Niyati - 49 in Marathi Love Stories by Vaishali S Kamble books and stories PDF | नियती - भाग 49

Featured Books
Categories
Share

नियती - भाग 49

भाग 49

कॉल करून झाल्यानंतर बाबाराव गाडीची वाट पाहत होते तर त्यांच्याकडे मोहित येऊ लागला...

पण अगदी जवळ न जाता थोडा दूरच उभा राहून....

मोहित बाबाराव यांना म्हणाला....

 

"मालक... चिंता करू नका आपण...

मी मायूची खरंच काळजी घेईन... यापुढे तिच्यासोबत असं काही होणार नाही..."

 

 

बाबाराव मोहितकडे न पाहता रस्त्याकडेच 

पाहत म्हणाले....

"ती तर घ्यावीच लागेल... तुम्हा दोघांनाही एकमेकांची 

काळजी घ्यावीच लागेल. लग्न केले तुम्ही आपल्या मताने...

बरं असो... लवकरात लवकर पोलीस कारवाई संपली की रामच्या हाताने मी तिकिटे पाठवीन... आता इकडे तिकडे न भटकता सरळ सरळ ठरविल्याप्रमाणे आपल्या आयुष्यात पुढे जावा दोघंही.... एवढेच मी म्हणू शकतो... मी फौजदार साहेबांशी बोलून लवकरात लवकर काय आहे ते उरकवायला सांगेल.... आणि मायराला सांग...आमचे दोघांचेही आशीर्वाद तुमच्या सोबत आहेत..."

 

ते बोलतंच असताना राम गाडी घेऊन आला... बाबाराव यांनी एकवार नजर ताराआजीच्या घराकडे टाकली आणि गाडीत बसले.

 

 

तेथे  खिडकीच्या पडद्याच्या मागून मायराही बाबाराव यांना एकटक पाहत होती.... आणि आवाज न करता हळूहळू रडत होती.... तिला माहीत होते तिचे बाबा किती बोलण्याचे पक्के आहेत तर.....

 

 

........

 

पुढल्या दोन दिवसांत फौजदार साहेबांनी.....

कारवाई  पूर्ण केली...

 

 

कोर्टात खटला उभा राहिला. पोलिसांनी केस पद्धतशीरपणे तयार केली. सरकारी वकिलांचे काम त्यांनी चोखपणे केले होते.

 

 

पण नानाजी शेलार यांनी सुंदरच्या बाजूने त्याचा बचाव करण्यासाठी वकील केला होता. त्यांनी केलेल्या वकील फौजदारी खटले यशस्वी लढवणारा एक नामांकित वकील होता.

शेलार यांच्या वाडीतले.... त्यांच्या बाजूची माणसं त्याला मदत करायला तयार होतीच आणि आणखी मदतीची गरज काही भासणार नाही असं शेलार यांना वाटत होतं.

 

नानाजींनी मुलाचा बचाव करण्यासाठी कंबर कसली. त्यांच्या पत्नी ही म्हणजेच सुंदरची आई.."रमाबाई"...  सुद्धा त्या वकिलाच्या मागे लागून त्यांचे डोके खात होत्या... 

त्यांना सुंदरला अटक केली हे सहनच होत नव्हते...

त्या मायराच्या नावाने नाही नाही ते बोलत होत्या.

 

 

सुंदरने पार्वती आणि कवडूचा गळा धरताना प्रत्यक्ष पाहणारे कोणी नव्हते हाच मुद्दा सुंदरच्या .... वकिलाच्या दृष्टीने तो चांगला होता पण परिस्थितीजन्य पुरावा मात्र .....सुंदरच्या विरोधात जात होता शिवाय त्या घटनेच्या दिवशी बाहेर पोलीस कर्मचारी तसेच .......बाबाराव यांनी नेमलेले माणसं ह्यांनी सुंदरला कवडू आणि पार्वतीच्या घरात जात असताना पाहिले होते.

 

 

खटल्याच्या निकालामध्ये सर्व जणांना म्हणजे नानाजी आणि स्वतः सुंदर याला असेच वाटत होते की निर्दोष सुटणेच आहे सुंदरचे... सर्वांना उत्सुकता लागलेली होती निकालाची.

 

 

शेलार वाड्याजवळील बहुसंख्य लोकांना तर खात्री होतीच

की ही सुंदर नक्कीच निर्दोष सुटेल...

काही जणांना वाटत होतं ....त्याला फाशी व्हावं....???

काही जणांना वाटत होतं जन्मठेप तर नक्कीच होणार...!!!

तर काहीजणांना वाटत होतं की काही वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा होईन बस्स..

 

 

जिल्हा सत्रन्यायालयाच्या आवारामध्ये तुफान गर्दी आणि लोकांच्या कानावर आज जज यांनी जाहीर केलेल्या शिक्षेचा शब्द पडला त्यावेळी अनेक जण कुजबुजले...

