mala spes habi parv 2 bhag 7 in Marathi Short Stories by Meenakshi Vaidya books and stories PDF | मला स्पेस हवी पर्व २ भाग ७

Featured Books
  • રેડ સુરત - 6

    વનિતા વિશ્રામ   “રાજકોટનો મેળો” એવા ટાઇટલ સાથે મોટું હોર્ડીં...

  • નારદ પુરાણ - ભાગ 61

    સનત્કુમાર બોલ્યા, “પ્રણવ (ૐ), હૃદય (નમ: ) વિષ્ણુ શબ્દ તથા સુ...

  • લગ્ન ને હું!

    'મમ્મી હું કોઈની સાથે પણ લગ્ન કરવાના મૂડમાં નથી, મેં નક્...

  • સોલમેટસ - 10

    આરવને પોલીસ સ્ટેશન જવા માટે ફોન આવે છે. બધા વિચારો ખંખેરી અન...

  • It's a Boy

    સખત રડવાનાં અવાજ સાથે આંખ ખુલી.અરે! આ તો મારો જ રડવા નો અવાજ...

Categories
Share

मला स्पेस हवी पर्व २ भाग ७

मला स्पेस हवी पर्व २ भाग ७

मागील भागात आपण बघीतलं की रमणच्या बायकोला त्याच्या बद्दल संशय येतो पण खात्री नसते. या भागात बघू काय होईल


रमणची बायको प्रचंड तणावाखाली असते. भीतीचा एक प्रचंड मोठा गोळा तिच्या मनात गरगर फिरत असतो. तिला दोन वर्षांपूर्वीचा प्रसंग आठवला.

ती अशीच संध्याकाळी आपलं काम आटोपून आईवडिलांना भेटायला गेली होती. दारावरची तिने बेल वाजवली. दार उघडल्यावर दारात तिला बघताच तिची आई आनंदाने म्हणाली,

“ छकू किती दिवसांनी आलीस ग? कशात बिझी होतीस?”

आईने विचारलं.

“ अगं सध्या मी मुलांच्या जगात गुरफटून गेली आहे.”

“ त्यात रमण सुद्धा असेल त्रास द्यायला “

आईने हसत म्हटलं. छकूच्या चेहऱ्यावर उदास भाव आले. तिच्या मनात आलं की किती दिवस की महिने की वर्ष झालं रमणने आपल्याला छकू म्हणून हाकच मारली नाही.

लग्नानंतर त्याला जेव्हा कळलं माझं टोपण नाव छकू आहे तर हसला होता पण लगेच म्हणाला होता की मला छकू नाव खूप आवडलं तुला मी आजपासून छकू अशीच हाक मारणार. खरच त्या दिवसापासून रमण आपल्याला छकू म्हणायला लागला. रमणने छकू अशी हाक मारली की आपल्या अंगावर मोरपीस फिरायचं. हे मोरपीस कधी बंद झालं ?त्याचं छकू हाक मारणं कधी बंद झालं? लक्षात येत नाही.


“ छकू अगं कसल्या विचारात गढलीस?”

“ अगं काही नाही. कुठे बाहेर चालले का दोघं?”

छकू ने विचारलं.

“ नाही.मीच भाजी आणायला जाणार होते.तुझे बाबा काल म्हणाले छकू आणि रमणला घरी बोलाव”

“ कशाला?”

“ त्यांना काही बोलायचं होतं रमणशी”

“ काय बोलायचं होतं?”

“ ते तू त्यांनाच विचार.”

“ बरं”

असं म्हणून छकू वडलांच्या खोलीत गेली.ते कुठलतरी पुस्तक वाचत होते. छकुला बघताच त्यांनी पुस्तक खाली ठेवलं आणि हसत म्हणाले,

“ ये. मी उद्या परवा बोलावणारच होतो तुम्हा दोघांना.”

“ आई म्हणाली.काय काम होतं रमणशी?”

