त्याच बोलणं ऐकून संजना रडते आणि शान ला मिठी मारते.... शान ने तिला आपल्या मिठीत घेतलं ..... शान च्या डोळ्यातूनही अश्रू वाहू लागतात.... संजनाची दुखापत पाहून शान च्या हृदयात वेदना होऊ लागतात.....
शान ने संजनाचा चेहरा हातात धरून तिला विचारलं " मला साग संजना तुला कोणी मारलं आहे... त्याच नाव साग एकदा ........"
संजना शान च्या काखेत बेहोश होते.... तिच्या लटपट्या जिभेने अमितचा नाव घेते... हे बघून शान पटकन तिला आपल्या हातात उचलतो आणि मग तिला त्याच्या गाडीत घेऊन जातो आणि तिला व्यवस्तीत झोपवतो ....... त्यानंतर तो स्वतःहा ड्रायव्हिंग सीटवर बसतो आणि गाडी हॉस्पिटल च्या दिशेने वळवतो .... त्यावेळी त्याला खूप राग येत होता ...... त्याला अमितचा जीव घ्यायचा होता.... पण त्या आधी संजना त्याच्यासाठी महत्वाची होती..... शान गाडी वेगाने चालवत होता..... काही मिनिटातच एका मोठ्या हॉस्पिटल मध्ये घेऊन येतो..... हॉस्पिटल मध्ये उपस्थित असलेले डॉक्टर आणि नर्स शान ला खूप आधीपासून ओळखत होते.....
शान रागाने डॉक्टराणा सांगतो " याच्यावर उपचार लवकरात लवकर सुरु करा..... त्याच्या उपचारात कोणतीही कमतरता व्हायला नको नाहीतर मी तुम्हाला सोडणार नाही...."
शान चा राग पाहून डॉक्टर घाबरले...... त्यांनी पटकन संजनाला ऑपरेशन रूममध्ये हलवलं आणि तिचे उपचार सुरु झाले....... शान बाहेर बेचवर बसला होता.... त्याला खूप राग येत होता.....
साधारण अर्ध्या तासांनंतर त्याचा मोबाईल वाजला..... शान मोबाईल स्क्रीन कडे पाहतो .... त्याला श्रेयाचा कॉल येत होता..... सहन कॉल उचलतो आणि हॅलो म्हणतो....
श्रेया त्याला म्हणते" शान कुठे आहेत तुम्ही ..... इतक्या रात्री कुठे गेलात..... तुमच्या रुममधली लाईट चालू होती म्हणून मी तुमच्या रम मध्ये गेले आणि बघितलं तर तुम्ही रूममध्ये नव्हता .... कुठे आहात .....?"
शान सर्व काही श्रेयाला सागतो .... शानच बोलणं ऐकून शरियाही खूप अस्वस्थ होते....
ती त्याला पुढे बोलते.... "शान काळजी करू नका... मी आता हॉस्पिटल मध्ये पोहचते आहेसंजनाला काही होणार नाही .... ती बारी होईल...."
हे ऐकून शान म्हणतो" ठीक आहे वाहिनी लवकर या.... मी तुमची वाट पाहतोय..."
श्रेया नंतर कॉल डिस्कनेक्ट करते.... आणि रुद्रला सर्व काही सांगते .... काही वेळाने रुद्र आणि श्रेया देखील हॉस्पिटलला निघून जातात....
तोच डॉक्टर ऑपरेशन रूममधून बाहेर येतो.... डॉक्टरांना पाहून शान उभा राहतो.....
डॉक्टर शान कडे बघत म्हणाले" सर त्यांना खूप मर लागला आहे .... त्याच्या शरीरावर अनेक ठिकाणी खोल जखमा च्या खुणा आहेत.... त्या जखमा बऱ्या व्हायला वेळ लागेल.... आम्ही खप प्रयत्न केले पण त्या अजूनही बेशुद्ध आहेत..... त्या केव्हा शुद्धीवर येतील..... हे आम्ही सांगू शकत नाही ....."
डॉक्टरच म्हणणं ऐकून शान च्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता.... त्याला अमितला जाऊन मरावस वाटलं.... पण या क्षणी संजना त्याच्या साठी जास्त महत्वाची होती.... शान च हृदय जोरात धडधडला लागलं .... शान लगेच च संजनाजवळ गेला .... संजनाचे डोळे पण बंद होते.... तिच्या चेहऱ्यावर वेदना स्पष्ट दिसत होत्या.... शान संजनाच्या जवळ बसला आणि तिचा हात धरला....
डॉक्टर शान ला म्हणतात"सर तुम्ही बाहेर जा आणि मॅडमला अराम करू द्या.... त्यांना खूप विश्रांतीची गरज आहे,..... त्या जितक्या जास्त अराम करतील तितक्या लवकर बऱ्या होतील....."
डॉक्टरच म्हणणे ऐकून शान संजनाकडे पाहतो आणि मग तिच्या कपाळावर किस करतो आणि त्याचे ओठ तिच्या कानाजवळ आणून हळुवारपणे म्हणतो" घाबरू नकोस बेबी मी तुझ्या जवळ आहे,,.... आता मी तुला माझ्यापासून कधीच दूर जाऊ देणार नाही आणि ज्याने तुला दुखावलं आहे..... मी तुला वचन देतो कि मी त्या व्यक्तीला खूप वाईट मृत्यू देईल...."
असं म्हणत तो संजनाच्या कपाळावर किस करून खोलीतून बाहेर निघून जातो....
