Tuji Majhi Reshimgath - 21 in Marathi Love Stories by Swati books and stories PDF | तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 21

The Author
Featured Books
Categories
Share

तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 21

रोनित श्रेया ओढून तिला बेडजवळ ढकलतो आणि तिच्या वर येतो आणि जबरदस्तीने तिला किस करू लागतो.... श्रेया स्वतःला त्याच्यापासून मुक्त करण्याचा प्रयत्न करते पण रोनित तिला घट्ट धरून ठेवतो .... श्रेया तिची सर्व शक्ती वापरते आणि त्याला घट्ट घरून ठेवतो.... श्रेया तिची सर्व शक्ती वापरते आणि त्याला दुसऱ्या बाजूला ढकलते.... 

रोनित तिच्या शेजारी झोपतो आणि हसत म्हणतो" मी आता तुला सोडतोय पण तू पुन्हा पळून जाण्याचा प्रयत्न केला तर मी लग्नाआधी हनिमून साजरा करेल आणि मग तू मला थांबवू शकणार नाहीस... आता शांत झोप..... उद्या सकाळी आपलं लग्न आहे...."

एवढं बोलून तो डोळे बंद करतो... श्रेया पण उठून बसते... ती त्याच्याकडे रागाने बघत होती.... ती मग पटकन पलंगावरून खाली उतरते आणि खोलीतल्या सोफ्यावर बसते.... आता तिला खूप टेन्शन येत होत कि ती तिथून कशी बाहेर पडेल?


सकाळी उठून रोनित त्याच्या शेजारी पाहतो पण श्रेया त्याच्या बेडवर नव्हती .... मग तो समोरच्या सोफ्यावर डोकं ठेवून बसलेली श्रेया झोपी गेली होती....... रोनित हळूच बेडवरन खाली उतरतो आणि तिच्या जवळ बसतो आणि तिच्याकडे बघू लागतो... झोपताना श्रेया खूप क्युट आणि निरागस दिसत होती..... रोनित मग तिच्या चेहऱ्यावर बोट हलवायला सुरवात करतो... श्रेयाने तिला कोणीतरी स्पर्श केल्याचं पाहून धक्क्का बसून डोळे उघडले आणि रोनितला तिच्या इतक्या जवळ पाहुणती त्याला ढकलते ज्यामुळे रोनित मागे सरकतो..... 


श्रेया रागाने त्याच्याकडे बोट दाखवते आणि म्हणते " खबरदार जर तू मला हात लावलास तर माझ्यापेक्षा वाईट कोणी असणार नाही....."


तीच बोलणं ऐकून रोनित हसतो आणि म्हणतो" रिलाक्स कर मी तुला हात लावणार नाही.... मी तुला सांगितलं होत कि लग्न कारपर्यंत मी तुला हात लावणार नाही पण लग्नानंतर मी तुला सोडणार नाही हे लक्षात ठेव... लग्न एकदाच होऊ दे त्यानंतर मी काय करतो ते तू बघ....."



हे ऐकून श्रेया रागाने म्हणते" मला माझ्या कुटूंबाला भेटायचं आहे....."


रोनित म्हणतो" तुझं कुटूंब कुठे पळून जातंय ... आधी तू तयार हो.... मी तुला तयार करायला मुलींना पाठवतो.... तयार हो आणि माझी वधू बनून लवकर बाहेर ये..."


असं बोलून तो खोलीतून निघून गेला... त्याच्या गेल्यानंतर श्रेया अस्वस्थ झाली कारण तिला रुद्रला कोणत्याही मार्गाने निरोप द्यायचा होता कि ती अडचणीत आहे...... 

इथे रोनित त्याच्या बंगल्याच्या मागे बांधलेल्या कोटेजमध्ये जातो जिथे पुरुष तिथे उपस्थित होते... रोनित त्याच्या माणसाना पाहतो आणि सार्क खोलीत जातो...... नीलम निशांत आणि देवकी ला बांधून ठेववला होत.... 

रोनित त्या सगळ्यांकडे बघतो नि हसत म्हणतो" कसे आहेत तिघे.... रात्री छान झोप लागली का....?"


त्याच बोलणं ऐकून निशांत दात घासत म्हणतो" कुठे आहे माझी बहीण.... एकदा फक्त माझे हात उघड आणि बघ मी तुझ्यासोबत काय करतो ते....."


रोनित त्याच बोलणं ऐकून वेड्यासारखं हसतो आणि म्हणतो" अरे माझ्या मेव्हण्या.... आधीच तुला किती लागलं आहे.. आणि तू म्हणतोस कि माझे हात उघड..... हे बघ तू शांत बसला आहेस म्हणून शांत च बसून रहा नाहीतर तुला चालायच्या लायकीचा नाही ठेवणार ... मी तुला एवढं मरेन कि उरलेली हाडही तुटतील आणि राहिली गोष्ट तुझ्या बहिणीची तर ती माझ्याकडे पूर्णपणे सुरक्षित आहे... मी तिला काहीही केलं नाही.. मी अली आहे तुम्हला सांगायला कि श्रेया आणि माझं लवकरच लग्न होणार आहे म्हणून तुम्ही तिघंही तयार व्हा कारण आजपासून तुम्हाला तुमच्या श्रेयाला पुन्हा भेटता येणार नाही..."

देवकी रडतात आणि म्हणतात" रोनित बेटा तुझे वडील आणि माझे पती खूप चांगले मित्र होते.... तुझं आणि श्रेयाचा लग्न पूर्ण विधी आणि थाटामाटात व्हावं अशी त्याची इच्छा होती पण तू हे काय करतोस.... तू माझ्या मुलीशी असं लग्न करू शकत नाही...."


