mala spes habi parv 2 bhag 11 in Marathi Short Stories by Meenakshi Vaidya books and stories PDF | मला स्पेस हवी पर्व २ भाग ११

Featured Books
  • My Wife is Student ? - 25

    वो दोनो जैसे ही अंडर जाते हैं.. वैसे ही हैरान हो जाते है ......

  • एग्जाम ड्यूटी - 3

    दूसरे दिन की परीक्षा: जिम्मेदारी और लापरवाही का द्वंद्वपरीक्...

  • आई कैन सी यू - 52

    अब तक कहानी में हम ने देखा के लूसी को बड़ी मुश्किल से बचाया...

  • All We Imagine As Light - Film Review

                           फिल्म रिव्यु  All We Imagine As Light...

  • दर्द दिलों के - 12

    तो हमने अभी तक देखा धनंजय और शेर सिंह अपने रुतबे को बचाने के...

Categories
Share

मला स्पेस हवी पर्व २ भाग ११

मला स्पेस हवी पर्व २ भाग ११

मागील भागात आपण बघीतलं की नेहाच्या ऑफिसमध्ये अचानक रमणची बायको आली. त्यामुळे नेहा गडबडली. आता पुढे काय होईल ते बघू.


छकु नेहाच्या ऑफिसमधून बाहेर पडली. इकडे नेहाच्या केबिनमध्ये नेहा आणि अपर्णा विचित्र भाव अवस्थेत होत्या.अपर्णांनी विचारलं,

“ नेहा मॅडम हे काय होतं?”

नेहा म्हणाली,

“ तेच मला कळत नाही. मला कधीच वाटलं नव्हतं की रमण शहाची बायको आपल्याला भेटायला येईल .एक प्रकारे ते बर झालं. मला सारखं मनातून वाटायचं की रमणच्या बायकोला त्याचं वागणं कळल्यावर तिची काय अवस्था होईल. त्यामुळे मला प्रचंड टेन्शन यायचं. बरं झालं ती आली आणि मी तिला खरं काय आहे ते कळलं.”

यावर अपर्णा म्हणाली,

“ खरं आहे मॅडम. इतकी विचित्र कंडिशन झाली होती तुमची.”


“ ऑफिसमध्ये काम करताना सतत माझ्या डोक्यावर त्या रमण शहाची टांगती तलवार असायची. हा कधी येऊन टपकेल याचा नेम नसायचा आणि हळूहळू मला त्याचं दर्शन सुद्धा नकोस वाटायला लागलं होतं.”

“ बरोबर आहे तुमचं म्हणणं कारण त्याच्यामागे असणाऱ्या बायका तशाच असल्यामुळे त्यांना याचं टेन्शन येत नसेल. आज रमण सरांची बायको इथे आल्यामुळे सगळं नीट झालं. उद्या तुमचे मिस्टर आणि ऋषी येतात आहे.तेव्हा दोन दिवस रमण शहा हा विषय मनात आणू नका. किती महिन्यांनी ऋषीचा चेहरा तुम्ही बघणार आहात. त्याचे लाडं लाडं बोलणं ऐकणार आहात. त्याचं तुमच्याबरोबरच वागणं हे सगळं तुम्ही एन्जॉय करा. तुमचे मिस्टरही किती महिन्यांनी तुम्हाला भेटणार आहे तेव्हा हा तुमचा फॅमिली टाईम आहे हे लक्षात घ्या.अजिबात कामाचं किंवा रमण शहाचं टेन्शन घेऊ नका.”


“हो. अपर्णा तू म्हणतेस तसेच करणार आहे आणि म्हणूनच आज मी जरा फार खुशीत होते उद्या हे लोक येणार आणि अचानकपणे रमण शहाच्या बायकोला समोर बघून मी दचकले. असं वाटलं की आताही काय बोलते आपल्याला आणि काय नाही पण फार समजुतदार वाटली.”

“ हो तुम्ही म्हणता ते खरं आहे. एखादी असती तर भांडली असती. कारण ब-याच बायकांना आपल्या नव-याचा दोष दिसत नाही. त्यांना वाटतं की आपला नवरा खूप सज्जन आहे आणि ही बाईच आपल्या नव-यावर जाळं टाकते आहे. “

“ तीच भीती मला वाटली म्हणून तिने जेव्हा मला ती कोण आहे हे सांगीतलं तेव्हा मी खूप घाबरले होते पण मनाशी ठरवलं की खरं काय आहे तिला सांगायचं. माझं नशीब चांगलं असेल तर ती समजून घेईल. सत्याची ताकद खूप असते हे मला कळलं.”