“ अगं मी मृत्यू पत्र करायचं म्हणतोय.”

“ करा. तुमचं वय बघता आणि आपल्या व्यवसायाचा पसारा बघता मृत्यू पत्र करा.पण रमणशी काय बोलणार होतात?”

“ अगं छकू तुमच्या लग्नानंतर रमणला मी म्हटलं तसं तो त्याची नोकरी सोडून मला मदत करायला आपल्या व्यवसायात आला. खूप काम करून त्याने व्यवसाय छान वाढवला. आता गेली पाच वर्ष झाली मी ऑफिसमध्ये येत नाही पण रमणने कुठेही कामात ढिलाई केलेली नाही तर मला वाटतं की माझ्या नंतर हा व्यवसाय रमणच्या नावे करावा?”

“ का? तुम्हाला मुलगी आहे नं? मग जावयाच्या नावे का व्यवसाय करायचा?”

“ अगं अशी रागावते का? तू आणि रमण वेगळे थोडीच आहात?”

“ बाबा आम्ही दोघं नवरा बायको असलो, एका घरात राहत असलो तरी दोन भिन्न व्यक्ती आहोत. तुमचा व्यवसाय तुमच्या नंतर आईचा होईल नंतर माझा. हे कायद्यानुसार आहे. मग माझ्यापेक्षा रमण का जवळचा वाटतोय?”

“ अगं गैरसमज नको करून घेऊस. रमण खूप धडाडीचा माणूस आहे म्हणून म्हटलं”

“ बाबा मी गैरसमज करून घेत नाही.तुम्ही चुकीचा निर्णय घेताय. आज तुम्ही रमणच्या नावे व्यवसाय केला. आणि तुम्ही गेलात. त्यानंतर रमणची नियत बदलली आणि मला त्याने त्याच्या आयुष्यातून दूर केलं तर? मी काय करू?”

छकूने आपल्या मनातील भिती बोलून दाखवली.

“ कुठे भलत्या टोकाचा विचार करतेस?”

“ बाबा पैसा बघीतला की कोणाचीही नियत बिघडू शकते.आपण कितीतरी उदाहरणं आपल्या आजूबाजूला बघतो पेपरमध्ये वाचतो. यावरून तरी शहाणे व्हा. तुम्ही माझ्या पेक्षा जास्त पावसाळे बघीतले आहेत तेव्हा ही गोष्ट मी तुम्हाला सांगायची गरज नाही. माझ्या ऐवजी जर मुलगा असता तर त्याच्या नावावर तुम्ही व्यवसाय केला असतात नं?“

“ अगं आपला रमण असा नाही. भलते विचार डोक्यात आणू नकोस छकू.”


छकूची आई इतक्या वेळ दोघांचं संभाषण ऐकत होती .छकूचं म्हणणं तिलाही पटलं नाही.

“ इथेच चुकतात तुम्ही. आपला बाब्या असा नाही असं प्रत्येकालाच वाटतं. वाईट घडलं की धक्का बसतो. आई बाबा वेळीच शहाणं व्हा. तुमच्या मनात असा काही विचार आहे हे त्याच्यापाशी बोलूनही दाखवू नका.”

बराच वेळ तिघही काहीच बोलले नाही.

“ बाबा तुमच्या पेक्षा मला रमण कसा आहे हे माहीती आहे. कारण चोवीस तास मी असते त्याच्याबरोबर.”

“ तुझ्या नावे करत नाही म्हणून राग येतोय का तुला?”
बाबांनी विचारलं.

“ अजिबात नाही. कायद्यानुसार हा व्यवसाय तुमच्या नंतर माझ्याचकडे येणार आहे कारण मी तुमची एकुलती एक मुलगी आहे. बाबा तुम्हाला एवढा साधा नियम माहिती नाही?”

