहे की सदर पत्रानुसार आपलेच नातेवाईक असलेल्या दिवंगत मुख्याध्यापकाच्या निधनानंतर स्वतः शाळेतील रेकॉर्ड आपलेच पुतणे असलेल्या व्यक्तीनं, जे या शाळेत त्या काळात कोणत्याही पदावर नव्हते. त्यांना हाताशी धरुन लांबवला. तो रेकॉर्ड मी मागुनही आपण दोन चार दस्तावेजाशिवाय दिला नाही व तो रेकॉर्ड मिळविण्यासाठी मी वारंवार पत्र पाठवलीत. जी पत्र माझ्या काळातील जावक रजिस्टरमध्ये रजिस्टर आहेत. ते आता शाळेत आधिनस्थ आहेत. त्याच जावक रजिस्टरनुसार वारंवार विनंतीचे अर्ज पाठवूनही मला शाळा चालवायला रेकॉर्ड दिला नसल्याने आपली तक्रार मला मा. उच्च न्यायालयात दाखल करावी लागली. कारण तो रेकॉर्ड मिळाल्याशिवाय शाळा चालवताच येत नव्हती. शेवटी एका प्रशासकाचे प्रशासकीय कामकाज सांभाळतांना यात काहीच चुकले नाही. त्यानंतर आपण मा. न्यायालयीन आदेशानुसार त्यातील काही रेकॉर्ड शाळेच्या प्रशासनाला सुपूर्द केला. यावरुन हा मुद्दा मला गैर वाटत नाही व त्यात मी आपला अपमान होईल अशी कोणतीच विकृत भाषा वापरलेली मला आढळली नाही. शिवाय आपणच संबंधीत पत्रात म्हणता की त्या पत्रानुसार मी मुजोरी केली. हेही खोटे असून मी रेकॉर्ड मागण्यासंबंधी विनंती केली आहे. आपण फक्त शालेय पोषण आहाराच्या उरलेल्या धान्याबद्दल फक्त मला पत्र दिले. शिल्लक असलेला पोषण आहार आपण स्वतः माझ्या ताब्यात दिलाच नाही. ज्याप्रमाणे शाळा चालवायला लागणारा दस्तावेज दिला नाही तसा. मा. महोदय, गतकाळात जेव्हा मला प्रभारी मुख्याध्यापक पद मिळाले. त्यापुर्वी शाळेत मुख्याध्यापक पद रिक्त असल्याने आम्हा शिक्षकांना, आम्ही शिक्षक असून देखील भिकारी असल्यासारखं शिक्षकहजेरी मागायला व त्यावर स्वाक्षरी करायला आपल्याच संस्थेच्या माध्यमिक विभागाच्या कक्षात जावं लागायचं. ज्यात दिवंगत मुख्याध्यापकसाहेबांच्या निधनानंतर शाळेतील शिपायांना उन्हाळ्यात शाळेत येवूनही स्वाक्षरी करता आली नाही व जाणूनबुजून सुट्ट्या लावण्यात आल्या. त्याची तक्रार सर्व शिक्षकांसमोर शाळेत झालेल्या एका बैठकीत आपल्याकडे सर्व शिक्षकांनी केली होती. मात्र आपण त्यावर विचारविमर्श केला नाही व जाणूनबुजून दुर्लक्ष केलं. आपण त्यावर चर्चा न करता शिक्षकांचे म्हणणे ऐकून घेतले नाही. तशीच त्या बैठकीत सर्व शिक्षकांना धमकी दिली होती की आम्हाला दोन वर्षपर्यंत शाळेत मुख्याध्यापक पदच भरायचे नाही. दोन वर्ष शिक्षकांचं वेतन नाही झालं तरी चालेल. तुम्हाला जिथं जायचं असेल, तिथं जावं. त्यानंतर नाईलाजास्तव आम्हाला मा. शिक्षणाधिकारी साहेबांकडे शाळेच्या हितासाठी जावं लागलं. म्हणूनच हे पत्र माझा कार्यकाल संपत येत असतांना मा. शिक्षणाधिकारी साहेबांना पाठवलं. परंतु ते आपल्याला दिलं जरी नसलं तरी त्यानंतर लगेच एक पत्र, आपल्याला दिलं. मा. महोदय, ते पत्र देवूनही काहीच फरक पडला नाही. आपण मला मुख्याध्यापक पद नाकारण्याच्या भावनेने त्या पत्राचीही दखल घेतली नाही. कारण आपल्याला मी दिवंगत मुख्याध्यापक साहेबांच्या अकाली निधनानंतर शाळेला संकटातून सावरुनही मला मुख्याध्यापक पद द्यायचे नव्हते. जी कृती आपण त्यानंतर आठ महिन्यानंतर केली. जेष्ठ शिक्षिकेचे कारण पुढे करुन. शिवाय मी अनुसूचित जातीचा आहे हे वारंवार सांगण्याची गरज नसतांनाही वारंवार अपमानच करीत राहिले. हे आपल्याच कृतीवरुन वारंवार आजही दिसतेच. जी कृती दिवंगत मुख्याध्यापक साहेबांनी केली. आपणही तीच कृती वारंवार करीत आहात. यावरुन हेच दिसते की दिवंगत मुख्याध्यापक साहेबांच्या सर्व कृतींना आपलेच पुर्ण स्वरुपात समर्थन होते. मा. महोदय, आपण स्वतःला शाळेचे मालक समजता. असे म्हणणे माझे चुकीचे ठरणार नाही. कारण जे मालक असतात. तेच शाळेतील आलमाऱ्या व त्यातील रेकॉर्ड आपल्या पुतन्यांना हक्कानं मदतीस घेवून नेवू शकतात. शिवाय त्यातील बराचसा रेकॉर्ड पुर्णपणे आजही रिट याचिका निकालात निघूनही अजुनही दिला नाही आणि आपणालाही माहीत आहे की रेकॉर्ड नसेल तर शाळा चालवता येवू शकत नाही. त्यामुळंच माझं वक्तव्य असं की 'मला शाळा चालविण्यात विघ्न आणले' या म्हणण्यात काही गैर नाही. मला आपण शाळा चालवायला रेकॉर्ड न देणे व न्यायालयाने आदेश देवूनही आपण पुर्ण रेकॉर्ड शाळेला सुपुर्द न करणे. ही गैरकृती असून ही कृती समर्थनीय नाही. शिवाय हा मला त्रास देत असल्याचा भक्कम व ठोस पुरावा आहे असे मला वाटते. माझे म्हणणे खरेच आहे. कारण आपण त्यावेळेसही मी अनुसूचित जातीचा असल्यानं कदाचीत मला मुख्याध्यापक बनवले नाही. अन् आजही माझा मुळ स्वरुपात मुख्याध्यापक पदाचा अर्ज पाठवताच तो नाकारत आपण फार मोठी आरोपाची यादी पाठवली. यावरुन मी जे बोललो, ती सत्य बाब आहे. शिवाय आपलेच नातेवाईक असलेले दिवंगत मुख्याध्यापक नेहमीच म्हणत असत की आपल्या सचीव साहेबांनी स्वतः विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे पैसे खाल्ले. ते केवळ त्यांचे म्हणणेच नव्हते तर त्यासंदर्भात चर्चाही परीसरात होती. शिवाय वर्तमानपत्रातही तशा स्वरुपाच्या बातम्या छापून आलेल्या होत्या. शिवाय शाळेचा दस्तावेज नेतांना तो गुप्तपणेच नेला. शाळेतील कोणत्याही जेष्ठ शिक्षकाला त्यात विश्वासात घेतले नाही. ही गंभीर बाब आहे. आपले म्हणणे नेहमीच 'तुम्ही कोण? मी तुम्हाला कसे विचारणार. तुम्ही, आम्ही नियुक्त केलेले नोकर आहात. मी मालक आहे.' अशी आपली भाषा असते. यात अजुनही बराचसा रेकॉर्ड आपल्याकडेच असणे, तो माननीय न्यायालय महोदयांच्या आदेशानंतरही आम्हास द्यायला टाळाटाळ करणे हाच या मुद्द्यातील भक्कम व ठोस पुरावाच आहे. आपण आधीच शाळेतील रेकॉर्ड नेला होता. तो अजुनही पुर्ण दिलाच नाही. त्यामुळंच हे सुद्धा माझे कथन बरोबर असून ते कथन आपला अपमान करणारे