 

काही शेलार यांच्या जवळचे नातेवाईक हळहळले सुद्धा. नानाजी शेलार यांचाही चेहरा पडला. सुंदरची आई आक्रोश करू लागली....

पोलिसांनी सादर केलेल्या पुराव्यावरून आणि .....

आणि आणखी प्रत्यक्षदर्शीने सांगितल्याप्रमाणे....

या सर्वांमुळे सुंदरवरील खूनाचा आरोप शाबीत केला गेला आणि त्याला जन्मठेपेची शिक्षा दिली गेली....

 

 

पण शिक्षा ऐकून मात्र...

मोहितला आणि मायराला आनंद झाला....

 

 

इकडे रामने बाबाराव यांचाही चेहरा उजळलेला पाहिला.

 

......

 

पाच-सहा दिवसानंतरचे रिझर्वेशन तिकीट दिल्लीचे आणून दिले रामने.... 

जाताना दोघांनीही ताराआजीचा आशीर्वाद घेतला.

 

 

खरे पाहता मायराला आपल्या आई वडिलांना एक नजर पहावे भेटावे खूप वाटत होते. कालच राम येऊन तिला भेटला होता आणि तिच्या हातात एक स्मार्टफोन जबरदस्ती फोन दिला.

तिला घ्यायचा नव्हता तरी.... हातात कोंबून दिला... एक भाऊ देतोय त्या नात्याने घे असे म्हणून.... निघताना मात्र त्याचेही डोळे पाणावलेले होते त्यावेळी.... मायराला समजले होते की त्याला कूणी पाठवले असावे.... मग तिनेही जास्त विचार न करता आशीर्वाद म्हणून स्वीकार केला.

 

 

आजूबाजूच्या लोकांच्या भेटी घेऊन दोघेही तेथून निघाले आणि

रेल्वे स्टेशनला पोहोचले...

 

......

उद्यापासून नवीन जीवनाला सुरुवात होणार होती.

रामने त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला होता पण दोघांनीही विनम्रपणे ते नाकारले. त्यांच्या दृष्टीने बाबाराव यांनी मोहितची ऍडमिशन तेथे क्लास साठी घेऊन दिलेली होती तेच फार फार

महत्त्वाचे होते.. त्यांच्यासाठी...

 

तेथे दिल्लीला गेल्यानंतर चौकशी अंती हे समजले की टॉप स्कॉलर जो असेल त्याला स्कॉलरशिप मिळते तेथील त्याच्या क्लासेससाठी.

 

त्यामुळे आता त्यांचे काम सोपे होणार होते. इव्हन तेथे लायब्ररी सुद्धा होती अभ्यासासाठी...

 

राहण्याचा प्रॉब्लेम लक्षात आला त्यांचा.... तेथील ऍडमिनिस्ट्रेशनला...... तेव्हा तेथील अकॅडमीने पर्याय सुचवला.

त्या सुचवलेल्या पर्यायानुसार...... मायराला तेथील लायब्ररीमध्ये पार्टटाइम लायब्ररी अटेंडन्स म्हणून जॉब मिळाला.

 

 

आणि तेथील त्या मोठ्या परिसरात असणाऱ्या वॉचमनच्या 

रूमजवळ आणखी एकच रूम होती ती अतिशय वाजवी 

दरावर त्यांना रेंटमध्ये देण्यात आली.

 

त्यामुळे दोघांनाही नवीन जीवनाला सुरुवात करताना ही एक फार मोठी मदत झाली..

रूमवर आल्यानंतर त्यांच्याजवळ असलेल्या पैशाने त्यांनी.... संसाराला लागणारे सामान घेण्यासाठी कुठे जावे...???

काय घ्यावे ....?? याची विचारपूस बाजूला असलेल्या वॉचमन काकाकडे केली....

 

 

तेव्हा त्या काका आणि काकू दोघांनीही त्यांना जमेल तशी मदत केली.... पण यामुळे त्यांच्या जवळ असणारे पैसे संपत आले.

 

 

मोहितचे क्लासेस व्यवस्थित चालू झाले.... जास्तीत जास्त तो लायब्ररीमध्ये राहून अभ्यास करत होता.... त्याला अभ्यासाचा आता जणू ध्यासंच लागला होता... 

 

 

 

मायराही आपले काम व्यवस्थित करत होती लायब्ररीतले... पण तरीही तिला समाधान वाटत नव्हते.... तिला असं वाटत होते की आपल्याला या सिटीत फिट करायचं असेल तर आता आपल्याला आणखी आपले नॉलेज वाढवावे लागेल... आपण शिक्षण तर घेतलं आहे पण एवढंसं शिक्षण पुरेसं नाही... तिला या विषयावर मोहितशी बोलायचं होतं पण तिला असं वाटत होतं की आपल्यामुळे तो डिस्टर्ब होऊन जाऊ नये.

 

 

 

 

आता पुन्हा प्रश्न पडला तेवढ्या सिटीत राहायचे म्हणजे... संसाराचा गाडा चालवण्यासाठी दोघांचा.... त्यांना पैशाची 

गरज होती.