“ माहिती आहे. मी विचार केला की रमणच्या नावावर व्यवसाय केला तर तो आणखी त्याला मोठं करेल. “

“ आताही त्याच्या नावावर व्यवसाय नसताना त्याने वाढवला आहे नं! तसाच वाढवेल नंतरही.”

खूप चर्चेनंतर छकुच्या बाबांनी निर्णय बदलला.


हि सगळी घटना छकूला आत्ता आठवली आणि तिने स्वतःलाच धन्यवाद दिले की तेव्हा आपण हे बाबांना बोललो नसतो तर आज रमणला ही कंपनी आपलीच आहे हे कळलं असतं. आत्ताच असा वागतोय मग तर मला गुंडाळून ठेवलं असतं.

आपलं नशीब चांगलं म्हणून आईबाबांच्या डोक्यातून हे खूळ गेलं.

किती तरी वेळ तिला रमणच्या आजच्या वागण्याचा अर्थ लागत नव्हता. असं काय झालं असेल की कधीही असा विमनस्क अवस्थेत न दिसणारा रमण गेले महिनाभर दिसतोय. त्यात भर म्हणजे आजचं त्यांचं हमसून हमसून रडणं. काय अर्थ लावायचा या सगळ्या गोष्टींचा.

तो नक्कीच कोणत्या स्त्री मध्ये गुंतला आहे. आजचं वागणं हे विफल प्रेमातून येतं. कोणत्या स्त्री च्या प्रेमात हा पडला आहे आणि याला अपयश आलंय? त्या स्त्रीने सरळ याच्या प्रेमाला नकार दिला का? आजपर्यंत याच्या राजबिंड्या रूपामुळे किती तरी स्त्रिया याच्या मागे यायच्या. एक दोघींना आपण याच्याबरोबर बघीतलं तेव्हा विचारलं रमणला तसं त्याने बेमालूमपणे आपली बाजू मांडली.

काही दिवस छकू सतत त्याच्या वागण्याकडे लक्ष ठेवून होती पण तिला काही सापडलं नाही. तिला काही सापडणार नाही अशी काळजी घेण्याएवढा रमण हुशार आहे हे तिला माहीत नव्हतं. रमण सेफ गेम खेळत होता. छकूचं सहावं इंद्रियं मात्र सतत तिच्या डोक्यात धोक्याची घंटी वाजवत होतं त्यामुळेच तिने लाख प्रयत्न करून आईवडिलांना त्यांचा निर्णय बदलवण्यास भाग पाडले होते.

आज तिला या गोष्टी बद्दल खूप समाधान होतं की पुढे मागे रमण विचीत्र वागला तरी तिचा व्यवसाय आणि घर यावर तिचीच पक्की हुकूमत असेल. वेळ आली तर ती मुलांच्या भविष्यासाठी कठोर पावलं उचलू शकेल.

आजचं रमणचं वागणं बघून तिला वाटायला लागलं की रमणला योग्य शब्दात समज द्यावी लागणार आहे. पण पहिले त्या स्त्री बद्दल कळायला हवं. ते कळून घेण्यासाठी कोणता मार्ग अवलंबावा यांचा ती विचार करू लागली.

रमण अजूनही बाल्कनीतच बसलेला होता. कोणतही काम न करता त्याला प्रचंड थकवा आला होता. मनावर कशाचा ताण आला तर शारीरिक मेहनती पेक्षा जास्त थकवा येतो हे रमणला आजकाल पटायला लागलं होतं.


“नेहा तू का माझ्या प्रेमाला प्रतिसाद देत नाहीस. मी फार दु: खी झालो आहे. तू माझ्या जवळ असलीस की मी आनंदाने जगीन. माझ्या जगण्यातला आनंद तू आहेस हे तू का समजून घेत नाहीस?”