नाहीच. गतकाळातील मुख्याध्यापक हे आपलेच नातेवाईक होते. त्यातच मी त्यांनी माझ्यावर केलेल्या अत्याचाराच्या विरोधातील तक्रार पोलीस स्टेशनला टाकल्यानंतर बदल्याच्या भावनेनं पेटून उठून त्यानंतरच खोट्या स्वरुपाची बरीचशी पत्र लिहिलेली आहेत. जी पत्र खोटी आहेत. मात्र यावरुन संबंधीत पत्रातून मी दोषी ठरत नाही. शिवाय त्याच मुद्द्यात म्हटले आहे की मी शिपाई असलेल्या व्यक्तीचे वेतन काढले. त्यांचा अर्ज नव्हता. परंतु आपणास नम्रपणे सांगतो की माझ्या काळात त्यांनी शाळेला अर्ज पाठवला होता. त्यात त्यांचा अपघात झाला होता व ते पायाने चालूच शकत नव्हते. आपण मला जो काही तुटपुंजा थोडासा रेकॉर्ड दिला होता. ज्याने शाळा चालूच शकत नव्हती. तोच रेकॉर्ड व त्यानंतर मी स्वतः बनविलेला व माझ्याकडे असलेला काही रेकॉर्ड मी माझ्यानंतर पदावर आलेल्या शाळेच्या प्रशासनाला सुपूर्द केला. पुर्ण रेकॉर्ड आपल्याकडेच होता. मला मा. शिक्षणाधिकारी साहेबांनी प्रभारी मुख्याध्यापक बनविण्यापुर्वी सदर जेष्ठ शिक्षिका मुख्याध्यापक बनल्या नाहीत. त्या बनल्या नसल्याने मला प्रभारी मुख्याध्यापक बनावं लागलं. तसेच शाळेतील दिवंगत मुख्याध्यापकाच्या निधनानंतर अपुर्ण असलेली सर्व प्रकारची कामे मी केलीत. अचानक दिवंगत मुख्याध्यापक साहेबांच्या मृत्युनंतर कोसळलेल्या संकटातून मी शाळेला बाहेर काढले. त्यानंतर आपण माझ्यापेक्षा जेष्ठ असलेल्या शिक्षिकेला कायम स्वरुपाचं मुख्याध्यापक पद दिलं. मा महोदय, आपण कुठेही आम्हा शिक्षकांची व मुख्याध्यापकांची बदनामी करणारी पत्र लावता. हा पुरावाच आहे. मात्र आम्ही आपल्या वयाकडे पाहून व आपण आमचे संस्थाचालक आहात त्यांचा आदर करतो. आपल्याला काहीच म्हणत नाहीत. तरीही आपण विनाकारण आम्हाला वेगवेगळ्या स्वरुपाचे पत्र पाठवून सतत मानसिक त्रास देत असता. कारण आजही आपला पैसा कमविणे हाच उद्देश असून दिवंगत मुख्याध्यापक साहेबांनी आपल्याला पैसे देण्यासाठी बरेचदा आमच्या वेतनातून पैसे कापून दिले. तीच कृती मी प्रभारी मुख्याध्यापक असतांना मला आपण करायला लावत होते. मी तसे केले नसल्याने मला मी प्रभारी मुख्याध्यापक असतांना त्रास दिला. शाळेच्या विद्यमान मुख्याध्यापिका यांनाही आपण त्रासच देत आहात. पैसे मिळत असेल, तो मुख्याध्यापक चांगला. पैसे मिळवून देत नसेल. तो मुख्याध्यापक वाईट. हा हेतू रेकॉर्ड लांबविण्यातही दिसून येतो. तसेच असे पत्र भिंतीवर लावणे यातही दृष्टच हेतू आहे. कारण बरेचसे पालक तेच पत्र वाचतात. त्यात आमची नावं असल्यानं आम्हालाच विचारतात की सर हे काय आहे. त्यातून आमची बदनामी होते. हे माझे म्हणणे खरेच आहे. त्यामुळं हाही आरोप मला मान्य नाही. मी मा. शिक्षणविभागाला विनंतीपुर्वक मागणी केली आहे व त्याची प्रतिलिपी आपल्याला पाठवली आहे. त्या मागणीनुसार मुख्याध्यापक पद रिक्त होत असून त्या रिक्त होणाऱ्या जागेवर मुख्याध्यापक म्हणून सेवाज्येष्ठतेनुसार मला पद मिळावं. तशी मागणी करणं काही अनुचीत नाही. तशी तरतूद खाजगी प्राथमिक शाळा नियमावली व शाळा संहिता नियमानुसार रास्त आहे. तसेच मी अनुसूचित जातीचाही व्यक्ती आहे. याची आपणास जाण असून त्याच गोष्टीचा फायदा मी घेत असल्याचे आपण संबंधीत पत्रात नमूद केले आहे. शिवाय संदर्भीय पत्रात असेही नमूद आहे की मी अनुसूचित जातीचा असल्याने शाळेत दहशत आहे. परंतु आपल्यालाही माहीत आहे की मी फक्त अनुसूचित जातीचा गरीब व्यक्ती आहे. एक साधारण शिक्षक आहे. दहशत आपलीच आहे व ती दहशत आपण मुख्याध्यापकामार्फत सर्व शिक्षकांवर ठेवलेली होती. मा. महोदय, आपण व दिवंगत मुख्याध्यापक साहेबांनी शिक्षकांना धमकी होती की नारायण सर हे अनुसूचित जातीचे असून त्यांनी आपल्या शाळेतील मुख्याध्यापकाची तक्रार पोलीस स्टेशनला टाकलेली आहे. ज्यात त्यांना कोणीही मदत करु नये. जे कोणी त्यांना मदत करतील. त्यांनाही आम्ही पाहून घेवू. त्याच धमकीमुळं कोणताच शिक्षक माझ्या बाजूनं मी विनंती करुनही उभा राहिला नाही. त्यातच तो खटला सुरु असतांनाच दिवंगत मुख्याध्यापक साहेबांनी खोट्याच स्वरुपाचे कारण पुढे करुन जाणीवपूर्वक माझे वेतन बंद केले होते. ते वेतन बंदची प्रक्रिया त्यांची पोलीस स्टेशनला तक्रार टाकल्यानंतरच घडली. जाणूनबुजून खटला लढता येवू नये यासाठी. तो सिद्ध होवू नये यासाठी. मा. महोदय, आपणालाही माहीत आहे की कोणताही खटला लढायला पैसे लागतातच. तो पैसा माझ्याजवळ नसल्याने व आपण व आपलेच नातेवाईक असलेल्या मुख्याध्यापक साहेबांच्या धमकीमुळे एकही शिक्षक माझ्या मदतीला आले नाहीत. जे एक शिक्षक माझ्या मदतीला आले. त्यांनाही आपण आपल्या अत्याचाराचे शिकार बनवले. त्यामुळं इतर शिक्षक माझ्या मदतीला आले नसल्याने, तसेच आपण व इतर शिक्षक त्यांच्या मदतीला असल्याने, त्यांचीच शाळेत दहशत असल्याने मला खटल्यात हार मिळाली. यावरुन मी टाकलेला खटला खोटा ठरत नाही. मा. महोदय, खटल्यादरम्यानच्या काळात माझे वेतनच बंद केले होते. ज्यात माझी उपासमार होत होती. मग मी खटला कसा लढावा? सामना हा कधीच मांजराचा व उंदराचा होत नाही. सामना होतो, बरोबरीच्या व्यक्तीचा. दहशत ही कधीच उंदराची नसतेच. दहशत असते मांजरीचीच. तेव्हा संबंधीत खटला जरी मी हारलो असेल तरी त्यातून माझी तक्रार खोटी होती हे सिद्ध होत नाही. संबंधीत खटल्यात आपलंच त्यांना समर्थन होतं. मा. महोदय, आपण पत्रात जे आरोप केले व कारणे दाखवा नोटीस दिली. त्यावरुन लक्षात येत आहे की आपल्याला माझा मुख्याध्यापक पदाचा हक्कं डावलायचा आहे. तसेच आपल्याच नातेवाईकांना मुख्याध्यापक पदावर बसवायचे आहे. त्याची तयारी आपण आधीपासूनच करीत असल्याचे दिसून येते. ज्यातून पैशाच्या वादातून प्रकरण घडले व आपणच ते प्रकरण घडवून