Lakshmi's face .. ??? Not just for the name ??? in Marathi Philosophy by Vrushali Gaikwad books and stories PDF | लक्ष्मीचे रुप..??? फक्त नावापुरतेच नाही ना???

Featured Books
Categories
Share

लक्ष्मीचे रुप..??? फक्त नावापुरतेच नाही ना???

आजच माझं लग्न झालं... नुकतीच माप ओलांडून मी माझ्या सासरच्या घरात लक्ष्मीच्या रुपाने आली. माझ्या मनात धडधड सुरुच होती. आजुबाजुला असलेली, नजरेसमोर येणारी प्रत्येक व्यक्ती माझ्यासाठी नविन होती. माझं माहेर माझ्या सासरहून ४०० किमी दूर होते. म्हणुन माझं सासरच्या मंडळींसोबत कधीच बोलणं किंवा भेटणं ही झालं नव्हतं. माझी लास्ट ईअरची परिक्षा झाली आणि लगेचच मावशीने या स्थळाबद्दल वडिलांना सांगितले, बाबांनी कोणताही विचार न करता बघण्याचा कार्यक्रम ठेवला. दोन दिवसांनी येऊन मुलगा, त्याचे आई - वडिल आणि आत्या मला बघुन गेले. त्यांनी जास्त वेळ न घेताच अर्ध्या वाटेत गेल्यानंतर आम्हांला मुलगी पसंद आहे म्हणून फोन केला.. घरात सर्वच खुश होते. बाबांनी तर साधा माझा विचार ही घेतला नाही आणि मावशीला मुलीकडुन होकार आहे असं कळवायला सांगतले. मला वेळ हवा होता, मला बघण्यासाठी आलेला हा पहिलाच स्थळ होता पण मला विचार करायला वेळही मिळालाच नाही. अवघ्या सात दिवसांवर साखरपुड्याचा कार्यक्रम ही होता. साखरपुडा झाला तरी माझं काही माझ्या होणा-या नव-यासोबत बोलणं झालं नाही.
ज्या स्थळाला मी माझा होणारा नवरा समजत होती तो माझ्यापेक्षा बारा वर्षांनी मोठा होता हे मला साखरपुड्यात समजले. माझ्या मनात प्रश्नांची गर्दी झाली होती, हा माणुस साधा माझ्याकडे एक नजर ही वळवुन बघत नाही, जो माझ्यापेक्षा वयाने जास्तच मोठा आहे.. त्याच्यासोबत मला संपुर्ण आयुष्य घालवायचे आहे. साखरपुड्याचा कार्यक्रम झाल्यानंतर मी आईसोबत बोलण्याचा प्रयत्न केला. "आई माझ्यापेक्षा इतका मोठा मुलगा तुम्ही माझ्यासाठी का बरं बघितला आहे??"
"अगं बाळा, त्याचं घरचं खुप चांगलं आहे, घरात सर्व सोय आहे, तुला त्रास नाही होणार तिथे..."
"हो, अगं पण इतका मोठा..???
"रश्मी तु प्रश्न विचारून काहीच होणार नाही.. तुझं लग्न आता जमलेलं आहे पुढच्या महिन्यात लग्नाची तारीख काढली आहे..."
माझं बोलुन कोणी ऐकणारच नव्हतं तर माझ्या बोलण्याला काही अर्थ ही नव्हता... मला खुप वाटायचे माझ्या होणा-या नव-याने माझ्यासोबत रोज फोनवर बोलावे, इतर मुलींसारखे मला लग्नाआधी गिफ्ट द्यावे. पण माझ्यासोबत असं झालेच नाही. कधी फोन आलाच तर तो लग्नाची तयारी विचारण्यासाठी असायचा.. मला माझ्या भविष्याची चिंता होती. मी होणा-या नव-यासोबत बोल्लीच नाही तर लग्नानंतर तरी आमचं बोलणं होईल का????
एकामागून एक दिवस जात होते. एक महिना मध्ये निघुन गेला तरीही मी नव-यासोबत प्रेमाचे दोन शब्द ही बोलली नव्हती.
