Julun yetil Reshimgathi - 7 in Marathi Love Stories by Pratikshaa books and stories PDF | जुळून येतील रेशीमगाठी - 7

Featured Books
  • નારદ પુરાણ - ભાગ 61

    સનત્કુમાર બોલ્યા, “પ્રણવ (ૐ), હૃદય (નમ: ) વિષ્ણુ શબ્દ તથા સુ...

  • લગ્ન ને હું!

    'મમ્મી હું કોઈની સાથે પણ લગ્ન કરવાના મૂડમાં નથી, મેં નક્...

  • સોલમેટસ - 10

    આરવને પોલીસ સ્ટેશન જવા માટે ફોન આવે છે. બધા વિચારો ખંખેરી અન...

  • It's a Boy

    સખત રડવાનાં અવાજ સાથે આંખ ખુલી.અરે! આ તો મારો જ રડવા નો અવાજ...

  • ફરે તે ફરફરે - 66

    ફરે તે ફરફરે - ૬૬   માનિટ્યુ સ્પ્રીગ આમતો અલમોસામાં જ ગ...

Categories
Share

जुळून येतील रेशीमगाठी - 7

भाग - ७

{थोडं भूतकाळातील...❤‍🩹}
.
.
.
सकाळी अर्जुन आणि सावीच्या घरी धुमाकूळ सुरु झाला....बातमी कळताच....अर्जुनच्या घरची मंडळी सावीच्या घरी आली....सोबतच दोन्ही साखरदांडे कुटूंब हीं होते...




सगळेच शांत बसले होते.....घटनाच अशी घडलेली....सावी च्या सुद्धा डोळ्यात पाणी साचले होते..... डोळ्यात पाणी साचण्याचे कारण काय हेच कळत नव्हतं........अर्जुन मात्र शांत बसलेला.....चेहऱ्यावर कसलीच रूपरेषा बदलली नव्हती....

शांतता भंग करत, शुगरफॅक्ट्री बोलले.....





माधव - अहो काय सांगू तुम्हाला काय झालं ते...





केशव - हे असं झालंच कस... गणपत आणि शांती पळून कसे गेले.... एवढी हिंमत कशी आली त्यांच्यात...





भागीरथी - त्यांनी पत्रात तर लिहिलंच आहे ना, ते दोघ कॉलेज मध्ये होते तेव्हा पासूनच त्यांचं प्रेम होतं.....आणि तुम्ही हे सगळं ओळखून होतात तरी त्यांना जबरदस्ती लग्नासाठी उभ केलं..




भाऊसाहेब - हो आणि दोन खरं प्रेम करणायऱ्या मध्ये आम्ही नाही येणार.....लग्न नाही झालं ते बरच झालं.....या लग्ना मुळे चार आयुष्य बरबाद झाले असते..... मनाविरुद्ध लग्न म्हणजे किती मोठी जोखीम.....कळतंय का साखरदांडे....





माधव - पण या लग्नासाठी गणपत स्वतः तयार झालेला...एवढ्या मुलींमधून फक्त त्यांनी...सावीचा फोटो पसंत केला...





केशव - शांती सुद्धा विसरलेली सगळं ते प्रेम बीम... असं काही नव्हतंच त्यांचं....आता त्यांनी हिंम्मत केलीच कशी...





माधव - एवढी सोन्या सारखी पोरगी...तिला सोडून भलती सोबत गेला....सगळं घेऊन फरार झाला...पैसे दागिना सगळं.... काही नाही प्रेम संपलं की यांच्या पोरीला घेऊन येईल घरी....प्रेम काय नसतं....ते फक्त दाखवण्यापुरता....





केशव - प्रेमानी नाही, पैशाने पोट भरता येतात....




माधव - पण खरतर कुठली पनवती सुचली आणि यांच्या मुलीशी सोयरीक जुळवायला आलो असं वाटतय आता....एवढ्या पोरी दाखवल्या पण कधी तो असं पळून नाही गेला....एवढी हिंमत नाही केली त्यांनी....... हिनेच शिकवलं असेल.....हिचाच पायगुण असेल..... काही लोक तरी बोलले.... आईला गिळून बसली लहान मुलगी....... आणि मोठी बापाची चांगली नोकरीं गिळून बसली लहानपणी.......बरं झालं लग्न नाही झालं ते..... नाय तर.....






हे ऐकताच सावी - साची च्या डोळ्यात टचकन पाणी आलं.....अर्जुन - अपूर्व ने दोघीच्या डोळ्यातलं पाणी पाहिलं.....अर्जुनला सुद्धा रहावलं नाही....




अर्जुन / अपूर्व - स्टॉप इट...बस्स आता एक शब्द नाही...





अर्जुन आणि अपूर्व चा एवढा मोठा आवाज ऐकून कुलकर्णी कुटूंब थक्क झाले...... 😮




अर्जुन - आता अजून एक शब्द बोलू नका पेडणेकर बद्दल.....माझा मी ताबा सोडेल नाहीतर...... आताच म्हणालात पेडणेकर सोन्यासारखी मुलगी आहे आणि आता असं वाईट बोलताय? लोक काय बोलणारच पण पेडणेकर बद्दल वाईट बोलणारी लोक फक्त एक टक्के असतील..... त्यांचं तुम्ही ऐकून यांना बोलताय...