आणले असावे. अशी शंका व्यक्त होते. मा. महोदय, मी नम्रपणे सांगतो की दिवंगत मुख्याध्यापक साहेबांच्या काळात आपल्याला जी शिक्षकांचे वेतन कापून रक्कम मिळायची. ती रक्कम मी मुख्याध्यापक पदाचा दावा केल्याने कदाचीत मिळणार नाही. नातेवाईक पदावर बसवला तर मिळेल. ही भीती मनात बाळगून तशा आशयाचे लांबलचक पत्र आता ऐन शाळेच्या परिक्षा सुरु होणार असतांना व शाळेची बरीच कामं, त्यातच ऑनलाईन कामं असतांनाही पाठवले आहे. जेणेकरुन संबंधीत शिक्षकांला त्रास व्हावा. शिक्षकांनी शाळेची कामं अजिबात करु नये. त्यांची नोटिस वाचून मानसिकता खराब व्हावी व नोटिसचं उत्तर लिहिण्यात वेळ जावा. शाळेची कामं खोळंबवावी. माझ्या वर्गाची माझी कामे खोळंबावी. असा हेतू यातून दिसून येत आहे. मा. महोदय, मलाही माहीत आहे की ही मला कारणे दाखवा नोटीस देणे म्हणजे शुद्ध मला दिलेली धमकी आहे. या कारणे दाखवा नोटीसला मी घाबरावे व आपला मुख्याध्यापक पदावरील हक्कं सोडावा. नाहीतर गाठ माझ्याशी आहे. असे आपले धमकीवजा म्हणणे उघडपणे यातून दिसून येत आहे. मा. महोदय मी केलेले आरोप हे चुकीचे नसून आपण केलेले आरोप हेच चुकीचे आहेत. कारण आपण संबंधीत मुख्याध्यापक दिवंगत होताच सर्व वरीष्ठ शिक्षकांना स्वेच्छानिवृत्ती घ्यायला लावली होती. त्यांनी ती घेतली नाही. त्यामुळंच आपण ते सक्षम असतांनाही त्यांना मेडिकल बोर्डासमोर उभे केले. ज्यातून मेडीकल बोर्डानं त्यांना क्लीनचीट दिली. याचे दस्तावेज मी बनविलेल्या आवक जावकमध्ये आहेत. आपण एवढ्यावरच थांबले नाही तर आपण सर्व शिक्षकांनी जे जिपीएफ चे पैसे उचलले होते. ते कुठे खर्च केले? याचं विवरण मागीतलं. आपण एवढ्यावरच थांबले नाहीत तर आपण निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांनाही त्रास दिला. त्यांच्यावरही ताशेरे ओढले. आपल्या नातेवाईक असलेल्या कर्मचाऱ्यांची सेवापुस्तकं जाणूनबुजून गहाळ करुन त्यांच्या सेवापुस्तिका आपल्याच स्वाक्षरीनं अद्ययावत केल्या. एवढंच नाही तर आपले नातेवाईक असलेल्या दिवंगत मुख्याध्यापकाचे काळात आपण संगनमत करुन आमचे सर्वांचे, कितीतरी वर्षाचे जी पी एफचेही पैसे खाल्ले होते. मा. महोदय, आपण गतकाळातील मुख्याध्यापकांना मदत केली. त्याची दोन कारणं होती. पहिलं म्हणजे ते आपले नातेवाईक असणे व दुसरं म्हणजे त्यांच्याकडून देण म्हणून येणारा पैसा. दिवंगत मुख्याध्यापक हे शिक्षकांच्या वेतनातूनच गैरकायदेशीररित्या पैसे कापत असत व सांगत असत की मला हा पैसा संस्था संचिवांना द्यायचा असतो. मात्र मी हा पैसा त्यांच्या म्हणण्यानुसार शिक्षकांच्या वेतनातून कापलाही नाही व मी स्वतः मुख्याध्यापक बनल्यानंतर आपल्याला असा कोणताच पैसा दिला नाही. त्यामुळं मी आपल्याला मुख्याध्यापक म्हणून चालत नाही असे यातून दिसून येते. शिवाय मी प्रभारी मुख्याध्यापक असतांना माझ्याच काळात माझ्या गाडीवर जाणाऱ्या माझ्या मातेसमान असणाऱ्या आपलेच नातेवाईक असलेल्या मॅडमचे रस्त्यावरुन गाडीवर बसल्याचे फोटो काढले. आपण एवढ्यावरच थांबले नाही, त्यानंतर त्यांच्या मोबाईलवर नाचणाऱ्या वयोवृद्ध महिलांचा विकृत व्हिडीओ टाकला. यावरुन आपल्या विकृत मानसिकतेचे दर्शन होते. मा. महोदय, मलाही माहीत आहे की शिक्षक कसा असायला हवा. मी जेव्हा शाळेत लागलो. तेव्हा शाळेतील परिस्थिती गंभीर होती. मुलं ताडपत्रीच्या खाली बसायची व त्यावर टिनाचं शेड होतं. ज्या टिनाच्या शेडमध्ये गाई राहात व त्या आपली विष्ठाही करीत असत. त्यावेळेस ते स्वच्छ करतांना आपण नसायचेच. ते मी अनुसूचित जातीचा असल्यानं मलाच साफ करावं लागत असे. मात्र मी कुरकूर केली नाही. कारण मी कर्तव्यात प्रामाणिक होतो. माझ्यावर माझ्या आईवडीलांचे चांगलेच संस्कार झालेले असून त्यात वक्तशीरपणा, सेवाभावी वृत्ती, नम्रता, शिस्तप्रियता, गुणवत्ता व इतर सर्व गुण आहेत की ज्यातून शाळा वाढू शकेल. हे आपणाला माहीत आहे. शिवाय आपणाला माझ्याबद्दल हेही माहीत असेल की आजही माझे नाव प्रगतीशील लोकांच्या यादीत आहे. हे माझ्यातील चांगल्या गुणांमुळे. आपल्याला आणखी कसा मुख्याध्यापक हवा आहे? मी शाळा चालविण्यास समर्थ असून ज्यावेळेस मला प्रभारी मुख्याध्यापक पदाची संधी मिळाली, तेव्हा मी शाळेची पटसंख्याही वाढवली होती. हे एका शाळेसाठी गौरवाची बाब आहे. असे चांगले सुसंस्कारीत्व असतांना जर मुख्याध्यापक पद मिळत नसेल तर जगातील कोणताही व्यक्ती मुख्याध्यापक पद मागण्यास पुढे येणार नाही. जर आपणास मनातून इच्छा असेल की आपली शाळा वाढायला हवी तर आपण मला मुख्याध्यापक पद देण्याबाबत तर्क वितर्क करु नये. मी नेहमीच आपला आदर केलेला आहे व आपल्याच मार्गदर्शनाने चालत आहे. मला वाटतच नाही की मी माझ्या कर्तव्यात चुकलो. त्यामुळे स्वखुशीनं, सन्मानानं आपण मला मुख्याध्यापक पद द्यावं. तसंच सहकार्य करावं. जेणेकरुन शाळा पुढे जाईलच. तेव्हा आपण विचार करावा व मला मुख्याध्यापक पदाची संधी बहाल करावी ही विनंती. जे काही करणार. ते आपल्या शाळेच्या हितासाठीच करणार. जेणेकरुन आपल्या शाळेचे व आपल्याच संस्थेचे नाव होईल. नारारण सरांनी केवळ हेच लिहिले नव्हते तर त्यांनी तो संस्थाचालक त्यांना का बरं मुख्याध्यापक बनवू शकत नाही. याची कारणंही त्या कारणे दाखवा नोटीसमध्ये लिहिली होती. मा महोदय, आपण पत्रात लिहिले आहे, कारणे दाखवा. त्यावरुन आपण माझ्यावर विविध स्वरुपाचे आरोप केलेत. ज्या आरोपात काहीच तथ्य नाही. आपण मला का बरं मुख्याध्यापक बनवू शकत नाहीत. त्यांची कारणे आहेत. १) आपल्याला चांगल्या गोष्टी करणे कधीच जमले नाही. आपण फक्त जे शिक्षक पैसे देत नाहीत, त्या शिक्षकांचं नुकसान कसं होईल, यासाठीच शिक्षकांच्या मागे मुख्याध्यापकामार्फत लागणे