“ हे तर आहेच पण त्याचबरोबर तीही समजूतदार असल्याने मॅडम तुमच्या पुढील अडचणी कमी झाल्या. खूप छान पद्धतीने तिने या प्रकरणात तुमची बाजू समजून घेतली.”

“ तिला माहिती आहे की तिचा नवरा कसा आहे त्यामुळे तिला ते मान्य करावं लागलं.”

“ मॅडम खूपदा आपला नवरा फ्लर्ट आहे हे माहीत असूनही बायको दुसऱ्या स्त्रीवरच आरोप करते.”

“ हो तेही होतच म्हणून तर मला भीती वाटली. आज हा किस्सा संपला बरं झालं पण पूर्ण संपला आहे असं मला वाटत नाही.”

“ का? असं का वाटतं तुम्हाला?”

“ अगं त्याच्या बायकोपर्यंत ही गोष्ट संपली आहे पण रमण शहाला हे कितपत रूचेल माहीत नाही. तो कितपत नीट वागेल माहीत नाही. बायकोला कळणार नाही अश्या प्रकारे तो मला त्रास द्यायला लागला तर कठीण होईल.”

नेहाचा चेहरा अजूनही चिंताग्रस्त होता.

“ असं नाही होणार. मॅडम समजा रमण शहा असं वागलेच तर त्याच्या बायकोला लगेच फोन करा.’

अपर्णा म्हणाली.

“ माझ्या जवळ कुठे तिचा नंबर आहे? “

“ बरं ठीक आहे. वेळ आल्यावर बघू तिचा फोन नंबर कसा काढायचा ते. सध्या तरी ताण घेऊ नका. ऊद्या तुमच्या घरचे येतात आहे मन खूप शांत ठेवा “

हे बोलून अपर्णा हसली.

“ अपर्णा तू आहेस म्हणून बरंय ग . नाही तर मी रमणची बायको गेल्यावर वेड्यासारखी एकटीच विचार करत बसली असती आणि आणखी टेन्शनमध्ये आले असते.”

नेहा हसतच म्हणाली.

“ती मुलगी येईल थोड्यावेळाने. चालेल नं?”

“ कोणती मुलगी येणार आहे?”

काही लक्षात न आल्याने नेहाने विचारलं.

“ आपल्या जाहीरातीचं स्क्रिप्ट लिहिण्यासाठी बोलावलंय नं!”

“ हो. आलं लक्षात. मघाशीच सांगीतलंस तू मला. मध्येच ही रमणची बायको येऊन गेल्यामुळे विसरले.”

“ काही हरकत नाही. ती आली की तुमच्या कडे घेऊन येते.”

“ हो. काय नाव आहे तिचं?”

“ वर्षा मेहंदळे.”

“ वर्षा मेहंदळे”

नेहा स्वतःशीच पुटपुटली.

“ घेऊन ये तिला.”

नेहा म्हणाली. अपर्णाने होकारार्थी मान डोलावली आणि केबीनबाहेर पडली. अपर्णा गेल्यावर नेहाने एक दीर्घ श्वास घेतला आणि दोन्ही हात एकमेकांवर चोळून ते चेहऱ्यावरून फिरवले. हाताची गरम ऊर्जा आधी डोळ्यांवर लावली मग संपूर्ण चेहे-यावरून ते हात फिरवले. नंतर हळूच डोळे उघडले. नेहाच्या चेहऱ्यावर एक मंद हास्य उमटलं. या कृतीमुळे तिला खूप बरं वाटलं. मन स्थीर झाल्यासारखं वाटलं.

नेहा समोरच्या फाईल मधील राजेश सरांनी दिलेले टूर्सचे डिटेल्स बघत होती. तेवढ्यात तिचा मोबाईल वाजला. मोबाईलवर सुधीरचं नाव वाचताच तिच्या मनात ऋषीची आठवण तीव्र झाली.

तिने फोन घेतला.

“ हॅलो”

“ गुड मॉर्निंग.”

“ गुड मॉर्निंग.”

“ आज आवाज छान वाटतोय.”

“ हो. आज खूप वाटतंय.”

“ आम्ही आज संध्याकाळी निघतोय. सकाळी आम्ही कॅब करून येऊ. ऋषी तर कालपासून खूप एक्साईट आहे. “

“ मी सुद्धा.”

“ अगं वर्गात सगळ्या मित्रांना सांगीतलं आहे की मी ऊद्या गावाला जाणार आहे.आईकडे.त्याने त्याच्या टिचरला पण सांगीतलं.”

“ अरे बापरे! गंमत वाटतेय मला.”

नेहा हसतच म्हणाली.

“ त्याची पुढची गंमत ऐक. तो त्याच्या टिचरला म्हणाला टीचर मी तुमच्या साठी बंगलोर हून काय आणू?”
“ काय?”