अपूर्व - आणि हीं कोणती बोलायची पद्धत छोटीने आईला गिळलं म्हणजे...... तुम्ही होतात का तेव्हा बघायला...... पिंकी ची आई कशा गेल्या ते पाहायला शुगरफॅक्ट्री 😡.... हिंम्मत कशी झाली साची ला अअअअ आणि सावी ताईला असं बोलायची? तुमच्या घरात मुलगी नाही म्हणूंन नाही माहित तुम्हाला...... मुलीची आब्रू काचे सारखी असते, सांभाळता येत नसेल ना तर फोडायचा प्रयत्न करू नका..... हे प्रयत्न सुद्धा लागतात मनाला स्त्रियांच्या...





अर्जुन - सावी कशा आहेत तुम्हाला काय माहिती......
आणि हो हे तुमच्या मुलांचं तुम्ही लपवलं आमच्या पासून....आणि प्रेमाला काय नाव ठेवता, सगळेच जण प्रेम करतात काका....लग्न नंतर नवरा बायकोत होणार ते प्रेम आहे ना....नाहीतर काय आहे? पैशाने सगळं विकत घेता येत, आजची गरजच पैसा आहे मान्य मला...... पण याने विकत नाही घेता येत ते म्हणजे सुख, समाधान....
पुन्हा जर पेडणेकर बद्दल आणि साची बद्दल वाईट बोललात तर याद राखा....आणि हो जगू द्या शांतपणे गणपत आणि शांती ला....प्रेमात काय ताकद आणि समाधान असत तुम्हाला नाही समजणार.... शांतीच आनंद पाहून तुम्हाला लक्षात येईलच....नंतर समजेल..... जमलं तर त्यांना समजून घ्या....





अपूर्व - येऊ शकता आता तुम्ही शुगरफॅक्ट्रीज...चला...चला.......विसरा हा पत्ता आता....





साखरदांडे कुटूंब बाहेर निघून जातात.......तस सावी रडत वरती निघून जाते...आणि साची बाहेर जाते.....तस सतीश सुद्धा स्वतः ला हारून बसतात.....सगळे त्यांना आधार देत असतात....तेवढ्यात अपूर्व आणि अर्जुन पळ काढतात....





सावी खोलीत जाऊन रडत बसली होती.....अर्जुन तिची समजूत काढण्यासाठी तिच्या शेजारी जाऊन बसतो...
दुःखी असलेली सावी नकळतचं अर्जुनला मिठी मारते..

त्यांची पहिली मिठी होती, अशी नकळत घडलेली.....
सावीच्या अचानक मारलेल्या मिठीने अर्जुन शॉक होतो.....
पण ती मिठी त्याला समाधान देऊन जाणारी होती....
सावीला कळत तस लगेचच ती दूर होतेय..



सावी - अअअअ स सॉरी सॉरी सर,
(दूर होतं )




अर्जुन - इट्स ओके पेडणेकर, बरं वाटलं 🥰




सावी - काय? 🤨




अर्जुन - अअअ म म्हणजे बरं वाटलं का? तुम्हाला असं... रडू नका तुम्ही...




सावी - माझ्यामुळे माझ्या बाबांना ऐकावं लागलं ना.... 😔




अर्जुन - पेडणेकर यात तुमची काय चूक...ते आधीच पळून गेले हे बरं झालं....निदान होणारी मोठी बदनामी तरी टळाली....तुम्ही तुमच्या जागी योग्य ते दोघेही त्यांच्या जागी...कुणाला दोष देऊन फायदा नाही...




सावी - हो 😔




अर्जुन - तुम्ही का नेहमी सगळं स्वतः वर घेता मला हे कळत नाही....जरा प्रॅक्टिकलं व्हा, यात तुमचा काय दोष नाही पेडणेकर...




सावी - नेहमी माझ्या बाबांना ऐकावं लागत ना पण.... मागे पण असच.....




अर्जुन - काय? मागे पण असच म्हणजे???





सावी - अअअ काही नाही ते असच म्हंटल....काहीही चूक झाली आमच्याकडून की त्यांनाच सगळेच ऐकवतात ना अस....




अर्जुन - नाही नाही तुम्ही विषय बदलताय...ते तुम्ही बोलत की.......




सावी - अअअअ ब बरं ऐका ना मला जरा गरगरत आहे...बीपी ल ल लो होईल असच झालं तर...




अर्जुन - अरे बापरे, नको तस....मग तुम्ही झोपा हवं तर, जास्त लोड घेऊ नका म्हणूंन होते असं...आहोत आम्ही सगळेच ओके.... जास्त झालं तर आवाज द्या....





सावी - हो आराम करेन जरा तर होईल बरी...तस पण हृदयावरील जखमा लगेच कुठे भरतात..जन्म उलटतात त्या भरायला.....




अर्जुन - हम्म?? मला काही समजलं नाही...पण पेडणेकर you are the Best❤️डोन्ट थिंक टू मच...चिल....
.
.
.
.
.
अपूर्व - शुईईईई, शांत हो पिंकी, मेकअप उतरला तुझा....खरा चेहरा दिसायला लागला आता तुझा..... 😂



साची - अप्पू.... 🥺




अपूर्व - हे बग आपण योग्य आहोत आपल्याला माहिती आहे ना मग लोक काहीही बोलूदे आपण रडायचं नाही....लोकांच्या बोलण्याने आपण तसे होतं नाहीत.... आपण हे केलं, चुकीचं असेल पण दोन प्रेम करणार्यांना मिळवलं आपण...... चार आयुष्य वाचवले...... पुण्य झालं ते.....तू काय शुगरफॅक्ट्रीचं मनावर घेते......रडू नको चूप.... माझं बाळ ग ते...❤️
(तिला मिठीत घेऊन...)




