satisfaction in Marathi Motivational Stories by Gajendra Kudmate books and stories PDF | समाधान

Featured Books
  • રેડ સુરત - 6

    વનિતા વિશ્રામ   “રાજકોટનો મેળો” એવા ટાઇટલ સાથે મોટું હોર્ડીં...

  • નારદ પુરાણ - ભાગ 61

    સનત્કુમાર બોલ્યા, “પ્રણવ (ૐ), હૃદય (નમ: ) વિષ્ણુ શબ્દ તથા સુ...

  • લગ્ન ને હું!

    'મમ્મી હું કોઈની સાથે પણ લગ્ન કરવાના મૂડમાં નથી, મેં નક્...

  • સોલમેટસ - 10

    આરવને પોલીસ સ્ટેશન જવા માટે ફોન આવે છે. બધા વિચારો ખંખેરી અન...

  • It's a Boy

    સખત રડવાનાં અવાજ સાથે આંખ ખુલી.અરે! આ તો મારો જ રડવા નો અવાજ...

Categories
Share

समाधान

नमस्कार मित्रांनो, आलोय पुन्हा तुमची भेठ घ्यायला आणि काही मनातील हितगुज करायला. तुम्हाला भेटण्याची तुमच्याशी बोलण्याची हितगुज करण्याची लालसा ही माझी आणि माझा मनाची काही केल्या कमी होतच नाही, ती वाढतच असते निरंतर दररोज. तुमच्याशी भेट जर काही कारणास्तव होऊ शकली नाही तर माझे मन हे बेचैन होऊन उठते, दर आठवड्याचा शनीवारी कसल्या न कसल्या लेखाचा नाहीतर कवीतेचा स्वरुपात मी तुमचा पुढे उपस्थित होतो. त्यामुळे माझा मनाला समाधान प्राप्त होतो. तर मित्रांनो, आज मी तुमच्याशी समाधानाबद्दल काही हितगुज करणार आहे. लेखाचा शेवटी तुमचे
मत अभिप्राय राहतील तर जरूर कळवा.
तर मित्रांनो, मनुष्या जवळ सगळ काही असून सुद्धा त्याचा जवळ एक वस्तू नसते, ती म्हणजे समाधान, तृप्ती, शांती.
मित्रांनो आपण सर्वांनी ऐकले असेल वाचले असेल, " मन एवढ एवढ जसा खाकसचा दाना, मन एवढ एवढ ज्यात आभाळ
मावेना". जर यात मी चुकत असेल तर जरूर मला करेक्ट कराल. तर मित्रांनो या आपल्या मनाबद्दल आणखी काय म्हणाव आणि लिहाव. जेवढ लिहावं तेवढच कमी आहे शब्दकोशातील शब्द संपून जातील परंतु या मनाची महिमा काही संपणार नाही. ईश्वराने आपणास मनुष्य रुपात जन्म दिला, तर मनुष्य असोत किंवा पशु प्राणी या सगळ्यांना ईश्वराने शरीरात अवयव हे
भरभरून दिले आहेत. त्यातील एकमेव आणि अतीआवश्यक अशा अवयवाबद्दल मी बोलणार आहे. तो अवयव आहे आपले मन, हृदय, दिल अशा वेगवेगळया नावाने आपण याला उच्चारतो ओळखतो. याचबरोबर एक आणखीनच आवश्यक आणि त्रासदायक अशा अवयवाबद्दल सुद्धा मी नंतर बोलणार आहे. या दोघांचा परस्पर संबंध हा फार नीकटचा आणि वेळोवेळी होणारा असतो.
तर मित्रांनो, मी वर म्हटल्याप्रमाणे मनुष्याला जीवनात आवश्यक असणाऱ्या गोष्टी, वस्तू आणि संसाधन अशा भौतिक
आणि अभौतिक गोष्टी म्हणजे प्रेम, वात्सल्य, आपुलकी आणि बरेच काही या सर्वथा हव्याच असतात निरंतर. याबद्दलची त्याची भूख ही कधी क्षमत नाही ती निरंतर वाढतच असते दिवसेंदिवस. या गोष्टीचा न संपणाऱ्या भूखेचे एकच कारण आहे ते म्हणजे समाधान, तृप्ती. मनुष्याचा मनाला आणि तनाला जर हा समाधान किंवा ही तृप्ती जोवर प्राप्त होत नाही तोवर त्याची ही न संपणारी भूख कधीच शांत होतच नाही. संपूर्ण मनुष्य जाती या भूखेने ग्रासलेली असते आणि आहे. प्रत्येकाची भूख ही प्रत्येक व्यक्तीनुसार वेगवेगळी असते. त्यानुसार या भूखेचे प्रमाण ही त्या सम रूपाने कमी जास्त किंवा खूपच जास्त असते. या भूखेला कुठलेच मापदंड नसते, ना ही यावर कुणाचेच नीयंत्रण नसते. या भूखेचे प्रमाण हे त्या मनुष्याचा गरजेनुसार, आवश्यकतेनुसार कमी जास्त असे होत असते परंतु ती कधी पूर्णपणे संपुष्टात येतच नाही. या भूखेला आणखी बळ मीळते ते त्या मनुष्याचा लालसी वृत्तीमुळे, हो ही लालसाच असते जी मनुष्याकडून हे सर्व कृत्य करवून घेते. या लालसेचा मनुष्याचे मन आणि जे दुसरे अवयव आहे ते म्हणजे मनुष्याचे पोट उदर यावर संपूर्ण ताबा असतो. ते म्हणतात ना कि, “ आदमी के दिल का रस्ता सीधा उसके पेट से होकर गुजरता है". म्हणूनच मी म्हणतो कि या दोन अवयवाचे एक दोघांचा परस्पर संबंध हा फार नीकटचा आणि वेळोवेळी होणारा असतो. या दोन्ही अवयवात एक फरक असतो तो भूखेचा म्हणजे पोटाला जाणवते ती असते भौतिक संसाधनाची भूख आणि मनाला जाणवते ती अभौतिक म्हणजे भावनीक प्रकारची भूख. यामध्ये पोटाची भूख ही काही कालांतराने फक्त काही वेळेसाठीच क्षमते परंतु संपूर्ण संपुष्टात येत नाही. ती जेव्हा उत्पन्न होते तेव्हा मनुष्याला कधी दानव, तर कधी शैतान सुद्धा बनवीते. कारण ही असते भौतीक संसाधनासाठी उमळलेली जसे अन्न. या पोटाचा खडगीला किंवा भूखेला क्षमवण्यासाठी मनुष्य कुणाचा चरणी लोटांगण घालतो तर कधी मजबुरीने त्या समोरचा व्यक्तीचा शीर कापण्यास सरसावतो. परंतु त्याची लालसा त्याला वेळोवेळी मजबुरीने किंवा जबरदस्तीने असे कृत्य करण्यास भाग पाडते. याउलट मनुष्याचा मनाची जी भूख म्हणा कि असमाधान, अतृप्ती ही तर त्यापेक्षाही जास्त हानीकारक आणि
वीध्वन्सकारक अशी असते. वर म्हटल्याप्रमाणे ही भूख कधीच क्षमतच नाही तर मनुष्याची तृष्णा किंवा तहान आणि भूख ही एकमेकांचा विपरीत प्रमाणात चालत असतात. मनुष्याची लालसा, तृष्णा कुठल्या वस्तूबद्दल असेल तर त्याचा मनात त्या वस्तूबद्दल लालसा निर्माण होते. त्या तृष्णेची, लालसेची तृप्ती करण्यास मनुष्य सारे सामर्थ्य एकवटून सरसावतो. एक क्षण असा येतो कि तो मनुष्य आपल्या निश्चित अशा ध्येयाला गाठण्याच अगदी शेवटचा टोकाला पोहचून जातो. कुठल्याही क्षणाला त्याचा तृष्णेची, लालसेची तृप्ती होणे आता नीश्चित आहे असे वाटत असतांना त्या तृष्णेत, लालसेत आणखी भर पडतो आणि ती आणखी जास्त वाढते जेव्हा कि तीला कमी किंवा संपूर्ण संपुष्टात व्हायला पाहिजे. मनुष्याला एखादी वस्तू मिळण्याचे समाधान मिळण्या आधीच नवीन वस्तूची तृष्णा, लालसा निर्माण होते. मनुष्य ती वस्तू मीळण्याचा आणि त्याची लालसा पूर्ण होण्याचा
त्या समाधानाचा पूर्णपणे आस्वाद ही घेत नाही तर त्या नवीन वस्तूचा लालसेत किंवा मोहात तो मनुष्य होरपळून जातो.