आपल्याला जमले. वाईट कामात आपण जास्त लक्ष लावलं. कारण देण म्हणून आपल्याला शिक्षकांकडून पैसा हवा होता. हवा आहे. आजही शाळा आहे. परंतु ती शाळेसारखी वाटत नाही. शाळेत पिण्याचे पाणी व्यवस्थित मिळत नाही. ते पाणी कधी मिळतं, कधी मिळत नाही. शाळेत शौचालय बरोबर नाही. आजही शाळेत मुलांना बसण्याच्या चांगल्या सोयी नाही. जणू कोंडवाड्यागत शाळेची अवस्था आहे. शाळेला एवढे वर्ष झाली. परंतु आपण एक संस्थाचालक म्हणून या सोयी आमचे वेतनातून मुख्याध्यापकामार्फत पैसे कापूनही केल्या नाहीत. मात्र मुख्याध्यापक म्हणून आता मला पद मिळताच मी त्या सोयी करायला लावणार. हे आपल्यालाही माहीत आहे. ज्या सोयी मी प्रभारी मुख्याध्यापक असतांना करायला लावल्या होत्या. २) मी मुख्याध्यापक म्हणून बसताच आपल्याला माझ्याकडून व शिक्षकांकडून देण म्हणून पैसे मिळणार नाहीत. जे गतकाळात आपले नातेवाईक असलेल्या मुख्याध्यापकामार्फत वेतनातून मिळत होते. आज मी मुख्याध्यापक पद मागताच आपल्याला वाटले की संबंधीत व्यक्ती मुख्याध्यापक बनताच मला शिक्षकांच्या वेतनातून असा पैसा कापून मिळणार नाही. कापताच येणार नाही. कारण मी प्रभारी मुख्याध्यापक असतांना आपल्याला असा पैसा मिळालेला नाही. जे आपलेच दिवंगत नातेवाईक मुख्याध्यापक असतांना आपण शिक्षकांच्या वेतनातून मुख्याध्यापकामार्फत कापून घेतला आणि तो पैसा न देणाऱ्या शिक्षकांना खुप त्रास दिला. ३) आपण आपल्या कारणे दाखवा नोटिसमध्ये वारंवार दिवंगत मुख्याध्यापकांनी मला त्रास देवूनही त्यांच्या कृतीचे समर्थन केले. यावरुन सिद्ध होते की वेतनातून जे शिक्षकांचे पैसे त्यांनी कापले. त्यांनाही आपलीच साथ होती. जेव्हापर्यंत मी त्यांना देण म्हणून पैसे देत होतो. तेव्हापर्यंत ते काहीच बोलले नाही व मला त्रासही दिला नाही. जेव्हापासून देण म्हणून त्यांना मी पैसा देणे बंद केले. तेव्हापासून मी त्यांच्या त्रासाचा बळी ठरलो. ४) आपण दिवंगत मुख्याध्यापकाच्या काळात स्वतः देण म्हणून पैसे मिळविण्यासाठी जी दहशत निर्माण केली. त्यानुसार मी मुख्याध्यापक म्हणून बसताच आपली दहशत निर्माण होणार नाही. ही भीती आपल्या मनात आहे. कारण मी विद्यार्थी हित व शिक्षक हित जपणारा आहे हे आपल्यालाही माहीत आहेच. ५) ज्यांनी ज्यांनी आपल्याला दिवंगत मुख्याध्यापकामार्फत पैसे दिले नाहीत. त्यांना त्यांना आपण जाणूनबुजून दिवंगत मुख्याध्यापकामार्फत त्रास दिलेला आहे. त्यांचं नुकसानही केलं आहे. ६) मी आपल्या वाढत्या पैशाच्या मागणीच्या वाढत्या अपेक्षा पुर्ण करु शकलो नाही. म्हणूनच आपण मला मुख्याध्यापक बनवायचं टाळत असल्याचे अगत्याचे दिसते. ७) मा. महोदय, आपल्या स्वतःच्या वैयक्तिक जीवनात घरी फक्त एकटेच राहता. आपण आनंदी नाहीत. त्यामुळंच आपल्याला दुसऱ्यांचा आनंदही बघवत नाही. आपण शाळेचे विद्यार्थी कमी करण्यासाठी "शाळा बंद होणार आहे. आपल्या मुलांचे नाव काढा." असे पालकांना मागील तीन वर्षांपासून फोन करीत आहात. यावरुन आपले मानसिक संतुलन जागेवर नसल्याचे स्पष्ट दिसते. त्यातच शाळा वाढलेली आजतरी आपल्याला चालत नाही. जे मी माझ्या प्रभारी मुख्याध्यापक पदाच्या काळात केलं. पटसंख्या वाढवली. तेही आपल्याला आवडलं नाही. शिवाय आपला अख्खा दिवस कंटाळवाणा जातोच. ज्यातून आपल्याला नैराश्य येतं व त्यावर उपाय म्हणून आपण शिक्षकांना जाणूनबुजून त्रास देण्याच्या कृती करतात. यात आपल्याला फार मोठा आनंद होतो. त्यासाठी आपण शिक्षक व विद्यमान मुख्याध्यापकांना धारेवर धरता. जे आपण गतकाळात मी प्रभारी मुख्याध्यापक असतांना माझ्यावरही दबाव टाकून मला करायला लावले होते. असे आपण यापुर्वी दिवंगत मुख्याध्यापकामार्फत बरेचवेळा केले आहे. ज्यांनी देण म्हणून आपल्याला पैसे दिले नाही, त्यांचे वेतन वेगवेगळ्या पर्यायानं थांबवले. काहींचे इन्कमटॅक्समध्ये सोळा क्रमांकाचे रिटर्न फॉम न देता कापले. जी पी एफ मध्येही घोळ केला. तो आता आपल्याला मला मुख्याध्यापक म्हणून पदभार दिल्यावर करता येणार नाही. ही भीती आपल्याही मनात असेलच. म्हणूनच आपण मला मुख्याध्यापक बनवणार नाही. ८) सर्वात महत्वपुर्ण कारण आहे माझी जात. मी अनुसूचित जातीत जन्म घेतला हा माझा गुन्हा नाहीच. तरीही कदाचीत तीच बाब मनात ठेवून आपण माझा हक्कं असतांनाही तो टाळत असल्याचे या कारणे दाखवा नोटीस पत्रावरुन दिसते आहे. ज्यातूनच बिनबुडाचे मुद्दे जाणूनबुजून उपस्थित केलेले आहेत. हेच या कारणे दाखवा पत्राची कारणे आहेत. आपण केलेले यातील सर्व आरोप हे बिनबुडाचे, कपोलकल्पित, द्वेषपुर्ण व भेदभाव करणारे असल्याने ते मला मान्य नाहीत. मा. महोदय, आपण मी केलेल्या चांगल्या गोष्टी कधीच विचारात घेतल्या नाहीत. जसे पटसंख्या वाढविणे, शाळेला संकटातून बाहेर काढणे, शाळेतील शेण, कुडा कचरा बाहेर फेकणे. शाळेला प्रगतीच्या टप्प्यात आणणे. इत्यादी. शिवाय मी पदावर बसलो व चांगल्या गोष्टी केल्या तरीही त्या आपल्याला आवडल्या नाहीत. उलट आपण माझे विनाकारण वेतन मुख्याध्यापकामार्फत बदल्याची भावना ठेवून मी शाळेत नियमीत असतांनाही बंद केले होते. शिवाय माझा दोष नसतांनाही जे वेतन आपण व आपल्या नातेवाईक असलेल्या मुख्याध्यापक साहेबांनी बंद केलं होतं. त्याचं व्याज दिलं नाही. आपण आपल्याच संस्थेअंतर्गत असलेल्या माध्यमिक विद्यालयाला आईचा दर्जा दिला. तसेच आमच्या शाळेत मी पारदर्शक व्यवहार करुनही मावशीचाच दर्जा दिला. तो केवळ मलाच नाही तर शिक्षकांनाही त्रास व्हावा म्हणून. या गोष्टीचे शाळेतील शिक्षक कर्मचारी साक्षीदार आहेत. शिवाय मला त्रास देण्यासाठी आपल्याच माध्यमिक विद्यालयातील मुख्याध्यापिकेमार्फत मी शाळेत नसतांना माझ्यावर लांच्छन लावण्यासाठी व माझ्या वर्गातील मुलांना