साची - ह्म्म्म..लव्ह यूं अप्पू... ❤️




अपूर्व - लव्ह यूं टू पिंकी ❤️



साची - वाईट ताई साठी वाटतं तिच्या नशिबी सगळी दुःख आहेत....



अपूर्व - होईल सगळं नीट पिंकी...



साची - हो मी.....ए आतून आवाज येतोय...माझे ब बाबा रडतात वाटतं.....




अपूर्व - हो ए चल आत चल...
.
.
.
.
.
सतीश - काय होऊन बसल हे...🥺माझ्या चिऊ च्या आयुष्यात आनंदच नाही...प्रेम नाही....काही चूक नसताना सुद्धा तिला हे भोगावं लागतंय....




भाऊसाहेब - सतीश शांत हो पोरा,अरे तुझी मुलगी लाखात एक आहे...तिला असं बोलून जाणारे लाखो असतील पण यामुळे ती काय तशी होते का...




भागीरथी - हो तर, बोलणारे बोलतात ते जळतात म्हणूंन बोलतात.... तुझ्या मुलीच सगळं चांगलंच होईल बग...




संगीता - हो ना भाऊ तुम्ही काळजी नका करू..



सतीश - खूप मुश्किलने लग्नासाठी तयार झालेली चिऊ... आधीची घटना आणि....आता पुन्हा असं झाल्यावर....




संगीता - मुश्किलने म्हणजे...? घटना...असं काय झालंय?




सतीश - अअअ काही नाही ते...
(स्वतः ला सावरत..)




भागीरथी - निसंकोच पणे बोल आता आपण घरचेच आहोत असं समज...आम्ही काय तुझ्या मुलीला वाईट नाही समजणार...
(त्यांना आधार देत )




सतीश - हे मी.कस.? ते!




भाऊसाहेब - सांग सतीश काय झालं होतं....आम्ही सुद्धा यात काही मदत लागली तर करू....




सतीश - हो तुमच्यावर विश्वास आहे म्हणून सांगतो.....हीं घटना पाच वर्षा आधीची.....सावित्री गेल्यावर मीच चिऊ - पिंकी ला जपलं.....पण यात माझी सावी पिंकीची आई झाली.......मला वेगळं काही करावं नाही लागलं......माझ्या सावीच वय एकवीस होतं,नुकतीच लास्ट इयर ची एक्साम देऊन झालेली आणि आम्ही तेव्हा गावी गेलो होतो जत्रेसाठी.......आधी इतकी चांगली परिस्थिती तशी नव्हती......तेव्हाच एक स्थळ सांगून आलं सावीला,घरदार उत्तम होतं, पैसा होता, मुलगा शिकलेला तरुण...सावीला पुढे नोकरीं, शिक्षण सगळं ते करून देतील असं म्हंटले होते.....आम्ही लगेचच सावीच लग्न लावून दिल....माझ्या सावीने पण माझ्या शब्दाचा मान ठेवला...




भाऊसाहेब - सावीच लग्न झालेलं....🤨




सतीश - हो,पण सगळ्यांच ऐकून लग्न लावून तर मी दिल......सावी सुखात आहे या भ्रमात मी गेले वर्षभर होतो....पण तिकडे माझी गरीब सावी तिने खूप हाल सहन केले....फोन वर बोलण व्हायचं पण लगेचच काम आहे असं सांगून ठेऊन द्यायची.....मी सुद्धा खुश होतो की ती तिच्या संसारात रमली असेल..... साची तेव्हा लहानच होती मी तिच्याकडे लक्ष देत होतो.......पण तिकडे तिच्या नवऱ्याने आणि सासरच्या मंडळीने तिचे हाल वनवास केले....🥺शब्दात मांडू नाही शकत मी....एवढं दुःख तिने सहन केलं...
तिला जेवण नव्हते देत, सर्व काम हीच करायची......नवरा दारू पिऊन घरी यायचा, रोज नवीन नवीन पद्धतीने मारायचा......कधी पट्टा, कधी लोखंडाची सळी, तर कधी जळती मेणबत्ती ने चटके.....कधी लाथाने तुडवायचा...तर कधी भिंतीवर डोकं आपटून..... 🥺




संगीता - बाईsssss 🥺काय सांगताय...




भागीरथी - बापरे... क क काय सांगतोस...मग तुला कस समजलं नंतर....सावी हे सहन कस करत होती?




