Kripi Filej - Khari Drashy Bhitichi - Season - 1 - Part 32 in Marathi Horror Stories by jay zom books and stories PDF | क्रीपि फाईलज - खरी दृष्य भीतीची ... - सीजन 1 - भाग 32

The Author
Featured Books
  • पिता का जन्म

    पिता का जन्म एक एक गुजरता पल मानो दिनों की तरह गुजर रहा था ,...

  • My Arrogent Businessman - 4

    एक बूढ़ा आदमी अपने छोटे से घर के बाहर चारपाई डाल कर सो रहा थ...

  • जंगल - भाग 23

                      ( 1 धारावाहिक )            भूमिका बताने से...

  • बंधन प्यार का - 36

    "पहले साल में 6 महीने तो बन्द और प्रदर्शन होता था।बचे 6 महीन...

  • रिश्ते का बांध - भाग 10

    ***"और तब अपने हाथों से बनाये हुए कागज़ों को मल्लिका ने कालिद...

Categories
Share

क्रीपि फाईलज - खरी दृष्य भीतीची ... - सीजन 1 - भाग 32

जत्रा भाग 1

मित्रहो आजचा सत्यअनुभव आहे जत्रा !         एखाद्या देवतेच्या उत्सवासाठी अथवा एखाद्या सत्पुरुषाच्या जयंती वा पुण्यतिथी उत्सवासाठी एखाद्या तीर्थक्षेत्री वर्षातून त्या ठराविक दिवशी वा ठराविक कालानंतर गावोगावच्या लोकांचा जो धार्मिक मेळावा जमतो, त्यास जत्रा किंवा मेला म्हणतात.        जत्रा नाव ऐकलं की डोळ्यांसमोर येत ते दृष्य म्हंणजे , उंचच्या उंच भिंगरीसारखे गोल गोल भिंगणारे आकाश पाळणे-  पटरीवरुन धावणारी ट्रेन ,  मिठाई, खेळणी, अशी वेगवेगळ्या प्रकारची दूकान - लोकांची भलीमोठ्ठी गर्दी ..           मित्रहो आता तुमची उत्सुकता जास्त न ताणता थेट सत्यकथेला सुरुवात करुयात ? चला तर मग!          सदर अनुभव मी  जत्रेत स्व:हक्क आकाशपाळण्याचे मालक असलेले  विजय दुंदा सावरकर ह्यांसकडून ऐकला आहे , जी घटना त्यांच्या  परिवारा सोबत घडली आहे -          घटना घडली तो काळ  :2001      अनुभवाच नाव: जत्रा              विजय दुंदा सावरकर वय वर्ष 42 ह्यांचा आकाशपाळण्याचा धंदा  होता - म्हंणजे स्काय क्रेडल होय !  जिथे कुठे  जत्रा , मेळा, उरुस, जुळूस भरत असे - तिथे त्यांना बोलावण यायचं व ते आपल आकाशपाळण्याच सर्व सामान जागेवर नेऊन  जत्रेत आकाशपाळणा  लावत असत.         विजय ह्यांच्या परिवारात बायको मीनाक्षी विजय सावरकर वय वर्ष 36 ह्या विजयरावांना त्यांच्या कामात मदत करत असायच्या-  म्हंणजेच आकाशपाळणा जिथे लागायचा , तिथे बाजुलाच तिकिट विकायच्या काउंटरवर त्या बसून तिकिट विकायच्या,    मीनाबाईंना विजयरावांकडून एक मुलगा  होता - निरंकुश उर्फ निरु विजय सावरकर वय वर्ष 17 तो सुद्धा आपल्या वडिलांना त्यांच्या कामात हातभार लावायचा..        तर झालं अस, 2001 ह्या साली  डिसेंबरच्या नुकत्याच सुरु झालेल्या थंडीच्या महिन्यात ,  विजयरावांना एके जत्रेत बोलावण आल होत -           जत्रा सुरु व्हायच्या अगोदरच म्हंणजेच  नऊ दिवसां अगोदरच, विजयराव , मीनाक्षीबाई, आणि निरु  आपल्या परिवारा समवेत जत्रेच्या ठिकाणी  निघुन  झाले , जत्रा सुरु होण्या अगोदर  येण्यामागच कारण हेच की आकाशपाळणा उभ करण्यासाठी  नऊ दिवसतरी लागायचेच..-           विजयराव आकाशपाळण्याच सामान टेम्पोमार्फत घेऊन जत्रेच्या ठिकाणी हजर झाले होते -         जत्रा भरायला अजुन खुप दिवस बाकी होते -  जत्रा जिथे भरणार होती , तो एक वर्तुळाकार मैदान होता -  मैदानाच्या पुढच्या बाजुला पाच मिनिटांवर हाईवे होता, अजुन पाच मिनिटांवर पुढे रेल्वेस्टेशन होत -                 मैदानाच्या मागच्याबाजुला  पाच मिनिटांवर जंगलासारखा भाग होता झाडांनी नटलेल्या टेकड्या होत्या - हव तर रानच म्हंणूयात !           विजयरावांनी गडी मांणसांमार्फत आकाशपाळण्याच सर्व सामान खाली उतरवल, आणि कामाला सुरुवातही केली!     तो पर्यंत मीनाक्षीबाईंनी , निरुसोबत जरा दूर बाजुलाच तिघांना  राहण्यासाठी एक त्रिकोणी आकाराचा  तंबू ठोकला -           सकाळी सुरु झालेल काम संध्याकाळी सहा पर्यंत थांबल ,मजूर लोक काम करुन निघुन गेले आता ते उद्याच येणार होते.         