 

 

मोहित अभ्यासात जरी संपूर्ण लक्ष घालत असला तरी सुद्धा त्याचे लक्ष आता त्याने मायरावर सुद्धा ठेवलेले होते.... त्याला आता तिच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नव्हते... मायराची हुशारी अभ्यासात फारशी नव्हती तरी व्यवहारात मात्र तिची हुशारी ,मनमिळाऊपणा , विनम्र स्वभाव .. पाहून त्याला 

तिचा अभिमान वाटत होता.

 

तिने सर्व स्वयंपाक करणे हे वॉचमन काकांच्या बायकोकडून शिकून घेतले होते... खूप व्यवस्थित नाही पण चांगल्या तऱ्हेने करू लागली होती ती स्वयंपाक. पोळ्या तिच्या वर्तुळाकार होत नव्हत्या तरी पण वाकड्या हेकड्या असल्या तरी गरम गरमच करून त्याला खाऊ घालायची कारण थंडं झाल्या की त्या वातळ होत होत्या.

 

 

पण आता एवढ्यात तिचा चेहरा थोडासा चिंताजनक... तेवढा उत्साह दिसत नव्हता वागण्या बोलण्यात.

 

एक दिवस तो म्हणाला ....

"मायू.... का नाराज आहेस...?? तुला बरं वगैरे वाटते ना...!!!

इतक्यात तू मला मनातलं ही काही सांगत नाहीस..... माहित आहे मी अभ्यासात असतो.... पण जेवढा वेळ आपण दोघे असतो एकमेकांसोबत... त्या वेळात तरी तू काही सांगावस ना गं मला... मी थोडासा वेंधळा आहेच... मला माहित आहे... पण जसं तू माझ्यावर अगोदर हक्क दाखवत होतीस.... जसं माझ्याकडून तुला करून घ्यावयाचे आहे तसं करून घेत होतीस.... तसंच करत जा प्लिज.... मला नाही येत कधी कधी तुझ्या मनातलं ओळखता... तेव्हा तू चिडून ओरडून माझ्याकडून ते करवून घेत जा.... पण अशी शांत नको राहूस... मला मग खूप एकटे एकटे फील होतं . असं वाटतं की माझं कोणीच नाही आता..."

 

त्याने असं म्हटल्यानंतर तिला खूप छान वाटले... की नाराज आहे ते त्यानेबरोबर ओळखले आणि तिच्या शांत राहण्याने किंवा तिच्या आनंदी  न राहण्याने त्याला फार फार फरक पडतो....त्याला .....

 

खाली चटईवर एक बेडशीट टाकून झोपले होते दोघेही... ती तशीच वळून त्याला बीलगली. थोडा वेळ त्याच्या रुंद छातीवर डोके ठेवून शांत बिलगून राहिली...

 

पण तिच्या तोंडून एकही शब्दं फुटला नव्हता...

तिला असे वाटत होते की.... आपण... जे आता पार्ट टाइम लायब्ररी अटेंडन्स म्हणून काम करत आहोत त्या व्यतिरिक्त बाहेर जाऊन आणखी काम करायचे आणि स्वतःला ऍडजेस्ट करून कुठलातरी क्लास लावायचा हे जर आपण असं सांगितलं तर कदाचित मोहितला राग येऊ शकतो. वादही होऊ शकतात. आणि त्या वादात त्याच्या प्रगतीकडे दुर्लक्ष होऊ शकते. म्हणून सध्या तिने मनातले काही सांगण्याचा विचार सोडून दिला....

 

तशीच त्याला बिलगून .... त्याला शांत करायला ....

म्हणून म्हणाली....

"मोहित.... तू चिंता करू नकोस काही.... मी तुला सध्या यासाठी सोडले आहे की तुझं अभ्यासावर कॉन्सन्ट्रेशन असावं.

तू फक्त अभ्यासावर फोकस्ड असावा... मंथली प्रॉब्लेम आहे माझा म्हणून थोडसं जरा अपसेट होते आहे मला... हार्मोनल इमबॅलन्स असावा.... झोप आता आणि मलाही झोपू दे.. आणि हो एक सांगायचं राहिलं.... सकाळी उठून एक्झरसाइज करत जा... स्वतःला फिट ठेव.... बिलगून झोपून राहतोस मला.. उठत नाहीस लवकर.... हे असं चालणार नाही सांगून ठेवते."

 

त्यावर तोही तिला खट्याळपणे म्हणाला....

"काय झालं...?? बायकोलाच तर बिलगतो...!! संयम बाळगून आहे मी समजलं... सीमारेषा अजूनही पार केलेल्या नाहीत...

ऐकतोय ना तुझं सगळं याबाबतीत... तेवढं तर मी सोडणार नाही... पण आता उठत जाईन ...तू म्हणते ते बरोबर आहे."

 

त्यावर मायरा म्हणाली....

 

"ए मोहित....