सतीश - काय करणार होती ती....गरिब बापाची लेक होती...बऱ्याच मुली नेहमी सहनचं करतात...
.वर्षभर माझ्या सावीची भेट नाही म्हणूंन सरप्राईज द्यायला अचानक गावी गेलो......गावात गेल्याच क्षणी सगळ्यांनी मला खबर दिली माझ्या सावीची.....तस लगेच मी गावातील काही लोकांना घेऊन सावीच्या सासरी गेलो......खरं खोटं बघायला....तर समोर पाहिलं माझी सावी अंगणातील विहीरजवळ बसल्या बसल्या झोपली होती.....
तेजस्वी चेहरा नाहीसा झालेला.....अंगाची नुसती हाड झालेली.... ते बघताच मी पेटून उठलो......हातातली काठी घेऊन आम्ही सगळ्यांनी सावीचा पती लक्ष्मण ला खूप मारलं.......तो तिकडून पळाला, मी सगळ्यांना पोलिसांच्या तब्ब्यात दिल... सावीला घरी घेऊन आलो उपचार केले.......तिच्या जखमा सगळं सांगत होत्या,.....माझी पोरं नुसती थरथर कापत होती गेले कित्येक दिवस.....काही दिवसांनी खबर लागली की ट्रक खाली येऊन लक्ष्मणचा मृत्यू झाला..... त्याच्या घरच्यांना हीं जन्मठेप झाली.....मग मी सावीला घेऊन कायमचा मुंबई ला आलो....🥺




भाऊसाहेब - किती वेदना सहन केल्या रे तुझ्या मुलीने....




सतीश - हो त्या गोष्टीला पाच वर्ष झाली....सावी तेव्हा एकवीस वर्षांची होती..... लहानच होती, आता सववीस वर्षांची आहे,पण अजूनही तीला तेच भास होतात, स्वप्न,भीती वाटणं....लग्नापासून लांब पळते....माझी सावीने खूप सहन केलंय....🥺😭आता तयार झालेली....परत तेच 🥺कुणास ठाऊक तीच लग्न होईल की नाही.....




संगीता - होईल सतीश भाऊ, कुणीतरी चांगला मुलगा बघूच की आपण तिच्यासाठी.... आणि हे प्रकरण आधीच झालं ते बरं झालं....




भागीरथी - पोरा शांत हो तू...




सतीश - सावी माझ्याशी काही क्लीयर बोलत नाही..कारण बाप आहे मी.... आज तिची आई असती तर ती मन मोकळ करून रडली असती...एकदा का रडली असती कदाचित पुन्हा आधीसारखी राहिली असती....ती रडली नाही असं नाही.... पण मनात जे दाटल आहे ते एखाद्या स्त्री कडेच ती व्यक्त करू शकते नाही... 🥺मनात घुसमटतय तिच्या सगळं...




भागीरथी - हो हो पोरं तू शांत हो आम्ही आहोत नाही...



सतीश ने सांगितलेला सगळा प्रकार मागे उभे राहून अर्जुन, अपूर्व आणि साची ऐकतात...साची ला याचा अंदाज होता.....पण अपूर्व अर्जुन ला नाही....अर्जुनला तर धक्काचं बसला हे सगळं ऐकून....त्याला काय बोलाव कळतच नव्हतं....




अर्जुन - म्हणजे पेडणेकर जे मधे मधे असं न समजण्यासारखं बोलायच्या ते ह्यामुळे?!😶

#नाही सर, सगळ्या गोष्टींचा अंदाज नंतरच येतो माणूस पहिल्या भेटीतच नाही ओळखता येत...
काही माणसांना ओळखायला तर एक जन्म कमी पडतो....पण त्यांचे रंग मात्र रोज दिसत जातात....

#हृदयावरील जखमा कुठे लगेच बऱ्या होतात त्या भरायला तर जन्म उलटतात....

#मला प्रेमात काहीच रस नाही आणि लग्नात सुद्धा...... कारण नाही माहिती पण नाही...

#माझ्यामुळे माझ्या बाबाना ऐकावं लागत.. मागे पण असच....

#खरतर जो माणूस मनात दुःख असूनही आनंदी राहतो त्या माणसाच्या मनात काय चाललं आहे हे समोरच्याला कळत नाही....चेहऱ्यावर हसू असत पण मनात तुफान असतो!!

(मागील घटना आठवताना....)




अपूर्व - पिंकी, त तुझ्या ताईच... लग्न?




साची - हो, बाबा बोलें ते खरं आहे.....मी लहान होते त्यावेळी पण जस मोठी झाले तेव्हापासून ताईला फक्त एकट्यात रडताना पाहिलं......माझी ताई त्या लक्ष्मण ला विसरली आहे......पण तिने सहन केलेल्या वेदना...तो मार.......सगळं तिला अजूनही आठवत......पुरुषांच्या स्पर्शला सुद्धा ती घाबरायची, एवढंच नव्हे तर बाबांना सुद्धा हात लावू द्यायची नाही स्वतःला.....आता ती सावरली त्यातून पण ते स्वप्न थोडीफार भीती अजूनही आहे...🥺




अर्जुन - बापरे हे हे सगळं अविश्विषनीय आहे...पेडणेकर च्या मनात एवढं दुःख आहे कधी वाटलंच नाही....



साची - अर्जुन सर माझ्या ताईची सवय आहे मनात दुःख असली तरी ती चेहऱ्यावर हसूच ठेवते....आणि बाबांची एकच इच्छा आहे की ताईच लग्न व्हावं तिला हे सगळ्या गोष्टी समजून घेणारा पती मिळावा... तिच्या जखमा ओरबडणारा नको..