दबाबात आणण्यासाठी विद्यार्थ्यांचे फोटो काढण्याची कृती केली. आपण मी पदावर असतांना शिक्षकांवर दबाव टाकला तसेच त्यांचेही छायाचित्र काढले. शिवाय मी पदावर असतांना आमच्या शाळेतील विद्यार्थीनीसमोर आपल्याच संस्थेतील माध्यमिक शाळेचे कर्मचारी दार उघडे ठेवून शौचालयात लघवी करायला जावून काय काय करीत. ते सांगायला नको. याबाबत आपणास पत्र दिले असता त्यांचेवर आपण कोणतीच कारवाई केली नाही. मा. महोदय, पुन्हा एक विनंती आहे की आपण माझ्या या कारणांवर विचार करुन मला मुख्याध्यापक पद सन्मानानं बहाल करावे ही नम्र विनंती. नारायण सरांनी संस्थाचालकाला पाठविलेलं पत्र संपलं होतं. ते त्यांना पाठवलंही होतं. परंतु ते पत्र संस्थाचालकाला मान्य नसल्यानं त्यांनी त्यावर चौकशी लावली. चौकशी थातूरमातूर झाली व ती चौकशी नारायण सरांना पदावरुनच दूर नाही तर नोकरीवरुनच दूर करणारी ठरली होती. (१७) तो दिवस नारायण सरांच्या आयुष्यातील काळा दिवस होता. आज शाळेला सुट्टीच होती. कार्यालय सुरु होतं. नारायण सर उदासीतच होते. अशातच दुपार झाली होती. दुपारी पोष्टमेन दारात आला. त्यानं नारायण सरांच्या हातात एक पत्र देवून तो चालता झाला. पत्र उघडताच त्यात लिहिलेलं मजकूर नारायण सरांनी वाचला. ज्यातून त्यांना निलंबित करण्याची नोटीस देण्यात आली होती. नारायण सरांना घरी बसवले होते. नारायण सर घरी बसताच ते आपला खटला लढवू लागले होते. त्यांनी आपला खटला लढवितांना आपण दिलेल्या पत्राच्या उत्तराचाच आधार घेतला होता. नारायण सर आज नोकरीवर नव्हते. त्यांना अचानक निलंबित केलं होतं संस्थाचालकानं. त्यातच नोकरी नसल्यानं सरांकडे आपला खटला लढवायला पुरेसं भांडवल नव्हतं. पोटाचाही प्रश्न उपस्थित झाला होता. काय करावं सुचत नव्हतं. अशातच एक आशेची किरण चालून आली. ती किरण होती धंदा लावणं. सरांनी तसा विचार करुन जवळ जी काही पुरेशी मिळकत होती. त्या आधारावर एक लहानसं किराणा दुकान लावलं होतं. सरांनी लावलेलं ते दुकान. परंतु दुकानातील वस्तू खपत नव्हत्या. तसं पाहिल्यास प्रारब्ध जेव्हा खराब असतं. तेव्हा संकट चारही बाजूंनी येतं. तेच घडलं होतं नारायण सरांच्या आयुष्यात. आज त्यांना उपासाचे फाके पडत होते. अशातच सरांनी एक अभिनव प्रयोग करायचे ठरवले. विचार केला की आपण जेवनाचे वा नाश्त्याचे प्रकार बनवावेत. कारण सध्या नाश्त्याला जास्त मागणी आहे. नाश्त्याचा विचार करताच नारायण सरांनी दुकान तसंच ठेवलं व नाश्त्याचा धंदा सुरु केला. आता ते दिवसभर दुकान सुरु करायचे व सायंकाळी ते नाश्ता विकायला जायचे. त्या विक्रीतून जो पैसा यायचा. त्या पैशात ते आपलं पोट चालवायचे. ज्यातून त्यांना खटलाही लढवावा लागत होता. आज खटल्याची पाश्वभुमी लक्षात घेता नारायण सरांचा तो खटला वेध घेणारा होता. न्यायालयात फैरीवर फैरी झडत होत्या. ज्यातून खटल्यावर प्रकाश टाकला जात होता. अशातच एक आशेची किरण परत आली व खटल्याचा निकाल लागला. जो खटल्याचा निकाल नारायण सरांच्या बाजूनं लागला होता. नारायण सरांना न्याय मिळाला होता. बराचसा पैसाही मिळाला होता. परंतु त्या खटल्याला बराच कालावधी लागला होता. ज्यातून नारायण सरांचंही वय झालं होतं. ते आता निवृत्तीनंतरचं वय होतं. नारायण सरांना न्यायालयामार्फत न्याय मिळाला होता. ते जिंकले होते. त्यांना फायदाही झाला होता. परंतु ते आताही नैराश्येत होते. कारण त्यांना जी वर्ग शिकवायची हौस होती. त्यांना ज्या गोष्टीत आनंद वाटत होता. ती गोष्ट त्यांना आयुष्याच्या या उतारवयात करता आली नव्हती. त्यांना वर्ग शिकविण्यात जो आनंद होता. तो आनंद त्यांना संस्थाचालकाच्या निलंबीत करण्यानं मिळवता आला नाही. त्यामुळंच जरी खटला जिंकून पैसा मिळाला असेल तरी ते खुश नव्हते. कारण त्यात सुख नव्हतं. जे एका शिक्षकाला वर्ग शिकवूनच प्राप्त होत असतं. म्हणतात की सैनिकांची नियुक्ती देशासाठी लढण्यासाठी असते. त्यात त्यांना वीरमरण आल्यास फार बरं वाटतं. तेच वाटतं शिक्षकांनाही. जर त्याला शिक्षक असल्यानं विद्यार्थी शिकवता आले तर बरे वाटते. त्यामुळंच नारायण सर जिंकले असले तरी ते खुश नव्हते. तो दररोजचा दिवस त्यांचा अगदी दुखातच जायचा. अशातच त्रिशाचं आगमण झालं आणि ज्या दिवशी त्रिशाचं आगमण झालं. तो दिवस हा सोन्याहुनही अधिक पिवळा झाला होता. त्रिशा व रुषाली या चांगल्या मैत्रीणी होत्या. त्या नारायण सरांच्या घरी जाणार होत्या. परंतु नारायण सरांचा, ते कुठे राहतात, याचा शोध लागला नव्हता. अशातच एका शाळेतील शिक्षिकेकरवी नारायण सरांचा शोध लागला. परंतु त्रिशाला वाटलं की सरांना आपण दोघींनीच भेटणं बरोबर नाही. आपण आणखी मैत्रीणी जमवूयात. त्रिशाचा तो विचार. त्यातच तिनं रुषालीला विचारलं की तुझ्या संपर्कात कोण कोण आहेत? त्यावर रुषालीनं अवनी व आस्थाचे मोबाईल क्रमांक दिले. ज्या क्रमांकावर त्रिशानं फोन लावला व विचारलं की त्या दोघांच्या संपर्कात कोण कोण आहेत. त्यांचे मोबाईल क्रमांक द्यावेत. त्रिशा वर्गाची नायिका. तिनं यावेळेसही कॅप्टनशिपच केली होती. मैत्रीणीकडून तिनं मोबाईल क्रमांक मिळविलेत व त्याचा एक ग्रुप बनवला होता. त्यानंतर तिनं ग्रुपमध्ये विचारविमर्श केला. आपण नारायण सरांचा सत्कार करायचा. आपण आज ज्याही स्थितीत आहोत. ती अवस्था ही नारायण सरांमुळे आपल्याला प्राप्त झाली आहे. कदाचीत ते जर नसते तर आज आपण मोठमोठ्या हुद्यावर गेलो नसतोच. तो त्रिशाचा वर्ग. त्या वर्गातील सर्वच मुलं ही उच्च पदावर गेली होती. आज सर्वच मुलं नोकरीवर लागली होती व त्यांनी अधिकारपद प्राप्त केलं होतं. त्रिशानं जो विचार ग्रुपवर आपल्या मैत्रीणीसमोर बोलून दाखवला. तो विचार सर्वांना पटला होता. त्यातच सर्व मुलं त्यांचा सत्कार