आज वर्तमान युगातील एकच लालसा म्हणा कि भूख म्हणा ती म्हणजे पैशाची भूख ही फारच न म्हणता आपल्या सर्वस्व
काही पोटाचा खड्गीला मीटवण्यासाठी, तर काही परिस्थितीचा हाती विवश किंवा मजबूर होऊन, तर काही मानसन्मानासाठी,
जर काही फक्त आणि फक्त या पैशांचा मोहात अडकून नुसते धावतच राहिले आहेत. मुख्य म्हणजे यांचा मनाला समाधान हो मीळत नाही आहे. ज्या मनुष्याकडे पैसा नाही आहे तो उदरनीर्वाहासाठी त्या पैशाचा मागे धावून राहिला आहे जे कि त्याचासाठी अती आवश्यक आहे. परंतु काही असे मनुष्य आहेत कि ज्यांचाकडे अमाप असा पैसा उपस्थित असून ही ते या पैशांचा
घोडदौडीत आंधळे होऊन धावून राहिले आहेत आणि असतात. त्यांचा मनाला कधी समाधानाची प्राप्ती होतच नाही. उलट
त्यांचा मनाची भूख ही निरंतर वाढतच असते, शेवटी मरणाचा घडी सुद्धा त्यांचे हे असमाधानी मन त्यांना सुखाने मरू सुद्धा देत नाही. ते या अटळ सत्यापासून अवगत असतात कि शेवटी हा सगळा पैसा हे वैभव सगळ मरणानंतर येथेच राहणार आहे आणि त्याचासोबत काहीच नाही जाणार तरीही मनुष्य त्या पैशाचा मागे धावून राहिला आहे. याउलट एक गरीब मनुष्य जो मजबुरीने पैशांचा मागे धावतो तो मनुष्य मात्र लवकर समाधानी होऊन जातो म्हणजे
त्याचा मनाला समाधान मीळून जातो. कारण कि त्या मनुष्याला त्याची ऐपत आणि त्याची मर्यादा ही ठावूक असते. त्यानुसार तो आपली मर्यादा बांधून ठेवतो. त्याची जेवढी गरज असते तो त्यापुर्तीच धाव घेतो. एकदा त्याची गरजपुर्ती झाली तर तो समाधानी पावतो. तो त्याचा छोट्याशा भुकेचा लालसेचा पूर्तीचा आनंदाचा तो क्षण मोठ्या मन समाधाने आस्वादतो. त्याचे मन इतके समाधानी पावते कि तो उद्याचा काळजीत जगत नाही किंवा रात्रीला जागत नाही. तो उद्याचा काळजीत जगण्यापेक्षा आज मध्ये जगतो आणि आत्मवीश्वासाने म्हणतो, “कल कि कल देखेंगे, अभी तो इस पल का मजा लेना है." त्या गरीब मनुष्याचा या दिलदार वीचारामुळेच तो त्याचा स्वतःचा नजरेत एक राजा पेक्षा काही कमी नसतो. त्याचा अशा वीचारामागे एकच गोष्ट कारणीभूत असते आणि ती म्हणजे त्याचा समाधान. तो बीचारा भौतीक संसाधनाने भलेही असमाधानी असेल परंतु मनाने समाधानी
असतो. त्या बीचाऱ्याला त्याची लालसा आणि तीची हद्द माहित असते आणि त्याचे तीजवर संपूर्णरीत्या नियंत्रण असते. परंतू
या अशा न क्षमणाऱ्या लालसेचा बळी पडतो श्रीमंत आणि धनाढ्य मनुष्य. त्याचा त्या लालसेच रुपांतर काही काळानंतर होते मोहात. मोह म्हणजे वीकार तो श्रीमंत व्यक्ती या मोहाचा वीकाराने ग्रसीत होऊन जातो. तो सर्वथा असंतृष्ट आणि बेचैन असतो, त्याला कुठेच आणि कशातही संतृष्टी किंवा समाधान मीळत नाही. जसे लहानसे बाळ त्या वर आकाशात दिसणाऱ्या चंद्राला पकडण्यासाठी वारंवार हाथ उंचावतो, त्याचप्रमाणे तो श्रीमंत धनाढ्य मनुष्य नीरंतर संपूर्ण आयुष्यभर एखाद्या लहान बाळाप्रमाणे त्या न मीळणाऱ्या समाधानाचा मागे धावत असतो. शेवटी त्याचा अंत होण्याची पाळी येते तरीही त्याचा समाधान त्याला मीळत नाही आणि तसाच असमाधानी तो या जगाला सोडून जातो.