अर्जुन - हम्म खरय...खूप स्ट्रॉंग आहेत त्या.. 🥺




अपूर्व - पिंकी नक्की ताईला चांगला जोडीदार मिळेल तू रडू नकोस...




साची - हम्म 🥺



*****************


रात्री जेवण झाल्यावर कुलकर्णी कुटूंब एकत्र गप्पा मारत बसलेले...





संगीता - कस ना आई? एवढं वाईट झालंय त्या सावी बरोबर, कधी वाटलंच नव्हतं की अशी लोक अजूनही आहेत आपल्या देशात...




भागीरथी - हो तर,आपल्या देशात अजूनही असे लोक आहेत.. जे मुली - सु्नांना मोलकरीण समजतात, ओझं, वंशाला वारस देणार मशीन समजतात....त्यांना मुली म्हणजे खेळण वाटत....कमी लेखतात मुलींना...हुंडा प्रथा अजूनही चालू आहेच....




भाऊसाहेब - हो तर, उलट आम्ही मुलींसाठी किती तडपलो काय भागीरथी....किती नवस केले पण आम्हाला झाली दोन्ही मुलंच...आणि माझ्या दोन्ही मुलांना हीं मुलंच झाली...




संगीता - हो ना ज्यांना मुलींची किंमत कळते त्यांनाच माहिती..




भाऊसाहेब - मुली - सुना म्हणजे वरदान असतात, शक्ती, माया, भक्तीचं रूप....स्त्रिया आहेत म्हणूंन आपण आहोत...त्या जे सहन करतात ते पुरुष कधीच समजू नाही शकत...




संगीता - हो ना..



अपूर्व - खरं आहे आजोबा, आता आपल्याच घरात बघा ना, आई आणि आज्जी शिवाय पान हलत नाही आपल्या तिघांचा...या दोन्ही स्त्रिया घरात नसल्या की घर खायला उठत...




अर्जुन - हे खरं आहे बायकांशिवाय घर आणि आयुष्य अधुरं आहे....




संगीता - हो ना बरं झालं तुम्हाला हे समजलं ते 😂




अर्जुन - 😂😂




भाऊसाहेब - या मुलींचं चुकत, अन्याया विरुद्ध लढायचं, हरायचं नाही...जो अन्याय सहन करतो तो सर्वात मोठा गुन्हेगार असतो...




संगीता - हो..पण भीती वाटतेच ना हो बाबा...




भाऊसाहेब - हो पण भीती वाटणं म्हणजे घाबरट असण नव्हे, भीती हीं एक स्टेप असते..




अपूर्व - मला तर वाटतं ना, की अन्याय करणाऱ्या माणसांना पहिले अक्कल हवी, कारण अन्याय करायचाच का आहे? स्त्रियांना पण मन असतंच ना, त्यांना हीं वेदना होतात....स्त्रिया आहेत म्हणून आपण आहोत....




अर्जुन - वाह अप्पू पहिल्यांदा बरोबर बोललास 😂




भाऊसाहेब - 😂😂😂




भागीरथी - मी काय म्हणते संगीता आपण ना साविसाठी उत्तम जोडीदार शोधूयात...माझ्या ओळखीत आहे एक.... त्याच हीं लग्न असच मोडलं होतं... पण पोरगा चांगला आहे, सावीला खुश ठेवेल...शिवाय आई वडील नाहीत त्याला....




संगीता - चांगल आहे की मग... भलं होईल तीच...




अर्जुन - कशालाsssss.....तुम्हाला बघायची काय गरज आहे का....पेडणेकर ना नसेल करायच लग्न तर? तुमच्या मर्जी त्यांच्यावर लाधू नका..😡मी.. अअअ
(रागात उठून निघून जातो....)




भाऊसाहेब - अरे याला काय झालं? 🤨




भागीरथी - काही कळलं नाही?




अपूर्व - दादा 🤨




अर्जुन रागातच आत खोलीत झोपायला जातो.....पण डोळे बंद करातच क्षणी त्याला नजरे पुढे सावीच येते.......नकळतच का होईना अर्जुन सावीच्या प्रेमात पडत होता......तिचा गोड चेहरा आठवतंच तो झोपी जातो...
.
.
.
.
(काही महिन्यानंतर....जेव्हा सर्व प्रकरण शांत होते..)





अर्जुन - गुड इव्हिनिंग टीम!!




सगळेच - गुड इव्हिनिंग सर >>




अर्जुन - आजचं काम संपल आता सर्वजण घरी जाण्याच्या तयारीत असाल....एक गुड न्यूज सांगायची आहे तुम्हाला.....उद्या रामनवमी आहे म्हणून बँकेला हॉलिडे आहे सो उद्या एन्जॉय करा...




सगळे - येssss ओहो ssss थँक्यू सर...




अर्जुन - चला जा आता घरी.. बाय..




सगळे - बाय सर (एका सुरात )




विदुला - बरं झालं उद्या सुट्टी आहे ते...मस्त आराम करेन उद्या...




सावी - तू आरामाचा विचार कर फक्त 😂




राहुल - मी तर माझ्या बायकोला घेऊन राम मंदिर ला जाणार आहे...जरा बरं वाटतं ना मंदिरात जाऊन आलं की...




विदुला - हो रे खरं आहे.




सावी - हो... तू पण जा की मग विदुला...





विदुला - हो हो...




