अभ्यास कसा करायचा ? in Marathi Anything by Vishal Khandekar books and stories PDF | अभ्यास कसा करायचा ?

Featured Books
Categories
Share

अभ्यास कसा करायचा ?

अभ्यास कसा करायचा?✍️...

सातत्याने पडणारा प्रश्न, ज्या प्रश्नाच योग्य उत्तर न मिळाल्यामुळे आम्ही आमच्या उदिष्ठापर्यंत पोहचू शकत नाही . काहींना त्या प्रश्नाचं उत्तर लगेच सापडत ' तर काहींना त्याच उत्तर शोधता- शोधता आयुष्य निघून जात . मग आयुष्य घालवायचं की घडवायच हे आपल्याच हातात असतं . अभ्यास प्रत्येक जणच करतो', पण प्रत्येकालाच यश मिळत नाही . तुम्ही योग्य दिशेन अभ्यास करत नाही , तुम्हाला नक्की काय करायच कळत नाही. तुम्ही मागील प्रश्नपत्रिकांच विश्लेषण करत नाही . कोणता भाग करायचा आणि कोणता भाग सोडायचा हे ही तुम्हाला कळत नाही . नक्की अभ्यासक्रम काय आहे , हे तुम्ही कधी बघत नाही तुम्ही चुकीचा अभ्यास करता . तुम्ही smart work करत नाही . अशी असंख्य वाक्य आजपर्यंत फक्त आमच्या मनावर कायमची बिंबवली गेली . पण एक प्रश्न पडतो की , खरच या गोष्ठी विद्यार्थ्यांना कळत नाहीत का ?, आम्ही दहावी पासून आजपर्यंत फक्त हेच करत आलो . अभ्यासक्रम बघणं . प्रश्नपत्रिका बघणं , गेल्या वर्षी काय विचारलं होत. त्याच्या आधी काय विचारलं होत. काय विचारलं जाऊ शकत. मग काय केलं पाहिजे,आणि काय नाही केलं पाहिजे..

ज्या गोष्टी आम्ही लहानपणापासून करत आलोय. त्या गोष्टी तुम्ही आम्हाला का सांगताय .

आम्ही मान्य करतो की , याही गोष्टी अनेक जणांना माहित नसतील ही पण हीच कारणं तुमच्या अपयशाची खरचं आहेत का ?. का याही पलीकडे अश्या काही गोष्टी आहेत. ज्या आम्ही कधीच मान्य करत नाहि. किंवा आम्ही त्या कुणाला सांगत नाही. . ज्या त्या वर्षी 2-3 लाख फॉर्म येतात. परीक्षेमध्ये स्पर्धा असते. परीक्षा अवघड होती..

खरचं.. परीक्षा अवघड होती का तुझी तयारी कमी पडली होती.?

हा प्रश्न मला त्या प्रत्येकाला विचारायचाय , ज्यांनी अशा निगेटिव्ह शब्दांना जन्म दिला. जे नवीन मुले या क्षेत्रामध्ये येऊ पाहतात, त्यांच्या मनामध्ये तुम्ही भीतीच काहूर निर्माण करता . परीक्षा अवघड असते. आयुष्याची राख रांगोळी करायला कशाला येतोयस" दुसरं काहीतरी बघ, पण आम्ही प्रामाणिकपणे अभ्यास केला नाही हे कधी सांगत नाही. आम्ही आमच्या ध्येयाशी एकनिष्ठ नव्हतो. आम्ही भटकलो पण असंख्यांची मने पण भटकावली ही गोष्ट आम्ही कुठेतरी मान्य करत नाही.

;हा आहे, ना अभ्यास करताना एक स्ट्रेचिटी एक प्लॅन असला पाहिजे .जर तुम्ही FY ला आहे. SY ला आहे आणि TY ला आहे.या प्रत्येकासाठी एक वेगळा प्लॅन असणार आहे .

पहिल्या वर्षी काय करायचं, दुसऱ्या वर्षी काय करायचं, मग शेवटच्या वर्षी काय करायचं.या सगळ्या गोष्टींचे नियोजन असलंच पाहिजे, त्यात शंका नाही पण आमचा प्रॉब्लेम खरतर इथे असतो की त्या ठरवलेल्या गोष्टी आम्ही कधी पूर्ण करत नाही म्हणून आम्ही तिथपर्यंत पोहोचत नाही जिथपर्यंत आम्हाला पोहोचायचं असतं. खरं तर ही परीक्षा त्यांच्यासाठी देणगी आहे. जे FY पासून किंवा SY पासून तयारी करतायत. त्याचं कारण असं आहे की या कालावधीमध्ये ना आम्हाला कोणता ताण असतो. कोणतच प्रेशर , ना परीक्षेचे टेन्शन असतं ही, परीक्षा त्यांच्यासाठी थोडीशी अवघड , जे ग्रॅज्युएट झाल्यानंतर तयारीला लागतात कारण" त्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं असल्यामुळे लगेच परीक्षा द्यावी लागते. त्यामुळे एक दोन वर्षांमध्ये पुरेसा अभ्यास झालेला नसतो मग pre-mains, pre-mains इथपर्यंतच गाडी येऊन अडकते जी कधी निघते तर कधी कायमची अडकून बसते. त्यामुळे या गोष्टी पण लक्षात घेणं खऱ्या अर्थाने गरजेचं आहे. मी कोणत्याच एका स्पेसिफिक एक्झाम बद्दल बोलत नाहीये, मग ती यूपीएससी असो.वा एमपीएससी किंवा कम्बाइन असो त्या प्रत्येक एक्झाम साठी प्लॅन वेगळाच असणार आहे. त्यात तीळ मात्र शंका नाही पण ते करत असताना प्रामाणिकपणे अभ्यास करणं फार गरजेचं असतं. खरं तर अपयशी होण्याचं खरं कारण जे सांगितल्यामुळे अनेक जणांची मने दुखावली जातील, पण त्याला पर्याय नाही. खरंतर तुम्ही जेवढा अपेक्षित आहे तेवढा अभ्यास करतच नाही. हे सगळ्यात मोठं कारण आहे मग, त्यानंतर चुकीचा अभ्यास, सिल्याबस न बघणं, परीक्षा अवघड असते. त्या नंतरच्या गोष्टी आहेत. हे सांगून तुम्ही तुमचं सांत्वन करताय . आणि स्वतःला धीर देताय . तुम्ही म्हणता परीक्षेमध्ये खूप लॉजिक लावावं लागतं ., लॉजिक त्याच वेळेस लागतं ज्यावेळेस खूप गाढा अभ्यास असतो; ते तुमच्या करायचं म्हणून केलेल्या अभ्यासामुळे नाही लागत. तुम्ही फक्त सातत्याने अभ्यास करा . अभ्यास केल्याने सगळं काही शक्य आहे हे केल्यावरच कळेल. ऑल द बेस्ट त्या प्रत्येक विद्यार्थ्याला ज्याला ही परीक्षा खरचं पास व्हायची आहे. अभ्यास कसा करायचा यापेक्षा अभ्यासच करायचा ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा..