शान तिचा हात धरतो आणि तिला जवळ घेतो आणि तिच्या डोळ्यात बघतो आणि म्हणतो " जर तुला मला त्रास द्यायचं आहे ना ..... तर तुला पूर्ण आयुष्य आहे मला त्रास द्यायला कारण आता मी तुला माझ्यापासून कधीही दूर जाऊ देणार नाही संजना..... आय लव्ह यू सो मंच ...."
हे ऐकून संजना हसते आणि त्याला मिठी मार्ट आणि म्हणते" आय लव्ह यू टु शान ...."
संजनाच्या तोडून 'आय लव्ह यू' ऐकून षांच्या ओठावर मोठे हसू उमटलं.... त्याने तिला आणखीन घट्ट पकडलं.... तेवढ्यात श्रेयाने शान चा कान धरला त्यामुळे शान ओरडला..... ती पटकन संजनापासून दूर होऊन श्रेयांकडे पाहतो.....
कमरेवर हात ठेऊन श्रेया त्या दोघआंकडे रागाने बघत होती.... रुद्र नयना आणि श्लोक सुद्धा श्रेयाच्या मागे उभे होते.... आजोबानी नयना आणि श्लोक ला घरी बोलावलं होत कारण २ दिवसांनी संजना आणि शान ची इगेजमेंट देत निघाली होती आणि मग एका आठोड्यानंतर दोघे लग्न करणार होते...
श्रेया संजना आणि शान कडे बघते आणि म्हणते" तुम्ही दोघे रूम मध्ये एकत्र काय करत आहेत..... जोबानी सांगितलं आहे कि तुम्ही होईपर्यंत वेगळे राहाल.... मग तुम्ही एकत्र काय करत होता....?"
श्रेयाचा बोलणं ऐकून संजना लाजली आणि तिच्यापासून दूर पाहू लागली... हे पाहून शरिया मनातल्या मनात हसत होती पण ती रागच नाटक करत होती....
शान मग बेडवरुन उठतो आणि म्हणतो"वाहिनी आजोबानी हि कसली अट घातली आहे ....सगळ्यात आधी मी संजनाला एवढ्या अडचणीच्या मिळवलं आणि त्यांनी आम्हाला वेगळं राहायला सांगितलं.... मला फक्त संजनाच्या तोडून आय लव्ह यू ऐकायचं होत म्हणून मी तिच्या खोलीत आलो.... आमचा रोमान्स नुकताच सुरु झाला होता,, तेवढ्यात तुम्ही सगळे कबाब मधल्या हाडासारखे आलात...."
हे ऐकून नयना त्याला म्हणते"अच्छा बच्चू आता संजना मिळाली तर आम्ही तुला कबाब मध्ये हड्डी वाटायला लागलो ना....?"
शान संजनाच्या खांद्यावर हात ठेवतो आणि हसत म्हणतो" हो आणि नाही तर काय ..."
यावर रुद्र म्हणतो" जास्त बोलू नकोस कळलं ... आजोबांनी २ दिवसानी एगेजमेंट ची तारीख ठरवली आहे...."
हे ऐकून शान हसत हसत म्हणतो" दोन दिवसांनी संजना आणि माझी एंगेजमेंट होणार आहे हे खर आहे का....?"
तर रुद्र म्हणतो" हो आणि मग आठवड्यानंतर लग्न.... मी तुला हेच सांगायला आलो कि तू संजनाला घे आणि ऐंगेजमेंट रिंग चुस करायला जा... आणि तिच्याबरोबर थोडा टाइम सुद्धा स्पेंड कर...."
रुद्र च बोलणं ऐकून शान त्याला मिठी मारतो आणि म्हणतो"थँक्स दादा मला समजून घेणारा तूच आहेस...."
हे ऐकून श्रेया म्हणते" हा तुम्ही सगळे तर जल्लाद आहेत ...."
तीच बोलणे ऐकून शान हसायला लागतो आणि तो संजनाला म्हणतो" लवकर त्यात हो संजना..."
संजना डोकं हलवते.....
संजना तयार होऊन खाली हॉल मध्ये येते... हॉल मध्ये सर्वजण खाली बसले होते.... संजनाला पाहून सहन हसला .... संजनाने खूप सुंदे साडी घातली होती.... त्यात ती खूप सुंदर दिसत होती.....
शान ची आई त्याला म्हणते"संजना ला जी अंगठी आवडेल ती घे मग कितीही महाग असली तरी...."
यावर शान म्हणतो" आई काळजी करू नको मी संजनाच्या आवडी नुसार अंगठी घेईल..."
असं म्हणत त्याने संजनाच्या समोर हात पुढे केला.... संजनाही हसते आणि तिचा हात त्याच्या हातावर ठेवते... शान मग तिचा हात घारुननिघून जातो...
तो निघून गेल्यावर अवन्तिक हसत हसत म्हणतात" ब्र झालं आपल्या शान च्या आयुष्यात हि त्याच प्रेम आलं हे चांगलं झालं .... त्याच्या ओठावर हसू उमटलं आहे... मला खूप बरं वाटलं... नाहीतर काही दिवसापूर्वी शान खूप उदास आणि एकटा दिसत होता..... पण आता त्याच्या ओठावर पुन्हा हसू उमटलं... आहे आता माझ्या कुटूंबातील कोणत्याही सदस्यावर कधीही सक्त येऊ नये आणि प्रत्येकजण असाच हसत मुख आणि प्रेमळ राहो हीच ईशवरचरणी प्रार्थना ...."
संजना आणि शान त्याच्या इगेजमेंट रिंग चुस करायला जात होते... शान कर चालवत होता.. आणि संजना त्याच्या शेजारी बसली होती.... ती बाहेर बघत होती जेव्हा शान ने तिच्या हातावर हात ठेवला.... संजना त्याच्याकडे बघु लागली... शान हसतो आणि डोळे मिचकावतो....
संजना समोरच्या दिशेने तोड वल्लवते आणि म्हणते" मिस्टर शान समोर बघून गाडी चालवा नाहीतर आपला दोघांचा ऍक्सीडेन्ट होईल.... नातंर बघ मला..."
हे ऐकून शान हसत हसत म्हणतो" तुझ्या चेहऱ्यावरून माझी नजर हटत नाहीये तर मी काय करू ....?"
त्याच बोलणं ऐकून संजना हसायला लागते.... शान हि हसतो .... काही वेळाने शान त्याची कर शहराबाहेरील रस्त्यावर घेऊन जाऊ लागतो....
ते पाहून संजना त्याला म्हणते" शान आपण कुठे चालतोय.... आपल्याला ऍग्ग्जमेन्ट रिंग घ्याची आहे ना मग तू मला कुठे नेट आहेस...?"
शान ने तिच्या बोलण्याला प्रतिसाद दिला नाही आणि गाडी दुसरीकडे वळवली.... आता त्याची गाडी सुनसान रस्त्याच्या दुतर्फा जंगल दिसत होती आणि क्वचितच मांस दिसत होती....
हे पाहून संजना थोडी घाबरते आणि पुन्हा शंका म्हणते"शान मी तुला काहीतरी विचारतेय ना तू कुठे घेऊन जतोय.....?"
यावर शान म्हणतो " बस बघत रहा ..... मी आता गाडीत काही सांगू शकत नाही....."
त्याच बोलणं ऐकून संजना गप्प बसते आणि पुन्हा बाहेर पाहू लागलो.... काही वेळाने गाडी एका घरासमोर थांबते .... काही लोक घराबाहेर पहारा दे होते ....... शान गाडीतून खाली उतरतो आणि संजनाच्या बाजूने दरवाजा उघडतो आणि तिच्या दिशेने हात पुढे करतो.... संजना त्याच्या हाताकडे बघू लागते........
शान तिला पाहून " संजना बाहेर ये... काळजी करण्या ची गरज नाहीये मी तुझ्या पाठीशी आहे...."
हे ऐकून संजना त्याच्या हातावर हात ठेवून बाहेर येते.... शान तिला घरात घेऊन जाऊ लागतो ...... घराबाहेर उभे असलेले लोक शंका पाहून मन टेकतात.... शान नेही हलूच मान हलवली आणि मग संजनाला तो घरात घेऊन जातो .... संजना हे सर्व पाहत असताना घरात काही लोक सुद्धा होते आणि त्या सर्वांच्या हातात बंदूका होत्या...
त्याच खोलीतुन सतत कोणाच्यातरी किंचाळण्याचा आवाज येत होता.... कोणीतरी त्याच्या मरणाची भीक मागत होत... तो वारंवार म्हणत होता कि.... "मला मारून टाका मला आता जगायचं नाहीये" त्याला खूप वेदना होत होत्या.... आणि तो असमर्थ पाने त्या वेदना सहन करत होता.... तो आवाज एका माणसाचा होता... आणि त्याचा आवाजात खूप वेदना होती....
त्या माणसाचा वेदनादायक आवाज ऐकून संजना खूप घाबरते आणि तिने शान चा हात दोन्ही हातानी घट्ट पकडला... शान तिच्याकडे एक नजर टाकतो आणि मग तिला त्या खोलीच्या दिशेने हेरून जातो आणि खोलीचा दरवाजा उघडतो.... दरवजा उघडताच संपूर्ण खोली आतल्या तेजस्वी प्रकाशने चमकते... संजना नंतर शान सोबत खोलीत जाते आणि पाहते.. आत अमितला खुर्च्या बांधल्या होत्या आणि तो सतत ओरडत होता.... त्याला खूप मर लागला होता... अमितला या अवष्ठेत पाहून संजना खूप घाबरते आणि शान कडे बघते...
अमितला पाहताच शान च्या डोळ्यात पुन्हा राग येतो ... तो त्याची बंदूक काढतो लोड करतो आणि संजना च्या हातात धरतो आणि म्हणतो" हे घे... तो तुझ्यासोबत खूप वाईट वागला आहे ना,.... मी त्याला आतापर्यन्त जीवनात ठेवलं आहे जेणेकरून तू त्याला आपल्या हातानी शिक्षा करू शकशील... म्हणून हि बंदूक पक्कड आणि त्याला मारून टाक ......."
.......,..............................
हेय गाईज .... काय वाटलं काय करेल संजना .... ती सुद्धा त्याला शिक्षा करेल का...? काय होईल अमितच....?तुम्हाला नाही ना माहित कि काय होईल ते.... मग त्यासाठी तुम्हाला नेक्स्ट पार्टची आतुरतेने वाट पाहावी लागलं.... आणि हो आवडल्यास तुम्ही मला स्टिकर देव शकता.... आणि हो बघूया काय होती ते पुढे त्यासाठी वाचत रहा.....
माझी तुझी रेशीमगाठ....❤️❤️❤️❤️❤️