मीनाक्षीबाईंनी  सोबत आणलेल्या गैस स्टोव्हवर जेवन वगेरे बनवलंच होत - जेवन करुन, भांडी वगेरे घासून सावरकर कुटूंबांची तंबू आत अंथरुन टाकुन झोपायची तैयारी सुरु झाली..          थंडीचा महिना असल्याने गारठा चांगलाच वाढला होता - मैदानावर चारही दिशेना पांढ-या साडीतल्या हडळीसारखा धुका पसरला होता.          रात्री दिड वाजेच्या सुमारास  विजयरावांना झोपेतून जाग आली,  पाणी  जास्त पिल्याने विजयरावांना  लघुशंका आली होती..          डोळ्यांवर झोपेचा अंमळ जाणवत होता - डोळ्यांसमोर सर्वकाही अंधुक अंधुक दिसत होत.         विजयराव सोबत एक बैटरी घेऊन तंबूतून बाहेर आले , मैदानावर विजयरावांच्या तंबू व्यतिरिक्त अजुन कोणतही तंबू नव्हत -         त्यासहितच ह्या दिड वाजेच्या समई त्या सुनसान मैदानावर विजयराव एकटेच उभे होते , विजयराव बैटरीच्या पिवळसर उजेडात  तंबूपासून दहा - वीस पावळ चालत जरा दूर आले..      चड्डीखाली सरकवून त्यांनी कार्यक्रम उरकायला घेतला -           म्हंणतात रात्री थंटीत, थंड हवेने दूरचे आवाज वाहत जवळ येतात..-          विजयरावांनी लघुश्ंका झाली तस चड्डी वर घेतली, हळुच मागे वळले - की तोच कानांवर एक हसण्याचा आवाज आला..         " हिहिहिहिहिहिहीहीह्हीहीहीही!" एखादी चेटकी बाई हसावी तसा तो आवाज होता -          तो हसण्याचा आवाज ऐकून विजयराव जागीच थांबले ,  हातातल्या बैटरीचा प्रकाश   त्यांनी मैदानावर आजुबाजुला फिरवून मारला -  परंतू काहीच दिसल नाही..  तोच पुन्हा आवाज आला - परंतू ह्यावेळेस  आवाज आला तो मुसमसून रडण्याचा ....         " हं ,हं,हं,हं,हं,उंहू,ऊ,उह्ं..!"  त्या आवाजाने विजयरावांच्या डोळ्यांवरची झोप उडाली- ते जरासे सावध झाले , कानांनी आवाजाची दिशा ओळखली आणि हातातली बैटरी रानाच्या दिशेने मारली ,         बैटरीचा पिवळसर प्रकाश वेगान धावत  त्या रानातल्या झाडांवर पडला , आणि त्याच प्रकाशात विजयरावांना एक फिकट राखाडी रंगाची नऊव्वारी साडी , छातीवर गडद काळसर पोळका , डोक्यावरचे पांढरे केस पाठिमागे सोडलेले, अशी एक म्हातारी बाई पाठमोरी चालत रानात घुसतांना दिसली..        विजयरावांनी एकवेळेस डोळे मिचकावूनपुन्हा दुर दृष्टी टाकली, परंतू  डोळे मिचकवताच म्हातारी  गायब झाली होती, नजरेला दिसत नव्हती..        " असेल इथलीच कोणितरी , !" विजयराव स्वत:शीच म्हंणाले.  पुन्हा तंबूत निघुन गेले .. क्रमशः जत्रा भाग 2बैटरीचा पिवळसर प्रकाश वेगान धावत  त्या रानातल्या झाडांवर पडला , आणि त्याच प्रकाशात विजयरावांना एक फिकट राखाडी रंगाची नऊव्वारी साडी , छातीवर गडद काळसर पोळका , डोक्यावरचे पांढरे केस पाठिमागे सोडलेले, अशी एक म्हातारी बाई पाठमोरी चालत रानात घुसतांना दिसली..        विजयरावांनी एकवेळेस डोळे मिचकावूनपुन्हा दुर दृष्टी टाकली, परंतू  डोळे मिचकवताच म्हातारी  गायब झाली होती, नजरेला दिसत नव्हती..        " असेल इथलीच कोणितरी , !" विजयराव स्वत:शीच म्हंणाले.  पुन्हा तंबूत निघुन गेले .. Xxxxx आता पुढे         दुस-या दिवशी ..जत्रेच्या मैदानावर ब-या पैकी नवीन लोक आली होती, पटरीवर धावणारी ट्रेन, पाण्यात चालणारी होडी अशी खेळ  असलेली धंद्यावाली मांणस आली होती ,  सर्वाँनी आप-आपले तंबू दूर दूर ठोकले होते -      आकाशपाळण्याच  दिवसाच काम होऊन गेल , की मजुर लोक घरी निघुन जात-  तो पर्यंत मीनाक्षीबाई जेवन बनवायच्या , साडे नऊ वाजेपर्यंत जेवण , भांडी वगेरे घासून झालं - की  दहा - सव्वा दहा वाजेपर्यंत सावरकर कुटूंब अंथरुण  टाकुन झोपी जात...        दुस-या दिवशी सुद्धा वेळेवरच सावरकर कुटूंब झोपी गेले..-   मध्यरात्री  तीन वाजता निरुला जाग आली,  साहजिकच आहे , की थंडीच्या महिन्यात पाणी पिल्यावर लघवी येणारच...        