राहुल - कोणासोबत त्या हिच्या बॉयफ्रेंड पप्पी सोबत...😂😂😂




विदुला - राहुल त्याच नाव पवन आहे मी त्याला लाडाने पप्पी म्हणते....




सावी - कस नाव आहे ग पण हे 😂 पप्पी....




राहुल - नाव आहे की फीलिंग्स हेच कळत नाही 😂




विदुला - गप रे..



राहुल - विदुला तू त्या पप्पी ला घेऊन कुठेच जाऊ नकोस.... मंदिरात तर नकोच.... जाशील तर त्याच्या खऱ्या नावाने हाक मार.... या नावामुळे घोळ होऊ शकतो....



विदुला - म्हणजे कस?




राहुल - मंदिरात जाऊन जर तुला काही तरी हवं असेल आणि तू म्हणालीस...पप्पी ते दे... दे लवकर पप्पी....चल लवकर पप्पी... घे लवकर पप्पी... कस वाटेल ते..... 😂😂😂




सावी - राहुल काय रे 😂विदुला मस्ती करतोय हूं तो...




विदुला - गप तू राहुल काहीही बोलू नकोस.... 😂😡




राहुल - हो का.... 😂




सावी - 😂😂😂😂




अर्जुन - अअअ पेडणेकर?




सावी - अअअ हूं सर बोला ना..




अर्जुन - बीजी आहात का??? तुम्हाला एक निरोप द्यायचा होता, माझ्या आज्जीने बोलवलं होतं तुम्हाला घरी, तीच काही तरी काम आहे म्हणे..




सावी - मला असं अचानक?




अर्जुन - हो....काळजी नका करू आज्जीने सतीश काकांना कळवलं आहे आधीच..... सो चला सोबत जाऊया का ?




सावी - अच्छा, हो ठीके..


----------------------



सावी आणि अर्जुन त्याच्या घरी जातात.....अर्जुन पूर्ण रस्त्यात गप्पच होता..... कारण त्याची आज्जी काय बोलणार आहे हे त्याला ठाऊक होतं...त्याला त्याला गोष्टीचा राग आलेला होता...
सावी अर्जुन घरी पोहोचले....

आज्जी- आजोबा सोफ्यावर बसून कार्यक्रम पाहत होत्या,संगीता किचन मध्ये होत्या..




सावी - अअअ आज्जी,..




भागीरथी - अरे सावी ये ये बाळा..ये बस बस..




भाऊसाहेब - संगीता, बाळा पाणी आन सावी आलेय...




संगीता - आलीस का ग सावी...
घे पाणी घे बाळा...
(पाण्याचा ग्लास तिला देताना..)




सावी - थँक्यू संगीता काकू..




संगीता - बस आता.. मी लगेच गरम गरम कांदा भाजी आणते... तयारच आहेत..




सावी - काकू अहो नको...




भाऊसाहेब - गप बस्स सावी....बेटा तू आन जा लवकर..



संगीता - हो बाबा आलेच..




भागीरथी - आ सावी बेटा, आज काही गोष्टी तुझ्याशी बोलायचं आहेत, तुझ्या आयुष्याविषयीं... तुझी हरकत नसेल तर बोलू?




सावी - आज्जी, विचारू नका काही, सरळ सांगा.. त्यात परवानगी का मागताय..



संगीता - घ्या भजी खाता खाता बोलू..आपण...




भाऊसाहेब - तुम्ही बोला, मी थोड्या वेळाने येतो..
(खोलीत जाताना..)




अर्जुन - हो मी पण आलोच....
(तिकडून खोलीकडे जाताना...)




संगीता- सावी बाळा आज तुला इथे बोलवण्याचं कारण, असं की मागे आम्हाला तुझ्या खासगी आयुष्य बद्दल कळलं,भूतकाळविषयी...तुझ्या बाबांनीच सांगितलं होतं...




भागीरथी - ऐकूनच काळीज भरून आलं माझं...नजरेसमोर तुझा केविलवाणा चेहरा उभा राहिला.... 🥺 सावी बाळा तुझ्या मनात खूप दुःख आहे, आम्ही नाही समजू शकत....पण असच मनात ठेवशील कुणाही जवळ तू राग नाही काढणार तर मन मोकळ कस होईल.... रोज असच रडत राहशील ग...




संगीता - तुला आज बोलवलं कारण, तुझी आई नाही...घरात मोठी स्त्री कुणी नाही... तुझ्या बाबासोबत तू किती गोष्टी शेयर करणार.... रोज रात्री रडतेस,घाबरतेस....हे सगळं थांबवण्यासाठी तुला मन मोकळ करून रडायला हवं बेटा...




सावी - नको आज्जी, काकू...नको ते पुन्हा पुन्हा आठवून त्रास होतो.... 🥺




भागीरथी - अग बेटा, पुन्हा पुन्हा आठवून त्रास करून उपयोग काय? आज तू रड मन मोकळ कर आम्ही स्त्रिया आहोत समजू शकतो तुला....बघ तुला खूप बरं वाटेल...




भागीरथी - रड बेटा रड... सांग तुझ्या मनाची घालमेल.... ती व्यथा, आठव आणि रड...मन मोकळ होईल ग तुझं...




संगीता - बोल सावी बेटा, काय आहे मनात तुझ्या... का घुसमटत राहतेस स्वतः शी....
बोल सावी...