“ हो. मग मी म्हटलं अरे तू कसं काय असं विचारलं तर म्हणतो कसा बाबा कोणी गावाला गेले की आपल्या लाडक्या लोकांसाठी गिफ्ट आणतात नं म्हणून मी म्हटलं. तुम्ही गावाला गेले की आणता नं माझ्यासाठी.”

“ बापरे! ऋषी मोठा झाला.”

“ हो मग. तुला माहितीय आजकाल तो शाळेतून आल्यावर स्वतःच स्वतःचा युनिफॉर्म काढतो धुवायला टाकतो. बूट मोजे काढतो. आजी आजोबांना वाकू देत नाही.म्हणतो ते ओल्ड झाले नं त्यांची कंबर दुखेल वाटलं की.”

या वाक्याने नेहाच्या डोळ्यात पाणी तरळलं. आई नाही म्हणून ऋषी एवढा शहाणा झाला. वयाच्या आधी लवकर मोठा झाला का?

“ नेहा ऐकतएस नं?”

“ हो ऐकतेय.”

“ मध्येच गप्प का झालीस? बरं वाटतंय नं? ऑफिसमध्ये असशील नं?”

“ हो रे एवढा घाबरू नकोस.मी ठीक आहे.मला ऋषी खूप लवकर मोठा झाला का असं वाटलं.”


“ अगं बाकी त्याच्या खोड्या चालू असतात. त्यामुळे तू फार सिरीयसली घेऊ नकोस.”

“ हं.”

“ ठीक आहे. मी रात्री निघाल्यावर तुला फोन करतो.”

“ हो.”

“ चल फोन ठेवतो.”

“ हं”

सुधीरने फोन ठेवला. नेहा नुसती फोनकडे बघत होती.
सहा महिन्यांपूर्वी जी नेहा पुणे सोडून बंगलोरला आली ती वेगळीच होती आज तिच्यात खूप बदल झाला आहे.

नात्यांमधला घोळ सहन न होऊन स्पेस हवी म्हणत ती बंगलोरला आली. स्त्रियांना एका मर्यादेपर्यंत सगळी घुसमट सहन केल्यानंतर कुठेतरी स्वतः साठी वेळ हवा असं वाटतं. काहीजणी ही भावना व्यक्त करतात काही जणी ती सहन करतात.

घरातील वातावरण विश्वासार्ह असेल तर स्त्री आपल्या मनातील ही भावना व्यक्त करायला धजावते.

सुधीरच्या घरचे सगळे समजूतदार असल्याने त्यांनी नेहाचं मन जाणून तिला हवी असलेली स्पेस मान्य केली म्हणून नेहाच्या मनात आता सुधीरला भेटण्याची ओढ लागली. तिच्या मनात आलेला रूक्षपणा आता जवळपास नाहीसा होत आला होता.

एक स्त्री म्हणून नेहाला सगळ्यांनी समजून घेतल्यामुळेच ती रमण शहाच्या बाबतीत ठाम होती. नेहाच्या मनातील सुधीरबद्दलचा प्रेमांकूर क्षीण झाला होता नाहीसा झाला नव्हता.

या सहा महिन्यांत तिच्या मनावर उमटलेले वळ हळूहळू नाहीसे झाले. तिच्या मनाला बरीच शांतता मिळाली त्याने तिच्यात बराच बदल झाला. मन आता हळूहळू मोकळं झालं होतं.

सुधीरचा आवाज तिला सहा महिन्यांपूर्वी ऐकायला पण नकोसा वाटत होता. आता तेवढा कोरडेपणा तिच्या मनाला राहिला नव्हता. आज सुधीरशी बोलताना वेगळीच स्पंदनं नेहाला जाणवली.

ही स्पंदनं पुर्वीच्या आवेगात रूपांतरीत होतील का? नेहाच्या आयुष्यातील हा प्रवास बघण्यासारखा असेल.

प्रेमाचे हिंदोळे हे आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर आकर्षक असतात. त्याचं सौंदर्य त्या त्या टप्प्याला साजेसे असतं. वयाचा बुंधा जरड होती आला तरी प्रेमाची झुळूक मनाला सुखावणारीच असते..
ऐकूया सुधीर आणि नेहाच्या प्रेमाचं हळुवार संगीत.
_______________________________
क्रमशः वाचकहो चालणार तुम्ही माझ्या बरोबर नेहा आणि सुधीरच्या प्रेमाचं संगीत ऐकण्यासाठी. समीक्षेत मनमोकळेपणाने सांगा म्हणजे मला त्यांच्या प्रेमाचा पारिजात कसा फुलला आहे हे सांगायला