निरु अंथरुणातून उठला , बाजुला ठेवलेली बैटरी घेऊन तंबूतून बाहेर आला -  त्याने त्य्च्या आई - किंवा बाबाला उठवल नव्हत , मी जरा लघवीला जाऊन येतो अस सांगितलं नव्हत - कारण आपण आता मोठे  झालो आहोत अस त्याच समज होत.       निरुने आजुबाजूला पाहिल,  मैदानावर  त्यांच्यासारखीच जत्रेत धंदा करण्यासाठी आलेल्या मांणसांचे तंबू ठोकलेले दिसत होते .       अंधारात त्या तंबूना एका मृत - प्रेताच घर असलेल्या कबरीसारख स्वरुप आल होत -    त्याच तंबुंच्या आसपास हून ( अवतीभवतीहून) सफेद रंगाच धुक वाहत पुढे जात होत...         निरुने आपल नित्यकर्म आटोपले - तोच कानांवर एक हाक आली-         " ओय !"  आवाज ईतका स्पष्ट होता -की निरु जागेवरच थांबला , बैटरी जागेवरुनच चारही दिशेना मारुन पाहिली -          पिवळ्या बैटरीचा उजेड अंधाराच्या कातडीला कापत दूर जात होता..-         " ओय ....ऑय!"  पुन्हा एकदा हाक आली- आवाज लहान मुलाचा होता .         " कोण आहे ?" निरुने बैटरी आजुबाजूला मारत , पाहत विचारल.        " ऑय..ऑय..! " तिस-यांदा हाक आली. ती थेट  मागून , आवाज  बरोबर पाठिमागून आला होता..        त्या आवाजाने  निरु जरासा दचकला , पटकन त्याने वळून मागे पाहिल,  नजरेला एक सहा वर्षाचा मुलगा दिसला...       अंगात एक तपकीरी फुल बाह्यांचा कुर्ता ,खाली सफेद रंगाचा पायजमा - पायांत काळ्या चपला..        त्या मुलाचा चेहरा खुपच पांढरट होता - ईतका की पुर्णत पावडरची डबीच फासली होती -  डोळ्यांखाली फिकट  काळसर वर्तुळ उमटली होती..  -दोन्ही हातांत रेल्वेच इंजिन असलेल खेळण धरल होत..   त्या मुलाची     नजर शुन्यात निरुकडे पाहत होती -        " ए काय रे ? " निरु जरा रागातच म्हंटला.           त्या मुलाच्या अश्या अचानक मागे  येऊन उभ राहण्याने निरुला जराशी भीतीच   वाटली होती, परंतू लागलीच भीतीने रागाच रुप घेतल होत..         तो मुलगा एकटक शुन्य नजरेने , डोळ्यांत कसलेच भाव न ठेवता , एकटक निरुलाच पाहत होता..         " काय रे ? ईतक्या रात्री बाहेर काय करतोय ? जा  तंबूत जा , झोप जा जाऊन- तुझे आई बाबा वाट बघत असतील जा !" निरु चढ्या आवाजात जरासा खेकसत उच्चारला..         " निरु अरे कुणाशी बोलतोयेस !" अचानक निरुच्या मागून मीनाक्षीबाई आल्या -   निरुने एकक्षणासाठी  मागे वळून समोर  पाहिल,  व पुन्हा समोर पाहत म्हंटला..        " हा काय हा  पोरगा आहे ईथ!" अस म्हंणतच निरुने समोर पाहिल, तसे त्याचे डोळेच विस्फारले - तोंड मोठ झाल - चेहरा पांढरा पडला..         कारण समोर फक्त पिवळसर बैटरीचा प्रकाश आणि त्या उजेडात फिरणार पांढर धुक दिसत होत..क्रमशः  भाग जत्रा भाग 3 " निरु अरे कुणाशी बोलतोयेस !" अचानक निरुच्या मागून मीनाक्षीबाई आल्या -   निरुने एकक्षणासाठी  मागे वळून समोर  पाहिल,  व पुन्हा समोर पाहत म्हंटला..        " हा काय हा  पोरगा आहे ईथ!" अस म्हंणतच निरुने समोर पाहिल, तसे त्याचे डोळेच विस्फारले - तोंड मोठ झाल - चेहरा पांढरा पडला..         कारण समोर फक्त पिवळसर बैटरीचा प्रकाश आणि त्या उजेडात फिरणार पांढर धुक दिसत होत..Xxxxx आता पुढे :        तो मुलगा ? ईतक्यात कुठे , कसा गेला? कळायल काहीच मार्ग उरला नव्हता.!         " अंग आई हा पोरगा कुठे गेला , ईथेच तर होता आता!" निरुने बैटरी  आविश्वासाने अवतीभवती मारली.        " निरु ईथे कोणीच नाहीये रे , हे बघ जास्त विचार करु नको , असेल ईथलाच  कोणाचतरी पोरगा , चल टाईम झालंय खुप चल झोप चल, आणि एकट्याने बाहेर जाऊ नकोस;  बाहेर जायचं असेल तर कोणालातरी उठवत जा !"  मीनाक्षीबाई अस म्हंणतच निरुला हाताला धरत तंबूच्या दिशेने घेऊन गेल्या..              अश्यातच चार पाच दिवस निघून गेले, ह्या दिवसांत काही विचीत्र अशी घटना घडली नाही, कामाच्या व्यापात निरु - विजयराव ती म्हातारी तो मुलगा ह्या दोघांबद्दल विसरुनही गेले होते.         