भागीरथी - बोल बेटा....




संगीता - बोल सावी...



सावी - नन नको नको आजी...



भागीरथी - बोल बेटा...



सावीच्या नजरेसमोर तिचा भूतकाळ पुन्हा उभा राहायला सुरवात करतो........सगळ्या घटना ती आठवत होती........सगळं काही स्पष्ट नजरेसमोर दिसत होतं तिला.......नकळत तिच्या डोळ्यात पाणी साचले...
आता मात्र सावीचा बांध फुटला.....

सावी ओक्षाबोकशी रडू लागली.......तिच्या रडण्याचा आवाज सर्व घरभर फिरत होता......आता ती स्वतः ला सावरू शकत नव्हती..



सावी - आज्जी, काकूssss काय गुन्हा केला होता मी......😭काय केलं होतं मी......😭माझ्या बाबांनी एकवीस वयातच लग्न लावल.......त्यांनी माझं भलं पाहिलं आणि मी त्यांची अज्ञा पाळली.....सासरी गेले आणि पहिल्या दिवशी पासूनच अत्याचार सुरु झाले.....शारीरिक, मानसिक, भावनिक...पहिली रात्र म्हणजे मुलींच्या - मुलांच्या आयुष्यातला सुखद क्षण मानला जातो..
पण, त्याच रात्री मला सत्य कळलं लक्ष्मण बद्दल, दारूच्या नशेत आला होता तो.....ज्या गोष्टीची मला चीड होती तीच गोष्ट आयुष्यभर झेलत होती... 🥺
उपाशी राहणं, मार खान, हेच सगळं मी सहन करत होते...... त्या सिगरेट ने दिलेले ते चटके.... अंधाऱ्या खोलीत एकटीला बसवन.... अजून काय काय सांगू....😭माझ्यासोबत का असं... 😭




भागीरथी - सावर सावी.... 😔




सावी - एक गोष्ट अशी आहे जी मी बाबांना हीं सांगितलं नव्हतं...... आता ती मी अजून मनात नाही ठेऊ शकत.....🥺
या सगळ्यांत जबरदस्ती शारीरिक सबंध लक्ष्मण माझ्यासोबत बनवायचा...आणि मी प्रेग्नेंट हीं होते, फक्त एकच महिना झालेला, मला हीं बातमी नव्हती माहित.....पण त्याच वेळी त्यांनी मला मारहान केली होती,आणि बाबा मला घेऊन आले होते...त्याच वेळी हीं घटना घडली.....बाळ आतल्या आत..... 🥺😭😭😭 ज्या डॉक्टरांनी माझा उपचार केला त्यांना मीच हीं गोष्ट बाबांना न सांगण्यास सांगितली... आणि सगळं काही क्लीयर केलं...
मला हीं गोष्ट मनात अजून सळते 😭🥺 एका निष्पाप जीवाचा बळी गेला....😭माझं आयुष्य कुठल्या कुठे बिघडलं...😭
कोणतीही मुलगी कस विसरेल हे सगळं 😭😭




भागीरथी - बापरे सावी 🥺 बाळा ये इकडे... शुईईई शांत हो....
(तिला कुशीत घेऊन )




संगीता - देवा काय हे चांगल्या लेकरांना asaa त्रास...🥺नको काळजी करुस बाळा, होईल सगळं नीट... आता रड हवं तेवढं पण परत रडू नकोस... कारण तू स्त्री आहेस, सहन करायच तेवढं केलंस... आता हिंमतीने उभी राहून दाखव..



भागीरथी - हो बाळा.... शुईईई शांत शांत...



सावी - आज्जी, 🥺😭 मी एवढं देव धर्म करते, तरी देवाने अस का केलं...



भागीरथी - बाळा काहीतरी वाईट झालं की समजावं की देवाने जास्त वाईट होण्याआधी वाचवलं आपल्याला... मग त्याचे आभार मानायचे... निगेटिव्हली नको घेऊ.... पॉजिटीव्ह वे नी घे...बाप्पावर विश्वास ठेवं ते कधीच वाईट नाही करणार... आता तुझं सर्व चांगलंच होणार..कारण एक साखळी असते, दुःख नंतर सुख, नंतर परत दुःख आणि शेवटी परत सुख... हे चालूच असते... अग कर्म, दुःख हे देवाना हीं नाही चुकले...आपण तर माणसं... म्हणूंन आता सर्व चांगल होणार आहे तुझं, म्हणूंन हलकी होऊन जा आज... मन सगळं मोकळ कर...




सावी - हो.... 😭 आज्जीssssss😭😭😭😭😭




अर्जुन बाजूला उभा राहून हे सगळ ऐकतो.... त्याच्या डोळ्यातून नकळत अश्रू वाहतात..आणि राग हीं येतो, तो रागात खोलीत निघून जातो...



अर्जुन - किती क्रूर कृत्य आहे हे...हरामखोर माणूस होता बरं झालं गेला...नाहीतर...नाहीतर आज मीच त्याचा खून केला असता.... 😡
(कपडे बेड वर टाकून..)



अर्जुन बाथरूम मध्ये जातो, शॉवर चालू करतो...थोडं शांत होतो...डोळे बंद करतो तर त्याला सावीच दिसते....तिचा गोड चेहरा, तिचे अश्रू...त्याला ते पाहवत नव्हतं...त्याच्या डोक्यात सावीच फिरत होती...