तर मित्रांनो, मी काही विद्वान किंवा संत नाही आहे. माझा तोंडून असे शब्द तुम्हाला बरे वाटत नसतील. तरीही मी
माझा अनुभव स्वतःबद्दल आणि स्वतःचा जीवनाबद्दल बोलतोय. या अशा भावना गोष्टी किंवा अनुभव हे सहजासहजी येत नसतात तर हे आपले जीवन म्हणा कि आयुष्य आपल्याला ते शिकवते. यासाठी कुठल्या शाळेत किंवा आश्रमात जावे लागत नाही. हे आपले जीवनच एक भलीमोठी पाठशाळा आहे जेथे मनुष्याचा जन्मापासून तर मरणापर्यंत नी असे नवनवीन धडे शिकण्यास मीळतात. तर माझ्या वीचारांपासून आपण सहमत असाल नसाल काही गोष्ट नाही आहे. माझे हे म्हणणे जर तुमचा मनाला भेळसावले असेल तर माझे लिखाण मी सफल झाले असे समजेल. मनात हीच आशा घेऊन मी तुमचा पुन्हा नीरोप घेतो पुन्हा नव्याने तुमचा भेटीला येण्यासाठी. आपले वीचार जरूर कळवा काही उणीव राहिली असेल तरीही जरूर कळवा तुमचा कमेंट्सचा रूपाने, मला त्याची आतुरतेने प्रतीक्षा राहील.

धन्यवाद

स्वलिखित

गजेन्द्र गोविंदराव कुडमाते