अश्यातच आठव्यादिवशी :  संध्याकाळ झाली होती - मीनाक्षीबाई  जेवण बनवत होत्या , तेवढ्यात मीनाक्षीबाईंच्या लक्षात आल की पाणिच संपल आहे ..   मीनाक्षीबाईंनी विजयरावांना ह्या बद्दल सांगीतलं ...    त्यावर ते म्हंटले की मी करतो काहीतरी..           निरु तंबू बाहेर उभा होता - त्याने त्याच्या आई आणि वडीलांच बोलण ऐकल होत -            " ऑय,ऑय ..!" अचानक निरुच्या कानांवर ती हाक आली..        निरुने आवाजाच्या दिशेने पाहिल, समोर तोच मुलगा उभा होता - ज्याला निरुने मध्यरात्री पाहिल होत .         अंगात एक तपकीरी फुल बाह्यांचा कुर्ता ,खाली सफेद रंगाचा पायजमा - पायांत काळ्या चपला..        त्या मुलाचा चेहरा खुपच पांढरट होता - ईतका की पुर्णत पावडरची डबीच फासली होती -  डोळ्यांखाली फिकट  काळसर वर्तुळ उमटली होती.. !         डोळ्यांतली खोल बुभळांची   नजर शुन्यात निरुकडे पाहत होती -         ' काय आहे रे ?"  निरुने त्या मुलाला विचारलं..          निरुच्या वाक्यासरशी त्या मुलाने हळूच आपला एक हात वर उचल्ला, रानाच्या दिशेने करत म्हंटला..         " पाणी..!" त्या मुलाच्या तोंडून फक्त ईतकेच वाक्य निघाले..         "    तिकडे पाणि आहे का ?" निरुने त्या मुलाला प्रश्ण केला.-        निरुकडे  शुन्यात पाहणा-या त्या मुलाने  ह्यावेळेस फक्त हो अस करत मान हळवली.. व  पाठमोरा वळून मंद गतीने चालत पुढे पुढे जाऊ लागला..        निरु तंबूत  परत आला - निरुने त्याच्या आई वडीलांना पाण्याबद्दल सांगितलं ..- विजयराव - निरु  दोघेही बापलेक  - प्लास्टीकचे दोन डबके घेऊन रानात पाणि आणायला निघाले..-          विजयरावांनी सोबत प्रकाशाकरीता एक एव्हरीडे बैटरी व नोकियाचा फोन घेतला होता.       पाच मिनिटे चालून झाल्यावर ह्या दोघांनी मैदान पार केला - व आता रानाची सीमा सुरु झाली,         आजूबाजुला मोठ मोठी झाडे दिसत होती-   कालोखात त्या झाडांना भयंकर भ्योत्पादक असा , राक्षसी आकार प्राप्त झाला होता.         दोघेही रानातल्या पायवाटेने चालत चालत पुढे जाऊ लागले - आजुबाजूहून रातकीड्यांची किरकिर कानांना ऐकू येत होती..       अंधारात वाट दाखवण्याकरीता - विजयरावांनी बैटरी सोबत  घेतली होती - बैटरीच्या पिवळाधमक उजेड समोरची वाट दाखवत होता.         अश्यातच दोघेही बाप-लेक गप्पा मारत- मारत पुढे  जात होते -          गप्पांमध्येच विजयरावांनी निरुला सांगितलं की पहिल्यादिवशी मला एक म्हातारी ह्या रानात पाठमोरी चालत जातांना दिसली होती , नक्कीच ती म्हातारी आणी तिचा परिवार ईथेच कुठेतरी राहत अशणार .. व ईथेच कुठेतरी पाण्याचा साठा ही असेल!          विजयराव निरु दोघांनाही चालून फार वेळ झाला होता - पाण्याचा चिन्ह मात्र अद्याप कुठेही दिसत नव्हता -   नाही कोणती मानव वस्ती तिथे होती.        निरु - विजयराव दोघांच्याही नजरेला पाणि तर नाही, परंतू झाडाच्या ढोळीत बसलेली मोठ्या मोठ्या काळ्याशार आकाराची, भेदक वटारलेल्या पिवळ्याधमक डोळ्यांची दोन- तीन  घुबडे मात्र दिसली होती..         मध्येच जरा डोक्यावरुन काळ्या रंगाची वटवाघळे चिचिची असा आवाज काढत उडून जात होती -        ज्या आवाजाने अंगावर भ्योत्पादक - (भयउत्पन्नक )असा काटा उभा राहत होता..        दहा मिनिटे अजुन चालून झाल्यावर शेवटी विजयराव - आणि निरु दोघांना एक वहल दिसला , क्रमशः. जत्रा भाग 4 निरु - विजयराव दोघांच्याही नजरेला पाणि तर नाही, परंतू झाडाच्या ढोळीत बसलेली मोठ्या मोठ्या काळ्याशार आकाराची, भेदक वटारलेल्या पिवळ्याधमक डोळ्यांची दोन- तीन  घुबडे मात्र दिसली होती..         मध्येच जरा डोक्यावरुन काळ्या रंगाची वटवाघळे चिचिची असा आवाज काढत उडून जात होती -        ज्या आवाजाने अंगावर भ्योत्पादक - (भयउत्पन्नक )असा काटा उभा राहत होता..        दहा मिनिटे अजुन चालून झाल्यावर शेवटी विजयराव - आणि निरु दोघांना एक वहल दिसला , Xxxxxx आता पुढे : वहल तस आटलेलच होत -         परंतू काही काही ठिकाणी जमिनीत खड्डे  खणलेले होते. ज्या डबक्यांमध्ये पाणी साचल होत.          