करण्यासाठी तयार झाली होती. अशातच त्रिशानं सर्वांचं पुन्हा एकदा एकत्रीकरण करुन ती सरांच्या सत्कारासाठी त्यांच्या घरी गेली. ज्यात त्यांचा तिनं सर्व मुलांसमवेत सत्कार घडवून आणला होता. नारायण सरांचा सत्कार झाला होता. आज त्यांना अगदी गदगद झाल्यासारखा आनंद झाला होता. तो आनंद त्याही आनंदापेक्षा मोठा होता. ज्या काळात नारायण सरांचा मुलांनी वाढदिवस साजरा केला होता. गतकाळात याच दिवशी सरांनी एक वेगळाच आनंद अनुभवला होता. जो त्या शाळेतील संस्थाचालकाच्या डोळ्यात खुपला होता. आज सरांना अगदी धन्य झाल्यासारखं वाटत होतं. जेव्हा प्रत्यक्ष रुपात तो वर्ग त्यांच्या डोळ्यासमोर उभा राहिला. ती इवली इवली मुलं आज बरीच मोठी झाली होती. ती आज कामाला लागली होती. परंतु ती सरांना विसरली नव्हती. त्या सत्कारामुळं नारायण सरांना वाटत होतं की आयुष्यात त्यांनी काय मिळवलं. एका शिक्षकांसाठी हेच महत्वाचं असतं की जी त्यांनी शिकवलेली मुलं. आयुष्याच्या उतार वळणावर अशी जर भेटत असतील. शिवाय सत्कार करीत असतील तर तीच कृती एका शिक्षकांसाठी आदरणीय ठरत असते. आपली स्वतःची मुलं प्रसंगी आपली सेवा करु शकत नाहीत. त्याच ठिकाणी ही शाळेतील इवली इवली मुलं येवून भेटत असतील तर यापेक्षा शिक्षकांच्या आयुष्यात आणखी मोठा आनंद कोणता असू शकतो. त्रिशा सरांचा सत्कार करुन निघून गेली होती. ती सरांच्या संपर्कात होती त्या दिवसापासून. ती कधीकधी सरांना भेटायला येत असे. जेव्हा ती शहरात यायची. तशीच ती मुलंही सरांना कधीकधी भेटायला यायची. जी त्या शहरात असायची वा त्या शहरात यायची. परंतु प्रत्यक्षात ती जवळ नसायचीच. सर आज आपल्या घरी अगदी आनंदात राहात होते. ते आपली नातवंड सांभाळत होते. त्यांना एकच मुलगी होती. जी मुलगी नोकरी करीत होती. जावईदेखील चांगलेच होते. ते आपल्याच वडीलागत नारायण सरांना सांभाळत होते आणि भेटायला येत होती ती मुलं. ज्या मुलांना नारायण सरांनी आपल्या आयुष्यात शिकविलं होतं. त्यांच्या बुद्धीचा विकास केला होता नव्हे तर त्यांना खऱ्या अर्थानं आत्मनिर्भर केलं होतं. नारायण सरांचं त्रिशासोबत जेही काही बोलणं व्हायचं. त्या बोलण्यात नारायण सरांनी तिला त्यांचेवर बेतलेले प्रसंग सांगीतले होते. आज नारायण सर मरण पावले होते. ते वार्धक्यानं मरण पावले होते. आज ते जगात नव्हते परंतु त्यांनी शिकविलेल्या गोष्टी ते ज्ञान आजही जीवंत होतं. आज तेच ज्ञान त्रिशाच्या रुपात प्रत्येक वर्गामधून विद्यार्थ्यांच्या मनपटलावर उमटत होतं. जे एका आदर्श शिक्षकांना अभिप्रेत होतं. नारायण सरांनी तो विद्यार्थ्यांचा मळा फुलवला होता. ज्याला आज संस्काररुपी फळं लागली होती. खाजगीकरण आजही होतं. ज्या खाजगीकरणानं उत्कृष्टपणे ज्ञान देणाऱ्या नारायण नावाच्या शिक्षकांच्या ज्ञानरचनेची कत्तल केली होती नव्हे तर त्याच खाजगीकरणानं ज्या नातेवाईक लोकांना शिकविताही येत नव्हतं. त्याच नातेवाईक शिक्षकांना गुणवान बनवलं होतं. मात्र आज त्रिशा त्याच खाजगीकरणाचा विरोध करीत होती. एक प्रकारचं आक्रंदन करुन. (१८) त्रिशाचा तो काळ व तिच्या काळात संपुर्णतः खाजगीकरण झालेल्या त्या संस्था. तिला बराच फरक पडला होता खाजगीकरणाचा. कारण आता शाळा या पुर्णच स्वरुपात खाजगी झालेल्या होत्या व वेतनही त्यांचं अगदी अल्प होतं. अशातच आता संस्थाचालकांचा बोलबाला होता. शिवाय आता कोणाला मुख्याध्यापक बनवायचं व कोणाला नाही हे आधीच ठरलेलं असायचं. मुख्याध्यापक कोणी बनायला पुढे येत नसत. कारण त्या पदावर फार मोठे कष्ट असायचे. काळ नुकताच ऑनलाईन पद्धतीचा झाला होता व सदैव शासनाचे कोणते ना कोणते पत्र येवून धडकत असत. मग ही माहिती भरा. ती माहिती भरा. अशी माहिती भरा. तशी माहिती भरा. अमूक माहिती भरा, तमूक माहिती भरा. असं सारखं सांगीतलं जायचं. त्यातच मुख्याध्यापकाची त्रेधातिरपीट उडत असे. आज काळ बदलला होता. शाळाही बदलल्या होत्या. शाळा खाजगी झाल्यानं शिक्षणाच्या संधी या सिमीत झाल्या होत्या. शाळा आज सरकारी मालकीच्या नव्हत्याच. त्याचा परिणाम हा शिक्षणावर झाला होता. लोकं आपल्या मुलांना उच्च शिक्षण शिकवू शकत नव्हते. तसाच बदलत्या काळानुसार आज कोणताच व्यक्ती संस्थाचालकाची मुजोरी सहन करीत नसे. वेतन कमी असल्यानं कोणताच व्यक्ती त्याच संस्थेत टिकून राहात नव्हता. वेतन कमी असलं तरी शिक्षकांचं महत्व वाढलं होतं. कारण शिक्षक हा शाळेत कमी व शिकवणी वर्गात जास्त राहात असे. शिकवणी वर्गाला जास्त महत्व प्राप्त झाले होते, अशा प्रकारची व्यवस्था आज निर्माण झाली होती. त्रिशाही एका संस्थेत शिकवायचे काम करीत होती. तिचं संस्थेत महत्व वाढलं होतं. त्याचं कारण होतं, आज शिक्षणाचं खाजगीकरण. वेतन कमी असल्यानं कोणीच संस्थेत टिकत नव्हता. त्यांना इतर ठिकाणीही वेतन मिळत होतं. शिवाय खाजगीकरणाच्या प्रक्रियेत शिकवणी वर्गाला जास्त महत्व आलं होतं. त्यातच गरीबाची मुलं फक्त चार दोन तेवढेच वर्ग शिकत होती. कारण जास्त शिकतो म्हटल्यास खाजगी शाळेचं शुल्क जास्त होतं. आज त्रिशाला मुख्याध्यापिका पद चालून आलं होतं. त्यातच तिला नारायण सर आठवत होते. तिला आठवत होतं की ज्या नारायण सरांनी मुख्याध्यापक पद मिळविण्यासाठी संघर्ष केला. त्यांनी तसा प्रस्ताव पाठवला तरी त्यांना मुख्याध्यापक पद मिळालं नाही आणि आपल्याला ते पद अगदी सहज चालून आलं. कदाचीत हा योग नारायण सरांच्या रुपानं प्रत्यक्ष विधात्यानंच घडवून आणला असेल. आज तिनं मनोमन नारायण सरांचे आभार मानले होते. त्रिशाचा तो ग्रुप. त्या ग्रुपमध्ये असलेल्या त्या सर्व मैत्रीणी आजही एकमेकांशी बोलत असत. त्यातच नारायण सरांचीही आठवण करीत असत. आज त्याही खुश होत्या. कारण त्यांच्यात नारायण सरानं