रमण मनातच बडबडला.त्याच्या डोळ्यांनी चार दुःखाश्रू ढाळले आणि आपलं कर्तव्य बजावलं. रमणचं दुसरं मन मात्र हसत होतं. हसतच म्हणालं,

“ वा! काय रमणीय दृश्य आहे?”

“ पुन्हा आलास मला त्रास द्यायला?”

“ मग मी कुठे जाणार? मी सदैव तुझ्याच बरोबर असणार. मी तुला त्रास देत नाही. हा त्रास तू स्वतः ओढवून घेतला आहेस.”

“ तुला कळलं का तू कधी नेहाच्या प्रेमात पडलास ते?”

“ मला कळून उपयोग नाही.”

“ का? मला सावध करू शकत होतास?”

“ मी तुझं दुसरं मन आहे. माझं तू कधीच ऐकत नाहीस आणि ऐकलही नसतं मग मी कशाला तुला सांगायचे कष्ट घेऊ? म्हणून ठरवलं जे जे होईल ते ते पहावे.”
एवढं बोलून हसला.


“ म्हणजे तू माझी ही अवस्था बघून आनंद घेतो आहेस?”

रमण आता चिडला. चिडून त्याने समोरच्या स्टुलावर असलेला काचेचा फ्लाॅवर पाॅट उचलून फेकला. फ्लाॅवर पाॅट खाली जमीनीवर पडताच खळकन फुटला.

तो आवाज ऐकताच छकू दचकली आणि धावत समोरच्या खोलीत आली जिथे बाल्कनीत रमण बसला होता.

खाली जमीनीवर महागाईचा फ्लाॅवर पाॅट फुटून काचेचा गालिचा पसरलेला होता. हा फ्लाॅवर पाॅट रमणने छकूला वाढदिवसाला दिलेला होता. छकूला तो खूप आवडला होता. ते दृश्य बघून छकुली भीतीने थरथरली. तिला वाटलं हा काचेचा फ्लाॅवर पाॅट फुटला तसा आपला संसार उद्धवस्त होईल का? इतकी वर्षात सुख दुःखाच्या धाग्यांनी गुंफलेल्या आपल्या संसाराचं वस्त्र विशविशीत होईल का?

या विचारांनी छकुली भीतीने थिजली पण तेव्हाच तिचं लक्ष रमणकडे गेलं. रमण खुर्चीवर वेडावाकडा पडला होता आणि त्याच्या डोळ्यातून अखंड अश्रू धारा वाहत होत्या.

कसंबसं स्वतःला सावरत छकुलीने आधी खाली पडलेल्या काचा गोळा केल्या आणि रमणकडे धावली.

“ रमण ऊठ. रमण काय झालं? रमण काहीतरी बोल?”

रमण काही बोलत नव्हता आणि डोळे पण उघडत नव्हता. छकू घाबरली तिने मुलीला हाक मारायला सुरुवात केली.

छकुची मुलगी दिशा आत्ताच थोड्या वेळापूर्वी शाळेतून घरी आल्यावर झोपली होती. छकूच्या जोरजोरात हाका मारण्याने दिशा झोपेतून दचकून ऊठली आणि धावत समोरच्या खोलीत आली. छकूचा घाबरलेला चेहरा आणि वेडावाकडा पडलेल्या रमणला बघून दिशा जागीच स्तब्ध ऊभी राहीली. तिला समजत नव्हतं.

“ दिशा बघ काय झालं रमणला?”

दिशा छकूच्या बोलण्याने भानावर आली. दिशा लगबगीने रमण जवळ आली.
“ बाबा ऊठा.बाबा काय झालं तुम्हाला? असे कसे पडलात?”
छकू आणि दिशा दोघीही घाबरल्या. छकुला रडू यायला लागलं
“ आई मी डाॅक्टर काकांना फोन करते.”

एवढं बोलून दिशा फोन घेण्यासाठी आपल्या रूममध्ये पळत गेली.

_______________________________
क्रमशः
काय झालं असेल रमणला बघू पुढील