शान खोलीतून बाहेर येतो आणि भीतीवर जोराने हात मारतो .... त्याला खूप राग येत होता मग कोणीतरी मागून त्याच्या खांद्यावर हात ठेवला.... शान ने वळून पाहिलं तर समोर श्रेया आणि रुद्र उभे होते...
श्रेया शान ला तिला सांगतो " शान संजना ठीक आहे ना....?"
तर शान तिला सांगतो " वाहिनी ती सध्या बेशुध आहे,.... डॉक्टराणी सांगितलं आहे कि तिला काही वेळ लागेल शुद्ध यायला .... मला खूप राग येतोय वाहिनी ..... त्या अमित मुळे संजनाची अशी अवस्था झाली आहे,,.... मी त्या अमितला सोडणार नाही .... मी त्याला मारून टाकिन.... "
तर रुद्र त्याला सांगतो " मी ठरवलय त्या अमितचा काय करायचं .... तू माझ्यासोबत चाल आणि श्रेया तू इथेच रहा संजनाकडे ..... आम्ही दोघेही येऊ काही वेळात....."
रुद्र च बोलणं ऐकून श्रेयाने मान डोलावली ........ रुद्र तिथून शान सोबत निघून गेला.... त्याच्या गेल्यावर श्रेया खोलीत संजनाकडे जाते.....
अर्ध्या तासानंतर.....
एका अंधाऱ्या खोलीत एका माणसाच्या ओरडण्याचा आवाज आला आणि त्याला खूप मारलं जात होत ....... काही वेळाने खोलीचा दरवाजा उघडला .... दार उघडताच खोलीत सर्वत्र प्रकाश पसरला आणि त्या व्यक्तीचा चेहरा स्पष्ट पाने दिसू लगला .... तो माणूस दुसरा कोणी नसून संजना चा नवरा अमित होता..... अमितला खुर्चीला बांधून रुद्रचे लोक मारहाण करत होते.... रुद्र मग त्याच्या माणसांना दंडोळ्यानीच इशारा करतो .... रुद्रने इशारा करताच त्याची माणसे बाजूला होतात.... रुद्र मग अमित कडे रागाने पाहतो ... रुद्रचे डोळे पाहून अमित खूप घाबरतो.....
रुद्र त्याला म्हणतो"तुला काय वाटलं कि माझ्या कंपनीत पैशाचा घोटाळा करशील आणि मला कळणार नाही .... तू माझ्या श्रेयाच्या मैत्रिण संजनाचा नवरा आहेस म्हणून इतके दिवस गप्प बसलो.... मला मला वाटलं तर पैसे घेतले तर काय होईल ...... ?मी तुला जाऊ देत होतो पण तू खूप चुकीचं केलं जे तू तुझ्या बायकोवर हात उचललास ..... तुला माहित आहे कि माझा भाऊ शान संजनावर प्रेम करायला लागला आहे... आणि तू माझ्या भावाच्या प्रेमावर हात उचलून खूप मोठी चूक झाली......."
रुद्रच बोलणं ऐकून शान त्याच्याकडे आश्चर्याने बघू लागतो कारण त्याने रुद्रला कधीच सांगितलं नव्हतं कि त्याच संजनावर प्रेम अणे मग रुद्रला हे कसं कळलं....?
शान रुद्रकडे बघत होता पण रुद्रच्या चेहऱ्यावर कुठलेच भाव दिसत नव्हता..... शान मम्ग डोळे मिटून घेतो आणि समजतो कि रुद्रपासून काहीही लपवता येत नाही.....
अमित रुद्रसमोर विनवणी करतो आणि म्हणतो"माफ करा से माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे,.... तुम्ही मला पाहिजे तितके मारा पण मला रतहून जाऊ द्या.... मी तुम्हाला वाचन देतो कि मी संजनाला घटस्फोट देईल..... तुमचा भाऊ तिच्याशी पुन्हा लेन करू शकतो ..... मी संजना आणि शान च्या आयुष्यात पुन्हा येणार नाही.... प्लिज मला इथून जाऊ द्या....."
रुद्र त्याच्या माणसाला अमितचे दोर सोडायला सांगतो.... रुद्रची माणसे दोर सोडतात....
रुद्रचा एक गार्ड जातो आणि अमितच्या समोर एक कागद ठेवतो आणि म्हणतो" साइन कर....."
अमितने पेपर्स बघितले..... ते घटस्फोटाचे पेपर होते ज्यात स्पष्ट लिहिलं होत कि आतापासून अमितचा संजनशी संबंध राहणार नाही.... संजना आता पूर्णपणे फ्री झाली आहे...
रुद्र चिडला होता आणि म्हणाला "या कागदावर लवकर सही कर....."
रुद्रच राग पाहून अमित लगेच बॉडीगार्ड कडून पेन घेतो आणि कागदावर सही करतो... बॉडीगार्ड मग तो कागद रुद्रकडे घेऊन येतो....
रुद्र शांकडे पाहतो आणि म्हणतो" हा तुझा अपराधी आहे तुला पाहिजे ती शिक्षा तू त्याला देऊ शकतो...."
असं म्हणत रुद्र कागद घेऊन तिथून निघून जातो.....
..... ............... .... .....
हेय गाईज ..... कसा वाटला आजचा भाग .... रुद्र तर नियघून दिला पण आता शान काय करेल.... काय होईल अमितचा ..... बघूया पुढच्या भागात .... तोपर्यंत तुम्ही वाचत रहा......
माझी तुझी रेशीमगाठ.....❤️❤️❤️❤️