तर रोनित रंगात म्हणतो " माझं आणि श्रेयाचा लग्न पूर्ण विधी आणि थाटामाटात व्हावं अशी माझीही इच्छा होती पण तुमची ती मुलगी सतत माझा अपमान करत राहते आणि तुमचा हा मुलगाही तोही मला धमक्या देत असतो..... मी दोन तीन वेळा जेलमध्ये गेलो तर काय झालं....?मी काही गुन्हा केला आहे का..? तुम्ही मला नेहमीच अपमानित करता..... मी जेव्हा तुम्हा लोकांशी छान बोलायचो पण तुम्हा लोकांना ते समजलं नाही म्हणून आता भोग... आता मला अशाच प्रकारे लग्न कार्ल आणि मग मी तुम्हा लोकांना सांगेल कि मी काय आहे तर......"

असं बोलून रोनित तिथून निघून गेला..... काही वेळाने श्रेया पूर्णपणे तयार होते..... ती स्वतःला आरशात पाहते ती खूप सुंदर दिसत होती.... तिला मग तो क्षण आठवतो जेव्हा तीच रुद्रशी लग्न झालं होत ..... त्यावेळी तिला लग्नाचा अजिबात आनंद नव्हता कारण ती तिच्या फ्रेंडसाठी रुद्रच्या लग्नाची उयोजना आखात होती.... पण चुकून रुद्रने तिच्याशी लग्न केलं त्यामुळे ती रुद्रपासून विभक्त होण्याचं मार्ग शोधत होती.... पण आज ती रुद्रला खूप मिस करत होती... तिला रुद्रने तिच्याकडे यावं असं वाटत होत कारण श्रेयाला त्याच्या मिठीत खूप अराम वाटत होता.... तिला रुद्राशिवाय दुसऱ्या कोणाची बायको व्हायचं नव्हतं.... 

तेवढ्यात आवाज आला...."श्रेया.... "



श्रेयाने आवाज ऐकलं आणि मागे वळून पाहते कि रुद्र तिच्या मागे उभा आहे आणि हसत होता..... रुद्रला पाहून श्रेयाचे डोळे भरून येतात..... ती धावतच त्याच्याकडे जाते आणि त्याला मिठी मारते.... रुद्रनेहि तिला आपल्या मिठीत घेतलं.... पण थोड्याच वेळात तीच स्वप्न तुटत जेव्हा तिच्या डोअरवर कोणाची तरी थाप पडते..... 



रोनितच्या हवेलीत बागेत बाहेर मंडप बांधून संपूर्ण बॅग सजवली होती.... रोनितची मांस सगळीकडे पसरली होती.... काही वेळाने रोनित खोलीत आला... श्रेया तिच्याच विचारात हरवली होती.... रोनित तिचा हात धरून तिला जवळ ओढतो... त्याच्या अचानक ओढण्याने श्रेया पुन्हा शुद्धीवर येते आणि त्याला ढकलते..... 


रोनित हसतो आणि म्हणतो " चाल आपल्या लग्नाची वेळ झाली... आहे... " असं म्हणत तो तिचा हात धरतो आणि तिला जबरदस्ती बागेत घेऊन जातो.... 
शर्य जुबाजुला बघत होती./...... आजूबाजूला रोनितचे गार्ड उपस्थित होते आणि प्रत्येकच्या हातात बंदुका होत्या.... 

श्रेया रोनितला म्हणते" माझं कुटूंब कुठे आहे ... मला आधी त्यांना भेटायचं आहे तरच मी तुझ्याशी लग्न करेन...."


रोनित त्याच्या एका माणसाला इशारा करतो.... तो महूस तिथून निघुनजातो.... क्काही वेळाने देवकी नीलम आणि निशांत... याना तिथे आणलं जात.... तिघांचेही हात बांधलेले होते.... त्याना पाहून श्रेया त्याच्याकडे पळून गेली..... 


देवकी श्रेयाला डोळ्यात पाही आणून बोलतात " बेटा तू ठीक आहे....... ," 

श्रेया डोकं हलवते आणि म्हणते" नाही आई मी एकदम ठीक आहे,....."


निशांत रोनितकडे रागाने पाहत होता.... श्रेया मग नीलमकडे येते तिचे आणि देवकीचे हात उघडू लागते..... मग रोनित हे पाहून रागावून तिचा हात मागून धरतो .... तिला स्वतःकडे वळवतो आणि तिला जवळ ओढतो.... 

श्रेया त्याच्या छतीवर मारते आणि म्हणते" सोड मला...."


रोनित दात घासतो आणि म्हणो " कोणाला विचारून तू त्याचे कोलते आहेस.... मी त्यांना इथे बोलावलं आहे जेणेकरून ते आपलं लग्न पाहू शकतील आहि तुलाही ते शेवटच्या वेळी पाहू शकतील .... करणं आजपासून तू त्याना कधीच भेटू शकणार नाही आणि त्यानाही तुला भेटता येणार नाही....."


रोनितच बोलणं ऐकून शर्य रागाने बोलते" रोनित तू खूप चुकीचं करत आहेस.... बघ तुला खूप पश्चाताप होईल... मी अजूनही म्हणत आहे कि मला माझ्या कुटूंबाला इथून जाऊ द्या नाहीतर तुझ्या हातून तुझा जीव जाईल..... तुझ्या मृत्यूला तूच जबाबदार असशील...."





 ...........................................
 
 
 बघूया पुढे काय होत..... येईल का रुद्र वेळेत.... काय त्याच्यासाठी वाचत राहा..... 
 
  माझी तुझी रेशीमगाठ......❤️❤️🥰🥰😍