अर्जुन - खरच, म्हणजे असं वाटतं ना की सावी सारख्या इतक्या गोड, निष्पाप जीवाला कुणी इतका त्रास कसा देऊ शकतो?
म्हणजे तिचा चेहराच किती सुंदर आहे, असं हात उचलावंसं हीं वाटणार नाही कुणालाच.... 🥰🥹
त्याला लक्ष्मण ने इतका त्रास दिलाच कसा हेच कळत नाही...मूर्ख कुठला..एवढी सुंदर हुशार बायको आजच्या काळात मिळण मुश्किलच...
एवढी गोड आहे ती....तिच्या डोळ्यात मला अश्रू आवडतच नाहीत.... पण असं सगळं का विचार करतोय मी??
(तो आरशात पाहून हसत होता )




अपूर्व - दादा,तुला खाली........हूं 🤨
(दरवाजा खोलतो आणि मधेच थांबतो..)




अर्जुन - का बरं विचार करतोय मी एवढा त्यांचा?



अपूर्व - दादा, कोणत्या तरी मुलीचा विचार करतोयस नाही?
(मागून येताना...)



अर्जुन - हो....
(हरवून, बोलत असताना...)



अपूर्व - काय 😀कोण आहे ती?
(जोरात ओरडून...)



अर्जुन - अअअअअ ह्ह्ह्ह अअअ अप्पू तू.. 😶
(गांगरून जाताना )



अपूर्व - दादा खरच तू मुलीचा विचार करत होतास? कोण आहे सांग नाही...



अर्जुन - अरे अप्पू असं काही नाही समजलं.



अपूर्व - सांगतोस की आईला सांगू..



अर्जुन - नन नको नको.. अरे म्हणजे मुलीचा म्हणजे...असच पेडणेकर चा विचार करत होतो... आणि दुसरी... अअअ दुसरी आहे कुणीतरी...



अपूर्व - अच्छा,
तुझ्या बँकेत काम करते का??



अर्जुन - अअअ हो..



अपूर्व - मग तिचा विचार का करत होतास?? मला सांगू शकतोस तू, अरे मी तुझी मदतच करेन...



अर्जुन - हो तुझी मदत लागणारच आहे, पण आता नाही...नंतर... आता तू का आला होतास?



अपूर्व - अरे हो, तुला आज्जी बोलवत होती...



अर्जुन - तू पुढे हो ओके मी आलोच..



अपूर्व - ओके..
.
.
.
सावी - आज्जी, आजोबा,काकू येते मी..
तुमचे आभार कसे मानू हेच कळत नाही आहे मला...
सक्ख्या माणसानी हीं केलं नाही एवढं केलंत तुम्ही...



संगीता - तुझं मन हलक झालं ना ? बस्स



सावी - ह्म्म्म..



भाऊसाहेब - थांब सावी अर्जुन सोडेल तुला...एकटीने नको जाऊस...



भागीरथी - अर्जुन... खाली ये..



अर्जुन - हूं आलो आज्जी,
बोल काय काम होतं..



भागीरथी - जा सावी ला घरी सोडून ये..



अर्जुन - हो.. चला पेडणेकर.



सावी - येते आज्जी..



भागीरथी - सावकाश जा...



संगीता - काळजी घे आणि आता आनंदाने जग..जशी आधी होतीस तशीचं सावी बन..



सावी - ह्म्म्म
येते..

.
.
.
शांत वातावरण.....रस्त्यावर बरीच शांतता होती...
कार मध्ये सावी अर्जुन....
आणि रेडिओ वरील गाणी..... 📻



कुछ भी नहीं जब दरमिया.....
फिर क्यू हैं दिल तेरे हीं ख्वाब बुनता...
चाहा की दे तुझको भुला......
पर ये भी मुमकिन हो ना सका...
क्या हैं ये मामला..
जानू ना मै जानू ना....
दिल सभलं जा जरा...... ❤‍🩹



(सावीच घर येत...)



सावी - थँक्यू सर...



अर्जुन - एक मिनिट मिस पेडणेकर..
मला बोलायचंय.



सावी - हूं?
(मागे वळून पाहताना )



अर्जुन - माफ करा, राग येणार नसेल तर बोलतो..



सावी - हूं बोला.



अर्जुन - असं म्हणतात की मन खोलून रडलं मनातलं बोललं... की मन हलक होतं..दुःख विसरता येत..बळ मिळत ते विसरायला... हे बघा जो अत्याचार तुमच्यावर झाला कबूल की तो खूप भयानक आहे ,पण जे घडलं ते विधिलिखित होतं पण आता जे तुम्ही जुनी सावी ला कोंडून ठेवलत ना...आयुष्य नीट जगत नाही आहात.. हे विधिलिखित नाही स्वलिखित आहे...
माझी आई उदाहरणं आहेच....तुम्हाला अजून माहित नाही म्हणून.....💔
शेवटचं हेच बोलेन की, अजूनही वेळ नाही गेली, आयुष्य एकदाच मिळत....येतो मी...



(अर्जुन गाडी घेऊन निघून जातो...सावी सुद्धा आत निघून जाते....)




क्रमश :
©Pratiksha Wagoskar