Saturday Night in Marathi Women Focused by Vrushali Gaikwad books and stories PDF | शनिवार ची रात्र...

Featured Books
  • રેડ સુરત - 6

    વનિતા વિશ્રામ   “રાજકોટનો મેળો” એવા ટાઇટલ સાથે મોટું હોર્ડીં...

  • નારદ પુરાણ - ભાગ 61

    સનત્કુમાર બોલ્યા, “પ્રણવ (ૐ), હૃદય (નમ: ) વિષ્ણુ શબ્દ તથા સુ...

  • લગ્ન ને હું!

    'મમ્મી હું કોઈની સાથે પણ લગ્ન કરવાના મૂડમાં નથી, મેં નક્...

  • સોલમેટસ - 10

    આરવને પોલીસ સ્ટેશન જવા માટે ફોન આવે છે. બધા વિચારો ખંખેરી અન...

  • It's a Boy

    સખત રડવાનાં અવાજ સાથે આંખ ખુલી.અરે! આ તો મારો જ રડવા નો અવાજ...

Categories
Share

शनिवार ची रात्र...

सोनिया तिच्या मैत्रिणीसोबत एका नाईट पार्टीला गेली होती. गावातून पुण्यात नवीन शिकण्यासाठी आलेली सोनिया मैत्रिनीवर डोळे झाकून विश्वास ठेवत होती. रूममेट बोलल्यानंतर सोनियाला त्या मुली म्हणजे बहिणीचं वाटतं होत्या. उद्या रविवार आहे कॉलेज ला सुट्टी आहे. चल ना, सोनिया पार्टीसाठी जाऊ या.. सोनिया हो नाही बोलत कशी तरी पार्टीसाठी, रात्री रूम बाहेर पडण्यासाठी तयार झाली. आपण 9, 10 वाजेपर्यंत परत रूमवर येऊ असं बोलून प्रिया आणि आकांशा सोनियाला घेऊन एका पबमध्ये गेल्या. 