त्याआधीच सुसंस्काराचे बीज रोवले होते. नारायण सर मरण पावले होते. त्याबद्दल त्रिशाच्या वर्गाला बरंच वाईट वाटलं होतं. तशीच त्यांच्या हातातून शिकलेली बरीच मुलं हळहळली होती. ज्यांना ज्यांना नारायण सर गेल्याचं कळायचं. ती शाळा आजही अस्तित्वात होती. मात्र त्या शाळेचा संस्थाचालक आज बदलला होता. जुना संस्थाचालक जावून नवीन संस्थाचालक आला होता. ज्यानं ती शाळा हडपली होती. त्याचंच नाव आज शाळेला प्राप्त झालं होतं. नारायण सरांच्या बाबतीत आजही काही लोकं जसे हळहळत होते. तसं हळहळणं संस्थाचालकाच्या बाबतीत घडत नव्हतं. आज ज्या संस्थाचालकानं शाळा बांधली. त्याच शाळेतील संस्थाचालक मरण पावताच त्याचं नामोनिशाण मिटवलं गेलं होतं. आज त्याच शाळेला त्या संस्थाचालकाची शाळा नाही तर दुसर्याच संस्थाचालकाचं नाव मिळालं होतं. खाजगीकरणानं संस्थाचालकाची चांदीच चांदी केली होती. मात्र नारायण सारख्या सरांच्या कर्तृत्वाची हत्या होत होती. कारण खाजगीकरणाच्या या काळात नात्यालाच वाव होता. गुणांना नाही. संस्थेत असलेले नातेवाईक शाळेत शिकवायचे काम करीत नव्हतेच. ते शिकवणी घ्यायचे व आपण शिकवीत असलेल्या त्याच शाळेतील मुलांना ते शिकवणी लावायला लावत असत. त्रिशाची जुनी शाळा म्हणजेच नारायण सर ज्या शाळेत होते, ती शाळा आज संपण्याच्या मार्गावर होती. तिथं विद्यार्थी संख्या पुरेशी नव्हती. त्याचं कारण होतं नातेवाईकांचा भरणा. संस्थेत नियुक्त झालेले नातेवाईक जुना संस्थाचालक जाताच नवीन संस्थाचालकाला ऐकत नव्हते. ते आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांना शिकवीतही नव्हते. ज्यातून शाळा मोडकळीस आली होती. इमारतीला तडे गेले होते. ते तडे नवीन आलेलं संस्थामंडळ सुधरवीत नव्हतं. ज्यातून पालकही आपल्या पाल्याचं भविष्य अशा धोकादायक शाळेतून घडवू पाहात नव्हते. काही संस्थाचालक नक्कीच चांगले होते व त्यांच्या संस्थाही नावारुपाला आल्या होत्या. जे आपल्या संस्थेत नातेवाईकांची नियुक्ती करीत नसत. त्या शाळेत नियुक्त होणारे कर्मचारी हे नात्यातील नसल्यानं ते त्याच शिक्षकांना राबवून घेत असल्यानं त्या संस्थेतील मुलं ही चांगली शिकत असत. त्यामुळंच त्या संस्थेतील शिकणाऱ्या मुलांच्या नावारुपास येण्यावरुन त्या संस्थेचं नाव झालं होतं. आज त्रिशानंही मुख्याध्यापक बनताच आपली शाळा नावारुपाला आणली होती. कालांतरानं तिला अनुभव येताच तिनंही एक शाळा उघडली होती. ज्याचं नाव नारायण सरांच्या नावावरुन ठेवलं होतं. आज त्रिशा आपल्या शाळेतून निवृत्त झाली होती व तिनं उघडलेली तिची शाळा वाढविण्याचे प्रयत्न तिनं सुरु केले होते. आज त्रिशानं उघडलेली शाळा ही नावारुपाला आली होती. कारण त्याठिकाणी नारायण सरांचे आशिर्वाद जुळले होते. नारायण सरांनी जे त्यांच्या शाळेत भोगलं होतं. ते का भोगलं. त्याचं इतिवृत्त त्रिशाला सांगीतल्यानं त्रिशानंही शाळेतील नियुक्त्या करतांना झालेल्या चुका विचारात घेतल्या होत्या. खाजगीकरण झालेलं असलं तरी तिनं आपल्या शाळेत शिक्षकांच्या नियुक्त्या करतांना नातेवाईकांना वाव दिला नव्हता. शिवाय ती शिक्षकांचा आदर करीत असे. ज्यातून नियुक्त झालेले शिक्षक अतिशय मेहनत घेत व विद्यार्थ्यांना चांगलंच शिक्षण देत असत. त्यामुळंच त्रिशाची शाळा नावारुपास येण्यास फायदाच झाला होता. ती शाळा नावारुपास येण्यास कुठंतरी नारायण सरांचे आशिर्वाद कामात आले होते. त्रिशा आज म्हातारी झाली होती. ती ओसरीत पहुडली होती. तिला झोप येत नव्हती. तिला विचार येत होता. ती विचार करीत होती. जर मला नारायण सर मिळाले नसते तर..... तर कदाचीत मी शाळाही उघडू शकले नसते आणि माझी शाळा ही आज नावारुपासही आली नसती. त्रिशाचं ते सोचणं बरोबर होतं. कारण ते तिची शाळा उघडणं आणि त्या शाळेचं नावारुपास येणं ही नारायण सरांचीच कृपा होती. कदाचीत नारायण सर तिच्या आयुष्यात आले नसते तर त्रिशानं शाळाही उघडली नसती. मग ती शाळा नावारुपास येणं दूरच. अशी तिच्या शाळेची अवस्था झाली असती. (१९) त्रिशाला नारायण सरांच्या अनेक कृती आठवायच्या. तसा तो एक दिवस तिला आठवत होता. त्या दिवशी सरानं एक निबंध लिहायला लावला होता. त्यात माझे आवडते शिक्षक असा विषय होता. ज्यात सर्व मुलांनी आपल्या चवथीला शिकविणारी शिक्षिका आवडती शिक्षिका असल्याचा उल्लेख केला होता. मात्र त्रिशाच अशी एकमेव मुलगी होती की जिथं नारायण सर्च आपल्याला आवडत असल्याचा उल्लेख केला होता. आज त्रिशाला नारायण सरांची वर्गातील तिही कृती आठवत होती. ज्यावेळेस सर जास्त रागावले होते व विद्यार्थ्यांना म्हणत होते की कोणत्याही गोष्टी या घरी सांगण्याऐवजी शाळेत आपल्या शिक्षकाजवळ सांगाव्यात. तेच तुमचे मायबाप असतात. सरांचं ते रागावणं. आजपर्यंत सर असे कधीच बोलले नव्हते. मात्र आज त्यांचा पारा वाढला होता. त्याचं कारण होतं, त्यांना रात्रीला एका पालकाकडून आलेला फोन. त्या फोनवरुन एका विद्यार्थ्याचे पालक सरांना बोलले होते की त्यांची एक तक्रार आहे. तक्रार सांगीतली नव्हती. सराचं डोकं आज जास्त गरम होतं. सर्व काही चांगलं करुनही वा विद्यार्थ्यांना आपल्या लेकरागत शिकवूनही नारायण सरांना आलेला तो कारणे दाखवा नोटीस, त्यातच सरांच्या त्या नोटीसनंतर लगेचच असा शाळेतील पालकांचा धमकीचा फोन. सरांना त्या रात्री झोपच आली नाही. सारखा विचार येत होता. आपली अशी कोणती तक्रार असेल की पालकांनी आपली तक्रार आहे असं सांगीतलं. तसा दुसरा दिवस उजळला. सर भीतभीतच शाळेत गेले. तसे त्या विद्यार्थ्याचे पालक आले. विषय चर्चेला निघाला. विषय होता चिठ्ठी प्रकरणाचा. कोणीतरी एका मुलीला चिठ्ठी दिलेली. ती चिठ्ठी तिनं त्या मुलाला दिलेली व त्या मुलानं तीच चिठ्ठी दुसर्या कुणाला तरी दिलेली. ज्यात ती चिठ्ठी ज्याला दिली होती.