का कुणासाठी झुरायच, आपण फक्त आपल्यासाठी जगायचं in Marathi Classic Stories by Vishal Khandekar books and stories PDF | का कुणासाठी झुरायाच, आपण फक्त आपल्यासाठी जगायचं

Featured Books
  • એઠો ગોળ

    એઠો ગોળ धेनुं धीराः सूनृतां वाचमाहुः, यथा धेनु सहस्त्रेषु वत...

  • પહેલી નજર નો પ્રેમ!!

    સવાર નો સમય! જે.કે. માર્ટસવાર નો સમય હોવા થી માર્ટ માં ગણતરી...

  • એક મર્ડર

    'ઓગણીસ તારીખે તારી અને આકાશની વચ્ચે રાણકી વાવમાં ઝઘડો થય...

  • વિશ્વનાં ખતરનાક આદમખોર

     આમ તો વિશ્વમાં સૌથી ખતરનાક પ્રાણી જો કોઇ હોય તો તે માનવી જ...

  • રડવું

             *“રડવુ પડે તો એક ઈશ્વર પાસે રડજો...             ”*જ...

Categories
Share

का कुणासाठी झुरायाच, आपण फक्त आपल्यासाठी जगायचं

मनात आलेल्या प्रत्येक भावनेला एकच प्रश्न विचारायचा की, तुला जे खरं वाटतंय" तेच खर आहे का? आणि तेवढेच खरा आहे का? का याही पलीकडे अजून काहीतरी विश्व आहे. ज्या विश्वाच्या दुनियेत अजून आम्ही प्रवेश केलेला नाही. त्या आकाशातल्या ग्रहताऱ्यासारख आमच आयुष्य एका धाग्याच्या दोऱ्याने कुणीतरी गुरुफुटून टाकतय. आणि आम्ही त्या गुरफटलेल्या धाग्यात आयुष्यभरासाठी कैद होऊन जातोय.
 एखाद्या गुन्हेगाराला दिलेल्या कठोर शिक्षेप्रमाणे आम्ही आमचं आयुष्य आमच्याच हाताने व्यापून टाकतो. आमच्या भावनिकतेच्या भावनेला खोटी भुरळ घालून, आम्ही जे काल्पनिक जगणं जगतो ना' खरं तर ते जगणं नसून खऱ्या जाणिवेची कल्पना असूनही आमच्या समाधान साठी आम्ही निवडलेले एक काल्पनिक सीमारेषा असते. आयुष्याच्या मर्यादांमध्ये आम्ही अनेक मर्यादा फक्त त्यांच्यासाठी ओलांडतो. पण त्या मर्यादा ओलांडता ओलांडता आमचं आयुष्यच आमची मर्यादा कधी ओलांडत. हे आम्हालाच कळत नाही. भावनेला भावनिकतेचा आधार असावा. पण त्याची मर्यादा एवढी नसावी की आपली भावनाच आपल आयुष्य खडतर बनवेल. प्रत्येक गोष्टीचा आनंद तुम्ही घ्या आयुष्यामध्ये हवं असणारा हवं ते सुख तुम्ही उपयोगा. पण ज्या गोष्टीची नोंदच तुमच्या हव्या असणाऱ्या आयुष्यामध्ये नाहीये, त्या गोष्टीसाठी तुम्ही तुमच सुलभतेने चालणार आयुष्य एखाद्या गोष्टीसाठी का कठीण बनवता.
 ज्या गतकाळाच्या नोंदी भूतकाळावर कधीच अवलंबून नव्हत्या. त्या गतकाळात आम्ही आमचा भविष्यकाळ का ठरवतो? तुझ्या मनात जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नांची उत्तरे कदाचित तुला आज सापडत नसतील. पण त्या मनात येणाऱ्या प्रत्येक प्रश्नाला वास्तविकतेच्या दुनियेतून फक्त एकच प्रश्न विचारायचा की तो पडलेला प्रत्येक प्रश्न खरंच खर आहे का? का फक्त माझ्या मनाला लागलेली ती चाहूल आहे आणि आयुष्यभरासाठी कोणाची तरी वाट बघत बसलेल्या एखाद्या वाटेकरू सारखीच आमची स्थिती होऊन बसलीय का?
 ज्या गोष्टी कधी मिळणारच नाहीत; त्याच गोष्टीसाठी आम्ही आमचं पूर्ण आयुष्य पणाला लावतो. त्याच गोष्टीचा हट्ट धरून बसतो. कुणासाठी तरी व्याकूळ होतो. कधी रडतो कधी धडपडतो कधी त्या गोष्टीसाठी केविलवाणी भीक मागतो. भीक मागता मागता त्या पत्रावळीचा तुकडा पण आमच्या हातातून निसटून जातो. मग उरतो फक्त भयावह दुःखाने ओसंडलेला दुःखाचा डोंगर काहीना त्या दुखातून बाहेर येता येत . तर काहीजण त्या डोंगरावर आयुष्यभर वाट बघत बसतात.
 आयुष्यात फक्त एखादी गोष्ट मिळवण्यासाठी हे आनंदान उत्साहाने आणि अनेक अंगाने नटलेले हे जीवन आम्ही कायमच विसरून जातो. जी गोष्ट आपली कधीच नव्हती, ती आपलीच होती असं म्हणणाऱ्यांसाठी हे आयुष्य अजूनही अंधारातल्या भूतकाळासारखाच आहे.
आम्ही का त्या भुतकाळामधून बाहेर येऊन आमच्या भविष्यकाळाचा विचार करत नाही. त्याच त्या गोष्टि आम्ही आमच्या आयुष्याच्या खोलवर भागात सातत्याने का रुजवत जातो.
का ,त्या आठवणींना आम्ही आमच्या आयुष्यातून कायमचं नाहीस करत नाही. का, परत त्याच गोष्टी आठवणून आयुष्याचा केंदबिंदू सातत्याने एकाच केंद्रबिंदूवर आणून ठेवतो . 
आमच्या उज्वल भविष्याचा विचार करण्याची आमची क्षमता कायमचीच का आम्ही गमावून बसतो. या गोष्टीतून आम्हाला कुठेतरी बाहेर याव लागेल.
ज्या गोष्ट्री आमच्या आयुष्यातून कधीच नाहिशा झाल्या. पण,मग तरीही त्या गोष्टी आम्ही स्वीकारायला का तयार नाहीये त्याच गोष्टीची येण्याची प्रतिक्षा का आहे?
ज्या गोष्ट्रीची वाट बघण खरतर निरर्थक ठरणार आहे? तीच गोष्ट आम्ही आमच्या इच्छाशक्तीच्या जोरावर का विकसित करत नाहीये.
त्या भुतकाळातच आम्ही का हरुवून बसलोय जिथे तुम्हाला शोधायला कुणीही येणार नाहीये ;
त्या व्यक्तीने जर तिचं जगण तुमच्याशिवाय स्विकारल असेल. तर तुम्ही का त्या व्यक्तींविना आयुष्य जगायला तयार नाहीयेत. 
कारण कोणतीच गोष्ट् आपल्या आयुष्याच्या अंतयात्रेसोबत नसते. 
सोबत असते ती फक्त तुमची अनेक गोष्टी स्वीकारण्याची किंवा त्या नाकारण्याची, सकारात्क आणि नकारात्मक शक्ती त्या विचारांच्या जोरावर अवलंबून असते.  
तो समजुतदारपणा चा माणूस जो या जीवनाच्या कडू आणि गोड गोष्ट्री मान्य करण्याच सामर्थ्य ठेवतो.