विजयराव निरु दोघेही त्या डबक्यांजवळ आले , दोघांनीही सोबत आणलेल्या प्लास्टीकच्या डबक्यांत पाणी भरल..         विजयरावांनी फोन मध्ये वेळ पाहिल- साडे सात वाजले होते - आणि फोनमधल्या सिमला रेंजही फुल होती..                  " चल  निघूयात आता !" विजयराव फोन खिश्यात ठेवत म्हंणाले.          दोघांनी प्लास्टीकच्या डबक्या खांद्यावर ठेवल्या - आणि परतीची वाट धरली..          पुढे विजयराव आणि मागे निरु असे दोघे चालत जात होते. -         आजुबाजुला धुक्याची भिंत होती - धुक्याचे पुंजके अमनिवय शक्तिच्या हुकमाखाली फिरत असल्यासारखा भास होत होता..          चालता चालताच निरुला जाणवल की कोणीतरी आपल्या पाठीमागून चोरासारख लपतछपत पाठलाग करत मागे  येत आहे..        निरु त्या जाणीवेने  जागीच थांबला -  दोन्ही डोळे डाविउजवीकडे  फिरवत त्याने वळून मागे पाहिल-           परंतू मागे काळ्या अंधाराशिवाय कोणीही नव्हत - ! निरु पुन्हा त्याच्या वडिलांच्या मागोमाग चालू लागला..-     जरा दूर आल्यावर पुन्हा तोच भास झाला. , कोणीतरी मागून चालत येत आहे - परंतू मागे पहिल्यावर मात्र नजरेला काहीच दिसत नव्हत..      निरु पुन्हा चालू लागला - काहीवेळाने  मागून अक्षरक्ष पावलांचा धप धप असा आवाज कानांना ऐकू येऊ लागला -           निरुला आता कळून चुकलंच होत - नक्कीच मागे कोणितरी आहे - पटकन निरुने विजयरावांना आवाज दिला ," बाबा आपल्या मागून कोणितरी येतय !"  निरु - विजयराव दोघांनी एकाचवेळेस मागे वळून पाहिल- विजयरावांनी हातातली विजेरी मागे सगळीकडे मारुन पाहिली -           परंतू त्या बैटरीच्या पिवळसर  उजेडात सोनेरी रंगाच गवत- रिकामी पाऊलवाट ह्याव्यतिरीक्त काहीही नव्हत..        विजयरावांनी निरुला तुला भास झाला असेल , अस  म्हंटल  - व दोघेही पुन्हा वाट चालू लागले..         काहीवेळा अगोदर ही दोघ अर्ध्या तासात     वहळापर्य्ंत पोहचली होती - परंतू अर्धातास तर केव्हाचंच होऊन गेला होता ना ? मग अजुन ही दोघे जत्रेच्या मैदानावर , तंबूपाशी पोहचली का नव्हती ?           अचानक विजयराव व निरु दोघांच्या पाऊल वाटेतून  समोरुन  एक दूधाळ  रंगाची गाय धावत आली -  जिच्या दुधाळ अंगावर  काळ्या रंगाचे डाग होते - डोक्यावर धारधार शिंगे होती , ती गायसाधारण सहा फुट उंच  आणि रुंदीने पाच फुट लांब होती..        विजयराव- निरु दोघेही प्रसंगसावधानता बाळगत झटकन त्या गाईच्या वाटेतून बाजुला झाले  ती गाई आली तशी समोरुन मागे निघुन गेली- अंधारात हरवली....           " निरु  तू ठिक आहे ना ?" विजयरावांनी काळजीमय स्वरात विचारलं .. !  निरुने फक्त मानेनेच हो अस म्हंटल.. व म्हंटला.        " बाबा एवढी मोठी गाय मी आजपर्यंत पाहिली नव्हती !" निरु अविश्वसनिय स्वरात म्हंटला.          विजयराव सुद्धा हक्काबक्का झाले होते - त्यांनी सूद्धा ईतकी विलक्षण मोठी गाय कधी पाहिली नव्हती..          परंतू त्या गाईबद्दल ते काही म्हंणाले नाही, फक्त निरुला ईतकेच म्हंटले -         " लवकर  चल निरु टाईम झालाय..!" विजयरावांच्या स्वरात भीतीची छटा होती.. आवाज जरासा  बसल्यासारखा झाला होता.-         दोघांनाही चालून - चालून अर्धातासापेक्षा जास्त वेळ घेऊन गेली होती -  विजयरावांनी सोबत आणलेल्या त्यांच्या नोकीया फोनमध्ये वेळ पाहिली ..         पावणे नऊ झाले होते - आणि फोनच्या सिमला नेटवर्क नव्हत..- काहीवेळा अगोदर तर नेटवर्क मिळत होत - अगदी चारही कांड्या फुल दिसत होत्या , मग अचानक नेटवर्क जाण?  कस शक्य आहे ? विजयराव जागेवरच उभे होते, फोनमध्येच पाहत होते - साडे सात वाजता त्यांनी परतीची वाट धरली होती -         मग आठ सव्वाआठ पर्यंत तरी ते तंबूपर्यंत पोहचायला हवे होते - मग ईतका ऊशीर कस लागू शकत-  तब्बल सव्वा एक तास ते जंगलातून चालत होते - आणि अद्याप ते तंबूपर्यंत पोहचले नव्हते..         