त्या मुलाचे मायबाप चिठ्ठी देण्याचे माध्यम ठरलेल्या मुलाच्या आईवडीलांशी भांडायला आले होते. तो पाचवा वर्ग. त्या वर्गातील ती लहान मुलं. त्यांना प्रेम काय असतं तेही समजत नव्हतं. मात्र ती दोन्हीही मुलं माध्यम ठरली होती चिठ्ठी देण्यासाठी आणि शिव्या त्या दोघांनाच पडल्या होत्या. त्यातच नारायण सरही रात्रभर पिसले गेले होते त्या चिठ्ठी प्रकरणात. सरांना राग येणं साहजीकच होतं. कारण सरांना असं शाळेतील प्रेम आवडत नव्हतं. कारण शाळेत प्रेमातून घडलेली कित्येक प्रकरणं त्यांनी अनुभवली होती. ज्यात मुली पळून गेल्या होत्या. परंतु त्यांचा संसार हा सुखाचा झाला नव्हता. काहींचे त्या प्रेमप्रकरणातून मायबाप दुरावले गेले होते. तर काहींचे संसार तुटले होते. सरांना राग आला होता आपल्या वर्गाचा. कारण त्यांना वाटत होते की अशाच चिठ्ठी देण्याच्या प्रकरणातूनच ही लहान मुलंही पुढे जावून बिघडण्यास कारणीभूत होतील. सरांना वाटत होते की ते जी मुलं शिकवितात. त्यांनी बिघडू नये. त्यांनी सोज्वळ राहावे. शाळेतील विद्यार्थ्यात प्रेम वैगेरे काही नसतं. असते ती वासना वा हवस. ज्यातून दुरगामी परिणाम होतात. तो दिवस व त्या दिवशी प्रकरण माहीत होताच सरांनी वर्गात रागाच्या भरातच मार्गदर्शन केलं. ज्यातून मुलं चूप होती. ती शांतपणे ऐकत होती सरांचे बोल. एखाद्या मोठ्या झालेल्या विद्यार्थ्यांसारखे. त्यावर कोणीच बोललं नाही. आज वर्ग दिवसभर शांतच होता. त्याचं कारण होतं सरांचं रागावणं. सरांनी आपल्या मार्गदर्शनातून चांगले शिका व स्वतः आत्मनिर्भर व्हा, असाच संदेश दिला होता. त्यानंतरच प्रेम करा असंही म्हटलं होतं. त्रिशाला आठवत होतं, नारायण सरांचं बोलणं. सर वर्षभर विद्यार्थ्यांशी चांगलेच बोलले होते. चांगलेच वागले होते. परंतु ते शेवटच्या दिवसात रागावून बोलले. चिठ्ठी प्रकरणापासून रागातच वागले. त्याचा परिणाम हा झाला की त्यांच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी तरुणाईतही प्रेम केलं नाही. हं, बोलणं चालणं ठेवलं. परंतु तेही तेवढ्यापुरतंच. सरांनी सांगीतल्यानुसार जेव्हापर्यंत ती मुलं आत्मनिर्भर झाली नाहीत, तेव्हापर्यंत त्या मुलांनी जोडीदार पकडले नव्हते व लग्न केले नव्हते. शिवाय पुढे कालांतरानं सर्वजण विवाहबद्ध झाले. त्यातच त्यांचे विवाहही आईवडीलांच्याच मर्जीनं झाले होते. नारायण सरांनी अगदी छोटे छोटे प्रसंग टिपले व त्याच छोट्या छोट्या प्रसंगातून विद्यार्थ्यांवर संस्कारच फुलवले होते. जेणेकरुन आजही नारायण सर जेव्हा जेव्हा विद्यार्थ्यांना आठवायचे. तेव्हा तेव्हा गहीवरुन यायचं. त्रिशाला ती सकाळ आठवत होती. ती अंगणात पाणीच टाकत होती. तोच तिच्या मुलानं फोन आल्याचं सांगीतलं. फोन एका अज्ञात क्रमांकावरुन आला होता. फोनवरुन कर्कश आवाज होता. आज तुमचे नारायण सर राहिले नाहीत. तो फोनवरुन त्रिशाला आलेला पुढील व्यक्तीचा आवाज. त्या आवाजावर विश्वास बसला नव्हता तिचा. परंतु ती बातमी सत्य होती. कारण जेव्हा वर्तमानपत्र तिच्या हातात पडलं. त्यात नारायण सर गेल्याचं स्पष्टच लिहिलं होतं. त्रिशाला तशी नारायण सराच्या मृत्युची बातमी येताच तिला आठवला तो वर्ग. त्यातच आठवले तिला त्या वर्गात सरांनी दिलेले संस्कार. ज्या संस्कारातून ती आज एक संस्थाचालिका बनली होती व तेच संस्कार विद्यार्थ्यांना देत होती. ज्या खाजगीकरणानं नारायण सरांची गळचेपी झाली होती. त्याच खासगीकरणातून ती आपल्या शाळेतील विद्यार्थ्यावर संस्कारही फुलवत होती. तिला वाटत होते की कदाचीत नारायण सर जर तिला भेटले नसते तर ती जास्त शिकलीच नसती. तशीच जीवनाच्या अगदी तरुणवयात ती कुण्या महाविद्यालयीन तरुणाशी प्रेम करुन फुर्रर्र झाली असती. ज्यातून तिचंच आयुष्य उध्वस्त झालं असतं. त्रिशानं जी शाळा काढली होती. त्या शाळेतून ती संस्कार शिकवीत होती. तिच्या शाळेत ती नित्य मार्गदर्शन करीत असे संस्काराविषयीच. कधीकधी नारायण सरांचेच किस्से वर्गातून सांगत असे कथेच्या स्वरुपात. त्यातच विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर होण्याच्या गोष्टी शिकवीत असे. शिवाय खाजगीकरण असल्यानं व तिच्या शाळेला शासनाचं अनुदान नसल्यानं ती विद्यार्थ्यांकडून कमी शुल्क घेत असे. ज्यातून सर्वसामान्य गरीबांच्या मुलांनाही शिक्षण घेता येत असे. व्यतिरीक्त तिनं आपल्या शाळेतून असा एक आरक्षण ठेवले होते की जे गरीबात गरीब विद्यार्थी असत, त्यांना निःशुल्कपणानं शिकता येत असे. अशा विद्यार्थ्यांना तिच्या शाळेत कोणतंच शुल्क लागत नव्हतं. आज त्रिशानं महाविद्यालयही उघडलं होतं. ज्या महाविद्यालयातून डॉक्टर, इंजीनियर बनवले जात असत. परंतु त्रिशा त्यांच्याकडूनही शुल्क घेत नसे. जे शुल्क इतर महाविद्यालयात असायचं. ज्या अभ्यासक्रमाला शिकायला इतर महाविद्यालयात बाजारु स्वरुप प्राप्त झालं होतं. त्रिशानं एवढं करीत असतांना आपल्या महाविद्यालयातील मुलांना प्रेम करायला बंदी घातली होती. ती तशी मुलं आढळून आल्यास त्यांना महाविद्यालयातून काढून टाकत असे. तिचं म्हणणंच होतं की शाळा, महाविद्यालय हे शिकण्यासाठी असतं. प्रेम करण्यासाठी नाही. शाळा, महाविद्यालयातून शिकून आधी आत्मनिर्भर व्हा. मगच प्रेम करा. जे तशा स्वरुपाचं विचाराचं बीज नारायण सरांनी ती वर्ग पाचवीत असतांनाच त्रिशासह सर्व विद्यार्थ्यात पेरलं होतं. तेच संस्कार आता ती आपल्याही शाळा, महाविद्यालयातून पेरत होती. मुलांना डॉक्टर, इंजीनियर बनविण्यासाठी नाही तर परीपुर्ण माणूस बनविण्यासाठी. ज्यात माणूसकी कुटकूट भरलेली असेल. ***************************************************************समाप्त ******************