आज माझे लग्नही झाले आणि मी या अनोळखी घरात वावरणार होती. लग्नाच्या रात्रीच माझ्या चुलत सासुबाई आणि माझ्या ह्यांच्या आत्या माझ्या शेजारी येऊन बसल्या. मला कसलीच कल्पना नव्हती.. कसं वागायचं? कुठे बसायचं?? मी माझ्या माहेरी जशी खुर्चीत सर्वांसमोर बसायची तशीच इथे नणंदा सोबत बसली. माझ्या शेजारी बसलेल्या सासुबाई, माझ्या केसांवरुन हात फिरवुन पोरी असं खुर्चीत मोठ्यांसमोर नाही बसायचं.. मला सुचलं नाही मी लगेच ऊठुन लादीवर बसली. सास-यांसमोर पण वर नाही बसायचं... मी मान हालवली. आत्यांनी मागुन पदर माझ्या डोक्यावर ठेवला, कोणी आल्यानंतर पदर डोक्यावर घेऊन पाया पडत जा..रोज साडी नेसायची, सासुबाई सांगतील ती सर्व कामं करायची, सकाळी लवकर ऊठायचे, नव-यासोबत सर्वांसमोर बसायचं नाही, बोलायचं नाही.. हे सर्व ऐकुन मी फक्त मान हालवत होती.. माझ्यासाठी हे सर्व पहिल्याच दिवशी ऐकणं आणि लगेचच प्रत्यक्षात आणणं, म्हणजे शाळेत पहिल्या बेंचवर बसलेल्या मुलीने बाईंच ऐकुन लगेच होमवर्क पुर्ण करायला घेण्यासारखं होतं.. पण मी काही पहिल्या बेंचवर बसणारी मुलगी नव्हती तरीही मला ऐकावं लागत होतं...
माझ्या ह्यांची एक काकांची मुलगी आहे, अवघ्या सात वर्षाची, माझ्या शेजारी येऊन बसली.. वहिनी कशा आहात? म्हणुन तीने मला विचारलं.. तीला मी प्रत्युत्तर देणार तेवढ्यात शेजारच्या आत्याबाई बोलल्या.. तु वहिनीला कशा आहेत नाही विचारायचं.. कशी आहेस विचारायचं..आता तु नणंद आहेस. आणि रश्मी तु पण हीला नावाने नाही हा बोलायचं.. ताई बोलायचं तीला एकेरी आवाज नाही द्यायचा.. सुनबाई आहेस आता तु.. तुला खुप काळजी घ्यावी लागेल...
माझा लग्नाचा पहिला दिवस म्हणजे माझ्यासाठी पहिलीत पुन्हा बसल्यासारखा होता.. काही अजिबतच मनाला पटत नव्हतं तर काही नविन शिकायला भेटत होतं.. मनात त्या दिवशी मात्र प्रश्नच प्रश्न होते.. आपण अजुनही त्याच शतकात आहोत, त्याच विश्वात आहोत.. कुठेतरी आपण मागेच आहोत.. कितीही पुढे गेलो, कितीही नविन गोष्टी आत्मसात करण्याचा प्रयत्न केला तरी आपण मागेच आहोत.. मला एक कळत नाही.. आपण स्वतः ही स्रीच आहोत, स्वतः ही कोणाची तरी सुन झालेले आहात किंवा होणार आहात.. मग त्या घरात असलेल्या सुनेला समजुन घ्यायचं सोडुन तिला आल्यापासुन काही कामाच्या नसलेल्या गोष्टी का शिकवत बसतात.. घरात येणा-या पाहुण्यांच्या वारंवार पाया पडुन नेमकं काय साध्य होतं???? घरात सर्वांसमोर खाली बसल्यानंतरच घरची सुन लक्ष्मी असते का??? वयाने छोट्या असलेल्या व्यक्तीला ही मान मर्यादा शिकवाव्याच लागतात का ??
का पण स्वतःच्या सुनेला आज समजुन घेऊ शकत नाही???का आपण मान मर्यादा यामध्ये अडकतोय??? पुन्हा तो चक्र आपल्यकडेच येतो हे कसं कळत नाही..आज घरातल्या सुनेला समजुन नाही घेतले तर ऊद्या तुमच्या मुलीला किंवा नातीला मान मर्यादा पाळाव्या लागतात म्हणुन तक्रार करु नका.. शिक्षण इंग्लिश मिडीयम मध्ये कॉलेज पुर्ण करुन पुन्हा मुलींनी यामध्येच अडकायचं का?? मग शिक्षणाचा उपयोग आणि खर्च नक्की कशासाठी करता..???


✍सौ. वृषाली गायकवाड,जाधव.