अचानक  धप- धप असा आवाज करत हंब्बा असा एक विलक्षण घोग-या आवाजात हंबरण फोडत मगाशचीच ती सफेद रंगाची गाय वेगान समोरुन धावत आली- ..         अचानक समोरुन धावून आलेल्या ह्या गाईची कल्पना दोन्ही बापलेकांना मुळीचंच नव्हती -         ज्याने दोघेही भयंकर घाबरले , दोघांच्याही खांद्यावरुन पाण्याने भरलेली प्लास्टीकची डबकी खाली पडली-         धप- धप असा आवाज झाला सर्व पाणी खाली जमिनीवर सांडल..         समोरुन आलेली ती गाय पुन्हा आली तशी पुढे निघुन गेली अंधारात गायब झाली...        "  बाबा तुम्ही ठिक आहात  का ? आणि अस मध्ये का थांबला होतात ?" निरुने प्रश्ण केला.          त्यावर विजयराव घाबरतच - थरथरत्या स्वरात म्हंटले.        " काहीही ठिक नाहीये निरु , काहीतरी भयंकर घडत आहे आपल्या सोबत !"         " म्हंणजे ?" न समजून निरुने विचारले.        " बाळा , अरे आपल्यासोबत काहीतरी वाईट घडत आहे रे  , मला वाटत्ंय आपण छलाव्यात ( चकव्यात) फसलोय  !  अरे आपण अर्ध्यातासात तंबूवर पोहचायला हव होत - पण तब्बल सव्वा एक तास ऊलटून गेला आहे , पण अजुनही आपण पोहचलो नाहीये , नक्कीच- नक्कीच चकाट्याने आपली वाट  अडवलीये..! आपण फिरुन फिरुन तिथच येतोय..!"  निरुला आपल्या वडीलांकडून ही महीती ऐकून फार भीती वाटली , भीतीने काय करु  ? काय नको अस झालं ? मेंदू बधीर झाला - भीतीचे पाष संंमंध शरीरात पसरले..          " हिहिहिहिहिहीहीही!" अचानक अंधारातून  खसखसत्या स्वरात आसुरी मज्जाव करणार हसू बाहेर आल..         ते हसूसहितच आजुबाजुची झाडे फांद्यांसहितच वेगान हळू लागली- वारा सुटला..         " निरु , , निरु धाव - निरु धाव !"      विजयराव ओरडले ,  त्यांनी निरुचा हात हातात धरला - रानातून मिळेल त्या वाटेने काट्याकुट्याची पर्वा न करता धावत सुटले..      दहा मिनिटे झाली असतील , धावून धावून दोन्ही बाप लेकांना धाप लागली होती .. घश्याला कोरड पडली होती - धावून धावून छातीतले ठोके धड धड करत वाजत होते..      दोघेही जागेवरच थांबले -  श्वास पुर्ववत होईचपर्य्ंत दोघेही एका झाड़ाला खेटून खाली बसले -          तोच जरा वेळ  जातो न जातो पुन्हा एकदा घोग-या स्वरातल्या हंबरण्याचा आवाज आला , आणि त्या आवाजासरशी तीच ती सफेद रंगाची, अंगावर काळे टीपके सहा फुट उंच - पाच फुट रुंद गाय वेगान ह्या दोघांच्यासमोरुन धावत पुढे निघून गेली- व नजरेपासून दहापावळांवरच अचानक पांढ-या धुरात बदलत , गायब झाली..        हे समोरच आकळण क्षमतेपलीकडच द्रुश्य पाहून दोन्ही बापलेकांच्या अंगावरचा एकनी एक केस ताठरला - हाता - पायांवर मोहरीएवढ्या  लहान पुळ्या   उठून आल्या..        डोळे समोरच दृष्य पाहून खोंबणीतून बाहेर निघतील ईतके मोठे झाले..         " ऑय ओय !"  निरुच्या कानांवर तोच त्या लहान मुलाची हाक आली..-  क्रमशः. जत्रा भाग 5 शेवट डोळे समोरच दृष्य पाहून खोंबणीतून बाहेर निघतील ईतके मोठे झाले..         " ऑय ओय !"  निरुच्या कानांवर तोच त्या लहान मुलाची हाक आली..-  Xxx xxxxx आता पुढे        निरुने हळूच खेटून बसलेल्या झाडावर , मान मागे करुन वर पाहिल- तसा त्याचा ह्दयाचा ठोकाच चुकला.          झाडाच्या वरच्या फांदीला  वेताळासारख उलट लटकून - ते लहान मुलाच ध्यान झुळत होत..         दोन्ही पायांनी फांदीला विळखा घातला होता - डोक्यापासून ते कमरेपर्यंतच शरीर उलट लटकल होत -         पांढरा प्रेताड चेहरा , डोळ्यांतली दोन्ही बुभळे कोळश्यासारखी काळी निळी पडली होती -         काळ्याशार ओठांतले - तपकीरी दात विचकत ते ध्यान निरुकडे  पाहत हसत होत..        " हे हे हे हे हे हे हे हे  , कसा फसवला - कसा फसवला  , हिहिहिहिहिही! ऑय ऑय ..! हिहिह्हिहिहीही..!"  निरुची हे दृष्य पाहून बोबडी वळली - तोंडाला पिळ बसला - छातीतले ठोके थांबल्यासारखे झाले.. भीतीने निरु चड्डीत मुतला..