चला ना आता 10 वाजत आले आहेत. आपलं जेवण तर झालं आहे आपण रूमवर जाऊयात, मला बाबांना पण फोन करयचा आहे. मी त्यांना सांगितलं नाही मी बाहेर आली आहे ते. असं म्हणत सोनिया निघायच्या तयारीत होती.. तु लहान आहेस कां आता?? आणि घरी आहेस कां?? तुला काय बाबा इथे बघायला येणारेत कां?? प्रिया आणि आकांशा सोनियाच ऐकत नव्हत्या. सोनिया चल ना थोडा वेळ अर्धा तास तरी आपण डान्स करूयात ना.. नको ग प्रिया..plz नको,  तुम्ही करा डान्स, मी बसते इथे असं म्हणत सोनिया चेअरवर बसून राहिली.. 
 आकांशा आणि प्रिया बराच वेळ डान्स करत होत्या, कधी रात्री 1 वाजले त्यांना समजलंच नाही. प्रिया आकांशा चला यार किती डान्स करणार आहात तुम्ही.. असं म्हणत सोनिया ने प्रिया आणि आकांशाला पब बाहेर खेचत आणले. 
 तिघी ही रात्री 1 वाजता पब बाहेर रोड शेजारी उभ्या होत्या. त्यांना समोर एक ही ऑटो दिसत नव्हती. इकडे तिकडे तिघी ही ऑटो शोधत होत्या, पण इतक्या रात्री ऑटो काही दिसत नव्हती, अचानक त्यांच्या समोर एक फोर व्हीलर येऊन थांबली..
 कारमध्ये एक गोरा पान, हँडसम मुलगा पाहून आकांशा आणि प्रिया जाम खुश झाल्या होत्या . दोघीही लगेच तयार होत्या कार मध्ये बसण्यासाठी.. 
  हॅलो कुठे जायचं आहे??तुम्हाला मी सोडवू कां.. नाही नाही नको असं म्हणत सोनिया बाजूला झाली..
नाही काय नाही सोनिया.. आपल्याला आता एक ही ऑटो मिळणार नाही यावेळी..
प्रिया आणि आकांशानी सोनिया ला समजावले आणि तिघी ही कारमध्ये बसण्यासाठी तयार झाल्या. प्रिया पुढच्या सीटवर म्हणजे हँडसम मुलगा अमेय च्या शेजारी बसली. आकांशा आणि सोनिया मागच्या सीटवर बसल्या होत्या. 
    Hii तुझं नाव काय आणि तु हि पब मध्ये होतास कां?? हो.. मी अमेय. तुम्ही तिघी फ्रेंड्स आहात कां?? हो. मी प्रिया, हि आकांशा आणि हि सोनिया.. तिघी हि छान दिसता हा तुम्ही..हो थँक यु.. 
कुठे घरी जात आहात कां?? आकांशा लगेच हो म्हणाली, तिला पण अमेय वर विश्वास ठेवणं योग्य वाटतं नव्हतं... अच्छा मग तिघी हि जवळपास राहत असणार, आकांशा पून्हा हो म्हणाली.. हो काय?? अग आपण रूममध्ये राहतो ना तिघी, सांग ना असं.. प्रियांनी अमेयला आम्ही PG मध्ये राहतो असं सांगितलं. इथेच 20 मिनिटवर आमची रूम आहे. ओके ओके.. अमेय नी कारमध्ये अचानक मोठ्या आवाजात गाणी लावले. सोनिया..आवाज कमी करा प्लिज, असं वारंवार बोलतच होती पण प्रिया मात्र एन्जॉय करण्यात मग्न होती. आता आकांशाला मात्र अमेयवर शंका येत होती. 
     हॅलो अमेय plz गाडी थांबवा आमची रूम इथून जवळच आहे. आम्ही इथून जाऊ,
"कानावर हात ठेवून ओरडत आकांशा बोलत होती."
पण अमेय इग्नोर करत होता. अमेय त्याचा एक हात प्रियाच्या पायावरून फिरवत होता, 
अमेय काय करता तुम्ही मला कां हात लावता?? Plz गाडी थांबवा तुम्ही, आम्ही जाऊ तिघी इथून.. प्रिया घाबरून बोलत होती. 
असं कसं मी जाऊन देईल तुम्हाला इतक्या सुदंर मुली मला स्वतःहून समोरून भेटल्या आहेत, अमेय नि गाडी थांबवली आणि प्रिया सोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत होता. आकांशा आणि प्रिया त्याला मारत होत्या, पण अमेय त्यांना ऐकत नव्हता.. सोनिया गाडीतून खाली उतरली.. आणि इकडे तिकडे कोणी दिसत कां बघत होती...तिला समोरून कोणीतरी येतंय असं दिसत होती, ती जोरजोरात प्लिज आम्हाला मदत करा असं ओरडत होती, समोरून कोणीतरी दोघी धावत आल्या आणि त्यांनी विचारलं काय झालं बाळा?? सोनियानी त्यांना अमेय प्रियासोबत जबरदस्ती करतोय हे दाखवलं,  त्या दोघीनी अमेयला खूप मारले, एकीनी पोलिसांना कॉल केले..पोलीस आले आणि अमेयला घेऊन गेले..
पण त्या दोघी ज्यांनी मदत केली त्यांना बघून आकांशा, प्रिया आणि सोनिया थक्क होत्या कारण ते किन्नर होते. आणि आज त्यांच्यामुळे ह्या तिघी हि सुरक्षित होत्या. तिघीनी पण त्या दोघींचे मनापासून आभार मानले, आणि त्या दोघीहि प्रिया आकांशा आणि सोनिया ला रूमजवळ सोडवायला गेल्या .. तुम्ही आम्हाला हि केलेली मदत आम्ही कधीही विसरणार नाही म्हणुन तिघीही त्यांना बाय रूमवर गेल्या..