-          " निरु काय बघतो  , निरु !" विजयरावांनी निरुला विचारलं परंतू त्याच्या तोंडून एक शब्दही निघेना , तस विजयरावांनीही हळुच वर पाहिल..         परंतू  त्यांना दिसल ते दृष्य वेगळ होत , फांदीवर ते लहान मुलाच ध्यान नसून - एक जक्खड चेटकी म्हातारी फांदीवर बसली होती-         अंगात फिकट  राखडी रंगाची नऊव्वारी साडी, त्यावर काळा पोळका - फांदीवरुन खाली सोडलेले काळेशार , निळसर मिश्रित कातडीचे पाय, त्या पायांना खुरासारखी धारधार नख होत -  वळवळ करत वळवळत होती..         म्हातारीचा सर्व शरीर मॉर्ग मध्ये बेवारस म्हंणून पडून- राहिलेल्या प्रेताप्रमाणे दिसत होत...   कातडी पांढरी काळीशार  होती,  डोळ्यांखालच रक्त गोठल होत तिथे काळशार सर्कल्ज तैयार झाले होते.. - आणि ते पिवळ्याजर्द रंगाचे डोळे, व त्यात मीरीचा ठिपका अशी ती अमानवीय ,भुत, ध्यानाची नजर खाऊ की गिळू अश्या हेतूने विजयरावांनाच पाहत होती..        विजयरावांनी कसतरी निरुला उठवलं , त्या झाडाखालून  - धावत पळत सुटले ..        विजयराव - निरु दोघांनाही आता ख-या अर्थाने कळल होत - आपण चकाट्याच्या चकव्यात - सापडलोय , आणि तो मुलगा व ती म्हातारी भुत आहेत..       दोघेही झाडाखालून ऊठले पुन्हा धावत - पळत जरा दूर आले , व जागीच थांबले -          " बाबा आता काय करायचं?  " निरु  म्हंणाला.          " आता फक्त देवच आपल्याला वाचवू शकतो निरु , नाहीतर हा चकाट्या , त्याच एकदा का आपल्या वरच मन भरल की आपल्याला मारुन टाकिल.! "   विजयराव घाब-या स्वरात म्हंणाले.           तोच अचानक गाईचा घोग-या स्वरातला हंबरण्याचा आवाज आला -  निरु - विजयराव दोघांनीही वळून समोर पाहिल..         समोर तीच ती सहा फुट उंचीची गाय उभी होती - तीचे डोळे अंधारात लाल विस्तवासारखे चकाकत होते..          आणी गाईच्या नाकांमधून गरम वाफाळते श्वास बाहेर पडत होते..-  त्या  गाईच्या पाठिवर  तेच त्या म्हातारीच ध्यान बसल होत..         त्या म्हातारीचे पिवळसर काजवासारखे डोळे अंधारात चकाकत होते.-            " हिहिहिहिही  गावलात र  दोघे , गावलात एकदाचे- आता मारणार दोघांना मी , हाड- मांस चावून खाणार दोघांची ..हिहिही!"  त्या म्हातारीच्या तोंडून खर्जातला आवाज बाहेर पडला ...         ती विचीत्र , भयानक गाई मोठ्याने हंबरली- तीचे ते लालेलाल विस्तवी डोळे चेंडू एवढे मोठे झाले..         धप धप पाऊल पुढे टाकत  - ती गाई ह्या दोघांच्या दिशेने येऊ लागली..        त्या गाईच्या अंगावर बसलेल्या म्हातारीच भुत दोन्ही हातांनी टाळ्या पिटू लागल.         विजयराव - निरु दोघांनी भीतीने डोळे मिटले, स्वत:हाचा हा भयंकर मृत्यू जणू ते दोघे पाहू शकत नव्हते..         बंद डोळ्यांआडून कानांवर धप धप असा पाऊलांचा आवाज पुढे पुढे येतांना ऐकू येत होता.          तोच अचानक एक तरुण ह्या दोघांच्या समोर येऊण पाठमोरा उभा राहिला , त्याच्या हातात एक काठी होती , काठीला लाल पिवळ्या रंगाचे दोरे बांधळे होते - त्याच काठीला चार पाच घुंगर अडकवली होती..  त्याच      घुंगरांचा आवाज विजयराव - निरु  ह्या दोघांच्या कानांवर पडला..         खाडकन दोघांनी डोळे उघडून समोर पाहिल- समोर एक पाच फुट उंचीचा तरण्याबांड देहाचा  तरुण उभा होता -  त्या तरुणाच  सोनेरी रंगाच कांतीमय देह अंधारातही चकाकत होत - डोक्यावरचे  वाढलेले काळेशार केस दोन्ही खांद्यांवरुन पाठिवर आले होते.- अंगात एक पिवळसर रंगाच धोतर सोडल तर सर्व शरीर निर्वस्त्र होत..त्या तरुणाच्या देहातून चंदनाचा  सूवास येत होता..       त्या विशाल सहा  फुट उंच गाईच्या, आणि त्या म्हातारीच्या भुतासमोर  तो तरुण निर्भीड, निडर उघड्या छातीने उभा होता..          त्या तरुणाच्या येण्याने विजयराव - निरु दोघांनाही सूरक्षेची भावना जाणवली..         ते ध्यान त्या तरुणाच्या येण्याने जागेवरच थांबल होत - ती गाई  डोक नाही नाही करत पाय जमिनीवर घासत  , नाकावाटे गरम श्वासांसहित फुत्कार सोडत होती..         मागे मागे जात होती.         " ए राम्या , ए राम्या ! तू तू ईथे काय करतोय , ए जा जा ..जा ईथून जा !" ते म्हातारीच ध्यान भित्र्या आवाजात म्हंटल..         " मी ह्या दोघांना वाचवायला आलोय !"त्या तरुणाच्या तोंडून एक करडा आज्ञाधारक आवाज बाहेर पडला !  त्या आवाजात कमालीची  जरब होती..         " आणि तुम्ही दोघे!" तो तरुण मागे न वळताच बोलू लागला. " मी ह्या म्हातारीला थांबवतो , तो पर्यंत तुम्ही  दोघे निघा ईथून - तुम्हाला शोधायला मांणस आली आहेत जा, आणि काहीही झालं तरी मागे न वळून पाहू नका.. जा.. !"  त्या तरुणाच्या वाक्यावर विजयराव व निरु दोघेही मागे न पाहताच  सरळ वाटेने धावत सुटले..         धावून धावून उरात आग पेटली होती - परंतू प्रश्न जीवाचा होता !  धावता धावताच मागून भयंकर असे रडण्याचे , ओरडण्याचे , मध्येच हसण्याचे असे कित्येकतरी आवाज कानांना ऐकू येत होते -  मागून धप धप असा आवाज सुद्धा कानांना ऐकू येत होता - जणू ते ध्यान मागून येतच होत..         परंतू विजयराव - निरु दोघांनाही मागे  वळून पाहिल नव्हत  - समजा  मागे वळुन पाहिल आणि ती अभद्र म्हातारी दिसली तर..        शेवटी पाच - दहा मिनिटे धावून  होताच, विजयराव - निरु दोघांनाही दूरुन बैट-यांचा प्रकाश दिसू लागला , पाच - सहा मांणसे हातात काठ्या  घेऊन त्यांच्याकडेच येतांना दिसली..         जी सर्व मांणसे विजयराव - निरु ह्या दोघांनाच शोधायला आली होती -  मीनाक्षीबाईंनीच ह्या सर्व मांणसांना विजयराव व निरु ह्या दोघांना शोधायला जाण्याची विनंती केली होती..         विजयराव व निरु दोघेही त्या मांणसांसोबत काहीवेळातच जत्रेच्या मैदानात असलेल्या त्यांच्या तंबूपाशी पोहचले - तसे त्या दोघांनाही दिसल. की मीनाक्षीबाई  प्रभू श्रीराम ह्यांच्या फोटोसमोर दिवा लावून , श्रीराम रक्षा पठण करत बसल्या आहेत , आणि त्या फोटोत जो श्रीरामांचा फोटो होता - निळ्या कमळासारखा श्यामवर्ण चेहरा , कमळासारखे टपोरे असलेले दोन डोळे - केसांचा मुकुट धारण केला होता.. -हातात खड्ग , तुणीर ,धनूष आणी बाण होता - त्या फोटोला पाहताच विजयराव व निरु दोघांचे डोळे भरुन आले होते , कारण काहीवेळा अगोदर ह्या दोघांना ज्या तरुणाने वाचवल होत त्या तरुणाचा चेहरा हूबेहूब प्रभू श्रीरामां सारखाच दिसत होता..            मीनाक्षी बाईंनी आपला नवरा , मुलगा सुखरुप परत आले हे पाहून श्रीरामांना मबोभावे हात जोडले..         विजयराव निरु दोघांनीही जंगलात घडलेला भयाण प्रसंग मीनाक्षीबाईंना, आजुबाजूला उभ्या मांणसांना  जसाच्या तसा सांगितला -  जे ऐकून तिथे उपस्थित मांणसांमधली काहीजण म्हंणाली..        " ह्या ताईंच्या श्रीराम रक्षापठणा  मुळे साक्षात श्रीराम तुम्हाला वाचवायला आले होते..भाऊ, खरंच तुम्ही फार भाग्यवान आहात! "        अजुन दोन दिवसांनी जत्रेला  सुरुवात झाली , आणि जत्रा असलेल्या गावातल्या  एका मांणसाकडून विजयरावांना कळाल , की त्या रानात  एक अस्वांग नावाच पिशाच्छ भटकत , हे पिशाच्छ कोणाचही रुप घेऊ शकत , हा भक्षाला चकाट्याचा चकवा लावतो, आणि मग मन भरेस्तोवर भक्षा सोबत खेलतो आणि शेवटला एकदा का मन भरल की त्याच्या वाहनाच्या पायदळी तुडवून त्याच्या भक्षाला मारुन टाकतो,   ह्या पिशाच्छाच वाहन म्हंणजेच ती गाय असते..         ही सर्व माहीती ऐकून विजयराव , निरु, मीनाक्षीबाई तिघांचेही भीतीने धाबे दणाणले होते -         पुन्हा एकदा विजयरावांनी श्रीरामांना हात जोडून त्यांचे आभार मानले..-  व पुन्हा कधीच त्या गावच्या जत्रेत ते आपला आकाशपाळणा घेऊन गेले नाहीत...         सदर अनुभव किती खरा , आणी किती नाही - ह्याच मोजमाप करुन नये!         कथा वाचा ऐका आणि भयथराराची मज्जा घ्या..         धन्यवाद भेटु पुढील अनुभवात..!                 समाप्त :